विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टौंगी - ब्रह्मदेश. दक्षिण शान संस्थानांचे सुपरिटेंडेंट व इतर अधिकारी यांचें हें मुख्य ठिकाण आहे. या गांवाच्या उत्तरेकडील देखावा फार सुरेख असून बाकीच्या तीन्ही बाजूंनी टेंकड्या आहेत. यांतील सार्वजनिक इमारती म्हणजे रेसिडेन्सी, दरबार हॉल, मामुली सरकारी कचेर्या, आणि सरदार लोकांच्या मुलांकरितां शाळा, ह्या होत. येथें दर पांच दिवसांनीं बाजार भरतो; या गांवांत ज्ञान, ब्रह्मी, चिनी, आणि यूरोपीयन लोकांची वस्ती आहे.