विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डूलचेन्यो - अल्बेनियन सरहद्दीपासून ८ मैलांवर अड्रियाटिक समुद्राच्या किनार्यावर डूलचेन्यो हें मॉटेनिकग्रोममध्यें बंद आहे. मॉटेनिग्रोंतील शहरांत हें सर्वांत सुंदर आहे. येथील लोकसंख्या सन १९०० मध्यें सुमारें ५००० होती. येथील बाजार, मशिदी, लहान मनोरे व बुरख्यांतील बायका पाहून हें शहर तुर्कींचे असावें असें वाटतें. या शहरांत पुष्कळशी वस्ती तुर्कांची आहे. येथें रोमनकॅथोलिक देवालय आहे या ठिकाणीं निवार्याची जागा नाही.
इ. स. पूर्व १६७ सालीं रोमन लोकांनीं हें घेतलें. ते याला अलसिनियम् म्हणत. मध्ययुगांत हें चांचे लोकांच्या उपद्रवामुळें प्रसिध्द होते. स. १८८० पर्यंत हें तुर्कींच्या ताब्यांत होतें. १८७८ च्या बार्लिनच्या तहाप्रमाणें १८८० मध्यें मांथिनिग्रोकडे हें आलें.