प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
           
प्रसूतिविज्ञान- हा विषय फार मोठा आहे. तथापि ह्यासंबंधी माहिती संक्षिप्तपणें ग्रथित करतांना (१) प्रसूतीसाठीं लागणारी पूर्वतयारी, (२) प्रसूतिसमयाच्या तीन अवस्था, पैकीं दोन अवस्थांचें वर्णन, (३) तृतीयावस्थेंत प्रसूतीनंतर लागलीच व दहा दिवसांतील ठेवण्याची व्यवस्था, (४) मूल व माता यांच्याकडून येणा-या अडचणींचा नामनिर्देश व (५) अडचणीच्या प्रसूतीसाठीं करण्यांत येणा-या शस्त्रादि क्रियांचा नामनिर्देश, आणि (६) अवांतर मोठ्या संकटांचा नामनिर्देश, अशी मांडणी करून या विषयाचा परामर्ष घेतला आहे.

प्रसूतीस लागणारी पूर्वतयारी- बाळंत होणारी स्त्री रोगट असल्यास ती निरोगी होण्यासाठीं गरोदरपणीं औषधोपचार करावे. बाळंत होण्याची खोली अगोदर निश्चित करून ठेवावी. ती निर्मळ व हवाशीर असून तींत गोंगाट नसावा. बाजेवर अगर लोखंडी पलंगावर कापसाची गादी न घालतां इतर प्रकारचा जाड बिछाना करून त्यावर घाण व रक्त सांडेल म्हणून मेणकापड अंथरावें व त्यावर एक पांढरी स्वच्छ चादर अगर धोतर दुहेरी अगर चौघडी करून मऊसे घालावे. प्रसूतीनंतर हे धोतर व मेणकापड काढलें म्हणजे खालील अंथरूण कोरडें व स्वच्छ रहातें. लुगडयाच्या आंतूण एक मोठा परकर त्या वेळेपुरता (नेसण्याचा प्रघात नाहीं तरी) तो नेसल्यास प्रसूतीनंतर तेवढा खराब झालेला परकर सोडून घेतला म्हणजे वरचें लुगडें कोरडें रहातें. प्रसूतीसमयीं लुगडें वर खोंवून ठेवावें; व भिजलेला परकर सोडून घेतल्यावर ते खालीं करावें म्हणजे बाळंतीणीस हलविण्याचें कारण नाहीं. जरूरीं पुरतें अंग पुसावें. प्रसूतीनंतर बाळंतिणीस पूर्ण विश्रांति हवी. हालचाल उपयोगी नाहीं म्हणून ही व्यवस्था ठेवणें चांगलें.

प्रसूतिसमय नजीक असल्याचीं लक्षणें.- बालक आंत असलेलें गर्भाशय कटिराच्या पोंकळींत ओटीपोटांत उतरल्याप्रमाणें गर्भिणी स्त्रीस वाटतें व छातींत व पोटावर दाब पदून तिला जो दम व धांप लागत असते ती अंमळ कमी होते लघवीस वरच्यावर लागतें: चालण्यास अडचण पडते. कोणा स्त्रियांनां वरच्यावर शौचास लागतें व एका अर्थानें तें बरें असतें. त्यायोगें मळ निघून जाऊन तितकी ओटीपोटांतील जागा रिकामी झाल्यामळें प्रसूति होण्यास सुलभ जातें. बद्धकोष्ठता असेल तर किंवा एरव्ही देखील यासाठीं सौम्य रेचक देतात व यासाठीं प्रसूतीच्या आरंभीं एनिमा (बस्ति) देऊन कोठा साफ करतात. वारेचीं वेष्टनें बोटास योनिमार्गांत स्पष्ट लागतात व गर्भाशयाचें छिद्र बरेच मोठें तेथें लागतें. गर्भाशयसंकोचनलहरी अधिकाधिक व मधून मधून ओटीपोटांत येतात. त्या गर्भिणीसच स्वतःसमजतात व पोट तपासतांना हातास कळतात. मुलें झालेल्या कांहीं बायांनां क्वचित् अशीं पूर्व चिन्हें होत नाहींत. एखाद्या वेळीं खोटया कळा येतात. त्यांचीं लक्षणें हीं कीं, त्यामुळें गर्भाशयाचें छिद्र मोठें झालेलें नसतें व विपुल चिकट स्त्राव सुटलेला नसतो. एनिमा देऊन त्या कळा थांबतात. ख-या कळा येऊं लागल्या म्हणजे प्रसूतीस आरंभ होतो. सुईण अगोदर पाहून ठेवलेली असावी. बाळंतपण खरें सुरू झालें किंवा नाहीं; तसेंच सहजप्रसूति होणार किंवा अडचणीची होणार; व प्रसूतीनंतर बालकाची निगा कशी ठेवावी; हें तीस कळलें पाहिजे. ती धीराची, चतुर, मायाळू, निरोगी, स्वच्छ व प्रसंगवधानी असावी. अशी अनुभविक सुईण अगर पोक्त बाई नसल्यास आतुरालयांत शिकून तयार झालेली सुईण उत्तम. इतर कामासाठीं (धुणें, पुसणें, नाहूं घालणें यांस) मोलकरीण असावी. नाळ कापण्यास चाकू अगर कातरी हवी व ती बांधण्यासाठीं बळकट दोरा तयार ठेवावा. कढत आणि थंड असें पाणी बरेंचसें तयार ठेवावें. साबण, एक घडयाळ, बेडपॅन या जिनसा खोलींत असाव्या. पांढरे स्वच्छ अनेक रूमाल व फडकीं व मागाहून बाळंतिणीचें पोट बांधण्याकरितां कापडाचा अगर धोतराचा केलेला लांब पट्टा तयार ठेवावा. मलमूत्रावर व मोरींत टाकण्यासाठीं फिनाईल, लायसॉल, यांपैकीं एकादें जंतुघ्न औषध असावें. ख-या कळा सुरू झाल्या म्हणजे मात्र बाळंतिणीस पलंगावर निजवावें. डाव्या कुशीवर तीस निजवल्यास मूल बाहेर येण्याच्या जोरानें पहिलटकरीण गर्भिणीचा योनीच्या मागील भाग जास्त फाटत नाहीं. बाळंतीण कोणी उताणीहि निजवतात व त्यामुळें कळा चांगल्या येतात. प्रथम सुईणीनें आपले हात व नखें जंतुघ्न साबणानें स्वच्छ धुवून जंतुघ्न द्रव्यमिश्रित तेलांत बोट बुडवून योनिमार्ग तपासावा. म्हणजे गर्भाशयछिद्र मोठें व सैल आढळणें, मुलाची कवटीं, डोकें, मुख अगर पायाळू मूल येत असल्यास ढुंगण, गुदद्वार अगर तें आडवें आलें असल्यास खांदा बोटास लागतो व चिकट स्त्राव पुष्कळ असल्यास प्रसूति नीट चालेल असें तीस कळतें. पायाळू व आडवें मूल आहे असें कळल्यास अगर नाळ पुढें येणे अगर वार पुढें असून रक्तस्त्राव फार सुरू होणें हीं लक्षणें व गर्भाशयछिद्र फार वेळ होऊनहि सैल न झाल्यास सुईणीनें धोक्याची सूचना देऊन वैद्य, डॉक्टर, डॉक्टरणीची मदत बोलवावी. अगर आपल्या अनुभवाप्रमाणें काम करावें. प्रसूतीच्या आरंभीं व मागाहून तिनें जंतुघ्न साबाणानें योनिमार्ग धुवावा. म्हणजे दहा दिवसांतील तापाचा बहुधां प्रतिबंध होतो अगोदर नुसतें ओटीपोट तपासूनहि मूल डोक्याकडून येणार किंवा नाहीं हें सुईणीस समजले पाहिजे.

प्रसूतीच्या तीन अवस्था.- प्रसूतीची प्रथमावस्था म्हणजे कळा येऊन गर्भाशयछिद्र मोठें व सैल होऊन योनिमार्गहि सैल होण्यास आरंभ होणें ही होय. हिच्या आरंभीं थोडा विटाळ म्हणजे रक्त पडतें. यांत पहिलटकरणींनां वेदना फार होतात. परंतु या वेदनांमध्यें व मुलें झालेल्या बायांत व्यक्तिवैचित्र्याप्रमाणें कमी, अगर असह्य वेदना होतात. यावेळीं गर्भिणीनें एकसारखें निजूं नये, तर कांहीं वेळ बसावें व थोडें हिंडावें देखील. ही अवस्था अंमळ चेंगटच असते. गर्भिणी निजली तर उताणें निजल्याने कळा येण्यास मदत होते. मात्र तिनें आतांपासून कुंथून दमूं नये. तिनें या वेळीं दूध अगर हलका अल्पाहार करावा म्हणजे शक्ति टिकून रहाते. यावेळीं सुईणीनें बोट घालून उगाच वरच्यावर तपासूं नये. त्यामुळें योनिमार्ग कोरडा होतो. मात्र मध्येंच गर्भाभोंवतालची पाणमोटळी फुटल्यास तेव्हां जरूर तपासावें. कारण पाण्याच्या लोंढयाबरोबर डोक्याकडून अगर दुस-या भागाकडून मूल येत असल्यास प्रवाहाच्या जोरानें तें फिरण्याची व प्रसूतीस अडचण येण्याची भीति असते. यावेळीं सुईणीनें गर्भिणीस मधून मधून लघवी करण्यास सांगावें व तीस संकोच न व्हावा म्हणून वाटल्यास अंमळ खोलीबाहेर जावें. गर्भाशयछिद्र पूर्ण मोठें झालें अशी खात्री वाटली व वेळ लागूं लागला तर सुईण अनुभविक असल्यास तिनें पाणमोटळी कळ येऊन ताठ झाली असतां तींत बोट खुपसून व नखानें कुरतडून अगर स्वच्छ दाभणानें टोंचून फोडावी व असें करण्याच्या अगोदर गर्भिणीच्या नितंबाखालीं बेडपॅनचें भांडें ठेवलें म्हणजे त्यांत घाण पाणी सांडेल, व बाळंतीण विनाकारण भिजणार नाहीं. त्या भांडयाबाहेर सांडणारें पाणी फडक्यांनीं टिपून घ्यावें.

द्वितीयावस्था- हा गर्भाशयछिद्र पूर्ण मोठें होऊन पाणमोटळी फुटून बालक बाहेर येण्यापर्यंतचा काळ असतो. यावेळीं येणा-या कळांचें स्वरूप पालटतें. त्या वरच्यावर व फार जोराच्या येतात व पूर्वीच्या कळा ज्या सुमारें मिनिटभर टिकत त्या दीड दोन मिनिटेंहि टिकतात; व पुढें तर सारख्या कळाच येऊन शेवटीं मूल उपजतें. यावेळीं कळा जोराच्या असतातच पण कोणी न सांगतां शिकवतां पलंगाच्या पायाकडील कठडयास पाय टेंकून त्या आधारानें बाळंतीण कुंथून या कळांनां आपणाकडून आपोआप मदत करते, अगर उशाशीं अगर पायथ्याशीं एक टॉवेल पलंगास बांधून तो हातांत धरून कुंथण्यास मदत होते. प्रथमावस्थेंत बाळंतिणीचें रडणें ऐकूं येतें पण आतां वेदना अधिक असून कुंथण्याच्या वेळीं आंत श्वास ओढून तो दाबून ठेवावा लागत असल्यामुळें रडणें फारच कमी असून जेव्हां कळ निघून जाते तेव्हां ऐकूं येतें; म्हणून या मोठ्या कळा तिला पूर्वीच्या कळांच्यापेक्षां असह्य वाटतात. कारण मुलाच्या प्रसूतीची प्रगति होत आहे हें तिला कळत असतें व पूर्वीच्या कळांच्या वेळीं ही आशा तिला नसते. योनिमार्गाच्या बाहेरील कांठावर मुलाचें डोके येतांना तिचा मागील भाग फाटूं नये म्हणून बाळंतीण वेदनेमुळें रडूं लागली कीं, कुंथण्याचा जोर आपोआप कमी पडून तें फाटणें टळतें. ती तेव्हां न रडेल तर सुईणींनें तिला थोडे रडण्यास अगर निदान थोडें हळू ओरडण्यास मुद्दाम सांगावें व त्यावेळीं त्या भागावर आपला पंजा आडवा ठेवल्यानें फाटण्याचें संकट टळतें. नंतर कळा येऊन डोकें पुढें सरतांना गुदावर त्याचा दाब पडून त्यांतील मळहि बाहेर येतो, यासाठीं प्रसूतीच्या आरंभीं एनिमा देणें चांगलें. त्या दाबामुळें गुदद्वार मोठें होतें व नंतर योनीमागील किंचित भाग पहिलटकरणी बाळंतिणीचा फाटून प्रथम डोकें व नंतर सर्व मूल उपजतें. या अवस्थेमध्यें सुईणीनें वरचेवर बोट घालून प्रगति होत आहे असा धीर बाळंतिणीस द्यावा. खरें म्हटलें तर निसर्गतःच यावेळींहि प्रसूति होत असते; पण धीर व उत्तेजन बाळंतिणीस पाहिजेच. या अवस्थेंत अशक्त गर्भिणी असह्य वेदनांनीं रडूं लागली तर वेदनेच्या वेळीं दम कोंडून कुंथण्यास तीस मुद्दाम सुईंणीनें सांगावे म्हणजे प्रगति होते. डोकें योनीबाहेर आल्यावर त्याच्या गळयाभोवतीं नाळेचा विळखा आहे कीं काय हें पहावें व असल्यास तो काढावा अगर खांद्यावर सरकवावा; अगर तो इलाज न चालेल तर तशा पूर्ण मूल उपजण्याच्या अगोदरच्या स्थितींत नाळ कापावी. प्रसूतीस फार वेऴ लागला तर मुलाचें तोंड व अंग काळें-निळें होऊन तें रडत नाहीं. तसें झाल्यास त्याच्या अंगावर व तोंडावर थंड पाण्याचे हबके मारावे म्हणजे मूल रडतें. घसा घरघर वाजूं लागल्यास घशांतील चिकट स्त्राव पुसून काढावा. नंतर अनेक बारीक दोरे मिळून अमळ जाड केलेल्या दो-यानें बेंबीपासून दोन इंचांवर नांळ बांधावी. बाळंतिणीच्या ओटीपोटावर टणक गर्भाशय लागतो तेथें पंजानें दाबून ठेवण्यास, सुइण कामांत असल्यास दुस-या कोणास सांगावें. मूल उपजल्यामुळें ओटीपोट बरेंच लहान झालें पाहिजे. तसें तें नसल्यास जुळें मूल बहुधां गर्भाशयांत शिल्लक असतें व त्याची प्रसूतीहि लवकर होते.

प्रसूतीची तृतीयावस्था- मूल उपजल्यावर पूर्वीच्या वेदना व श्रमानंतर बाळंतिणीस फार आराम व सुख वाटतें. थोड्याच स्त्रियांनां मागाहून भोंवळ, थकवा वाटणें व थंडी वाजणें हीं लक्षणें होतात. या तृतीयावस्थेंत गर्भाचीं वेष्टणें व वार पडते. मूल उपजल्यावर बराच रक्तस्त्राव व कोंडलेलें पाणमोटळीचें पाणी पडतें त्यावरून वांर सुटण्याला आरंभ झाला असें समजावें. गर्भाशयाच्या आकुंचनानें वारेची उभट व वाटेळी घडी पडून ती सुमारें १५।२० मिनिटांनीं बाहेर येते व तीवरचीं वेष्टणें उलटीं होतात. क्वचित मूल उपजांतच लागलीच पाठोपाठ वार पडते. पण ती सावकाशपणें पडली म्हणजे गर्भाशयांतील मोठ्या रक्तवाहिन्यांतील रक्त गोठण्यास वेळ मिळतो व मागाहून भीतिकारक रक्तस्त्राव होण्याचें टळतें. ती वार पडल्यावर गर्भाशय पोट तपासून पाहिला तर हातास क्रिकेटच्या चेंडूप्रमाणें टणक लागतो व मूत्राशयाच्या वर तो सुमारें ५ इंच असतो. प्रसूतीच्या तिन्ही अवस्था मिळून पहिलटकरणींनां सुमारें पंधरा तास लागतात. गर्भिणी ३५ वर्षें वयाच्या पुढील असल्यास २४ तासांपेक्षां अधिक वेळ लागतो. लेंकुरवाळया बायांनां ७।८ तास लागतात. प्रसूतीच्या या तृतीयावस्थेंत सुद्धां सुइणीकडून व्यवस्था व जपणूक उत्तम झाली पाहिजे म्हणजे सूतिकाज्वरादि महा संकटें टळतात व याच वेळीं हयगय होण्याचा विशेष संभव असतो. वार लवकर पडण्यासाठीं ती कोणी अडाणी सुइणी नाळेनें ओंढतात. पण तें करणें वाईट व धोक्याचे आहे. मूल उपजतांच बाळंतिणीस अर्गट औषधाचा अर्क (३० थेंब) थोड्या पाण्यांत घालून पाजावा. नंतर आकुंचनामुळें घट्ट व टणक झालेल्या गर्भाशयावर हाताच्या पंजानें जें दाबून धरलेलें असतें त्याऐवजीं तो टणक गोळा चांगला व हळू हळू वाटोळा हात फिरवून चोळावा म्हणजे वारहि सुटते व आकुंचनहि चांगलें होतें. यानंतर योनिमार्गांत वारेची खालची कड बोटास लागल्यास मग ती कडेनें धरून काढून घेण्यास हरकत नाहीं; पण पोट न चोळतां एकदम नाळेस धरून ती ओढली तर खोलींतील सर्व मंडळीं निघून गेल्यावर प्राणघातक व महारक्तस्त्राव मागाहून होण्याचा फार संभव असतो; अगर गर्भाशयांत बाहेरील हवेचा प्रवेश होतो. यानंतर सुईणींनें उलटी झालेल्या गर्भाच्या वेष्टणाच्या पिशवीचे पापुदरे व वार पाण्यानें धुवून तपासावी. ती सबंध आहे किंवा कोठें तिचा अगर वेष्टणांचा तुकडा राहिला आहे हें पहावें. दोहोंपैकीं एखाद्याचा तुकडा गर्भाशयांत राहिल्यानें तेथें तो कुजून सूतिकाज्वर येतो, म्हणून तसे तुकडे आंत राहिल्यास योनिमार्ग व गर्भाशयाच्या छिद्रांत बोट घालून बोटास लागतील ते तुकडे व गोठलेलें रक्त बाहेर काढून घ्यावें. सरतेशेवटीं जंतुघ्न औषधमिश्रित कढत पाण्याच्या प्रवाहानें योनिमार्ग धुवून काढावा, म्हणजे सूतिकाज्वरप्रतिबंध उत्तम होतो. या प्रसूतिसमयीं उत्तम जंतुघ्न औषध कीं ज्यायोगें सूतिकज्वरादि भयांचें निवारण व प्रतिबंध होतो; रसकापूर या महाविषारी औषधाचा १ भाग ४००० भाग पाण्यांत विरघळून धुण्याचें औषध तयार करणें होय. पण हें घरच्या माणसांनीं करू नये. तें महाविषारी असल्यामुळें माहितगार डॉक्टर-डॉक्टरणीनेंच तें वापरावें. त्यांत चूक झाल्यास अनर्थ होतील. तें नीट वापरल्यास फारच हितावह होईल. या धुण्याच्या अगोदर सुइणीनें गर्भाशयाच्या मुख्याच्या कांठावर काही जखम पडली असल्यास तीवर औषध लावावे व योनि व गुदद्वारामधील भाग फाटला असल्यास तेथे टांके घालून शिवण्यासाठीं डॉक्टर अगर डॉक्टरीण यांनां बोलवावें. नंतर लांब पट्टयानें पोट बांधावें. त्यानें आंतील ढिल्या झालेल्या इंद्रियांनां आधार मिळतो. यानंतर बाळंतणीस ज्वर आहे कीं काय, हें पहावें व नाडीचा वेग मोजावा. तो या वेळीं दर मिनिटास १०० पेक्षां अधिक असूं नये. असल्यास कांही तरी भय आहे असें समजून त्याचें कारण शोधून त्यावर वेळींच उपाय केलें पाहिजेत. प्रसूतीमध्यें औषधें देणें तीं वैद्यडॉक्टरी सल्ल्यानें द्यावी. अडाणी सुइणी प्रसूतीच्या आरंभीं अर्गटचा अर्क कळा येण्यासाठीं देतात, त्यामुळें अपाय होण्याचा संभव असतो. आरंभी क्किानाईन ५ ग्रेन दिल्यास कळा येण्यास उपयोग होतो. नंतर मुलास नाहूं घालून निजवावें. त्याच्या डोळयांत पुढें जुनाट खुप-या होऊ नयेत म्हणून औषध (सिल्व्हर नैट्रेट ४ ग्रेन व बाष्पजल १ औंस) याचा १ थेंब दोन्ही डोळयांत एकदां घालावा. दहा दिवसांत बाळंतिणीचा ज्वर व नाडीचा वेग याचें टिपण ठेवावें. १।२ दिवस तिला भेटीस येणा-याशीं फार बोलू देऊं नये. बालक लागलीच एकदां पाजण्यास घ्यावें. माता अशक्त असली तर दीड दोन महिने तरी मूल अंगावर पाजावें. तें पाजणें दोघांसहि हितावह असतें. माता सशक्त असल्यास पुढेंहि पाजावें. दहा दिवसांत तिला हलकें पण पौष्टिक अन्न द्यावें. ज्वर असल्यास दूध व पातऴ अन्न द्यावे. तिला अंगावर दूध आलें तर पाहिजे व ती बाजेवर पडून असल्यामुळें व्यायाम तिला नाहीं हें ध्यानांत ठेवून तीस पुरेसें अन्नापाणी दूध, चहा, कॉफी, तूप, लोणी, मांस, अंडीं वगैरे अन्न आवड व धर्माप्रमाणें द्यावें. अपचन मात्र होऊं देऊ नये. खोलींत स्वच्छता ठेवावी. खिडक्या शक्य तेवढया हवेंसाठीं उघडया ठेवाव्या. थंडी असल्यास विस्तवाची शेगडी ठेवावी. सकाळ संध्याकाळ जननेंद्रियें जंतुघ्न औषधांनीं धुवावींत. मलशुद्धि नीट होईल अशी व्यवस्था ठेवावी. पहिले एक दोन दिवस बाळंतिणीनें अगदीं पडून रहावें. नंतर जेवण्यासाठीं वगैरे उठून ती बसली तरी चालते. मात्र ज्वर असल्यास उठणें उपयोगी नाहीं.

वरील सर्व वर्णन निरोगी गर्भिणीसंबंधीं असून कटिर व नितंबप्रदेशांत व्यंग नाहीं अशा स्त्रीचें आहे. म्हणजे तें निर्विघ्न प्रसूतीचें झालें. अडचणीच्या प्रसूतिचे ढोबळ कारणांचा फक्त नामनिर्देश येथें करतो-

गर्भिणीमातेकडून येणा-या अडचणीं- ओकारी व डोहाळे अतिशय लागणें, पंडुरोग, कंपवातरोग, बेशुद्धि, झटके, अंगास सूज येणें, मूळव्याध, गर्भाशय स्थानभ्रष्ट होणें, हृदयरोग, कावीळ, यकृतरोग, कफक्षय, फुफ्फुसदाह, ओटीपोटांत ग्रंथिरोग, हिवताप, फिरंगोपदंश, देवी वगैरे सांथीचे ताप, महामारी, रक्तस्त्राव, अतिशीघ्रप्रसूति, अतिचेंगट प्रसूति, नाना त-हेचीं वांकडीं फेगडीं चिंचोळीं कटिरें व नितंबप्रदेश.

रोगट गर्भामुळें व मुलाच्या विकृतीमुळें येणा-या अडचणी- गर्भाच्या वेष्टणांत होणारे नाना रोग, ग्रंथिरोग, नाळेस गांठी, पीळ व वेढें पडणें, मृतगर्भ, वाळलेला गर्भ, हातपाय कापलेला गर्भ, किडलेला व कुजलेला गर्भ, फिरंगोपदंशग्रस्त गर्भ, मुलाचा एक हात, पाय, अगर खांदा पुढें येंणें, मूल आडवें येणें, एकमेकांत अडकलेलीं व गुंतलेलीं जुळीं मुलें, दोन डोक्यांचीं वगैरे विद्रुप मुलें, अकाली गर्भपात होणें, पायाळु मूल वगैरे.

वरील नाना प्रकारच्या अडचणींच्या निवारणार्थ करण्यांत येणारीं नानाप्रकारचीं मुख्य कर्में व शस्त्रक्रियाः- मातेच्या परम दुर्बलतेसाठीं मुद्दाम गर्भपात करणें (ही क्रिया निदान दोन डॉक्टरांच्या संमतीनें करावी); पायाळू मुलाची प्रसूतिक्रिया, चेंगट व अडलेली प्रसूति मोठ्या चिमटयाच्या साह्यानें पूर्ण करणें; म्हणजे मूल आडवें येणें वगैरे प्रसंगीं मूल फिरवणें म्हणजे डोकें अगोदर येणार असेल तें फिरवून पाय ओढून अगोदर आणणें; जिवंत मूल काढणें शक्य नसेल तेव्हां व मातेच्या जिवाच्या रक्षणासाठीं मूल कापून काढणें; चिंचोळया कटिरांच्या स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या मार्गानें प्रसुति शक्य नसल्यास मूत्राशयाच्या अंमळ वर अगर ओटीपोट चिरून प्रसूति करणें. यासच सीझेरियन शस्त्र प्रसूति म्हणतात. कारण या क्रियेनेंच ज्यूलियस सीझर उपजला. आफ्रिकेंतील रानटी लोकांतहि ही शस्त्रक्रिया करतात ही गोष्ट सत्य व विश्वसनीय आहे. नाळेच्या वेढयामुळें मूल गुदमरतेवेळची प्रसूति; फाटलेला योनिमार्ग व इतर जखमा शिवणें; आंत राहिलेली वार अगर तिचे तुकडे काढणें.

अवांतर मोठी संकटें:- सूतिकाज्वर चिकित्सा; बाळंतिणीस आरंभीं अगर मागाहून लागणारें वेड. तिचा हात अगर पाय एकदम फार सजून पांढरा होणें; विपुल दुधामुळें वगैरे स्तनदाह व स्तनांत गळू; स्तनांच्या बोंडशीस पडणा-या भेगा वगैरे होत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .