प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ठाणें, जिल्हा.- मुंबई इलाख्याच्या उत्तरविभागांतील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ ३५७३ चौरस. मैल. उत्तरेस दमण (पोर्तुगीज) व सुरत जिल्हा; पूर्वेस पश्चिम घांट; दक्षिणेस कुलाबा जिल्हा; आणि पश्चिमेस आरबी समुद्र आहे. हा जिल्हा सखल असून त्यांत पूर्वेस व ईशान्येस १०० ते २५०० फू. उंचीचे पुष्कळ डोंगर आहेत. किनार्‍याजवळील वैतरणीच्या कांठची जमीन सखल व सुपिक आहे. डहाणूकडे कोंकणपेक्षां गुजराथी छाया जास्त दिसते. तेथें भाषाहि मराठी ऐवजीं गुजराथी चालते. बहुतेक गांवें दाट वस्तींची आहेत. ईशान्येकडील अरण्याच्छादित दर्‍यामधून थोडथोडी लागवड होते. बहुधां सर्व भागांत पाणी मुबलक असून झाडी पुष्कळ आहे. पाण्याच्या मुबलकपणानें भाताचें पीक मुख्यत: काढतात. या जिल्ह्यात मिठागरेहि पुष्कळ आहेत. वैतरणी ही मुख्य नदी नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबक डोंगरांत (गोदावरीजवळ) उगम पावते. त्यामुळें तिला फार पवित्र मानतात. दख्खनचा उत्तर भाग व समुद्र यांच्या दरम्यान होणार्‍या व्यापाराचा सर्वांत जुना मार्ग तिच्या खोर्‍यातून होता. त्या खोर्‍याच्या रमणीयपणामुळें प्राचीनकाळीं आर्य लोकांनी तिच्या कांठीं वसाहत केली होती. महाभारतांत या नदीचा उल्लेख आलेला आहे. आगाशीपासून मनोरपर्यंत या नदीतून लहान नावा चालतात. उल्हास नदी बोरघांटाच्या उत्तरेकडील खिंडीत उगम पावून वायव्य दिशेनें ४० कोसांपर्यंत वहात गेल्यावर वसईच्या खाडीला मिळते. वसईच्या खाडीखेरीज इतर खाड्या समुद्रापासून १० मैलांच्या आंतच उथळ होतात.

या जिल्ह्यांतील विहार, तुळशी व तान्सा या कृत्रिम तलावांच्या योगानें मुंबईला पाण्याचा पुरवठा होतो. विहार तलाव मुंबईपासून १४ मैलांवर कुर्ले व ठाणें यांच्यामध्यें असून त्याचें क्षे. फ. सुमारें १४०० एकर आहे. यांच्या जवळच तुळशी तलाव आहे. मुंबई शहराच्या ज्या उंच भागांत विहाराचें पाणी चढत नाहीं त्या भागाला या तलावाचें पाणी दिलेलें आहे. ठाण्याच्या वायव्येस दोन मैलांवर असलेल्या पोकर्ण तलावाचें पाणी ठाणें गांवाला मिळतें.

थळ घांटापासून दक्षिणेकडे गेलेला सह्याद्रि या जिल्ह्याची पूर्वेकडील एक नैसर्गिकच मर्यादा बनला आहे. इतर डोंगरांपैकीं साष्टीमधून दक्षिणोत्तर जाणारी रांग, आणि वैतरणी व वसईची खाडी यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर जाणारी रांग, या रांगा महत्त्वाच्या आहेत. याशिवाय दुसरे कित्येक तुटक डोंगर असून त्यांवर प्राचीन काळीं मजबूत किल्ले होते. त्यांपैकीं मादुली, कामणदुर्ग व मलंगगड हे पहाण्यासारखे आहेत.

या जिल्ह्यांच्या किनार्‍याला पुष्कळ बेटें आहेत. त्यांमध्यें साष्टी हें सर्वांत मोठें आहे. वसई बेटाचा उल्लेख इतिहासांत आलेला असून अद्यापिहि तें बेट व मुख्य जमीन यांच्या मधून वसईची खाडी वहातें. वसई तालुक्यांत अर्नाळा बेटावर अर्नाळा नांवाचाच किल्ला आहे. त्यांत मुसुलमानी अवशेष, दारावर संस्कृत व मराठी शिलालेख, आणि आंत जुनें हिंदू देऊळ आहे (अर्नाळा पहा).

या जिल्ह्यांत प्रमुख उन्हाळीं माहीम, वाडें, भिवंडी आणि वसई येथें आहेत; परंतु माहीमखेरीज बाकीचे झरे तान्सा नदीच्या पात्रांत किंवा पात्राजवळ आहेत. किनार्‍याजवळ ताडीची झाडें पुष्कळ होतात. त्यांच्या पासून ताडी काढून विकतात. या धंद्यावर सरकारी नियंत्रण आहे. फळझाडांत कलमी आंबे फार उत्तम होतात. वसई तालुक्यांत आगाशी, वसई वगैरे ठिकाणीं सुमारें १० प्रकारचीं सुकेळीं होतात.

चवदाव्या शतकाच्या आरंभी या जिल्ह्यांत कित्येक 'काळे सिंह' होते असें फ्रायर ओडेरिक लिहितो. हल्ली जंगलांत वाघ, चित्ते, तरस, कोल्हे व सायाळ हे प्राणी सामान्यपणें आणि गवा व चितल हे कधी कधी आढळतात. विषारी व निर्विष साप फार आहेत.

सहा महिने हवेंत आर्द्रता अतिशय असल्यानें येथील हवा सामान्यत: रोगट (मलेरियाची) असते. समुद्रावरील वारे नेहमी येत असल्यामुळें निरनिराळ्या ऋतूंत उष्णमानामध्यें फारसा फरक होत नाहीं. उष्णमान जानेवारींत ५८० व एप्रिलमध्यें १०३० होतें. हिंवाळा फार थोडा व सौम्य असतो. किनार्‍याला सरासरी वार्षिक पाऊस ६२ ते ६९ इंच होतो. सर्वांत जास्त पाऊस (१११ इंच) शहापुर जिल्ह्यांत आणि सर्वांत कमी (६२ इंच) उंबरगांव पेट्यांत पडतो.

इतिहास:- येथें ख्रि. पू. तिसर्‍या शतकांतील एक अशोकाचा बौध्द स्तूप आढळला. त्यावरून त्याचें राज्य या भागावर सोपार येथें असल्याचें सिध्द होतें. अशोकानंतर आंध्रभृत्य, त्यांच्यामागून शहा किंवा पश्चिम क्षत्रप, व पुढें कल्याणचें चालुक्य (यांनी प्राचीन घराण्याचा उच्छेद केला) हे येथें राज्यकर्ते झाले. इ. स. ८१० ते १२६० पर्यंत हा भाग शिलाहारांकडे असून त्यांची राजधानी पुरी (ठाणें) येथें होती. त्यांच्या अमदानींत मुसुलमानांनीं स्वारी केली, परंतु १५०० च्या सुमारास गुजराथच्या नबाबाची सत्ता येथें कायमची स्थापन होण्यापूर्वी येथें मुसुलमानांचें वर्चस्व नांवाला मात्र होतें. १५३३ सालीं पोर्तुगीज लोकांनीं गुजराथच्या नबाबापासून वसई घेऊन तेथें किल्ला बांधला; पुढें तें हळू हळू किनार्‍यावरील मुलुख आपल्या ताब्यांत घेऊ लागल्यामुळें त्यांचें अहमदनगरच्या राजांशीं व जव्हारच्या कोळी राजाशीं वैमनस्य पडलें. स. १६६६ त शिवाजीनें या जिल्ह्याचा आग्नेय भाग काबीज करून साष्टी बेटांतील पोर्तुगीज लोकांवर हल्ला केला आणि कल्याणपर्यंत सर्व मुलुखांत आपली सत्ता अनिर्बंध रीतीनें प्रस्थापित केली (१६७५). पुढें कांहीं दिवसांनीं मोंगलांनीं आपला गेलेला मुलुख परत मिळवून पोर्तुगीजांवर हल्ला केला. जंजिर्‍याच्या शिद्दयाच्या व मराठ्यांच्या जलयुध्दामुळें या प्रांताच्या सुरक्षितपणाला धक्का बसत असे. अरब चांच्यांनी पोर्तुगीजांचा मुलुख उद्ध्वस्त केला व अवरंगझेबाच्या मृत्यूनंतर आंग्रयानें बोरघांटापासून भिवंडीपर्यंत सर्व मुलुख आपल्या ताब्यांत आणिला. पुढें १७३९ पर्यंत पेशव्यांनीं ठाणें व वसई या बंदरासुद्धा पोर्तुगीजांचा सर्व मुलुख जिंकून घेतला; पेशव्यांच्या गृहकलहांत राघोबा वसई व साष्टी व त्याच्या भोंवतालचा मुलुख इंग्रजांस देऊन इंग्रजांशीं तह केला; परंतु पुढें सालबाईच्या तहान्वये तो मुलुख इंग्रजांनीं पेशव्यांनां परत दिला. शेवटीं रावबाजीनें (१८१७) इंग्रजांच्या मदतीबद्दल त्यांनां ठाणें जिल्ह्याचा उत्तरभाग दिला.

प्राचीन अवशेष:- या जिल्ह्यांत मुख्यत: हिंदूंचे प्राचीन अवशेष बरेच आहेत. पोर्तुगीज लोकांचे महत्त्वाचें अवशेष म्हणजे वसई, मंडपेश्वर, घोडबंदर व इतर ठिकाणचे त्यांचे किल्ले आणि प्रार्थनामंदिरें हे होत; भिवंडी व कल्याण येथील मशिदी, थडगी, आणि टाकीं हे मुख्य मुसुलमानी अवशेष होत. कान्हेरी, कोंदिवटी व भिवंडी येथें बौध्दांची कोरीव लेणीं आहेत; त्यांपैकीं कान्हेरी येथील व डहाणु तालुक्यांतील इंद्रगड व जीवधन येथील आणि साष्टी तालुक्यांतील जोगेश्वरी व मंडपेश्वर येथील लेणी पाहण्यासारखी आहेत. कल्याण तालुक्यांत अंबरनाथ, भिवंडी तालुक्यांत लोणाद व शहापुर तालुक्यांत अटगांव व वशली येथील जुनीं कोंरीव देवालयें प्रेक्षणीय आहेत.

लोकसंख्या.- ठाणें जिल्ह्यांत ७ मोठी गावें असून १६९७ खेडीं आहेत. त्यांत १०३ इनामी आहेत. एकंदर लो. सं. (१९२१) ७५९९१६. पैकीं शेंकडा ९० हिंदु व शेंकडा ५ मुसुलमान आहेत. शेंकडा ८८ लोक मराठी भाषा बोलतात. वारली, ठाकुर, कातकरी, काथोडी, आगरी आणि कोळी वगैरे मूळच्या (अनार्य) लोकांचा भरणा ठाणें जिल्ह्यांत बराच आहे. पहिल्या चार जाती जंगली असून आगरी लोक शेतकरी व मीठ तयार करणारे आहेत, आणि कोळी लोक मासे मारण्याचा व खलाशांचा धंदा करतात. हे लोक मद्यपी फार आहेत. हंगामाच्या वेळीं या जिल्ह्यांत घांटावरून पुष्कळ कुणबी येतात. भंडारी जातीचे लोक माडी काढण्याचा धंदा करितात. लोकसंख्येपैकीं शेंकडा फक्त चारच उद्योगधंद्यावर आपलें पोट भरतात.

शेती:- गोडी व खारी असे जमिनीचे दोन प्रकार असून गोडी जमीन काळी किंवा तांबडी असते. काळ्या जमिनीला शेतजमीन व तांबडीला माळवर्कस असें म्हणतात. ज्या जमिनीला बांध घातलेले असतात किंवा जी सखल असल्यामुळें बांधाखेरीज जींत पाणी राहूं शकते अशा भाताच्या जमिनीला बांधणी असें नांव आहे; व भाताच्या इतर खुल्या जमिनीला माळखंडी असें म्हणतात. भात हें मुख्य पीक असून त्याच्या खालोखाल नागली व बरी हीं पिकें होतात. किनार्‍याकांठीं असलेल्या बांगांतून आंबे व केळी होतात. मासे मारण्याचा धंदा बराच महत्त्वाचा असून कायद्याचा आहे. जंगलांतून इमारती लांकूड, जळावू लांकूड, कोळसा, बांबू वगैरे माल निघतो.

शेतीच्या खालोखाल समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणें हा या जिल्ह्यांतील महत्त्वाचा धंदा आहे. पितळेची व मातीचीं भांडीं कांहीं ठिंकाणीं होतात. ठाणें व भिवंडी येथें रेशमी व सुती कापड निघतें. कुर्ला येथें सूत कातण्या, कापड विणण्याच्या व हाडांचें खत तयार करण्याच्या गिरण्या आहेत.

ह्या जिल्ह्यांतून तांदूळ, मीठ, लांकूड, चुना व खारेमासे हे जिन्नस बाहेर जातात आणि कापड, धान्य, तंबाखू, नारळ, साखर व गूळ हे जिन्नस बाहेरून आणावे लागतात. समुद्रकिनार्‍यानें व खाड्यांतून जहाजें व पडाव यांच्या योगानें दळणवळण होतें. या जिल्ह्यांतून बी. बी. आणि सी. आय्. व जी. आय्. पी. या रेल्वे आणि थळघांटावरून नाशिककडे जाणारा आग्रा रोड आणि बोरघाटांतून जाणारा पुणें रस्ता या दोन मुख्य सडका आहेत. कोंकणच्या इतर भागांप्रमाणें ठाणें जिल्ह्यांतहि सहसा अवर्षण पडत नाहीं.

ह्या जिल्ह्यांत नऊ तालुके व दोन पेठे आहेत. ते- वसई, भिवंडी, डहाणू, कल्याण, माहीम, मुरबाड, साष्टी, शाहापूर, वाडे, आणि उंबरगांव व मोखाडें पेटे. ह्या जिल्ह्यांतच जव्हार संस्थान आहे. या जिल्ह्यांत थळ, शीर, अवंधा, पिंपरी, मालशेज व नाणें हे घाट आहेत. उंबरगांव, दांतिवरे, वसई, कल्याण, तुर्भे, ठाणें, डहाणू, चिंचणीतारापूर, केळवें, भिवंडी, या ठिकाणी खाड्या असून हीं गांवें बंदरहि आहेत. निर्मळ, महालक्ष्मी, वर्जेश्वरी, कवाड, अंबरनाव शहापूर हीं यात्रेची ठिकाणें आहेत. चिंचणीस बांगड्या; भिवंडी, सोपारें येथें लुगडी; वसईस गूळ, केळी; व भिवंडी, पडघें येथें गाड्या तयार होतात.

साष्टी तालुक्यांत खोती पध्दतीची शेती बरीच आहे. खोताकडे कांहीं गांवें पट्टयानें लागलेलीं आहेत. दुसरी इसाफत व तिसरी शिलोत्री म्हणून सारापध्दत आहे. मुसुलमानी अंमलापूर्वी हिंदूराजवटीपासून शिलोत्री ही पध्दत चालूं आहे. ह्या पद्धतीचीं दुसरीं नांवें ठेंप, हुन्डाबंधी, मुडाबंधी, कासबंधी, तकबंधी व तोकाबंधी हीं आहेत. तालुक्यांच्या गावी म्युनिसिपालीट्या असून शिवाय डिस्ट्रिक्टबोर्ड व तालुकाबोर्डे आहेत. नवापाड येथें वेड्यांचें इस्पितळ आहे.

शहर.- हें गांव या जिल्ह्याचें व साष्टी तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. हें शहर खाडीच्या कांठीं असून बंदर व रेल्वेस्टेशन आहे. लोकसंख्या (१९११) १५५९१ हें पूर्वी एका स्वतंत्र (यादव) हिंदुराज्याच्या राजधानीचें ठिकाण होतें. पुढें मुबारक खिलजीनें हें गांव जिंकून त्या ठिकाणीं एक मुसुलमान गव्हर्नर नेमिला (१३१८). त्यानंतर हें पोर्तुगीज लोकांनां मिळालें (१५३३). त्यांच्यापासून मराठ्यांनी काबीज करून घेतलें व शेवटीं इंग्रजांच्या हातीं आलें. येथें फिरंगी लोकांनीं बांधिलेला जुना किल्ला आहे. त्याचा सध्यां तुरुंगासारखा उपयोग करितात. येथें उत्तम सुती कापड निघतें. येथें म्युनिसिपालिटी आहे. गांवांत तीन दवाखाने आहेत. एक हायस्कुल, एक पारशी मुलांकरितां व एक मुलींकरितां शाळा आहे. [संदर्भग्रंथ-हीरेन-हिस्टारिकल रिसर्चेस; ग्रॅंटडफ; ग्रीस-व्हॉयेज; महिकावतीची बखर; ठाणें ग्याझेटियर, नेर्न-कोंकण.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .