प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ढीमर -  मासे मारणारांची व पालख्या वाहणांराची ही जात मध्यप्रांत-वर्‍हाडांत विशेषत: मराठी जिल्ह्यांतून पुष्कळ आहे. यांची संख्या २८४००० आहे. उत्तरेकडे भोई व ढीमर या निराळ्या जाती आहेत पण मध्यप्रांतात तशा नाहींत. गोंड लोक भोई शब्द फार सन्मानाचा समजतात. यावरून बरेच गोंड ढीमर व भोई जातींत शिरले असावे असा रसेल तर्क करतो. चांद्यास मासे धरणार्‍यांस पालेवार असें तेलगू नांव आहे.

यांचे उपवर्ग बरेच आहेत. शिंगाडें पेरणारांस सिंगारिया, नदी व नाल्याच्या काठीं रहाणारांस वाढा, पाटा व जातें सुधारणारांस टांकीवाले, झिंगे धरणारा झिंगा, गळ टाकणारांस बनसिया याप्रमाणेंच सराइया, बंधाइया व धुरीया अशीं नांवें उपवर्गाचीं आहेत; हीं अर्थात् धंद्यावरून पडलीं आहेत. धुरिया हे लाह्या व पोहे विकतात व यांचा मूळ पुरूष महादेवानें पार्वतीची पालखी वाहून नेण्याकरितां मूठभर मातीपासून निर्माण केला अशी त्यांची समजूत आहे व हे छत्तीसगडांतील धुरी लोकांपैकीं असावे. सोनझारा ढीमर सोनें मिळविण्याकरितां झारेकर्‍याचें काम करतात. त्यांची निराळीच जात बनली आहे. कसधोनिया हे स्नानाच्या वेळीं क्षेत्रांतील नद्यांतून लोकांनीं टाकलेले पैसे उचलतात. गोंडी डीमर हें गोंडापासून झालेले असावे पण बहुतेक ढीमर वर्ग गोंड व कोल लोकांपासून झाला असावा असें मानण्यास पुष्कळ जागा आहे. कारण गोंड व विशेषत: कोल लोक पालखी वाहण्यांत फार कुशल आहेत. सुवरहा लोकांचें नांव डुकरावरून पडलें आहे. यांचा दर्जा इतरांपेक्षां फार नीच आहे. गधेवाले डीमर ओझ्याचीं गाढवें बाळगतात.

यांच्यांत बरेच असगोत्रविवाही, पशुपक्षी व झाडांचीं नांवें घेतलेले लोक आहेत. जसें वाघमारे, ओझवे, गुरूपहचान, मिदोईया (सीमा रखविणारे), गिधवे (गिधाड), गधेखाय, कस्तूरे, तुमसरे, नागपूरकर मडगी, भोयर, पिंडारिया, गोडिया व गोधली. कच्छवा हें रजपूत नांव आहे असें रसेल म्हणतो (पण कासव धरणें हा धंदा करणारे जे लोक असतील त्यांस कछवा हें नांव पडलें असावें.)

सकुलविवाह आणि आते, मामे व मावस भांवडांचे विवाह निषिद्ध आहेत. पुष्कळ ठिकाणीं ज्या ज्या कुलास नातीं ठाऊक आहेत तीं कुलें परस्परांत विवाह करीत नाहींत. नध व केहरा या जाती आपसांत लग्नें करीत नाहींत. यांच्यांपैकीं जर कोणास दुसर्‍याची मुलगी वधू पाहिजेच असली तर त्यानें बधूच्या जातींत येऊन दीक्षा घेऊन प्रवेश करावा व मग लग्न करावें. एखाद्या अविवाहित स्त्रीने स्वजातीशीं किंवा उच्च जातीपाशीं व्यभिचार केला तर तिला जातिभोजन घेऊन शुद्ध करतात अथवा तिच्या केंसाची बट कापून तिला शुद्ध करतात. दोन कुलें आपसांत मुली बदलून घेतात व लग्नें करतात. हिंदुस्थानी जिल्ह्यांत बायका वरातीबरोबर जात नाहींत पण मराठी जिल्ह्यांतून जातात. भनाराढीमर लग्नविधि वधूकडे केल्यास वधूशुल्क १६ रूपये व वराकडे केल्यास २० रूपये घेतात. चांद्यांतील ढीमर लोकांत काटकसर करण्याकरितां विवाहविधि लांबणीवर टाकतात. मुलीच्या बापास १। रपाया देऊन मुलगी घरांत आणावयाची आणि जातीस भोजन घालावयाचें. मग ती पत्‍नीसारखा व्यवहार करूं लागते व म्हातारपणी मरण्यापूर्वीं तिचा लग्नविधि करून घेतात कारण त्या संस्काराखेरीज आलेलें मरण चांगलें नाहीं अशी समजूत आहे. अशा रीतीनें आजा, आजी, आईबाप, मुलगा व सून यांचीं लग्नें कधीं कधीं एकाच वेळीं एकाच मंडपांत झाल्याचीं उदाहरणें आहेत. छिंदवाड्यातील  शिंगाडे ढीमर लग्नाच्या पूर्वीं मगर मारून अवश्य खातात व सोनझार ढीमरात मगर नदींतून काढून आणून त्याची पूजा करून पुन्हां नदींत सोडतात.

भंडारा जिल्ह्यांत वरास जाळें व वधूस शिधोरा देतात व ती दोघे मासे मारण्याकरितां नदीस जातात पण वधूचा भाऊ त्यांस वाटेंतूनच परतवून आणतो. मंडल्यामत वराच्या घरातल्या उंबर्‍याखालीं डुकर गाडतात व त्याच्यावरून पाय देऊन वरानें घरांत गेलें पाहिजे. विधवाविवाहास पूर्ण मोकळीक आहे. मंडल्यांत रविवार, मंगळवार व शनिवार या रात्री खेरीजकरून कोणत्याहि रात्रीं विधवाविवाह करतात. घटस्फोटाला परवानगी देतात पण फारच क्वचित. बायकोच्या व्यभिचाराला नवरा नेहमीं क्षमा करतो आणि अतिशयच बोभाटा झाल्याखेरीज घटस्फोट सहसा करीत नाहीं.

प्रेतांस बहुतेक दारिद्य्रामुळें हे लोक पुरतात. अशौच १० दिवस पाळतात. पण कान टोचलेल्या मुलाचें १ दिवसच पाळतात. वर्‍हाडांत ढीमरांचा अंत्यविधि गोंडासारखाच असतो. यांचा देव दुल्हादेव आहे. कदंवाच्या लांकडाची देवाची प्रतिमा करून त्यावर शेंदूर फांसतात. वर्‍हाडांत अन्नपूर्णादेवीची प्रार्थना करतात. तिची घोड्यावर बसलेली आकृति पितळेच्या पत्र्यावर काढतात व तिला हळद, कुंकू वाहतात. पाण्यांत शिरण्यापूर्वीं जलदेवतेनें संरक्षण करावें म्हणून कांहीं वेळ प्रार्थना करतात. गंगेला गंगामाई म्हणतात. उतारूंनां नदीवरून नेणारे ढीमर घटोईया देवाची पूजा करतात. वडाच्या देवतेस बरमदेव म्हणतात. गावच्या पुरोहिताच्या आत्म्यास परिहार म्हणतात आणि फार मोठ्या साधूसंतास गुसांई देव म्हणतात. देवीला काळ्या बकरीचा बळी देतात आणि घरातील खड्यांत बकरीचीं हाडें व इतर शरीरातील निरूपयोगी भाग पडूं देतात व त्यांत यांखेरीज कांहीं पडलें तर तें बाहेर न काढतां त्यासकट पुरून खड्डा बुजवितात. एकदां एक लहान मूल त्यांत पडलें असतां तें तसेंच पुरलें पण दुसर्‍या वर्षीं खोदलें तेव्हां तें खेळतांना सापडलें अशी एक कथा हे लोक सांगतात. दुसरी बायको आपल्या पहिल्या सवतीच्या नांवाचा ताईत गळ्यांत घालते.

यांचे धंदे मासे मारणें, होड्या चालविणें, कावडींतून पाणी आणणें, भांडीं घासणें, हंगामाच्या वेळीं शेतांत शिजविलेलीं बोरें व राताळू नेऊन विकणें व पालखी वाहणें हे आहेत. जेथें यांनीं मळलेली कणीक लोकांस चालते तेथें हे तें काम सुद्धा करतात.

क्रूक म्हणतो की “उत्तर हिंदुस्थानांत कहरास मेहर म्हणतात व याचा संबंध त्यानें महिला या संस्कृत शब्दाशीं जुळवून जनानखान्यांत सुद्धा यांनां राखण व काम करण्यास ठेवीत म्हणून हें नांव यांचें पडलें असावें असें म्हणतो. ढीमर आपल्या मालकाचा हुक्का भरतो व कसा भरला गेला हें पाहण्याकरितां प्रथम स्वत: ओढून मग मालकास देतो. ढीमर स्त्रियांस मध्यप्रांताच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत वरोणी म्हणतात. यांना घरातील झाडझूड व इतर कामें करण्यास नौकर ठेवतात व कांहीं मालक कधींकधीं आपलीं लहर त्यांच्यावर पुरवून घेतात. ढीमर हा बहुधां कुंटणपणाहि करतो. ढीमर लाह्या व पोहे विकतो, कोणी तागाचीं तरटें विणतात व कोणी डुकरे पाळतात. महाराच्या नारायण देवाला बली दिलेल्या डुकराच्या प्रसादांत ढीमर सामील होतो. हे लोक कोशाचे जंतू पाळून कोशाची जोपासना करतात. लागवडीच्या हंगामात हे दोन महिने रानांत एक वेळ खाऊन व स्त्रीसंग वर्ज्य करून राहतात.

कोशाच्या सुरवंटांचीं अंडीं झाडावर ठेवतांना त्या झाडांत पाठदेवाची भावना करून त्याला रेशीम गुंडाळतात. कोशाच्या सुरवंटांची जोपासना करणें, त्यांची वाढ होऊन कोश तयार झाल्यावर त्यांनां ठकवणें इत्यादि सर्व प्रक्रिया फार धर्मबुद्धींनें करतात व त्या सर्वकाली स्त्रीसंग वर्ज्य करतात. विवाहारंभीं सुरवंट खाण्याचा विधि मगर खाण्याच्या विधीप्रमाणेच आहे. यांचा दर्जा समाजांत फार विचित्र झाला आहे. यांच्या हातचें पाणी बहुतेक सर्व पितात. हे पालखी वाहतात म्हणून ब्राह्मणांनीं यांनां अस्पृश जातींतीन काढून स्पृश जातींत घेतलें आहे. पण जवलपुरांत रेकवार, वंट, बरमैयान, पवेह या उपवर्गांतील स्त्रिया एकमेकीच्या हातचें जेवत नाहींत व मडक्यात ठेवलेलें पाणीहि त्यांस आपसांत चालत नाहीं. पितळेच्या भांडंयांतून ताजें विहिरींतून काढलेलें पाणी असेल तर चालतें. वर्षांतून एकदां मोहोरमांत हे लोक मुसुलमानांच्या हातचें जेवतात. त्या दिवसांत भीक मागून आणलेलें अन्न फकीराजवळ नेतात; तो तें हुसेनाच्या ताजियावर वाहून यांनां प्रसाद देतो. उत्तरहिंदुस्थानात नाई व बारी ह्या ढीमर जाती घरातलीं कामें करतात त त्यांस पावनी प्रजा म्हणतात. कधीं कधीं यांची जागा अहीर घेतात. लग्नकार्यात यांच्या पंक्तींत स्वतंत्र निराळ्या भांड्यांतून वाढण्याची व्यवस्था करतात. नीच जातीच्या स्त्रीपुरूषांच्या हातचें जेवल्यास किंवा इतर अंगसंग व्यवहार केल्यास अजीबात जातींतून बहिष्कार घालतात. पण जर अविवाहितांनीं तसे केल्यास त्याला प्रायश्चितानें शुद्ध करतात. मांजर, कुत्रा, खार मारल्यास, जखमेंत किडे पडल्यास व तुरूंगांत गेल्यास प्रायश्चित्तानें शुद्ध करतात. तसेंच अगदी नीच जातीशीं व्यभिचार केल्यासहि प्रायश्चित्तानें शुद्धि होते. यांची शुद्धि यांच्या जातीच्या भटानें केली पाहिजे. तो गुन्हेगारास नदीवर नेतो, त्याला स्नान घालून त्याच्या केंसाची एक बट कापतो व नारळ फोडून त्याला पंचगव्य देतो. मग सर्व एकत्र जेवतात. भटाला १। रू. ध्क्षणा द्यावी लागते. वर्‍हाडांत बहिष्कृत भोयास ब्राह्मणाच्या पायाच्या तीर्थानें शुद्ध करतात. मात्र त्यानंतर जातवाल्यास दारू पाजावी लागते.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .