प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टिळक, बाळ गंगाधर - (२२ जुलै १८५६ - १ १९२० आगस्ट) कोंकण प्रांतीं रत्नागिरी जिल्ह्यांत दापोली तालुक्यांत चिखलगांव म्हणून जो गांव आहे तो टिळक घराण्याचा मूळ गांव होय. या गांवची खोती टिळक घराण्याकडे असे. बळवंतराव टिळक यांचे पणजे केशवराव हे कर्तृत्ववान पुरुष असल्याकारणानें त्यांनीं पेशवाईंत अंजनवेलची मामलतहि मिळविली. पण पुढें पेशवाई बुडाल्यावर त्यानीं ती सोडून देऊन, ते घरी स्वस्थ बसले. यांचा सर्वांत वडील मुलगा रामचंद्र हा बळवंतरावांचा आजा होय. घरची गरीबी असल्यामुळें रामचंद्रपंताचें शिक्षण बेताबेताचें झालें व त्यांनीं मोजणी खात्यांत नोकरी धरली. राचंद्रपंतानां आपल्या वयाच्या १८ व्या वर्षी पहिला मुलगा गंगाधर हा झाला. बळवंतरावाचें हे वडील होत. रामचंद्रपंतानां कौटुंबिक अडचणीमुळें वैताग प्राप्त होऊन, ते घर सोडून निघून गेल्यामुळें, गंगाधरपंतांचा विद्याभ्यास पुरा होण्यापूर्वीच त्यानां पोटासाठीं नोकरी धरणें भाग पडलें. हे संस्कृत व गणित या विषयांत प्रवीण असल्यामुळें त्यांनीं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली सांपत्तिक स्थिति थोडी फार सुधारली, गंगाधरपंतानां १८५६ सालीं मोठ्या नवसानें मुलगा झाला व तेच प्रस्तुत बळवंतराव होत. लहानपणापासूनच बळवंतरावांच्या अंगांतील बुध्दिमत्ता, करारीपणा इत्यादि गुण निदर्शनास येऊं लागले होते. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच त्यांचें संस्कृत व गणित इंग्लिश सहावी सातवी इयत्तेतल्या मुलांइतकें गंगाधारपंतानीं करून घेतलें होतें. १८७२ सालीं गंगाधारपंत वारल्यामुळें बळवंतरावाची घरची व्यवस्था त्यांचे चुलते पाहूं लागले. हायस्कूलमधील शिक्षणक्रम संपवून बळवंतरावानी डेक्कनकॉलेजमध्यें १८७३ सालीं प्रवेश केला. १८७६ सालीं ते बी. ए. परीक्षा पास झाले व १८७९ सालीं एल्.एल्. बी. झाले. एम. ए. लाहि ते एक दोन वेळ बसले पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. कॉलेजमध्यें असतांनाच आपल्या देशाची अनिष्ट स्थिति कशी सुधारतां येईल याविषयीं त्यांचे विचार चालत असत. आगरकरादि मंडळांबरोबर या विषयासंबंधीं त्यांचे मोठे कडाक्याचे वादविवादहि होत असत. देशाची व समाजाची स्थिति सुधारण्याचे जे बरेच मार्ग आहेत त्यांपैकीं जनतेला शिक्षण देणें हा मार्ग टिळकांना विशेष पसंत पडला होता व याच सुमारास विष्णुशास्त्री चिपळूणकरानींहि सरकारी नोकरी सोडून पुण्यास खासगी शाळा काढावयाचें ठरविल्यामुळें त्यानां टिळक जाऊन मिळाले. या शाळेंचें नांव न्यू इंग्लिश स्कूल असें होतें. या शाळेला पुढें आगरकर, वामनराव आपटे इत्यादि मंडळीं मिळाल्यामुळें ही फारच भरभराटीस आली पुढें याच मंडळांनीं शाळेला जोडून छापखाना काढला व केसरी व मराठा हीं पत्रें सुरू करण्यात आली. १८८२ सालीं बर्वे प्रकरण उपस्थित होऊन त्यांत टिळक-आगरकररांनां शिक्षा भोगावी लागली. पण त्यामुळें टिळकांची लोकप्रियता वाढूं लागली.

इ. स. १८८४ मध्यें डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली व पुढें थोड्याच दिवसांनीं फर्ग्यूसन कॉलेज काढण्यात आलें. यांस टिळकांचे श्रम मुख्यत: कारणीभूत झाले ही गोष्ट विसरून चालवयाचें नाही. प्रोफेसर या नात्यानेंहि टिळकांची ख्याति असे. पुढें डे. ए. सोसायटीच्या धोरणासंबंधीं व इतर अनेक भानगडी उपस्थित झाल्यामुळें, या सोसायटींत फूट पडली; व त्यामुळें टिळकानी सोसायटींतुन १८९० सालीं अंग काढून घेतलें.

त्यानंतर टिळकांनां सार्वजनिक बाबतींत पडावयास फुरसत सांपडली. केसरी व मराठा पत्रेंहि त्यांच्या मालकीची झाली होतीं. त्यांनीं लोकांचीं बाजू पुढें मांडण्यास सुरवात केली. क्रॉफर्ड कमिशनच्या वेळी कित्येक मामलतदारांनां बळवंतरावानीं उत्तम प्रकारचें साहाय्य केलें. संमतिवयाचा कायदा व्हाईसरायाच्या कौन्सिलपुढें वाटाघाटीस निघाला त्यावेळीं परक्या लोकांनीं आपल्या सामाजिक सुधारणेच्या बाबतींत हात घालावयाचें कारण नाही या पक्षाचें समर्थन त्यानी केलें व त्यामुळें त्यांच्यांत व सुधारक पक्षांत खडाजंगी उडाली. हिंदु व मुसुलमान यांच्यामध्यें १८९३ मध्यें दंगे झाले त्यांचें कारण सरकारची फूट पाडण्याची कावेबाज युक्ति होय असें त्यांनीं प्रतिपादन केलें. लोकांनां राजकीय शिक्षण देण्यासाठीं १८९४ सालीं गणेशोत्सव सुरू केला; या नंतरचा शिवाजीउत्सव हाहि महाराष्ट्रांत लवकरच फैलावला. १८९५ सालीं रायगडच्या शिवाजीमहाराजांच्या समाधीच्या अनवस्थेवर त्यांनीं झणझणीत टीका केली. १८९६ त मुंबई इलाख्यांत भयंकर दुष्काळ पडला तेव्हां फॅमिनकोडप्रमाणें सरकारनें सवलती द्याव्या म्हणून टिळकांनी जोरदार लेख लिहिले व फॅमिनकोड लोकांस समजून सांगण्याकरितां त्यानीं महाराष्ट्रांत उपदेशक पाठविले. स्वत: त्यानीं तर लोकांसाठीं जिवापाड मेहनत केली. १८९७ सालीं वैशाखांत पुण्यात प्लेगचा कहर उसळला. त्यावेळीं पुण्यातील सर्व पुढारी प्लेगच्या भीतीनें बाहेर पळाले असतां एकट्या टिळकांनीं पुण्यात राहून प्लेगग्रस्त लोकांनां मदत केली. हिंदु हॉस्पिटल स्थापन केलें. प्लेगमध्यें गोर्‍या लोकांनीं अत्यंत जुलुम केल्यामुळें त्याचा शेवट रँडसाहेबाचा खून करण्यात झाला. त्याच सुमारास राजद्रोहाचा खटला टिळकांवर होऊन त्यानां १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा मिळाली. पण टिळकांच्या विद्वत्तेची कीर्ति मॅक्समुल्लर इत्यादि पाश्चात्यांच्या कानी गेली असल्यामुळें त्यांनीं महाराणी व्हिक्टोरियाकडे विनंति करून हीं शिक्षा कमी करविली व त्यांची मुक्तता करण्यात आली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर एक दोन वर्षानंतरच ताईमहाराज प्रकरण उपस्थित झालें. त्यांत टिळकांवर खटला होऊन खालच्या कोर्टानें १॥ वर्षांचीं सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली पण हायकोर्टानें त्यानां सोडून दिलें.

काँग्रेसच्या जन्मापासूनच टिळकांचें काँग्रेसकडे फार लक्ष असें. सन १८९५ त पुण्यात काँग्रेस भरली होती त्यावेळीं टिळकांनीं बराच पुढाकार स्वीकारला होता. पण काँग्रेसमध्यें विचारविनिमयाशिवाय आणि ठराव पसार करण्याशिवाय दुसरें कांहीच होत नव्हतें. या सुमारास काँग्रेस ही मेथांच्या ताब्यांत होती. ती आपल्या ताब्यांत आणण्याचा टिळकांनीं उद्योग चालविला. १९०५ सालीं वंगभंगाविरुध्द चळवळ सुरू झालीं. तिचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्यें बळवंतरावानीं अपूर्व जागृति कली. त्याचप्रमाणें सदरहू चळवळींतून निघालेली स्वदेशी-बहिष्काराची चळवळहि टिळकांनीं महाराष्ट्रांत फैलावली. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार व स्वराज्य या चतु:सूत्री महामंत्राची घोषणा सर्व हिंदुस्थानांत व विशेषत: महाराष्ट्रांत टिळकांच्यामुळें झाली. काँग्रेसनें चालविलेली भिक्षांदेहीची वृत्ति त्याज्य आहे असें टिळक व इतर तरुण पुढार्‍यानां वाटत होतें. पण त्यामुळें मवाळ उर्फ प्रागतिक पक्षांत भयंकर रणें माजून शेवटीं सुरत काँग्रेसमध्यें स्फोट झाला व टिळकपक्षीयांनीं काँग्रेस सोडली.

१९०८ च्या बाँबप्रकरणासंबंधीं केसरींतून लेख येऊं लागले. सरकारनें दडपशाहीचें धोरण सुरू केलें होतें. त्या धोरणाचे किती भयंकर परिणाम होतील याचें चित्र टिळकांनीं यथार्थ रीतीनें लोकांपुढें मांडलें. त्या निमित्तानें पुन्हां टिळकांच्यावर खटला होऊन त्यांत टिळकांनां सहा वर्षांची शिक्षा झाली. या खटल्यांत टिळकानीं, स्वत:च आपला खटला चालविला. या खटल्यामुळें टिळकांची लोकप्रियता हिंदुस्थानभर झाली.

मंडालेंत असतांना त्यांनीं गीतारहस्य हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला व तुरुंगातून आल्यावर तो प्रसिध्द केला. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी मराठ्यांत पत्र लिहून आपली राजनिष्ठा व्यक्त केली. काँग्रेसमधील दुफळी मोडून पुन्हां काँग्रेस अभेद्य करण्याचा निश्चय करून त्यांनीं तें काम तडीस नेलें; व काँग्रेसमध्यें शिरून त्यानीं लगेच १९१६ सालीं काँग्रेस आपल्या पक्षाची व जिवंत अशी बनविली. याच वेळीं त्यानीं होमरूलची चळवळ सुरू केली व सर्व महाराष्ट्रभर त्या चळवळीचा फैलाव करण्याचें काम चालविलें. त्यामुळें सरकारला भीति वाटून टिळकांकडून ४००० रुपयांची रक्कम, सद्वर्तनाबद्दल जामीन मागितली पण हायकोर्टानें त्यानां दोषमुक्त केलें.

टिळकांच्या वयाला ६० वर्षे पुरी झालीं त्यानिमित्त टिळकानां सर्व महाराष्ट्रानें मिळून एक लाख रुपयांची थैली अर्पण केली पण ती त्यानीं परत राष्ट्रसेवेंतच खर्च करावयाचें ठरविलें. महाराष्ट्रांत ठिकठिकाणीं होमरूल संस्था स्थापन करवून, काँग्रेसच्या कार्याला त्यानीं चालना दिली. या कार्याचा परदेशांत प्रसार करण्यासाठीं १९१८ सालीं टिळक विलायतेस जाण्यास निघालें पण कोलंबोहूनच त्यानां परत फिरावें लागें. १९१८ सालीं जुलै महिन्यांत मँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणांचा रिपोर्ट प्रसिध्द झाला. त्या सुधारणा निराशा-जनक, अपुर्‍या व असमाधानकारक आहेत असें टिळकानीं आपलें मत प्रसिध्द केलें व तेंच पुढें सन १९१९च्या अमृतसर काँग्रेसमध्यें त्यानीं पास करून घेतलें. तथापि याचा शक्य तो उपयोग करून घ्यावा अशाच मताचे ते होते. पुढें चिरोलच्या खटल्यानिमित्त व इंग्लंडमध्यें सुधारणासंबंधीचें हिंदी लोकांचें मत काय आहे हें इंग्लिश लोकांनां स्पष्ट कळविण्यासाठीं ते इंग्लंडास गेले. तेथें असतांना त्यानीं शांततापरिषदेकडे एक हिंदी आकांक्षा स्पष्टपणें पुढें मांडणारा खलिता पाठविला. चिरोलकेसमध्यें टिळकानां अपयश आलें व त्यानां खर्चसुध्दा चिरोलला नुकसान भरून द्यावें लागलें. पण महाराष्ट्रानें ती सर्व रक्कम टिळकांकरतां सोसली. इंग्लंडमध्यें टिळकानीं व्याख्यान व लेखनद्वारां महत्त्वाची कामगिरी केली. हिंदुस्थानांत परत येतांच टिळकांनीं पंजाब व खिलापत प्रकरणांत सरकारावर जोराची टीका केली. पण महात्मा गांधींच्या व त्यांच्यामध्यें वरील प्रश्नावर पुष्कळ मतभेद होते. १९२० मध्यें काँग्रेसडेमॉक्रटिक पक्षाची त्यानी स्थापना करून त्या पक्षाचें धोरण समजावून सांगण्याकरतां आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द केला. पण पुढें थोडक्याच महिन्यांत त्यांची प्रकृति बिघडून त्यांचें देहावसान झालें. त्यांच्या शवदहनाच्या प्रसंगी मुंबईस पांच सहा लाख लोकांची गर्दी जमली होती. त्यावरून, त्यांची लोकमान्यता प्रत्ययास येते.

टिळक व समाज सुधारणा.- समाजसुधारणा विषयक टिळकांची मतें कोणतीं होतीं हें सांगणें कठिण आहे. कारण समाजसुधारणेची नक्की दिशा त्यानीं आपल्या डोळ्यांपुढें ठेविलीच नव्हती. त्यांचें प्रमुख कार्य राजकीय स्वरूपाचें असल्यामुळें त्यानीं समाजसुधारणेच्या प्रश्नावर पूर्ण विचार केला नव्हता. त्यानीं वेळोवेळीं जी सामाजिक बाबतींत आपलीं मतें प्रतिपादन केलीं तीं मुख्यत: सामाजिक सुधारणावादी सुधारकांच्या अचकट विचकट मतांचे खंडन करण्यासाठीं व पुराणमतवाद्यांच्या संरक्षणासाठीं होती. टिळकांच्या वेळचे समाजसुधारक पाश्चात्य कल्पनांनीं भारून गेलेले, जुनें तेवढें त्याज्य या मतांचा पुरस्कार करणारे, अविचारी व अव्यवहारी होते. त्यामुळें टिळकानां त्यांच्या अतिरेकावर हत्यार उपसावें लागलें. ते स्वत: समाजसुधारणेला विरोधी नव्हतें. कोणतीहि समंजस सुधारणा करण्याच्या बाबतींत ते कधींच विरोध करीत नसत. स्वत: त्यानीं आपल्या मुलींनां चांगल्या प्रकारचें शिक्षण दिलें होतें. त्यानीं आपल्या मुलींचीं लग्नें प्रौढपणींच केलीं होतीं. तात्पर्य टिळक हें समाजसुधारणेला विरोधी होते हें म्हणणें चुकीचें आहे.

टिळक व राजकीय सुधारणा.- टिळकांचें प्रमुख कार्य म्हटले म्हणजे राजकीय हक्क हिंदुस्थानला प्राप्त करून देणें हें होय. पण तें कोणत्या दिशेनें करावयाचें त्याची दिशा त्यानीं १९१४ पर्यंत निश्चितपणें आंखली नव्हती. पण त्याबद्दल त्यानां दोष देणें योग्य होणार नाहीं. कारण टिळकांच्यावेळीं या दिशेनें विचार करणारीं माणसें हाताच्या बोटोवर मोजण्याइतकींच होतीं. तेव्हां प्रथम लोकांच्यामध्यें राजकीय जागृति करणें हेंच त्यानां आवश्यक वाटलें व त्यासाठीं जमेल त्या रीतीनें व जुळतील त्या साधनांनी त्यानीं लोकजागृति केली. १९१४ नंतर मात्र त्यांच्या राजकीय मतांनां निश्चित स्वरूप आलें. त्यांनी साम्राज्यांतर्गत स्वराज्य हेंच हिंदुस्थानचें राजकीय ध्येय (तात्पुरतें कां होईना) ठरविलें व तेवढयावरून प्रागतिकांनीं टिळक हे आमच्याच मताचा पुरस्कार करूं लागले म्हणून त्यांच्याशीं सहकार्य करण्यास सुरवात केली, पण टिळक व प्रागतिक मवाळ यांच्यामध्यें फरक हा कीं, टिळकांनीं आपल्या नेहमीच्या धडाडीनें व प्रचंड परिश्रमानें तीन चार वर्षांच्या अवधींत सर्व हिंदुस्थानमध्यें ही चळवळ फैलावली व प्रागतिकांच्या कडून तें कार्य २० वर्षांतहि झालें नव्हतें. इंग्लंडमध्यें जाऊन आल्यानंतर त्यांच्या राजकीय व सामाजिक मतांत कांहीं क्रांति घडून आली होती; व ते आणखी कांहीं काळ जगते तर स्वमतप्रसाराचें कार्य त्यानीं केलें असतें व तें पार पडलें असतें असें मानावयास जागा आहे.

टिळकांची विद्वत्ता.- टिळकांची बुध्दिमत्ता फार दांडगी होती. त्यांचे प्रमुख ग्रंथ म्हणजे ओरायन, आर्टिक होम इन दि वेदाज व गीतारहस्य हे होत. पहिल्या दोन ग्रंथांत, वेदकालनिर्णय व आर्यांचें वसतिस्थान या संबंधींचा उहापोह कला आहे. त्यांचीं मतें अद्यापि सर्वमान्य झालीं नाहींत. तथापि ती विचारक्षेत्रांत खळबळ करून टाकणारीं आहेत व साधारण विद्वानांच्या हातून त्यांचें खंडन-मंडण होणें शक्य नाहीं हीं निर्विवाद गोष्ट आहे. वेदांवरील त्यांचा व्यासंग जबरा होता. गीतारहस्यांत त्यानीं निष्कामकर्मयोगाचा पुरस्कार केला आहे. या ग्रंथानें हिंदुसमाजांत फार क्रांति करून टाकली. या ग्रंथाशिवाय 'ए मिसिंग व्हर्स इन सांख्य कारिका' हें छोटें पुस्तक, खाल्डियन लोकांसंबंधींचा त्यांचा लेख, वेदांगज्योतिषावरील त्यांचा निबंध हीं त्यांची अगाध विद्वत्ता, मार्मिकता, संशोधकबुध्दि इत्यादि गुण प्रगट करतात.

[संदर्भग्रंथ:न.चिं. केळकर-टिळक चरित्र; वा. त्र्यं. आपटे, व गं. कृ. लेले-टिळक चरित्र; डी. के. आटल्ये-लाइफ आफ बी. जी. टिळक; इंदुप्रकाश-टिळकगुणकलाप इ.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .