प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

तंजावर, जि ल्हा.- मद्रास इलाख्याच्या दक्षिण भागांत किनार्‍याच्या काठचा एक जिल्हा. क्षे. फ. ३७१० चौ. मै. मर्यादा-  उद्रारेस कोलेरून व तिच्या पलीकडे त्रिचनापल्ली व दक्षिण अर्काट जिल्हे; पश्चिमेस पुदुकोत्तई संस्थान व त्रिचनापल्ली जिल्हा; व दक्षिणेस मदुरा जिल्हा. किनार्‍यावर कारीकाल ही फ्रेंच वसाहत आहे.

स्वाभाविक वर्णन:- उत्तर व पूर्वेकडील प्रदेशांत कावेरी व तिच्या शाखांच्या योगानें शेतीला पाणी मिळण्याची सोय उत्तम असल्यामुळें, तेथें वस्ती सर्वांत दाट आहे. या भागापेक्षां दक्षिण भागाची उंची ५० फूट जास्त उंच असून प्रदेश रूक्ष आहे. या जिल्ह्यांत कोल्हा व खोंकड यांखेरीज इतर रानटी जनावरें आढळण्यांत येत नाहींत. जिल्ह्याची हवा एकंदरींत आरोग्यकारक आहे; सर्व जिल्ह्यांत सरासरी पाऊस वर्षास ४८ इंच होतो.

इतिहास:- दहाव्या शतकाच्या मध्यभागापर्यंत हा जिल्हा चोलांच्या राज्यांत मोडत होता. पहिल्या राजराजाच्या कारकीर्दींत त्या घराण्याची सत्ता कळसास पोहोंचली. त्यावेळीं त्यांच्या राज्यांत हल्लींचा सर्व मद्रास इलाखा, म्हैसूर, कुर्ग व सिलोनचा उत्तर भाग, एवढ्या प्रदेशाचा समावेश झाला होता. राजराजाच्या सैन्याचा सरंजाम व त्याची तयारी ही फार उच्च प्रकारची असून सैन्यांत घोडेस्वार, पायदळ, व गालंदाज यांच्या तुकड्या केलेल्या होत्या. त्यानें लागवडीखालच्या सर्व जमिनीची मोजणी करून तिचा सारा ठरविला व देवालयें आणि सार्वजनिक इमारती बांधून तंजावर सुशोभित केलें. त्याच्या कारकीर्दींत दिवाणी कारभाराचीहि व्यवस्था नीट लावण्यांत आली. प्रत्येक गांवांत अगर ग्रामसमूहांत स्थानिक अधिकार्‍यांच्या देखरेखीखालीं एक महासभा असून, गांवासंबंधीं सर्व प्रकारच्या बाबतींत तिला पूर्ण बहुतेक अधिकार असत. कांहीं ग्रामसमूह मिळून एक जिल्हा व कांहीं जिल्हे मिळून एक प्रांत होत असे. चोलांच्या राज्यांत असे सहा प्रांत होते. राजराजानें स्थापन केलेलें राज्य त्याच्या मृत्यूनंतर पुष्कळ काळपर्यंत कायम राहिलें. राजराज चोळ व त्याच्या मागून गादीवर बसलेले राजे, त्याच्याप्रमाणेंच शूर व राज्यकारभारदक्ष होते. कावेरी व कोलेरून नद्यांना विभक्त करणारा मोठा बंधारा त्यांनींच बांधला.

तेराव्या शतकांत चोलांच्या इतर मुलुखाबरोबर तंजावरहि द्वारसमुद्राच्या होयसळ बलजळांच्या आणि मदुरा येथील पांड्यांच्या अंमलाखालीं गेलें. चवदाव्या शतकाच्या अखेरीस उदयोन्मुख विजयनगरच्या राज्यांत सामील होण्यापूर्वीं, हा जिल्हा सर्व दक्षिणेबरोबर मलिक काफूरच्या मागून आलेल्या मुसुलमानांच्या स्वार्‍यांनां बळी पडला असावा. सोळाव्या शतकांत विजयानगरच्या एका सेनापतीनें आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें व त्याच्या नंतरच्या पुरूषानें सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या वर्षांत तंजावर येथें नायक घराणें स्थापन केलें. ह्या घराण्यांतील राजांनीं जिल्ह्यांतील बहुतेक किल्ले व वैष्णव मंदिरें बांधिली आहेत. नायक घराण्यांतील  शेवटल्या राजाला मदुरा नायक चोक्कनाथ यानें स. १६६२ त वेढा दिला; त्यावेळीं बचाव करणें अशक्य आहे असें पाहून त्यानें राजवाडा व झनाना उडवून दिला, व आपण आपल्या पुत्रांसह वेढा देणार्‍या लोकांवर तुटून पडून लढतां लढतां मरण पावला. तथापि त्याचा एक लहान मुलगा बचावला; मुलाच्या अनुयायांनीं विजापूरच्या मुसुलमान राजाची मदत मागितल्यावरून विजापूरहून शिवाजीचा सावत्र भाऊ व्यंकोजी यास तंजावरवर पाठविण्यांत आलें. व्यंकोजीनें प्रथम बाल नायकाला गादीवर बसविलें. परंतु पुढें लवकरच ती गादी आपण स्वत:बळकावून तेथें मराठी घराण्याची त्यानें स्थापना केली. अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत या घराण्याची सत्ता कायम होती. पहिलीं सुमारें सत्तर वर्षें मात्र मुसुलमानांशीं त्यांचें वर्तन सलोख्याचें असून त्यांनां ते खंडणी देत असत.

स. १७४९ त येथील गादीसंबंधीं तंटा चालू असतां इंग्रजांनीं एक पक्ष स्वीकारून देवी कोट्टईवर हल्ला केला व अखेर तें गांव घेतलें. कर्नाटकच्या युद्धांत राजा इंग्रज व महंमदअल्ली यांच्या बाजूला मिळाला होता परंतु एकंदरींत त्यानें युद्धांत फारसा भाग घेतला नाहीं. पुढें १७७३ सालीं राजा हैदरअल्ली व मराठे यांजबरोबर कांहीं मसलत करीत आहे असें वाटल्यावरून इंग्रजांनीं तंजावर आपल्या ताब्यांत घेतलें. परंतु १७७६ त कंपनीशीं झालेल्या तहान्वयें तें परत करण्यांत आले. स. १७९९ त सरफोजी राजाने आपला सर्व मुलुख कंपनीच्या हवालीं करून आपण पेन्शन घेतलें. १८५५ सालीं सरफोजीचा मुलगा शिवाजी हा निपुत्रिक वारल्यामुळे तंजावर गाव व किल्लाहि ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. या जिल्ह्यांत पुराणवस्तुसंशोधकांच्या द्दष्टीनें महत्त्वाची ठिकाणें म्हणजे तेथील धार्मिक इमारती होत. सर्व देवालयांत तंजावर येथील पहिल्या राजराजानें बांधलेलें मंदिर महत्त्वाचें आहे.

लोकसंख्या:- सर्व इलाख्यांत ह्या जिल्ह्याची लोकवस्ती फार दाट असून, घनतेचें प्रमाण द. चौ. मैलास ६०५ लोक असें आहे. जिल्ह्यांत लहान मोठी २५२९ गांवें आहेत. एकंदर लो. सं. (१९२१) २३२६२६५. पैकीं शें. ९१ हिंदू, शें. ५ मुसुलमान व शें. ४ ख्रिस्ती आहेत. जिल्ह्यांतील बायकांचें पुरूषांशीं प्रमाण ११:१० असें आहे. याचें कारण येथून ब्रह्मदेश, सीलोन, वगैरे ठिकाणीं पुष्कळ लोक जातात व बरोबर स्त्रिया नेत नाहींत हें होय. जिल्ह्यांत सर्वत्र तामीळ भाषा चालते. केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणारा वर्ग या जिल्ह्यांत इतर ठिकाणच्या मानानें कमी आहे; याचें कारण पुष्कळ लोक व्यापार, सोनारकाम वगैरे किरकोळ धंद्यावर चरितार्थ चालवितात.

शेती:- या जिल्ह्यांत मुख्यत: रयतवारी पद्धत चालू असून काहीं जमीनदारी व इनामी जमिनीहि आहेत. कावेरीच्या खोर्‍यांत मुख्यत: भाताची लागवड होते, व इतर भागात वरगू नांवाचें धान्य सर्वांत ज्यास्त पिकतें. शेतीकरितां लागणार्‍या पाण्याचा बहुतेक पुरवठा कावेरी व तिच्या शाखांपासून होतो. जिल्ह्याच्या उत्तर मर्यादेवरून वाहणारी कोलेरून ही कावेरीची शाखा असून तिचा प्रवाह मुख्य पात्रापेक्षां सखल जागेवरून वहात असल्यामुळें कावेरीचें बरेंच पाणी कोलेंरूनमधून जात असे. याकरितां दोन मोठे बांध किंवा धरणें घालून कावेरीच्या पाण्याचा उपयोग तंजावर जिल्ह्यांतील शेतीकरितां करून घेण्यांत आलेला आहे. या जिल्ह्यांत महत्वाचीं जंगलें मुळींच नाहींत. वल्लम येथें गार सांपडते व जिल्ह्याच्या नैर्ॠत्य भागांत लॅटराइट व चुनखडी हीं मुबलक आहेत. तंजावर तालुक्यांत पिंवळी काव व नागोरजवळ शिरगोळा हे खनिज सांपडतात.

व्यापार व दळणवळण:- विणकाम व धातुकाम हे येथील मुख्य उद्योगधंदे आहेत. एके काळीं तंजावरचें रेशमी कापड प्रसिद्ध असे; परंतु कृत्रिम रंग निघाल्यापासून आणि स्वस्त विलायती माल मिळूं लागल्यापासून हा धंदा बहुतेक बसला आहे. कोर्नाद व अय्यंमपेटीई हीं गांवें रेशमी कापड आणि गालीचे यांकरितां प्रसिद्ध होतीं. तंजावर व कुंभकोणम येथें अद्यापहि कशिद्याचें व जरीचें काम चांगलें होतें. दक्षिणेंत तंजावरच्या तोडीचें धातुकाम मदुरेखेरीज इतर कोठेंहि होत नाहीं. मदुरेंतील कारागीर फक्त पितळेचें काम करितात; परंतु तंजावरमध्ये पितळ, तांबे व रूपें या तिन्हहि धातूंचा उपयोग केला जातो. या धातूंच्या देवाच्या मूर्ती व इतर नक्षीदार जिन्नस तयार केले जातात. तंजावर शहर, कुंभकोणम व मन्नारगुडी ही धातुकामाची मुख्य ठिकाणें होत. इतर किरकोळ धंद्यांपैकीं पिसानत्तूरचें काशाचें काम आणि वाद्यें व खेळणीं तयार करण्याच्या कारखान्यांचा उल्लेख करणें जरूर आहे. कलाकौशल्याच्या कामाखेरीज, केवळ कारखाने असे तंजावरमध्यें फारसे नाहींत.

तंजावर जिल्हा समुद्रकाठीं असून त्यातून रेल्वेचे फांटे पुष्कळ गेलेले असल्यामुळें तो व्यापारद्दष्ट्या फार सोयीचा आहे. त्यात एकंदर १५ बंदरें असून नेगापट्टम हें सर्वांत महत्त्वाचें आहे. त्रांक्किबार, नागोर, (नगावर ?) मुत्तुपेट, अदिरांपट्टम, व अम्मपट्टम हीं बंदरेहि साधारण बरीं आहेत. नेनापट्टम खेरीज, तंजावर, कुंभकोणम, मायावरम, व मन्नागुडी हीं दुसरीं व्यापाराचीं ठिकाणें आहेत. खुष्कीनें व जलमार्गानें होणारा बहुतेक व्यापार चेट्टी व मुसुलमान लोकांच्या हातीं आहे.

तांदूळ, विड्याची पाने, भुईमुगाच्या शेंगा, धांतूचीं भांडीं व कापड हे खुष्कीमार्गानें जाणारे मुख्य निर्गत जिन्नस आहेत. तुतिकोरीनहून मीठ; म्हैसूर व तिनेवल्लीहून सरकी, मद्रासहून राकेल; पश्चिम किनार्‍यावरून चिंच व इमारती लाकूड; आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून तूप, मिरची, डाळी, वगैरे जिन्नस येतात. तुतिकोरीन बंदर झाल्यापासून या जिल्ह्याचा समुद्रावरून होणारा व्यापार कमी झाला आहे.

साक्षरतेच्या बाबतींत तंजावर जिल्ह्याचा नंबर मद्रास शहराच्या खालोखाल लागत असून, शें. २०.३ पुरूषांनां व शें. ०.९ स्त्रियांनां लिहितां वाचतां येतें. १९०४ सालीं जिल्ह्यांत ११८२ प्राथमिक शाळा, ७८ दुय्यम शाळा, ७ विशिष्ट शाळा, ३ शिक्षकांच्या शाळा, व ३ आर्टस कॉलेजें होतीं. या जिल्ह्यांत स्थानिक बोर्डें व म्युनिसिपालीट्या यांनीं चालविलेलीं १६ रूग्णालयें व २२ दवाखाने आहेत. तंजावर शहरच्या रूग्णालयाला एक मेडिकल स्कूल जोडलेले आहे.

तालुका.- मद्रास इलाख्यांत तंजावर जिल्ह्याचा पश्चिम तालुका व पोटविभाग. क्षे. फ. ६८९ चौ. मै. आहे. लो. सं. (१९०१) ४०७०३९. यांत ३६२ खेडीं व तंजावर शहर (जिल्ह्याचें आणि तालुक्याचें ठिकाण), तिरूवाडी हें पवित्र गांव, कलेक्टरचें राहण्याचें ठिकाण वल्लम, व गालिचाकरितां प्रसिद्ध असलेलें अय्यंपेट्टई अशीं चार मोठीं गांवें आहेत. या तालुक्यांत कल्लण नांवाचे चोर्‍या करणारे लोक फार आहेत. यांत तांदूळ, कंबू, रगी, भुईमूग, तांबडा हरभरा, वगैरे पिकें होतात.

शहर.- मद्रास इलाख्यांत याच नांवाच्या जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें शहर साऊथ इंडियन रेलवेच्या मुख्य फांट्यावर मद्रासपासून २१६ मैल व तुतिकोरीनपासून २२६ मैल अंतरावर आहे. लो. सं. (१९२१) ५९९१३. तंजावर हें मद्रास इलाख्यांतील आठवें मोठें शहर आहे. तंजावर हें अनुक्रमानें चोल, नायक व मराठे लोकांचें राजधानीचें ठिकाण होतें. या शहराला, १७४९ सालीं फ्रेंच व चंदांसाहेब यांनीं आणि १७५८ सालीं लालीच्या हाताखालीं फ्रेंचांनीं वेढा दिला होता; परंतु ते वेढे निष्फळ झाले. स. १७७३ त कर्नल जोसेफ स्मिथ यानें हें शहर काबीज केलें व स. १७७६ त तें पुन्हां महाराजाकडे देण्यांत आलें. स. १७९९ त तंजावरचा राजा सरभोजी यानें आपला सर्व मुलूख इंग्रजांनां दिला त्यावेळीं तंजावर शहर मात्र आपल्या ताब्यांत ठेविलें होतें; त्याचा मुलगा १८५५ सालीं निपुत्रिक वारल्यावर तेहि इंग्रजांच्या राज्यांत सामील झालें. राजाच्या चार राण्या व कुटुंबांतील इतर मंडळी, किल्ल्याच्या मध्याभागीं असलेल्या राजवाड्यांत रहात असत (१९०८). राजवाड्यांत मराठे व नायक यांचे दरबारी दिवाणखाने, शस्त्रागार व निरनिराळ्या भाषांतील २२००० पुस्तकें असलेलें वाचनालय हीं आहेत.

किल्ल्याचा तट पाडून टाकलेला आहे. किल्ल्याच्या आतल्या बाजूला शिवगंगा नावाचा लहानसा किल्ला असून त्यांत शिवगंगा टाकें, व बृहदीश्वर स्वामीचें प्रख्यात देवालय आहे. भिंतीवरील लेखावरून हें देऊळ ११ च्या शतकांत, चोल राजा पहिला राजराज यानें बांधलें असें समजतें. एतद्देशीय राजांच्या अमदानींत तंजावर हें कलांचें माहेरघर समजलें जात असे. अद्यापहि येथें कांहीं कुशल कारागीर आहेत. तंजावरसारखें धातुकाम व वाद्यें या इलाख्यांत बहुधा दुसर्‍या कोठेंहि होत नाहींत; व येथील रेशमी विणकाम, फीत, कशिद्याचें व जवाहिरी काम आणि कृत्रिम हार फा प्रसिद्ध आहेत.

तंजावर हें १८६० सालीं जिल्ह्याचें मुख्य ठिकाण झालें; व तेव्हांपासून येथें सर्व जिल्हा कामगार आहेत. उत्तरेकडील करतंत्तान नांवाच्या उपांत भागांत ब्राह्मणवसति असून आग्नेयीकडील मानंबुचावाडींत यूरोपियन लोक रहातात. येथें ख्रिस्ती लोकांच्या निरनिराळ्या धर्मपंथांच्या मिशनरी मंडळ्या आणि एस. पी. झी. मिशन सोसायटीचें कॉलेज, खासगी लोकांनीं चालविलेलें हायस्कूल, शिक्षकांकरितां ट्रेनिंग स्कूल व टेकनिकल इन्स्टिट्यूट या शिक्षणसंस्था आहेत. येथील म्युनिसिपालिटी १८६६ सालीं स्थापन झाली. १९०३-०४ सालीं तिचें उत्पन्न १०३००० रू. होतें. वेन्नर नदीच्या पात्रांतील विहिरीचें पाणी पंपानें वर काढून शहराला दिलेलें आहे. किल्ल्याच्या भागांतील मैलमोर्‍यांचें काम १८४० सालीं राजाच्या वेळीं झालें. सार्वजनिक वर्गण्या गोळा करून १८८० सालीं स्थापन झालेल्या रूग्णालयाला मेडिकल स्कूल जोडलेलें आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .