प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

तंत्रग्रंथ - हे हिंदुंच्या धार्मिक वाङमयांपैकीं असून योग्यतेच्या द्दष्टीनें श्रुति, स्मृति, पुराणें व तंत्रें असा त्याचा चवथ्या नंबरचा दर्जा आहे. तंत्रग्रंथांतील विधिनियम पाळणारे लोक तर यांना पांचवा वेद मानतात. कांहीं तंत्रग्रंथ पुराणानंतरचे आहेत व कांहीं त्यांच्याहि पूर्वींचे आहेत. तथापि त्यांचा रचनाकाल निश्चित झालेला नाही. कांहीं ग्रंथ ६ व्या व ७ व्या शतकांतील आहेत. ‘तंत्र’ याचा मूळ अर्थ जाळें असा आहे. धार्मिक विधि व नियम असा अर्थ नंतर आला; व या ग्रंथानुसार वागणारा असा एक धर्मपंथ निर्माण झाला. हिंदुंतील दत्तात्रयाचा जो त्रैमूर्ति अवतार त्यानें हे ग्रंथ लिहिले अशी समजूत आहे. तथापि प्रत्यक्ष ग्रंथाची रचना शिवपार्वतीसंवाद अशा स्वरूपाची आहे. कुल्लूकभट्ट म्हणतो ‘ईश्वरप्रणीत ग्रंथ दोन प्रकारचे आहेत; एक वैदिक व दुसरे तांत्रिक. बंगालमधील शाक्तपंथीयांमध्यें या ग्रंथांनां वेदांहूनहि अधिक मान आहे, कारण शाक्तपंथाचे हेच मुख्य धर्मग्रंथ होत. या ग्रंथांतील शिकवण भक्तिमार्गी असून हा मार्ग ज्ञान किंवा कर्म मार्गापेक्षां अधिक योग्यतेचा मानतात. तंत्रग्रंथप्रणीत पंथांत जातिभेद किंवा स्त्रीपुरूष भेद मानीत नाहींत म्हणजे ईश्वरोपासनेच्या बाबतींत सर्वांचा दर्जा समान मानतात. सतीच्या चालीचाहि निषेध या ग्रंथांत केला आहे.

तां त्रि क वा ङ म य- या सदराखालीं येणारे बरेच ग्रंथ असून ते शारदा लिपींत लिहिलेले आहेत. त्यांपैकीं वामकेश्वर तंत्र नांवाच्या ग्रंथांत चौसष्ट तंत्रांचीं नांवें पुढीलप्रमाणें दिलीं आहेत:-

 १  महामायाशंबर  ३७  मातृभेद  ५२ कुलचूडामणि
 २  योगिनीजालशंबर  ३८  गुह्यतंत्र  ५३  सर्वज्ञानोत्तर
 ३  तत्त्वशंबरक  ३९  कामिक  ५४  महापिशामत
 ४-११  भैरवाष्टक  ४०  कालपाद  ५५  महालक्ष्मीमत
 १२ १९  बहुरूपाष्टक  ४१  कालसार  ५६  सिद्धयोगीश्वरमत
 २०  ज्ञान  ४२  कुब्जिकामत  ५७  कुरूपिकामत
 २१-२८यमलाष्टक  ४३  नयोत्तर  ५८  रूपिकामत
 २९  चंद्रज्ञान  ४४  वीणू (णा) द्य  ५९  सर्ववीरमत
 ३०  वासुकि  ४५  तोत्तल  ६०  विमलामत
 ३१  महासम्मोहन  ४६  तोत्तलोत्तर  ६१  उत्तम
 ३२  महोच्छुश्म  ४७  पंचामृत  ६२  आरूणेश
 ३३  महादेव  ४८  रूपभेद  ६३  मोदनेश
 ३४  वाथु (तु ?)  ल४९  भूतोड्डामर  ६४  विशुद्धेश्वर
 ३५  नयोत्तर  ५०  कुलसार
 ३६  हृदभेद  ५१  कुलोद्दीश

वरील यादींत नयोत्तर दोनदां आलें आहे. त्यापैकीं पहिलें (३५ वें) वानुलोत्तर असावें असें वाटते. वरील यादींतील आणि यज्ञेश्वरशास्त्री यांनीं आपल्या आर्यविद्यासुधाकर नामक ग्रंथांत दिलेल्या यादींतील व प्रोफेसर ऑफ्रेक्ट यांनीं ऑक्सफर्ड कॅटलागांत दिलेल्या यादींतील नांवांत बराच फरक आहे. वरील यादींतील महोच्छुश्म याऐवजीं वामजुष्ट असें इतर ठिकाणीं असून तें वामकेश्वर किंवा वामिकेश्वर याबद्दल आलें असावें. म्हणून महोच्छुश्मं हें नांव येथें चुकीनें आलें असावें.

शांबरतंत्र नामक ग्रंथांत संस्कृत, हिंदी, गुजराथी व मराठी या चारी भाषांत जादूचे व दैवतसिद्धीचे मंत्र लिहिले आहेत. त्यांचा उपयोग शत्रूंचा नाश, संकटनिवारण, अद्भुत शक्तीची प्राप्ति व इच्छित वस्तूची प्राप्ति वगैरे गोष्टी साधण्याकरितां करतात. या मंत्रांनांच एक दोन ठिकाणीं शाबर मंत्र असें म्हटलें आहे. आरंभीं बारा कापालिकांचीं पुढीलप्रमाणें नांवें दिलीं आहेत:-

 १  आदिनाथ  ७  महाकाल
 २  अनाथ  ८  कालभैरवनाथ
 ३  काल   ९ वाटुक
 ४  अतिकालक  १०  भूतनाथ
 ५  कराल  ११  विर (वीर ?) नाथ
 ६  विकराल  १२  श्रीकंठ

  बारा शिष्य, निरनिराळे मार्गप्रवर्तक यांचीं नांवें पुढील प्रमाणें त्याच ग्रंथात दिलीं आहेत:-

 १  नागार्जुन  ७  चर्पट
 २  जडभृत  ८  अव (?) घट
 ३  हरिश्चंद्र  ९  वैराग्य
 ४  सप्तनाथ  १०  कंथाधारी
 ५  भीमनाथ  ११  जलंधरी
 ६  गोरक्ष  १२  यमलार्जुन

कुलार्णवतंत्र, रूद्रयामलतंत्र, ब्रह्मयामल, भैरवयामल, संम्मोहनतंत्र, विश्वोद्धरतंत्र, सुदर्शनसंहिता वगैरे आणखी तंत्रग्रंथ आहेत.

पार्वतीपुत्र नित्यनाथ यानें केलेल्या मंत्रसार नामक ग्रंथांतील सिद्धखंडांत दुसर्‍यांना आपल्या इच्छेप्रमाणें वागण्यास लावण्याची मृतांना पुन्हां जिवंत करण्याची वगैरे अद्भत शक्ति प्राप्त करून घेण्याचे मंत्र दिलेले आहेत. पुण्यानंदाचा कामकलाविलास व भास्कररायाचा वरिवस्यारहस्य असे दोन दुसरे ग्रंथ आहेत. दुसरा ग्रंथ १७ व्या शतकांतला आहे. त्या दोघांचा विषय एकच असून त्यांपैकीं पहिलें तंत्र अधिक जुनें आहे व पहिल्यांतील उतारे दुसर्‍यांत आलेले आहेत. त्यामध्ये देवीच्या उपासनेच्या विविध पद्धतीचा गूढज्ञानपर अर्थ सांगितलेला आहे; व त्यातून निष्पन्न होणार्‍या तात्त्विक सिद्धांतांचा उपनिषदातील विवेचनाशीं मेळ घातलेला आहे.

शां भ व द श नां ती ल त त्त्व ज्ञा न. - या तत्त्वज्ञानपद्धतीला शांभवदर्शन असें नांव दिलेलें आढळतें. त्यांत शिव आणि शक्ति अशीं दोन मूलद्रव्यें कल्पिलीं आहेत. शिव हा प्रकाशरूपानें विमर्श किंवा स्फूर्तिरूपांत असलेल्या शक्तीमध्यें प्रवेश करतो व बिंदुरूप बनतो. त्याचप्रकारें शक्ती शिवामध्यें शिरते आणि तो बिंदु वाढूं लागतो. नंतर त्यांतून नाद नामक स्त्रीजातीय तत्त्व निर्माण होतें. हें भातकणाच्या अग्राएवढें बारीक असते, पण त्यांत सृष्टींतील छत्तीस मूलतत्त्वें बीजरूपांत असतात. पुढें बिंदु व नाद एकत्र होऊन त्यांचा एक बिंदु बनतो. हा पदार्थ म्हणजे स्त्रीपुरूषस्वरूपी शक्तींमधील आत्यंतिक स्नेहभावाचा पुतळा होय. यालाच काम (प्रेम) म्हणतात. त्या दोन बिंदुपैकीं पुरूषत्त्वदर्शक बिंदुचा रंग पांढरा व स्त्रीत्त्वदर्शक बिंदुचा रंग तांबडा असून त्या दोन बिंदुना कला म्हणतात. काम म्हणजे सूर्य, व दोन बिंदुपैकीं एक चंद्र दुसरा अग्नि, असे मानले आहेत. काम व दुसरे दोन बिंदु हे एकत्र होऊन त्यांचा तिसराच पदार्थ बनतो, त्याला कामकला म्हणतात त्यांतूनच सर्व वाक् म्हणजे शब्द अर्थ म्हणजे पदार्थ यांची उत्पति होते. वरिवस्यारहस्यांत कामकला याच्यामध्यें पुढील तीन पदार्थ असल्याचें सांगितलें आहे:- पहिला, मिश्रबिंदु अथवा काम; दुसरा स्त्री आणि पुरूषजातीय बिंदु; आणि तिसरा, हार्धकला, हा काम किंवा पहिला बिंदु यांमध्ये शक्तीने प्रवेश केल्यावर वाढ होऊन उत्पन्न होतो, व त्याचे स्वरूप गुरूमुखांतूनच समजावून घेतलें पाहिजे, त्याचें ग्रंथांत वर्णन देतां येत नाहीं असें भास्करराय म्हणतो. कामकलाविलास ग्रंथावरील टीकेंत उल्लेखिलेल्या एका ग्रंथांत, कामकला ह्या सर्वश्रेष्ठ देवतेचा सूर्य (मिश्रबिंदु) हा चेहरा असून चंद्र व अग्नि (पांढरा व तांबडा हें दोन बिंदु) हे तिचे स्तन आहेत व हार्धकला हें तिचें जननेंद्रिय होय, असें म्हटलें आहे. कामकला याच देवतेची परा, ललिता, भट्टारिका आणि त्रिपुरसुंदरी हीं आणखीं नांवें आहेत. संस्कृतभाषेच्या लिपीचें ‘अ’ हें अक्षर म्हणजे शिव आणि शेवटचें अक्षर ‘ह’ म्हणजे शक्ति असें रूपक कल्पिलें आहे व म्हणूनच प्रथम बिंदूपासून निघालेले स्त्रीजातीय तत्त्व नद यालाच हार्धकला म्हटलें आहे. म्हणजेच कलेचें अर्ध याचें ‘ह’ या अक्षराशीं साम्य कल्पिलें आहे. शिव व शक्ति यांच्या संयोगानें उत्पन्न झालेली कामकला किंवा त्रिपरसुंदरी हिचें निदर्शक गूढाक्षर अ आणि ह यांच्या संयोगानें झालेलें आहे, तें अह् अतवा अह म्हणजेच अहं = ‘मी’ हें होय. म्हणूनच त्रिपुरसुंदरीला अहंता उर्फ मीपणा असें म्हटलें आहे. अर्थांत् तिच्यापासून उत्पन्न झालेल्या सर्व वस्तुमात्रांत अहंभाव किंवा मीपणा भरलेला असतो. येणेंप्रमाणें सर्व जीवात्मे हे त्रिपुरसुंदरीचींच रूपें असून ते जेव्हां कामकलाविद्या व देवीचक्रें यांचा अभ्यास करून तदनुसार आचरण करतात तेव्हां ते स्वत:च त्रिपुरसुंदरीच्या स्वरूपाप्रत पोहोचतात. ज्याप्रमाणें त्रिपुसुंदरीपासून सर्व वस्तुमात्रांचा उगम होतो त्याप्रमाणें अ आणि ह या आद्यंत अक्षरांमध्यें सर्व शब्दब्रह्माचा अन्तर्भाव होत असल्यामुळे सर्व भाषेचा उगम तिच्यापासून होतो. म्हणून तिला परा म्हणजे चार भाषणप्रकारांपैकीं पहिला प्रकार म्हटलें आहे. भास्करराय म्हणतो कीं, सर्व सृष्टि हा एक परिणाम किंवा मूळ बिंदूपासून झालेली वाढ आहे. वेदांतशास्त्रांत सांगितल्याप्रमाणें विवर्त म्हणजे केवळ मिथ्याभास किंवा खोटा देखावा नाहीं. या पंथांत सांगितलेलीं मूळ छत्तीस तत्त्वें पुढें दिली आहेंत.

यांपैकी पहिली अकरा ही याच पंथातील विशेष मानलेली तत्त्वें असून बाकी सर्व सांख्यशास्त्रांतल्याप्रमाणे आहेत. यापैकीं १७-२१ हीं पंच ज्ञानेंद्रियें व २२-२६ हीं पंच कर्मेंद्रिये असून २६ वें मन हें ज्ञान व कर्म या दोहोंचे इंद्रिय आहे. २७-३१ हीं पंच तन्मात्रें म्हणजे सूक्ष्म तत्त्वें असून ३२-३६ हीं वृद्धिंगत झालेली तत्त्वें आहेत.

 मूलतत्त्वें
 १  शिव  १३  प्रकृति  २५  पायु
 २  शक्ति  १४  अहंकार  २६ उपस्थ
 ३  सदाशिव  १५  बुद्धि  २७  शब्द
 ४  ईश्वर  १६  मन  २८  स्पर्श
 ५  शु्द्धषवद्या  १७  श्रोत्र  २९  रूप
 ६  माया  १८  त्वक्  ३०  रस
 ७  कला  १९  नेत्र  ३१  गंध
 ८  विद्या  २०  जिव्हा  ३२  आकाश
 ९  राग  २१  घ्राण  ३३  वायु
 १०  काल  २२  वाक्   ३४  तेज
 ११ नियति  २३  पाणी  ३५  अप
 १२ पुरूष  २४  पाद  ३६  पृथ्वी

शांबरदर्शनांतील तत्त्वज्ञान याप्रकारचें आहे. त्यांत आरंभीं जरी पुरूषत्त्व मान्य केलेलें असलें तरी पुढें त्याला गौणत्त्व देवून स्त्रीतत्त्वच श्रेष्ठ ठरविलें आहे व तदनुसार त्रिपुरसुंदरी ही सर्व श्रेष्ठ देवता असे मानलें आहे; आणि या पंथांतील प्रत्येक भक्ताचें परम कर्तव्य म्हणजे आपल्या त्रिपुरसुंदरी देवतेच्या स्वरूपाप्रत पोहोंचणें हें आहे, व त्याकरितां तिच्या भक्तानें करावयाच्या धार्मिक अभ्यासामध्यें स्वत: आपण स्त्रीस्वरूप आहोंत अशी भावना आपणांत पूर्ण बाणेल, असा प्रयत्‍न करावयाचा असतो. पुणें शहरनजीकच्या एका खेड्यांत एक शाक्तपंथीय जोगी असून तो स्त्रीयांचीं वस्त्रें परिधान करीत असतो असें ऐकण्यांत आहे.

दे वी च्या उ पा स ने चे प्र का र.- वरिवस्यारहस्य ग्रंथांत शक्तिपूजेविषयीं सविस्तर अशी माहिती दिलेली असून तिचा गूढार्थ काय हेंहि तेथें सांगितलें आहे. कामकलाविकास ग्रंथावरील टीकेंत शेवटीं हें सांगितलें आहे कीं, ब्रह्मज्ञान किंवा शिव अथवा त्रिपुरसुंदरी यांशीं एकरूपता होण्याकरितां या पंथाची दीक्षा घेतलीच पाहिजे. ही दीक्षा म्हणजे एक प्रकारचा धार्मिक अभ्यास आहे. या दीक्षेचे तीन प्रकार आहेत ते आणवी, शाक्ती व शांभवी हे होत. परंतु दीक्षा प्राप्त होण्याकरतां परमदेवतेची भक्ति करावी लागते. ही भक्ति करण्याचेहि तीन मार्ग आहेत ते – परा, अपरा व परपरा. त्यांपैकीं पहिल्या म्हणजे परा मार्गामध्यें महापद्मवनामध्यें वास करणार्‍या शिवाच्या अंकावर बसलेल्या देवीच्या आनंदमय स्वरूपाचें एकाग्र मनानें ध्यान करून ती देवी सर्व सृष्टिनिर्माणकत्रीं असून आपण स्वत: तद्रूपच आहोत, अशी भावना द्दढ करावयाची असते. दुसरा मार्ग चक्रपूजेचा; यांत कांहीं गूढार्थक चक्रांच्या द्वारें पूजा करावयाची असते. हा बाह्ययाग म्हणजे भक्तीचा भौतिक मार्ग आहे; आणि तिसरा मार्ग या पंथांतील तात्त्विक ज्ञानाचा अभ्यास करणें हा होय.

चक्रपूजेच्या मार्गानें करावयाच्या देवीच्या उपासनेंतील मुख्य गोष्ट म्हणजे देवीला अमृतरूप मद्य अर्पण करणें. मांस व मत्स्य हेहि पदार्थ अर्पण करावयाचे असून देवीच्या आराधनेकरितां ‘म’ अक्षरानें आरंभ होणार्‍या एकंदर पाच गोष्टी करावयाच्या असतात त्या-  मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन. मोक्षप्राप्तीची इच्छा करणार्‍या प्रत्येक भक्ताला या शांभवदर्शनाचा आश्रय करावा लागतो. महामायाशंवर वगैरे इतर तंत्रात जे मार्ग सांगितलेले आहेत ते सर्व शिवानेंच उपदेशिलेलें आहेत, पण त्यांचा अवलंब करावयाचा नसतो. कारण ते केवळ दुष्ट लोकांनां भुलाविण्याकरितां सांगितलेले असून फक्त हलक्या दर्जाचे लोक त्यांचा आश्रय करतात. तंत्रग्रंथामध्यें परम देवतेचीं परस्परविरोधी अशीं अनेक स्वरूपें वर्णिलीं असून त्यापैकीं कित्येक कृष्ण व भयानक आहेत. देवीभक्तांचे अनेक निरनिराळे पंथ असून प्रत्येकानें हेतुपूर्वक आपला आराधनामार्ग भिन्न भिन्न ठरवून ठेवलेला आहे.

ऑर्थर अ‍ॅव्हॅलॉननें तंत्रवाङमय प्रसिद्ध करून त्या विषयाबद्दल बरेच श्रम केले आहेत. एच. एच्. विल्सन, मॉनिअर विल्यम व ए. बार्थ यांनींहि तंत्रें व शाक्तधर्मासंबंधीं आपल्या समजुतीप्रमाणें अभ्यास केला आहे. डॉ. भांडारकर यांनीं शाक्तधर्मास फारसे महत्त्व दिलेलें आढळत नाहीं. तंत्रें व शाक्तपंथ अनीतिमूलक आहेत, अशी जनसमजूत आहे, परंतु ऑर्थर अ‍ॅव्हॅलॉननें मूळग्रंथ प्रसिद्ध करून व सुत्रांचे अर्थ देऊन व मार्मिक प्रस्तावना लिहून वरील समजुती नाहींशा करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

तंत्रवाङमय हें बाह्यत: बाष्कळ अथवा हास्यास्पद व अनीतिमूलक असें दिसतें तथापि तें एक गूढशास्त्र आहे व हें गूढ उकलणार्‍या जिज्ञासूला असें आढळून येतें की, औपनिषद तत्त्वज्ञान हेंच सर्व तंत्रांचें शाक्तधर्माचें अधिष्ठान आहे. ब्रह्म ही कांहीं तरी एक अगम्य वस्तु नसून ते आदि सामर्थ्य आहे व त्यांपासूनच जगाची उत्पति, स्थिति व लय होत असतो. शक्ति हा शब्द व्याकरणद्दष्ट्या स्त्रीलिंगी आहे. जगावा अनुभवहि असाच आहे कीं सर्व उत्पत्तीचें आदिकारण स्त्री होय. एतावता प्रकृति हेंच आदिकारण होय. पुराणांत तरी ती पुरूषाची म्हणजे शिवाची पत्‍नी म्हणून प्रसिद्ध आहे. या जगन्मातेंत सर्व देवांची शक्ति एकवटलेली आहे. तिच्यांत ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा अन्तर्भाव होतो. जगाची उत्पत्ति, स्थिति व लय तिच्यामुळेंच संभवतात. महानिर्वाणतंत्रामध्यें या शक्तिदेवीचें उत्कृष्ठ वर्णन आढळतें.

या देवीच्या उपासनेला ‘पंचतत्त्वें’ जरूर असतात. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन हीं पंचतत्त्वें संस्कारित शाक्तमंडळानेंच आचरणांत आणावयाचीं असतात. या पंचतत्वांचा दुरूपयोग केला जाऊं नये असा महानिर्वाणतंत्रांचा कटाक्ष आहे. मनसोक्त सुरापान करणारा हा देवीचा भक्त होत नाहीं. कलियुगांत फक्त स्वभार्याच शक्ति म्हणून उपभोगिली जावी व मद्याऐवजीं दूध, साखर, मध इत्यादि वस्तूंचाच उपयोग केला जावा, स्वेच्छाचार सोडून देऊन कलियुगांत फक्त कमलपाद देवीचीच अर्चा करावी इत्यादि अनेक सुधारणा महानिर्वाणतंत्रांत पंचतत्वासंबंधीं केल्या आहेत. पंचतत्त्वांचें अनुष्ठान फक्त वीराला अथवा खर्‍या अधिकारी साधकालाच शक्य आहे, इतरांस नाहीं असाहि इषारा आहे.

या देवीच्या उपासनेचीं साधनें मंत्र, बीज, यंत्र, मुद्रा व न्यास इत्यादि आहेत. या साधनावलंबानें देवी साधकावर प्रसन्न होते. इतर धर्मपंथांप्रमाणेंच शाक्तांचें मोक्ष हेंच साध्य आहे. वेदस्मृतिपुराणें व इतिहास हे गतकालीन धर्मग्रंथ होत, परंतु कलियुगांत तंत्रें हेंच एक मोक्षाचें साधन होय. वेदस्मृतीपेक्षां तंत्रवाङमय बरेच आधुनिक कालाचें आहे. महानिर्वाणतंत्रांत वर्णन केलेल्या देवीच्या उपासनेंत भौक्तिक व आध्यात्मिक गोष्टीचें मधुरमीलन झालेलें आहे असें आढळून येतें. कारण त्यांत बाह्योपकरणांच्या थाटाबरोबरच ध्यान अथवा मानसपूजेसहि बरेंच महत्त्व देण्यांत आलें आहे.

शाक्तधर्माचा हिंदु धर्मांत अन्तर्भाव करण्यांत येत असतो. शाक्तासारखे अनेक पंथ मूळ ब्राह्मणधर्माहून विकृत स्वरूपांत प्रचलित झाले आहेत. तथापि शिव व विष्णु यांची उपासना करणारे जे पंथ आहेत त्यांनां ब्राह्मणधर्म हेंच अधिवेशन आहे. तंत्रवाङमयांत वेदान्त व सांख्यतत्वें बरींच आढळतात. महानिर्वाणतंत्रांतील आठव्या अध्यायांतील नीतिशास्त्रगीता ही मनु व बुद्ध यांची आठवण करून देते. शाक्त धर्मांत फारसा कडक जातिभेद नाहीं. त्यांच्यांत सर्व जातींची एक पाचवी जात मानण्यांत येते. मनूनें चार आश्रम सांगितलें आहेत. परंतु शाक्तांमध्यें गार्हस्थ्य व संन्यास हे दोनच आश्रम मानण्यांत येतात. प्रत्येक जातीचीं कर्तव्यें, स्त्रीपुरूष कर्तव्यें, कौटुंबिक कर्तव्यें, सर्व संस्कार, विवाह व श्राद्धदि विधी वगैरेंचा तंत्रामध्यें पूर्ण उहापोह करण्यांत आला आहे.

तंत्रवाङमयाबद्दल आजपर्यंत लोकांचें दुर्लक्ष्य व पूर्वग्रह होतें, परंतु हें वाङमय अभ्यासिलें जाणें आवश्यक आहे. महायान, बुद्धधर्म व तिबेटांतील बौद्धधर्म यांवर तंत्राचा परिणाम झालेला आहे. या गोष्टीचें महत्व धर्माच्या इतिहासांत बरेंच मानलें जाईल. एकंदर १९२ तंत्रें आहेत असें म्हणतात. ऑर्थर अ‍ॅव्हॅलॉनचे तंत्रवाङमयाचे तीन विभाग प्रसिद्ध आहेत. तंत्रवाङमयांत मंत्राभिधान हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. एकाक्षरकोश पुरूषोत्तमदेवानें केला आहे, व बीजनिघंट हा भैरवकृत एक ग्रंथ आहे. महीधर व माधव यांनीं मातृकानिघटु नामक ग्रंथ लिहिले आहेत. मुद्रानिघंटु हा वामकेश्वरतंत्राचा भाग आहे. श्रीतत्त्वचिंतामणीच्या सहाव्या अध्यायांत षट्चक्रनिरूपण आहे, व हा तत्त्वचिंतामणी ग्रंथ पूर्णानंस्वामीनें लिहिला आहे. ‘प्रपंचसारतत्व’ हा ग्रंथ शंकराचार्यानीं लिहिला आहे असे म्हणतात. तथापि यासंबंधीं बराच मतभेद आढळतो. या ग्रंथांत सृष्टीची उत्पत्ति, देहाची उत्पत्ति, काल, संस्कार, होम, गायत्रीमंत्र इत्यादि विषयांचा उहापोह केलेला आहे. सर्वांत निर्वाण, बृहन्निर्वाण व महानिर्वाण ही तंत्रें प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणें नील, बृहन्नील व महानील ही तंत्रेहि प्रसिद्ध आहेत. महानिर्वाण व प्रपंचसार या तंत्रांत उत्तान शृंगार फा आहे असा एक आक्षेप आहे. परंतु त्यांत बीभत्स असें कांहींच नाहीं असा डॉ. विंटरनिट्झ यांनीं आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.

बौ द्ध तं त्रें- बौद्ध धर्माच्या पूर्ण आध्यात्मिक अवनतीचा पुरावा या द्दष्टीनें या बुद्ध-वाङमयशाखेकडे म्हणजे तंत्राकडे लक्ष देणें, योग्य व जरूर आहे. त्यांतील कांहीं भाग धर्मविधि (क्रियातंत्र) व आचारविधि (चर्यातंत्र) यांविषयीं आहे व कांहीं योग्यांकरतां योगशास्त्राविषयीं (योगतंत्र) आहे. ह्या ग्रंथापैकीं पहिल्या प्रकारचे ग्रंथ उत्तम आहेत, कारण त्यांत जुन्या ब्राह्मणधर्मांतील विधींचें पुनरूज्जीवन केलें आहे. आदिकर्मप्रदीप हा अशा प्रकारचा आहे. त्यांत ब्राह्मणांच्या (गृह्यसत्रें, कर्मदीप) विधि-प्रयोग ग्रंथातल्याप्रमाणेंच धर्मकृत्यें व विधी यांचें वर्णन आहे; आणि हे धर्मविधी “आदिकर्मिक-बोधिसत्वाला” म्हणजे महायानपंथाच्या लोकांनां आणि दिव्यद्दष्टि-मुमुक्षूंनां करावे लागतात. या ग्रंथांत मूळ सूत्र व त्यावरील साग्र टीका असून त्यांत शिष्याच्या (तो बुद्ध असूं शकेल किंवा सामान्य जन असूं शकेल) प्रवेशसंस्काराचीं वचनें, परिमार्जन, प्रक्षालन आणि प्रार्थना व शिवाय मुखप्रक्षालन, दंतधावन, प्रात:सायंप्रार्थना, पितृतर्पण, भिक्षादान, भोजन, बुद्धादि पूज्यांचें पूजन, प्रज्ञापारमिताचें वाचन, ध्यान आणि इतर कर्मांचे मंत्र दिलेले आहेत, आणि मुमुक्षूला (पूर्ण योगी न बनलेल्याला) नित्य विवक्षित कालीं त्या गोष्टी करावयाच्या असतात.

क्रियातंत्रग्रंथांमध्येंच अष्टमीव्रतविधान हें असून त्यांत प्रत्येक पक्षांतील अष्टमीला करावयाच्या संस्कारांबद्दल नियम दिलेले आहेत. यामध्यें गूढार्थक आकृती व हस्तविक्षेप उपगांत आणले आहेत, आणि यज्ञान्तर्गत दानें व प्रार्थना (गूढार्थक पूर्णाक्षरयुक्त उ. र्‍हूम र्‍हूम र्‍हूम फट फट फट स्वाहा) बुद्ध व बोधिसत्व यांबद्दलच नव्हे तर शैवपंथीय देवतांबद्दलहि आलेल्या आहेत.

तंत्रांपैकीं मोठी संख्या दुसर्‍या प्रकारच्या म्हणजे योगतंत्रांची आहे. हे ग्रंथ माध्यमिका व योगाचार या पंथांतील गूढार्थवादातून निर्माण झालेले आहेत. यांत योगी जें परमोच्च ज्ञान मिळवूं पहातात त्या शून्यतेच्या ज्ञानाविषयीं वर्णन आहे. तो योगी हें ज्ञान मिळविण्याचा संन्यास व ध्यानमार्गानें प्रयत्‍न करतो. इतकेच नव्हे तर मंत्रतंत्र, जादूटोणा, मूर्च्छनावस्था व अंगांत येणें या मार्गांनींहि प्रयत्‍न करतो. या शेवटच्या प्रकारांत मांसभक्षण, सुरापान व संभोग याचें साहाय्य घेतात. याप्रमाणें आपणांस तंत्रांमध्यें गूढविद्या, जादू व शृंगार तिहीचें मिश्रण झालेलें आढळतें. प्रत्यक्ष बुद्धधर्माबद्दल या तंत्रांमध्यें माहिती क्वचितच आहे; उलट शैवपंथीय तंत्रांशीं त्यांचें फारच साम्य आहे; फक्त बाह्य रचना आणि तंत्रें “बुद्धप्रणित” असल्याबद्दल वचन, एवढ्याच बाबतीत फरक आहे. या संप्रदायांत योगिनी, डाकिनी इत्यादि स्त्रीदैवतांनां जें महत्त्व आहे तें विशेष आहे. या ग्रंथामध्यें शहाणपणाचा आणि अर्थाचा भाग शोधुन काढण्याचा प्रयत्‍न करणें निरर्थक होय. या ग्रंथांचे कर्ते बहुतकरून चेटके लोक आहेत; व त्यांनीं व्यावहारिक आणि स्वार्थी हेतूनें ते केलेले आहेत. तथापि यांपैकीं पुष्कळ ग्रंथांनां मोठा मान मिळत आहे. उ. तथागतगुह्यक अथवा गुह्यसमाज हा ग्रंथ नेपाळी बौद्धांच्या ‘नवधर्मा’ मध्यें मोडतो. या ग्रंथांत आरंभीं ध्यानाच्या अनेकविध प्रकारांविषयीं वचनें आहेत हें खरें; पण पुढें लवकरच बुद्धाच्या पूजनामध्यें जरूर असलेल्या गूढार्थक आकृती व वचनें यांची माहिती दिलेली आहे; आणि जादूचे शब्द आणि कृत्यें यांतील छांछूं व हातचलाखी या गोष्टी देऊनच ग्रंथकार थांबत नाहीं, तर पुढें परमोच्च सिद्धीकरितां गज, अश्व, श्वान यांचें मांस भक्षण करण्याचा व त्याचप्रमाणें तरूण चांडालकन्यांबरोबर नित्य मैथुन करण्याचाहि उपदेश केला आहे. महाकालतंत्र हें शाक्यमुनि व एक देवता यांच्यामधील संवाद अशा स्वरूपांत लिहिले आहे; आणि हें “बुद्धप्रणित” असल्याचें म्हटलें आहे. यांत महाकाल (म्ह. शिव) या नांवांतील अक्षरांच्या गूढार्थाविषयीं, गुप्तधनप्राप्तीविषयीं, राज्यप्राप्ती व इच्छितवधूप्राप्ती याविषयीं आणि लोकांनां वेड लावून गुलाम करणें किंवा ठार मारणें यांविषयीं माहिती देलेली आहे. संवरोदयतंत्र याला जरी बुद्ध आणि बोधिसत्व वज्रापाणि यांच्यामधील संवादाचें स्वरूप आहे तरी तो ग्रंथ बौद्धधर्मीयापेक्षां शैवपंथीय आहे; कारण त्यांत लिंग व शैवपंथीय दैवता यांचें पूजन करण्याविषयी स्पष्टपणें सांगितलें आहे. कालचक्रग्रंथ आदिबुद्धनें सांगितला असें जरी म्हणतात तरी त्यांत मक्का व मुसुलमानी धर्म यांविषयीं उल्लेख आहे. मंजुश्रीमूलतंत्रामध्यें शाक्यमुनि इतर गोष्टींबरोबर हेंहि सांगतो कीं, नागार्जुन हा त्याच्यानंतर चारशे वर्षांनीं होणार आहे. तेव्हां हे सर्व ग्रंथ नागार्जुन आणि महायानसूत्रें यानंतर बर्‍याच कालानें लिहिलेले असले पाहिजेत; आणि माध्यमिक पंथाचा संस्थापक नागार्जुन यानेंहि एकादें तंत्र लिहिलें असलें पाहिजे याबद्दल वाद करणें जरूर नाहीं. तथापि पंचक्रमांतील सहापैकीं पांच भाग त्यानें लिहिले असें म्हणतात. या ग्रंथांत तांत्रिक संस्कारांपेक्षां योगाबद्दल अधिक माहिती आहे. ग्रंथनामावरून जो बोध होतो त्याप्रमाणेंच या पंचक्रमांत पांच अवस्थाबद्दल सांगितलें असून पांचवी अवस्था म्हणजेच परमोच्च योगप्राप्ति होय. प्राथमिक अवस्थांमध्यें काया, वाचा आणि मन यांची शुद्धि करून बुद्धाच्या काया, वाचा आणि मन यांच्या ‘वज्रा’ स्वभावाचें ग्रहण करण्याची तयारी करावयाची असते. तथापि या पांच अवस्था प्राप्त करण्याची साधने म्हणजे जादूचीं वर्तुळें, जादूचे मंत्र, गूढार्थक उच्चार आणि महायानीय व तंत्रगत देवतांचें पूजन, या रीतीनें योगी अत्यंत श्रेष्ठ अवस्थेप्रत पावतो; व त्या अवस्थेंत सर्व भेदभाव नष्ट होऊन कोणत्याहि प्रकारचें द्वैत म्हणून शिलज्क राहत नाहीं. अशा योग्याबद्दल विशेष वर्णनहि दिलें आहे.

या ग्रंथाचा नागार्जुन हा जर खरोखरच कर्ता असेल तर महायानपंथाच्या संस्थापकाहून हा भिन्न असावा. तिसर्‍या भागाचा कर्ता शाक्यमुनि असें सांगितलें आहे, आणि बंगालचा देवपाल (सुमारें इ. स. ८५०) याचा समकालीन म्हणून तारानाथनें ज्याचा उल्लेख केला आहे तोच हा असावा. तो सर्वच ग्रंथ बहुतकरून या कालांतला असावा. तारानाथनें जें म्हटलें आहे कीं, बंगाल्यांतील पालघराण्याच्या वेळीं म्हणजे ९ व्यापासून ११ व्या शतकापर्यंत योग व जादू यांचें वर्चस्व होतें, तें म्हणणें विश्वसनीय दिसतें, आणि तंत्रग्रंथांचा आरंभ याच्या अगोदरच्या कालांत झाला असें म्हणण्यापेक्षां याच कालांत झाला असें म्हणणें हें अधिक संभवनीय आहे. नागनाथानें आपल्या “हिंदुस्थानांतील बौद्धधर्माचा इतिहास” या ग्रंथामध्यें तंत्र-बौद्ध धर्मांतील भावार्थाची चांगली कल्पना दिली आहे. त्यामध्यें महायान व त्रिपिटक आणि बाद्धैशास्त्र व बौद्धस्वार्थत्याग याबद्दल मजकूर आहे हें खरें आहे, तथापि सिद्धि, मंत्र व तंत्रे यांनी प्राप्त होणार्‍या जादूगिरीबद्दलचे पुष्कळ भाग आहे.

या तंत्रग्रंथांतील संस्कृतभाषा बहुतकरून त्यांतील माहितीइतकीच रानटी असते. या तंत्रग्रंथांचा उत्तहिंदुस्थान, तिबेट व नंतर चीन या देशांत फार प्रसार झाला आणि संस्कृतीच्या इतिहासांत त्यांचें फार महत्त्व आहे; नाहीं तर त्यांच्यांतील रानटीपणामुळें मौन स्वीकारून पुढें जावें असेंच कोणालाहि वाटलें असतें.

[संदर्भ ग्रंथ:- एच्. एच्. विल्सन-एसेज अँड लेक्चर्स ऑन दि रिलिजन ऑफ दि हिंदूज (१८६२); मोनियर विल्यम- ब्रह्मॅनिझम अँड हिंदुइझम (१८९१); एन्. मॅकनिकल-इंडियन थिइझम (१९१५). डब्लू. जे. विल्किन्स मॉडर्न हिंदुइझम (१९००). आर्थर आव्हालोन – प्रिन्सिपल्स ऑफ तंत्र (१९१६); आर. डब्ल्यू. फ्रेझर - इंडियन थॉट, पास्ट अँड प्रेझेंट (१९१५).]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .