प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

डुप्ले - जोसेफ फ्रांक्वा डुप्ले हा १ जानेवारी रोजी जन्मला. त्याचा बाप प्रथम जकातदार होता; पुढें फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या तंबाखूच्या व्यापाराचा तो मक्तेदार बनला. डुप्ले आपल्या १८ व्या वर्षी प्रथम हिंदुस्थानांत येऊन गेला. त्यानंतर तो तीन वर्षे फ्रान्समध्यें होता. तारुण्यांतील हूडपणानें त्याच्या बापानें कंटाळून त्याला फ्रेंच ईस्ट इं. कंपनींत नोकरीस लावून हिंदुस्थानांत पाठविलें. त्याला पांडेचरीच्या गव्हर्नराच्या कौन्सिलांत वरिष्ठ सभासदाची व तेथील मुख्य सेनापतीची जागा मिळून, तो फ्रान्सहून २९ जून १७२१ रोजीं निघाला.

जहाजावर सुरतच्या फ्रेंच वखारीचा कमिशनर डुलिव्हर हा होता; तो वाटेंतच मेला; त्यानें डुप्लेला चारशें पागोडे (१ पागोडा = ४॥ ते ५॥ रुपये) कर्जाऊ दिले होते. याच रकमेबर डुप्लेने सट्टे व व्यापार करून अगणित पैका मिळविला. तो पांडेचरीला १६ ऑगष्ट (१७२२) रोजी आला; व वरिष्ठ सभासदाच्या जागी २५०० लिव्हर पगारावर कायम झाला. परंतु एक महिन्यांतच त्याचा हुद्दा कमी करून ९०० लिव्हर पगाराच्या जागीं (चौथा सभासद म्हणून) त्यास नेमिलें. पुढें डुप्लेनें, पोओनोव्होच्या संस्थानिकानें फ्रेंचांची आगळीक केल्यावरून त्याचा पराभव केला. यानंतर त्याला चीन देशांत माल विकण्यास जी गलबतें जात होतीं त्यांवर देखरेख करण्यास नमिलें (१७२४). या ठिकाणीं त्यानें पैका बराच खाल्ला; त्यामुळें त्याची चौकशी होऊन कांहीं दिवस बडतर्फहि केलें; परंतु त्यानें अर्ज वगैरे खटपट करून पुन्हां नोकरी मिळविली (१७२७-२९). नोकरीवरून निघाला; तेव्हां त्याची हलाखी नव्हती एवढेंच नहे तर त्यानें स्वदेशीं आपल्या घरीं वीस हजार पागोडा किंमतीचें जवाहिर पाठविलें होतें. हिंदुस्थानांतील देशी राजकारणाचा अभ्यास करण्यास त्यानें याच वेळीं आरंभ केला

बंगाल्यांतील फ्रेंचांचा व्यापार मंदावला होता, तो सुधारण्यासाठीं डुप्लेला चंद्रनगरच्या वखारीवर नेमिलें (१७३१). त्यानें येतांक्षणीं अनेक खटपटी करून व्यापार वाढविला व कासीमबाजार आणि पाटणा येथें नवीन बखारी घातल्या; मात्र स्वत: खाजगी व्यापार करून बराच पैसा मिळविला, इतका कीं पुढें त्याची नेमणूक पांडेचरीस गर्व्हनरच्या जागीं झाली असतांहि, चंद्रनगर (व बंगाल) सोडण्याचें त्याच्या जिवावर आलें. वास्तविक कंपनीच्या नोकरांनीं खाजगी व्यापार करूं नये असे नियम होते पण अधिकारी लोक ते धाब्यावर बसवीत व डुप्लेहि त्यांपैकींच एक होता. अशा कारणांनीं फ्रेंच कंपनी डबघाईस आली.

यावेळची त्याची रहाणी सरदारी होती. त्याला इंग्रजी फारसे येत नसे, मात्र तो इंग्रजी वर्तमानपत्रें भाषांतर करून घेई स. १७३५ या वर्षी मात्र त्याला व्यापारांत बरीच ठोकर बसली; बाप मेला व त्यानें आपली सर्व मिळकत डुप्लेला न देतां त्याच्या वडील भावाला दिली; त्यानें लांच देऊन पदवी मिळविण्याची खटपट केली, पण ती व्यर्थ गेली; मात्र पाटणा व कासीमबाजार येथें वखारी काढल्यामुळें कंपनीनें त्याला रोख बक्षीस दिलें. यानंतर १७३७ व १७३९ या वर्षी त्याला व्यापारांत जबर तोटा आला. नादीरशहाच्या दिल्लीवरील स्वारीनें एकंदर व्यापारासच धक्का बसला होता. इतक्यांत त्याच्यावर सरकारी पैसा खाल्ल्याचा आरोपहि आला. त्यामुळें तो फारच वैतागला.

यावेळीं दिल्लीस असलेल्या एका फ्रेंच वैद्यानें बादशहाकडून डुप्लेला पंचहजारी मनसब मिळवून दिली. परंतु कंपनीला यापासून फायदा होणार नाहीं म्हणून त्यानें ती परत केली. कर्नाटकांत पंजाब; कर व कर्नाटकचा नबाब यांच्यांत तंटे लागून फ्रेंचांनीं नबाबास मदत केल्यानें, नबाबानें त्यांनां तंजावरकराचा करिकाल प्रांत दिला. या राजकारणास ड्यूमास या गव्हर्नरानें कंपनीची परवानगी घेतली नव्हती. तेव्हां हीच पध्दत (कंपनीच्या बिगर परवानगीनें राजेरजवाड्यांस मदत करून येथील प्रांत बळकावण्याची) पुढें डुप्लेनें स्वीकारली. सन १७३९ मध्यें ड्यूमास यानें राजीनामा दिला व डुप्लेची नेमणूक पांडेचरीस गव्हर्नर म्हणून झाली. याच वेळीं कर्नाटकांत बरीच भानगड उडाली. कर्नाटकचा नबाब दोस्तअली हा स्वतंत्र झाला, तेव्हां निजामानें मराठ्यांची मदत मागितली. रघूजी भोसल्यानें स्वारी करून दोस्तअल्लीस लढाईंत ठार केलें तेव्हां त्याच्या माणसांस फ्रेंचांनीं आश्रय दिला (१७४० मे). यामुळें त्याचें व मराठ्यांनीं सफदरअल्ली (दोस्तअल्लीचा मुलगा) च्या विनंतीवरून पुन्हां स्वारी करून त्याचा प्रतिस्पर्धी चंदासाहेब यास पकडून कैदेंत ठेविलें.

डुप्लेला गव्हर्नर नेमिलें, तरी चंद्रनगर सोडून दख्खनमध्यें जाण्याची तयारी नव्हती; कारण त्याला खाजगी व्यापार करून पैसा मिळविण्याची चटक लागली होती. शिवाय या सुमारास त्याला व्यापारांत खोट बसून कर्जहि झालें होतें. त्याचा एक मित्र व्हिनसेनीज याचेंच देणें पुष्कळ होतें; परंतु तो यावेळीं मेला आणि डुप्लेनें त्याच्या विधवेशीं लग्न लाविलें आणि देणें निकालांत काढिलें. त्याच्या या नव्या बायकोला व्हिनसेनीजपासून आठ मुलें झालेलीं होती. पाट लावला तेव्हां ती ३५ वर्षांची होती. ती मोठी कारस्थानी व जहांबाज बायको होती; तिचे वजन डुप्लेवर फार होतें; तिच्यामुळें त्याला पुष्कळ त्रास झाला. तिला तामीळ भाषा येत होती. डुप्लेच्या हेरखात्यावर तिची देखरेख असे. पांडेचरीस (१७४८) इंग्रजांचा वेढा पडला असतां, शत्रूकडील वित्तांबातमी तिनेंच मिळविली. या कामासाठी शिपयांची एक तुकडीहि तिच्या दिमतीस होती. डुप्लेपासून तिला एक मुलगा झाला होता परंतु तो उपजतच मेलेला होता. (१७४२). तिनें आपले हेर खुद्द मद्रासेस इंग्रजांच्या किल्ल्यांत पेरले होते.

डुप्ले हा पांडेचरीचा गव्हर्नर १७४२ ते १७५४ पर्यंत होता. त्यानें प्रथम माही येथील नायरांचें बंड मोडलें व मग चंदासाहेबाच्या राजकारणांत भाग घेतला. यासाठीं दिल्लीच्या बादशहानें त्याला पदव्या व पोशाख पाठविला होता. चंदासाहेबाला जसा फ्रेंचांचा आश्रय होता तसा सफदरअल्लीला इंग्रजांच होता. याप्रमाणें कर्नाटकांत गोंधळ माजला. कर्नाटकांतील लोकांनांहि या दोन्ही नबाबांबद्दल फारसें प्रेम नव्हतें. अशा स्थितींत बळजोरीनें कर्नाटक हस्तगत करण्याचीं संधि डुप्ले पाहूं लागला.

सन १७४४ त इंग्लंड व फ्रान्स यांमध्यें युध्दास सुरवात झाली. इंग्रजांनीं मलाक्काजवळ कंतानहून येणारीं फ्रेंच जहाजें लुटली, त्यांवर डुप्लेची खासगी मिळकत बरीच होती तीहि गेली. फ्रेंच सरकारचें व त्याचेंहि नुकसान झालें. तेव्हां त्यानें इंग्रजांवर हल्ला करण्याची तयारी केली. परंतु फ्रान्सहून त्याला कुमक येईना. इकडे इंग्रजांच्या वखारी नबाब अनवरुद्दीनच्या रक्षणाखालीं होत्या, त्यामुळें त्यानें इंग्रजांचा पक्ष धरला व डुप्लेला उलट धमकावण्या दिल्या. डुप्लेचा मुख्य उद्देश फ्रेंच व्यापारास हिंदीमहासागरांत व चीनच्या समुद्रांत निर्बंध नसावा व फ्रेंच वखारीचें संरक्षण व्हावें असा होता.

मद्रासच्या इंग्रज लोकांनीं 'वरील लुटीशीं आपला संबंध नाहीं. तो काफिला थेट इंग्लंडच्या हुकमतीखालीं आहे' असें जाहीर करून व आंतून त्या काफिल्यास पांडेचरीवर न येतां दर्यांतच चांचेगिरी करावी, असे हुकूम पाठवून तूर्त लढाईचा प्रसंग टाळला. परंतु लाबर्दोने या फ्रेंच अधिकार्‍यानें डुप्लेचें मन वळवून व फ्रेंचसरकारचा हुकूम (हिंदुस्थानांत युध्द सुरू करूं नये हा) धाब्यावर बसवून इंग्रजांशीं लढण्याची जय्यत तयारी केली. नबाबाला यामुळें फ्रेंचांच्या बळाची खात्री पटली व डुप्लेनें त्याला ५० हजार पागोडे नजर केल्यानें त्यानें त्या स्वारीस (मद्रास आपल्याला देण्याच्या अटीवर) परवानगी दिली.

याप्रमाणें लाबदोंनेनें जाऊन मद्रासवर हल्ला चढवून तें काबीज केलें (सप्टेंबर). तेथें लुटालूट न करितां तें नबाबाच्या हवालीं त्यानें करावें असा डुप्लेचा हुकूम असतां, लाबर्दोनेनें तो धाब्यावर बसवून मद्रास लुटलें. या सर्व भानगडी कंपनीच्या आज्ञेच्या विरुध्द डुप्लेनें केल्या होत्या, त्यामुळें तो यावेळी तोंडघशीं पडला. लाबर्दोनेची त्यानें पुष्कळ समजूत केली, परंतु उपयोग झाला नाहीं. शेवटीं डुप्लेचाहि बेत फिरून तो मद्रास नबाबाला देईना. म्हणून नबाबानें त्याच्यावर सैन्य पाठविलें. परंतु त्याचा डुप्लेनें पराभव केला. लाबर्दोनेनें इंग्रजांशीं केलेले करार आपण मानणार नाहीं असें डुप्लेनें जाहीर करून इंग्रजांच्या सर्व वखारी जप्त केल्या व सर्व इंग्रज लोक आणि त्यांचे अनुयायी यांनां कैद केलें; फोर्ट सेंट डेव्हिडवर त्यानें हल्ला केला, परंतु त्यांत त्याचा पराभव झाला. इतक्यांत विलायतेस फ्रेंचइंग्रजांत तह होऊन लढाई थांबली व परस्परांचा मुलूख परस्परांस परत मिळाला (१७४८). डुप्लेच्या मनांत मद्रास परत करण्याचें मुळींच नव्हतें; कलकत्ता व मद्रास हीं इंग्रज वसाहतींचीं शहरें मी फिरून मच्छीमार खेंडीं बनवीन अशी त्यानें प्रतिज्ञा केली होती. पांडेचरीवर यावेळीं इंग्रजांनीं चढाई केली असतां ती यशस्वीपणें लढविल्यामुळें डुप्लेला मोठमोठ्या रणगाजींनां मिळणारा 'कारडन सेंट लुई' हा किताब फ्रेंच सरकारनें दिला. यावेळीं मद्रास परत न देतां त्याबद्दल ब्रिटनमधील लुईसबर्ग इंग्रजांनां द्यावे व इंग्रज सत्ता दक्षिणेंतून अजीबात नाहींशी करावी असा डुप्लेचा बेत होता.

तह झाला तरी दक्षिणेंत गोंधळ असल्यामुळें त्याचा फायदा घेऊन व देशी राजांनां मदत करतो या सबबीवर आपापली सत्ता पुन्हां वाढवावी असें दोन्ही कंपन्यांनां वाटूं लागलें. तिकडील देशी राजांची त्यांनां मुळींच भीति वाटत नव्हती; या कामीं प्रथम इंग्रजांनीं डाव टाकला. तंजावरच्या देवीकोटचा बळकट किल्ला घशाखालीं उतरवून शहाजी तंजावरकरास पोलिटिकल पेन्शन नेमून दिलें (या पोलिटिकल पेन्शनाचा प्रारंभ याप्रमाणें येथून झाला).

इकडे निजामाच्या गादीबद्दल व कर्नाटकच्या नबाबीबद्दल तंटे लागले, तेव्हां डुप्लेनें नासीरजंगाचा पक्ष घेतला व चंदासाहेबासहि मदत केली आणि अंबूरच्या लढाईंत अनवरुहिनास मारून चंदा यास कर्नाटकची नबाबगिरी मिळवून दिली. या लढाईंत बूमी हा प्रसिध्दीस आला. यापुढें तो डुप्लेचा प्रमुख हस्तक बनला. चंदानें याबद्दल पांडेचरांच्या आसपासचीं ८० गावें फ्रेंचांनां देऊन खास डुप्ले, त्याची बायको व सैन्यांतील एक दोन अधिकारी यांनां मोठ्या जहागिरी दिल्या.

या फ्रेंचांच्या जयानें इंग्रजांचें दणाणलें. इकडे नासीरजंग हा मुझफरजंगवर चालून आला. तेव्हां डुप्लेनें मुझफरची व इंग्रजांनीं नासीरची बाजू घेतली. डुप्लेनें इंग्रजांचा पराभव करून जिंजीचा किल्ला काबीज केला. या लाढाईंत नासीरचा खून झाला. यानंतर डुप्लेने मुझफरजंगाला नीजामाच्या गादींवर व चंदासाहेबाला अकोटच्या गादीवर बसवून सर्व दख्खन आपल्या हाती आणली व विजयाच्या स्मारकासाठीं त्यानें अंबूर येथें एक फातियाबाद नांवाचें शहर वसविलें. थोड्याच दिवसांत मुझफरचा खून झाला तेव्हां डुप्लेनें सलाबतजंग याला गादीवर बसविलें. त्याबद्दल त्यानें डुप्लेला कर्नाटकाची नबाबगिरी, मदुरा, त्रिचनापल्ली हें प्रांत व त्याच्या संरक्षणासाठीं ठेवलेल्या फ्रेंच सैन्याच्या खर्चास दरमहा दोन लाख रुपये दिले. डुप्लेनें पोर्तुगिज व त्रावणकोरचा राजा यांच्याशीं या सुमारास तह केलें. तेव्हां इतक्या भानगडी करूं नयेत असें डायरेक्टरांनीं डुप्लेस कळविलें, परंतु तें त्यानें जुमानलें नाही.

यावेळीं डुप्लेचें प्रस्थ दख्खनमध्यें फार माजलें व इंग्रज फिक्के पडलें सन (१७५१). चंदासाहेबाने त्रिचनापल्ली घेऊन महंमदअल्लीला पिटाळलें, तेव्हां मराठ्यांच्या मदतीनें महंमदनें चंदाचा पराभव केला. येथून डुप्लेच्या त्रासास प्रारंभ झाला (१७५२). लारेन्स या इंग्रजी सेनापतीनें फतियाबाद उद्ध्वस्त करून त्रिचनापल्लीवर हल्ला केला व फ्रेंचांचा पराभव केला. फ्रेंच सेनापति लॉ हा चंदासाहेबसह इंग्रजांच्या स्वाधीन झाला. या अपयशामुळें कंपनीचें डायरेक्टर डुप्लेवर रागावले. तेव्हां त्यानें तितक्यांत महंमदअल्ली, म्हैसूरकर व मराठे यांच्यांत बिघाड आणून चंदाच्या मुलाला अर्काटचा नबाब बनविलें व जिंजीजवळ इंगजांचा पराभव करून फोर्ट सेंट डेव्हिडचाहि वेढा घातला. वास्तविक यूरोपमध्यें यावेळीं फ्रान्स व इंग्लंड हे मित्र होते. हिंदुस्थानांत त्यांनीं हें युध्द उपस्थित केलें तें निव्वळ राज्यलालसेंनें; परंतु देशी संस्थानिकांनां आम्ही फक्त मदत करतों; आमचें राज्य वाढावें म्हणून नव्हें असें त्यांनीं जाहीर केलें. बहूरच्या लढाईंत लारेन्सनें फ्रेंचांचा पराभव केला. या वेळीं डुप्ले डा मार्किस बनला.

डुप्लेनें हिंदुस्थानांत फ्रेंच साम्राज्य स्थापण्याची कल्पना, त्याला परत देशीं बोलावण्याच्या फक्त आधीं दोनच महिने डायरेक्टरांपुढें मांडली. ती जर पुष्कळ आधी मांडली असती तर डायरेक्टरांनी तिला पाठबळ दिलें असतें. त्यानें इंग्रजांवर शेवटचा विजय १७५४ सालीं मिळविला. सरकारी पैशाचा हिशेब चोख न ठेवल्यामुळें व स्वत: जहागिरी मिळविल्यानें व विनाकारण भानगडी करून उधळपट्टी करून कंपनीचें दिवाळें वाजविल्यामुळें (केवळ त्या आरोपावर) डायरेक्टरांनीं डुप्लेला परत बोलाविलें व पांडचरीस दुसरा गव्हर्नर नेमून पाठविला. त्यानें डुप्लेची पैशाच्या अफरातफरीबद्दल अप्रतिष्ठा न करितां त्याला सांभाळून घेतले. डुप्लेनें १४ आक्टोबर (१७५४) रोजीं हिंदुस्थान सोडलें. तो देशीं गेला त्यावेळीं त्याच्याबद्दल लोकमत निवळत चाललें होतें. त्यानें कंपनीला जेव्हां पैशाची चणचण भासली तेव्हां आपला खाजगी पैका मदतीदाखल बराचसा खर्च केला होता. त्याच्या उगवणीसाठी त्यानें यावेळीं कंपनीवर दावा लावला, परंतु पुढें प्रधानमंडळाच्या मध्यस्थीनें तो काढून घेतला. त्याची बायको स. १७५६ त मेल्यामुळें त्यानें दुसरें लग्न केलें. पुढें विशेष कांहीं न होतां (११ नोव्हेंबर) १७६३ सालीं तो मरण पावला.

जर डुप्लेच्या कल्पनेला फ्रान्सनें सक्रीय पाठिंबा दिला असता, तर हिंदुस्थानांत फ्रेंचांची राजकीय सत्ता बरीच फैलावली असती. फ्रान्समधून इकडे जे कामगार येत, तेहि सामान्यच असत. बुसी मात्र धडाडीचा होता; परंतु त्याला जावई करावें म्हणून डुप्ले त्याला मोठमोठ्या कामगिरीवर धाडीत नसे; ही त्याची चूक झाली. इंग्रजी आरमाराशीं ठक्कर देणारें आरमार त्याच्याजवळ नव्हतें. त्यानें कंपनीच्या व्यापाराकडें अगदीं दुर्लक्ष्य केल्यानें पैशाचें पाठबळ कमी होत चाललें. तो शास्ता चांगला होता, मात्र उत्तम सेनापति नव्हता. 'हिंदुस्थानांत यूरोपियन साम्राज्य स्थापणें शक्य आहे व तेंहि हिंदी लोकांच्याच भाडोत्री सैन्याच्या आधारानें' हें यानेंच प्रथम निदर्शनास आणले. त्याच्या मसलतीच्या नकला, फ्लाईव्हनें उचलल्या. डुप्ले फार महत्त्वाकांक्षी, धाडसी, मुत्सद्दी, मानी, मत्सरी व शिरजोर होता. एका इंग्रज चरित्रकारानें म्हटलें आहे कीं, डुप्ले जर नसता तर क्लाईव्ह प्रसिध्दीस आलाच नसता. [मॅलेसन, जॉन बिडल्फ, हॅमन्ट आणि एम. कुलत्रु यांची डुप्लेचीं चरित्रें.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .