प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

तंजावरचे राजघराणें- तंजावरच्या प्राचीन चोल राजांची माहिती ज्ञानकोशाच्या १३ व्या विभागांत चोल या नांवाखालीं दिली आहे; येथें भोंसले घराण्याची माहिती देण्यांत येत आहे. चोल राजे हे फार पूर्वींपासून इ. स. १२४४ पर्यंत राज्य करीत होते; त्यानंतर पाण्ड्य राजांनीं स. १५५९ पर्यंत आणि त्यांच्या मागून नायक राजांनीं स. १६७३ पर्यंत आपला अंमल चालविला; त्यांच्यानंतर भोंसले हे तंजावरचे राजे झाले.

मदुरा व तंजावर येथील नायक राजात नेहमी भांडणें होत. तंजावरचा शेवटचा नायक राजा विजयराघव होता; त्याच्यावर मदुरेच्या चोकनाथ नायकानें स्वारी करून त्यास लढाईंत ठार केलें. त्याचा मुलगा सेंगमल (चेंगमल) दास नांवाचा होता. त्यानें विजापुरास जाऊन चोकनाथाविरूद्ध आदिलशहाची मदत मागितली व शहानें शहाजीस तंजावरावर पाठविलें. त्यानें चोकनाथापासून तंजावर काबीज करून सेंगमल यास नेमणूक करून देऊन तो सर्व प्रांत आपल्या हाताखालीं घालून त्या प्रांतातील विधुपूर, कावेरीपट्टण, श्रीरंगपट्टण, चंदी, मदुरा, वालगुंडपुर वगैरे ठिकाणचे नायक राजे जिंकले (१६३७ -४८) आणि देशाची जमाबंदी करून व धारे ठरवून सर्वत्र उत्तम व्यवस्था लाविली. या सुमारास शहाजीचा मुलगा संभाजी हा कनकगिरीच्या पाळेगारांचें बंड मोडण्यास गेला असतां लढाईंत मारला गेला. शहाजीनें आपल्या आयुष्याचीं शेवटचीं दहा वर्षें तंजावर व बंगलूर येथे आपला मुलगा व्यंकोजी याच्यासह काढिलीं. पुढें बेदनूरच्या नायकावर स्वारी करण्यास जात असतां शहाजी हा वाटेंत मरण पावला व व्यांकोजी हा जहागिरीचा मुख्य मालक झाला (१६६४).

व्यां को जी (१६३१–१६८२). - याची आई तुकाबाई मोहिते. ही शहाजीची दुसरी स्त्री; तिच्या पोटीं व्यंकोजी १६३१ सालीं जन्मला. याला येकोजी असेंहि म्हणत. याच्या लहानपणची हकीकत चांगलीशीं सापडत नाहीं. शहाजी हा बेंगरूळास असतांना, व्यंकोजी त्याच्या जवळ असे; त्यामुळें त्याला राज्यकारभाराचें ज्ञान आपोआप झालें. शहाजी धरला गेला असतां, व्यंकोजी हा वडीलभाऊ संभाजी याच्या नजरेखालीं बेंगरूळासच होता. पुढें शहाजी सुटून आल्यावर व्यंकोजी व त्याची आई वगैरे मंडळी कांहीं दिवस पुण्याकडे शिवाजीपाशीं राहली होती. बाप मरण पावल्यावर त्याची जहागीर व्यंकोजीला आदिलशहानें कायम केली. पुढें व्यंकोजीनें त्रिचनापल्लीच्या नायकाचा पराभव करून तिकडील दंगेधोपे मोडले. शहाजीनें जरी तंजावर आपल्या जहागिरीस जोडलें होतें, तरी सेंगमल हा तेथें नेमणूक घेऊन राहत होता. यावेळीं त्याच्यावर त्रिचनापल्लीच्या नायकानें स्वारी केली, तेव्हां बरीचशी खंडणी देण्याच्या करारानें त्यानें व्यंकोजीस मदतीस बोलाविलें. व्यंकोजीनें जाऊन त्रिचनापल्लीकरास हांकून लाविलें. परंतु ठरल्याप्रमाणें सेंगमल हा खंडणी देईना, एवढेंच नव्हे तर उलट तो व्यंकोजीला दगा करण्याचा बेत करूं लागला; तेव्हां व्यंकोजीनें त्याच्यावर चाल करून त्याला लढाईंत ठार करून तंजावर काबीज केले (१६७४) व तेथें पुढील सालीं चैत्रांत स्व:स राज्याभिषेक करविला. तत्पूर्वीं जेव्हां शिवाजीनें औरंझेबातर्फे म्हणून आदिलशाहीवर स्वारी केली होती, तेव्हां व्यंकोजी हा आदिलशहाच्या बाजूनें शिवाजीवर चालून गेला होता; परंतु त्यांचें युद्ध होण्यापूर्वींच शिवाजी आग्र्याकडे गेला (१६६५ नोव्हेबर). त्रिचनापल्लीकराप्रमाणें व्यंकोजीनें मदुरा, रामनाथ वगैरे ठिकाणच्या नायकांनां जिंकून आपलें राज्य वाढविलें. याप्रमाणें संपत्ति व प्रभुत्व मिळाल्यानें व्यंकोजी गर्विष्ठ बनला व (मुत्सद्दी नसल्यानें) हलक्या लोकांच्या नादीं लागला. बापाच्या वेळच्या रघुनाथपंत हणमंत्यासारख्या मुत्सद्यांच्या सल्ल्यानें न चालतां तो मुसुलमान लोकांच्या मताप्रमाणें चालू लागला. शिवाजीसारखें हिंदु राज्य स्थापण्याचें किंवा निदान शिवाजीला त्या कालीं मदत करण्याचेंहि त्याच्या मनीं येईना. मुसुलमान बादशाहीचाच त्याच्या मनावर पगडा बसला होता, त्यामुळें रघुनाथपंतानें शिवाजीचा कित्ता गिरविण्याबद्दलचा केलेला उपदेश त्यानें ऐकला नाहीं; उलट त्याचा अपमान केला. तेव्हां ‘आम्ही सेवक खरें, पण तुमच्या अर्ध्या आसनीं बसण्यास योग्य आहों, असें स्पष्ट बोलून पंतानें शिवाजीकडे, व्यंकोजीपासून भाऊपणाचा वांटा मागण्याचें व या निमित्तानें दक्षिणदिग्विजय करण्याचें राजकराण केलें. शिवाजीनें प्रथम सौम्यपणें व्यंकोजीस आपला वांटा देण्याबद्दल व मुसुलमानांनां हुसकावून आपल्यासारखें स्वतंत्र बनण्याबद्दल उपदेश केला; पण त्यानें तिकडे दुर्लक्ष्य केलें. अखेर रघुनाथपंताच्या म्हणण्याप्रमाणें शिवाजी हा कर्नाटकच्या स्वारीस निघाला. (१६७६) प्रथम व्यंकोजीचा बेत मदुरेचा नायक व आपले मुसुलमान सरदार यांच्यासह शिवाजीशीं लढाई करावी असा होता; परंतु शिवाजीनें धडाक्यांत कर्नाटकाचा बराचसा भाग काबीज केलेला पाहून हे लोक घाबरले. अखेर व्यंकोजी त्रिमलवाडीस शिवाजीस येऊन भेटला. त्याचा आदर करून शिवाजीनें आपला वाटा मागितला, परंतु तो कबूल होईना. तेव्हां त्याला तंजावरास पाठवून आपलें हंबीररावादि लोक या नवीन घेतलेल्या प्रांतावर नेमून शिवाजी परत गेला. त्याबरोबर लागलीच व्यंकोजीनें हंबीरराव मोहित्यावर स्वारी केली, तींत त्याचाच पराभव झाला. हें ऐकून शिवाजीनें त्याला सांत्वनपर व वांटा देण्याबद्दलचीं पत्रे पाठविलीं. हीं पत्रें फार महत्त्वाचीं आहेत. त्यांत शिवाजीनें आपल्या हिंदु राज्यस्थापनेच्या हेतूचीं कारणें उघड दिलेलीं आहेत; परंतु व्यंकोजीनें तिकडे दुर्लक्ष्य केलें. शेवटीं त्याची राणी दीपाबाई हिनें त्याला बोध करून मार्गावर आणिलें; तेव्हां त्यानें रघुनाथपंतास बोलावून आणून राज्याची वांटणी केली. हा वांटणीचा तह एकोणीस कलमी आहे. त्यांत हिंदुद्वेषी लोकांना राज्यांतून काढून द्यावें व विजापुरकरांचे मांडलीक राहूं नये अशी शिवाजीची व्यंकोजीला आज्ञा असून दीपाबाईनें केलेल्या कामगिरीबद्दल तिला पांच लाख होनांचा प्रांत चोळीबांगडीसाठीं, सात लाखांचा खुद्द व्यंकोजीस दूधभातासाठीं म्हणून शिवाजीनें इनाम दिला. या राजकारणामुळें शिवाजीनें व्यंकोजीस आपल्या कह्यांत आणून, त्याजवर आपल्या स्वराज्याचें वर्चस्व स्थापून, कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा एकजीव केला आणि तंजावरावरील आदिलशाहीचें सार्वभौमत्व नाहींसें केलें (१६७९). याच सुमारास विजापुरावर औरंगझेबाची स्वारी झाली व तेथील दिवाणानें शिवाजीस मदतीस बोलाविलें. त्याप्रमाणें शिवाजीनें जाऊन मोंगलांचा पराभव केला. यामुळें दिवाणानें कोपळ वगैरे प्रांत व द्रविड आणि तंजावर प्रांतावरील सार्वभौमत्त्व आपण होऊन शिवाजीला देऊन टाकिलें. परंतु या सर्व कृत्यामुळें व्यंकोजी उदास बनून राज्यकारभार पाहीना. तेव्हां शिवाजीनें त्याला उपदेशपर पत्रें पाठविली. “शहाजींनें राज्य कसें मिळविलें तें पहा, आम्हींहि कोणे तर्‍हेने राज्य मिळविलें तें लक्ष्यांत घ्या; कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून शरीराची उपेक्षा कां करितां ? आम्ही तुम्हांस वडील असतां चिंता कशाची करितां; हे कार्याचे दिवस आहेत, आम्हास तमाशा दाखवा, वैराग्य उत्तरवयी करा” वगैरे उपदेश त्यांत आहे. त्याचा परिणाम होऊन व्यंकोजीने उदासपणा सोडला. यानंतर थोड्याच दिवसांत व्यंकोजी वारला (१६८२). तो मानीव वैभवाचा विशेष तोरा बाळगणारा होता. शौर्य व साहस त्याच्या अंगीं होतें; परंतु त्याचा बहुतेक काळ मुसुलमानांच्या सेवेंत गेल्यानें शिवाजीस स्वराज्यस्थापनेच्या कामीं त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं; उलट तो मुसुलमान सल्लागारांच्या मतानें वागे. असें असलें तरी तंजावर येथें त्यानें मरठ्यांची गादी स्वतंत्र स्थापिली हें विशेष केलें. शिवाजीस वांटा दिल्यानंतर त्यानें शांतपणें आपलें राज्य चालविलें.

व्यंकोजीला दीपाबाई, सईबाई व अनुबाई या तीन राण्या व नऊ नाटकशाळा होत्या. त्याला दीपाबाईच्या पोटी शहाजी (१६७१), शरफोजी (१६७४) व तुकोजी (१६७६) असे तीन पुत्र झाले; शिवाय चंद्रभान, सूर्यभाव वगैरे नऊ लेकवळे नाटकशाळांपासून झाले; अनुबाईस दोन मुली झाल्या. व्यंकोजीच्या राज्याचे पाच सुभे (त्रिवेदी, कुंभकोण, मायावर, मन्नारगुडी व पट्टकोढा) असून त्यांत ५७५३ गांवे होतीं आणि एकंदर वसूल २,४०,३७,५०० मणांचा (भाताचा) होता.

श हा जी (१६८२ – १७११). –व्यंकोजीनंतर हा गादीवर आला. यानें आपली आई दीपाबाई व दोन्ही भाऊ यांच्या सल्लामसलतीनें कारभार शांतपणानें केला. त्याला चिमाबाई म्हणून एकच राणी होती; त्याला पुत्र झाला नाहीं. त्यानें कांहीं पाळेगारांचा पराभव करून आपलें राज्य थोडेसें वाढविलें. मध्यंतरीं त्यानें रायगडास संभाजीकडे (१६७९ तील) कराराप्रमाणें वसूल पाठविला नाहीं; उलट त्याच्या विरूद्ध तो विजापूरकरांस मिळाला. तेव्हां संभाजीनें आपले सरदार पाठवून कर्नाटकचा वसूल उगवून घेतला. पुढें आदिलशाही बुडाल्यावर शहाजी आपणांस स्वतंत्र राजा म्हणवूं लागला. म्हैसूरकरानें त्याचा होस्टकोटे परगणा उपटला; त्यावेळीं त्यानें संभाजीचा सरदार हरजी महाडीक याची मदत घेतली असता तर तो परगणा त्याला परत मिळता, परंतु अशानें आपली दुर्बलता दिसेल म्हणून शहाजीनें मदत मागितली नाहीं. तरी पण तो त्याच्याशीं मिळून मिसळून वागे. दीपाबाईहि त्याला पोक्त सल्ला देई. तो शहाणा व कर्तृत्ववान असल्यानें त्यानें व हरजीनें त्या भागांत मराठ्यांची सत्ता चांगली राखिली. अवरंगझेबाची फौज बंगरूळकडे फिरकूं लागल्यावर (१६८७) बंगरूळचें रक्षण करणें कठिण जाणून शहाजीनें तो प्रांत म्हैसूरकरास विकण्यास काढला; परंतु तितक्यांत अवरंगझेबाच्या सैन्यानें तो काबीज केला. यामुळें शहाजींचें फार नुकसान झालें. पुढें राजाराम जिंजीस आला तेव्हां याची त्याला मदत असे; त्यामुळें झुलफिकारखानानें त्याच्यावर स्वारी करून त्याकडून अवरंगझेबाची ताबेदारी कबूल करविली व राजारामास मदत करणार नाहीं असें जबरीनें लिहून घेतलें (१६९६). यापुढें शांतपणें राज्य करून शहाजी हा १७११ त वारला.

स र फो जी (१७११ – २८). -शहाजी निपुत्रिक असल्यानें त्याचा धाकटा भाऊ सरफोजी हा राजा झाला. परंतु त्याच्या कारकीर्दीची माहिती बिलकूल उपलब्ध नाहीं. मात्र तो शांत व निरूपद्रवी असून पाळेगारांचीं बंडे मोडण्यांत व अर्काटचा नबाब आणि त्रिचनापल्लीकर नायक यांजकडून आपलें राज्य राखण्यांत त्याचा काळ गेला. त्याचा धाकटा भाऊ तुकोजी हा याच्यापासून वेगळा निघून महादेव पट्टणास राही; त्यास संतति पुष्कळ होती. सरफोजीला सुलक्षणा, अपरून व राजसबाई अशा तीन राण्या असून संतति झालीं नाहीं. अपरूपबाईनें राज्यलोभानें गदोदर राहिल्याचें ढोंग करून नऊ महिन्यानंतर एक तोतया मुलगा निर्माण केला. पण हें सरफोजीस समजलें व त्याला तें न आवडून त्यानें त्याचा निकाल लाविला. शेवटीं १७२८ सालीं सरफोजी वारला व त्याच्या बरोबर सुलक्षणा व राजसबाई सती गेल्या.

तु को जी (१७२८ – ३५).- सरफोजीनंतर हा गादीवर आला; याचीहि खात्रीलायक माहिती आढळत नाहीं. हा सरफोजीपेक्षां अधिक राजकारणी, कुशाग्र व विद्याभिलाषी होता. त्याला संस्कृत, तामीळ, मराठी व फारशी भाषा अवगत असून तो विद्वानांचा पोषिंदा होता. एका अरब पंडितानें खूष होऊन त्याला दोन उत्कृष्ट तरवारी दिल्या होत्या. यावेळीं कर्नाटकांत अनेक कारस्थानी पुरूष आपली सत्ता स्थापण्यास धडपडत होते. सादतअल्ली, निजाम, इंग्रज, फ्रेंच, या सर्वांचा डोळा कर्नाटकावर होता. त्या सर्वांस तुकोजी पुरून उरला व त्यानें आपल्या राज्यास या बुभुक्षितांचा धक्का लागूं दिला नाहीं. अखेर तो स. १७३५ त वारला. त्याला लग्नाच्या पाच व कट्यारीबरोबर लग्न लाविलेली एक (अन्नपूर्णा) मिळून सहा स्त्रिया होत्या; लग्नाच्या स्त्रियांस बाबासाहेब, सयाजी, अण्णासाहेब व नानासाहेब हे चार व अन्नपूर्णेंस एक प्रतापसिंग असे पांच पुत्र झाले.

बाबासाहेब (१७३६).- याचें खरें नांव येकोजी; तुकोजीनंतर हा राज्यावर आला; परंतु एका वर्षांतच तो वारला. आपला जीव घेण्यास आपले भाऊ टपले असल्याचा संशय त्यास नेहमी येई, त्यामुळें तो वेडसर बनला; आणि राज्यकारभारहि विस्कळीत झाला. तें पाडून चंदासाहेबानें तंजावरावर स्वारी केली; परंतु तेथील स्वामिनिष्ठ सरदारांनीं त्याचा पराभव केला. यानंतर लवकरच बाबासाहेब वारला (१७३६); त्यास अपत्य नव्हतें. त्याची राणी सुजानबाई ही फार हुषार व दक्ष असल्यानें कारभार्‍यांनीं तिच्याच नांवाची द्वाही फिरविली.

सुजानबाई (१७३६ – ३९):- हिची कारकीर्द महत्त्वाची झाली. ताराबाई, अहिल्याबाई यांच्यासारखी ही हुषार निपजली. तिनें तीन वर्षें कारभार केला. ती उदार, सद्गुणी असून तिचें दरबारी मंडळीवर वजन होतें. गादीवर हक्क सांगणारे अनेक लोक तिच्या कारकीर्दींत उत्पन्न झाले परंतु तिने त्यांचें कांहीं चालू दिलें नाहीं. अखेर सवाई शहाजी म्हणून एक तोतया कोयाजी घाटग्याच्या साहाय्यानें पुढें आला व त्यानें फितुरीनें तंजावरचा किल्ला घेऊन गादी बळकाविली (१७३९).

काटराजा (१७३९):- या तोतयास काटराजा म्हणत; तो रानांतून आला म्हणून त्यास काट म्हणत. मागें अपरूपेनें जें खोटें मूल तयार केलें होतें त्याचें नाव सवाई शहाजी होतें, पण त्याचा नाश मागेंच झाला होता. त्याचाच हा तोतया निघाला. इंग्रजानें याला मदत केली व याप्रमाणें तंजावरच्या राजकारणांत आपला हात पहिल्यानें घुसविला. कांहीं दिवसांनीं हा रूपी बटकीचा लेक सुभान्या असून सवाई शहाजी नव्हे असें समजलें तेव्हां दरबारीमंडळानें त्याला काट देऊन, तुकोजीचा दुसरा पुत्र सयाजी यास गादीवर बसविलें.

सयाजी (१७४०):- हा केवळ नाममात्र राजा असून सर्व कारभार तंजावरचा मुसुलमान किल्लेदार सय्यदखान व त्याचा भाऊ कासम हे पहात होते. याप्रमाणें लष्करशाही सुरू होऊन सर्वत्र बेबंदशाही माजली. तेव्हां मल्हारजी गाडेराव, मानाजी जगताप वगैरे जुन्या सरदारांनीं त्याला पदच्युत करून तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह यास गादीवर बसविलें (१७४०).

प्रतापसिंह (१७४० – ६३):- याची कारकीर्द महत्त्वाची असून तिनेंच इतिहासाचा बराचसा भाग आक्रमिला आहे. प्रतापसिंह गादीवर आल्यावर वरील सय्यद बंधूंनीं त्यानें आपल्या मुठीत असावें म्हणून पुष्कळ खटपटी केल्या, परंतु राजा बुद्धिवान व स्वाभिमानी असल्यानें त्यानें त्यांचें कांहीं चालू दिलें नाहीं. तेव्हां ते त्याला गादीवरून काढण्याची खटपट करूं लागले. लष्कराच्या जोरावर ते अतिशय जुलुमी बनले होते. त्यांनीं हिंदु देवालयांत अनाचार केले व तेथील देवदासी भ्रष्ट केल्या. सर्व राज्यांतील फौजदारी, राजाची चिटणिसी व तंजावरगडची किल्लेदारी त्यांच्याकडे असल्यानें ते भारी बनले होते. त्यांनीं चंदासाहेबास आपला व्याही करून त्याच्या मदतीने तंजावरचे राज्य स्वत: बळकवावें असा गुप्त कट केला. परंतु प्रतापसिंहानें त्याच्यापैकीं कासम यास फोडून, सय्यदखानास आयत्यावेळीं पकडून त्याचा वध केला व हें खूळ मोडलें. परंतु हें समजतांच व्याह्याचा सूड घेण्यासाठीं चंदासाहेबाने (याचें खरें नांव हुसेन दोस्तखान होतें) एकाएकीं चालून येऊन किल्ल्यास दोन महिने वेढा दिला. तेव्हां प्रतापसिंहानें कठिण समय जाणून सातार्‍यास शाहूकडे मदत मागितली. शाहूला तंजावरचा पूर्ण अभिमान असल्याने त्यानें फतेसिंग भोंसले व रघूची यांना तिकडे पाठविलें (१७४०). त्यांनां प्रख्यात सेनापति मुरारराव घोरपडे हाहि सामील झाला. मरांठ्यांनीं प्रथम अर्काट घेऊन तंजावरकडे मोर्चा फिरविला तेव्हां तंजावरचा वेढा उठवून चंदा त्रिचनापल्लीस पळून गेला. त्यामुळें मराठे तिकडे वळले यावेळीं कर्नाटकांतील सर्व हिंदु पाळेगारहि त्यांनां मिळाले. प्रतापसिंहानें शाहूस १५ लक्ष रूपये (स्वारी खर्च व खाशांस नजर मिळून) देण्याचा करार करून, रघूजीस फौज व दारूगोळ्याची मदत केली. मराठ्यांनीं मोठा पराक्रम करून त्रिचनापल्ली काबीज केली व चंदास कैद केलें (२६ मार्च १७४१) आणि तंजावरचें संकट टाळलें.

पुढे अनवरूद्दीन (अर्कालचा नबाब) यानें त्रिचनापल्ली घेऊन तंजावरावर स्वारी केली, तींत त्याचा पराभव झाला (जून १७४४). तेव्हां त्यानें पुन्हां पुढल्या वर्षीं स्वारी केली पण तींत तो पराभव पावून प्रतापसिंहाच्या हातीं लागला असतां त्यानें त्याला उदारपणें सोडून दिलें. यानंतर चार वर्षें प्रतापसिंहानें शांतपणें राज्य केलें. त्यानंतर इंग्रजांनीं आपला हात या राज्यांत शिरकविण्यासाठीं वर उल्लेखिलेल्या सयाजीस (काट राजाप्रमाणें) हातीं धरून, राजाच्या देवीकोटा किल्ल्यावर स्वारी केली. वास्तविक राजानें इंग्रजांची काहींहि कुरापत काढली नव्हती; परंतु इंग्रजांनां कर्नाटकांत फ्रेंचांविरूद्ध आपली बळकटी करावयाची असल्यानें व त्या प्रांतांत देविकोट्यासारखें बंदर हस्तगत असावें म्हणून त्यांनीं अन्यायानें राजाविरूद्ध (आपसांत मैत्री असताहि) उचल केली. राजानें त्यांना तोंड दिलें, पण अखेर देविकोटा पडलें व त्याबरोबरच त्याच्या आसपासचा ३१५०० रू. उत्पन्नाच्या प्रांतास राजास मुकावें लागलें (२५ जून १७४९).

याच वेळी चंदासाहेब सातार्‍याच्या कैदेंतून मोकळा झाला व त्यानें पेशव्यांनां दिलेलें वचन (तंजावरकरास उपसर्ग न देण्याबद्दलचें) विसरून फ्रेंचाच्या मदतीने तंजावरावर चढाई केली. त्यावेळीं प्रतापसिंहानें कारीकल बंदर देण्याचें कबूल करून फ्रेंचांनां फोडलें व नासारजंगास मदतीस आणिलें, तेव्हां चंदा पळून गेला. पुढे महंमदअल्ली व चंदा यांच्या झगड्यांत राजानें महंमदचा पक्ष स्वीकारला. त्याचा सेनापति मानाजी जगताप यानें, श्रीरंग येथील लढाईंत चंदाचा पराभव होऊन तो पाडाव झाला असतां व इंग्रज व महंमद हे त्याला जिवंत मागत असता (चंदाच्याच सांगण्यावरून) चंदाचा शिरच्छेद केला (जून १७५२). इतक्यांत त्रिचनापल्लीसाठीं म्हैसुरकर, इंग्रज व मुरारराव घोरपडे हे गुप्तपणें खटपट करून प्रतापसिंहास दपटशा देऊं लागले; तेव्हां त्यानें नानासाहेब पेशव्यांकडे मदतीचे सूत्र लाविले, पण त्याचा उपयोग झाला नाहीं. तेव्हां मानाजीनें स्वत:च मुराररावाचा मोड केला. तोंच दुसरीकडे फ्रेंचांनीं तंजावरच्या राज्यांत धुमाकूळ घातला व मराररावानें त्यांनां मदत केली. तेव्हां नाइलाजानें प्रतापसिंहानें इंग्रजांची मदत मागितली. या सुमारास अनेक राजकारणें होऊन शेवटीं महंमदअल्ली अर्काटकर मध्यस्थीनें तंजावरावरील हें अरिष्ट टळले (१७५४ – ५५). त्याबद्दल तंजावरने अर्काटकरास सालीना खंडणी देण्याचें ठरलें. परंतु पुन्हां (१७५८) फ्रेंचांनीं, प्रतापसिंहावर (तो इंग्रजांचा दोस्त बनल्यावरून) स्वारी केली, तेव्हां मानाजीनें इंग्रजांच्या मदतीनें त्यांनां पिटाळून लाविलें, यानंतर फ्रेंचांच्याविरूद्ध चिनापट्टणाच्या संरक्षणासाठीं प्रतापसिंहानें तीन वेळां इंग्रजांनां मदत केली. यापुढे फ्रेंचांचें वजन कर्नाटकांतून नाहीसें झालें. तेव्हां महंमदअल्ली व इंग्रज यांनां देश बळकाविण्याची इच्छा होऊन ते आाता प्रतापसिंहाच्या राशीस विनाकारण लागले (१७६१). सिद्धसाधकपणा करून त्यांनीं राजास लुटण्याचा धंदा चालविला. त्यांनीं रामनाथपूरच्या राजास प्रतापसिंहाविरूद्ध उठविलें परंतु मानाजीनें त्याचा पराभव केला. तेव्हां महंमदनें खंडणीची बाकी काढून राजावर स्वारीचा घाट घातला, मग इंग्रजानें मध्यस्थीचा आव आणून त्या दोघांचा समेट केला (१७६२). मात्र तंजावरकरानें अर्काटकरास द्यावयाची खंडणी आपल्या तर्फे द्यावी असें ठरविलें.

यानंतर प्रतापसिंहास फारसा त्रास झाला नाहीं; तो १७६३ सालीं मरण पावला. त्याला यमुना, सकवार, अहिल्या यशवंताबाई, या चार राण्या व सात नाटकशाळा होत्या; दोन मुली, दोन लेकवळे व एक तुळजा राजे नांवाचा औरस मुलगा अशीं त्याला अपत्यें झालीं.

तुळजाराजा (१८६३ – ८६) –बापाच्या पश्चात हा गादीवर आला. पहिलीं चार पाच वर्षें त्याच्या राज्यांत शांतता होती. पुढें रामनाथपुरच्या राजानें गडबड केली, ती यानें मोडली. नंतर दुर्मंत्र्यांच्या सल्ल्यानें यानें महंमदकडे दोन वर्षें खंडणी पाठविली नाहीं; म्हणून त्यानें तंजावरावर स्वारी केली; परंतु स्वारीखर्च (५०।६० लाख) व एक दोन किल्ले देऊन तुळजानें त्याला परत लाविलें. हा राजा दुबळा होता व मुत्सद्दीहि नव्हता. त्यानें दानधर्मांत देवळे, मशिदी बांधण्यांत, लग्नकार्यें व तीर्थयात्रा करण्यांत अतोनात पैसा उधळला. त्यामुळें फौजेचा पगार थकला. जुने मुत्सद्दी जाऊन नवीन लोकांच्या हातीं कारभार आला. त्यांनीं क्रूर कृत्यें केलीं त्यामुळें पदरचे सरदार व प्रजाहि विटली व ती बेदील झाली. याचा फायदा घेऊन महंमदच्या मनांत तंजावरचें राज्य घेण्याचें आलें व त्यानें राजाचे लष्करी अधिकारी फितूर करून, एकदम तंजावरच्या किल्ल्यावर हल्ला करून तो घेतला व पुष्कळ लूट नेली. त्यानें राजास बंदींत ठेवून तेथें आपला कारभारी नेमला. याप्रमाणें तंजावरचें राज्य दोन वर्षें त्याच्या ताब्यांत होतें. पुढें राजानें इंग्रजांस मदतीस बोलाविलें; त्यांनीं महंमदची समजूत करून पुन्हां तंजावरचें राज्य तुळजाच्या हवालीं करविलें. मात्र यावेळेपासून तंजावरकर हा अर्काटकराला सोडून इंग्रजांचा मांडलिक बनला. तंजावर किल्ल्याची किल्लेदारी व फौजदारी इंग्रजांनां मिळाली व तैनाती फौजेच्या खर्चास नागूर बंदरासह बराचसा मुलूखहि मिळाला. या मोबदल्यांत राजानें महंमद यास खंडणी देऊं नये असें इंग्रजांनीं ठरविलें व तेच स्वत: त्याचे मालक बनले.

यापुढे तुळजानें शांतपणे राज्य चालविलें. त्यास राजस, राजकुंवर, मोहना व सुलक्षणा या स्त्रिया होत्या; त्यांच्या पोटी तीन मुलगे व दोन मुली झाल्या. मुलगे लहानपणींच वारले व मुलीहि त्याच्या देखतच वारल्या. त्यामुळें राजा विरक्त बनला. इतक्यात हैदर नायकानें इंग्रजांना शह देण्यासाठीं तंजावर प्रांतीं स्वारी केली व पुष्कळ मुलूख जिंकला. याच वेळीं देशांत भयंकर दुष्काळ व सांथ पसरून अनेक लोक मेले. तुळजानें मुंगीकर भोंसल्यापैकीं एकास दत्तक घेऊन, त्याचें नांव सरफोजी ठेवून, तंजावरच्या इंग्रज रेसिडेंटाच्या व इतर पांच सहा आधिकार्‍यांच्या देखत दत्तविधान केलें. त्यानंतर दोन तीन दिवसांनींच तुळजाराजा वारला (१७८६).

अमरसिंह (१७८६ – ९८).- हा तुळजाचा सावत्र भाऊ; व प्रतापसिंहाच्या राखेचा पुत्र. यानें लटपटी करून मद्रासकर इंग्रजांनां सरफोजीचें दत्तविधान खोटें भासवून आपण गादी बळकाविली. या कामीं तत्कालीन मद्रासकर व तंजावरकर इंग्रज अधिकार्‍यांनीं बरीचशी मिळकत मिळविली असें म्हणतात. मात्र त्यांनीं सरफोजीस अमरसिंहाच्या ताब्यांतून काढून मद्रासेस आपल्या नजरकैदेंत ठेविलें व त्यास स्वार्त्झ नांवाचा एक पाद्री शिक्षक नेमून दिला.

पुढें इंग्रजांनीं अमरसिंहावर कडक अटी लादून अनेक तर्‍हेनें त्याच्याकडून प्रांत व पैका काढला, किल्ल्यांत आपले फौजी सरदार ठेवून फितूर केला, व वाटेल तसे करारनामे जबरदस्तीनें करून घेतले. त्यांनीं स. १७८७ त त्याच्यावर जबरीनें एक तह लादून २४॥ लाखांची वार्षिक खंडणी बसविली व वेळेवर खंडणी मिळाली नाहीं म्हणून सर्व राज्यकारभार हातीं घेतला. याबद्दल खुद्द अमरसिंहानें उल्लेख केला आहे (इति. सं. तंजावर राजघराणें). टिप्पूनें तंजावर प्रांतांत स्वार्‍या केल्या त्यावेळीं इंग्रजांनीं त्यांच्या प्रतिकाराच्या सबबीवर सर्व राज्याचा वसूल मुखत्यारीनें आपणच करून व इतरहि राज्यकारभार ताब्यांत घेऊन अमरसिंहास नुसतें बाहुलें बनविलें. शेवटीं राजानें पुण्यास पेशव्यांकडे संधान बांधलें आणि मग नाना फडणीस व महादजी शिंदे यांच्या दपटशानें इंग्रजांनीं अमरसिंहाशीं दुसरा तह केला (१७९२). त्यांत खंडणी १६ लाखांवर (वार्षिक) उतरली व सरफोजी आणि त्याच्या आया यांसाठीं सालिना ५०।६० हजार रूपयांची नेमणूक ठरली. यावेळीं मद्रासकर इंग्रजानें राजास थेडेसें लुबाडलें तर कलकत्तेकरानें जास्तच लुबाडलें होतें. अमरसिंह गव्हर्नरजनरलास लिहितो “लॉट पिकट याणें आम्हीं चार लाख होन सालीना द्यावे असा करार केला ... तर आपण चार लक्ष साठ हजार होन देत जावे म्हणता. दुसरा गव्हर्नरजनरल आला तर तो आणखी मागेल” (इति. सं. तंजावर राजघराणे पृ. १०७). हें राजाचें पत्र पाहिलें असतां तत्कालीन इंग्रजांनीं आपलींच सत्ता कशीं धुडकावलीं हे ध्यानांत येतें. इंग्रजी फौजेच्या खर्चास (तोडून दिेलेला प्रांत सोडून शिवाय ?) दरमहा पंधरा हजार होन द्यावे लागत, खेरीज वरील जबर खंडणी, टिप्पूच्या स्वार्‍या इत्यादि कारणांनीं संस्थानास कर्ज झाले, वसूल तटला, रयत नागावली व बेबंदशाही झाली.

या सुमारास सरफोजीचा पक्ष प्रबळ झाला; अमरसिंहापासूनहि यापुढें फलप्राप्ति होण्याची आशा दिसेना म्हणून कार्नवालीसनें, त्याला राज्य नीट चालवितां येत नाहीं असे आरोप करून शरफोजीचें दत्तविधान आतां कायम केलें (१७९६). त्यास कंपनीच्या डायरेक्टरांनीहि अनुमति दिली (१७९८). अखेर बिचारा अमरसिंह पदच्युत झाला. त्यास तंजावर जवळील मध्यार्जुन गांवीं ठेवून सालीना पाऊण लाखाची नेमणूक केली. तेथें तो १८०२ सालीं वारला. त्याचा प्रतापसिंह नांवाचा एक मुलगा स. १८४९ पर्यंत हयात होता. त्यानें येकोजी म्हणून दत्तक घेतलेला पुत्र स. १८८३ पर्यंत विद्यमान होता, त्याला दरमहा हजार रूपये मिळत असत. अमरसिंह सात्त्विक, दयाळु व उदार होता पण मुत्सद्दी नसल्यानें त्याचा अखेर असा परिणाम झाला.

सरफोजी (१७९८ – १८३२).- याला गादीवर बसवून इंग्रजांनीं जो त्याच्याशीं तह केला, त्या अन्वयें तंजावर संस्थान हें पूर्णपणें इंग्रजी अमंलाखालीं जाऊन, राजानें फक्त सालीना साडेतीन लाखांची (११८३५० पौंड) नेमणूक घेऊन किल्ल्यांत स्वस्थ रहावें, त्याचा मानमरातब कायम रहावा व राज्यकारभार त्याच्या नांवानें इंग्रजांनीं चालवावा असें ठरलें (२५ आक्टो. १७९९). याप्रमाणें तंजावरचे मराठी राज्य संपुष्टात आलें. या सुमारास कर्नाटकांतील इंग्रजांचे सर्व शत्रू नष्ट झाल्यानें सरफोजीच्या ३४ वर्षांच्या कारकीर्दींत आणीक भानगडी उत्पन्न झाल्या नाहींत. त्यानें आपला वेळ ग्रंथसंग्रह, विद्याप्रसार व विद्याव्यासंगांत घालविला; त्याला इंग्रजी भाषा चांगली येत होती. त्यानें अनेक ग्रंथ (काव्यें, नाटकें वगैरे) विद्वानांकडून तयार करविले; तंजावरच्या बृहदीश्वराच्या देवळांत आपल्या घराण्याचा संपूर्ण इतिहास त्यानें मराठींत कोरविला आणि राजवाड्यांत एक सरस्वतिमंदिर स्थापून तेथें अनेक विषयांवरील प्राचीन ग्रंथ, ताडपत्रें, भूर्जपत्रें व ताम्रपट जमवून ठेविले. हा संग्रह अप्रतिम व प्रचंड आहे; डॉ. बर्नेलनें वर्षेंच्या वर्षें खर्चून याच्या याद्या तयार केल्या आहेत. सरफोजीला शिल्प, संगीत, वैद्यक, ज्योतिष हीं अवगत होतीं व त्यांनां त्यानें उत्तेजनहि दिलें होते. पाश्चात्त्यशिक्षणाचा परिणाम झाल्यानें त्यानें त्या द्दष्टीनें सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. त्याला भेटावयास येणार्‍या बर्‍याच पाश्चात्य लोकांनीं आपल्या हकीकती लिहून ठेविल्या आहेत, त्यावरून त्याची योग्यता ध्यानात येते. त्याला लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीनें आपले सन्माननीय सभासद करून घेतलें होतें (१८२८). तंजावरास पाद्री लोकांच्या ज्या अनेक संस्था होत्या त्यांनां याची सढळ मदत असे. हा स. १८३२ त वारला. त्याला मुक्तंबा व अहिल्या अशा दोन राण्या होत्या. अहिल्याबाईस तीन मुली व एक मुलगा शिवाजी नांवाचा झाला.

शि वा जी (१८३३ – १८५५):- हा या घराण्यांतील शेवटचा राजा होय. स. १७९९ च्या तहामुळें तंजावरचा राजा म्हणजे नुसता एक नेमणुकदार बनला होता. याला सालीना १०८०९९३ रू. नेमणुकीबद्दल व तंजावरच्या वसुलाच्या पाचव्या हिश्श्याबद्दल मिळत असत. त्यामुळें यानें आपलें सारें आयुष्य चैनींत आालविलें. वडिलाप्रमाणें याला विद्येची गोडी नव्हती; मात्र तो उदार व दाता होता. म्हणून दक्षिणेकडे त्याला कर्ण म्हणत असत. तो वारल्यावर (२९ आक्टो. १८५५) त्याला औरस संतति नसल्यानें डलहौसीनें त्या सबबीवर तंजावरचें राज्य खालसा केलें. राजाला सयदंबा, पद्मांबा व कामाक्षीअंबा अशा तीन राण्या होत्या. पहिल्या दोन त्याच्या हयातींतच वारल्या. कामाक्षी ही स. १८९२ त वारली. सयदंबा हिला दोन मुली होत्या. पुत्र होईना म्हणून राजानें आणखीं १७ लग्नें केलीं; त्यापैकीं ११ राण्या त्याच्या मागें बर्‍याच काळापर्यंत जिवंत होत्या. कामाक्षाबाईंनीं आपलें राज्य परत मिळविण्यासाठीं फार खटपटी केल्या; थेट कंपनीच्या डायरेक्टरापर्यंत दाद पोहोंचविली; परंतु त्याचा कांहीं उपयोग न होता त्यावेंळीं कंपनीच्या ठरलेल्या (साम्राज्यविस्ताराचें) धोरणाप्रमाणें राणीच्या विरूद्ध निकाल लागला व दख्खनमधील हें मराठी राज्य नामशेष झालें.

शिवाजीच्या दोन्ही मुली कोल्हापुरकर सखारामराव मोहिते हंबीरराव यास दिल्या होत्या; पहिली लवकर वारली. दुसरीचे नांव विजयमोहना मुक्तांबा होते; तिला इंग्रजसरकारनें तंजावरकन्या असा किताब; दरमहा ६ हजारांचें पेनशन व तेरा तोफांच्या सलामीचा मान दिला होता. हिची मुलगी बडोद्याचे विद्यमान राजे श्री सयाजीराव गायकवाड यांनां दिली होती. त्यांचें नांव लक्ष्मीबाई होतें, त्या अल्पवयांत वारल्या. त्यांचे पुत्र फत्तेसिंहराव होते तेहि अल्पवयांत वारले; त्यांचे चिरंजीव यवराज प्रतापसिंह व दोन कन्या विद्यमान आहेत. पैकीं एक कन्या (इंदुमतीबाई) कोल्हापूरचे विद्यमान राजे श्री. वमराजे यांनां व दुसरी लक्ष्मीबाई सावंतवाडीचे विद्यमान राजे श्री. बापूसाहेब यांनां दिली आहे. तंजावरच्या राजघराण्याचा आजचा एवढाच (कन्येचा) अवशेष वंश उरला आहे.

शिवाजीच्या पश्चात १५ राण्या जिवंत होत्या; त्यांपैकीं शेवटची राणी जिजांबा ही ३ मे १८९२ रोजीं वारली. यांचे दोन दत्तक राजपुत्र श्री. शिवाजीराजे व श्री. प्रतापसिंहराजे विद्यमान आहेत. राण्यांना व इतर आप्तांनां नेमणुका होत्या; सन १८६० त ५४२८२० रूपयांची रक्कम या कामीं खर्ची पडली होती; हल्लीं हीं रक्कम अगदींच कमी झाली आहे; तथापि अद्यापि खाजगी मोकाशाची १९० गांवें व जमीनी वगैरे मिळून बरेंच खाजगी उत्पन्न चालू आहे. मध्यंतरी सरस्वरीमहालसंग्रहालय तंजावर येथून हलवून लंडन येथें नेण्याची खटपट चालू होती, शेवटीं बर्‍याच खटपटीअंतीं तें येथेंच ठेवण्याचें ठरलें.

[संदर्भग्रंथ:- डफ; बील; तंजावरचा शिलालेख; शिवदिग्विजय; म्याकेंझी – हिस्टरी ऑफ कर्नाटक; क्ल्युन्स – नेटिव्ह स्टेट्स ऑफ इंडिया; प्रतापवंशावळी; विल्क्स – हिस्टरी ऑफ म्हैसूर; टेलर – ओरिएन्टल हिस्टोरिकल म्यान्सक्रिप्ट्स; हिकी – तंजावर; रंगापिल्ले – डायरी; व्यंकास्वापीराव – तंजावर मॅन्युअल; ऑर्म - हिस्टरी ऑफ कर्नाटक.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .