प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
           
प्राणिशास्त्र (झोऑलोजी)- ह्या भूतलावरील सजीव सृष्टीमध्यें प्र्राणी व वनस्पती ह्या दोहोंचा समावेश होतो. प्राण्यांच्या संबंधाचें जें शास्त्र तें प्राणिशास्त्र. ह्या प्राणिशास्त्राप्रमाणें कांहीं प्राणी या भूतलावर नामशेष अथवा निर्वंश होऊन अश्मीभूत झालेले आहेत व इतर प्राणी हयात असून या भूतलावर आढळून येणारे आहेत. तेव्हां प्राणिशास्त्राची दोन अंगें होतात; एका अंगांत निर्वंश होऊन अश्मीभूत झालेल्या प्राण्यांचा समावेश होतो व त्यांत अशाच प्राण्यासंबंधीं वर्णन केलेलें असतें. या प्राणिशास्त्राच्या शाखेला निर्वंशजीवशास्त्र (पॉलीऑंटॉलजी) असें म्हणतात व ती एक निराळीच शाखा बनून राहिलेली आहे. दुसरें अंग म्हटलें म्हणजे ज्याच्यामध्यें हयात किंवा आजमितीस आढळणारे प्राणी ह्यांच्यासंबंधीं वर्णन केलेलें असतें तें होय. प्राणिशास्त्र ही संज्ञा ह्या दुस-या अंगाला संबोधून लावतात. तेव्हा प्राणिशास्त्र म्हणजे हयात असलेले प्राणी ह्याबद्दलचें शास्त्र होय.

प्राणी किंवा वनस्पती याविषयीं बोलतांना पहिल्याप्रथम आपल्या मनांत सजीवपणाबद्दल आपण बोलत आहों असा विचार येतो. तेव्हां जिवंत व निर्जीव वस्तू या दोहोंमध्यें काय भेद आहे हें जाणण्याविषयीं जिज्ञासा उत्पन्न होणें साहजिक आहे. या दोहोंतील भेद येणेंप्रमाणें- पहिला शरीराची वाढ होण्याची रीत- प्राण्याची वाढ होण्याची रीत अशी आहे कीं, ते कांहीं बाहेरचे पदार्थ आपल्या शारीरिक द्रव्याव्यतिरिक्त असे अन्नादाखल शरीरांत घेतात व त्यांनां आपल्या शारीरिक द्रव्यांचें रूप देऊं शकतात. या क्रियेला पचनक्रिया म्हणतात व हिच्यामुळें नवे व जुने शारीरिक कण सर्व एकत्र मिसळून जाऊन शरीराची वाढ होते. येथें मुख्य गोष्ट लक्षांत ठेवावयाची ती हीच कीं, या क्रियेंत नवे व जुने कण ओखळतां येत नाहींत अशा रीतीनें ते एकमेकांशीं मिसळून जातात. नवे कण म्हणजे कांहीं नुसते बाहेरून वरवर थरांच्या रूपानें लागून शरीराची वाढ घडवून आणीत नाहींत. एखादा क्षाराचा स्फटिक त्याच क्षाराच्या पाण्यामध्यें कांहीं वेळ लोंबकळत ठेविला असतां त्याला बाहेरून क्षाराच्या कणांच्या थरांचीं पुटें लागून वाढतो. या स्फटिकाच्या वाढींत व जिवंत सृष्टीच्या वाढींत मुख्य फरक आहे तो हा कीं, हे नवीन लागलेले कण जसेच्या तसेच त्यांच्यांत कांहींहि रासायनिक फेरफार झाल्याशिवाय लागतात. आणि ते सर्व बाहेरच्या पृष्ठाला लागलेले असल्यामुळें नवे व जुने कण ओळखतां येतात. तसेच दुस-या त-हेच्या रासायनिक क्षाराच्या पाण्यांत ह्या स्फटिकाची वाढ होऊं शकत नाही, म्हणजे बाहेरील द्रव्यांनां आपल्या शारीरिक द्रव्याचे रूप देण्याचीं शक्ति ह्या स्फटिकाला नाहीं. पचनक्रिया निर्जीव वस्तूंमध्यें होत नाहीं. व पचनक्रियेच्या अभावीं खरी वाढ होत नाहीं, तेव्हां नुसती वाढ होणें ही गोष्ट मुख्य नसून वाढ होण्याची रीत हीच मुख्य गोष्ट होय.

दुसरा भेद जीवफे-यांतील घडामोडी हा होय. निर्जीव वस्तूमध्ये घटनेसंबंधी फेरफार होण्याची प्रवृत्ति नसून ते जसेच्या तसेच राहतात. जिवंत वस्तूमध्ये नेहमीं घटकद्रव्यांच्या संबंधी घडामोडी होऊन फेरबदल होत असतात व त्यांची प्रवृत्तीच अशी असते कीं, कोणतीही क्रिया जिवंतपणें घडत असल्यास त्या क्रियेचें घडून येणें हें चैतन्यद्रव्याचा उच्छेद थोड्याबहुत प्रमाणावर होण्यावरच अवलंबून असते. चैतन्यद्रव्याचा मंद परंतु नित्य उच्छेद होऊन त्याचें निर्जीव पदार्थांत रूपांतर होणे ह्यावरच जीवफे-यामधील घडोमाडी अवलंबून असतात व सजीवतेची दर्शक हीच गोष्ट आहे. आणि ह्याचमुळें चैतन्यद्रव्याचा जो-हास होतो त्याची भरपाई करण्यासाठीं शरीरांत नित्य अन्न घेऊन तें पचन करून अचेतन रूपांतून चैतन्य रूपांत आणलें जातें. ही शरीराची भरती ओहोटी चालू असणें ह्यालाच जीवनक्रिया (मेटॅबोलिझम) म्हणतात व या जीवनक्रियेमध्यें अन्नापासून चैतन्यद्रव्य उत्पन्न होण्याच्या क्रियेला निर्माणजीवनक्रिया ((ऍनाबोलिझम) असें म्हणतात व चैतन्यद्रव्याचा उच्छद होऊन निर्जीव द्रव्यें शरीरांत उत्पन्न हाणें त्याला व्यवच्छेदजीवनक्रिया (कॅटाबोलिझम) असें म्हणतात व ह्या सर्व घडामोडी चैतन्याची साक्ष देतात; म्हणून यांनां जीवफे-यामधल्या घडामोडी म्हणतात. प्राण जाईपर्यंत या अशाच शरीरांत चालतात.

तिसरा भेद, बाह्यसृष्टीशीं मिलाफः- भौतिक व रासायनिक शक्ति आपला पगडा निर्जीव वस्तूंवर चालविण्यास नेहमीं तत्पर असतात व त्यांची क्रिया नेहमीं चालू असते. निर्जीव वस्तूंमध्ये या शक्तींनां क्षणभर सुद्धां थाबविण्याची किंवा त्यांच्या कार्यात फरक घडवून आणण्याची अथवा त्यांचा प्रतिकार करण्याची शक्ति नसते. यामुळें त्यांच्यावर झालेले परिणाम तात्काळ दिसून येतात. ह्याच्या उलट सजीव शरीर, त्याच्या चैतन्यशक्तीमुळें ह्या शक्तींचा पगडा आपल्यावर चालू देत नाही. किंवा त्यांच्या कार्याचे वाईट परिणाम अटकावूं शकतें. उदाहरणार्थ, जिवंत शरीर व शव.

४ था भेद, प्रजाजनकत्वः- प्रत्येक जीवंत प्रकृतिरूपाला स्वतःसारखीं रूपें उत्पन्न करण्याची शक्ति असते. शरीराचे कांहीं भाग ताबडतोब किंवा कांहीं वेळानें प्रत्येक प्रकृतिरूपाला काढून टाकण्याची शक्ति असते. हे शारीरिक भाग किंवा पेशीसम बीजांकुर योग्य व अनुरूप परिस्थितीमध्यें असतां आपल्या उत्पादकाप्रमाणें त्यांच्यासारख्या रूपांत विकास पावतात व त्यांच्यामध्यें सुद्धां पुढें ही प्रजाजनकत्वाची क्रिया घडून येते.

५ वा भेद, बाह्यसृष्टिज्ञानः- प्रत्येक प्रकृतिरूप हें चैतन्यद्रव्याचें झालेलें असल्यानें त्याला इंद्रिय असणें हें स्वाभाविक आहे. कारण हा एक चैतन्यद्रव्याचा गुण आहे. ह्या गुणामुळें बाह्यसृष्टीचें ज्ञान होतें.

आतां जिवंत प्रकृतिरूपांचें जीवित्व जीवात्म्यांवर अवलंबून असतें असें नेहमीं सांगण्यांत येत असते. परंतु जीवात्मा काय वस्तू आहे हें निश्चित असें सांगतां येत नाहीं. त्याचा संबंधींचें कोडें अजून उकललें गेलें नसल्याकारणानें त्याच्याबद्दल वाटाघाट न करतां कोणतीं विशिष्ट अनुकूल अशी स्थिति प्राप्त झाली असतां प्रकृतिरूपांच्या ठायीं चैतन्य अथवा जीवनशक्ति व्यक्त होऊं शकते ह्याबद्दल थोडा विचार करणें आवश्यक आहे. सजीव सृष्टीचें अवलोकन व शोधन केलें असतां असें आढळून येतें कीं, चैतन्यशक्ति ही कांहीं विवक्षित गोष्टी साध्य झाल्या असतां व्यक्त होते अथवा चैतन्यशक्ति व्यक्त होण्यास त्या सर्व गोष्टींची जरूरी आहे व त्या सर्वांचा मिलाप झालाच पाहिजे. या गोष्टींपैकीं प्रथम एक अंतर्गत मुख्य गोष्ट ही आहे की, एक विशिष्ट द्रव्यज्याला चैतन्याचें भौतिक मूल किंवा आधार असें म्हणतां येईल-व जें सजीवत्वास साक्षात कारणीभूत होतें तें-प्रत्येक प्रकृतिरूपांत प्रत्यक्ष अस्तित्वांत असलें पाहिजे. याला आद्यद्रव्य किंवा चैतन्यद्रव्य (प्रोटोप्लाझम,बायोप्लाझम) अशीं संज्ञा देतात. जिवंत शरीराच्या कोणत्याहि भागांमध्यें एखादी शारीरिक क्रिया प्रत्यक्ष घडत असल्यास असे आढळून येतें कीं, तेथें हें चैतन्यद्रव्य प्रत्यक्ष अस्तित्वांत असतें. शरीराच्या ज्या भागांत हें चैतन्यद्रव्य प्रत्यक्ष अस्तित्वांत नाहीं तेथें चेतनाक्रिया घडून येत नाहींत. एकंदर अवलोकनावरून असें सिद्ध होतें कीं सर्व शरीर सबंध चैतन्यद्रच्याचेंच बनलेलें असलें पाहिजे असें नाहीं. चैतन्यद्रव्याबरोबर दुसरीं द्रव्यें मिळून शरीराची रचना झालेली असते, तथापि प्रत्येक जिवंत शरीरामध्यें प्राण्याच्या दर्जाप्रमाणें हीं निर्जीव द्रव्यें थोड्या अधिक प्रमाणानें युक्त झालेलीं असतात. अति सूक्ष्म क्षुद्रजंतूचीं शरीरें सर्वस्वी ह्या चैतन्यद्रव्याचीं-त्यांत कांहीं फरक न होतां-झालेलीं असतात. उच्च दर्जाच्या संकीर्ण प्रकृतिरूपांमध्यें जीं निर्जीव द्रव्यें युक्त झालेलीं असतात ती सर्व या चैतन्यद्रव्यापासूनच उत्पन्न झालेलीं असतात. जरी संकीर्णप्रकृतिरूपांच्या शरीरांत निर्जीव द्रव्यें असली तरी त्यांच्या शरीरांत ज्या भागांत चैतन्य किंवा सजीवता अंतस्थ आढळून येते ते भाग चैतन्यद्रव्याचेच बनलेले असतात. चैतन्य द्रव्य प्रत्यक्ष अस्तित्वांत असणें ही अंतर्गत गोष्ट जरी साध्य झाली तरी जीवित्व किंवा जीवाचे व्यापार व्यक्त होण्यास दुस-या उपांग गोष्टींची सिद्धता व्हावी लागते व त्या गोष्टी साध्य झाल्या तरच जीवाचे च्यापार चालू शकतात व दृष्टीगोचर होतात. परंतु जर ह्या उपांग गोष्टी साध्य झाल्या नाहींत तर जीवित्व निद्रितावस्थेंत किंवा सुषुप्तावस्थेंत फार किंवा थोडा वेळपर्यंत राहतें. उदाहरणार्थ, पक्ष्यांचीं अंडीं किंवा झाडांचें बियाणें. कांहीं वेळां ही अवस्था विकास पावलेल्या प्राण्यांत किंवा वनस्पतींत सुद्धां आढळून येते. या उपांग गोष्टींपैकीं पहिली गोष्ट म्हटली म्हणजे पाणी होय व तें चैतन्यद्रव्याशीं संलग्न होऊन राहिलेलें असते. चैतन्य द्रव्यांत त्याच्याशी संलग्न होऊन राहिलेले पाणी थोडें किंवा जास्त प्रमाणावर नेहमीं असतेंच. हें पाणी चैतन्यद्रव्यांतून अगदीं समूळ काढून टाकलें असतां त्याचें चैतन्य अथवा जिवंतपणा नष्ट होतो. परंतु तें पाणीं थोड्याबहुत प्रमाणानें निघून गेलेलें असलें किंवा काढून टाकलें तर चैतन्यद्रव्याचा जिवंतपणा नष्ट न होतां त्याच्या जिवंतपणाचे व्यापार मात्र व्यक्त होत नाहींत. उदाः-बियाणें, दुसरी उपांग गोष्ट म्हटली म्हणजे चैतन्य द्रव्यामध्यें थोडीबहुत उष्णता असणें. उदाहरणार्थ, पक्ष्यांचीं अंडीं. या उष्णतेचें मान मात्र निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळ्या प्रमाणांत असतें व थोड्याबहुत प्रमाणावर ती उष्णता शरीरांत चैतन्याचे व्यापार बंद न पडतां कमी जास्त होऊं शकते. जसें मनुष्य, पक्षी, बेडूक इ. उच्च दर्जाच्या प्राण्यांत त्यांच्या शरीरांतील उष्णता जीवित्व कायम राहून फारच थोड्या प्रमाणानें कमी जास्त होऊं शकते; उदा–मनुष्य. परंतु अगदीं खालच्या दर्जाच्या प्राण्यांत हें मान जास्त असूं शकतें. तिसरी उपांगी गोष्ट म्हटली म्हणजे प्राणवायु प्रत्यक्ष असून तो चैतन्यद्रव्यास उपलब्ध असणें. चैतन्याचे किंवा जिवंतपणाचे व्यापार, व्यक्त होण्यास चैतन्यद्रव्याशीं प्राणवायु संलग्न झालाच पाहिजे. जिवंतपणामध्यें हा एक चैतन्यद्रव्याचा चालू व्यापारच आहे व तो होत असतांना चैतन्यद्रव्य हवेंतील प्राणवायु शोषून घेतें व कॅर्बालिक ऍसिडवायु व थोडी पाण्याची वाफ बाहेर टाकिते. जिवंतपणाची ही खूणच आहे व यालाच श्वासोच्छ्वासाची क्रिया असें म्हणतात. ही प्राणवायु शोषून घेण्याची क्रिया होत असतांना चैतन्यद्रव्यामध्यें थोडा फरक होऊन तें प्राणवायूच्या संलग्नक्रियेमुळें (प्राणिदीकरणामुळें) अस्थिर होतें व लगेच त्याच्यामध्यें उच्छेदजीवनक्रिया घडून येऊन त्याच्यापासून कांहीं निर्जीव अशीं द्रव्यें उत्पन्न होतात व त्या उच्छेदजीवनक्रियेचा परमावधि झाल्यानें तर एकतर्फी कॅर्बालिक ऍसिडवायु व पाण्याची वाफ अशी द्रव्यें बाहेर पडतात व दुस-या परीनें एकसमयावच्छेदेंकरून लगेच पुन्हां निर्माणजीवनक्रिया सुरू होऊन चैतन्यद्रव्य बनूं लागतें. प्राणवायूच्या संलग्न क्रियेमध्यें लांकूड किंवा कोळसा जळतो व तो जळत असतांना म्हणजे ती क्रिया चालू असतांना उष्णता उत्पन्न होते व ती बाहेर पडतें. तसेंच या प्राणवायूच्या संलग्नक्रियेमध्यें प्रकृतिरूपाच्या चैतन्यद्रव्यापासून उष्णता उत्पन्न होते. परंतु ही प्राणवायुसंलग्नक्रिया चैतन्यद्रव्यामध्यें फार मंद रीतीनें होत असते व ती क्रिया सतत चालू असते. ती तशी चालू राहाण्याकरितां मोकळा असा प्राणवायु प्रत्यक्ष अस्तित्वांत असणें आवश्यक होतें. या गोष्टीला अपवाद म्हणजे प्रकृतिरूपाला प्राणवायूची आवश्यकता नसते अशीं कांहीं अगदीं खालच्या दर्जाचीं प्रकृतिरूपें ज्यांनां बॅक्टेरिया अथवा सूक्ष्मजंतू म्हणतात हीं आहेत. त्यांनां प्राणवायूची जरूरी त्यांच्या जीवनक्रियेंमध्यें लागत नाहीं. सारांश, चैतन्यद्रव्य म्हणजे प्राण व चैतन्यद्रव्याखेरीज प्राणिप्रकृतिरूप किंवा वनस्पतिप्रकृतिरूप असूं शकत नाहीं तेव्हां चैतन्यद्रव्य म्हणजे काय याविषयीं थोडासा खुलासा करणें जरूर आहे. चैतन्यद्रव्य म्हणजे तो घन पदार्थाहि नाहीं तसाच प्रवाही पदार्थहि नाहीं. तर थोडा घन व थोडा प्रवाही असा मध्यम रीतीचा चिकचिकीत निर्मळ किंवा अतिसूक्ष्म कणयुक्त असा हा पदार्थ असून त्याची रासायनिक घटना फारच दुर्धर अथवा गुंतागुंतीची अशी असते. चैतन्यद्रव्य म्हणजे एकाच त-हेंचें एखादें रासायनिक द्रव्य नसून बहुविध असें एक रासायनिक मिश्रण असतें व या मिश्रणांतील अगदीं महत्त्वाची रासायनिक द्रव्यें म्हटलीं म्हणजे मांसोत्पादक द्रव्यें औजस (प्रोटीड) द्रव्ये होत. ही मांसोत्पादक द्रव्ये म्हणजे फार गुंतागुंतीचे रासायनिक पदार्थ होत व तीं सर्व कर्ब, प्राणवायु, उज्ज (हैड्रोजन), नत्र (नैट्रोजन), गंधक अशा रासायनिक मूल द्रव्यांचीं बनलेलीं असतात. कित्येक वेळां या घटकद्रव्यांमध्यें स्फुर (फॉस्फरस) हें मूलद्रव्यहि अंतर्भूत झालेलें असते. मांसोत्पादक द्रव्याचें अगदीं चांगलें उदाहरण म्हणजे पक्ष्याच्या अंडयांतील शुभ्र बलक हें होय. चैतन्यद्रव्याशीं वर सांगितल्याप्रमांणें जिवंतपणीं पाणी पुष्कळ प्रमाणानें संलग्न झालेलें असतें व तें पाणी चैतन्यद्रव्यानें नुसतें शोषून घेतलेलें असतें. चैतन्य द्रव्याला फार उष्णता दिली असतां तें गोठून जाऊन गतप्राण होतें. तसेंच तें मद्यार्कामध्येंसुद्धां गोठून जातें. चैतन्यद्रव्याच्या जिवंतपणीं त्याच्यामध्यें विशेष एक गुणधर्म दिसून येतो तो हा कीं, ते संकोच व विकास पावतें व त्याच्या संकोच-विकास पावण्यानें प्रकृतिरूपाची हालचाल घडून येते. ही हालचाल चैतन्यद्रव्य आपोआप संकोचविकास पावून घडवून आणूं शकतें किंवा ती हालचाल एखाद्या बाह्यकारणामुळें चैतन्यद्रव्य संकोचविकास पावून घडून येते. एकंदरीत असे म्हणतां येईल कीं चैतन्यद्रव्य स्वयंगतिक (आटोमॅटिक) आहे व सचेतन व इंद्रियगोचरहि (इरिटेबल) आहे.

वर म्हटलें आहे कीं प्राण म्हणजे चैतन्यद्रव्य व चैतन्यद्रव्य हें विविध मांसोत्पादक द्रव्याचें एक मिश्रण आहे. तरी रसायनशाळेंत नामांकित रसायनशास्त्रवेत्त्यांनीं मांसोत्पादक द्रव्यांचीं नानाविध मिश्रणें प्रयोगरीत्या तयार करण्यांत आपली शिकस्त केली तरी प्राण किंवा चैतन्यस्फूर्ति त्या मिश्रणांत उत्पन्न करतां आली नाहीं. आतां वर सांगितल्याप्रमाणें प्राण म्हणजे काय ह्यासंबंधीं वाटाघाट न करतां इतकें तरी सिद्ध होतें कीं, प्राणधारण करणा-या व्यक्ती किंवा प्रकृतिरूपें हीं चैतन्यद्रव्याचीं झालेलीं असतात किंवा त्यांच्या शरीरांत चैतन्यद्रव्य असतें. चैतन्यद्रव्याशिवाय प्राणधारणा होत नाहीं. हीं प्रकृतिरूपें किंवा प्राणधारण करणा-या व्यक्ती या जगांत कशा उत्पन्न झाल्या ह्याविषयीं थोडासा विचार करणें जरूर आहे. अगदीं प्रथमतः सृष्टि कशी उत्पन्न झाली व तींत प्रथमतः प्राणी व वनस्पती कसें अस्तित्वांत आले या गहन विचारांत न शिरतां व्यवहारज्ञान आपणांस आज सांगत आहे कीं, प्रत्येक प्राणी किंवा वनस्पति हीं प्रजारूपानें पूर्वज प्राणी किंवा वनस्पती ह्यांपासून उत्पन्न झालेले आहेत व होत आहेत. एकंदरींत म्हणावयाचें म्हणजे 'जीवो जीवस्य कारणं' हाच न्याय चालू आहे. ह्या जगावर किती तरी त-हेचे प्राणी वास करीत आहेतÑ त्यांचा एकंदर तपशील घेतला तर आपणांस असें आढळून येईल कीं, कांहीं प्राणी उच्च दर्जाचे आहेत. जसे सपृष्ठवंश (व्हर्टेब्रेट) प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांच्या शरीरांत हाडांचा कणा झालेला आहे असे प्राणी. ह्यांत ठळक असे किती तरी वर्ग आहेत. उदाहरणार्थ, सस्तनप्राणी-मनुष्य, वानर, वाघ, मांजर, कुत्रा, गाई, घोडा इत्यादि ह्या वर्गांत मोडतात. दुसरा वर्ग म्हणजे पक्ष्यांचा होय. तिस-यांत सर्प, सुसर, सरडे वगैरे सरपटणारे प्राणी. चौथ्या वर्गांत बेडूक व त्यासारखे जलस्थलचर प्राणी व पांचव्या वर्गांत मासे मोडतात. व्याहारिक ज्ञानानें आपणांस साधारपणें कळतें कीं, ह्या सर्व उच्च दर्जाच्या प्राण्यांची उत्पत्ति त्यांच्या पूर्वजांपासून प्रजाजनकत्व व प्रजेचा विकास पावणे ह्या रीतीनेंच झालेली आहे व होत आहे. या गोष्टीला दुसरा अन्य मार्गच नाहीं. तेव्हां ही कल्पना म्हणजे, 'जीवो जीवस्य कारणं,' आज मितीस बरोबर आहे. व तदनुरूपच प्राण्यांची उत्पत्ति व वाढ होत आहे हें जरी खरें आहे तरी प्रश्न उद्भवतो तो हाच कीं, या सर्व वर्गांतील प्राण्यांचे एक एक प्रतिरूप पूर्वज जोडप्या-जोडप्यानें सृष्टीवर एकाकाळीं निर्माण झाले असावेत व ते कसे व केव्हां झाले असावेत ह्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मिळालेलें नाहीं. याच्या खालच्या दर्जाचे प्राणी म्हणजे ज्यांच्या शरीरांत पाठीचा कणा नाहीं असे व ज्यांनां अपृष्ठवंश प्राणी ही संज्ञा आहे ते, यांत सुद्धां पुष्कळ त-हेचे प्राणी असून त्यांचेहि निराळेनिराळे वर्ग आहेत. उदाहरणार्थ मृदुकाय प्राणीः यांत गोगलाई, शिंपले, बायव्हॉल्ह; म्हांकूल (सेपिया) इत्यादि प्राणी मोडतात. दुसरा वर्ग संधिपाद (आर्थोपोड) यांचा होय. जसें शेंवडा, झुरळ, माशी, विंचू, कोळी, गोम, इत्यादि. तिस-या वर्गांत कंगणीदार प्राणी (अन्यूलोटा) मोडतात. जसें-गांडूळ, जळूं इत्यादि. अपृष्ठवंशप्राण्यांतील अगदीं शेवटल्या दर्जाचा वर्ग म्हटला म्हणजे आद्यजंतूंचा (प्रोटोझोआ) होय. यांत अतिसूक्ष्म प्राणी मोडतात. आतां साधारणरीत्या पाहतां नैसर्गिक नियम हाच दिसून येतो कीं जीवापासून जीवाची उत्पत्ति होते. तेव्हां साधारणतः असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं, सर्व प्राणिमात्राची उत्पत्ति व वाढ जीवजीवोत्पत्ति (किंवा जीवमूलक जीवोत्पत्ति) ह्याच न्यायानें होते व झाली आहे. परंतु आद्यजंतूंसारखे प्राणी लक्षांत आणिले व त्यांची शारीरिक रचना ध्यानांत घेतली म्हणजे ते केवळ चैतन्यद्रव्याचे सूक्ष्म निरवयव ठिपकेच होत. अशीं निरवयवें व साध्या चैतन्यद्रव्याचीं ठिपक्यासारखी प्रतिरूपें निसर्गतः सहजगत्या होऊं शकण्यासारखीं असली व होतहि असलीं, व जर चैतन्यद्रव्य निसर्गतः बनत असेल, तर कांहीं प्राणिशास्त्रज्ञांची अशी समजूत होतीं कीं, सहजजीवोत्पत्ति किंवा निर्जीवमूलक जीवोत्पत्ति आजमितीसहि घडून येत आहे. सहजजीवोत्पत्ति अथवा निर्जीवमूलक जीवोत्पत्ति हें मत अनुभवसिद्ध नाहीं व प्रयोगसिद्धहि नाहीं. तूर्त बहुतेक प्राणिशास्त्रज्ञाचें मत कायम धरून चालावयाचें. यापलीकडे जाण्याची जरूरी नाहीं.

आतां प्रश्न असा आहे कीं, प्रकृतिरूप व्यक्ति किंवा प्राणी कोणाला म्हणावयाचें व त्याला कसें ऒळखावयाचें? सावयव प्राण्यांतील व्यक्ति ओळखणें कठिण पडत नाहीं, कारण तशा प्रत्येक व्यक्तिमात्रांत जीवंतपणीं कांहीं शारीरिक व्यापार साधारणतः सारखे घडत असतात. ते व्यापार ठोकळ मानानें पचनक्रिया, श्वासोच्छवासाची क्रिया, प्रजाजनकत्व व बाह्यसृष्टिज्ञान इत्यादि होत. ह्या कसोटीनें पाहिलें तर अगदीं खालच्या दर्जाचें निरवयव साधे प्राणी जे नुसते चैतन्यद्रव्याचे एक एक ठिपके असे असतात व ज्यांनां आद्यजंतू ही संज्ञा आहे, ते सुद्धां व्यक्तिशः प्राणी होत. कारण ह्या प्रत्येक चैतन्यद्रव्याच्या ठिपक्याचा आयुष्यक्रम ताडून पाहिला तर त्यांत हे वर ठोकळमानानें सांगितलेले सर्व शारीरिक व्यापार घडून येतात तेव्हां प्रत्येक चैतन्यद्रव्याचा स्वतंत्र असणारा ठिपका, ज्यांच्यांत वर सांगितलेले सर्व व्यापार घडत आहेत तो व्यक्तिशः एक प्राणी होय. ह्याच्या वरच्या दर्जाचे प्राणी यांच्या शरीराचें पृथक्करण करून पाहिलें असतां असें आढळून यईल कीं त्यांचीं शरीरें चैतन्यद्रव्याचे अनंत ठिपके– आद्यजंतूंच्या शरीराच्या  चैतन्यद्रव्याच्या ठिपक्यांप्रमाणें दिसणारे-एकत्र होऊन झालेलीं असतात व यांचा जीवनारंभ चैतन्यद्रव्याच्या मूळ एक ठिपक्यापासून झालेला असतो. त्यांच्याहि वरच्या दर्जाच्या सावयव प्रण्यांमध्यें सुद्धां असेंच दिसून येतें तेव्हां प्राण्यांच्या उच्च किंवा खालचा दर्जा हा ठोकळमानानें सांगितलेल्या शारीरिक व्यापारावर अवलंबून नसून तो या चैतन्यद्रव्याच्या घटकावयवठिपक्यांच्या संख्येवर अथवा त्यांचीं रूपांतरें होऊन झालेल्या त्यांच्या रचनेवर अवलंबून असतो. सारांश साधारणतः असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं प्राणधारणचैतन्यद्रव्य हें सूक्ष्म ठिपक्यांच्या आकारांत मूलभूत अशा व्यक्तिशः प्रकृतिरूपानें अस्तित्वांत आलें. या चैतन्यद्रव्याच्या मूलभूत ठिपक्याला पेशीं असें म्हणतात. प्राण्याचें शरीर एका पेशींचे बनलेलेहि असूं शकेल. जसें-आद्यजंतू; किंवा अनंत पेशी एकत्र मिळूनहि झालेलें असेल. यांनां अनुक्रमें एक पेशीयप्राणी किंवा बहुपेशीयप्राणी अशीं नांवें आहेत. वर सांगण्यांत आलें आहे कीं ठोकळमानानें शारीरिकि व्यापार एकपेशीय प्राण्यांत व बहुपेशीय प्राण्यांत सारखेच होत असतात तरी शोधांतीं असें आढळून येईल कीं बहुपेशीय प्राण्यांत या व्यापारांची श्रमविभागणी झालेली असते. बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरांत सर्व पेशी सारख्या न राहून त्याचीं रूपांतरे होऊं लागतात. व या रूपांतर पावलेल्या पेशी शरीराचे सर्व सरसकट व्यापार व्यक्तिशः चालवूं शकत नाहींत कांहीं रूपांतर पावलेल्या पेशींत एखादा गुण जास्त विकास पावून त्या एक त-हेचा व्यापार चालवूं लागतात व पुढें तोच त्यांचा व्यापार कायम राहतो. तसेंच दुस-या त-हेचा शरीराचा व्यापार दुस-या त-हेच्या रूपांतर पावलेल्या पेशी चालवूं शकतात. उदाहरणार्थ, संकोच-विकास पावणें ही क्रिया चैतन्यद्रव्याच्या गुणांपैकीं एक गुण असून पुढें संकीर्ण प्रकृतिरूपांमध्यें ती मांसपेशी अथवा स्नायूपेशीमध्यें सांठली जाऊन मांसपेशींचा अथवा स्नायूपेशींचा हा एक व्यापारच बनून राहतो. चेतनास्फूर्ति व इंद्रियगोचरता ज्ञानपेशीच चालवूं शकतात. म्हणजे पेशींचीं रूपांतरे होऊन शारीरिक धातू इंद्रिये बनतात व त्यांनीं निरनिराळे व्यापार करण्याची योजना अमलांत येते. तेव्हां पेशींची रूपांतरें होणें म्हणजे त्यांचे गुणधर्म बदलणें होय व याच गोष्टीला शारीरिक श्रमविभागणी म्हणतात. ही श्रमविभागणी ज्या मानानें जास्त पूर्णत्वानें झालेली असेल त्यामानानें त्या प्राण्याचें शरीर उच्च दर्जाचें असें समजावयाचें. तेव्हां उच्च व खालच्या दर्जाच्या प्राण्यांत फरक जो आहे तो हाच कीं शारीरिक व्यापारांच्या संख्येत ठोकळमानानें पाहिलें असतां वाढ न होतां ते व्यापार सुलभ रीतीनें व जास्त पूर्णत्वानें श्रमविभागणीच्या तत्त्वावर घडवून आणतां येतात.

वरील सर्व विवेचनावरून सहज लक्षांत आलें असेल कीं शरीराचा मूळ पाया हा एका पेशीनें घातला जातो व ही मूळ पेशी विभागून जाऊन तिचे विभाग एकपेशीय प्राण्यांमध्यें अलग होऊन स्वतंत्र रीतीनें विकास पावतात व त्यापासून एकपेशीय नवीन प्राणी उद्भवतात. परंतु संकीर्ण बहुपेशीय प्राण्यांनां हे मूळ पेशींचे विभाग अलग न होतां एकत्र चिकटून राहतात व पुन्हां पुन्हां विभागून जाऊन व एकमेकाला लागलेले राहून विकास पावतात. व अशा रीतीनें त्याच्यापासून संकीर्ण बहुपेशीय प्राणी बनला जातो. तेव्हां सर्व प्रकारच्या शरीराचा मूळ पाया व घटकावयव म्हणजे पेशी होय. तिच्या रचनेसंबंधीं नीट अवलोकन केलें असतां तिच्यामध्यें मुख्य तीन भाग आढळून येतातः पहिला चैतन्य द्रव्याचा. हा भाग महत्त्वाचा असून प्रत्येक जिवंत पेशीमध्यें थोडाबहुत असलाच पाहिजे. ह्याच्याशीं पुष्कळ इतर द्रव्यें सूक्ष्मकणांच्या रूपानें संकलित झालेलीं असतात. दुसरा चैतन्य द्रव्याचाच परंतु त्याच्यामध्यें केंद्रीभूत होऊन त्याचे चैतन्याचे व्यापार चालविणारा एक बिंदुरूपीं भाग ज्याला चैतन्यकेंद्र म्हणतात तो; बहुशः प्रत्येक पेशीमध्यें असा एक चैतन्यकेंद्राचा भाग असतोच. तिसरा चैतन्यद्रव्याचें वेष्टण; ज्याच्यामुळें पेशीची आकृति व तिची स्वतंत्रता दिसून येते. हें वेष्टण प्राण्यांच्या शरीरांतील पेशीमध्यें बहुशः चैतन्य द्रव्याखेरीज एखाद्या निराऴ्या द्रव्याचे झालेले नसून चैतन्य द्रव्याच्याच पृष्ठावरील भागांत थोडा फरक होऊन झालेलें असतें. वनस्पतींच्या शारीरिक पेशींमध्यें मात्र हें वेष्टण निराळया द्रव्याचें झालेलें असतें. या गोष्टीला एखादा अपवाद मिळण्यासारखा आहे परंतु येथें साधारण विवेचन केलेलें आहे. पेशीचें आकार निरनिराळे असूं शकतात व त्यांचीं रूपांतरें होऊं लागलीं म्हणजे त्यांच्यांत पुष्कळच फरक होतो.

प्राण्याचीं शरीरें एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. बहुपेशीय प्रांण्यांच्या शरीरांत पेशींची रूपांतरे होऊन त्यांचे निरनिराळे शारीरिक धातू झालेले असतात. व त्यांच्या त-हेत-हेच्या रचना होऊन इंद्रियें व अवयव झालेले असतात. अशा प्रकारानें शरीर उच्च दर्जा पावतें. तेव्हां प्राणिशास्त्रांत प्राण्यांच्या शारीरिक रचनेसंबंधीं माहिती देणें ही एक त्याची बाब होय. याला शारीरशास्त्र (मॉर्फालॉजी) असें म्हणतात. परंतु नुसत्या शरीररचनेनें प्राण्यांच्या संबंधीं पूर्ण बोध होऊं शकणार नाहीं तर त्यांचे शारीरिक व्यापार कोणते आहेत व ते कसे चालतात याविषयींची माहिती म्हणजे प्राणिशास्त्राची दुसरी बाब होय. याला इंद्रियविज्ञानशास्त्र अथवा जीवनकार्यविचारशास्त्र (फिजिऑलॉजी) म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या शरीराचा पाया एकाच मूळ पेशीनें घातला जातो व तिची विभागणी होऊन व त्या विभागलेल्या पेशी एकत्रपणानें विकास पावून व त्यांचीं रूपांतरे होऊन बहुपेशीय शरीर बनतें. ह्यासंबंधाची सविस्तर माहिती ही प्राणिशास्त्राची तिसरी बाब होय. या भागाला गर्भविकासशास्त्र (एम्ब्रिऑलॉजी) असें नांव देतात. तेव्हां शारीरशास्त्राच्या अनुरोधानें, जीवनक्रियाशास्त्राच्या अनुरोधानें व गर्भविकासशास्त्राच्या अनुरोधानें प्रत्येक प्राण्याची माहिती देणें आवश्यक आहे व अशी माहिती संक्षिप्त रीतीनें एखाद्या प्राण्याबद्दल दिली असतां तिच्यावरून त्याचा आयुषक्रम समजला जातो. आतां प्रत्येक व्यक्तिमात्राची या तिन्ही बाबींप्रमाणें निरनिराळी माहिती देणें अशक्य असलें तरी थोड्या प्रयत्नांतीं व प्राण्यासंबंधीं चांगलें अवलोकन केलें असतां असें आढळून येईल कीं या भूतलावर सारख्या सारख्या व्यक्ती पुष्कळ असून त्यांचे सर्वसाधारण असे पुष्कळ समूह करतां येतात. उदाहरणार्थ मांजर, चित्ता, वाघ, सिंह, या जनावरांचा एक लहानसा समूह होऊं शकतो व त्याला व्याघ्रजाति (जीनस) हें नांव देतां येईल. तेव्हां हीं विविध जनावरे या समूहाचे जातिविशेष होत. प्रत्त्येक जातिविशेष हा थोड्या किंवा पुष्कळ व्यक्तींचा झालेला असतो. या समूहापैकीं एखादें जनावर प्रतिरूप कल्पून त्याच्या शरीराचें वर निर्दिष्ट केलेल्या बाबींप्रमाणें सर्वसाधारण वर्णन दिलें असतां ते या समूहांतील सर्व व्यक्तींनां लागू होतें. व अशा रीतीनें सर्व प्राण्यांचे समूह करून वर्णन करणें शक्य होतें. पुन्हां व्याघ्रजाति ही मांसभक्षक आहे. तसेंच कुत्र्याची जात पण मांसभक्षक. तेव्हां या दोन्ही जातींमध्यें ताडून पाहून जें साम्य दिसेल तें लक्षांत आणून त्यावरून त्यांचा एक वरच्या दर्जाचा समूह बनवितां येतो. त्याला मांसभक्षक पशू (कार्निव्होरा) असें म्हणतात. या समूहाला गण (आर्डर) म्हणतात. त्याचप्रमाणें गाय, घोडा वगैरे सारखेपणा असणा-या पशूंचा एक गण होतो त्याला खुग्युक्त पशु (अंग्युलाटा) म्हणतात. त्याचप्रमाणें मनुष्य व मनुष्यवत प्राण्यांचा एक गण होतो. आतां हे सर्व गण जर पाहिले तर त्याच्यांत कांहीं प्रकारानें थोडेसे साम्य आहे असें लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं. तेव्हां या साम्यामुळें ह्या सर्व गणांचा एक मोठा समूह बनतो त्याला वर्ग म्हणतात व या वर निर्दिष्ट केलेल्या गणांचा वर्ग म्हणजे सस्तनप्राणी (मॅमल) हा होय. याप्रमाणें शरीरगुणधर्म, शरीररचना व शरीरविकास पावणें अथवा गर्भविकास पावणें या सर्व गोष्टींचा विचार करून प्राण्याचे समूह निरनिराळ्या दर्जाचे बनविणें याला वर्गीकरण (क्लासिफिकेशन) म्हणतात. ही एक प्राणिशास्त्राची चवथी बाब होय. हिला प्राणिवर्गीकरणशास्त्र (सिस्टिमॅटिक झूलोंजी) म्हणतात. वर्गीकरणाच्या रूपानें सर्व प्राण्यांच्या संबंधीं माहिती एकवटून देणें शक्य होतें. हें वर्गीकरण करतांना एक मुख्य गोष्ट प्रमुखत्वाने पुढें येते ती ही कीं अगोदर जातिविशेष ठरले पाहिजेत व दुसरी ही आहे कीं जातिविशेष म्हणजे काय व कसे ओळखावयाचे व ते निश्चित आहेत किंवा बदलूं शकतात ह्या गोष्टींचा निर्णय करावा लागतो. जातिविशेषांमध्यें कालमानानें फरक होतो किंवा होत नाहीं ही प्राणिशास्त्रांतील एक मोठी वादग्रस्त बाब आहे. जातिविशेष म्हणजे थोड्या किंवा बहुत व्यक्तींचा अशा त-हेचा एक समूह कीं त्याच्यांतील व्यक्तिमात्रांत सर्व मुख्य गोष्टींमध्ये साम्य असतें व या सर्व व्यक्ती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीनें फलद्रूप सुप्रजा निर्माण करूं शकतात, व प्रजेंत त्यांच्या प्रतिरूपाहून थोड्याशा प्रमाणावर होणा-या जन्मसिद्ध व्यक्तिभेदामुळें थोडासा फरक दिसला तरी तो फरक वजा केला असतांहि प्रजा पूर्वजाच्याप्रमाणेंच असणारी निपजलेली असते. पुन्हां प्रत्येक जातिविशेषाला मर्यादा घालणारें एक लक्षण दिसून येतें तें हें कीं, जातिविशेषांतील व्यक्तिमात्रांत फलद्रूपता किंवा सुप्रजाजनकत्व हें विपुलतेनें दृष्टीस पडतें परंतु तें क्वचितच निरनिराळया जातिविशेषांच्या व्यक्तींमध्यें दृष्टोत्पत्तीस येतें. बहुतकरून अशा व्यक्तींमध्यें संयोग झाल्यास घडून येत नाहीं. व जर कदाचित प्रजा निष्पन्न झाली तर ती वांझ निपजते. जरी वर सांगितलेलीं हीं लक्षणें जातिविशेषांचा निर्णय करण्यास उपयोगी पडतात तरी जातिविशेष निश्चित करतांना मतभेद होण्याचा बराच संभव असतो. पुन्हां कांहीं प्राणिशास्त्रज्ञाच्या मताप्रमाणें जातिविशेष हें ईश्वरप्रणीत असल्यामुळें निश्चित आहेत व त्यांत फेरफार होत नाहींत. तर इतर शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणें जातिविशेष हे निश्चित असे ईश्वरप्रणीत नसून विकासाच्या तत्त्वानुरूप झालेले आहेत व त्यामुळें त्यांत फेरफार होऊं शकतात व नवे नवे जातिविशेष कालांतरानें बनून येतात. जातिविशेषाबद्दल आधुनिक शास्त्राज्ञांचा, साधारणतः हें दुसरें तत्त्व ग्राह्य मानण्याकडे कल झालेला आहे. जातिविशेष हा वर्गीकरणाचा पाया होय व या पायाचा निर्णय झाल्यावर वर्गीकरणाची इमारत बांधावयाची असते. हें वर्गीकरण करीत असतांना एक मोठी गोष्ट लक्षांत येते ती ही कीं, प्राण्याचें मोठमोठाले संघ (फायला) जरी निरनिराळे आहेत असें दिसलें तरी ते पायरीपायरीनें उन्नतावस्थेत आलेले असावेत व ते सर्व प्रगतिपर विकासाच्या तत्त्वावरच झालेले असावेत. तेव्हां प्राण्याचें वर्गीकरण करणें म्हणजे त्यांची एक प्रकारानें वंशावळच तयार करणें होय. या शास्त्राचा इतिहास ज्ञानकोश विभाग पांचवा (प्रकरण १५) यांमध्यें पहा.

आधुनिक एका पद्धतीनें प्राणिशास्त्रांतील सर्व तत्त्वांचा विचार करून प्राण्यांचें नैसर्गिक रीत्या होणारें वर्गीकरण पुढें कोष्टकरूपानें दिलें आहे.  
insert Table

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .