प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

डाळींब - डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून होत आहे. होमरच्या ओडीसी ग्रंथांत याचा उल्लेख आहे. ग्रीक व रोमन लोकांनां डाळिंबाच्या सालीचा वगैरे उपयोग माहीत होता. याच्याहि पूर्वी असीरियन व ईजिप्शियन लोकांच्या कोरीव कामावर डाळिंबाची चित्रें अद्याप दृष्टीस पडतात. फ्रान्समधील बरगंडी प्रांतांत प्लिओसीन काळांतील अश्मीभूत अशीं डाळिंबाचीं फळें सांपडली आहेत असें म्हणतात. डाळिंबाचा उल्लेख शकुनातीत आहे. हें फळ इतकें प्राचीन असल्यामुळें याचें मूलस्थान कोणतें हें खात्रीनें सांगतां येत नाही. तरी तें इराण किंवा अफगाणिस्तानांत असावें अशी सामान्य समजूत आहे. अफगाणिस्तानांत कंदाहार येथें उत्तम डाळिंबें होतात. बलुचिस्तानातील डाळिंबें फार प्रसिध्द आहेत. वायव्येकडील प्रांतांतील पेशावर येथून वर्षास ३७ हजार मणांपेक्षां अधिक डाळिंबें इतर प्रांतांत रवाना होतात; व तीं विशेषत: कलकत्ता व रंगून या बाजूला जातात. अलाहाबाद व लखनौ येथील डाळिंबें फार नामांकित आहेत; काश्मीर, राजपुताना व ब्रह्मदेश या प्रांतांतहि डाळिंबाची थोउीबहुत लागवड आहे. अमेरिकेंत फ्लारिडा, जार्जिआ वगैरे दक्षिणेकडील संस्थानात हल्ली डाळिंबाची लागवड वाढत्या प्रमाणावर होऊं लागली आहे.

मुंबई इलाख्यांत सिंध प्रांतांत हैद्राबाद, खैरपूर, सक्कर, व कराची या सर्व ठिकाणी डाळिंबाची लागवड बरीच होते. गुजराथेत काठेवाड, अहमदाबाद, धोलका, महाराष्ट्रांत पुणें, नगर, सातारा या जिल्ह्यांत डाळिंबाची लागवड बरीच हेते.

डाळिंबाला हवामान फार उष्ण, रखरखीत व कोरडें लागतें. सर्द हवेच्या प्रांतांत किंवा फार पाऊस पडतो त्या ठिकाणी डाळिंबाला फळ चांगलें येत नाहीं. झाडें मात्र चांगलीं होतात. डाळिंबाला जमीन फार हलक्या दर्जाची चालते. ती जमीन शेतकीच्या कामाला मुळींच उपयोगीं पडणार नाहीं ती किंवा तशाच प्रकारची जमीन बहुधां डाळिंबाला घेतात. जमीन भारीपैकीं असली तर फळ वर्षास येत नाहीं. जमिनीमध्यें चुन्याचें प्रमाण बरेंच असावे, निचरा चांगला असावा, मऊ व मुरबाड जमिनींत डाळिंबे चांगली येतात. अशा जमिनीवर माती अगदींच थोडी म्हणजे एक दोन इंच असली किंवा नसली तरी हरकत नाहीं. एकंदरीत डाळिंब हा गरीब शेतकर्‍याचा उत्तम मित्र आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण ज्या जमिनीवर कोणतेंच पीक येणार नाहीं किंवा नुसतें गवतहि चांगलें येणार नाहीं अशा ठिकाणीं डाळिंबाची लागवड करतात. फक्त चार महिने पाणी देण्यापुरती विहिरीची किंवा पाटाची सोय असली म्हणजे झाले. दुष्काळाच्या वर्षी पाऊस पडला नाहीं किंवा विहिरीचें पाणी आटून बहुतेक वर्षभर झाडांनां पाणी मिळालें नाही तरी इतर झाडांप्रमाणें डाळिंबाची झाडें सहसा मरून जात नाहींत, फक्त त्यावर्षी उत्पन्न मात्र कांहींच यत नाही. जमीन फार हलक्या दर्जाची असल्यामुळें नांगरणी फारशी लागत नाही व ती करतांहि येत नाहीं. त्याच प्रमाणे डाळिंबाच्या जमिनी बर्‍याच ठिकाणी डोंगराच्या कडेला असल्यामुळें त्यास पाट नसतात, तरीपण माती धुपून जाईल या भीतीनें मोठमोठ्या ताली घालाव्या लागत नाहींत. वरची माती बेताची असल्यामुळें ती वाहून व जाईल इतक्या बेताच्या लहान लहान ताली घातल्या म्हणजे पुरे.

डाळिंबाच्या तीन जाती आहेत; तांबडी, पांढरी व काळी. तांबडी अगर लाल जात पुणें, नगर, सातारा वगैरे प्रांतांत होते. पांढरी जात अहमदाबाद, धोलका वगैरे ठिकाणीं होते. काळी जात उत्तर हिंदुस्थानांत होते. तांबड्या जातीचा दाणा तयार होण्यापूर्वी पांढरा असतो. महाराष्ट्रांतील लोकांस पांढरी जात फारशी आवडत नाही. काबूल व मस्कत येथील उत्तम डाळिंबें आणून त्यांचीं झाडे इकडें लावलीं परंतु ती इकडील झाडांच्या मानानें फार लहान राहून त्यांनां फळ मुळींच येत नाहीं. आपल्या इकडील गांवठी झाडावर त्यांची कलमें बांधलीं तरी देखील त्यांनां फळें येत नाहींत, व फळें आलींच तर तीं धरत नाहींत.

डाळिंबाची पैदास मुख्यत्वेंकरून बिंयापासून करतात. बीं नेहमींप्रमाणें वाफ्यांत पेरून रोपें पावसाळ्याच्या आरंभीं कायम जागीं लावतात. पन्हेरी (रोपें) तीन ते सहा रुपये शेंकडा या भावानें मिळते. झाडांसाठीं खड्डे शक्य तितके मोठे-तीन फूट हमचौरस असे १५ फुटीवर घ्यावे. खड्डयांत चांगली माती व दोन दोन टोपल्या शेणखत घालावें. म्हणजे जमीन जरी हलकी असली तरी झाडं लवकर जोमांत येतात; व त्यांनां फळहि लवकर येतें. पाणी आठदहा दिवसांनीं असें दोन वर्षेपर्यंत द्यावें. जमिनीत दुसरें कसलेंहि पीक होण्यासारखें असेल तर तें काढून घ्यावें म्हणजे वर खर्च निघून येतो. दरवर्षी पावसाळ्याच्या आरंभी प्रत्येक झाडाला दोन टोपल्या शेणखत द्यावे. झाडें पांच फूट वाढली म्हणजे त्यांचा बहार धरण्याला तीं योग्य झालीं. याचे बहार तीन आहेत. आंबेबहार, मृगबहार व हस्तबहार. यांपैकीं कोणतातरी एक घ्यावा. कोणताहि बहार धरण्यापूर्वी सर्व झाडांनां तीन महिने तरी ताण मिळाला पाहिजे. हस्तबहार धरण्यापूर्वी पाऊस असल्यामुळें झाडाला ताण मिळत नाहीं; यासाठीं कोणी हस्तबहार धरीत नाहींत. डाळिंबाचें झाड काटक असल्यामुळें आपल्या सवडीनुसार विहिरींतील पाण्याचा अंदाज व जमिनीचा मगदूर पाहून कोणता बहार घ्यावयाचा व झाडांनां पाणी केव्हां द्यावयाचें हें ठरवावें. पाणी सर्व उन्हाळाभर भरपूर पुरण्यासारखें असल्यास आंबेबहार धरण्यासाठीं मकरसंक्रसंतीच्या वेळीं पाणी द्यावें, तें न साधेल तर शिवरात्रीच्या अगर रंगपंचमीच्या सुमारास द्यावे, अगर त्यापुढें अक्षय्यतृतीयेला द्यावें. यांपैकीं कोणतेंच पाणी देणें शक्य नसल्यास मृगबहार धरावा. इतक्या निरनिराळ्या वेळीं हें पीक धरतां येण्यासारखें आहे तरी होतां होईतों वर्षास नेमल्या वेळीं हीं कामें करण्याची वहिवाट ठेवावी; म्हणजे झाडांनां नियमित वेळीं फुलण्याची आपोआप संवय लागले. पहिल्यानें बहार धरण्यापूर्वी निदान दोन महिने तरी झाडाचें पाणी तोडलेलें असावें. यानंतर फळें काढून घेतल्यापासून तों पुन्हां फळें धरण्याचा हंगाम येईपर्यंत खणणीं, खुरपणी, पाणी देणें वगैरे बाबतींत बागेकडे लक्ष देण्याचें कारण नाही. या काळांत झाडांची सर्व पानें वाळून त्यांतील बरींचशीं गळून पडतील. पाणी देण्यापूर्वी एक महिना अगोदर सर्व बाग नांगरून किंवा खणून घ्यावा; नंतर अळीं खणून मुळ्या उघड्या कराव्या; जारवा (कोवळ्या मुळ्या) छाटाव्या आणि झाडांवरील सर्व मर व बांगूळ वगैरे असल्यास काढून टाकावें. मुळ्या दहा ते पंधरादिवस उघड्या ठेवून बाग वाळूं द्यावा; म्हणजे आणखी पानें गळून पडतील. दरम्यान दर झाडास ४ ते ६ टोपल्या चांगलें कुजलेलें गावखत सर्व आळ्यांत पसरून टाकावें व अळीं व पाट बांधून पाणी द्यावें. एखाद्या वर्षी अजमासापेक्षां पाणी कमी पडल्यास झाडाच्या बुंध्यापासून दोन फुटांवर एक फूट रुंदीचें बांगडीसारखें अळें करावें व त्यांत पाणी सोडावें. त्याच्या योगानें पाण्याची पुष्कळ बचत होते. पहिलें पाणी दिल्यावर एक महिन्यानें सर्व झाडें फुलतात. त्यावेळीं पाणी वेळेवर देण्यास चुकूं नये. तसेंच फळें तीन महिन्यांचीं झालीं म्हणजे राखण ठेवावी व मधून मधून बागेला थोडी चाळणी द्यावी म्हणजे फळें मोठीं होतील. झाडांचीं निगा चांगली राखल्यास झाडें तीस वर्षेपर्यंत टिकण्यास हरकत नाहीं. कांहीं ठिकाणीं पाऊणशें वर्षांचे बाग दृष्टीस पडतात. डाळिंबाच्या झाडाला खालपासूनच पुष्कळ फांद्या फुटतात व त्यांमुळें सर्व बाग दाट होऊन त्यामध्यें काम करण्यास फार अडचण पडते व उत्पन्न यावें तसें येत नाहीं. यासाठी सर्व झाडें जमिनीबरोबर तोडून टाकतात म्हणजे तीं सर्व पुन्हा बुंध्यापासून फुटून जुन्या खोडांपासूनच नवीन झाडें लवकर तयार होतात. अशा रीतीनें पुन्हां फुटलेलीं झाडें व मूळची बियांपासून आलेलीं झाडें यांमध्यें कांहीच फरक दिसत नाही.

रोग.- डाळिंबाच्या झाडाला व फळाला अनेक रोग होतात. परंतु डाळिंबाचें पीकं थोड्या खर्चांत बरेंच मिळत असल्यामळें शेतकर्‍याचें रोगाकडे फारसें लक्ष लागत नाहीं. डाळिंबाचें रोग एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास फारसे अडथळें येत नसल्यामुळें रोग हटविणें हें एकट्याच्या हांतून होण्यासारखें काम नसून तें सर्व बागवाल्यांनीं मनापासून, दक्षतेनें व सहकारितेंनें वेळच्यावेळी केल्यास रोग हटण्याचा संभव आहे. डाळिंबाचे मुख्य रोग पुढें दिले आहेत.

सुरसा:- फुलें येण्याच्या सुमारास फुलावर पाकळ्या असतात तेथें पाकोळीं एक एक अंडें घालते. तें अंडें फुटून आळी बाहेर आल्यावर ती फळ पोंखरून आंत जाते. ती आंतील बी खाऊन टाकते. आळी काळसर असून तिच्या अंगावर बारीक बारीक केंस असतात. या अळीलाच सुरसा म्हणतात. आळीची पूर्ण वाढ झाल्याबरोबर ती बाहेर येते, आणि फळ व देंठ ही धाग्यांनीं पक्कीं बांधून टाकते. त्यामुळें फळ गळून पडत नाहीं. नंतर ती पुन्हां फळांत जाऊन कोश करते. कांहीं दिवसांनीं कोशांतून पाकोळी बाहेर पडते. एकदां ही अळी फळांत शिरली कीं तें फळ फुकट जातें. यावर उपाय:- भोंकें पडलेलीं व सुरसा लागलेलीं सर्व फळें रोजच्यारोज काढून जाळून टाकावी. म्हणजे पुढच्या वर्षी तरी रोग जास्त फैलावणार नाहीं. दुसरा उपाय म्हणजे फूल फुलल्याबरोबर प्रत्येक फुलावर कापडाची पिशवी बांधावी म्हणजे फळावर पाकोळीं बसून अंडें घालणार नाहीं. हें काम फार दगदगीचें आहे.

चिकटा.- पानांच्या पाठीमागें लहान लहान काळे कीटक असतात; ह्यांनां पावसाळ्याच्या आरंभी पंख फुटून ते सर्व बाहेर उडूं लागतात: व पुन्हां नवीन पानांवर अंडी घालून त्यांच्यापासून आणखी रोग उत्पन्न होतो. यास उपाय- फिश ऑईल, रेझीन (राळ मिश्रीत माशाच्या तेलाचा साबण) हा एक भाग घेऊन त्यांत शंभरपट पाणी घालून तें मिश्रण झाडावर मारावें.

याशिवाय झाडाच्या खोडाला भेरूडसारखा किडा असतो तो झाडाचें खोड पोंखरून आंत जातो व त्यामुळें झाड लवकर जायबंदी होतें. उपाय-सळईनें किडा मारून टाकावा अगर त्यामध्यें टरपेन्टाईन तेल घालावें म्हणजे किडा मरतो.

वरील रोग्यांशिवाय डाळिंबाच्या झाडास आणखी एक वनस्पतिजन्य रोग होतो; त्याच्यायोगानें पुष्कळ फळें कुजून फुकट जातात. पहिल्यानें फळाची वरची साल काळी पडते; व हळूहळू आंतील भाग कुजत जातो. हा रोग नर (फकडी) फुलांनां व मादी फुलांनां दोहोंनांहि होतो. रोग झाल्यावर फुलें गळून पडतात. रोगट फळ कोंवळें असल्यास तें कुजून खालीं पडतें किंवा सुकून जाऊन तसेंच झाडांवर पुष्कळ दिवस रहातें. हा रोग सर्व ऋतूंत दृष्टीस पडतो परंतु पावसाळ्यांत तो विशेष दृष्टीस पडतो. यास उपाय- सर्व रोगट फळें गोळा करून तीं जाळून टाकावीं. फळें लहान असतांनाच सर्व फळांवर बोर्डो मिश्रण शिंपडावें.

उपयोग.- डाळिंबाचा उपयोग सर्वांस माहीतच आहे. डाळिंबाच्या रसाचा औषधासाठीं लेह करतात. फळाच्या सालीचा उपयोग बाळंतकडूंत व काढयांत घालण्यासाठी करतात. मुळांची व खोडाची साल कातडी कमावण्यासाठी उपयोगी पडते. याची निर्गत वायव्यप्रांतांतून फार होते.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .