प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

तत्त्वज्ञान - हा शब्द इंग्रजींतील “फिलासफी”या शब्दाचें भाषांतर म्हणून प्रचलित झाला आहे. तत्त्वज्ञान म्हणून कांहीं निश्चित विषय आहे असें नाहीं. यूरोपांतील वैचारिक आणि शास्त्रीय इतिहास पहातां ज्या ज्ञानक्षेत्रास विशिष्ठ नांव नाहीं त्यास फिलासफीमध्यें दडपण्याचा प्रचार आहे. जेव्हां शास्त्रें पृथक झालीं नव्हतीं तेव्हां अचर्वित असलेल्या विचारमालिकेस फिलासफी म्हणण्याची पद्धति सुरू झाली. अजूनहि ज्या लोकांस फिलासफी या शब्दाचा मोह सुटला नाहीं ते लोक जी निरनिराळीं शास्त्रें या शब्दाखालीं आणतात तीं येणेंप्रमाणें: (१) एपिस्टिमालजी उर्फ विज्ञानशास्त्र, (२) एथिक्स म्हणजे नीतिशास्त्र व (३) सायकॉलाजी ऊर्फ मानसशास्त्र वगैरे.

आयुष्याचा हेतु काय इत्यादि गोष्टीचें विवरण करणें आणि तें मानसशास्त्राच्या किंवा पूर्वगत सृष्टिविकासाच्या साहाय्यानें करणें या तर्‍हेची विचारमाला जेव्हां प्रगट केली जाते तेव्हां त्यासहि फिलासफी म्हणण्याचा प्रघात आहे. स्पेन्सरनें फिलासफी हा शब्द एका निश्चित अर्थानें वापरला होता. तो अर्थ म्हटला म्हणजे “शास्त्रांचें शास्त्र.” अनेक भौतिक शास्त्रांवरून सृष्टिविकासात्मक जे सिद्धांत निघतात, त्या सिद्धांतासहि कांहीं नियमांत घालता येईल तर पहावें या द्दष्टीनें स्पेन्सरनें प्रयत्‍न करून जे सिद्धांत काढले त्यांस तो फिलासफी अगर तत्त्वज्ञान म्हणे. कांहीं इंद्रियातीत ज्ञानाच्या अभिमान्यांनीं या स्पेनरच्या प्रयत्‍नफलास शास्त्र असेच म्हणून त्याला फिलासफर म्हणजे तत्त्ववेत्ता ना म्हणतां सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ असें म्हणण्याचा प्रयत्‍न केले आहे. केवळ प्रत्यक्षमूलक जें ज्ञान असेल त्याच्या अनुमानपरंपरेनें केलेल्या विकासाला फिलासफी या सदरांतून वगळावें असा “फिलासफी” च्या कित्येक अभिमान्यांचा आग्रह आहे. पण त्यांनीं अन्य दिशेनें कांहीं निश्चित प्रगति केली आहे असें वाटत नाहीं. ज्ञानकोशकारांस फिलासफी हें शास्त्रांतील ज्ञानक्षेत्र म्हणून संमत नाहीं; व शास्त्रांचें शास्त्र या पलीकडे जर फिलासफीचा अर्थ घेतला जाईल तर तो प्राचीन परंपरेचा त्याग करण्याची नाखुषी असलेल्या लोकांची एक वेडी आवड याच्या पलीकडे त्यास जास्त महत्त्व द्यावेसें वाटत नाहीं. ज्या निरनिराळ्या विचारपरंपरा आज प्रसिद्ध आहेत त्याचें वर्गीकरण आम्हीं दर्शनें, मतें व संप्रदाय असें करतो आणि त्या विशिष्ट नावाखालीं देण्यांत आल्या आहेत. उदाहरणार्थ “अद्वैत” वगैरे.

यूरोपीय विज्ञानेतिहासामध्यें “फिलासफी” नें निरनिराळ्या काळीं कसकशीं रूपें धारण केलीं याविषयीं थोडेसें विवेचन केलें म्हणजे या विषयावर अवश्य विवेचन केलें असें होईल.

फिलासफी या विषयाची व्याख्या व विषयविवेचनाची मर्यादा ही निरनिराळ्या काळांत व निरनिराळ्या लेखकांची भिन्न भिन्न आढळते. पाश्चात्त्य देशांत प्राचीन काळीं ग्रीक विद्वानांनीं सर्वसामान्य ज्ञानांतून तत्त्वज्ञान हा विषय हळूहळू निराळा काढला. ‘तत्वज्ञान’ या अर्थाचा ग्रीक शब्द प्रथम पायथॅगोरसनें (सुमारें ख्रि. पू. ५८२) उपयोगांत आणला असें म्हणतात; पण त्यांत तथ्य नाहीं. तो शब्द ‘तत्वज्ञान’ या विशिष्ट अर्थानें प्रथम प्लेटोनें वापरला व ‘तत्ववेत्ता’(फिलॉसफर) म्हणजे जो मनुष्य मानवप्राणी ज्या इंद्रियांनां भासमान होणार्‍या जगांतील वस्तुमात्रांत वावरत असतो त्यांचें मूळ सत्यस्वरूप काय आहे हें जाणतो तो, अशा अर्थाची व्याख्या त्यानें केली आहे. “या जगांत सनातन, अविकारी व अविनाशी असें काय आहे हें जो जाणतो तो तत्त्ववेत्ता” किंवा “प्रत्येक बाबतींत वास्तविक जें सत्यस्वरूप असतें त्यावर प्रेम करणारा तो तत्त्ववेत्ता” असें प्लेटोनें आपल्या रिपब्लिक नामक ग्रंथांत म्हटलें आहे. तथापि प्लेटोनें तत्त्वज्ञान हा शब्द नैतिक व धार्मिक ज्ञानाच्या क्षेत्रांनां उद्देशून विशेषत: वापरला होता असें म्हणावें लागतें. तर्कशास्त्र, नीतिशास्त्र व भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञानशास्त्र व अतीद्रियविज्ञान (मेटॅफिजिक्स) या सर्व विषयांच्या क्षेत्रांचें स्पष्ट पृथककरण प्लेटोनें केलेलें नाहीं. प्राचीन काळांतील ‘ज्ञानकोशकार’(एनसायक्लोपेडिस्ट) ही संज्ञा ज्याला यथार्थतेनें देतां येईल असा विद्वान् अरिस्टॉटल यानें तर्कशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांच्या विषयमर्यादा प्रथम ठरविल्या; आणि सर्व द्दश्य जगाच्या मूळांशीं असलेली जी आद्य तत्त्वें (फर्स्ट प्रिंसिपल्स) त्यांविषयींच्या ज्ञानाला त्यानें ‘फर्स्ट फिलॉसफी’ असें नांव दिलें. पण याच विषयाला नंतरच्या लेखकांनी ‘मेटॅफिजिक्स’ हा शब्द रूढ केलेला आढळतो. ‘द्दश्य जगाविषयींचें ज्ञान’ हा विषय ‘फिजिक्स’ या नांवानें संबोधिला जाऊन भौतिक जगाचा त्याच्या मूळ उत्पादकाशीं असलेला संबंध ज्यांत येतो त्याला ‘फिलॉसफी’ किंवा ‘मेटॅफिजिक्स’ असा अर्थ निश्चित झाला. रॅशनल कॉस्मॉलजी हा शब्द बराच काल रूढ होता पण त्यांत मेटॉफिजिक्सपैकीं कांहीं विशिष्ट भागाचा समावेश होतो. फिलॉसफी या विषयांत वुल्फच्या बराच काळ रूढ असलेल्या योजनेप्रमाणें पाहतां, आत्म्याविषयीचें ज्ञान देणारें ‘मानसशास्त्र’(सायकॉलजी), जगाविषयीचें ज्ञान देणारें ‘विश्वज्ञान’ (कॉस्मॉलजी) आणि ईश्वराविषयीचें ज्ञान देणारें दैवतविज्ञान (थिऑलजी) या तिहींचा अंतर्भाव होतो. मुख्य शास्त्र मेटफिजिक्स किंवा फिलॉसफी या विषयाला दुय्यम प्रतीचे असलेले विषय तर्कशास्त्र, नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र हे होत, कारण त्यांत वस्तुस्थितीचें ज्ञान नसून केवळ ध्येयात्मक गोष्टींची चर्चा असते.

फि लॉ स फी आ णि नॅ च र ल सा य न्स.- तत्त्वज्ञान या विषयाचें क्षेत्र स्पष्टपणें लक्षांत येण्याकरितां त्याचें तत्सद्दश विषयांशीं असलेलें भिन्नत्त्व तुलनेनें दर्शविलें पाहिजे. ‘फिलॉसफी म्हणजे आपल्याभोवतीं दिसणार्‍या सृष्टीविषयीचें ज्ञान’ असा अर्थ आहे तर याच सृष्टीविषयीं ज्ञान देणारें सृष्टिविज्ञान (नॅचरल सायन्स) किंवा भौतिकशास्त्रें यांमध्यें व फिलासफीमध्यें फरक काय हा प्रश्न उदभवतो. त्याचें उत्तर असें की, भौतिकशास्त्रें फक्त वस्तुस्थितीचें ज्ञान करून देतात. परंतु या निरनिराळ्या भौतिकशास्त्रांचा तात्त्विकद्दष्ट्या परस्पर संबंध जोडणें, तसेंच या द्दश्य जगाची मानवी आत्म्याला जी जाणीव होते तिचें तात्त्विक स्वरूप जाणणे, आणि या द्दश्य जगाची उत्पादक अद्दश्य शक्ति कोणती आहे हें ठरविणें या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत येतात.

सा य कॉ ल जी, ए पि स्टि मॉ ल जी व मे टॅ फि जि क्स.- तत्त्वज्ञान (फिलॉसफी) व मानसशास्त्र (सायकॉलजी) यांचा अगदी निकट संबंध आहे; करण जीव, जग व जगदीश्वर याविषयीचे सर्व विचार मानवी मनाच्या द्वारें चालतात. पण मन ही चीज काय आहे, त्याचे व्यापार कसे चालतात, मनाचा आणि मेंदूचा संबंध काय वगैरे गोष्टींचें ज्ञान हा स्वतंत्र व मोठा विषय असून त्याला मानसशास्त्र म्हणतात. मनांतील विचारांचा मेंदूंतील व्यापारांशीं निकट संबंध असल्याचें अलीकडे सिद्ध झाल्यापासून या मानसशास्त्र विषयाला प्रत्यक्ष तत्त्वज्ञान या विषयापेक्षांहि अधिक महत्त्व आलें आहे. इंग्रज तत्त्ववेत्त्यांमध्यें ह्यूमपासून ही प्रवृत्ति दिसते. सरडब्ल्यू हॅमिल्टन या तत्त्ववेत्त्यानें ‘सायकॉजली उर्फ मेटॅफिजिक्स’ अशी शब्दयोजना एके ठिकाणीं केली असल्यामुळें त्यालहि मानसशास्त्राच्या क्षेज्ञाची स्पष्ट कल्पना नव्हती असें म्हणावें लागतें. सायकॉलजी व एपिस्टिमॉलजी (विज्ञान शास्त्र) यांमधील स्पष्ट फरक प्रथम कांट या जर्मन तत्त्ववेत्त्यानें दाखविला. त्याचा ‘क्रिटिक ऑफ प्युअर रीझन’ हा ग्रंथ ज्ञानोपपत्तीबद्दलचा आहे; आणि कांटनंतर कांहीं काल तत्त्वज्ञानविषयक विवेचनाला ‘विज्ञानशास्त्रा’चें स्वरूप प्राप्त झालें होतें. लॉक ह्या तत्त्ववेत्त्यानें ‘थिअरी ऑफ नॉलेज,’ याच विषयावर लिहिलें; पण त्यानें आपल्या लेखनांत विज्ञानशास्त्र व मानसशास्त्र यांचा घोटाळा केला आहे. बार्कले व ह्यूम यांच्या ग्रंथात तोच दोष आढळतो.

हेगेलनें एपिस्टिमॉलजी व मेटॅफिजिक्स यांचा घोंटाळा केला आहे. ज्ञानाची उपपति (एपिस्टेमालजी) नीट लागण्याकरितां जीवाची (मानवाच्या अस्तित्त्वाची) उपपत्ति नीट लागली पाहिजे व म्हणून हे दोन विषय अगदी संलग्न आहेत; तथापि ते एक नाहींत. पण हेगेल व हर्बर्ट स्पेन्सर यांनीं या दोन अलग विषयांची गुंत गुंत केली आहे. त्यामुळें हर्बर्ट स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानाला मानवी अज्ञानविषयक तत्त्वज्ञान उर्फ अज्ञेयवाद व (डॉक्ट्रिन ऑफ दि अननोएबल) असें स्वरूप प्राप्त झालें. कांट व कोम्ट यांच्याहि तत्त्वज्ञानाला ‘अज्ञेयवाद’(अ‍ॅग्नॉस्टिसिझम) असें म्हणतां येईल. या मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाला ही दिशा लागण्याचें कारण असें कीं, शुद्ध तत्त्वज्ञानाविषयक प्रश्नांकडे हे लोक विज्ञानशास्त्रांतील सिद्धांतांच्या द्दष्टिकोनानें पाहतात. शबब तत्त्वज्ञान व विज्ञानद्यास्त्र यांच्यामधील फरक स्पष्टपणें ध्यानांत घेतला पाहिजे.

लॉ जि क, ए स्थे टि क्स व ए थि क्स.- तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र (लॉजिक) या दोन विषयांचाहि असाच घोंटाळा केला जातो. हिंदी तत्त्वज्ञानामध्यें न्याय व वैशेषिक हीं दोन मतें याचीं सुप्रसिद्ध उदाहरणें आहेत. सत्यनिर्णय येण्याकरितां आपण आपले विचार एकमेकांनां कसे जोडले पाहिजेत, हें तर्कशास्त्र सांगतें. त्यामुळें तर्कशास्त्राचा विवानशास्त्राशी निकट संबंध आहे. तत्त्वज्ञानविषयक विवेचनाला तर्कशास्त्राची अत्यंत अवश्यकता असली तरी हे दोन विषय अगदीं भिन्न आहेत.

एत्थेटिक्स (सौंदर्यशास्त्र) हा विषय मानसशास्त्राचा किंवा शारीरशास्त्राचा भाग आहे. पदार्थांना सुंदर किंवा भव्य (ब्यूटिफुल ऑर सब्लाइम) अशीं विशेषणें ज्या भावनांमुळें आपण देतों त्या भावना कोणत्या प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक चळवळीमुळें उत्पन्न होतात असा प्रश्न केला म्हणजे सदरहू विवेचनाला सुखदु:खादि भावनांचें ज्ञान असें स्वरूप येतें. परंतु हाच प्रश्न निराळ्या तर्‍हेनें केला पाहिजे. वस्तू कशामुळें सुंदर दिसतात व या सौंदर्यगुणाचा विश्वाच्या अंतिम स्वरूपाशीं काय संबंध आहे ? असा प्रश्न केला म्हणजे सौंदर्यशास्त्र हें तत्त्वज्ञानाची एक शाखा बनतें. परंतु निरनिराळ्या कलांची सुधारणा व वाढ हाहि सौंदर्यशास्त्राचाच विषय असल्यामुळें तत्त्वज्ञानाहून हा विषय अगदीं भिन्न ठेवणें जरूर आहे.

नीतिशास्त्राबद्दल असेंच म्हटलें पाहिजे. नीतिशास्त्राचे पुष्कळसे विषय असे आहेत कीं त्यांचा तत्त्वज्ञानाविषयाशीं कांहीं संबंध नाहीं. नीतिविषयक कल्पनांची वाढ कशी झाली या प्रश्नाचा निकट संबंध मानसशास्त्राशीं येतो; समाजशास्त्राच्या (सोशिऑलजी) निरनिराळ्या अंगांशींहि हा विषय संलग्न आहे. तसेंच मनुष्यामधील नैतिक बुद्धि उर्फ सदसद्विवेकबुद्धि हिचें स्वरूप काय आहे, मनुष्याला इच्छास्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ वुईल) कितपत आहे, वगैरे प्रश्नहि मानसशास्त्राच्या क्षेत्रांतले आहेत. हा भाग वगळल्यास नीतिशास्त्राकरितां दोनच प्रश्न शिल्लक राहतात ते (१) कर्तव्य म्हणजे काय आणि मानवी क्रियांचें ध्येय काय असावें ? आणि (२) या ध्येयानुसार निरनिराळ्या कर्तव्यांचा दर्जा कसा ठरवावा ? वास्वविक कर्तव्याकर्तव्य (कर्मा कर्म) विचार हाच नीतिशास्त्राचा मुख्य विषय होय. पण पुष्कळशा नीतिशास्त्रावरील ग्रंथांत या विषयाचा अभावच दिसून येतो. मानवी क्रियांचें ध्येय ठरविणें, या नीतिशास्त्रांतील पहिल्या प्रश्नाचा तत्त्वज्ञानाशीं निकट संबंध आहे. इतकेंच नव्हें तर तो तत्त्वज्ञान या विषयाचाच एक भाग आहे; आणि म्हणूनच या भागाला कांटनें ‘मेटॅफिजिक्स ऑफ एथिक्स’ असें म्हटलें आहे तें यथार्थ आहे.

फि लॉ स फी ऑ फ  दि स्टे ट (पोलिटिकल फिलॉसफी), फि लॉ स फी ऑ फ हि स्ट्री, व फि लॉ स फी ऑ फ रि लि ज न.- प्लेटो व अरिस्टॉटल यांच्या ग्रंथांत नीतिशास्त्र आणि राजनीतिशास्त्र हीं अगदीं अविभाज्यरीतीनें एकत्र केलीं आहेत. मानवाला आपलें अंतिम हित, समाजांत राहिल्यानेंच साधतां येतें असें दिसून आल्यामुळें या तत्त्ववेत्त्यांनीं राज्यकारभाराची उत्तम पद्धति हेंच सदाचरणाचें साधन ठरविलें. प्लेटोचें रिपब्लिक व हेगेलचें फिलॉसफी डेस् रेचटस हीं पुस्तकें याच अनुसंधानानें लिहिलीं आहेत. तथापि नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र व तत्त्वज्ञान हे विषय अगदीं पृथक् पृथक् आहेत. ही गोष्ट वरील विवेचनावरून स्पष्टपणें ध्यानांत येईल.

तत्वज्ञान या विषयाचें पूर्ण विवेचन होण्याकरितां अखिल मानव जातीचा इतिहास अवलोकन करून त्यांत उत्क्रांतितत्त्व कितपत द्दगोचर होतें हें पाहिलें पाहिजे. या विषयाला ऐतिहासिक तत्त्वज्ञान (फिलॉसफी ऑफ हिस्ट्री) हें नांव देण्यांत येतें.

शेवटीं दैवतविज्ञान (थिआॉलजी) आणि तत्त्वज्ञान (फिलासफी) किंवा धर्म (रिलिजन) आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध काय आहे हें पहावयाचें. परमेश्वराचें स्वरूप काय व परमेश्वरासंबंधानें मानवाचें कर्तव्य काय, हे प्रश्न धर्म किंवा दैवतविज्ञान या विषयांमध्यें येतात. यासंबंधानें तत्त्वज्ञान या विषयांतहि विवेचन काहीं अंशीं येतें. परमेश्वरप्राप्ति, मुक्ति, शाश्वत शांति व आनंद हे धर्माचे विषय आहेत; आणि या बाबतींत मानवजातीच्या कल्पना कोणत्या आहेत त्याची आजपर्यंतची माहिती देणे व त्यांतून उत्क्रांतितत्व व सत्यस्वरूप कसें बाहेर पडत आहे हें दाखविणें, हे ‘फिलासफी ऑफ रिलिजन’ या विषयाचें काम आहे.

याप्रमाणें फिलॉसफी (तत्त्वज्ञान) या मूळ अत्यंत व्यापक अशा विषयाचें वर्गीकरण होतां होतां केवळ ‘तत्वज्ञान’ या विषयाखालीं येणारी माहिती अगदीं संपुष्टांत आली आहे; आणि उलटपक्षी ‘फिलॉसफी’ हा एक सामान्य अर्थीं शब्द असून ‘फिलॉसफी ऑफ स्टेट’‘फिलॉसफी ऑफ हिस्ट्री’,‘फिलॉसफी ऑफ रिलिजन’ वगैरे अनेक शब्दप्रयोग रूढ होत आहेत; इतकेंच नव्हें तर ‘ज्ञाना’ च्या अगदीं आधुनिक वर्गीकरणांत ‘हिस्ट्री’ (इतिहास) व ‘फिलासफी’ (तत्त्वज्ञान) हीं प्रत्येक ज्ञानविषयाचीं दोनदोन अंगें समजलीं जातात.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .