प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टॉलस्टॉय, लिओ (१८२८-१९१०)- रशियांतील एक विख्यात कादंबरीकार व समाजसुधारक. याचा जन्म ता. ९ सप्टेंबर १८२८- कोणीं म्हणतात ता. २८ आगस्ट-रोजीं झाला. टॉलस्टॉयचें घराणें मूळचें जर्मन असून तें पीटर दि ग्रेटच्या काळांत रशियांत राहण्यास आलें. याच्या पूर्वजांपैकीं प्रथमच लौकिकास चढलेला मनुष्य पीटर अँड्रिव्हिच टॉलस्टॉय हा होय. टॉलस्टॉयचा बाप निकोलस हा सैन्यांत कांहीं दिवस नोकरीवर होता. पुढें त्याचें लग्न मराया व्हॉयकनस्काया नांवाच्या एका राजकन्येशीं झालें. कौंट टॉलस्टॉय हा या दांपत्याच्या पांच अपत्यांपैकीं चौथें असून याची आई हा तीन वर्षांचा असतांना वारली. यानंतर सहा वर्षांनीं त्याचा बापहि वारला. लहानपणीं टॉलस्टॉय विचारशील व शोधकबुद्धीचा, प्रत्येक गोष्टीचें निरीक्षण करणारा असे खरा; परंतु, त्याची बुद्धिमत्ता त्यावेळेस फारशी झळकली नाहीं. त्याच्यावर मायेच्या दृष्टीनें नजर ठेवणारा कोणींच शिल्लक न उरल्यामुळें त्याला ही उणीव फार जाचक वाटे. तो मोठा झाल्यावरसुद्धां याच कारणानें आपल्या स्नेहीमंडळींतसुद्धां फारसा न मिसळतां तासचे तास एकान्तांत चिंतन करण्यांत घालवी. त्याच्या लहानपणांत एक दिवस त्याच्या मनांत ''मरणाचें ताट आपल्यापुढें नेहमींच वाढून ठेविलेलें आहे; आपल्याला सुखी व्हावयाचें असेल तर चाललेली घडी आपली समजून भविष्यकालाचा विचार न करतां आनंदांत काळ घालवावा'' असे विचार कसे आले त्याचे त्यानें वर्णन लिहून ठेविलें आहे. असे विचार येतांच त्यानें आपल्या पेन्सिली व बुकें फेंकून देऊन, बिछान्यावर पडून खाणें, पिणें, मजा मारणें, कादंबर्‍या वाचणें वगैरेंत काळ घालविण्यास सुरवात केली. तरी परंतु, त्याच्या बापाला शिकारीचा वगैरे नाद असल्यामुळें, त्याच्या नादानें या प्रकारच्या त्याच्या वागण्यास थोडासा आळा बसला.

बापाच्या मृत्यूनंतर टॉलस्टॉय व त्याचीं भावंडें यांचें पालकत्व त्याच्या एकामागून एक दोन आत्यांकडे आलें. जुकशाव्ह या अत्येचीं नीतीसंबंधाचीं मतें फार उदारपणाचीं होतीं, व ही बाई संगतिप्रिय असल्यामुळें कोणाहि आल्यागेल्यास तिच्या घरीं मज्जाव नसे. या बाईच्या देखरेखीखालीं येण्याच्या वेळेत टॉलस्टॉय ११ वर्षाचा होता व या बाईच्या वर्तनाचा त्याच्यावर जो परिणाम झाला तो एकंदरीनें वाईटच होता, असें टॉलस्टॉय स्वत: पुढें म्हणे. काझन येथील युनिव्हर्सिटींत प्रवेश करण्यापूर्वीं टॉलस्टॉय व त्याचीं भावंडें एका फ्रेंच शिक्षकाच्या हाताखालीं शिकत असत. फुरसतीच्या वेळीं टॉलस्टॉय आपले दिवस मानवी चरित्रासंबंधाच्या निरनिराळ्या पश्नांचा विचार करण्यांत घालवी, व कधीं कधीं तो तालमींत कसरतहि करीत असे.

आपल्या वयाच्या १५ व्या वर्षी टॉलस्टॉय युनिव्हर्सिटींत शिरला. या (काझन) युनिव्हर्सिटींत बडे बापके बेट्यांचा लौकर प्रवेश होई. असला या युनिव्हर्सिटीचा लौकिक असल्यामुळें टॉलस्टॉयला आपल्या आवडत्या विषयावर म्हणजे समाजासंबंधीं उत्पन्न होणार्‍या निरनिराळ्या प्रश्नांवर विचार करण्यांत सांपडत असे. मनुष्यानें जगांत कशाकरितां जगावयाचें अशासारख्या गहन प्रश्नांवर टॉलस्टॉय नेहमीं विचार करीत असे; व चिमणीनें दाणे टिपल्याप्रमाणें इतर ग्रंथकारांच्या वचनांची कंथा बनविण्यापेक्षां स्वत:चे विचार प्रगट करण्याकडे याचा जास्त कल असे. याप्रकारच्या परिस्थितीमुळें त्याचें लक्ष पौर्वात्य भाषांकडे वळलें. परंतु त्याच्या अष्टपैलु बुद्धीला तो एकांगी अभ्यास रुचेना, तेव्हां १८४५ सालीं त्यानें कायद्याकडे आपला मोर्चा वळविला. इतिहास, धर्म व कायदा यांचे अध्ययन करून त्यांत युनिव्हर्सिटीची पदवी घ्यावयाची असा शेवटीं त्याला बेत करावा लागला. धार्मिक बाबतींत त्याचें विलक्षण मतांतर होऊन टॉलस्टॉय पुरा नास्तिक बनला. इतिहास हा विषय तो कुचकामाचा समजे. शेवटीं १८४७ सालीं प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळें युनिव्हर्सिटी सोडून टॉलस्टॉय बाहेर पडला व येथेंच त्याच्या शिक्षणाची इतिश्री झाली. याच्या बुद्धीची व स्वतंत्र विचारांची कांहीं थोडे लोक तारीफ करीत. परंतु, या त्याच्या सोबत्यांपैकीं एकाच्या मनांत टॉलस्टॉय म्हणजे पुढें सबंध रशियांतील प्रख्यात कादंबरीकार होणार आहे असें आलें नसेल.

पुढें शेतीभातीकडे लक्ष देऊन शेतकीची स्थिति सुधारावी व जमीनदार या नात्यानें आपलें कर्तव्य बजावावें म्हणून टॉलस्टॉय आपल्या गांवीं आला. परंतु १८४७ सालींच दुष्काळ पडून लोकांची अन्नान्नदशा झाली. युनिव्हर्सिटींत काळ कंठीत असतांना यानें जीन जॅक्स रूसोयाचे ग्रंथ वाचले होते. साधी राहणी, कामांत सचोटी, वगैरे बद्दलच्या रूसोच्या मतांचा याच्यावर विलक्षण परिणाम झालेला होता. या ध्येयाच्या प्राप्त्यर्थ प्रयत्‍न करावयाचे म्हणून तो मोठ्या उत्साहानें उद्योगास लागला. परंतु, वारंवार येणार्‍या निराशेच्या लाटांशीं झगडण्याइतकें आत्मबल टॉलस्टॉयपाशीं अद्यापि आलेलें नव्हतें. म्हणून सहा महिनेपर्यंत असा झगडा करून शेवटीं त्यानें या बाबतींतला प्रयत्‍न टाकून दिल्यासारखें केलें, व अखेर तर त्यानें आपल्या भावाच्या संगतींत शिकार करणें, द्यूत खेळणें, वगैरेंत काळ काढून उच्च विचार अजीबाद वार्‍यावर सोडून दिले. १८५१ सालीं हा आपल्या निकोलस नांवाच्या वडील भावाजवळ जाऊन राहिला व तेथें दरमहा १२ शिलिंग भाड्यानें एक झोंपडी घेऊन तींत अत्यंत काटकसरीनें राहूं लागला. पुढें भावाच्या व मोठमोठ्या हुद्यांवर असलेल्या नातलगांच्या भिडेमुळें टॉलस्टॉय लष्करांत शिरण्यास तयार झाला. टिफिस येथें जाऊन जरूर ती परीक्षा पास होऊन त्या वर्षींच्या हिंवाळ्यांत तो लष्करांत सामील झाला. काकेशस पर्वतांतील लोकांपासून रशियाला या कालांत अत्यंत त्रास पोंहोंचत असे. हे लोक वारंवार येऊन पुंडावा करीत व लूट लुटून नेत. तथापि लष्करी काम किंवा खेळ यांत टॉलस्टॉयचें मन कधींच पूर्णपणे रंगलें नाहीं; आणि आतां त्याच्या ईश्वरदत्त देणगीच्या सुप्त असलेला प्रभाव जणू जागृत झाला व त्यानें लेखणी उचलली. त्याचे सुरस ग्रंथ एकामागून एक बाहेर पडूं लागले. 'चाइल्डहुड' ('बाल्य') हा त्याचा पहिला ग्रंथ होय. टॉलस्टॉय यावेळीं चोवीस वर्षांचा होता. या ग्रंथानंतर 'लँडलॉर्डस् मॉर्निंग (जमीनदाराचा उष:काल), 'बॉयहुड ('पौगंडावस्था), 'युथ' (तारुण्य) वगैरे त्याचे ग्रंथ एकामागून एक प्रसिद्ध होऊं लागले. तो आपल्या मित्रांनां चरफडून सांगें कीं, ''बाबांनों, मानवी जीविताचें रहस्य, व सुखाचें साधन आपल्यास अजून उमगलें नाहीं. साध्या सृष्टिनियमानुसार चालणार्‍या जीवितक्रमांत काय मौज आहे. ती अनुभवून पहा म्हणजे सृष्टीच्या नियमानुसार, त्यांत कृत्रिमपणा न आणतां वागण्यांतच खरें सुख आहे, सृष्टिवैभवाच्या अवलोकनांतच काय ती मौज आहे, सृष्टींशीं हितगुज करणें यांतच शुद्ध ब्रह्मानंद आहे असें तुमच्या अनुभवास येईल.'' याच वेळेस क्रिमिअन युद्ध सुरू होत होतें व टॉलस्टॉयहि कंटाळून घरीं परत जाऊं इच्छित होता.

टॉलस्टॉय स्वदेशीं आला तेव्हां तो अगदींच निराळ्या विचाराचा असा बनून आला. नि:स्वार्थबुद्धीनें देशाकरितां शत्रूंशीं लढणारे शिपाई व त्यांची कामगिरी डोळ्यांनीं पाहून आल्यानंतर, स्वार्थासाठीं धडपडणार्‍या उमरावांकडे पाहिल्याबरोबर त्याला या उमरावांपेक्षां ते सामान्य शिपाईच बरे वाटेल. त्यानें जे जे प्रसंग डोळ्यांनीं पाहिले, गरीब शिपायांचा भावार्थीपणा जो त्याच्या दृष्टीस पडला, त्याच्या योगानें त्याचा परमेश्वरावरील विश्वास वाढत चालला. सेबॅस्टपूल व काकेशस येथील गोष्टींच्या वर्णनानें त्याच्या कीर्तीत भर टाकली होती. रशियांत परत आल्यानंतर अधिकारी व सामान्य जनता त्याचें स्वागत करण्यास तयार होती. त्याचें 'बाल्य' हें पुस्तक ज्या मासिकांत प्रथमत: प्रसिद्ध झालें त्याच्या लेखकवर्गांत बरीच ठळक ठळक मंडळी होती. या ग्रंथकारांच्या ओळीस बसण्याचा मान मिळणें ही मोठीच गोष्ट समजली जात असे. चोहोंकडून असा मानमरातबांचा वर्षाव होऊं लागल्यावर त्याची संन्यासप्रिय वृति लुप्त होत चालली होती. तरी एका अर्थी त्या वृत्तीचा विकासहि त्याचमुळें झाला असें म्हणावयास हरकत नाहीं. त्याची मूळची प्रवृत्ति हळू हळू जोरावूं लागली व सत्यसंशोधनाकडे त्याचा कल वळला. सोयगैरसोय व कृत्रिम आचार या गोष्टींचे जे भोक्ते होते त्यांचा या निर्भेळ सत्यसंशोधकाशीं वारंवार मतभेद उत्पन्न होऊं लागला.

टॉलस्टॉयला याप्रमाणें आपल्या परिस्थितीचा वीट येत चालला होता. दुसरा अलेक्झांडर गादीवर बसल्यापासून रशियामध्यें 'समाज' व 'प्रगति' ह्या दोन गोष्टी रशियन लोकांच्या कानाला फार प्रिय वाटत. जर्मनीमध्येहि तीच स्थिति होती. सामाजिक कादंबरी या वाड्मयप्रकारचा उदय जर्मनींतच आरंभिला गेला व तेथून ती लाट रशियांत आली. या जर्मन गोष्टीचा टॉलस्टॉयच्या मनावर कायमचा संस्कार होऊन, आपल्या अंत:करणांत गुप्त असलेल्या विचारांचाच प्रतिध्वनि जर्मनींत झालेला पाहतांच त्याला आत्मप्रत्यय आला. आजपर्यंत स्वस्थ बसल्यानें जणूं ठाणबंद झालेल्या त्याच्या स्फूर्तीला एकदम चेंव येऊन त्यानें 'पॉलि कौश्य' ही कादंबरी लिहिली. शेवटीं प्रगति व सुधारणा या गोष्टींनीं त्याला भारून टाकलें व इतर देशांतील संस्थांचा अभ्यास करण्यासाठी तो १८५७ सालच्या जानेवारी महिन्यांत जर्मनींत गेला. टॉलस्टॉयनें रशियाची सरहद्द फक्त तीनदां ओलांडिली व तीहि १८५७ ते १८६१ च्या दरम्यान.

इ. स. १८६१ मध्यें तो परत आला. नंतर त्यानें परदेशांत मिळविलेल्या माहितीवर विचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या मनानें त्याला चोहोंकडे निराशाच दिसत होती. जर्मनीमधील शिक्षणपद्धति मात्र नाहीं म्हणावयास त्याला कांहींशी आवडली. त्यानें जर्मनींत असतांना ऑरबॅकची ओळख करून घेतली. ऑरबॅकच्या प्राथमिक शाळांसंबंधाच्या विचारांनीं टॉलस्टॉयच्या मनावर बराच पगडा बसविला. फ्रोबेलच्या किंडरगार्टन पद्धतीनें तर जवळ जवळ याला भारून टाकलें. या पद्धतीवर शाळा काढण्यासाठीं खटपट करून त्यानें परवानगी मिळविली; व उत्साहाच्या तडफेबरोबर त्यानें 'यस्न्ययपोल्यन' नांवाचें एक शिक्षणविषय नियतकालिक काढण्यास सुरुवात केली. ही शाळा काढण्यास टॉलस्टॉयनें वेळ मोठी चांगली पाहिली. कारण रशियांत यावेळेस सर्वत्र उदारमतवादीपणाचें वारें संचारलें होतें, नव्या मनूला आरंभ झाला होता. टॉलस्टॉयची शाळा सर्वच बाजूंनीं 'मोफत' होती. टॉलस्टॉय फी घेत नसे इतकेंच नव्हें तर मुलें शाळेंत वाटेल तेव्हां येत; वाटेल तेव्हां जात, व वाटेल तें शिकत. ज्या गोष्टीला सक्तीचा नुसता वास येत आहे तिच्यापासून देखील राष्ट्राचें अकल्याण होईल अशी त्याची भावना होती.'' आपल्या अंत:- करणप्रवृत्तीला पटत नाहीं असल्या अभ्यासक्रमाचें जोखड मानेवर घेण्याचें नाकारण्याची परवानगी- इतकी स्वतंत्रता विद्यार्थ्याला असली पाहिजे '' असें त्याचें मत होतें. पुढच्या पिढीला काय पाहिजे हें जुन्या लोकांपेक्षां त्यांचें त्यांनांच कळतें असें तो म्हणे. अशा तत्त्वांवर टॉलस्टॉयची शाळा त्याच्याच घराशेजारच्या एका घरांत सुरू झाली; टॉलस्टॉय स्वत: चित्रकला, गायन व बायबल शिकवी. 'ओल्ड टेस्टॅमेंट' हें त्याचें आदर्शपुस्तक असून या पुस्तकावांचून कोणतीहि शिक्षणपद्धति पुरी नाहीं, व या पुस्तकाचा कित्ता प्रत्येक पुस्तककर्त्यानें घ्यावा असें तो म्हणे.

टॉलस्टॉयचीं मतें सरकारमान्य नसल्यामुळें त्याच्या शाळेकडचा लोकांचा ओढा कमी होत चालला. दुसर्‍या वर्षी त्याला शाळा बंद करावी लागून त्याचें नियतकालिकाहि थंडावलें. या गोष्टीनें त्याच्या मनाला एक प्रकारें धक्का बसला. पुढें कांहीं काळानें टॉलस्टॉयनें पुन्हां परवानगी मागितली; परंतु, सरकारी अधिकार्‍यांनीं उर्मटपणानें ती नाकारिली.

टॉलस्टॉयचीं सामाजिक मतें आतां पूर्ण विकसित झालेलीं होतीं. तो सामान्य जनतेपुढें शिष्ट लोकांनां तुच्छ मानी. ''शिष्ट लोकांनीं 'प्रगति' व 'शिक्षण' यांचा अर्थ एकच समजण्यांत मोठी चूक केली व म्हणून ह्यांनीं सुरू केलेल्या सक्तीच्या शिक्षणाचे घातुक परिणाम झाले. मनुष्याच्या आयुष्यक्रमांत त्याचें शील बनविण्याच्या कामीं लिहिणें व वाचणें या दोन गोष्टींचा उपयोग फार थोडा आहे व मनुष्याची जीवितयात्रा सुखावह करण्याच्या कामीं त्यांची फारशी जरूरी नसते'' असें याचें मत होतें. ''हे प्रश्न जनतेवरच सोंपविणें बरें, जनतेला काय पाहिजे हें तिचें तिलाच अधिक कळतें,'' असा एकंदर टॉलस्टॉयच्या मतांचा मथितार्थ आहे. ''शिष्टंमन्य लोकांपेक्षां सामान्य जनता हीच अधिक बलवान्, अधिक स्वतंत्र विचाराची, अधिक न्यायी असून तिलाच माणुसकीची चाड अधिक आहे. तेव्हां समाजाला सामान्य जनतेचीच जरूर अधिक. सामान्य जनतेनें शिष्टंमन्य लोकांच्या शाळांतून जाण्यापेक्षां या लोकांनींच जनतेपासून धडे घेतले पाहिजेत,'' हे टॉलस्टॉयचे विचार फ्रेंच सुधारक रूसा याच्या विचारासारखेच आहेत. पुढें टॉलस्टॉय सामाजिक बाबतींत पूर्वींपेक्षां अधिक लक्ष घालूं लागला. या अवधींत त्यानें 'थ्री डेथस' (तीन मृत्यू, १८५९) व 'कोसाक्स' (१८६३) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. यांपैकीं कोसाक्स ग्रंथ 'तीन मृत्यू' या ग्रंथापूर्वींच दहा वर्षें लिहिला गेला होता. ह्याची मुख्य कल्पना म्हणजे ''सुधारणा-भौतिक सुधारणा-ही खर्‍या सुखाच्या वाटेंतील एक धोंड आहे '' ही होय. यानंतर टॉलस्टॉयचें त्याची जुनी मैत्रीण सोफाया हिच्याशीं लग्न झालें. सोफायाचा बाप एक शोकीन डॉक्टर असून त्याचा जन्म, शिक्षण वगैरे मॉस्को शहरींच झालें होतें. सोफाया ही त्याची दुसरी मुलगी. टॉलस्टॉयला एकंदर १३ अपत्यें झालीं; पैकीं, पहिल्याचा जन्म १८६३ च्या जूनमध्यें झाला. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतींत तो प्रयोग वगैरे करण्याच्या भानगडींत पडला नाहीं. तो मुलांनां शिक्षा फार थोडा वेळ करी. त्याची मुख्य शिक्षा म्हणजे ज्यानें कांहीं अपराध केला असेल त्याच्याशीं इतरांनीं अबोला धरावयाचा ही होय; व हा बहिष्कार त्या मुलानें स्वत:चा अपराध कबूक करीपर्यंत काढावयाचा नाहीं. टॉलस्टॉय आपल्या मुलांत मिसळून खेळे, त्यांच्याशीं कसरत वगैरे करी. त्याला स्वत: हातानें श्रमाचीं कामें करण्याचा नाद होता. त्याच्या शेतीभातीच्या कामाकडे त्या गोष्टीचा चांगला उपयोग होई. हा बाहेर फिरावयास गेला म्हणजे एखाद्या मजुराचें खुरपें किंवा विळा घेऊन मोठ्या आवडीनें काम करूं लागे.

'युद्ध व शांतता' व ' अ‍ॅना कॅरेनिना' या त्याच्या दोन कादंबर्‍या त्यानें या वेळेसच सुरू केल्या. परंतु रशियामधील 'काँझरव्हेटिव्ह' किंवा 'लिबरल, या दोन्ही पक्षांनीं त्याचा फारसा आनंदानें स्वीकार केली नाहीं. स्वभाववर्णन करण्यांत टॉलस्टॉय हा कुशल असे खरा; परंतु त्याला कादम्बरी लिहिण्याकरितां मुद्दाम म्हणून प्रयत्‍न करावा लागे. 'लेखणी घेऊन लिहावयास बसल्याखेरीज स्फूर्ति उत्पन्न होत नाहीं', असें तो म्हणे.

या कादम्बर्‍याच्या संबंधानें टॉलस्टॉय व त्याचा स्नेही फेट यांच्यांत जो पत्रव्यवहार झाला त्यांत टॉलस्टॉयच्या शेतकीबद्दल व जमीनदारीबद्दल किरकोळ उल्लेख आहेत. तो म्हणे 'गुमास्ते, मुकादम, वगैरे लोक शेतीच्या कामीं अगदीं कुचकामाचे होत. त्यांच्यामुळें शेती वाढण्याच्यां ऐवजीं कमी मात्र होते. या सर्वांनां हांकून देऊन मालक जरी १०-१० वाजेपर्यंत बिछान्यांत पडून राहिला तरी त्यापासून फारसें नुकसान होणार नाहीं.''

टॉलस्टॉयनें विश्रांति न घेतां कादंबर्‍या लिहिण्याचें काम चालविलें होतें. परंतु, हे एकदम केलेले श्रम त्याला सहन झाले नाहींत व तो आजारी पडला; व १८७० सालीं त्याच्या बायकोनें त्याला समर येथें जाण्याची सल्ला दिली. समर येथील डॉक्टरांची पद्धति वगैरे त्याला पसंत होती. तो राहत होता त्या ठिकाणच्या लोकांची रहाणी वगैरे याच्या स्वभावाला अनुरूप अशीच होती. समर येथील या सफरीनें त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला कीं, त्यानें लागलीच २००० एकरच्यावर जागा तेथें विकत घेतली. परंतु पुढें लवकरच दुष्काळ वगैरे पडल्यानें त्याला त्यापासून व्हावें तितकें सुख झालें नाहीं. टॉलस्टॉयनें शोपेनहारच्या तत्त्वज्ञानाचा थोडासा अभ्यास केला व त्याच्या ग्रंथांचीं भाषांतरें करण्याचा उद्योग त्यानें आरंभिला.

कांहीं दिवस याप्रमाणें थोडेसे शांततेंत गेल्यावर टॉलस्टॉयवर संकटें येऊं लागलीं. १८७३ सालीं त्याचीं दोन मुलें वारलीं; व लागलीच त्याची प्रेमळ आत्या एर्ग्लोस्काय हीहि वारली. या गोष्टींनीं व रूसो-टर्किश युद्धामुळें त्याचे विचार अधिकच प्रौढ बनले. पारमार्थिक विचारांकडे त्याचें मन जास्त जाऊं लागलें.

टॉलस्टॉय आतां आपल्या आयुष्याच्या तिसर्‍या अवस्थेंत होता. त्यानें स्वत:च आपल्या मानसिक विकासाच्या तीन अवस्था लिहून ठेविल्या आहेत. पहिली अवस्था म्हणजे आपल्या स्वत:च्या वैयक्तिक सुखाकरितां काळ काढणें ही होय. ह्या अवस्थेंत तो वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत होता. नंतर, समाजाच्या कार्यार्थ झटणें ही दुसरी अवस्था होय. पण, सर्वांत महत्त्वाची अवस्था म्हणजे तिसरी. या अवस्थेंत 'परमेश्वराची भक्ति' हेंच त्याचें अवतारकार्य होऊन बसलें होतें. धर्मसंबंधानें त्याचीं मतें प्रत्येक अवस्थेंतून गेलेलीं होतीं. लहानपणीं तो निमूटपणें देवळांतून प्रार्थनेंसाठीं वगैरे जात असे. तारुण्यांत त्यानें धर्माला केव्हांच रजा दिली होती; व पुढें प्रौढावस्थेंत पुन्हां त्याचे विचार आस्तिक्याकडे वळले. परंतु अखेर 'रूसो-टर्किश' युद्धांत 'भिक्षुकवर्ग' शत्रुनाशासाठीं प्रार्थना करितांना पाहून त्याची भावार्थबुद्धि नष्ट झाली व तो तत्त्वविषयक विचारांकडे वळला. येणेंप्रमाणें कादम्बरीकार टॉलस्टॉयचा अखेर तत्त्वज्ञ टॉलस्टॉय बनला. दिवा मालविण्याच्या वेळेस जशी त्याची ज्योत मोठी होते तद्वत् टॉलस्टॉयच्या प्रतिभेनें पुन्हां एकदां उचल खाल्ली व 'इव्हान इलिइचचा मृत्यु' व 'अज्ञानाचा तडाखा' या त्याच्या कादंबर्‍या बाहेर पडल्या. परंतु, या पुढचे त्याचे लेख बहुतेक नीतिविषयक होते. यावेळेस त्याचें वय ५० वर्षाचें होतें. त्याचें आयुष्य बाह्यत: दिसण्यांत शांततेचें होतें खरें; पण त्याला अनेक प्रकारचा मानसिक त्रास भोगावा लागला होता.

'साधेपणा' हें त्याच्या राहणीचें आद्य तत्त्व होऊन बसलें होतें. परंतु एवढी खटपट जरी केली तरी टॉलस्टॉयला घरादाराचा त्याग करतां आला नाहीं. टॉलस्टॉयला जरी साधु बनावयाचें होतें, तरी मित्रमंडळी व इतर नात्यागोत्याचे लोक यांच्याकडे त्याला अगदीं दुर्लक्षच करितां आलें नाहीं. त्याला शहरच्या राहणीचा मनापासून कंटाळा आला होता. ''मनुष्याच्या गरजा जेवढ्या थोड्या तेवढा तो जास्त सुखी'' असें तो म्हणे. या त्याच्या एकंदर विचारामुळें त्याच्या मन:स्थितींत विलक्षण फरक पडला. कॉकेशसमधील 'डॉऊकहॉबरस्' नांवाच्या लोकांच्या चळवळींत हा शेवटीं शेवटीं पडला होता; व 'रिसरेक्शन' नांवाचा आपला ग्रंथ त्यानें या लोकांच्या मदतीदाखल लिहिला. या पुस्तकांत त्यानें जुन्या धार्मिक लोकांवर टीका केली. त्यामुळें १२ फेब्रुआरी १९०१ रोजीं त्याच्यावर धर्मगुरुंच्या आज्ञेनें बहिष्कार पडला. पुढें पुढें हा सर्व चळवळींत मन घाली. परंतु म्हातारपणामुळें त्याच्यानें सर्व गोष्टी झेंपत नसत. टॉलस्टॉय हा ता. २० नोव्हेंबर १९१० रोजीं अस्टपॉवो येथें निमोनिआच्या विकारानें मरण पावला.

''आपण जगतों कां?'' व ''आपण आपलें जिणें कसें जगवावयाचें ?'' या दोन प्रश्नांचीं समाधानकारक उत्तरें त्याला त्याच्या हयातींत मिळालींच नाहींत. ''मनुष्याचें जिणें म्हणजे एक वेड्याखुळ्यांचा बाजार आहे. व जगावयाचें म्हणजे आहे तें गोड करून रहावयाचें इतकेंच''! असें त्याचें मत होतें. त्याच्या मतें, जर कोणाचें जीवित चांगलें व सुखी असेल तर तें शेतकर्‍यांचें व दरिद्री लोकांचें होय. इतर प्राण्यांप्रमाणें अतिशय थोड्या गरजांत आपलें काम भागवून राहणें हेंच सुखमय जीवित असें तो म्हणे. परमेश्वराच्या निर्देशाप्रमाणें वागणें म्हणजे सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून सर्वांभूतीं नम्र होऊन सर्वांना उपकारक होईल अशा तर्‍हेनें वागणें होय असें टॉलस्टॉय म्हणत असे. या शुद्ध धर्मतत्त्वांखेरीज इतर गोष्टी त्याला अगदीं नापसंत होत्या. म्हणजे थोडक्यांत सांगावयाचें तर टॉलस्टॉय हा नास्तिक नव्हता तर त्याचा ख्रिश्चन आचारां विचारांवर विश्वास नसे इतकेंच. बायबल वाचून त्याचें असें मत झालें कीं, येशूनें पांचच नव्या आज्ञा पाळावयास सांगितल्या आहेत- (१) सर्वांशी गुण्यागोविंदानें राहाणें. अक्रोध, रागशून्यता, हा ख्रिस्तानुयायांचा पहिला गुण होय. (२) एकपत्‍नीव्रतानें राहणें. (३) शपथ मुळींच न घेणें (यामध्यें कायद्याच्याकोर्टांतील शपथाहि येतात). (४) पापाचा प्रतिकार न करणें. पाप नाहींसें करण्याचा उपाय, तें होण्याचीं कारणेंच नाहींशीं करणें हा होय. जबरदस्तीनें दाबून टाकून पापें नाहींशीं होत नाहींत. आणि (५) ''आपल्या शत्रूंवरहि प्रेम करा'' ही ख्रिस्ताची पांचवी आज्ञा होय. अर्थांत् लढाया वगैरेंनां ख्रिस्ती धर्माची अनुज्ञा मुळींच नाहीं.

टॉलस्टॉयचीं मतें त्याच्या स्वत:च्या ग्रंथांत जितकीं स्पष्टपणें नमूद झालेलीं आहेत तितकीं कोठेंहि नसतील. 'बाल्य' (१८५२), 'पौगंडावस्था' (१८५४) व 'तारुण्य' (१८५५-५७) हे ग्रंथ जवळ जवळ आत्मचरित्रपरच म्हटले तरी चालतील. याच्या ग्रंथांत कथानक वगैरे फारसें नसून विचारांची उत्क्रान्तीच विशेषत: दाखविलेली आहे. याची कळकळ व आस्था हीं कौतुक करण्यासारखीं आहेत. 'युद्ध व शांतता' (१८६४-६९) या पुस्तकांत त्यानें रशियन समाजाचें चित्र रेखाटलें आहे. पुरुषांनां कीर्ति मिळविण्याची व सुख भोगण्याची हांव सुटलेली, व बायकांनां गप्पागोष्टी करण्याची हांव सुटलेली होती, असें यांत दाखविलें आहे. पीटर बेझोचॉव हें चित्र टॉलस्टॉयनें फारच सुंदर रंगविलें आहे. हा गृहस्थ म्हणजे प्रति टॉलस्टॉयच होय. याच्या नंतरचें पुस्तक म्हणजे ' अ‍ॅना कॅरिनाना' हें होय. यांत अलीकडच्या रशियन समाजाचें चित्र रेखिलें असून प्रेमाभावामुळें शुष्क भासणारें वैवाहिक आयुष्य व प्रेमार्द्रतेमुळें सुखमय वाटणारें वैवाहिक आयुष्य यांच्यांतला विरोध मार्मिकपणें दाखविला आहे. १८९० सालीं यानें 'क्रूझर सोनाटा' नांवाचें पुस्तक लिहून यांत रशियांतील विवाहसंस्थेवर तडाखे ओढले आहेत. टॉलस्टॉयचे ग्रंथ ज्यांनां माहीत नव्हते असले वाचक तर ह्या ग्रंथानें स्तंभितच झाले. जेथें शुद्ध प्रेम आहे असलेंच लग्न व तेंहि केवळ मानववंश चालावा या हेतूनें केलेलें क्षम्य आहे. इतर लग्नें नीतिपोषक नसून उलट नीतीचा घात करणारीं होत, असें टॉलस्टॉयनें यांत प्रतिपादिलें आहे. १८९८ सालीं 'कला म्हणजे काय?' या विषयावर त्यानें पुस्तक लिहून सौदर्यशास्त्राची मीमांसा केली आहे. या भावनेच्या सर्व व्याख्या नापसंत ठरवून कला म्हणजे ज्याच्या योगानें एकाच्या मनांतील भावना दुसर्‍याच्या मनांत उद्भूत होते ती होय, असें टॉलस्टॉय यानें ह्मटलें आहे. देशाभिमान, धर्माभिमान किंवा वैषयिक प्रेम यांपैकीं कोणत्याहि गोष्टीचा पगडा न बसतां ज्याच्या योगानें मनांत प्रेम व आदर उत्पन्न होतो ती कला तें सौदर्य असें टॉलस्टॉय म्हणत असे. निरभिलाष आनंद ज्यापासून होतो तें सौदर्य, ही कोंटची व्याख्या किंवा शेले व हेगेल यांची 'पूर्णावस्थेची जवळजवळ बरोबरी करणारें तें सौदर्य' ही व्याख्या या सर्व टॉलस्टॉयनें नापसंत ठरविल्या होत्या. या विषयावर विचार करण्यांत त्यानें १५ वर्षें घालविलीं होतीं.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .