प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टाटा, जमशेटजी नसरवानजी (१८३९-९०४). एक हिंदी कारखानदार. यांचा जन्म १८३९ सालीं, नवसरी येथें एका मध्यम स्थितीच्या परंतु कुलीन अशा घराण्यांत झाला. लहानपणापासून टाटांच्या अंगी चिकाटी आणि दृढनिश्चय हे गुण प्रामुख्यानें दिसून येत. नवसरी येथें उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळें, वयाच्या तेराव्या वर्षीं टाटास मुंबईस पाठविण्यांत आलें. मुंबईत १८५८ सालापर्यंत 'एलफिन्स्टन इन्स्टियूशन' मध्यें टाटानीं शिक्षण संपादिलें. याच सुमारास जमशेटजींच्या बापाला व्यापारांत थोडाफार फायदा होऊन त्याची सांपत्तिक स्थिति सुधारली. तो चीन देशाशीं अफूचा व्यापार करीत असे. व्यापारधंद्यातील लहान सहान गोष्टीचें ज्ञान व्हावें या हेतूनें टाटानीं आपल्या बापाच्या 'फर्म' मध्यें कांहीं काळ काम केलें. याच सुमारास संधि साधून, टाटा हाँगकाँग शहरीं गेले व चीनशीं व्यापार करण्यास लागणारें अवश्य ज्ञान त्यानीं मिळविलें.

यावेळीं टाटा कापसाचा व्यापार करीत असून मेसर्स प्रेमचंद रॉयचंद यांच्याशीं टाटांचा व्यापारी नात्यानें चांगला जम बसला होता. पुढें यंत्रकलेचें संपूर्ण ज्ञान मिळविण्याकरितां जमशेटजी मँचेस्टर येथें जाऊन परत हिंदुस्थानांत आल्यावर, नागपूर शहरीं १८७७ सालीं गिरणी उघडण्याचा समारंभ झाला. टाटांच्या अचाट धैर्यामुळें व दीर्घ प्रयत्‍नामुळें या एम्प्रेस मिलला अपूर्व यश मिळालें.

एम्प्रेस मिलला मिळालेलें यश पाहून, लोंकर विणण्याचा आणखी एक कारखाना काढावा अशी कल्पना टाटांच्या मनांत आली. याला अनुसरून टाटानीं एक नवीन कम्पनी स्थापन करून तिला 'स्वदेशी मिल' असें नांव दिलें. याच सुमारास, मुंबई इलाख्यांतील सर्वांत मोठ्या गिरण्यापैकीं एक जी 'दि धरमती मिल' ती विक्रीस निघाली. ती टाटानीं विकत घेतली. या गिरणीचा कारभार सुरळीत चालण्यास प्रथम अनेक अडचणी आल्या. परंतु कंबर बांधून, टाटानीं सर्व अडचणींस मोठ्या धैर्यानें तोंड दिलें व अखेर यश संपादन केलें. कापूस कांतण्याच्या व विणण्याच्या यंत्रांमधील सर्व नवीन नवीन शोधांस टाटानीं योग्य स्थान दिलें व आपल्या शोधकदृष्टीनें प्रत्येकाचें पूर्ण परीक्षण करून यंत्रांत बरीच सुधारणा घडवून आणली. वरील सर्व प्रयत्‍न यशस्वी झाल्यानंतर टाटानीं हिंदुस्थानांतील कापसाच्या लागवडींत लक्ष घालून, लांब धाग्याचा कापूस निर्माण करण्याविषयीं प्रयत्‍न केले. हिंदुस्थानांत तयार झालेलें कापसाचें कापड शक्य तितक्या कमी दरांत इतर ठिकाणीं विकतां यावें म्हणून टाटानीं प्रयत्‍न केला.

१८९५ साल हें टाटांच्या वाढत्या उद्योगधंद्यांत व व्यापारांत अतिशय भरभराटीचें गेलें. यावेळेस 'दि एम्प्रेस मिल' आणि 'दि स्वदेशी मिल' या गिरण्यांचें काम चांगल्या तर्‍हेनें चाललें असून, त्यांत कापडहि मोठ्या प्रमाणावर तयार होत असे. या गिरण्यांची व्यवस्था टाटानीं अनुभवी आणि निपुण अशा माणसांच्या हातीं दिली. या वेळेस हिंदी उमेदवारांनां आय्. सी. एस्. च्या परीक्षेस बसतां यावें म्हणून टाटानीं बरीच खटपट चालविली. हुशार विद्यार्थ्यांनां पैशाच्या अभावीं उपरिनिर्दिष्ट परीक्षेस बसतां न येण्याची अडचण दूर करण्याकरितां टाटानीं फंड जमवून गरीब विद्यार्थ्यांनां बरीच मदत केली. प्रथम आपल्याच जातीच्या तरुणांकरितां टाटानीं द्रव्यसाहाय्य देण्याचें कबूल केलें. परंतु पुढें हिंदुस्थानांतील कोणत्याहि युनिव्हर्सिटीच्या पदवीधरांस वरील द्रव्यसहाय्याचा फायदा घेतां येईल अशी सोय करण्यांत आली.

लो खं ड व पो ला द यां चे का र खा ने.- हिंदुस्थानांतील खाणींतून निघालेलें लोखंड देशांतल्या देशांत वितळवून, त्यापासून पोलाद करतां यावें अशी योजना टाटांच्या डोक्यांत आली व त्या दिशेनें त्यानीं प्रयत्‍न करण्यास आरंभ केला. मध्यप्रांतांतील चांदा येथील खाणींतून निघणार्‍या लोखंडापासून पोलाद तयार करण्याचा या योजनेचा मुख्य हेतु होता. ही प्रचंड योजना सुरवातीस अशक्य व त्याज्य ठरविण्यांत आली. परंतु टाटानीं आपल्या नेहमींच्या धिमेपणानें व चिकाटीनें तें काम हातीं घेऊन यशस्वी रितीनें पार पाडून दाखविलें. आतां साकची येथील टाटांचे लोखंडी व पोलादी कामाचे कारखाने प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानांतील औद्योगिक बाबतींत टाटांच्या या कारखान्यामुळें नवें मन्वंतर सुरू झालें असें नि:संशय म्हणतां येईल. जमशेटजीच्या साकची येथील लोखंडी कारखान्यावरून त्या गांवालाच जमशेटपूर हें नांव १९१८ सालीं देण्यात आलें.

यांची आणखी एक नवी योजना म्हणजे त्यानीं बंगलोर येथें स्थापिलेली 'दि रिसर्च इन्स्टिट्यूशन' किंवा 'इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स' ही संस्था होय. हिंदुस्थानांतील कलाकौशल्यांत शक्य तितक्या शास्त्रांचा उपयोग व्हावा व त्याच्यामुळें कला भरभराटीस यावी असा टाटांचा मुख्य हेतु होता. या इन्स्टिट्यूशनला टाटानीं ३० लाख रुपयांची देणगी देऊन ऋणी करून ठेविलें आहे.

ज ल वि द्यु त् श क्ति.- सह्याद्रि पर्वतावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याच्या ओघापासून वीज उत्पन्न करण्याची कल्पना मि. डेव्हिड गॉस्लीम नांवाच्या एका इंजिनियरनें सुचविली होती. ती कल्पना जमशेटजी यानीं अविश्रांत परिश्रम करून मूर्त स्वरूपास आणिली ('जलविद्युत्शक्ति' पहा).

सारांश आपल्या अनेक योजनांनां मूर्त स्वरूप आलेलें पहाण्यास टाटा जगले नाहींत. तथापि समाधानाची गोष्ट ही कीं, त्यांच्या उद्यमप्रिय मुलांनीं बापाच्या सर्व योजना मोठ्या प्रयासानें व नेटानें नांवारूपास आणिल्या. बंगलोर येथील 'रिसर्च इन्स्टिट्यूट, साकची येथील लोखंड व पोलाद यांचे कारखाने व 'हायड्रो इलेक्ट्रिक वर्क्स' हे सर्व कारखाने प्रगमनशील असून दिवसेंदिवस त्यांची भरभराट होत आहे. हिंदुस्थानसारख्या, उद्योगधंद्यांची व कारखान्यांची उणीव भासत असलेल्या देशांत, टाटांनी जो दांडगा उद्योग सुरू केला व जे अवाढव्य कारखाने स्थापिले त्यावरून टाटा किती कुशाग्र बुद्धीचे, खटपटी व धोरणी होते हें चांगलें प्रत्ययास येतें. जमशेटजी हे ता. १९ मे १९०४ रोजीं नान्हीम येथें वारले.

कै. जमशेटजी टाटा यांना आपल्या अंगीकृत कार्यांत जें अलौकिक यश मिळालें त्याचें कारण नुसतें भरपूर भांडवल हें नसून टाटांच्या अंगीं असलेलें धैर्य, चिकाटी, उद्योगप्रियता, दृढनिश्चय आदिकरून सद्गुणच होत. तथापि देशाभिमान आणि सार्वजनिक काम करण्याची आवड हे गुण टाटांच्या अंगीं ठळकपणें वसत होते. हिंदुस्थानातील आधुनिक उद्योगधंद्यांचे ते आद्य जनक होत.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .