विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टेगर्नसी - हें सरोवर बव्हेरियांत म्यूनिकच्या दक्षिणेत ३४ मैलावंर डोंगराळ प्रदेशांत आहे. समुद्रसपाटीपासून हें २३८२ फूट उंच आहे. याची लांबी व रुंदी अनुक्रमें ४ व १। मैल असून खोली २३५ फू. आहे. यांतील पाणी मॅग्नफॉलमधून इनमध्यें जातें. दक्षिणेच्या बाजूस फारच नयनमनोहर वनश्री आहे. म्युनिकच्या आसपासचे लोक उन्हाळ्याचें दिवस येथेंच घालवतात. टगर्नसी हें गावं याच्या पूर्वकिनार्यावर आहे.