प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

तपागच्छ त पा ग च्छा ची प ट्टा व ली.- महावीरापासून खरतरगच्छाचा ३८ वा सूरि उद्योतन यापर्यंत जे प्राचीन आचार्य होऊन गेले तेच आचार्य तपागच्छाच्या पट्टावलींत निर्दिष्ट केले आहेत. मात्र त्या दोहोंत कांहीं विशेष भेद आहेत. प्रथमत: महावीर हा आचार्यांत गणला गेला नाहीं.

१) सुधर्मन:- प्रथमोदयाचा पहिला आचार्य. (२) जम्बू:- हा फार सद्वर्तनी होता. (३) प्रभव.

(४) शय्यंभव:- ह्यानें दशवैकालिक नांवाचा ग्रंथ केला. (५) यशोभद्र. (६)  संभूतविजय आणि भद्रबाहु. हे दोघेहि सहावे पट्टधारी होते. (७) स्थूलभद्र:- हा गृहांत ३०, व्रतांत २४, व युगप्रधानाप्रमाणें ४५ वर्षें राहून वयाच्या ९९ व्या वर्षी वी नि. २१५ त (ह्याच वर्षीं चंद्रगुप्तानें ९ व्या नंदाला मारिलें.) मृत्यु पावला (हीं वर्षें खरतरपट्टावलीतील वर्षांहून भिन्न आहेत.)
(८) आर्यमहागिरि व आर्य-सुहस्तिन गुरूभ्रातर:- पहिला गृहांत ३०, व्रतांत ४० व युगाप्रधानांप्रमाणें ३० असा एकंदर १०० वर्षें राहिला.
(९) सुस्थित आणि सुप्रतिबद्ध:- सुहस्तीचे शिष्य. ह्यांचें उपनाव कोटिक व काकंदिक असें होतें त्यावेळेपासून निर्ग्रंथचे नांव कोटिकगच्छ असें पडलें.
(१०) इंद्रदिन्न. (११) दिन्न. (१२) सिंहगिरी (१३) वज्रा:- वी. नि. ४९६ सालीं जन्मला. वी. नि. ५८४ सालीं मरण पावला. (१४) वज्रासेन:- हा गृहांत ९, व्रतांत ११६ व युगप्रधानाप्रमाणें ३ वर्षें राजून वयाच्या १२८ व्या वर्षीं वी. नि. ६२० सालीं मरण पावला.
(१५) चंद्र:- त्याच्यापासून चंद्रगच्छ हें तिरसें नांव उत्पन्न झालें आहे.
(१६) सामंतभद्र:- याच्यापासून वनवासी हें चवथें नांव उत्पन्न झालें.
(१७) वृद्धदेव:- कोरण्टकामध्यें नाहड मंत्र्यानें निर्माण केलेल्या प्रासादांत मारूतीची प्रतिष्ठा ह्यानें केली. ती प्रतिष्ठा १२५ सालीं केली असें गुर्वालींत लिहिलें आहे. तसें म्हटलें तर वी. नि. ५९५ होतो हें ठीक नव्हे. कारण त्याच ग्रंथांत वी. नि. ६२० सालीं वज्रासेन मरण पावला असें दिलें आहे. त्यानंतर चन्द्रसूरि व सामन्तभद्रसूरि हे होऊन गेले. पट्टधर म्हणून वृद्धदेवसूरिनें वी. नि. ५९५ सालीं प्रतिष्ठा केली, हें म्हणणें असंगत आहे. (१८) प्रद्योतन. (१९) मानदेव.
(२०)  मानतुंग:- मालवदेशचा राजा चौलुक्यवयरसिंह ह्याचा अमात्य वाण व मयूर यांच्या जादूनें फसलेल्या राजाला वाराणसी येथें भक्तामरस्तवनानें धर्मदीक्षा दिली, आणि भयहरस्तवनानें नागराजाच्या मनाची खात्री केली. भत्तिभरानें सुरू झालेलें एक स्तवनहि त्यानें रचिलें आहे. प्रभावकचरित्रांत प्रथम मानगुंगाचे व नंतर मानदेवाचें चरित्र सांगितलें आहे. हा मानदेव वृद्धदेवसूरीचा शिष्य असून प्रद्योतनसूरि त्याचा शिष्य होता.
(२१) वीर:- नागपूर येथें नेमिभवनांत प्रतिष्ठा केल्यामुळें ह्याचें हस्तसौभाग्य पूजित झालें होतें. (२२) जयदेव. (२३) देवानंद. (२४) विक्रम. (२५) नरसिंह.
(२६) समुद्र:- हा खोमाण राजकुलांतला होता. तो उदार व अधिकारपूर्ण होता. त्यानें गच्छ राजाची स्तुति केलेली आहे. त्यावेळीं त्यानें जैन भिक्षूंनां जिंकून नागसरोवरांतील भुजंगनाथाचें पूज्य तीर्थ स्वत:च्या ताब्यांत आणिलें. (२७) मानदेव. (२८) विबुधप्रभ. (२९) जयानंद. (३०) रविप्रभ:- यानें नड्डुलपूर येथें वी. नि. ११७० (सं. ७००) त नेमिनाथाचें देवालय बांधिलें. वी. नि. ११९० सालीं युगप्रधान उमास्वाति होऊन गेला.
(३१) यशोदेव:- वी. नि. १२७२ सालीं (सं. ८०२) वनराजानें अणाहिलपुरपट्टण स्थापन केलें. वी. नि. १२७० सालीं (सं. ८००) बप्पभट्टि जन्मला. त्यानें आमराजाल धर्मांतराची दीक्षा दिली. तो वी. नि. १३६५ (सं. ८९५) सालीं मृत्यु पावला. (३२) प्रद्युम्र.
(३३) मानदेव:- उपधानवाच्य व इतर ग्रंथांचा कर्ता. (३४) विमलचंद्र.
(३५) उद्योतन:- अर्बुद पर्वतावरील तेली नामक गांवाच्या मर्यादेवर असलेल्या एका मोठ्या वटवृक्षाखालीं सर्व देवसूरीला (इतर ग्रंथकारान्वयें ८ सूरींनां) ह्यानें वी. नि. १४६४ त (सं. ९९४) दीक्षा दिली. ह्यापासून बृहत् अथवा वट गच्छ उत्पन्न झाला (पांचवें नांव).
(३६) सर्वदेव:- हा बृहत्गच्छाचा पहिला आचार्य होय. सुधर्मस्वामीपासून १५ वा पट्टभृत व चंद्रगच्छाला ज्याच्यापासून नांव मिळाले त्या चंद्रसूरीपासून हा २१ वा होता. सं. १०२९ त धनपालानें देशी नाममाला रचिली. सं. ९०९६ त थारापद्रगच्छाचा वाडिवेताल नांवाचा शांतिसूरि मरण पावला. त्यानें उत्तराध्ययन सूत्रावर एक टीका लिहिली आहे. (३७) देव:- ह्याचें नाव रूपश्री होतें. (३८) सर्वदेव. (३९) यशोभद्र आणि नेमिचंद्र गुरूभ्राते. सं. ११३५ मध्यें (इतर ग्रंथकारान्वयें सं. ११३९ त) ९ अंगांवर वृत्ति करणारा अभयदेवसूरि मृत्यु पावला. तदनंतर, कुर्च पुरगच्छाचा चैत्यवासी जो जिनेश्वरसूरि त्याचा शिष्य जिन वल्लभ ह्यानें चित्रकूटांत सहाव्या कल्याणकाचें वर्णन करून विधिसंघ विधिधर्म इत्यादि नांवानें आपल्या मतांचें प्ररूपण करून प्रवचन बाह्य झाला. तें प्ररूपण वि. ११४५ त किंवा ११५० त झालें असावें असा संभव आहे.
(४०) मुनिचंद्र:- नेमिचंद्राचा गुरूभ्राता जो विनयचंद्र त्याचा हा शिष्य होता.

सौवीरपायी हें ह्याचें बिरूद होतें. त्यानें सप्तग्जिकदिपद्या हा ग्रंथ रचिला. सं. ११७८ त तो मरण पावला. मुनिचंद्राचा एक शिष्य देवसूरि नांवाचा होता. अणहिल्लपूरपट्टणाचा राजा जयसिंहदेव याच्या समोर एका वादांत दिगंबर कुमुदचंद्राचार्याला त्यानें जिंकलें व त्यायोगानें त्या शहरांत दिगंबराच्या येण्याला अडथळा केला. सं. १२०४ त देवसूरीनें एक चैत्य स्थापन केलें व फलवर्द्धिग्रामांत एक बिंब उभारिलें (ते तीर्थ अजून देखील प्रसिद्ध आहे), आणि आरासण येथें नेमिनाथप्रतिष्ठा केली. त्यानें स्याद्वाद रत्‍नाकर नांवाचा एक प्रमाण ग्रंथ रचिला. त्यापासून चतुविशतिसूरि शाखा उत्पन्न झाली. देवसूरि सं. ११४३ त जन्मला; दीक्षा ११५२; सूरिपद ११७५; स्वर्ग सं. १२२६ त त्याच काळीं हेमचंद्रसूरि होऊन गेला. हा देवचंद्रसूरिचा शिष्य होता. देवचंद्रसूरीनें राजा कुमारपाल ह्याला दीक्षा दिली होती. तो त्रिकोटिग्रंथांचा कर्ता होता. सं. ११४५ त जन्मला; दीक्षा सं. ११५० त: सूरिपद सं. तो ११६६ त व स्वर्ग सं. १२२९ त.

(४१) अजितदेव. यांच्या कारकीर्दींत जिनवल्लभापासून खरतराची उत्पत्ति झाली. जिनवल्लभानें स्थापिलेला विधिसंघ हाच जिनदत्तदौष्ट्रिक खरतर वगैरे नावें असलेला होय. त्याचप्रमाणें वि. १२१३ मध्यें बिउणपगांवांत पौर्णिमीयक एकाक्षनरसिंहोपाध्याय व नाठीश्राविक या दोघांपासून आंचलिकमताची उत्पत्ति झाली.
(४२) विजयसिंह:- यानें विवेकमंजरी शुद्ध केली.
(४३) सोमप्रभा आणि मणिरत्‍न.
(४४) जगच्चंद्र:- तपागच्छाचा सुप्रसिद्ध संस्थापक कर्म करण्यास शिथिल असा मुनिसमुदाय आहे हें जाणून गुरूच्या आज्ञेनें वैराग्यरसाचा मुख्य सागर अशा चैत्रगच्छाच्या देवभद्र उपाध्यायाला मदतीला घेऊन यानें कर्माविषयीं उग्रता दाखविली म्हणून हरिलाजगच्चंद्रसूरि हें नांव त्याला प्राप्त झालें. कांहीं असें प्रतिपादन करतात कीं आघाट पुरांत ३२ दिगम्बराचार्यांबरोबर वाद करणारा तो हिर्‍याप्रमाणें अभेद्य राहिला म्हणून राजानें त्याला हरिलाजगच्चन्द्रसूरि असें म्हटलें. त्याचप्रमाणें जन्मभर आचामाम्लतप करणारा तो बारा वर्षांत तप नांवाचें बिरूद (विशिष्ट नाव, उपलक्षण) मिळवितां झाला. म्हणून वि. १२८५ त सहावें नांव तपा असें प्रसिद्ध झालें. तसेंच, निर्गन्थ, कौटिक, चन्द्र, वनवासि; बृहद्गच्छ व तपा हीं सहा नांवें प्रचारांत येण्याला जे कारण झालें ते आचार्यक्रमानें सुधर्मस्वामी, सुस्थित, चन्द्र, सामन्तभद्र, सर्वदेव, व जगच्चन्द्र या नांवाचे सहा सूरि होते.
(४५) देवेंद्र:- याच्या काळीं विजयचंद्र जिवंत होता. विजयचंद्र हा वस्तुपालाच्या घरीं लेख्यकर्मकृन्मंत्री (लेख्यकर्म करणारा मंत्री) होऊन गेला व जगच्चंद्रानें त्याला सूरि केलें.

मोठ्या सभागृहांत असल्यामुळें विजयचन्द्रसमुदायाला वृंद्धशालिक हें नांव लोकांनीं दिलें. त्याचप्रमाणें लहान सभागृहांत राहिल्यामुळें देवेन्द्रसूरि ज्यांत आहे अशा समुदायाचें लघुशालिक असें नांव पडलें (ज्याप्रमाणें, पौर्णिमीयकमताची उत्पत्ति झाल्यानंतर त्याच्या विरूद्ध पक्षाच्या तीर्थाचे चतुर्दशीयक हें नांव पडलें तसें). सं. १३०२ मध्यें उज्जयिनी येथें महेभ्यजिनचंद्राचे पुत्र विरहवल व भीमसिंह यांनां देवेंद्रानें दीक्षा दिली. सं. १३२३ त (क्वचित् १३०४ त) वीरधवलाला विद्यानंदसूरि ह्या नांवानें सूरिपद देवेंद्रानें दिलें व भीमसिंहाला धर्मकीर्ति ह्या नांवानें उपाध्यायपद त्यानें दिलें. विद्यानंदानें एक व्याकरण रचिलें आहे. त्या व्यापकरणाचें नांव विद्यानंद असें आहे. तें सर्वोत्तम, स्वल्पसूत्र आहे व त्यांत पुष्कळ अर्थ संकलित केला आहे. देवेंद्रानें खालील ग्रंथ रचिले आहेत:- (१) श्राद्धदिनकृत्यसूत्रवृत्ति २; (२) नव्यकर्मग्रंथपंचकसूत्रवृत्ति २; (३) सिद्धपंचाशिकासूत्रवृत्ति (४) धर्मरत्‍नवृत्ति १; सुदर्शनाचरितम; (५) त्रीणि भाष्याणि ३; (६) सिरिउसहबद्धमाणप्रभृतीस्तवादय. कांहीं जणांचें असें मत आहे कीं, श्रावकदिनकृत्यसूत्र हें चिरन्तनाचार्यांहून वेगळ्या अशा दुसर्‍या ग्रंथकारानें केलें आहे.

देवेंद्र मालवदेशांत सं. १३२७ त मृत्यु पावला. त्याच्या पाठीमागून नेमलेला विद्यानंदसूरि या देवेंद्रानंतर १३ दिवसांनीं विद्यापूर येथें मृत्यु पावला. म्हणून विद्यानंदसूरीचा बंधु धर्मकीर्त्युपाध्याय ह्याला धर्मघोष ह्या नांवानें सूरिपद मिळालें.

(४६) धर्मघोष. यानें खालील ग्रंथ रचिले:- (१) संघाचाराख्य भाष्यवृत्ति; (२) सुअधमोटिस्तव; (३) कायास्थतिभवस्थितिस्तवौ; (४) चतुर्विंशतिजिनस्तव: २४; (५) शास्ताशर्मिति आदिस्तोत्रम् (६) देवेंद्र: अनिशम् इतिश्लेषस्तोत्रम्; (७) यूयम् युवात्वम् इति श्लेषस्तुतय:; (८) जयवृषभेति. आदिस्तुत्याद्या:. तो सं. १३५७ त मृत्यु पावला.

(४७) सोमप्रभ:- सं. १३१० त जन्मला. व्रत सं. १३२१ त घेतलें. सूरिपद सं. १३३२ त मिळालें. हा सं. १३७३ त मृत्यु पावला. त्याचे ग्रंथ खालीलप्रमाणें आहेत:- (१) नमिउणभणाई एवम् इति आदि आराधनासूत्रम्; (२) सविस्तरयतिजितकल्पसूत्रम्; (३) यत्राखिलेति आदि २८ स्तुतय:, (४) जिनेन येनेति स्तुतय:, (५) श्रीमच्छर्मेत्यादय: सं. १३५७ त त्यानें आपला शिष्य विमलप्रभ याला सूरिपद दिलें; आणि विमलप्रभाच्या मृत्यूनंतर त्याचे शिष्य परमानन्द व सोमतिलक यांनां त्यानें सूरिपद दिलें. सोमतिलक सोमप्रभाच्या मागून पदावरील अधिकारी झाला.

(४८) सोमतिलक:- हा सं. १३५५ त जन्मला. दीक्षा सं. १३६९ त घेतली. सूरिपद सं. १३७३ त मिळालें. स्वर्गाप्रत सं. १४२४ त गेला. त्यानें अनेक स्तोत्रें व टीकाग्रंथ रचिले. शिवाय त्यानें क्रमानें खालील मनुष्यांना सूरिपद दिलें – पद्मतिलक, चंद्रशेखर, जयानंद आणि देवसुंदर. पद्मतिलक एक वर्षानें मरण पावला.

चंद्रशेखर:- हा संवत १३७३ मध्यें जन्मला. सं. त त्यानें व्रत घेतलें. सं. १३९३ त (मुनिसुंदराच्या गुर्वावली प्रमाणें सं. १३९२ त) सूरिपद मिळालें सं. १४२३ पावला. त्यानें खालील ग्रंथ रचिले:- (१) उषित भोजन कथा (ह्याला दुसरें नांव वासिकभोज्यकथानक आहे); (२) यवराजर्षिकथा; (३) श्रीमत्-स्तम्भनकहारबंधादिस्तवनानि (ह्याला दुसरें नाव, शत्रुंजय – रैवतस्तुति).

जयानंद:- सं. १३८० त जन्मला. व्रत सं. १३९२ त धारा येथें घेतलें. सूरिपद सं. १४२० त अणहिलज्पट्टण येथें मिळविलें. सं. १४४१ त मृत्यु पावला. त्याचे ग्रंथ:- (१) स्थूलभद्रचरित्र; (२) स्तोत्रें.

(४९) देवसुंदर:- सं. १३९६ त. जन्मला. महेश्वर ग्रामांत सं, १४०४ त व्रत मिळविलें. त्याचे पांच शिष्य होते. ते ज्ञानसागर, कुलमंडन, गुणरत्‍न, साधुरत्‍न आणि सोमसुंदर.

ज्ञानसागर:- सं. १४०५ त जन्मला. दीक्षा १४१७ त घेतली. सूरिपद १४४१ त घेतलें. सं. १४६० मृत्यू पावला अवश्यक आणि ओघनिर्युक्त ह्या ग्रंथावर अवचूर्णी (संक्षेपावृत्ति, सारग्रंथ) लिहिल्या, व श्रीमुनि-सुव्रतस्तव, धनौघन व खंडपार्श्वनाथस्तव, इत्यादि ग्रंथांवर देखील अवचुर्णि लिहिल्या.

कुलमंडन:- सं. १४०९ सालीं जन्मला. व्रत स. १४१७ त घेतलें; सूरिपद सं. १४४२ त घेतलें आणि सं. १४५५ त मृत्यू पावला. त्याचे ग्रंथ:- (१) सिद्धांतालापकोद्धर; (२) विश्वश्रीधरेत्याष्टादशारचक्रबंधस्तव; (३) गरीयो .... हार बंधस्तव, इत्यादि.

गुणरत्‍न:- याचे ग्रंथ:- (१) क्रियारत्‍नसमुच्चय; (२) षङदर्शनसमुच्चयबृहदवृत्ति, इत्यादि. साधुरत्‍न:- यतिजित कल्पावर (अंक ४७ पहा.) एक वृत्ति व इतर ग्रंथ ह्यानें लिहिले.

(५०) सोमसुंदर:- सं. १४३० त जन्मला. व्रत सं. १४३७ त घेतलें. वाचकपद सं. १४५० मिळालें. सूरिपद सं. १४५७ त मिळालें. सं. १४९९ त मृत्यु पावला. त्याचे ग्रंथ:- (१) योगशास्त्रावरील बालावबोध; (२) उपदेशमाला; (३) षडावश्यक; (४) नवतत्व इत्यादि. त्याचे शिष्य मुनिसुंदर, कृष्णसरस्वती हें बिरूद असलेला जयसुंदर (ह्याचें नांव जयचंद्र असेंहि होतें.) भुवनसुंदर आणि दीपालिकाकल्पाचा कर्ता जिनसुंदर हे होते.

(५१) मुनिसुंदर (बिरूद- कालीसरस्वती):- हा सं. १४३६ त जन्मला; व्रत सं. १४४२ त घेतलें, वाचकपद १४४६ त घेतलें. सूरिपद सं. १४७८ घेतलें. सं. १५०३ त मरण पावला. त्याचे ग्रंथ:- (१) उपदेशरत्‍नाकर; (२) शांतिकरम् इति समहिमशांतिस्तव; (३) गुर्वावली, इत्यादि.

(५२) रत्‍नशेखर (बिरूद बालसारस्वत):- सं. १४५७ क्वचित् १४५२) त जन्मला. व्रत १४६३; पंडितपद १४८३; वाचकपद १४९३; सूरिपद १५०२; सं. १५१७ त मरण पावला. त्याचे ग्रंथ:- (१) श्राद्धप्रतिक्रमणवृत्ति, (२) श्राद्धविधिवृत्ति, व (३) आचारप्रदीप. सं. १५०८ लुंकाक अथवा लुंपाकमत लेखक लुंका यानें स्थापिलें, आणि ह्या मतापासून सं. १५३३ त वेषधारांचा उदय झाला.

(५३) लक्ष्मीसागर:- सं. १४६४ त जन्मला. दीक्षा १४७०. पन्यासपद १४९६; वाचकपद १५०१, सूरिपद १५०८, गच्छनायक पद १५१७. (५४) सुमतिसाधु.

(५५) हेमविमल:- सं. १५६२ त कटुक मत त्रिम्तुतिकमतापासून विभक्त झालें. कटुक मत हें गृहस्थ-कटुकाचा पाया होय. संवत १५७० त वेषधरवीजा ह्याच्या प्रभावाचा लुंकामतावर परिणाम होऊन लुंकामतापासून वीजमत भिन्न झाले. सं. १५७२ त उपाध्याय पार्श्वचन्द्र (किंवा पाशचंद्र) ह्याच्या प्रभावाचा परिणाम होऊन त्याच्या नांवाने प्रचलित असलेलें मत नागपुरीय तपागणापासून विभक्त झालें.

(५६) आनंदविमल:- ईलादुर्ग येथें सं. १५४७ त जन्मला. व्रत १५५२. सूरिपद १५७०. सं. १५९६ त. अहमदाबाद येथें मृत्यु पावला.

(५७) विजयदान:- सं. १५५३ त जन्मला. दीक्षा १५६२. सूरिपद १५८७. सं. १६२२ त वटपली येथें मृत्यु पावला.

(५८) हीरविजय:- ह्यानें अकबर बादशहाला धर्मांतराची दीक्षा दिली. तो सं. १५८३ त प्रल्हादनपूरांत जन्मला. दीक्षा पाटणा येथें सं. १५९६ त घेतली. नारदपुरींत १६०८ सालीं वाचकपद मिळालें. सिरोहि येथें १६१० सालीं सूरिपद मिळालें. उम्नानगरांत सं. १६५२ त मरण पावला.

(५९) विजयसेन:- हा संवत १६०४ मध्यें नारदपुरीत जन्मला. दीक्षा १६१३. अकबरबादशहापासून काली सरस्वताबिरूद्ध मिळविलें. स्तम्भतीर्थ येथें सं. १६७१ त मृत्यु पावला.

(६०) विजयदेव:- सं. १६३४ त जन्मला. दीक्षा १६४३. पन्यासपद १६५५. सूरिपद १६५६. जहांगीर बादशहापासून महातापा हें बिरूद मिळविलें. उम्नानगर येथें सं. १७१३ त मरण पावला. त्याच्या पाठीमागून येणारा अधिकारी म्हणून विजयसिंहास नेमिलें होतें. परंतु विजयसिंह हा विजयदेवाच्या अगोदर मरण पावला.

विजयसिंह:- मेडटा येथें सं. १६४४ त जन्मला. दीक्षा १६५४. वाचकपद १६७३. सूरिपद १६९२. सं. १७०९ त मृत्यु पावला.

(६१) विजयप्रभ:- कच्छ प्रांतांतील मनोहरपुर येथें सं. १६७७ त जन्मला. दीक्षा १६८६. पन्यासपद १७०१. सूरिपद सं. १७१० त गंधारबंदिरा येथें मिळालें. नागोरा येथें सं. १७३२ त विजयरत्‍नमाला अनुगामी अदिकारी नेमिलें. [पट्टावलीसारोद्धार पुढील माहिती मिळाली नाहीं].

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .