प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ट्रॉम्बे - हमरस्त्यांतून, लोकांनां जाण्यायेण्याकरितां रुळावरून, जनावरांच्या किंवा यंत्रशक्तीच्या साहाय्यानें धांवणार्‍या गाडीस ट्रॉम्बे असें म्हणतात. कधी कधीं हिचा उपयोग सामान वाहतुकीकडेहि करितात. जमीनीखालून किंवा वरून कोळसा व इतर माल नेण्याकरितां, व इतर उपयोगाकरितां, लहानशा आगगाडीसहि ट्रॉम्बे असें नांव आहे. पहिली ट्रॉबे न्यूयार्क शहरीं इ.स. १८३२त बांधली. हिच्या चाकांनां बाहेरच्या बाजूस कडा असत. ह्या तेर्‍हेच्या ट्रॉम्बे लवकरच नामशेष झाल्या. पुढें इ. स. १८५२ त एका फ्रेंच एंजिनियरनें नवीन तर्‍हेची ट्रॉम्बे न्यूयार्क शहरींच तयार केली. त्यानें प्रथम रस्त्यावर जेथें रूळ घालावयाचे त्याच्याखालीं लांकडी तुळ्यांचें अंथरूण घातलें आणि त्याजवर वरच्या अंगाला मध्यभागी खोबण असलेले रूळ घातले. रूळांनां पाडलेली खोबण रेल्वेच्या चाकाप्रमाणें, ट्रॉम्बेचीं कडा असलेली चाकें त्यांत बसण्याकरितां केलेली असे. ती ह्या अमेरिकन तर्‍हेच्या ट्रॉम्बेंनां धोक्याची आहे असें उघडकीस आलें. तेव्हां ह्यावर उपाय म्हणून इ. स. १८५५ त फिलाडेल्फिया येथें रूळ- त्याच्या एका कडेला अदमासे ७/८ इंच उंच पायरी केलेला असा- बनविण्यांत आला. इ. स. १८६० मध्यें इंग्लंडांत जेव्हां ट्रॉम्बे आल्या, तेव्हां वरच्या रुळासारखे रूळ वापरण्यांत आले.

इंग्लिश लोकांस ह्या पायरीच्या रुळाचा त्रास वाटूं लागला तेव्हां लंडनमधील बहुतेक ठिकाणचे हे रूळ काढून टाकावे लागले. अशा रीतीनें इकडे युनायटेड स्टेट्समध्यें पायरीचा रूळ नमुनेदार झाला तर तिकडे यूरोपमध्यें खोबण पाडलेला रूळच बहुतेक उपयोगांत येऊं लागला. ट्रॉम्बेच्या दृष्टीनें पाहिलें असतां पायरीच्या रुळापासून पुष्कळ फायदे आहेत; कारण खोबणींत बर्फ, घाण वगैरे सांठून रहाते व वळणाच्या ठिकाणीं चाकांच्या कडांनां विरोध होतो. तथापि, खोबणीच्या रुळापासून इतर वाहानांनां त्रास होत नाहीं. कांहीं अमेरिकेंतल्या मोठमोठ्या शहरीं हे रूळ वापरूं लागले आहेत.

इ. स. १८७० मध्यें ट्राम्बेज् अ‍ॅक्ट केल्यापासून तिची वाढ फार झपाट्यानें झाली. चपटा खोबणीचा रूळ लाकडावर पक्का करून कांक्रीट घालून तयार केलेल्या जमीनींत बसवीत. आतांपर्यंत ट्रॉम्बे रस्ता तयार करणामध्यें फरक झाला असेल तर तो रुळाच्या नमुन्यांमध्यें आणि कांक्रीटच्या पायावर तो बसविण्याच्या पध्दतीमंध्येंच; इतर कोठें नाहीं. रुळाचा खालचा भाग चपटा असल्याकारणानें, लंबरेषेंत त्याला ताठपणा अथवा जोर नसे; त्याकरितां दोन्ही कडांनां खालच्या बाजूस दोन पट्टया वाढविण्यांत आल्या. या पट्टया खालच्या लांकडांत गच्च बसत असल्याकारणानें लंब रेषेंत, वरच्या बाजूस जोर येऊन सपाटीवरहि सरकण्याची भीति राहिली नाहीं.

ह्यापुढील फरक म्हणजे इ. स. १८७२ मध्यें किंकेडनें रूळ बसविण्यासाठीं लोखंडाच्या खोबणीवजा ओतीव खुर्च्या उपयोगांत आणल्या. तेव्हां त्याकरितां रूळहि बदलावे लागले. दोन कडेच्या पट्टयांऐवजी त्या खुर्च्यांमध्यें मधोमध नीट बसेल अशी एकच पट्टी जोडून रूळ तयार केला जेव्हा १८८० सालीं वाफेच्या शक्तीनें वाहनें ओढण्यास सुरवात झाली तेव्हां ह्या वरील रुळाच्या तर्‍हा मोडून आगगाडीच्या रुळासारखे खाली रुंद बैठक असलेले नवे रूळ काढले. ह्यांची जाडी व भरींवपणा फार उपयोगी पडला. दुसर्‍या प्रकारच्या रुळांमधील सर्व दोष ह्यांत नाहींसे झाले आहेत. हेच रूळ चांगले तयार होऊन, हल्लीं सर्व जगभर ट्रम्बेकरितां वापरतात.

यूरोपमध्यें उपयोगात असणार्‍या ट्राम्बेच्या रुळांस बहुतेक एका कडेला खोबण असते. तींतील माती, केर, चाकाच्या कडांच्यायोगें बाहेर पडतो. कांहीं थोड्या रुळांना मधोंमध खोबण असते. रुळांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखें असतें. लंडन वगैरे कांहीं मोठ्या शहरीं ४ फू. ८॥ इंच हें रुळांमधील ठराविक अंतर दृष्टीस पडतें विजेची शक्ति उपयोगांत आल्यावर गाड्यांचें वनज व वेग ही वाढली व त्यामुळें रूळ निरुपयोगी ठरून भारी वजनाचे (एक यार्ड लांब रुळाचें वनज ९५ ते १०० पौंड असणारे) रूळ वापरावे लागले; तेव्हां रुळाचे प्रकार वारंवार बदलूं लागल्यानें, कारखानदारांस त्रास होऊं लागला; म्हणून १९०३ सालीं एंजिनियर स्टॅन्डर्ड कमिटीनें ''स्ट्यांडर्ड ट्रॉम्बे'' रुळाची लांबी रुंदी वगैरे मापें ठरवून टाकिलीं.

वाफेने आणि ताराच्या योगें चालणार्‍या ट्रॉम्बे.- खडकाळ प्रदेशांत घोडे ओढीत असलेल्या गाड्या चालण्यास फार अडचण पडते; म्हणूनच ट्रॉबेच्या इतिहासांत वाफेच्या शक्तीनें आणि तारांनी ओढल्या जाणार्‍या गाड्यांचे उल्लेख आहेत. इंग्लंडांत १८८० सालीं वाफेच्या इंजिनमध्यें पुष्कळ सुधारणा केल्यानंतर ट्रॉम्बेकडे ह्या साधनाचा उपयोग करण्यांत येऊं लागला. तारांची पहिली ट्राम्बे १८७३ मध्यें सॅन्स फ्रॅन्सिस्कोमध्यें तयार केली. इ. स. १८८४ सालीं याची सुरवात झाली. या तर्‍हेच्या ट्रॉम्बेकरितां रस्ता तयार करण्याला फार खर्च येतो व त्यांचा वेगहि कमी असतो म्हणून त्या हल्ली मुळींच प्रचारांत नाहींत म्हटल्यास चालेल. एडिंबरो, बमिंगहॅम, म्याटलाक्, ब्रिक्सटन वगैरे थोड्या ठिकाणीं अशा तर्‍हेची ट्रॉम्बे उपयोगांत आणलेली आहे. फक्त सामान्य पृष्ठाकर्षणाला भारी असा चढउतार आक्रमण्याच्या कामीं हिचा चांगला होतो. ह्या ट्राम्बेकरितां लागणार्‍या तारा ज्यांतून जातात असे नळ तयार करून रस्तोरस्तीं घालणें हें फार खर्चाचें काम आहे.

विजेच्या ट्राम्बे.-सध्यां वीज ही ट्रॉम्बेची सर्वसामान्य चालक शक्ति होऊन बसली आहे. ही तीन पध्दतींनीं उपयोजितात (१) डोक्यावरची (उंचीची) किंवा ट्रॉलीची पध्दत. (२) उघड्या नळांची पध्दत. (३) पृष्ठसंयोगाची (किंवा झांकलेल्या नळांची) पध्दत.

(१) डोक्यावरची ट्रॉली:- ह्या पध्दतीनें चालणार्‍या गाड्यांस विद्युत्प्रवाह डोक्यावर असलेल्या दोन विद्युत्द्वाहक तारांकडून पोहोंचतो. हे विद्युत्वाहक हमेशा रुळापासून अदमासें २१ फूट उंच बांधलेले असतात. तारांकरितां रस्त्यांवर अदमासें ४० यार्ड लांबीवर खांब रोंविलेले असतात.

(२) उघडे नळ:- कांहीं शहरांतून हे उंचीवरून नेलेले विद्युद्वाहक खपत नाहींत तेव्हां त्याकरितां उघड्या नळ्यांच्या आणि पृष्ठसंयोगाच्या ट्रॉम्बे तेथें उपयोगांत आणलेल्या असतात. ह्या नळांच्या पध्दतींत विद्युतद्वाहक रस्त्यांखालून नेलेले असतात व विद्युत्प्रवाह गाड्यांनां केलेल्या हलाकृति विद्युत्कर्षकाच्या द्वारां वर खेंचला जातो. ह्यांत दोन प्रकार आहे. एकांत नळ कडेला एका रुळाखालीं असतो व दुसर्‍यात तो दोन रुळांच्या मध्यें असतो. पहिल्या प्रकारच्या ट्रॉम्बे इंग्लंडांत फक्त बोर्नमौथ येथेंच आहेत; पण व्हिएन्ना, ब्रुसेल्स, पॅरिस, बर्लिन व बुडापेस्ट येथें ह्याच ट्रॉम्बेंचा उपयोग केला आहे. मधोंमध नळ बांधलेले आहेत अशा ट्रॉम्बे लंडन, बोर्डो, न्यूयार्क, वाशिंग्टन वगैरे ठिकाणी आढळतात. कडेला नळ घालण्यांत कांहीं फायदे आहेत. रस्ता तयार करण्यास खडी कमी लागते, फरसबंदीचा फारसा नाश होत नाहीं व बांधकामास खर्च कमी येतो. हे नळ सिमेंट कांक्रीटचें बांधलेले असतात. यांत मोठी अडचण जी असते ती नळांतून घाण व पाणी सांचतें ही होय. लंडनच्या ट्रामरस्त्यावर ६० यार्डांच्या अंतरानें विहिरी बांधल्या आहेत. त्यांत नळांतील हें घाण पाणी पडतें; या विहिरी गटारांनां जोडून दिल्या आहेत. तेव्हां या नळाच्या पध्दतीस मोठी हरकत म्हणजे तिला लागणारा जबरदस्त खर्च. उंचावरच्या ट्रालीपध्दतीनें जर दर मैलीं, सिंगल लाईनला ८००० पौंड खर्च आला तर ह्या पध्दतीस १३००० पौंड खर्च येतो.

(३) पृष्ठसंयोग:-हा बांधणीचा जबरदस्त खर्चच पृष्ठसंयोग पध्दत शोधून काढण्यास कारणीभूत झाला. ह्या पध्दतीचे अनेक नमुने निघाले. ह्यांतील सर्वसाधारण घटना म्हणजे, रस्त्यांत दोन रुळांच्या मध्यभागी लोखंडी घोडे ठेविलेले असतात; त्यांमधून विद्युत्प्रवाह गाडीतील यांत्रिक जोड्यांत जातो. हे घोडे एकमेकांपासून १० । १५ फूट अंतरावर असतात; यांनां फिरती विजेची कडी असते, ती गाडीखालील लोहचुंबकाच्यायोगें उभी राहून विद्युत्संग्राहक जोड्याला लागतो व अशा रीतीनें गाडीला गति मिळते. पृष्ठसंयोगपध्दतीच्या ट्राम्बेगाडीवर विद्युत्संग्राहक जोडा व लोकचुंबक ह्यांचें वजन फार भरतें व लवकर लवकर एक जोडा बदलून दुसरा घ्यावा लागतो. रस्त्यानें जाणार्‍या वाहनांत कार्यक्षमवाहन कोणतें हें ठरवावयाचें असल्यास, घातलेल्या भांडवलाचा योग्या मोबदला देऊन, रस्त्याची खराबी न करतां लोकांच्या नेहेमीं व चटकन उपयोगी पडणार्‍या सोयीवार याच गाड्या होत असेंच म्हणावें लागेल.

रुळावरून चालणार्‍या ट्रामगाड्या प्रवासास पूर्वीच्या साध्या गाड्यांपेक्षां फार सुखकर वाटूं लागल्या. घोडे जुंपलेल्या वाहनांचें वनज कमी असे, म्हणून भरधांव चालणारी, जास्त, मोठ्या व अधिक सोयीच्या वाफेच्या गाड्या त्या ठिकाणीं आल्या. पण ह्यांत दोष म्हणजे, कमी शक्ति व गाड्या कितीहि जरी हलक्या केल्या तरी बांधण्यास व बाळगण्यास खर्च फार. तारांनीं चालणार्‍या गाड्यांस, जर नफा करून घ्यावयाचा असेल तर वाहतुक जास्त लागते. ह्यांचा फायदा हाच कीं, बिकट चढउतारावर अशा गाड्या सुरक्षितपणें जाऊं शकतात व एकदां सुरवात करून दिल्यावर पुढें खर्च कमी येतो.

विद्युच्छक्तिसंचायक गाड्यांचे प्रयोग १८९० सालीं बार्मिगहॅम येथें करून पाहिले पण पुढें असमाधानकारक व निरुपयोगी म्हणून त्याचें नांव टाकले. या गाड्यांनां खर्च फार लागे व त्या मानानें शक्तिसंचय फार कमी होऊन उलट विद्युदुत्पादक भांड्यांचेंच वजन त्यांवर फार होई. ज्यांनां बाहेरून विद्युत्छक्तीचा पुरवठा होतो अशांच विजेच्या गाड्या फायदेशीर होतात. एक गाडीचें वजन कमी, वेग पाहिजे तितका जास्त, शक्तिसंचय मोठा, गाडीत स्वच्छता, व आवाज कमी. विजेच्या नळांच्या (विद्युन्नलिकेच्या) ट्राम्बेंत जसे फायदे आहेत तसे तोटेहि पण आहेत. त्याचप्रमाणें पृष्ठसंयोगाच्या ट्राम्बेमध्येंहि, कांहीं गैरसोयी आहेत.

कृतींत सोपी म्हटली तर डोक्यावरच्या पध्दतीची ट्राम्बे पहिली येईल. हिच्यांतील विद्युद्वाहक आटोक्याबाहेर उंच असून त्यांनां विद्युत्स्थापकांची दुहेरी तिहेरी आरणें लागतील तशीं करतां येतात. हिच्या खांब व तारांपासून रस्त्यांत कांही अडथळा येत नाहीं; व विद्युत्शक्तीच्या पुरवठ्यास अतिशय पाऊस, बर्फ किंवा हवेंतील फरक ह्यांपासून बिरोध येत नाही.

ट्राम्बे गाड्या.-प्रचलित ट्राम्बे गाडीचे दोन भाग पाडतां येतील. (१) बैठक व (२) वरखालीं होणारी साटी. साटी हा एक सांगाडा असून स्प्रिंगच्या योगानें खोबळ्यावर (तुंब्यावर) बसविला असतो आणि पुन्हां ह्या सांगाड्यावर स्प्रिंग घालून बैठक बसविली असते. साटीमध्यें चालक (मोटार) यंत्रें असतात. हल्लींच्या गाडीच्या बैठकी, एका चार चाकी न फिरत्या साटीवर किंवा दोन चार चाकी फिरत्या साठ्यांवर बसविलेल्या असतात. न फिरत्या साटीच्या पुढील व मागील चाकजोडीमधील अंतर सहापासून सात फुटापर्यंत असतें व तें अवघडांत अवघड व सुक्ष्म बळणा(बाकी)च्या त्रिज्येवरून ठरवितात. एका गाडीवर बहुतांशीं दोन चालक (मोटार) यंत्रें असतात.

ग्रेटब्रिटन व आयर्लंडमध्यं दुमजली ट्रामगाड्या फार आहेत. त्यांतून एकमजली गाड्यांपेक्षां दुप्पट माणसें बसून शिवाय नोकर लोक व विद्युच्छक्ति जवळ जवळ तितकीच लागते. एक मजली गाड्या आटपशीर व वेगवान् असतात. ह्यांखेरीज आणखी कांहीं ट्रॉम्गाड्यांच्या तर्‍हा आहेत; पण त्या फारशा उपयोगीत नाहींत.

व्यापारी माहिती.- विद्युद्वाहनांत व्यापारी दृष्टीनें बराच फायदा आहे. विजेच्या ट्रॉम्बेच्या तीन पध्दतींपैकीं पहिलीला (डोक्यावरची ट्रॉली पध्दत) खर्च कमी येतो. त्या तिन्ही पध्दतीच्या खर्चाचें प्रमाण २, १॥ आणि १ असें आहे. ब्रिटिश ट्रॉम्बे सुरू करण्याच्या वेळी अंदाजानें तिच्या खर्चाचें आंकडे तयार केले होते ते पुढें दिले आहेत. हे आंकडे सिंगल लाईनला दर मैली खर्चाचे आहेत.

 भांडवल  पौंड
 कायम रस्ता बाँडिग धरून  ५०५०
 डोक्यावरच्या पध्दतीची सामुग्री  ७५०
 पोषक तारा  ४००
 गाड्या प्रत्येक ७०० पौंड  २१००
 गाड्या ठेवण्याकरितां पडव्या वगैरे  १२००
 एकंदर  ९५००
 चालविण्याचा खर्च दर (गाडीच्या) मैली.  पेन्स
 विद्युत्शक्ति  १.५०
 ड्रायव्हर व कंडक्टरचे पगार  १.१०
 पडव्यांना खर्च, मजुरी व सामान  ०.५५
 इतर कांहीं खर्च   ०.९०
 मोडतोड वगैरे  १.२५
 एकंदर   ५.३०

गाडीच्या दर मैलीं १० पेन्स हें उत्पन्नाचें प्रमाण पडे. ग्रेटब्रिटनमध्यें असा अनुभव आहे कीं, विद्युद्वगहनांत घातलेल्या भांडवलावर फारसा नफा होत नाहीं. भांडवल जास्त वाढविलें तर (तिकिटाचे पैसे) भाडें कमी केलें जातें; त्यामुळें व्हावा तसा नफा होत नाहीं. वाहतुक जास्त होत चालल्यानें त्याकरितां जरूर त्या सोयी कराव्या लागतात. विद्युच्छक्तींत काटकसर करण्यास ती स्वत: तयार न करितां बाहेरून घेणें चांगलें. तिकडे ट्राम्बेकरितां लागणार्‍या विजेच्या एका मूलमानाला पडणारी किंमत १.०६ पेन्स असते. ठरलेल्या वेगापेक्षां गाड्यांस कांहीं जास्त वेग दिल्यास कांहीं खर्च कमी पडतो. ट्राम्बे गाड्या पार्सलें वगैरे नेऊं लागल्या किंवा भाड्यानें देण्यांत येऊं लागल्या तर उत्पन्नाची बाब वाढते. वहातुकीला सोयीवार होईल असा गाड्यांनां आकार देणें अवश्यक आहे. ट्राम्बेवर इन्शुअरन्सच्या खर्चाचा जो एक मोठा बोजा बसतो त्यामुळें तिचें नुकसान होतें.

१९०९ जानेवारींतील प्रसिध्द झालेल्या आंकड्यांवरून असें दिसून येईल कीं खर्च केलेल्या भांडवलावर इ. स. १८७८ त शेंकडा अदमासें ५। टक्के नफा पडला व १९०८ सालीं ६ ३/४ टक्के नफा पडला.

आतां घोडे, वाफ व वीज ह्या तीन वाहकांच्या योगानें चालणार्‍या ट्राम्बेकडे तुलनात्मक दृष्टीनें पाहू.

 तुलनात्मक कोष्टक
   घोड्यांचा काळ.   वाफेचा काळ  विजेचा काळ
 सन   ९८७९  १८९६  १९०७ ते १९०८
 चालू रस्त्याची लांबी.   ३२१.२७  १००९  २४६४.२२
 आंत बसलेल्या माणसांची संख्या   ९५०८८१५१५  ७५९४६६०४७  २६२५५३२८९५
 भांडवलावर मिळालेला शेंकडा नफा   ३.९७  ६.८८  ६.८१
 मिळकतीवर खर्चाचें शेंकडा प्रमाण   ८३.८१  ७४.७९  ६२.६४
 चालू वाटेवंरं दरमैलीं वहातुक   ४६९६४१  ७५२६९१  १०६५४६२
 माणसी सरासरीं भाडें पेन्स.   १.८४  १.६१  १.०९

वरील तक्त्यावरून हें उघड होतें कीं विद्युद्वाहनें सुरू झाल्यानें दर मैलीं खर्चण्यास लागणारें भांडवल वाढलें पण भांडवलावर मिळणार्‍या नफ्याचें प्रमाण कमी होत चाललें; इतकें असून चालूं खर्च कमी झाला, गाडीत बसणार्‍यांची दर मैलीं संख्या वाढली व गाडीभाडें प्रमाणाबाहेर उतरलें.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .