विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टिबेस्टी - मध्य साहारांतील डोंगराळ व अप्रसिद्ध असा एक प्रदेश. या ठिकाणी टिब्यू लोक राहातात. गस्टाव नॅक्टिगाल यानें १८७० सालीं ह्या देशाचा कांहीं भाग शोधून काढला. स. १९१० पर्यंत या ठिकाणीं कोणताहि यूरोपिअन फिरकला नाहीं स. १८९९च्या ऍंग्लोफ्रेंच करारान्वयें टिबेस्टी फ्रान्सकडे सोपविण्यात आला.