प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
          
निकोलस- या नांवाचे पांच पोप, एक प्रतिस्पर्धी पोप (अंटिपोप) व रशियाचे दोन झार होऊन गेले.

पोप, पहिला निकोलस- हा तिसरा बेनेडिक्ट याच्यामागून ८५८ मध्यें पोप झाला. याला दी ग्रेट ही पदवी आहे. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल महिती उपलब्ध नही. तो साडेनऊ वर्षे पाँटिफ या अधिकारावर होता. त्यावेळीं कॉन्स्टांटिनोपल येथील धर्माधिकार्‍याबरोबर भांडण होऊन पूर्वेकडील व पश्चिमेकडील (ईस्टर्न अँड वेस्टर्न चर्च) अशीं दोन ख्रिस्ती धर्मपीठें निर्माण झाली. निकोलसचें दुसरे भांडण, लॉरेन (फ्रान्स)चा राजा लोबेर याला पहिल्या बायकोशी घटस्फोट करण्याची परवानगी पाहिजे होती, ती देण्याच्या विरुद्ध निकोलस असल्यामुळें, चालू होतें. बल्गेरियाच्या नवीन ख्रिस्ती बनलेल्या, बोरिस नांवाच्या राजानें नैतिक व सामाजिक बाबीसंबंधीं १०६ प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरें निकोलसनें दिलीं तो लेख हल्लीं उपलब्ध आहे.

दुसरा निकोलस (१०५८-१०६१) याला व्यक्तिदृष्ट्या मुळीच महत्त्व नव्हतें. तिसरा निकोलस (१२००-१२८०) हा विद्वान व कर्तृत्ववान होता. पण त्यानें आपले पुतणे व इतर नातेवाईक यांनां स्वतंत्र जहागिरी (प्रिन्सिपॅलिटीज) दिल्यामुळें तो लोकनिंदेस पात्र झाला. चवथा निकोलस (१२८८-१२९२) हा मोठा धार्मिक वृत्तीचा व शांततावादी होता. मूर्तिपूजकांचा धर्म नष्ट करण्याची व धर्मयुद्धांत (क्रुसेड) जय मिळविण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.

पांचवा निकोलस (१४४७-१४५५) हा चांगला विद्वान होता. याची कारकीर्द जगाच्या राजकीय, शास्त्रीय व वाङ्‌मयीन इतिहासांत महत्त्वाची आहे. त्यावेळीं पांचवा फेलिक्स नांवाचा एक प्रतिपोप झाला होता त्याला यानें पोप पदाचा त्याग करण्यास लाविलें, व हें एक मोठें भांडण व दुही मिटविली. स. १४५० मध्यें त्यानें रोम येथें एक मोठा ज्युबिली समारंभ केला व त्यावेळीं यात्रेकरूंनीं पुष्कळ देणग्या अर्पण केल्या. या पैशाचा त्यानें ज्ञानप्रसाराच्या कामीं उपयोग केला. होमरच्या काव्याचें पद्यमय भाषांतर करविलें आणि नऊ हजार ग्रंथसंग्रह असलेली एक लायब्ररी स्थापली. पण स. १४५३ मध्यें तुर्क लोकांनीं कॉन्स्टँटिनोपल शहर घेतले. त्यामुळें ख्रिस्ती व धर्म ग्रीक वाङ्‌मय व विद्वान यांच्यावर जी आपत्ती ओढविली तिच्या योगानें पोपच्या मनाला मोठा धक्का बसला. मुसुलमानांच्या या कृत्याबद्दल ``हा होमर व प्लेटो यांच्यावर एक दुसरा मृत्यूच ओढवला’’ असें एकानें म्हटलें आहे. मुसुलमानांबरोबर धर्मयुद्ध करण्याकरितां निकोलसनें सर्व संस्थानिकांची एकी करण्याचा प्रयत्न केला. पण तो साधला नाही. निकोलसनें रोम शहर सुधारून शोभा वाढविण्याच्या मोठाल्या योजना केल्या, बरींच चर्चे दुरुस्त केली व सेंटपिटरचें चर्च पुन्हां बांधण्याचा उपक्रम केला. पण रोमन लोकांना ह्या गोष्टी आवडल्या नाहींत. त्यांनीं पोपचेंच राज्य बुडविण्याचा एक मोठा कट केला पण तो फसला. तथापि निकोलसला स्वत:विषयींची लोकांतील अप्रियता व कास्टँटिनोपलचा पाडाव पाहून अखेरीच्या दिवसांत अत्यंत खिन्नता प्राप्त झाली व तो १४५५ सालीं मरण पावला.

पांचवा निकोलस हा प्रतिस्पर्धी पोप म्हणून १३२८ ते १३३० पर्यंत इटालीत होता. त्याला वव्हेरियाचा लुई या चर्चबहिष्कृत बादशाहानें स्वत:च्या वजनानें पोप म्हणून निवडून आणलें होतें. २२ व्या जॉन पोपनें त्याच्यावर बहिष्कार घातला. निकोलसनें क्षमा होण्याच्या अटीवर आपली पापें कबूल केलीं. पुढें त्याला कैद करून पोपच्या राजवाड्यांत ठेवण्यांत आलें. तेथें तो १३३३ सालीं मरण पावला.

बादशहा पहिला निकोलस झार (१८९६-१८५५)- हा रशियाचा बादशहा पहिला पॉल बादशहा व त्याची राणी मेरिआ फेओडोरोव्हना यांचें आठवें अपत्य. हा २५ जून १७९६ सालीं जन्मला. तो ५ वर्षांचा असतांनाच त्याच्या बापाचा खून होऊन त्याचा भाऊ पहिला आलेक्झांडर हा बादशहा झाला. साहाव्या वर्षापासून पुढें पंधरा वर्षे निकोलसचें शिक्षण एम. व्हान लँब्सडॉर्फ नांवाच्या एका विद्वान व लष्करी अधिकारी असलेल्या इसमांच्या देखरेखीखाली झालें. तथापि पुस्तकी शिक्षणापेक्षां निकोलसला लष्करी शिक्षणाचीच गोडी अधिक होती. स. १८०८ मध्यें त्याला जनरल हा किताब देण्यांत आला. स. १८१४ मध्यें तो फ्रान्समध्यें लढाईवर गेला, व तेव्हांपासून पुढें आजन्म त्यानें लष्करी पोषाखाखेरीज इतर पद्धतीचा पोषाख कधीच केला नाही. स. १८१६ मध्यें त्यानें जर्मनी व इंग्लंडला भेट दिली. बर्लिनला असतांनां तेथें प्रशियाचा राजा तिसरा फ्रेडिरक विल्यम याच्या प्रिन्सेस चार्लोटी नांवाच्या मुलीशी त्याचा वाङ्निश्चय होऊन १८१७ जुलैमध्ये सेंटपिटर्सबर्ग येथें विवाह झाला. अलेक्झांडरनंतर कान्स्टंटाईन या मधल्या भावानें स्वत:ची नालायकी जाणून कबूली दिल्यामुळें निकोलसला गादी मिळण्याचें राज्यघराण्यांतील एकंदर मंडळीच्या कौन्सिलमध्ये ठरलें व त्याप्रमाणें स. १८२५ पहिला अलेक्झांडर वारल्यावर निकोलस बादशहा झाला. तथापि याच वेळीं कान्स्टंटाईनला गादी देण्याबद्दल कांहीं सैन्यानें कट करून निकोलसला घेरले. पण त्यांत निकोलसच्या तर्फेच्या सैन्याचाच जय झाला. नंतर कटवाल्यांची चौकशी करून कांहींनां फांशी देण्यांत आलें, कांहींनां कैदेंत टाकलें व कांहींना सायबेरियांत हद्दपार करण्यांत आले. याप्रमाणें गादीवर स्थिर झाल्यावर निकोलसनें राज्याची सुधारणा करण्याकडे लक्ष दिलें. राज्यांत सर्वत्र अंदाधुंदी व अव्यवस्था पसरली होती ती मोडून सर्वत्र शांतता, राजनिष्ठा व शिस्त स्थापणें हें मुख्य काम आहे असें निकोलसनें ठरवून सरकारी नोकरांच्या कामावर विशेष लक्ष ठेवलें, लेखन स्वातंत्र्यावर नियंत्रण (सेन्सॉरशिप) घातलें आणि सैन्याची सतत परेड व पाहाणी सुरू केली. याप्रमाणें स्वत:च्या देखरेखीनें त्यानें सर्व प्रजाजनांनां राजनिष्ठ बनविण्याची योजना केली. निकोलसमधील सर्वांत मोठा दोष म्हणजे त्याचा संशयी स्वभाव; त्याचा कोणावरहि विश्वास नसे. त्यामुळें कोणालाहि स्वतंत्र अधिकार न देतां त्यानें सर्व अधिकारसूत्रें आपल्या हातीं ठेविली होतीं. त्याची शरीरप्रकृति दगडासारखी कणखर होती, काम करण्याची ताकद अचाट होती; तपासण्या, परेडी, शिष्टमंडळांच्या मुलाखती, सार्वजनिक संस्थांना भेटी, व त्यानंतर आठ-नऊ तास खोलींत बसून रिपोर्ट, खलिते वाचणें व त्यांवर हुकून देणें वगैरे त्याचा नित्याचा व्यवसाय असे. यामुळें या वज्रकठोर झारच्या राज्यांत दिसावयाला जिकडे तिकडे बरोबर बंदोबस्त दिसूं लागला. परंतु प्रामाणिकपणें उघड टीका करण्याचा मार्ग बंद झाल्यामुळें व कोणालाहि स्वतंत्र बुद्धि चालविण्यास वाव नसल्यामुळें झारच्या कारभाराला प्रजेच्या संतोषाचें भक्कम पाठबळ नव्हतें. तर सर्व पोकळ डोलारा जोराचा धक्का बसतांच ढांसळणारा होता.

कोणत्याहि राज्याची खरी मजबुती त्याला युद्धरूपी धक्के बसूं लागतांच तात्काळ समजते. त युद्धाचा प्रसंग १८२८ सालीं तुर्कस्तानाबरोबर आला. १ ल्या अलेक्झांडरनें आरमाराकडे दुर्लक्ष केले होतें; त्याची सुधारणा निकोलसनें विशेष लक्षपूर्वक केली होती. पण खुद्द लढाईंत तें पूर्ण नालायक ठरलें; व बाल्कन प्रांतावरील स्वारींत सैन्यांतील अव्यवस्था व दुर्नीति त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनीं पहावी लागली. शिपायांनां धड पोटाला मिळेना; जखमी झालेल्यांनां दवाखान्यांत नीट औषधोपचार होईनात व तो स्वत: भित्र्या अंत:करणाचा असल्यामुळें शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देईना. यामुळें शत्रूंनां व रोगांनां शिपाई बळी पडले. याप्रमाणें अन्तर्गत व्यवस्था व बाह्य युद्धविजय या दोन्ही बाबतींतील आपल्या पराक्रमाविषयींचा त्याचा भ्रमाचा भोपळा फुटला!

स्वकीय कारभार व परराष्ट्रीय धोरण यासंबंधी निकोलसचीं तत्त्वें अशी होतीं की, प्रथम देशांत सुव्यवस्था लावून द्यावयाची. `होली अलायन्स’च्या उद्देशानुरूप यूरोपमध्यें राज्यक्रांतिकारकांचे बंड मोडून परंपरागत चाललेले बादशाही अम्मल चालू ठेवणें व पूर्वेकडील देशांत मोडकळीस आलेलें ऑटोमन साम्राज्य नष्ट करून पवित्र जुना ख्रिस्ती धर्म पसरविणें, ही रशियाकडे कामगिरी आहे अशी निकोलसची भावना होती. याच सुमारास ग्रीकांनीं तुर्कांच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू केलें. रशिया व ब्रिटन यांनीं संगनमतानें ग्रीसची बाजू धरली, तुर्कांची समुद्रावरील सत्ता नष्ट करून रशियन सैन्य कांस्टँटिनोपलमध्यें शिरलें आणि १८२९ मधील अड्रियानोपलच्या तहानें तुर्कस्तान रशियाचा मांडलिक बनला. स. १८३० मध्यें फ्रान्स व बेल्जममधील राज्यक्रांतिकारकांची चळवळ मोडून टाकण्याची त्यानें तयारी केली, पण पोलंडमध्यें मोठें बंड झाल्यामुळें निकोलस तिकडे गुंतला. तें मोडल्यावर पुन्हां निकोलसनें नवीन `पवित्र संघ’ (होली अलायन्स) स्थापला. १८३८ मध्यें तुर्कस्ताननें ऑस्ट्रियाच्या मदतीनें रशियापासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला व निकोलसनें ब्रिटिश सरकारशीं दोस्ती ठेवून तो प्रयत्न निष्फळ केला. १८४८ सालीं फ्रान्समध्यें क्रांति हऊन तिसरा नेपोलियन बादशहा झाला. त्याचा निकोलसनें योग्य तो सन्मान केला नाही. तुर्कस्थान रशियाच्या ताब्यांत रहावा हें ब्रिटनलाहि संमत नव्हतें. त्यामुळें हळूहळू इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया वगैरे देश रशियाचा पक्ष सोडून तुर्कस्थानच्या बाजूला वळले आणि त्यामुळें १८५४ साली सुरू झालेल्या क्रिमियन युद्धांत रशियाचा पराभव झाला. त्या धक्क्यानें झार स. १८५५ मध्यें मरण पावला. स. १८४४ त निकोलसनें इंग्लंडला भेट दिली होती. त्यावेळीं व्हिक्टोरिया राणीनें निकोलसच्या स्वभावाचें वर्णनपर पत्र बेल्जमच्या राजाला लिहिलें होतें, त्यांतील मजकुर असा :- ``तो करारी व कडक स्वभावाचा आहे; त्याची स्वकर्तव्याविषयीं तत्त्वें ठाम ठरलेलीं आहेत व तीं पृथ्वीवरील कोणीहि त्याला बदलण्यास लावूं शकणार नाहीं, तो फार हुषार आहेसें मला वाटत नाहीं; त्याचें मन सुसंस्कृत नाही. त्याचें शिक्षण दुर्लक्षिलें गेलें असावेंसे वाटतें. राजकारण व लष्करी गोष्ट यांतच कायती त्याला मोटी गोडी आहे. कला व इतर सौम्य व्यवसाय त्याला मुळींच रुचत नहींत. तथापि तो अगदीं निष्कपटी असून अगदीं मोठी अरेरावीपणाची कृत्येंहि सरळपणानें करतो, कारण राज्यकारभार करण्याचा हाच कायतो एक मार्ग आहे असें त्याला वाटतें. मला खात्री आहे कीं, त्याच्या राज्यांतील कित्येक इसमांवर जो भयंकर प्रसंग कोसळले त्याची त्याला दादहि नाही, कारण हाताखालचे अधिकारी लाचखाऊ बनून काय अनर्थ करतात. त्याबद्दल त्याला पूर्ण अज्ञान होतें; आणि स्वत: मी मोठा न्यायी आहे असेंत्याला वाटतें. त्याच्या कानावर फारशा गोष्टी येतच नाहींत. तो फारच मोकळ्या मनाचा असून लोकांपुढें उघड जें बोलूं नये तें तो बोलतो’’ इत्यादि. त्याला गृहसौख्य चांगलें लाभले. त्याला सात मुलें होतीं त्यापैकीं थोरला मुलगा दुसरा अलेक्झांडर हा त्याच्यानंतर बादशहा झाला.

दुसरा निकोलस (१८६८-१९१८)- हा तिस-या अलेक्झांडरचा मुलगा सेंटपीटर्सबर्ग येथें जन्मला. पुस्तकी व लष्करी शिक्षण त्याला चांगल्या विद्वानांकडून मिळालें. त्याला लष्करी शिक्षणाची गोडी नव्हती. १८९०-९१ त त्यानें ग्रीस, ईजिप्त, हिंदुस्थान, सिलोन व जपान या दूरच्या देशांत प्रवास केला. १८९४ त बाप वारल्यावर तो गादीवर आला व त्याच साली व्होक्टोरिया राणीच्या प्रिन्सेस अलिक्स नांवाच्या नातीशीं त्याचा विवाह झाला. नंतर मास्को येथें मोठा राज्यरोहणसमारंभ झाला व त्यावेळीं पोलिसांचा योग्य बंदोबस्त नसल्यामुळें २००० माणसें गर्दीत चिरडून मेली. त्यानें परराष्ट्रांबरोबर बापाप्रमाणेंच शांततेचें धोरण चालवून स्वराज्यांत सर्व सत्ता स्वत:च्या हातीं केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न चालविला. उदारमतवादी लोकांची पार्लमेंटरी पद्धतीनें राज्यकारभार चालविण्याची मागणी त्यानें कबूल न केल्यामुळें असंतोष उत्पन्न झाला. त्याची इच्छा नसतांहि जपानशी युद्धाचा प्रसंग उद्धवला आणि पार्लमेंटरी राज्यपद्धतीचे हक्क लोकांनां देणें भाग पडलें.

महायुद्ध सुरू झाल्यावर कमांडर इन चीफ म्हणून झार हा सैन्याच्या मुख्य तळांत राहिला होता आणी आलेक्झांड्रा राणी सर्व राज्यकारभार पहा त होती. तिनें साझोनोव्ह व पलिव्हानोव्ह हे लायक मंत्री दूर करून स्टुर्मर, प्रोटोपोपोव्ह किंवा गॅलिरझिन वगैरे प्रधान नेमले. रासपूटिनचा खून झाला तरी त्याचें एक देवालय बांधून खुनाच्या कटांतील इसमांनां फांशी व हद्दपारी अशा कडक शिक्षा दिल्या. राणीची ही सत्ता पुढील राज्यक्रांतीनें नष्ट झाली. १९१७ च्या मार्चमध्यें ड्यूमा सभेच्या प्रेसिडेंटनें निकोलसला राज्यत्याग करण्यास सांगितलें व तद्विषयक ठराव जेव्हां अधिकार्‍यांनीं प्रत्यक्ष त्याच्या हातीं दिला तेव्हां त्यानें तो शांतपणे व बिनहरकत मान्य केला. त्यानें बादशाही मुकुट आपल्या मुलाला देण्याचेंहि नाकारलें, कारण तसल्या राजकीय वादळाला तोंड देण्यास तो समर्थ नाही असें त्याला वाटलें. ग्रँड ड्यूक मायकेलनेंहि राजमुकुट धारण करण्याचें नाकारलें, कारण लोकांची संमति त्याला पाहिजे होती, पण ती मिळेना. या प्रमाणें राजसत्ताकपद्धति रशियांत नष्ट झाली. इंग्लंडनें झार व त्याचें कुटुंब यांनां इंग्लंडांत नेण्याची इच्छा दर्शविली, पण रशियाच्या तत्कालीन लोकशाही सरकारनें ते नाकारलें. नंतर झार, त्याची राणी व एक मुलगा आणि चार मुली यांनं तोबोलस्क येथें अटकेंत ठेवण्यांत आलें. तेथील चरित्रक्रम बादशाही कुटुंबाबरोबरच्या एका फ्रेंच शिक्षकानें वर्णिला आहे. राजघराण्यांतील माणसांचे सर्व गुण या बंदिवासांत निदर्शनास आले. स्वत: झार आपल्या मुलाला इतिहास व रशियन वाङ्‌मय शिकवूं लागला. सायंकाळीं सर्व कुटुंबीय इसम एकत्र जमून वाचन व गप्पागोष्टी करीत, प्रार्थना करीत व चर्चमध्यें हजर राहात. १९१८ सालीं बोत्शेव्हिक सरकारनें या मंळींनां इकेटरिंबर्ग येथें ठेविलें. तेथें त्यांच्यावर जुलूम होऊं लागला. सर्व माणसांना मिळून दोन निजण्याच्या व बसण्याउठण्याची एक मिळून तीनच खोल्या दिल्या होत्या. त्यांचा मुख्य जेलर एक कम्युनिस्ट पंथाचा ज्यू असून बादशाही कुटुंबाचा भयंकर द्वेष्टा होता. स. १९१८ मध्यें कोलचॅकनें उरल पर्वताच्या बाजूला चाल केली. त्यामुळें या राजकुटुंबाचा शेवट ओढवला. इकेटरिंबर्गच्या कम्युनिस्टांनीं एक गुप्त सभा भरवून या राजकीय कैद्यांनां ठार मारण्याचें ठरविलें. १६ जुलैच्या रात्रीं मुख्य जेलर युरकोव्हस्की यानें सर्वांनां त्या कैदखान्याच्या तळघरांत नेलें व देहांतशिक्षेचा हुकूम वाचून दाखविला. तो ऐकून झारनें कांहीं बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकदम रिव्हाल्वर झाडून जेलरनें त्या सर्व कैद्यांनां ठार मारलें. इतर मारेकर्‍यांनी संगिनी व बंदुकीचें दस्ते यांचा उपयोग केला. याप्रमाणें राजकुटुंबातील सात माणसें व त्यांच्याबरोबरचे त्यांचे चार नोकर मारले गेले. कांहीं दिवसांनीं जवळच एका जागी त्यांची प्रेतें जाळून टाकण्यांत आली.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .