विभाग पंधरावा: तपून - धमन्या
तिग्यैंग — उत्तर ब्रह्मदेश. कठा जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ३५२ चौरस मैल. १९११ सालीं लोकसंख्या १७५८२ होतीं. यांत ११६ खेडीं असून तिग्यैंग हे मुख्य ठिकाण आहे. १९०३-०४ सालीं वहीत जमीन १६ चौरस मैल असून सारा व कर यांचे उत्पन्न ४५,८०० रुपये होते.