प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ट्रान्सवाल - दक्षिण आफ्रिका संघांतील एक प्रांत. हा व्हाल व लिंपोपो या नद्यांच्या मध्यें द. अ. २२१/२० ते २७१/२० अणि पू. रे. २५० ३२० यांमध्यें बसला आहे. यांच्या दक्षिणेस ऑरेंजफ्रीस्टेट व नाताळ, पश्चिमेस केप प्रांत व बेच्वाना लँड प्रोटेक्टरेट, उत्तरेस र्‍होडेसिआ, पूर्वेस पोर्तुगीज ईस्ट आफ्रिका व स्वाझीलँड आहे. एकंदर क्षेत्रफळ ११०४५० चौरस मैल आहे. या देशाचा सुमारें ५/६ प्रांत डेकन्सबर्ग पर्वताच्या पश्चिमेस असून तो उंच सखल आहे. देशांत चार मोठ्या नद्या आहेत. त्या कोमारी, पांगोला (या हिंदी महासागरास जाऊन मिळतात), व्हाल व लिंपोपो. हा प्रदेश उष्ण कटिबंधाजवळ व कांहींसा उष्ण कटिबंधांत असला तरी देशाच्या साधारण उंचीमुळें येथील हवा आरोग्याकारक आहे. कित्येक भागांतील हवा तर उत्कृष्ट आहे. नोव्हेंबर, जानेवारी हे अतिशय उष्ण महिने ओहत व जून, जुलै हे कडक थंडीचे महिने होत. सन १९०४ सालीं ज्यावेळीं ट्रान्सवालची प्रथम खानेसुमारी करण्यांत आली, त्यावेळीं लोकसंख्या ५२६९९५१ होती. तींत शेंकडा २०.६७ यूरोपियन होते. यूरोपियनांत डच व ब्रिटिश असे मुख्य दोन भेद आहेत. डच अथवा ओअर लोक हे टाल नांवाची भाषा बोलतात. एतद्देशीय लोक मुख्यत: झुटपँस्बर्ग विभागांत आहेत. हे लोक बांटु-निग्रोवंशोत्पन्न आहेत व बासुटो बेचुआना, बाव्हेंडा, ह्या त्यांच्या मुख्य जाती होत. या जाती येथील मूळच्या रहिवाशी नसून १८१७-२० च्या दरम्यान बाहेरून या ठिकाणीं आल्या आहेत. याशिवाय ट्रान्सवाल मध्यें काफीर, शांगान बुशमेन, हाटेंटाट इत्यादि जातींहि राहतात. सन १९०४ मध्यें ट्रान्सव्वालांत तद्देशीय लोकांची संख्या ९७२६७४ होती. सन १९११ त एकंदर लोकसंख्या १६८६२१२ होती. राज्यकारभाराच्या सोयीकरितां देशाचे सोळा विभाग केले आहेत. प्रत्येक विभागावर एक मॅजिस्ट्रेट असतो. या विभागाचे पुन्हां उपविभाग केलेले असून त्या प्रत्येकावर एक एक लष्करी अंमलदार असतो; शिवाय पार्लमेन्टमध्यें पाठविण्याकरितां मतदारसंघाचे निरनिराळे प्रांतवाचक भाग पाडले आहेत. सन १८८८ त सरकारनें वाफेची ट्रामगाडी सुरू केली व १८९० सालीं प्रिटोरिया डेलागोआ हा आगगाडीचा पहिला फांटा काढला. यापुढें बरेच आगगाडीचे फांटे काढण्यांत आले ट्रान्सवाल ही जगप्रख्यात अशी सुवर्णभूमि आहे. या ठिकाणी सोन्याच्या, हिर्‍याच्या, चांदीच्या, तांब्याच्या व कोळशाच्या खाणी आहेत व्हेंटरस्कूल, क्लर्कर्भसडॉर्प व वाटरबर्ग या भागांत सोन्याच्या व प्रिटोरिआ येथें हिर्‍याच्या आणि झरबर्ग व माराबॅस्टॅड येथें लोखंड व तांबें यांच्या खाणी आहेत. खाणीसंबंधींचा धंदा वगळल्यास दुसरा महत्त्वाचा धंदा म्हटला म्हणजे शेतीचा होय. गुरांची पैदास करणें हा शेतकर्‍यापैकीं बहुतेकांचा धंदा आहे. प्रांताच्या क्षेत्रफळाच्या मानानें पाहतां उंचवट्यावरील शेतजमीन फारच थोडी आहे. देशांत पाऊस फारसा पडत नाहीं शिवाय पाटबंधार्‍याचाहि अभाव आहे. गहूं व मका यांची मुख्यत: लागवड करण्यांत येते. मका हें काफीरांचें मुख्य खाद्य आहे. ओट, जव व ज्वारी यांचा मुख्यत: घांसदाण्याकडे उपयोग होतो. बहुतेक सर्वत्र तंबाखूची लागवड होते. १९०२ सालीं शेतकीखातें स्थापन करण्यांत आलें. त्या खात्यानें कृषिकर्मपध्दतींत बर्‍याव सुधारणा केल्या आहेत. १९१० सालीं या ठिकाणीं एक शेतकी विद्यालयहि काढलें.

प्रचलित असलेल्या शासनपध्दतींना प्रारंभ १९१० सालीं झाला. सर्व देश मिळून युनियन पार्लमेंटांत आठ व हाऊस ऑफ असेंब्लीमध्यें छत्तीस असे एकंदर ४४ लोकनियुक्त सभासद असतात; पहिल्या आठांनां सिनेटर्स म्हणतात. पार्लमेंटच्या निवडणुकीच्या सोयीकरितां म्हणून, एक एकच सभासद पाठविणारे असे मतदारसंघविषयक जिल्हे केलेले आहेत. प्रत्येक वयांत आलेल्या गोर्‍या ब्रिटिश प्रजाजनाला मतदानाचा अधिकार आहे; यांत मालमिळकतीची वगैरे कांहींच अट नाहीं.

कार्यकारी मंडळाच्या मुख्य अधिकार्‍याची निवड संयुक्त प्रधानमंडळाकडून होते, त्याची मुदत पांच वर्षांची असून प्रांतिक कायदेमंडळानें निवडून दिलेल्या चार सभासदांचें एक कार्यकारी  मंडळ त्याच्या मदतीस असतें. प्रांतिक कायदेमंडळांत ३६ सभासद असतात. या मंडळाची सत्ता केवळ स्थानिक कार्यापुरती असून त्याची मुदत तीन वर्षांची असते. लोकसत्ताक राज्याच्या वेळीं जी या पोटविभागांतून लष्करी राज्यव्यवस्था होती येथें हल्ली प्रांतिक सरकारनें नेमिलेलें लष्करी अंमलदारच आहेत परंतु त्यांच्याकडे जन्ममरणाची व मतदारांची नोंदणी करण्याचें, सार्वजनिक रस्त्यांची सुस्थिति राखण्याचें वगैरे फक्त मुलकी कामच दिलें आहे. मुख्य स्थानिक संस्था म्हणजे म्युनिसिपालिट्या होत. ज्यांची १०० पौंड किंमतीची स्वत:ची मालमत्ता आहे, अथवा जे ३०० पौंड किंमतीच्या जमीनजुमल्याचे भाडेकरी आहेत, किंवा जे वार्षिक २४ पौंड कर देतात, अशांनां म्युनिसिपल निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे, परक्यांनां अथवा काळ्या ब्रिटिश प्रजाजनांनां हा हक्क नाहीं.

जकाती, खाणी, आगगाड्या, पोस्ट व तारखातें, जमीनमहसूल, व व्यापारधंद्यावरील कर ह्या उत्पन्नाच्या मुख्य बाबी होत. सन १९०७ मध्यें अबकारी खातें प्रथम उघडण्यांत आलें व १९१० सालीं सरकारी जमाबंदीवरील ताबा यूनिअन पार्लमेंटकडे गेला. तरी पण प्रांतिक कायदेमंडळांनां प्रांतिक कामाकरितां प्रत्यक्ष कर बसविण्याचा हक्क आहे.

रोमन-डच कायद्याच्या आधारावर जरूर तेथें स्थानिक वहिवाटीस अनुसरून, तेथील हल्लींचे कायदे बनविले आहेत. जोहान्सबर्ग येथें हायकोर्ट आहे. १९१० पासून प्राथमिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर शिक्षण हें पार्लमेंटच्या हातीं व प्राथमिक शिक्षण प्रांतिक कायदेमंडळाच्या हातीं आहे. १९०७ पासून गोर्‍या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकरितां मोफत शिक्षणाच्या सरकारी शाळा काढल्या आहेत. त्यांत ७ पासून १४ पर्यंतच्या मुलांनीं गेलेंच पाहिजे असा नियम आहे. खासगी शाळांनां सरकारी मदत नसते. प्रिटोरिआ, जोहान्सबर्ग वगैरे ठिकाणीं कॉलेजें आहेत.

एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा २६ ६९ लोक ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती लोकांपैकी शेंकडा ८० गोरे आहेत. गोर्‍या समाजापैकीं जवळ जवळ अर्धे लोक कोणत्याना कोणत्या तरी डच प्रार्थनामंदिराचे अनुयायी आहेत. ६७८८२ अ‍ॅग्लिकन्स आहेत. १९८२१ प्रेसबिटेरीअन्स व ३७८१२ मेथॉडिस्ट आहेत. गोर्‍या लोकांपैकी शेंकडा ३५ प्रॉटेस्टन्ट व बाकीचे रोमनकॅथोलिक, मेथाडिस्ट, प्रेसबिटेरिअन वगैरे आहेत व १५४७४ हिब्रू आहेत.

इतिहास.- १९ व्या शतकाच्या सुरुवातीस ट्रान्सवाल मध्यें बाव्हेंडा, युशेमन व हाटेंटाट वगैरे लोक असत. स. १८१७ च्या सुमारास माझी लीकाटझी नांवाच्या झुलू सरदारानें हा देश पादाक्रांत केला; तेव्हां बाव्हेंडा लोक उत्तरेस बाटरबर्ग कडे जाऊन राहिले. १८२९ व १८३६ च्या दरम्यान कांहीं ब्रिटिश व्यापारी ट्रान्सवाल येथें आलें.

ब्रिटिश अंमलापासून विभक्त होऊन स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या उद्देशानें बोअर लोकांनी केप कीलनी सोडली. १८३५ सालीं ट्रिचर्ड व जॅन व्हान रेन्सबर्ग यांच्या नेतृत्त्वाखाली ९८ बोअरांनी व्हाल नदी ओलांडून झुपॅन्सबर्ग गांठलें. रेन्सबर्गच्या हाताखालील लोक एतद्देशीयांकडून लवकरच मारले गेले पण ट्रिचर्डचे लोक १८३८ त बेचे किनार्‍यास जाऊन लागले, तेथून ते नाताळला गेले. स १८३६ त दुसर्‍या एका बोअर टोळीनें व्हेट नदीच्या तीरावर ठाणें दिलें होते. या टोळीनें माझीलीकाटझीवर हल्ला करून त्याचें बरेंच नुकसान केलें. १८३८ सालीं माझीलीकाटझी लिंपोपोच्या पैलतीरास कायमचाच पळाला. व त्याचा प्रांत बोअराच्या हातीं आला आणि त्यांनीं मूई नदीच्या तीरावर वस्ती केली. होतांहोईतों ब्रिटिशांचा संपर्क नको या हेतूनें या बोअर लोकांनीं डेलागोआबेकडे सरकून झुटपँन्सबर्ग येथें वसाहत केली. व त्याच्या दक्षिणेकडील प्रदेशांत इतर बोअरांनी वस्ती केली. स. १८४८ त प्रिटोरीअस हा बोअरांचा नायक होता. बोअरांचें स्वातंत्र्य मान्य करण्याच्या समयीं ब्रिटिश सरकारनें याच प्रिटोरीअसच्या द्वारें त्यांच्याशी बोलणें लाविलें होतें; १८५२ च्या जानेवारींच्या १७ व्या तारखेस बोअरांनां ब्रिटिशांनीं स्वातंत्र्य दिलें. १८५३ सालीं पोटनिअर व प्रिटोरिअस हे दोन्ही पुढारी मरण पावले.

प्रिटोरिअसच्या मरणानंतर त्याचा मुलगा मारथीनस हा पुढें आला. लहान लहान स्वतंत्र विभागांऐवजीं एक सुसंघटित मध्यवर्ती सरकार स्थापण्याचा प्रश्न यानें लोकांपुढें मांडला. तो लोकांनां पसंत पडून एक नवीन शासनपध्दति निर्माण करण्यांत येऊन तिला दक्षिण आफ्रिकेंतील प्रजासत्ताक राज्य असें नांव देण्यांत आलें व लोकनियुक्त लोकसभेची (बॉसक्राद) स्थापना करण्यांत आली. लोकसभेच्या अध्यक्षास एका कार्यकारी मंडळाची मदत असते. लोकसभा व कार्यकारी मंडळ या दोन्ही संस्थाचें सभासद यूरोपीअन रक्ताचें असले पाहिजेत अशी अट घालण्यांत आली. धार्मिक अथवा राजकीय कोणत्याहि बाबतींत काळ्या लोकांनी बरोबरी करण्याचा प्रयत्न केल्यास तो खपणार नाहीं अशी सक्त ताकीद असे. ही नूतन शासनपध्दति १८५६ सालीं अंमलांत आली.

ही नूतन योजना झुटपॅन्सबर्ग व लिडनबर्ग येथील बोअरांनां प्रथम पसंत पडली नाहीं. याचें कारण तेथील बोअरांचा प्रिटोरिअसच्या घराण्यावर १८५२ पासूनच रोष होता. वडील प्रिटोरिअससनें सँडरिव्हर कन्व्हेन्शनवर जी सही केली ती आपल्या एकट्याच्या जबाबदारीवर व अहंमन्यतेच्या भरांत केली असा यांचा त्याच्यावर आरोप असे. तो राग यावेळी त्यांनी अशा रीतीनें काढला. पण नूतन लोकसभेनें तो चालू दिला नाहीं. शेवटीं १८६० सालीं झुटपॅन्सबर्ग व लिडनबर्ग हीं दोन्ही शहरें नूतन प्रजासत्ताक राज्यास येऊन मिळाली. प्रजासत्ताक राज्याचा पहिला अध्यक्ष धाकटा प्रिटोरिअस हा झाला व राजधानी प्रिटोरिआ झाली.

ट्रान्सवालचा अध्यक्ष असतांहि त्याव वेळीं प्रिटोरिअसला ऑरेंजफ्रीस्टेटचाहि अध्यक्ष नेमण्यांत आलें. तेव्हां या दोन्ही प्रजासत्ताक राज्यांची एकी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याकरितां तो ब्लोएमफॉंटेन येथें गेला. लीडनबर्ग येथील लोकांनीं ट्रान्सवाल व ऑरेंजफ्रीस्टेट हीं एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा व दोन्ही ठिकाणचा एकाच वेळी अध्यक्ष झाल्याबद्दल प्रिटोरिअसचा निषेध केला. आणि त्यामुळें त्रासून जाऊन प्रिटोरिअसनें ट्रान्सवालच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रिटोरिअसचा पक्ष व लीडनबर्ग पक्ष या दोन विरोधी पक्षांत भांडण लागून कांहीं काळ ट्रान्सवालमध्यें बेबंदशाही माजली. तेव्हां स. १८६३त प्रिटोरिअसनें ऑरेंजफ्रीस्टेटचें अध्यक्षपदहि सोडलें, व शिकस्तीने त्यानें ही यादवी थांबविली. स. १८६४ त दोन्ही पक्षांत तडजोड होऊन पुन्हां प्रिटोरिअसलाच अध्यक्ष निवडण्यांत आलें.

अशा रीतीनें हा अन्त:कलह शमविण्यांत आला खरा, पण त्याचे परिणाम राज्यास भोंवल्यावांचून राहिले नाहींत. खजिना रिकामा झाल्यामुळें तो भरून काढण्याकरितां कडक उपाय अंमलांत आले. स. १८६५ त झुटपँन्स येथील एतद्देशीयांनीं बंड उभारलें तेव्हां त्यांच्याशीं तह करून सरकारनें कसें तरी स्थिरस्थावर केलें (१८६९).

याच सुमारास टाटी येथें सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यामुळें अध्यक्ष प्रिटोरिअस यानें जाहीरनामा काढून उत्तरेस व पश्चिमेस आपल्या राज्याची सीमा वाढविली (१८६८). त्यायोगें बेचुआनालँड व डेलगोआबेचा कांहीं भाग दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताक राज्यांत मोडूं लागला. इंग्लंड व पोर्तुगालनें या कृत्याचा निषेध केला. तेव्हां पोर्तुगालशीं तह होऊन पूर्व व पश्चिम मर्यादा ठरविण्यांत आल्या.

या गडबडींत ब्लोएमहॉफ जिल्हा प्रिटोरिअन सरकारच्या ताब्यांतून काढून घेण्यांत आला. या कृत्यामुळें संतापून प्रिटोरिअसनें अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हां थामसबर्गर्स हा अध्यक्ष झाला (१८७२). याच्या कारकीर्दीत देशांत सर्वत्र अंदाधुंदी माजली. या बेबंदशाहीचें कारण त्याचा गैरमुत्सद्दीपणा होय. तेव्हां ही बेबंदशाही नाहींशीं करण्यासाठीं इंग्रजांचा वसाहतमंत्री लॉर्ड कारनरव्हॉन याला कळवळा येऊन ट्रान्सवालची सुरक्षितता व सुबत्ता ब्रिटिश अमलाखालींच होणें शक्य आहे असें यानें ठरविलें व त्याच उद्देशाकरितां शेपस्टोन याला ट्रान्सवालमध्यें पाठविण्यांत आलें व त्यावेळच्या (देशाच्या) असहाय स्थितीचा फायदा घेऊन ट्रान्सवाल ब्रिटिश अमलाखालीं घेण्याचा जाहीरनामा काढण्यांत आला (१८७७). त्यावेळीं हें कृत्य कित्येक इंग्रजांनां देखील आवडलें नाहीं, म्हणून इंग्रज सरकारतर्फे ह्या कृत्याचें पुढीलप्रमाणें समर्थन करण्यांत आलें. ''खुद्द बोअरांनाच जर या कृत्यामुळें निरतिशय आनंद झाला तर दुसरा या कृत्याच्या आवश्याकतेचा व सरळपणाचा कोणता पुरावा पाहिजे?'' बोअरांनां हें कृत्य आवडलें असो वा नसो, पाल कुगरला मात्र तें मनापासून आवडलें नाहीं हें खास. या संबंधांत त्याच्या नेतृत्वाखालीं इंग्लंडला एक शिष्टमंडळ पाठविण्यांत आलें. पण त्या मंडळाच्या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावण्यांत आल्या. स्वराज्य घ्या पण तें राणीच्या छत्राखाली घ्या असा त्यांनां जबाब मिळाला. पुढें झुलू लोकांनीं ब्रिटिशांवर स्वारी केली असतां (१८७९) स्वातंत्र्य मिळविण्याची हीच योग्य संधि असें वाटून बोअरांनीं ब्रिटिश सरकारास कुमक देण्याचें साफ नाकारलें. झुलु लोकांचा पराभव झाला पण ब्रिटिशांचेंहि अत्यंत नुकसान झालें. सेनापति बुल्से यानें योवळीं बोअरांनां स्पष्ट सांगितलें कीं, यापुढें तुमच्यावर सतत ब्रिटिश सत्तेचा अंमल राहील. इकडे इंग्लंडमध्यें याच सुमारास गल्डस्टन ह्यानें पार्लमेंटांत केलेल्या भाषणानें बोअर लोकांनां साहजिकच उत्तेजन आलें. 'ट्रान्सवालचा अपहार म्हणजे एक संभावित चोरी होय. या कृत्यामुळें इंग्लंडला मोठें लांछन लागलें आहे.' अशाप्रकारच्या त्याच्या भाषणामुळें बोअर-चळवळ जास्तच फोंफावली. अशा आणीबाणीच्या प्रसंगींहि जेव्हां त्यांच्यावर करांचें नवीन ओझें लादण्यांत येऊं लागलें, तेव्हां तर त्यांचा त्वेष अनावर झाला. एका शेतकर्‍यानें कर न भरल्यामुळें त्याच्या गाड्या धरण्यांत आल्या, त्या लोकांनीं बळजबरीनें सोडविल्या. परिस्थितीनें उग्र स्वरूप धारण केलें व बोअरांनीं प्रचंड सभा भरवून लोकसत्ताक राज्य पुकारलें. प्रिटोरिअस, क्रूगर व जॉबर्ट या तिघांच्या मंडळाला तात्पुरतें लोकसत्ताक सरकारचे सर्व अधिकार देण्यांत आले व इंग्रजांबरोबर लढाईस सुरवात झाली. या लढायांत माजुवा हिल येथील लढाई अत्यन्त महत्त्वाची होय (१८८१); तींत सर जॉर्ज कोले हा मारला गेला व बोअर विजयी झाले. अर्थात तडजोडीच्या बोलण्यास सुरवात झाली. ट्रान्सवालला इंग्रज अधिराज्याखालीं पूर्ण अन्त:स्वातंत्र्य देण्याचें ठरलें, व बोअरांनीं नाहीं होय करतां करतां मान्य केलें. व त्याप्रमाणें सर्व राज्यकारभार वरील तिघा पुढार्‍यांच्या हातीं सोंपविला (८ आगष्ट १८८१). तिघांपैकीं क्रूगरला १८८३ मध्यें अध्यक्ष निवडण्यांत आलें.

या प्राप्त झालेल्या विजयामुळें राज्यमर्यादा विस्तृत करण्याची तेथील बोअर लोकांची हांव जास्तच वाढली. पश्चिम सरहद्दीवरील बोअरांनां त्यांच्या प्रांतांतून हुसकावून देऊन त्या जागीं स्टेलालँड व गॉशेन हीं प्रजासत्ताक राज्यें स्थापण्यांत आलीं. लार्ड डर्बी या वसाहतमंत्र्याच्या निषेधास न जुमानतां हीं दोन प्रजासत्ताक राज्यें संयुक्त करण्यांत आलीं. (१८८३). पाल क्रूगर वगैरे पुढार्‍याची इच्छा ब्रिटिश सत्तेचा थोडा देखील संपर्क नसलेलें निर्भेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती त्याबद्दल खटपट करण्याकरितां क्रूगर लंडन येथें लार्ड डर्बीला भेटला. याचा परिणाम स. १८४४ चें लंडन कन्व्हेन्शन भरविण्यांत होऊन ट्रान्सवालला बेचुअम्नालँड सरहद्दीवर कांहीं सवलती मिळाल्या.

पश्चिम सरहद्दीवरील मुलुख काबीज करून बोअरांच्या राज्यतृष्णेला खुलें असलेलें पश्चिमद्वार ब्रिटिशांनीं बंद केलें तेव्हां बोअरांच्या साम्राज्यलालसेचा लोंडा पूर्वेकडे वळाला. १८८४ सालीं डिनिझुलु याला झुलु राज्यावर बसविल्यामुळें बोअरांनीं झुलु लोकांपासून पारितोषिक म्हणून थोडा मुलुख घेतला व त्याचा ट्रान्सवालच्या राज्यांत समावेश करून घेतला (१८८८) व थोड्याच वर्षांत त्यांनीं स्वाझीलँडहि काबीज केला. याच सुमारास जोहान्सबर्ग, बारबर्टन वगैरे ठिकाणीं नवीन सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यामुळें जमीनीचीहि किंमत चढली व ट्रान्सवालच्या खजिन्यांत अतोनात धनसंचय झाला. जमीनीची किंमत इतकी चढली कीं सबंध जमीनीपैकीं १/३ जमीन बोअर सरकारनं युटिलँडर लोकांनां विकून टाकली. सोन्याच्या खाणीचा धंदा किफायतशीर होण्याचें कारण युटिलँडर लोकांचे श्रम होत. पण या लोकांनां राजकीय अथवा व्यापारी सवलती कांहींच न मिळाल्यामुळें हे लोक असंतुष्ट असत. आपल्या गार्‍हाण्यांची योग्य दाद लावून घेण्याकरितां चळवळ करण्याचें ठरवून त्यांनीं संघ स्थापन केले. टुडहोप हा त्यांचा पुढारी होता. सर्व नागरिकांनां समान हक्क देणें, मक्त्याचीं व त्याबरोबरच इतर गार्‍हाणीं नाहींशीं करणें हे या संघांचें उद्देश होते. संघाच्या प्रतिनिधींनीं क्रूगरची भेट घेतली परंतु त्यानें त्यांनां हात हालवीत परत पाठविलें.

लंडन कन्व्हेन्शनच्या अटींत ब्रिटिशसाम्राज्यछत्रासंबंधीं लेखी उल्लेख जरी नसला, तरी ट्रान्सवाल हें ब्रिटिश साम्राज्यसत्तोखालील स्वराज्योपभोगी राष्ट्र होय, असा निदान समज तरी त्यांत अन्तर्भूत होता व क्रूगरला हेंच नको होतें. १८९५ त इंग्रजांनीं टोंगालँड व कॉसीबे हीं आपल्या राज्यास जोडली. ट्रान्सवालला चांगलेसें बंदर नसल्यामुळें क्रूगरचा कॉसीबेवर फार दिवसांपासून डोळा होता. अर्थांतच या कृत्याचा त्यानें जोरानें निषेध केला.

१८९५ च्या आगस्टांत युटिलँडर्सनीं आपलीं गार्‍हाणीं पुन: क्रूगरला कळविलीं. पण या खेपेसहि त्यांनां तरवारीच्या जोरावर वाटल्यास हक्क मिळवा असें त्यानें सडेतोड उत्तर दिलें. आपल्याच उद्योगामुळें सरकारचा खजिना फुगत असतां आपणाला मतदानाचा हक्क मिळूं नये, हें युटिलँडर्सनां खपलें नाहीं. शेवटीं त्यांनीं बंड करण्याचें ठरविलें. परंतु त्यांचा कट फसला व मुख्य मुख्य पुढार्‍यास फांशी देण्यांत आलें व जोहान्सबर्ग येथील लोकांचीं हत्यारें काढून घेतली.

शेवटी युटिलँडर्सनीं व्हिक्टोरिया राणीकडे विनंति-अर्ज पाठवून मदतीची याचना केली. याचा परिणाम असा झाला कीं, ब्लोएमफाँटेन येथें एक परिषद भरून युटिलँडर्सचा प्रश्न सर आल्फ्रेड मिलनर यानें क्रूगरपुढें मांडला. परंतु तेथेहि समाधानकारक निकाल लागला नाहीं. कांहीं तरी निर्वाणीचा उपाय योजिल्याशिवाय प्रेसिडेंट क्रूगर या बाबतींत नमणार नाहीं असे इंग्रजी जनतेचें मत बनलें उलटपक्षीं युटिलँडर्सचा प्रश्न हा आमच्या अंत:कारभाराचा आहे व इंग्लंडला त्यांत हात घालण्याचा कांहीं एक अधिकार नाहीं असें क्रूगर प्रतिपादूं लागला. दोन्ही देश सैन्यांची जमवाजमव करूं लागले. ट्रान्सवालसरकारनें राणीसरकाराकडे निर्वाणीचा खलिता धाडला व ४८ तासांच्या आंत त्याचें उत्तर मागितलें (९।१०।१८९९). उत्तर न धाडतां इंग्लंड युध्दास तयार झालें व ट्रान्सवालच्या पश्चिम सरहद्दीजवळ युध्दास तोंड लागलें.

लढाईच्या सुरुवातीस बोअर लोकांनीं चांगलीच मर्दुमकी गाजविली. लेडीस्मिथला बोअर सैन्याचा अभेद्य वेढा पडला. इंग्रज सेनापति बुल्लर यानें बोअर सैन्यावर लागोपाठ हल्ले केले पण त्याचा कांहींच उपयोग होईना व बोअरांनांच विजय मिळण्याचा रंग दिसूं लागला. इतक्यांत सेनापति राबर्ट्स तेथें येऊन ठेपला; व त्यानें मोठ्या शिकस्तीनें लेडिस्मिथ येथील वेढा उठविला (फेब्रु.२८); बोबर सेनापति क्राँजे ब्रिटिश सैन्यास शरण गला. या पराभवामुळें बोअरांचा दम थोडा खचला. रॉबर्ट्स यानें ब्लोएमफाँटेमवर चाल केली, व नंतर त्याचें सैन्य ऑरेंजफ्रीस्टेटच्या राजधानींत शिरलें (१३ मार्च १९००). इतक्यांत बोअरांचा प्रख्यात सेनापति डीवेट यानें आपल्या फौजांची जमवाजमव करून ब्रिटिश सेनानींचा ठिकठिकाणी पराभव केला व राबर्ट्स याच्या चढावाच्या धोरणास आळा घातला.

आपल्या ढिलाईचा फायदा बोअरांनी घेतला असें पाहून रॉबर्ट्स यानें ताबडतोब सैन्याचा बंदोबस्त करून प्रिटोरिआवर चाल केली. मॅफेकिंगची मुक्तता करून (१७ मे) जोहान्सबर्ग काबीज करण्यांत आलें (३१ मे) व ऑरेंज फ्रीस्टेट ब्रिटिश अंमलास जोडलें; आणि ५ जूनला ट्रान्सवालची राजधानी प्रिटोरिआ ब्रिटिशांच्या हस्तगत झाली. प्रिटोरिआ पडलें तरी डीवेट हातीं लागला नाहीं. मात्र ब्रिटिश सैन्यानें बोथाचा बेलफास्ट येथें पराभव केला (२७ आगष्ट) व क्रूगर यूरोपमध्यें पळून गेला; आणि सरतेशेवटीं ट्रान्सवाल ब्रिटिश राज्यास जोडण्यांत आलें (२५ आक्टो.).

इतकें झालें तरी डीवेट हा अजून इंग्रजांचा पिच्छा सोडीना. केप कॉलनी व ऑरेंजरिव्हर वसाहतींतील लोकांनां यानें त्यांच्याविरुध्द उठविलें, तितक्यांत बोथानॅहि मिडलवर्ग रेल्वेवरील ठाणीं घेतलीं. १९०१ च्या फेब्रुआरीच्या १० व्या तारखेस तिकडे डीवेटनें केप कॉलनीवर चाल केली पण त्यांत त्याचा पराभव झाला (१० फेब्रु. १९०१) व इंग्रज सेनापति फ्रेंच यानेंहि बोथाला पळावयास लाविलें. शेवटीं यापुढें विरोध करणें निष्फळ आहे असें ठरवून बोथानें किचनेरशीं तहाचें बोलणें लाविलें पण त्याचा उपयोग झाला नाहीं.

आगस्टमध्यें इंग्रजांनीं जाहीरनामा काढला कीं जे बोअर पुढारी शरण येणार नाहींत त्यांनां दक्षिण आफ्रिकेंतून कायमचे हद्दपार करण्यांत येईल. पण या धमकावणीचा उपयोग झाला नाहीं. केपकॉलनींत फिरून बंडाळी माजून लष्करी कायदा पुकारण्यांत आला. बोअरांचा जमाव अजून २५००० होता. जानेवारी (१९०२) मध्यें बोअर सेनापति व्हिलजोएन याला पकडण्यांत आलें. शेवटीं नाइलाजानें बोअर सरकारचे प्रतिनिधी प्रिटोरिआ येथें आले व त्यांनी इंग्रजांशीं तहाचें बोलणें चालविलें नंतर व्हेनीगिंग येथें जनरल केंप याच्या अध्यक्षतेखालीं प्रतिनिधींची सभा भरून तहाच्या मुलकी राज्यव्यवस्था सुरू करण्याचें व एतद्देशीय मताधिकाराच्या प्रश्नाचा विचार स्वराज्य मिळाल्यानंतर करण्याचें ठरलें. ट्रान्सबाल हें ब्रिटिश अंमलास याच्या अगोदरच जोडण्यांत आलें होतें. रॉबर्ट्स परत गेल्यावर त्याच्या जागीं सर आलफ्रेड मिलनर हा आला. त्यानें ट्रान्सबालच्या राज्यव्यवस्थेची पुनर्घटना केली. न्याय, कायदा, जमाबंदी, वगैरे खात्यांत सुधारणा करण्यांत आल्या व जोहान्सबर्गला एक शहर-कौन्सिल देण्यांत आलें. पुढें मिलनरला ट्रान्सबालचा गव्हर्नर करण्यांत येऊन व त्याच्या मदतीस एक कार्यकारी मंडळ स्थापून लष्करी राज्यव्यवस्थेची समाप्ति करण्यांत आली (२१ जून). यानंतर ट्रान्सवालला प्रातिनिधिक राज्यपध्दति मिळावी म्हणून चळवळ सुरू झाली व शेवटीं ही मागणी इंग्लंडनं कबूल केली (१९०४) आणि त्याप्रमाणें १९०५ सालीं ट्र्रान्सवालला स्वराज्य मिळालें व जनरल बोथा याच्या हातखालीं एक प्रधानमंडळ बनविण्यांत आलें. या प्रधानमंडळानें ब्रिटिश हिंदी लोकांचा हक्क झिडकारून ट्रान्सवाल हा गोर्‍या लोकांचाच देश राखण्यांत येईल, असा आपला निश्चय जाहीर केला. स्वत:ला नोंदून न घेतल्यामुळें मोहनदास करमचंद गांधी व इतर हिंदी पुढार्‍यानां तुरुंगांत टाकलें व ८००० हिंदी लोकांनां हद्दपार केलें (१९०९). नोंदणीचा कायदा न पाळल्यामुळें २५०० लोकांनां बंदिवास पत्करावा लागला.

दक्षिणआफ्रिका संघ ज्यावेळी स्थापन करण्यांत आला त्यावेळी जनरल बोधा याला संयुक्तप्रधानमंडळाचा मुख्य प्रधान करण्यांत आलें. पुढें ट्रान्सवालचा समावेश यूनीअन ऑफ साऊथ आफ्रिकेंत करण्यांत येऊन त्याची राजधानी प्रिटोरिया येथें केली (३१ मे १९१०). या यूनीअनवर एक इंग्रज गव्हर्नरजनरल असून, त्याच्या मदतीस एक कार्यकारीमंडळ व एक (४५ सभासदांचें) कायदेमंडळ आहे. गव्हर्नर जनरलचा पगार वार्षिक १०००० पौंड आहे. ट्रान्सवालमध्यें सर्वांत मोठें शहर जोहान्सबर्ग आहे; कारण सोन्याच्या खाणींच्या प्रांतांतील ते मुख्य ठाणें आहे. कायदेकौन्सिलचा ठराव नामंजूर करण्यास गव्हर्नर जनरलला व्हेटोचा अधिकार आहे.

एक हार्बर आणि रेल्वे बोर्ड असून त्याच्या ताब्यांत आगगाड्या व बंदरें दिलीं आहेत; याच्या कामासाठीं रेल्वे व्यापार यांच्या उत्पन्नांतून भागविला जातो.

डच व इंग्लिश या दोन्हीहि भाषा सरकारदरबारी चालू आहेत. आशियाटिक व तद्देशज लोकांच्याबद्दल कायदेकानुन करण्याचा अखेरचा अखत्यार ग. जनरल व त्याचें कौन्सिल यांच्या हातांत असतो.

कोळशाच्या खाणीपासून बरेंच उत्पन्न होतें; देशांत एकंदर ५ हजार चौ. मै. चा प्रदेश या खाणींखाली असून त्यांतून ६६४१२२९ टन कोळसा सन १९१७ त बाहेर निघाला. देशांत मीठहि बरेंच बनतें; वरील साली १३४७६ टन मीठ निघालें. देशांत एकंदर १६०० च्यावर निरनिराळे कारखाने आहेत. यांतून खाद्यपेयांचे निरनिराळे पदार्थ तयार करणें, धातूंचे पत्रे, दळण्याच्या चक्क्या, विटा, कौलें, तंबाखूचे पदार्थ, साबू, मेणबत्त्या, एन्जीनियरिंगचीं यंत्रें, चाकू, कात्र्या, कापड, सूत वगैरे तयार करतात. सोने व हिर्‍याच्या खाणीपासून फार उत्पन्न होतें. सन १९१७ मध्यें ३८३०६३८१ पौंड किंमतीचें सानें व १६६७२९९ पौंडाचें हिरे बाहेर पडले.

युनिव्हर्सिटीखेरीज बाकीचें शिक्षण सोपीवखात्याकडे आहे. प्रत्येक शाळेंत मुलांच्या पालकांनीं निवडून दिलेल्या लोकांची एक कमिटी असते व तिची देखरेख शाळेवर असते. बहुतेक (वरिष्ठ शिवाय) शिक्षण मोफत आहे. १९२१ सालच्या खानेसुमारीप्रमाणें ट्रान्सवालमध्यें हिंदी लोकांची संख्या १३४०५ आहे.

[संदर्भग्रंथ:-ड्यूकेन-हिस्टरी ऑफ दि वार इन साउथ आफ्रिका; बोथा-बोअर टु बोअर; ब्राईस-इम्प्रेशन ऑफ आफ्रिका; क्रेसविक-ट्र्रान्सवाल वॉर; फिटझ पॅट्रि्क-ट्रान्सवाल फ्राम बुइदिन; क्रूगर-मेमॉयर्स; लीडस-अनेक्झेशन ऑफ ट्रान्सवाल नेव्हिनसन-लेडीस्मिथ; प्राग-ट्रान्सवाल ऍंड इटस् माईन्स.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .