प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ट्रिपोली.प्रांत.- हा उत्तर आफ्रिकेंतील प्रांत १९११-१२ पर्यंत तुर्कस्तानांत होता. नंतर तो इटालीनें घेतला. त्याच्या उत्तरेस भूमध्यसमुद्र असून सुमारें ११८० मैलांचा याचा किनारा आहे. यांत कमींत कमीं पांच जिल्हे येतात:-खुद्द ट्रिपोली, बार्का डोंगरपठार व घाट या ओलाव्याच्या जागा. हा प्रांत ट्युनीशिआ व ईजिप्तच्यामध्यें असून याचें क्षेत्रफळ सुमारें ४ लक्ष चौ. मैल व लोकसंख्या (१९११) ५,२३,१७६ तद्देशीय आणि ५।६ हजार यूरोपीय अशी आहे. दक्षिणेस व पूर्वेस याची सरहद्द ठरली नाही. पश्चिमेकडील सरहद्द १८९२ सालीं फ्रेंचसरकारच्या संमतीनें ठरली. त्याच्या दक्षिणेकडील प्रदेशासंबंधी तुर्कस्तान व फ्रान्स यांत लढा आहे.

राजधानीच्या दक्षिणेच्या बाजूस जेबेल नांवाच्या डोंगराच्या रांगेचें टकूट(टेकूक) नांवाचें ज्वालमुखीचें शिखर (२४०० फूट) आहे. खास ट्रिपोली व फेझन खोलवटा यांमध्यें ४०००० मैल क्षेत्रफळाचें हमदा-इल-होमरा नांवाचें डोंगरपठार आहे. या निर्जन 'तांबड्या हमदां' तून पूर्वी नद्या वहात होत्या. या पठाराच्या दक्षिणेस पर्वताच्या ओळी असून त्यांत जेबेलएस-सुदा ही विशेष प्रसिध्द आहे व तीची साधारण उंची २८०० फूट आहे. ओसाड घॅडेम्स जिल्ह्याच्या पलीकडे पुष्कळसें हिरवें गवत असलेले भाग, खजुराचीं झाडें व कांहीं पाण्याची तळीं आहेत.

नेडीकघांटाच्या ईशान्येस ओलवणांच्या रांगा असून त्यांनां ऑजिला खांचा म्हणतात. हीं ओलवणें नागमोडी खोर्‍याप्रमाणें दिसतात. बार्कापठार हें ह्या प्रांतांतील प्रेक्षणीय असून भूमध्यसमुद्राच्या बाजूस तें तटबंदीप्रमाणे आहे. हवा, पाणी, भाजीपाला यामुळें येथें बर्‍याच ग्रीक वसाहती झाल्या व त्यांत सायरिनी (खि. पू. ६३०) ही फार प्रसिध्द होती. या वसातींवरून त्या सर्व प्रांताला सिरीनेका नांव मिळालें. सायरिनी, अपोलोनिया, एंरसिनोई. बेरेनाईस व बाकी या पांच मुख्य शहरांमुळें याला पेन्टापोलीस असें म्हणत. सिरीनेका पठाराची उंची २००० फूट असून जेबेल अखदारला त्याची ३५०० फूट उंची आहे. अगदीं पूर्वेस सोलमच्या आखाताचें टोंक आहे. ऑजिलाच्या दक्षिणेस कुफ्रा ओलवणें आहेत. यांची संख्या पांच असून क्षेत्रफळ ७००० चौ. मै. व ७ हजार भटकणारे अरब-बर्बर लोक आहेत. हें ठिकाण सेकसाईटपंथाचें केन्द्र आहे. जोफ येथील या पंथाच्या मठाचें महत्त्व जेंराबुव (सिरीनेकांतील) येथील मठाबरोबर समजतात; सुपिकता आणि सिरीनेका व वडाई यांमधील रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण यांनीं ह्या प्रांताचा दर्जा वाढला आहे; पूर्वी सेनुसी पंथाचा येथें ताबा होता. परंतु स. १९१० पासून तुर्की सैन्यानें याचा ताबा घेतला. घाट समुद्रापासून २४०० फूट उंचीवर असून त्याचा सहाराच्या वाळवंटांत समावेश होतो. याच्या मध्यभागीं मोठें मैदान असून दरवर्षी जत्रा भरते. या ओलवणांत १०००० लोकसंख्या असून बहुतेक इहाजेनीस ट्वारेग लोक आहेत. निम्मी संख्या घाट शहरांतच आहे. रॅप्सा हें रोमन साम्राज्यांत व्यापाराचें व लष्करी शहर होतें. घॅडेम्स हें गारामांटीस लोकांचें सिडामस असून कार्नेलियस बॅलबस मायनरनें तें घेतल्यानें त्यांचें साम्राज्य लयास गेलें. शहर नैर्ऋत्येस असून त्यांत ७००० लोक आहेत. यांत अंजीर, खजूर, बदाम व भाज्या विपूल होतात. पुष्कळशा व्यापारी रस्त्यावर हें असून ट्रिपोली, ट्युनिशिआ व सुदान यांच्याशीं याचा संबंध येतो.

हवामान:- ट्रिपोलीचें हवामान नेहमीं बदलत असतें. दिवसा उष्मा होतो व रात्रीं थंडी पडते. उत्तरेकडे ५ पासून १५ इंचापर्यंत दरवर्षी पाऊस पडतो. किनार्‍यावरील उष्णमान ६८० असतें.

वनस्पति व प्राणी:- खजूराची झाडें सर्वत्र आढळतात. ओक, पाईन, ऑलिव्ह वगैरे वृक्ष असून बदाम, अंजीर, डाळींब, जरदाळू वगैरे फळझाडें येथें आहेत. कांहीं जिल्ह्यांत द्राक्षें होतात. जनावरांत रानडुकर, तरस व कोल्हे हीं सांपडतात. उंट हा येथील मुख्य प्राणी आहे. शहामृग, गिधाडें वगैरे पक्षी असून निर्गतींत मध हा मुख्य पदार्थ आहे.

लोक:- १९व्या शतकाच्या शेवटच्या ५० वर्षांत येथें खूणन जे शोध झाले त्यांवरून असें दिसतें कीं, येथें आदिमानव यांची वस्ती होती एवढेंच नाहीं तर आयबेरिया, ब्रिटनी, व ब्रिटिश बेटें याप्रमाणें येथें प्रास्तर संस्कृति होती. त्याचप्रमाणें अखंड दगडाचे स्तंभ, ओबडधोबड दगडी स्तंभ, कबरी, वगैरे अवशेष येथें दृष्टीस पडतात. जेबेलम्सिद व इतर जिल्ह्यांत 'सेनाम' अथवा तीन दगडांचे स्तंभ बरेच आहेत. हे स्तंभ बांधणार्‍या लोकांचे बर्बर लोक वंशज असावे असें म्हणण्यास बराच आधार आहे. ह्याच लोकांचीं ट्रिपोलींत वस्ती असून यांनां अरबांच्या भटक्या टोळीनें हुसकावून दिलें होतें. यामुळें अरबांचा भरणा राजधानीच्या भोंवतालच्या भागांत, सिरीनेका, मार्मरिका, व ऑजिला ओलवण यांत फार आहे. फेझन भागांत साहारांतील बर्बरांची संख्या जास्त आहे. त्यांच्यांत निग्रो लोकांचें मिश्रण आढळतें. वरच्या भागांतील बरेच बर्बर अरब बनले आहेत. या लोकांखेरीज यहुदी लोक येथें असून ते टॉलेमांच्या वेळीं ईजिप्तमधून आले. हे धुरीयाच्या उतरणींत अलेल्या चुनखडीच्या गुहांत राहतात. मोठ्या शहरांत यांचा भरणा असून तेथें तुर्क, माल्टीज, इटालियन, क्रीटन, व दक्षिण यूरोपांतील व्यापारी व कारागीर राहतात. ख्रि. पू. ७ व्या शतकांत सिरीनिकांत वसाहत करणारे ग्रीक अथवा त्यांच्यापूर्वी आलेले फिनिशियन, ज्यांनीं ईआ सॅब्राटा, लेप्सीमॅग्ना हीं मोठीं शहरें वसविलीं त्यांचा कांहीं मागमूस देखील लागत नाही. ईआ दोन्ही शहरांच्यामध्यें असून तें प्रांताचें मुख्य ठिकाण झाल्यावर त्याला ट्रिपोली (तीन शहरें) असें नांव मिळालें. रोमन काळापासून हेंच नांव कायम असून सीरिआंतील ट्रि्रपोलीपासून हें ओळखण्यासाठीं याला वेस्ट (पश्चिम) ट्रिपोली म्हणतात, यावरून या प्रांताचें मुख्य शहर ट्रिपोली हें जगांतील एक प्राचीन शहर असून ऐतिहासिकदृष्टया प्रसिध्द अशा व्यापारी मार्गांतवर हें वसलें आहे. बेंगझी (प्राचीन बेरेनिस) हें बार्कांतील मुख्य शहर आहे. किल्ला पडल्यामुळें याचें बंदर अगदीं बुजून गेलें आहे. याच्या पूर्वेस मर्ज (प्राचीन बार्का) व डेर्नाबंदर आहे. मार्सासुसा (प्राचीन अ‍ॅपोलोनिया) हें जवळच्या प्राचीन सयरिनी (ऐनशाहतग्रेन) शहराचें व्यापारी ठिकाण होतें १८९७ ते १९०३ पर्यंत या जिल्ह्यांत तुर्की सरकारनें बरीच चळवळ दाखविली व क्रीटबेटांतील असंतुष्ट मुसुलमानांनां येथें आणलें.

शेतकी व व्यापार:- ट्रिपोलो हा निव्वळ शेतकीचा व व्यापाराचा देश असून यांत उद्योगधंदे नाहींत व मिठाखेरीज दुसरे खनिज पदार्थ देखील नाहींत. अवर्षण, निकस जमीन व कर यांमुळें १० व्या शतकाच्या अखेरीस येथील शेतकीची फार वाईट अवस्था होती. यामुळें गव्हाच्याऐवजीं जंवाची पेरणी होऊन एक तर्‍हेच्या गवताची निर्गत होते. गहूं, जंव, गवत, आलिव्ह, केशर, अंजीर, खजूर वगैरे पदार्थ होतात. नारिंग, लिंबू वगैरे फळें व भाजीपाला योथें विपुल होतो. स्पंजाचा व्यापार ग्रीक लोकांच्या हातातं आहे.

पूर्वी येथें निग्रो गुलामांचा व्यपार चालत असे. सांप्रत गवत, जंव, अंडी, गुरेंढोरें, स्पंज, चटया, आणि मध्यआफ्रिकेंतून हस्तिदंत, शहामृगाचीं पिसें, कमावलेलीं कातडी (बकर्‍याचीं) व सोने सांपडणारी माती या पदार्थांचा व्यापार चालतो. बेंगझी प्रांतांतून ईजिप्त, माल्टा व क्रीट यांत लाखों मेंढया पाठवितात. बेंगझीचा व्यापार खेरीज १९ व्या शतकांत येथील आयात व निर्गत व्यापार सरासरी दरवर्षी ७७,००० पौं. होता. येथें खाद्यपदार्थ, कापड, तंबाखू, धातू, व लोखंडाचें सामान यांची आयात होते. बेंगझी व डेनी य बंदरांतून दरवर्षी २१४००० पौं. चा माल आयात व ४५५७०० पौंडाचा माल निर्गत होतो.

जंव हें येथील मुख्य धान्य आहे. भटक्या अरबांजवळ उंट, गुरेंढोरें, व मेंढया असतात. हे जाडीभरडीं लोकरीचीं वस्त्रे, चटया, वगैरे तयार करतात. येथील व सूदनमधील लोकांत चहाची संवय बरीच वाढली आहे

दळणवळणाचीं साधनें:- देशांत बहुतेक उंटाच्या तांड्यानें व्यापार चालतो. समुद्रमार्गानें चालणारा बहुतेक व्यापार इटालियन लोकांच्या ताब्यांत आहे व इटालियन जहाजें डेनी व बेंगझी येथें थांबतात. डेनी व र्‍होडसमध्यें बिनतारी विद्युतयंत्र आहे. १९२० त येथें १५७ मैल रेल्वे होती.

राज्यपध्दति:- येथील वली अथवा गव्हर्नर जनरलची नेमणूक तुर्की सुलतानाकडून होत असे व त्याच्या हातांत दिवाणी व लष्करी अधिकार असत. स्थानिक स्वातंत्र्याखेरीज इतर बाबतींत येथील राज्यपध्दति इतर तुर्की प्रातांप्रमाणें होती. बेंगझी अथवा बार्की प्रांताचा कारभार स्वतंत्र असून तें सरकार फक्त कॉन्स्टांटिनोपलला जबाबदार असे. जकात, व्हर्गो नांवाची डोईपट्टी वगैरेंपासून मुख्य उत्पन्न असे. येथें १०००० तुर्की फौज ठेविली असल्यानें उत्पन्नांपेक्षां खर्च नेहमीं जास्त असे. १९००-०५ या वर्षांत दरवर्षी सुमारें १५०००० पौंड उत्पन्न असून १७०००० खर्च होता. पैकीं १००००० पौंड लष्करासाठींच खर्च असावा.

इतिहास:- सिरीनेका व ट्रिपोली यांचा प्राचीन इतिहास साधारण सारखा पण वेगळा आहे. सिरीनेकांत प्रथम ग्रीकांनी वसाहत केली, नंतर तो प्रांत टॉलेमीच्या ताब्यांत गेला. शेवटीं रोमन लोकांनीं हा प्रांत काबीज केला. ट्रिपोलींत प्रथम फिनिशियन लोकांची वसाहत होती. यानंतर यावर कार्थेजचा अंमल बसला व त्याच्याप्रमाणें याची स्थिति होत गेली. रोमन लोकांपासून यास ट्रिपोली हें नांव प्राप्त झालें. ५ व्या शतकांत ट्रिपोली व सिरीनेका हे प्रांत व्हँडाल लोकांनीं जिंकले. यांची सत्ता पुढील शतकांत बेली सॅरियस नांवाच्या बायझन्टाईन सेनापतीनें मोडली. ७ व्या शतकांत अरबांनीं हा देश उद्ध्वस्त करून येथें इस्लामी संप्रदायाची स्थापना केली. यावेळेपासून बरीच शतकेंपर्यंत हा देश ट्युनिशियाच्या राजांच्या ताब्यांत असे. बनी अमर यानें १३२१ सालीं स्वतंत्र राज्य स्थापन केलें व मधलीं १५ वर्षे खेरीज करून स. १४०१ पर्यंत ट्रिपोली याच घराण्याच्या ताब्यांत होता.स. १५१०त हा देश स्पेनच्या फर्डिनांडनें घेऊन १५२८ सालीं सेंट जॉनच्या सरदारांनां दिला. परंतु ड्रेगुट व सिबान नांवाच्या चांच्यांनीं स. १५३३ त सरदारांनां हुसकावून दिलें. ड्रेगुटच्या मृत्यूनंतर ट्रिपोली व कॉन्स्टांटीनोपल यांच्यातील संबंध बराच ढिला पडला. परंतु भूमध्यसमुद्रांत ट्रिपोलीच्या चांच्यांवर बरीच दहशत बसलीं. १७१४ सालीं अहमंदपाशा कॅरामॅनलीं हा जवळ जवळ स्वतंत्र झाला. खंडणी अथवा 'नजराण्या' च्या रुपानें तुर्की सत्ता त्यानें मान्य केली व आपण राजप्रतिनिधि असल्याचें दाखविलें. स. १८०१ मध्यें येथील पाशानें आफ्रिका भूमध्यसमुद्रांतील व्यापाराचा चांच्यांपासून बचाव होण्याकरितां जी खंडणी अमेरिका देत असे तीपेक्षां जास्त मागणी केली. अमेरिकेनें ती नाकबूल करून युध्द जाहीर केलें. ४ वर्षे लढाई चालून अखेरीस पाशाला आपली मागणी परत घ्यावी लागली. स. १८१५ त पुन्हां असेंच अमेरिकेशीं युध्द झालें परंतु या वेळेला सुध्दां पाशाला हार खावी लागली. इ. स. १८३५ त येथें आपसांत लढाई होत आहे असें पाहून तुर्कांनीं हा प्रदेश साम्राज्यास जोडला. फ्रेंचांनीं ट्युनिशिया बेतल्यानें (१८८१) तुर्कांनीं आपली शिबंदी वाढविली. स. १८८९ च्या ऍंग्लो फ्रेंच तहानें मध्यसहारा फ्रेंच अंमलाखालीं असल्याचें मान्य झाल्यानें समुद्रकांठच्या प्रदेशासंबंधी बराच लढा पडला. सेनुसाईटसारख्या अर्ध्या धार्मिक व अर्ध्या राजकीय संस्थांचें ट्रिपोलींत बरेंच प्राबल्य आहे. १९११-१२च्या दरम्यान इटली व तुर्कस्तानमध्यें लढाई होऊन लढाईनंतर, ट्रिपोली व बेंगझी या जहागिरी तुर्कस्तानपासून इटलीला मिळाल्या. या दोन्ही जहागिरींनां मिळून 'लिबिया इटालियाना' असें नांव देण्यांत आलें. पण या दोन्ही जहागिरींची राज्यव्यवस्था स्वतंत्र रीतीनें हांकली जाऊं लागली. इटली तुर्कस्तानमध्यें जो तह झाला त्याला फ्रान्सनें संमति दिली व ग्रेटब्रिटनचीहि त्याला गर्भित संमति होतीच. ट्रिपोलीमधील तुर्कांचे हितसंबंध राखण्याकरतां, ट्रिपोली येथें एक अधिकारी व एक धर्माधिकारी नेमावयास सुलताननें इटलीकडून कबुली मिळविली होती व मुसुलमान लोकांना सार्वजनिक प्रार्थनेच्या वेळेला, तुर्कस्तानच्या सुलतानाला खलीपा असेंहि संबोधण्याची परवानगी इटलीनें दिली होती.

लॉसेन येथील तहान्वयें तुर्कस्ताननें ट्रिपोलीमधून आपलें सैन्य काढून घेण्यास लागलीच सुरवात केली. नंतर इटलीनें या मुलखांत शांतता राखण्यास सुरवात केली. जेफेरा नांवाच्या जातीच्या लोकांनीं इटलीचें वर्चस्व ताबडतोब कबूल केलें. पण बर्बर लोक मात्र त्याला कबूल होईनात. जेबेल नेफुस्ताचा मुख्य बर्बर जातीचा नायक सुलेमान एक वरूनी हा इटालियन लोकांचा पक्का द्वेष्टा होता. तुर्कस्तानच्या ताब्यांत ज्यावेळीं ट्रिनोली होती त्यावेळी ट्रिपोलीतर्फे तुर्कीपार्लमेंटमध्यें याची निवडणूक झालेली होती. याला पाशा हा किताब देण्यांत आला होता. यानें ट्रिपोलीच्या जवळच एका डोंगरांत आपलें स्वतंत्र राज्य स्थापन केलें होतें. तो पॅनइस्लामिझमच्या चळवळीला पुरा अनुकूल होता. अशा प्रकारच्या पुंड सरदाराला गप्प बसविणें जवळ जवळ अशक्यच होतें. तेव्हां इटलीला त्याच्यावर सैन्य पाठवणें भाग पडलें. स. १९१३ च्या ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्यानें इटलीला दाद दिली नाहीं पण पुढें त्याचा नाइलाज होऊन त्यानें यूरोपमध्यें पलायन केलें. हा कांटा काढून टाकल्यावर सर्व ट्रिपोली हां हां म्हणता इटलीच्या ताब्यांत आला.

अशा रीतीनें अंतस्थ शांतता प्रस्थापित केल्यावर बंदरें सुधारणें, रस्ते तयार करणें, शाळा व रुग्णालयें स्थापन करणें, आरोग्यमंडळें काढणें व शेतकी व उद्योगधंद्याला उत्तेजन देणें या गोष्टींकडे इटलीनें आपलें लक्ष पुरविलें. ट्रिपोलीच्या पुनर्घटनेसाठीं इटलीच्या लोकांनींहि पुष्कळच द्रव्यसहाय्य केलें. ट्रिपोली हा मूळचा इटलीचा पण तो पुढें तुर्कींकडे गेला होता. तेव्हां तो परत मिळाल्याबद्दल इटालियन लोकांनां आनंद वाटणें साहजिकच होतें. पुष्कळ इटालियन लोक ट्रिपोलीमध्यें वस्ती करण्यास जाऊं लागले व तेथें शेतकीचा धंदा करण्यास त्यांनीं सुरवात केली; पण इटली सरकारनें याला उत्तोजन दिलें नाहीं. ट्रिपोलीमधील अरब व बर्बर लोकांमध्यें इटालियन सत्तेविषयीं प्रेम व विश्वास उत्पन्न व्हावा व त्यांनीं बंडास प्रवृत्त होऊं नये हा विशिष्ट हेतू मनांत धरून बर्बर लोकांच्या अगर अरब लोकांच्या ज्या जमिनी होत्या, त्या जमीनीवरील त्यांचा ताबा इटलीनें काढून घेतला नाहीं. पण इटालियन सरकारचा हा उद्देश साध्य झाला नाहीं. ट्रिपोलांबरोबरच ट्रिपोलीनजीकचा बेंगझी उर्फ सिरेनैकाचा प्रदेश इटलीला मिळाला होता. पण या टापूंत अद्यापि इटलीला शांतता प्रस्थापित करतां आली नव्हती. येथें अद्यापीहि तुर्कांचेंच प्राबल्य होतें व येथील बंडखोरांनां आंतून सरकारचें साहाय्यहिं होतें. याचा परिणाम ट्रिपोलीमधील या पुड जातीवर झाल्याशिवाय राहिला नाहीं. या सिरेनैकामध्यें सेनूसाइट लोकांचें प्राबल्य होतें व त्यांचेच जातभाई फेझानी लोक यांचें ट्रिपोलीमध्यें वास्तव्य होतें.

१९१४ सालीं महायुध्दाला सुरवात झाली. त्यावेळीं ट्रिपोलीमध्यें वरील प्रकारें स्थिती होती. इटलीनें अद्यापि ताटस्थ्यच राखिलें होतें. १९१४ च्या सप्टेंबरमध्यें सेनूसाईट शेख लोकांच्या चिथावणीवरून, फेझानी लोकांनीं ट्रिनोलीमध्यें बंड केलें; व मुर्झूक व इतर बंदरांवर त्यांनीं हल्ला केला. अहमद एल अबिद यानें मुर्झूक येथें आपली सत्ता स्थापन झाल्याचें जाहीर केलें. अशा रीतीनें हा बंडाचा वणवा भराभर पसरूं लागला. त्यामुळें जनरल मियानीला फेझन शहर सोडणें भाग पडलें. जनरल मियानीच्या या कृत्यामुळें घट व घडमेस या ठिकाणच्या सैन्यानें ट्युनीशियन साहारा या ठिकाणीं वसती केली. पण लवकरच इटालियन सैन्यानें दोन्हीं ठिकाणें पुन्हां जिंकून घेतलीं. पण ट्रिपोलीच्या पूर्व भागांत इटलीला अपयश मिळालें; तेथें सेन्नूसी लोकांचें वर्चस्व स्थापन झालें व त्यांनी ट्रिपोलीमध्यें इटालियनांविषयीं द्वेष पसरविण्यास सुरवात केली. तुर्कस्तान व जर्मनी या राष्ट्रांनींहि याला मनोभावें साहाय्य केले. १९१५ सालीं इटलीनें ऑस्ट्रियाविरुध्द लढाई पुकारतांच या सेन्नूसी लोकांनीं एकदम बंड उभारलें. त्यामुळें इटलीला मोठ्या कष्टानें आपलें सैन्य ट्रिपोलीमधून काढून न्यावें लागलें. ट्रिपोली व होम्स एवढींच काय तीं बंदरें इटलीच्या ताब्यांत उरली होती व त्यांचें संरक्षण करण्याचें इटालियन लोकांनीं ठरविलें. अशा रीतीनें ट्रिपोलीमध्यें तुर्की लोकांचें वर्चस्व स्थापन झाल्यामुळें ट्रिनिशियांत व अल्जीरियांतहि बंड उभारण्याची खटपट या लोकांनीं सुरू केली. पण तेथें त्यांनां यश आलें नाहीं. १९१६ सालीं इटालियन लोकांनीं झुआसचें बंदर काबीज करून घेतलें.

१९१६ सालच्या सप्टेंबरमध्यें, सुलेमान एल बरूनीची स्वारी यूरोपमधून अचानकरीतीनें ट्रिपोली, येथें आली. येतांनां त्यानें तुर्कस्तानच्या सुलतानकडून आपल्याला ट्रिपोली, ट्युनीस व अल्जीरियाचा सुभेदार नेमल्याचें फर्मान आणलें होतें. तो मिसुरआ येथें आला व त्याला साधान एल एवी व नूरी बे या पुंड सरदारांनीं साहाय्य करण्याचें अभिवचन दिलें. यांच्या साहाय्यानें सुलेमाननें इटलीच्या सैन्याला सळो कां पळो करून सोडलें होतें. १९१७ सालीं ट्रिपोलींत सेन्नूसी लोकांचेंच वर्चस्व होतें. पण हळू हळू सुलेमान व साधान स्टेवी यांच्यांत व सेन्नूसी लोकांतच दुफळी माजूं लागली होती. अशी स्थिति पाहतांच नूरी बे यानें ट्रिपोलीमधून आपला पाय काढला. त्याच्या बदली सुलतान मुरादचा नातु राजपुत्र ओस्मान फूआद याला ट्रिपोलींत पाठविण्यांत आलें. त्यानें ही दुफळी मोडून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांत त्याला यश आलें नाहीं.

१९१८ सालीं महायुध्द संपलें. या युध्दांत जर्मनीचा पराभव झाल्यामुळें तुर्कस्तानची नांगी ढिली पडली. त्यामुळें इटलीला ट्रि्पोली व सिरेनैकामध्यें आपलें वर्चस्व स्थापन करण्याची संधि प्राप्त झाली. इटलीनें शक्य तो सामानेंच हें प्रकरण मिटविण्याचें ठरविलें. एलबेरूनी व इतर जातिनायकांशीं इटलीनें बोलणें सुरू केलें. १९१९ सालीं इटालियन सरकारनें जाहीरनामा काढून ट्रिपोलीमधील सर्व लोकांनां स्वातंत्र्य दिल्याचें जाहीर केलें. निरनिराळ्या जातींच्या नायकांनीं इटालियन गव्हर्नरच्या सल्ल्यानें आपापल्या मुलुखावर राज्य करावें असें ठरविण्यांत आलें. त्यामुळें हळू हळू ट्रिपोलीमधील स्थिति सुधारत चालली; व १९२१ सालीं इटलीला ट्युनीशियामध्यें काहीं आर्थिक सवलती मिळाल्या.

शहर.- ट्रिपोली (टॅराबुलस इल-धार्ब अथवा पश्चिमेकडील ट्रिपोली) हें उत्तर आफ्रिकेंतील ट्रिपोली विलायत (प्रांत) चें मुख्य शहर असून हें भूमध्यसमुद्रांतील एका भूशिरावर वसलेलें आहे. उ. अ. ३०० ५४' व पू. रे. १३० ११'. प्राचीन किल्ल्यांची रांग व बंदराच्या एका बाजूचें संरक्षण करीत असून दुसर्‍या बाजूस अंतर्दुर्ग आहे. हा दुर्ग स्पॅनिश सत्तेच्या वेळचा असून यांत गव्हर्नर राहतो. पश्चिमेस ओसाड मैदान असून पूर्वेस हिरवीगार असलेली मेशिंयाची ओलवण आहे. या ओलवणींत कारामान्लियन सुलतानांच्या कबरी व सिद्दी हाग्मोंदाचा बारा घुमट असलेला कुबा आहे. शहर दिसण्यांत रमणीय असून त्यावर पौरस्त्य छटा दिसतें. तुर्क लोकांच्या वस्तींत मशिदी आहेत. मोठी मशीद व पाशा मशीद यांचें मनोरे अष्टकोनी आहेत. बर्‍याच रस्त्यांवर कमानी आहेत. बंदराजवळ एक रोमन विजयकमान आहे. हिचें काम ऍंटोनियन बादशहाच्या कारकीर्दीत सुरू होऊन मार्कस ऑरेलियसच्या वेळेंस तें पुरें झालें.

रेशीम, गालिचे व कार्डोव्हा चामडें यांचें काम लहान प्रमाणावर येथें चालतें. हें व्यापारी शहर असून याच मार्गानें भूमध्यसमुद्राचा साहाराशीं व्यापार चालतो. येथील लोकसंख्या (१९२०) ७३००० असून तींत बर्बर, अरब, तुर्क, यहुदी, माल्टीज इटालियन व निग्रो हे लोक येतात. स्थानिक व्यापार यहुदी व माल्टीज लोकांच्या ताब्यांत असून समुद्रमार्गानें होणारा व्यापार इटालियनांच्या ताब्यांत आहे. इटालीचा ताबा झाल्यानंतरची माहिती देशवर्णनाखालीं आहे.

[संदर्भग्रंथ-ए. ब्रि. ब्रिटिश आरमारी खात्यानें प्रसिध्द केलेलें-ए हँडबुक ऑफ लिबिया (१९२०); ब्रिटिश परराष्ट्र खात्यानें प्रसिध्द केलेलें-इटालियन लिबिया १९२०)]-

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .