विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झेनागा - सेनागा उर्फ झेनागांनीं आपलें नांव सेंनेगाल संस्थानास दिलें आहे (सेनेगाल पहा) ही बर्बेरांची पोटजात होय. यांनीं मोरोक्को, स्पेन, आल्जीरिया इत्यादि देशांस राजघराणीं दिलीं. बर्बेर भाषेची झेनागा म्हणून एक पोटभाषा आहे. ही दक्षिण मोरोक्कोमध्यें, तशीच दक्षिण सेनेगालमधील सिद्दी लोकांकडून बोलली जाते.