विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
टिकमगड - मध्यहिंदुस्थान, बुंदेलखंड. हें ओरच्छा संस्थानाच्या राजधानीचें ठिकाण आहे. लोकसंख्या (१९११) १५४९५. यांतील मुख्य इमारती म्हटल्या म्हणजे महाराजाचा वाडा व किल्ला या होत. या गांवांत हायस्कूल, दवाखाना, डाक बंगला, सराई व पोस्ट ऑफिस हीं आहेत.