प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें          
   
प्रेम- प्रेमाचें उगमस्थान मुख्यतः शारीरिक आहे. स्त्रीपुरुषजननेंद्रियसंयोग हें त्याचें बाह्य व प्रत्यक्ष स्वरूप होय. स्त्रीच्या व पुरुषांच्या शरीरांतील वीर्यजंतूंमध्यें परस्पराकर्षण व संयोग घडून येण्याची ही जी क्रिया ती प्रेमाचे भौतिक स्वरूप असून ही क्रिया सर्व जीवांमध्यें आढळून येते. या मूलभूत कल्पनेपासून पुढें प्रेमासंबंधीच्या इतर कल्पना मागाहून उद्भूत झालेल्या आढळतात. या दृष्टीनें प्रेमाचे दोन भाग पडतात. (१)  संयोगनन्य प्रेम व (२) दूरान्वित प्रेम. खालच्या जीवसृष्टीमध्यें व मनुष्यसृष्टीमध्यें संयोगजन्यप्रेमाचें स्वरूप सारखेंच असतें. पण खालच्या जीव सृष्टीमध्यें दुस-या प्रकारचें प्रेम दिसत नसून तें केवळ मनुष्यसृष्टींतच दृग्गोचर होत असतें. ज्याप्रमाणें खालच्या सृष्टींत व मनुष्य सृष्टींत मेंदु हा मुख्यतः भेददर्शक आहे, त्याचप्रमाणें खालच्या जीवसृष्टींतील व मनुष्यसृष्टींतील प्रेमाच्या स्वरूपामध्यें जें भिन्नत्व दृष्टीस पडतें त्याचें कारणहि मनुष्याचा मेंदु हा होय. मनुष्याचा मेंदु हा हल्लीं ज्या आकाराचा दिसतो तो आकार एकदम झालेला नसून तो त्याच्या पूर्वीच्या लहान आकारापासून पुढें मोठा होत आला आहे व अद्यापिहि तो मोठा होत जाईल असें शास्त्रज्ञांचें मत आहे. या मेंदूच्या वाढीमुळें शरीराच्या इतर अवयवांमध्यें कमी अधिक असे फरक झालेले आहेत. स्त्रीपुरुषव्यवहाराच्या बाबतींतील कल्पनांमध्येंहि या मेंदूमुळें अनेक परिणाम घडून आलेले आहेत. अगदीं प्राथमिक अवस्थांमध्यें, मनुष्याची प्रेमाची कल्पना इतर जीवसृष्टींतील जीवांच्या प्रेमकल्पनेप्रमाणेंच शारीरिक होती. पण मनुष्याच्या मेंदूची ज्या मानानें अधिक वाढ होत गेली त्या मानानें त्याच्या प्रेमविषयक शुद्ध भौतिक कल्पनेमध्यें फरक पडत चालला या वाढीबरोबरच मनुष्यजातीची अधिक सुधारणा होत गेल्यानें प्रेमाच्या या भौतिक कल्पनेमध्येंहि फरक घडून आला आहे. शारीरिक दृष्टया पाहिलें असतां असें आढळून येतें कीं, खालच्या जीवसृष्टींतील व अगदीं प्राथमिक अवस्थेंतील मानवजातींतील स्त्रियांमध्यें संभोगेच्छा कांही विशिष्ट काळींच उत्पन्न होते. पण मनुष्याच्या मेंदूच्या वाढीबरोबर ही विशिष्ट कालीं होणारी संभोगेच्छा नित्य संभोगेच्छेंत परिणत झाली असें दिसून येतें. हा खालच्या जीवसृष्टींमध्यें, प्राथमिक अवस्थेंतील मनुष्यामध्यें आणि सुसंस्कृत मनुष्यांमध्यें प्रेमविषयक कल्पनेंत मोठा फरक होय असें शास्त्रज्ञांनीं म्हटलें आहे. याला कारण म्हणजे प्रेमाच्या भौतिक कल्पनेंत मानसिक तत्त्वाचा प्रथम प्रवेश हें होय. हें मानसिक अगर उच्च तत्त्व ज्यावेळीं या प्रेमाच्या भौतिक कल्पनेशीं संबद्ध झालें त्यावेळीं, कालिक संभोगेच्छेचें नित्यसंभोगेच्छेंत रूपांतर झालें असें कॅंटनें म्हटलें आहे. या उच्च कल्पनेच्या भौतिक कल्पनेशीं झालेल्या मिलाफामुळें इतर बाबतींतहि बरेच महत्त्वाचे परिणाम घडून आले. उदाहरणार्थ प्राथमिक मनुष्यामध्यें व खालच्या जीवसृष्टींत संभोगाच्या बाबतींत घ्राणेंद्रियाची फार मदत होत असे. या घ्राणेंद्रियानें जननेंद्रियाचा प्रदेश हुंगण्याची, आणि स्तन हुंगण्याची क्रिया खालच्या जीद्यासृष्टीमध्यें व प्राथमिक अवस्थेंतील माणसामध्यें दिसून येत होती पण मेंदूच्या वाढीमुळें व मानसिक अगर उच्च कल्पनेच्या संबंधामुळें, घ्राणेंद्रियाचें फारसें महत्त्व न राहतां, दृष्टि, स्पर्श, इत्यादिकांनां महत्त्व येत चाललें. उदाहरणार्थ, खालच्या जीवसृष्टींत व प्राथमिक मनुष्यामध्यें अधर अगर शरीराच्या इतर भागांच्या स्पर्शाची कल्पना आढळून येत नाहीं; हुंगण्याची कल्पना मात्र दिसून येते. पण पुढील मनुष्यजातीमध्यें ही स्पर्शाची कल्पना पूर्णपणें अस्तित्वांत असलेली आढळून येते. चुंबन अगर कपोलस्पर्श इत्यादि प्रेमोद्दीपक प्रकार बरेच अलीकडील होत असें शास्त्रज्ञांचें मत आहे. स्पर्शाप्रमाणेंच दृगिंद्रियाचेंहि महत्त्व बरेंच वाढलें. दृष्टिपात हा प्रेमाचा संदेशवाहक होय अशी कल्पना उद्भूत झाली. दृगिंद्रियानें प्रेमवस्तूचें सौदर्य, आकार, रंग इत्यादि माहीत होतात. सहानुभूति व आकर्षण परस्परांमध्यें घडून येतें व प्रेमवस्तूची निवड करण्याच्या बाबतींत या दृष्टीचें फार महत्त्व असते. त्यामुळें नेत्रेंद्रिंयाचें महत्त्व हळूहळू अधिक होत चाललें. नेत्रेंद्रियाप्रमाणेंच कर्णेंद्रियासहि महत्त्व येत चाललें. मंजुळ आवाज हा प्रेमोत्पादक आहे अशी समजूत होत चालली. गायन हें प्रेमोद्दीपक आहे अशी जी कल्पना आज प्रचलित असलेली आढळून येतें तिचें मूळ या कल्पनेंत आहे.

तात्पर्य मेंदूच्या वाढीबरोबर प्रेमाची भौतिक कल्पना मागें पडली. प्रेम म्हणजे स्त्रीपुरूषजननेंद्रियसंयोग या कल्पनेबद्दल प्रेम हा एक मनोविकार आहे ही उच्च कल्पना अस्तित्वांत आली. सुख, दुःख, इच्छा, बुद्धि इत्यादि मानसिक गुणांचें प्राधान्य स्थापित झालें व प्रेमविषयक कल्पनेमध्यें क्रांति घडून आली.

पण प्रमाची भौतिक कल्पना जरी कमी महत्त्वाची मानण्यांत येऊं लागली तरी या भौतिक कल्पनेचा मानसिक कल्पनेशीं अत्यंत निकट संबंध आहे असें आढून येतें. कामविकार हा सर्व मनोविकारांचा उत्पादक होय अशी कल्पना कित्येक विचारी लोकांनीं प्रतिपादन केलेली आढळते. प्लेटोनें तर विचार म्हणजे उच्च प्रकारची शारीरिक चेतना असें म्हटलें आहे. प्रेम म्हणजे इच्छाशक्तीचें केंद्रस्थान अशी शोपेनहॉरनें व्याख्या केली आहे.

अशा रीतीनें प्रेमाच्या भौतिक व मानसिक स्वरूपांतील निकट संबधामुळें, तसेच प्रेमाच्या कक्षेंत सर्व प्रकारचे मनोविकार अंतर्भूत होऊं लागल्यामुळें प्रेम म्हणजे एक स्वतंत्र व प्रबल अशी शक्ति होय अशी प्रेमविषयक कल्पना रूढ होत चालली.

अशा रीतीनें प्रेम ही स्वतंत्र शक्ति मानण्यांत येऊं लागली व त्यासंबंधीं शास्त्रीय रीतीनें विचार करण्यास सुरवात झाली. प्रेमाचा व नीतीचा संबंध काय, प्रेमाचा व धर्माचा संबंध कितपत येऊं शकेल यासंबंधीं विद्वानांनीं आपलीं मतें प्रतिपादन करण्यास सुरवात केली. प्रेमाचा व सौंदर्याचा निकटवर्ती संबंध आहे ही कल्पना ब-याच प्राचीन काळापासून अस्तित्वांत असलेली आढळते. प्लेटोची प्रेमाची कल्पना शारीरिक सौंदर्यावरच अधिष्ठित झालेली आढळते. मध्ययुगामध्यें, शिलेदारीच्या काळांत प्रेम ही अतिशय उच्च व पवित्र भावना आहे असें मानण्यांत येऊं लागलें. अर्वाचीन काळांतहि शारीरिक सौंदर्य हा प्रेमामधील महत्त्वाचा भाग मानण्यांत येतो.

अगदीं प्राचीन काळीं ज्यावेळीं प्रेम म्हणजे स्त्रीपुरूष संभोग एवढीच कल्पना होती, त्यावेळीं स्त्रीपुरूष संबंध हा अनियमित असे. ज्या कोणा स्त्रीद्यार ज्या कोणा पुरूषाचें प्रेम जडे तो पुरूष त्या बाईशीं संभोग करून आपली वासना तृप्त करून घेई. पण अशा बेशिस्त प्रेमाला विवाहसंस्थेनें आळा घालण्याचा प्रयत्न केला. विवाहसंस्थेनें स्त्री व पुरूष यांच्या प्रेमाला शिस्तीचें स्वरूप दिलें. पण विवाहानें जरी अशी रीतीचप निर्बध घातले तरी बेशिस्त प्रेमाचा मार्ग त्यामुळें अजीबात बंद झाला नाहीं; व आज सुधारलेल्या राष्ट्रांतहि अशा प्रकारचीं नियमबाह्य प्रेमाचीं उदाहरणें हवीं तितकीं दाखवून देतां येतील. याचें एक मुख्य कारण म्हणजे विवाहसंस्थेनें प्रेमावर कृत्रिम दडपणें घालण्याचा प्रयत्न केला हें होय. उदाहरणार्थ, एखाद्या पुरूषाचा विवाह एखाद्या स्त्रीशीं व्हावयाचा तर त्यावेळीं प्रेमाला लागण-या आवश्यक वस्तू दोघांच्यामध्यें कितपत आहेत हें पहाण्याऐवजीं, या विवाहापासून इतर द्दष्टीनें कोणते फायदे होऊं शकतील याच्यावरच अधिक द्दष्टि ठेवण्यांत येऊं लागलीं. प््रोमापेक्षां उपयुक्ततेवरच अशा रीतीनें अधिक भर देण्यांत येऊं लागल्यामुळें, प्रेमाची गति वक्र मार्गानें सुरू झाली. याचा परिणाम असा झाली कीं एकाच पुरूषानें प्रेमासाठीं म्हणजे आपली कामवासना सुखानें तृप्त करण्यासाठीं बिन लग्नाची अशी उपपत्नी ठेवण्यास सुरवात केली. अर्वाचीन काळांत या दोन्ही अंगांचा एका ठिकाणीं मिलाफ करण्याचे प्रयत्न चालले आहेत. विवाहित स्त्रीनें आपलें शारीरिक सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न केल्यास सौंदर्य व उपयुक्तता या दोन्हीं अंगांचा एका ठिकाणीं मिलाफ होईल व त्यामुळें स्त्रीपुरूषसंबंधाला शिस्त लागेल अशी कल्पना अर्वाचीन काळांत प्रसृत होत चालला आहे. प्रत्येक स्त्रीपुरूषाला प्रेमस्वातंत्रय असलें पाहिजे हें तत्त्व १९ व्या शतकांत उदयास येऊं लागलें. प्रेमस्वातंत्रय याचा अर्थ बेशिस्त प्रेम असा मात्र नव्हे हें या ठिकाणीं ध्यानांत ठेवलें पाहिजे. प्रेमस्वातंत्रयानें प्रेमाला दाढर्य येतें, प्रेमाला चिरकालित्व येते, प्रेमावर कृत्रिम दडपणें अगर निर्बध घातल्यानें समाजाची नीतिमत्ता बिघडते अशा प्रकारच्या कल्पना १९ व्या शतकांत निर्माण झाल्या व त्या अद्यापिहि अस्तित्वांत आहेत. तात्पर्य, प्रेम व विवाह याचें परस्परैक्य घडवून आणण्याचा प्रयत्न अर्वाचीन काळांत चालला आहे असें म्हणतां येईल.

प्रेमाची उत्पत्ति व स्त्रीपुरुषविषयक प्रेमसंबंध या दोन मुद्यांचे आतांपर्यंत विवेचन केलें पण स्त्रीपुरुषविषयक प्रेम एवढयावरच प्रेमाची मर्यादा थाबूं शकत नाहीं. प्रेम हा ज्याप्रमाणें, शारीरिक त्याप्रमाणेंच मनाचा व्यापार आहे. ती एक प्रकारची भावना आहे. प्रेम हें स्त्रीवरच जडेल आणि पुरुषावर जडावयाचें नाहीं असें म्हणतां यावयाचें नाहीं. दोन पुरुषांमध्यें परस्पराविषयीं प्रेम उत्पन्न होणें अगदीं स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ, बापाचें आपल्या मुलावर प्रेम असूं शकेल, त्याचप्रमाणे एखाद्याचे आपल्या स्नेह्यावरहि असूं शकेल. पहिल्या बाबतींतील प्रेमाला वात्सल्य व दुस-या प्रकारच्या प्रेमाला स्नेह हें नांव देण्यांत येते. पण दोन्हीहि प्रेमाचेच प्रकार आहेत. मातेच्या अपत्यावरील प्रेमाला वात्सल्य हें नांव देण्यात येतें. एखाद्या व्यक्तीचें अखिल मानवजातीवर प्रेम असेल तर त्याला भूतदया म्हणण्यांत येईल पण हीं झालीं तरी प्रेमाचीच विशिष्ट स्वरूपें आहेत. तात्पर्य, प्रेम हें स्त्रीपुरुषांमध्येंच असतें असें नसून तें समान जातीयांमध्येंहि असतें असें आढळतें. याहिपेक्षां पुढें जाऊन असें म्हणतां येतें कीं, दोन समानजातीयांमध्यें देखील शारीरिक संबंध जडूं शकतो. समानजातीय व्यक्तींमधील संभोगसंबंध प्राचीन समाजांतच नव्हे तर अर्वाचीन काळांतहि दिसून येतो, व तो सर्व देशांत कमी अधिक प्रमाणांत आढळून येतो.

प्रेमाचे वात्सल्य, स्नेह, भूतदया, इत्यादि ज्याप्रमाणें भेद पडतात त्याचप्रमाणें त्याचे सात्त्विक, राजस व तामस असे गुणभेदहि पाडण्यांत आले आहेत. सात्त्विक प्रेम शील, सत्त्व, व पावित्र्य यांच्या पायावर उभारलेलें असतें. राजस प्रेम सहेतुक पण विवेकशील असतें. तामस प्रेम हें अगदीं हलक्या प्रकारचें असतें. प्रेमाचा उदय कसा होतो यासंबंधीं थोडेसें सांगणें जरूरीचे आहे. विशिष्ट कारणानेंच प्रेमाचा उदय होतो असें नक्कीं सांगतां यावयाचें नाहीं. कधीं कधीं प्रथमदर्शनानेंच प्रेमाचा उदय मनामध्यें उत्पन्न होतो. तथापि साधारणतः सौंदर्य, सहवास, स्वभावपरिचय यांमुळें प्रेमाचा प्रादुर्भाव होतो असें म्हणतां येईल. खरें प्रेम हें अनुभवगम्य असतें. त्याला रावरंक, कुरूप-सुरूप इत्यादि कृत्रिम भेद दिसत नाहींत.

प्रेमाचीं लक्षणें कोणतीं आहेत याचा विचार करूं लागल्यास असें आढळून येईल कीं प्रेमाच्या मुख्य लक्षणांमध्यें, प्रेमवस्तूंबद्दलचा निर्हेतुक आनंद हें प्रमुख लक्षण होय. प्रेमवस्तूंबद्दलचा निर्हेतुक आनंद म्हणजे त्या वस्तूच्या स्वत्वाबद्दल आदर दाखविणें हें होय. प्रेमवस्तूच्या सान्निध्यांत आनंद वाटणें हें ज्याप्रमाणें प्रेमाचें मुख्य लक्षण त्याचप्रमाणें प्रेमवस्तूच्या वियोगानें दुःख होणें हेंहि प्रेमाचें एक मुख्य लक्षण होय. वियोगदुःखामुळें प्रेमवस्तूंविषयीं अधिक उत्कंठा लागते व त्यामुळें प्रेम हें शुद्धतर बनत जातें. प्रेमवस्तूबद्दल आत्यंतिक श्रद्धा असणें हें प्रेमाचे तिसरें लक्षण होय.

स्वतःचा स्वतःवर जितका प्रबळ विश्वास असतो तितका प्रेमवस्तूविषयींहि जाज्वल्य विश्वास असला पाहिजे. इतका विश्वास असला म्हणजे प्रेमवस्तूविषयीं मनामध्यें ऐक्याची भावना निर्माण होते. प्रेमाचें ध्येय प्रेमवस्तूचें व आपलें ऐक्य होणें हें होय. तथापि हें ऐक्य होणें म्हणजे स्वतःचें स्वत्व अजीबात विसरून जाणें असें मात्र नव्हें; नीतिशास्त्राच्या दृष्टीनें विचार केला तर मनुष्याच्या मनामध्यें जोपर्यंत अहंभावना जागृत आहे तोंपर्यंत दोन वस्तूंमध्यें तादात्म्य घडून येणें कधींहि शक्य नाहीं, तात्पर्य वरील विधानांचा संकुचित अर्थ केला पाहिजे. दोन हृदयांचें ऐक्य झालें म्हणजे दोन व्यक्तींमध्यें जरी भिन्नत्व राहिलें तरी तें भिन्नत्व प्रेमाला विघातक होत नाहीं असा त्याचा अर्थ होय. अशा प्रकारचे ऐक्य निर्माण झालें म्हणजे प्रत्येकाच्या मनांत एक प्रकारची क्रांति घडून येते. अखिल सृष्टीच्या बुडाशी प्रेमाचीच कल्पना आढळून येते. प्रेमावरच मुळीं सा-या जगताचा डोलारा उभारला आहे. प्रेमाची भावना नष्ट झाल्यास सर्व जगाचा नाश होईल असें जें एका ग्रंथकारानें म्हटलें आहे तें अगदीं खरें आहे.

(संदर्भग्रंथ- आय्.ब्लॉच.-दि सेक्शुअल लाईफ ऑफ अवर टाईम, हॅव्हलॉक एलिस- मॅन ऍंड वूमन, स्टडीज इन सायकॉलजी- ऑफ सेक्स; एडबर्ड कार्पेंटियर- लव्हज कमिंग- ऑफ- एज; मेरी स्टोपे- मॅरेज; एच्.टी.फिंक- रोमँटिक लव्ह ऍंड पर्सनल ब्यूटी; वेस्टमार्क- हिस्टरी ऑफ ह्यूमन मॅरेज; चार्लस अलबर्ट- फ्री लव्ह; इलेन की- लव्ह ऍंड मॅरेज; जॉर्ज  हिर्थ- वेज टू लव्ह; डॉ. रॉडरिक हेलमन- सेक्शुअल फ्रीडम; राबर्ट मुलर- सेक्शुअल बायॉलजी.)

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .