प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ  
         
निजामउल्मुल्क- याचें मूलचें नांव कमरुद्दीन; याचा बाप शहाबुद्दीन म्हणून औरंगझेबाचा सरदार होता. त्याच्या हाताखाली तुर्की मोंगलांचें छोटेसें सैन्य असे. तो औरंगझेबाबरोबर दख्खनमध्यें आला होता (१६४४). त्याची व संभाजी छत्रपतीच्या सैन्याची रायगडाजवळ निजामपुरीं एक छोटीशी लढाई होऊन तींत त्यास जय मिळाल्यानें त्याला औरंगझेबानें गाझीउद्दीन हा किताब दिला (१६८५).

विजापूरच्या वेढ्यांत गाझीनें आयत्यावेळी अझीमशहास रसद पोहोचवून त्याची उपासमार थांबविली व शेवटीं विजापूरहि गाझीच्याच मार्फत खालसा झालें. यामुळें औरंगझेबाची मर्जी त्याच्यावर फार बसून (१६८६), मराठ्यांनीं जेव्हां वर्‍हाडांत धुमाकूळ घातला तेव्हां त्यानें गाझीलाच वर्‍हाडची सुभेदारी दिली (१७०५) होतीं. (`गाझीउद्दीनखान’ पहा).

कमरुद्दिनास १३ व्या वर्षी औरंगझेबानें १०० स्वारांचें पथक व चिनकुलीचखान ही पदवी दिली. त्याच्या अखेरच्या काळांत हा विजापूरकरे सुभेदार होता. सय्यदबंधूंनां, फर्रुकसियर यास गादीवर बसविण्याच्या कामीं यानें मदत केली (१७१२); त्यावेळीं याला गाझीउद्दीन, फिरूजजंग या पदव्या मिळाल्या. याचें व दख्खनचा सुभेदार झुलफिकरखान याचें वांकडें होतें; त्याच्या खुनानंतर दख्खनच्या सुभेदारीवर याचीच नेमणूक होऊन यास खानखानान निजामउल्मुल्क बहाद्दर हा किताब मिळाला (१७१३). तो दख्खनमध्यें आल्यावर त्याला असंतुष्ट मराठे सरदार (चंद्रसेन जाधव, सर्जेराव घाटगे, रंभाजीराव निंबाळकर वगैरे) येऊन मिळाले. त्यांनां आश्रय देऊन त्यानें कोल्हापूरकर संभाजीचा पक्ष उचलून धरला, आणि शाहूच्या सरदारांवर सैन्य धाडलें. मराठ्यांनां चौथाई घेऊं द्यावयाची नाहीं ही त्याची प्रथमपासून इच्छा होती. परंतु शेवटीं मराठे व निजाम यांच्यांत सलोखा होऊन युद्ध थांबलें (१७१३). तरीपण त्यानें पुण्यावर आपला अंमल थोडे दिवस बसविला होता. फार दिवस इकडे राहिल्यानें दख्खनचे सर्व रीतीरिवाज, माहिती व राजकारण त्यास माहीत होतें.

दख्खनची सुभेदारी १७ महिने केल्यावर बादशहानें त्यास उत्तरेकडे मुरादाबादेस नेमून, दख्खनवर हुसेनअल्लीस नेमिलें (१७१५). निजामानें १७ महिन्यांत दक्षिणेंत पुन्हां औरंगझेबशाही उपस्थित केली होती. पण पेशव्यानीं ती पुढें मोडली. निजामानें मुरादाबादेकडील जमीनदारांची बंडाळी मोडल्यानें व सय्यदबंधूंच्या शिफारशीवरून बादशहानें त्याला बहारच्या व नंतर माळव्याच्या सुभेदारीवर पाठविलें. निजाम हा धूर्त असल्यानें बापाप्रमाणेंच वरा वाहील तशी पाठ देणारा होता. यावेळीं तो सय्यदबंधूंस आपण पूर्ण अनुकूल आहों असें दाखवीत होता (१७१९). पेशवा सय्यदांच्या साहाय्यासाठीं दिल्लीस यावेळीं गेला असतां निजामानें त्याला भाईचारा केला होता.

पुढल्या सालीं (१७२०) दिल्ली येथील गडबडीचा फायदा घेऊन, दख्खनमध्यें स्वतंत्र होण्याचें ठरवून (कारण सय्यदबंधू हे त्याला स्वतंत्र होऊं देत नसत) निजामानें १२ हजार सैन्यासह माळव्यांतून निघून नर्मदा उतरून थोड्याच काळांत लांचलुचपतीनें व कारस्थानानें अशीरगड, बर्‍हाणपूर आणि खानदेश हे प्रांत काबीज केले. यावेळीं माळव्याचा नायब सुभेदार दिलावर याच्या जवळ सय्यदबंधूंचें कांहीं सैन्य असून, औरंगाबादेचा नायबसुभा आलमअली यांच्याजवळहि त्यांचें थोडेसें सैन्य होतें. निजाम उघड उघड आपल्याविरुद्ध बंडखोर झाल्याचें पाहून सय्यदबंधूंनीं आलम व दिलावर यांनां त्याचा नाश करण्यास सांगितलें; त्याप्रमाणएं दिलावर त्याच्यावर चालून आला. त्याच्या तोंडावर थोडी फौज पाठवून व तो गाफील आहे असें पाहून निजामानें त्याच्यावर खांडवा येथें अचानक छापा घालून त्यास ठार मारिलें (१७२० जून). आलमअल्लीनें मराठ्यांच्या (दाभाडे, भोसले, निंबाळकर) साहय्यानें वर्‍हाडांत निजामाशी बाळापुरास लढाई दिली; परंतु तींत उतावीळपणानें त्याचा पराभव होऊन तो ठार झाला (आगष्ट १७२०). ही बातमी दिल्लीस गेल्यावर तेथें राज्यक्रांति होऊन सय्यदबंधूंचे खून होऊन बादशहा स्वतंत्र बनला. या बनावास मूळ कारण निजामच होता, व बादशहाचीहि त्याला अनुमति होती. म्हणून पुढें बादशहानें त्याचा सन्मान करन त्याला दख्खन व माळव्याचा सुभेदार केलें. पुढें वझीर अमीरखान मेल्यावर तर निजामास असफजाह किताबासह वझिरीहि मिळाली; परंतु दख्खनमधील गडबडीमुळें स. १७२२ (जानेवारी)पर्यंत तो दिल्लीकडे गेला नाहीं.

मध्यंतरी त्यानें मराठ्यांशी बचावाचें धोरण ठेविलें होतें. सय्यदांचा निकाल लागण्यापूर्वी कोल्हापूरकर व सातारकर यांच्यांशीं त्यानें दोस्ती केली होती व त्यांच्या चौथाईस त्यानें हरकत घेतली नाहीं. पुढें सय्यद गेले. बाळाजी विश्वनाथहि वारला, तेव्हां मात्र यानें गडबड चालवून सातारकरांच्या चौथाईस हरकत घेतली. इतक्यांत मराठे गंगथडीवर जमले व महंमदशहानें दिल्लीहून मराठ्यांस नवीन फर्मानहि (चौथ सरदेशमुखीचें) दिलें, त्यामुळें त्यानें माघार घेतली (१८२१) व चिखलढाण येथें बाजीरावाची भेट घेऊन सलोखा केला. यावेळीं त्याचें बस्तान नीट बसलें नव्हतें. त्यामुळें मराठ्यांशी भांडण्याचें त्याला सामर्थ्य नव्हतें. आपल्या स्वतंत्र सत्तच्या आड ते आले नाहींत, म्हणजे पुरे, मग वाटल्यास त्यांनीं बादशाही मुलुखावर खुशाल स्वारी करावी, असें त्यानें धोरण ठेवून शाहू, पेशवे व त्याचे सरदार यांच्याशीं आपली वागणूक ठेविली; त्याबरोबरच आपल्या फायद्यासाठी मराठ्यांतील अंत:कलहास तो मदतहि करीत होता. नंतर दिल्लीस आपलें वजन बसविण्यासाठी इकडील कामें उरकून तो तिकडे गेला (१७२२).

दिल्लीस दरबारांतील गोंधळ मोडून औरंगझेबी शिस्त लावण्याचा प्रयत्न निजामानें चालविला, परंतु तो विलासी बादशहास आवडला नाही, म्हणून त्यानें याला गुजराथेच्या सुभेदारीवर पाठविलें. यानें तेथील माजी सुभेदार हैदरकुली यास त्याची फौज फितूर करून पिटाळून लाविलें. हैदरास आंतून बादशहाची फूस होती. गुजराथेंतील धोलका, भडोच वगैरे पांच परगणे स्वत:स जहागीर ठेवून आपल्या तर्फे आपला चुलता हमीद यास आपल्या अमदाबादेस सुभेदार म्हणून भाऊ अझीमउल्ला यास माळव्याचा सुभेदार म्हणून नेमून निजाम दिल्लीस परतला (१७२३). परंतु तेथें त्यास कंटाळा येऊन त्यानें वझिरीचा राजीनामा दिला आणि बादशहास न विचारतां शिकारीच्या निमित्तानें दिल्ली सोडून तो दख्खनकडे निघाला.

यामुळें बादशहास राग येऊन त्यानें हैद्राबादच्या मुबारीझ नांवाच्या सुभेदारास निजामास अटकाव करण्याबद्दल गुप्त हुकूम पाठविला. निजामाच्या डोईजडपणास बादशहा कंटाळला होता व सय्यदांसारखाच त्याचाहि नाश करण्यास पहात होता. पण साकरखेड्याच्या लढाईत निजामानें मराठ्यांच्या साहाय्यानें मुबारीझला ठार केलें व गोवळकोंडा, हैद्राबाद वगैरे ठाणीं घेतली (१७२४ आक्टोबर). यामुळें बादशहानें गुजराथ व माळवा येथील निजामाच्या सुभेदाऱ्या काढून घेऊन, सरबुलंद व राजा गिरधर यांस तेथें अनुक्रमें सुभेदार नेमिलें.

निजामाच्या मनांत आपली राजधानी औरंगाबादेहून हलवून हैद्राबादेस न्यावयाची होती, त्यासाठी त्यानें प्रतिनिधीमार्फत शाहूशी बोलणें लाविलें कीं, हैद्राबाद व त्या सभोंवतालच्या प्रांताच्या चौथाईबद्दल मराठ्यांनीं नक्त रक्कम घ्यावी व इंदापूरजवळ कांहीं गांवें जहागीर घेऊन उपर्युक्त प्रांतावरील आपली सरदेशमुखीहि सोडावी (१७२७); परंतु हें बोलणें बाजीराव पेशवे यांनीं फेटाळून लाविलें. पुढें पेशवे-प्रतिनिधि व शाहु-संभाजी यांचा वाद चाललेला पाहून, निजामानें सरदेशमुखी व मोकासाबाब या बाबी दोन छत्रपतींच्या वारसांच्या हक्कांचा निकाल लागेपर्यंत आपण कोणांसच देत नाहीं असें जाहीर केलें व शाहूच्या राज्यावर वारंवार स्वार्‍या सुरू केल्या; तेव्हां शाहूनें बाजीरावास त्याच्यावर पाठविलें. निजामानें चंद्रसेन जाधव व संभाजीची मदत घेतली होती; तरी पण पेशव्यांनीं त्याला हैराण करून व अखेर त्याची उपासमार करून त्याचा सपशेल पराभव केला. त्यामुळें त्यानें तह करून, संभाजीचा पक्ष सोडणें, शाहूच्या सर्व बाकीचा फडशा करणें व त्याचे हक्क पुढें बिनहरकत वसूल होतील यासाठीं कांहीं किल्ले शाहूच्या ताब्यांत देणें, या गोष्टी कबूल केल्या (१७२८). याप्रमाणें बाजीरावास पहिली सात-आठ वर्षे निजामाच्या भानगडी मोडण्यांत घालावी लागलीं (१७२२-२८).

बाजीरावाविरुद्ध त्रिंबकराव दाभाड्यास निजामानें मदत केली होती (१७३१). वास्तविक पेशव्यांविरुद्ध दाभाड्यास त्यानेंच उभें करून पेशव्यांचा पाडाव करण्याचें कारस्थान रचिलें होतें, त्यामुळें डभईच्या लढाईनंतर त्यानें बाजीरावाचा राग शांत करून, त्यास माळवा ताब्यांत घेण्याची सल्ला दिली. यावेळीं बादशहा हतवीर्य झाला होता, त्याच्या भोंवती हलकट लोक जमले होते, बाजीरावास जिकडे तिकडे जय मिळत होता, त्यानें मनांत आणलें असतें तर बादशहाकडून त्याला सहज दख्खनची सुभेदारी मिळवितां आली असती, या सर्व गोष्टी लक्ष्यांत घेऊन व आपण स्वत: आतापर्यंत बादशहाचे अनेक अपराध केले आहेत, हें ध्यानांत ठेवून, यावेळीं निजामानें बाजीरावाशीं संगनमत केलें. पुढें मल्हारबा होळकरानें आग्र्याच्या पलीकडेहि स्वार्‍या केल्यानें घाबरून महंमदशहानें निजामास दिल्लीस बोलाविलें; परंतु बादशाही जितकी कमकुवत होईल तितकें आपणांस फायदेशीर होईल या उद्देशानें तो तिकडे गेला नाहीं (१७३५); शिवाय मराठ्यांशी भांडण्याचें सामर्थ्य त्याला यावेळीं नव्हतें. निजाम येत नाहींसें पाहून खानडौरान या वझिरानें, मराठ्यांनां त्याच्याकडून फोडण्यासाठी दख्खनच्या सर्व सुभ्यांत सरदेशपांडेपणाचे हक्क देऊं केले (१७३६); त्यामुळें तो दिल्लीस जाण्यास कबूल झाला. बादशहानेंहि त्याला पुन्हां गुजराथ व माळव्याची सुभेदारी देऊं केली; मात्र मराठ्यांनांच या दोन्ही प्रांतांतून त्यानें हाकलून द्यावें असें बादशहाचें म्हणणें होतें. त्यामुळें त्यानें सैन्य जमवून मराठ्यांनां गुजराथेंतून हांकलण्याची तजवीज जारीनें चालविली. तेव्हां बाजीरावानें त्याला भोपाळजवळ कोंडून व पाणी मिळण्याचीहि पंचाईत पाडून, तह करावयास भाग पडलें (फेब्रु. १७३८), पण या तहांत निजामानें स्वत:च्या पदरास मात्र खार लागूं दिला नाहीं. नादीरशहाच्या स्वारीच्या वेळी हा दिल्लीस असून महंमदशहातर्फे लढला होता.

यानंतर, दीड वर्ष झालें तरी ठरल्याप्रमाणें आपल्या माळव्याच्या सनदा मिळत नाहींत व निजामहि दिल्ली सोडीत नाही, असें पाहून बाजीरावानें निजामाच्या मुलुखावर स्वारी केली (१७३९), आणि नासीरजंगाला (निजमुल्कमुल्क याचा मुलगा) औरंगाबादेस कोंडून त्याच्या राज्यांत उच्छाद मांडला; तेव्हां नासीर शरण येऊन मुंगीपैठणचा तह झाला (१७४०). या तहानें पेशव्यांस हांडेप्रांतांत जहागीर मिळाली. या सुमारास निजाम हा दिल्लीस होता, व त्याला बादशहानें अमीरउल्लमरा हा किताब दिला होता. इतक्यांत नासीरजंग हा आपल्याविरुद्ध बंड करीत आहे, असें ऐकून निजामानें आपला वडील मुलगा गाझीउद्दीन त्याजवर वझिरी सोंपवून तो दख्खनकडे निघाला (१७४१ जाने.). इकडे येऊन निजामानें मराठ्यांच्या साहाय्यानें नासीरचें बंड मोडले (जुलै) व कांहीं दिवस त्याला कैदेंत ठेवून नंतर सोडून दिले (नासीरजंग पहा).

या सुमारास मराठे बंगालच्या राजकारणांत गर्क झालेले पाहून, निजामानें कर्नाटकांत आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली. यावेळीं अर्काटच्या सफदरअल्लीचा खून होऊन (१७४२) तिकडे सर्व गोंधळ माजला होता, ही संधि साधून बरोबर मोठें सैन्य घेऊन निजाम कर्नाटकांत गेला (१७४३ जाने.) व तेथें त्यानें आपल्या योजनेप्रमाणें सर्व व्यवस्था केली. मुरारराव घोरपड्याचे गुत्तीचे हक्क कबूल करून व त्याला गप्प बसवून त्रिचनापल्ली घेतली (आगष्ट). तसेंच पेशव्यानीं आपल्या राज्यावर स्वारी करूं नये, म्हणून त्यानें बादशहाकडून पेशव्यांनं माळव्याच्या सनदा मिळवून देण्यांत मदत केली.

इतक्यांत सातार्‍यास पेशवे, गायकवाड व भोंसले यांच्या फौजा जमलेल्या पाहून, आपल्या राज्याबद्दल काळजी वाटून आणि अन्वरुद्दीन यास कर्नाटक पैनघाटाचा व आपला नातु मुजफर यास कर्नाटक बालेघाटाचा कारभार सोपवून निजाम हैद्राबादकडे वळला (१७४४ फेब्रु.), परंतु मराठे त्याला त्रास देत नाहींत असें पाहून, त्यानें आपल्या राज्यांतील बंडखोरांचे पारिपत्य केलें. पुढें (१७४७) निजामानें सुरतेकडे हालचाल केल्यानें पेशव्यांनीं त्याच्यावर स्वारी करून आसुंबरी येथें त्याचा पराभव केला.

निजामउल्मुल्क हा ७७ वर्षांचा होऊन बर्‍हाणपूर येथें मरण पावला (१७४८). त्याला गाझीउद्दीन, नासीरजंग, सलाबतजंग, निजामअल्ली, बसालतजंग व मीरमोगल असे सहा पुत्र व दोन मुली होत्या. पैकीं एका मुलीचा मुलगा मुज्फरजंग याच्यावर त्याचें फार प्रेम होतें. निजामाची कबर बर्‍हाणपुरासच आहे. हा कवि होता असें म्हणतात; टिप्पूच्या ग्रंथसंग्रहालयांत ``दिवाण आसफ निजामउल्मुल्क’’ नांवाचा जो काव्यग्रंथ सांपडला, तो याचाच होय, असें कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे. औरंगझेबानें मराठ्यांचा संपूर्ण उत्खात करण्यासाठी वीस वर्षे घालविली, त्यावेळीं त्या तालमीत निजाम हा तयार झाला होता; म्हणून याच्या मनांतहि तोच हेतु अखेरपर्यंत होता; पण पेशव्यांच्या बळापुढें त्याची इच्छा औरंगझेबाप्रमाणेंच सफळ झाली नाहीं. हा बुद्धिमान, शूर, मुत्सद्दी व दीर्घायुषी होता. त्याचा जन्म ११ आगसष्ट स. १६७१ त व मृत्यू २१ मे १७४८ रोजी झाला; मृत्यूसमयीं त्याचें वय ७७ वर्षांचे होते; डफ म्हणतो १०४ वर्षांचें होतें, हें त्याचें म्हणणें चूक आहे. [आयर्व्हिन; एलफिन्स्टन; डफ; राजवाडे खंड २, ३, ६, ८; भारतवर्ष शकावली; शाहूचें चरित्र व डायरी; बाळाजी बाजीराव डायरी; का.सं. पत्रें, यादी; मासीर- उल्- उमरा; मनुची; मराठी रियासती २,३.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .