विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
डिवार, सर जेम्स (१८४२-) - ह्याला लंडन रॉयल इन्स्टिट्युटमध्यें रसायनशास्त्राचा मुख्य अध्यापक १८७७ साली नेमला. ह्यानें रसायनशास्त्रांत पुष्कळ संशोधन केलें. हा मुख्यत: अनेक वायू द्रवरूपांत आणल्याबद्दल प्रसिध्द आहे. ह्यानें मुद्दाम बनविलेल्या उपकरणांच्या साहाय्यानें प्राणवायु द्रवरूपांत आणला व तो सांचवून ठेवण्याकरितां भांडें तयार केलें व त्यांत ठेवतां येऊं लागला. कांहीं दिवसांनीं त्यानें उज्जवायु देखील तसाच द्रवरूपांत आणतां येतो हें प्रयोगानें सिध्द केलें व त्याकरितां एक नवीन मोठें यंत्रहि बनविलें. तसेच द्रवरूपांत ह्या निरनिराळ्या वायूंच्या गुणधर्माचें संशोधन करून त्यावर बरीच माहिती मिळविली.