प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झेंद-अवेस्ता - हा पारशांचा धर्मग्रंथ होय. अवेस्ता हा शब्द 'अविस्ताक-ज्ञान, ज्ञानदेणारें पुस्तक' या पहलवी भाषेंतल्या शब्दावरून बनलेला आहे. झेंद-अवेस्ता हें नांव चुकींचें आहे. पहलवी भाषेंत झंद याचा टीका असा अर्थ आहे. 'अविस्ताक व झंद' अगर 'अवेस्ता वा झेंद' असा शब्द प्रयोग पाहिजे.

अवेस्ता ग्रंथ, हा नष्टप्राय झालेल्या धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. जगांतील इतर कोणत्याहि धर्माचा या धर्माच्या इतका कमी प्रसार नसेल हें खरें, तरी पण या अवेस्ता ग्रंथाचें व त्यामध्यें सांगितलेल्या धर्माचें ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. या धर्मग्रंथांत खिस्ती शकापूर्वीं ५०० वर्षांपूर्वींच्या व ख्रिस्तीशकानंतर ७०० वर्षांच्या अवधींतील इराणी लोकांच्या धर्मकल्पना, समजुती, आचारविचार यांची माहिती सांपडते; इतकेंच नव्हे तर या धर्मग्रंथाच्या व त्यांत सांगितलेल्या धर्माच्या साहाय्यानें, पर्शुभारतीय काळावर म्हणजे वैदिक आर्यांच्या भारतप्रवेशापूंर्वीच्या काळावर प्रकाश पडण्याचा पुष्कळ संभव आहे. हल्लीं उपलब्ध असलेला अवेस्ता ग्रंथ हा एका काळच्या मोठ्या वाड्मयाचा केवळ अवशेष होय. मूळ अवेस्ताग्रंथाचीं १२०० प्रकरणें होतीं असें पहलवी दंतकथांवरून समजतें. अवेस्ताग्रंथ १२०० गाईंच्या कातड्यावर कोरला होता असें टबरी व मसूदी या इतिहासकारांनीं म्हटलें आहे. या ग्रंथाच्या विस्ताराबद्दल प्राचीन सीरियन लेखकहि साक्ष देतात व प्लिनी नांवाच्या रोमन पंडितानें, झोरोआस्टरनें २० लक्ष कविता रचल्या असें म्हटलें आहे. खुद्द उपलब्ध अवेस्ताग्रंथाचें अंतरंगपरीक्षण केलें तरी हेंच दृष्टोत्पत्तास येतें. पण सर्वांत बलवत्तर प्रमाण म्हणजे पहलवी भाषेंतील डिनकर्त या ग्रंथाचें व पर्शियन रिवायतग्रंथांचें होय. या ग्रंथांत प्राचीन अवेस्ताग्रंथाच्या विस्ताराबद्दल व त्यांतील मजकुराबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे.

पूर्वकाळीं व विशेषत: अकिमेनियन राजांच्या अंमलाखालीं या धर्मग्रंथाचें रक्षण मोठ्या आस्थेनें होत होतें. झोरोआस्टरचा सहाय्यक जो विष्तास्प राजा त्यानें अवेस्ता ग्रंथ सोनेरी अक्षरांत लिहून काढवून तो ग्रंथ पर्सेपोलीस येथील आपल्या दफ्तरकचेरींत ठेवला होता असें टबरीनें म्हटलें आहे, व डिनकर्त ग्रंथावरूनहि हीच गोष्ट दिसून येते. या ग्रंथाची दुसरी एक सोन्याच्या विटांवर कोरलेली १२०० प्रकरणात्मक प्रत समरकंदमधील अग्यारी (अग्निगृह) मधील खास खजिन्यांत ठेवली होती असें शात्रोइहा-इ ऐरान या पहलवी ग्रंथावरून समजते. पण या दोन प्रतींचा अलेक्झांडरच्या स्वारीमध्यें ज्यावेळीं पर्सेपोलीस व समरकंद हे ग्रीकांच्या हातीं आले त्यावेळीं नाश झाला.

अलेक्झांडरच्या मागून सेल्युकसच्या अंमलाखालीं व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व कांहीं भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडांत शतकाच्या प्रारंभीं शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकानें हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळें या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसर्‍या शापूरच्या कारकीर्दींत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखालीं या उपलब्ध ग्रंथानें एकत्रीकरण झालें; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीनें जें पारशांचें व त्यांच्या धर्मग्रंथांचें नुकसान झालें नाहीं तें मुसुलमानांच्या प्रशियावरील स्वारीनें झालें. मुसुलमानांनीं इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनीं आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणीं धर्मग्रंथ सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असें फर्मान काढण्यांत आलें व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळें पारशी लोकांनां देशत्याग करणें भाग पडलें. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशांतून वांचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकीं बर्‍याच लोकांनीं बाटण्याच्या भीतीनें हिंदुस्थानचा मार्ग धरला. हिंदुस्थानांत असतां राखण्यांत आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हां लिहून काढण्यांत आला. त्या प्रतींपैकीं कांहीं प्रती १३।१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याहि एका प्रतींत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाहीं.

अ वे स्ता ग्रं था चें स्व रू प.- ज्याला आपण हल्लीं झेंदावेस्ता म्हणून नांव देतों त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला, ज्यालाच खरोखर अवेस्ता हें नांव देणें संयुक्तिक होईल त्यामध्यें वेंदीदाद, विस्पेरद व यश्न यांचा समावेश होतो. वेंदीदादमध्यें पौराणिक कथा व धर्माच्या आज्ञा यांचा संग्रह झालेला आहे विस्पेरदमध्यें, यज्ञाकरितां जरूर अशा अरिष्टशांतिप्रार्थनांचा संग्रह आहे. यश्नमध्यें अशाच प्रकारच्या अरिष्टशांतिप्रार्थनांचा अंतर्भाव असून शिवाय, प्राचीन गाथापंचकाचाहि यांत समावेश करण्यांत आला आहे. कांहीं हस्तलिखित प्रतींत हे तिन्ही ग्रंथ परस्परांहून स्वतंत्र असून त्यांच्या शेवटीं पहलवी भाषेंतील भाषांतर जोडलेलें आढळतें. इतर हस्तलिखित प्रतींत हे तीन्ही ग्रंथ यज्ञांमधील प्रार्थनांच्या दृष्टीनें सोईप्रमाणें, एकत्र करण्यांत आले आहेत व त्यांच्या शेवटीं भाषांतर अगर टीका वगैरे कांहीं आढळत नाहींत. म्हणून त्याला 'शुद्ध वेंदीदाद' असें नांव देण्यांत येतें. दुसर्‍या भागाचें खोर्द अवेस्ता असें नांव असून त्याच्या मध्यें छोटीं छोटीं प्रार्थनासूक्तें ग्रथित झालेलीं आहेत. हीं सूक्तें केवळ उपाध्यायांनींच नव्हे तर सर्व गृहस्थांनी विशिष्ट प्रसंगीं विशिष्ट तर्‍हेनें म्हणावयाचीं असतात. याखेरीज या भागांत यश्त व इतर संकीर्ण कथांचा अंतर्भाव होतो. यश्त म्हणजे देवतांच्या स्तुतींचा केलेला संग्रह.

आज जें अवेस्तावाड्मय उपलब्ध आहे तें संपूर्ण नूसन बरेंचसें वाड्मय लुप्त झालेलें असावें असें या वाड्मयाच्याकडे विचारपूर्वक पाहिल्यास सहज दिसून येईल. शिवाय या मताला ऐतिहासिक पुरावाहि पण सांपडतो. अरबांच्या विजयामुळें सस्सानियन राजघराण्याला ओहोटी लागली. झेंद वाड्मयाचा बराच भाग उध्वस्त करण्यांत आला. वेंदीदादच्या पहलवी भाषांतरांत असे पुष्कळ झेद भाषेंतील उतारे सांपडतात कीं त्यांची माहितीच आपल्याला अद्यापि लागलेली नाहीं. निरंगिस्तान एओजेमेद, या ग्रंथांतहि असे पुष्कळ अज्ञात पुस्तकांतील उतारे घेतलेले आहेत. यश्तांची संख्या ३० आहे अशी पारशी लोकांची समजूत आहे. पण त्यांपैकीं १८ उपलब्ध आहेत. इतकें तरी अवेस्ता वाड्मय शिल्लक राहिलें याचें कारण त्यांत श्रौतस्मार्तविधींचा संग्रह असून त्यांचा नेहमीं व्यवहारांत उपयोग होत असल्यामुळें त्याचें रक्षण होणें स्वाभाविकच होतें हें होय.

प्रा ची न अ वे स्ता चें स्व रू प.- सस्सानियन घराण्याच्या सत्तोखालीं अवेस्ता वाड्मयाचा संग्रह करण्यांत येऊन त्याचे २१ नस्क (भाग) पाडण्यांत आले आहेत. यापैकीं पहिल्या सात भागांनां गाथा व दुसर्‍या सात भागांनां दात अगर आचारभाग व उरलेल्या सात भागांनां हधमाथ्र असें नांव पडलें.

गाथा नस्कामध्यें स्तोतयश्त, सूत्कर, वर्श्त मानसर, बक, वश्तग, हाधोक्त, स्पंद या गाथांचा अंतर्भाव होतो. स्तोत यश्तांत यश्नाचें सार आलेलें असून हें यश्त फार पवित्र मानण्यांत येतें. या स्तोत यश्तांचीं ३३ प्रकरणें असून, त्यांपैकीं २२ प्रकरणें पद्यमय असून त्यांतील भाषा ही फार प्राचीन दिसते. बाकीचीं ११ प्रकरणें हीं गद्यमय असून त्यांची भाषा तत्कालीन प्रचलित असलेली भाषाच आहे. सूत्कर, बर्श्त मानसर, व बक यांमध्यें प्रत्येकीं २२ प्रकरणें असून या २२ गाथांवर यांत टीका आलेली आहे व गाथांचें भाषांतरहि केलेलें आहे. पण हीं सर्व प्रकरणें उपलब्ध नाहींत, हाघोक्ताचीं तीन प्रकरणें आहेत, त्यांपैकीं एक प्रकरण यश्नामध्यें घालण्यांत आलें आहे.

धर्मकायदाविषयक नस्कामध्यें निकातम, गनबा सरनिगत, हूस्पारम, सकातुम, वेंदीदाद, कित्रदात, बकानयश्त इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. या सात नस्कांपैकीं पहिल्या पांच नस्कांत धर्मविषयक कायद्यांची माहिती आलेली आहे. शेवटच्या दोन नस्कांत, विश्वोत्पत्तिाविषयक व पौराणिक कथांचा संग्रह आहे. धर्मकायदाविषयक पांच नस्कांत वेंदीदाद हें नस्क पूर्णपणें उपलब्ध आहे. निकातम् गनबा सरनिगत, व सकातुम यांचा थोडा भाग उपलब्ध आहे. हुस्पारमचा महत्त्वाचा भाग, इरपतिस्थान व नीरंगिस्तानमध्यें राखून ठेवण्यांत आला आहे. कित्रदात नस्कांत मनुष्यजातांच्या व इराण देशाच्या उत्पत्तीची माहिती आली असून झोरोआस्टरच्या जन्मापर्यंतचा इतिहास त्यांत आढळतो. बकान यश्तांत निरनिराळ्या यझताच्या प्रार्थना असून हल्लीं १८ यश्तच उपलब्ध आहेत.

हधमाथ्र नस्कांत दामदात, नातर, पागग, रतदात इतग, बरीज, कस्किश्रव, विष्तास्प सास्त यांचा अंतर्भाव असून या नस्कांची नासाडी फार झालेली आहे. दामदातांत झोरोआस्टरच्या मतें जगाच्या उत्पत्तीची माहिती आलेली आहे पण हें नस्क संपूर्ण उपलब्ध नाहीं. नातरसंबंधीं कांहींच माहिती उपलब्ध नाहीं. पागगमध्यें गाहानबार, श्रौतविधी, कालाचे भाग, इत्यादींची माहिती आलेली आहे. रतदात इतग याचे दोनच भाग उपलब्ध असून त्यांत यज्ञांचें विधिवर्णन केलेलें आहे. बरीजमध्यें नीतितत्त्वांचें विवेचन आहे. कास्किश्रवामध्यें यज्ञ बिनचुक कसा करावा याविषयींची माहिती आली आहे. विष्तास्प सास्त यामध्यें झोरोआस्टरनें विप्ताष्पाला आपल्या धर्मांत ओढून घेतल्याची कथा व झोरोआस्टरनें अर्गास्पविरुद्ध केलेल्या लढायांची हकीकत आली आहे.

प्राचीन अवेस्ता ग्रंथाच्या स्वरुपाचे थोडक्यांत वर्णन केल्यानंतर त्यापैकीं हल्लीं किती भाग उरला आहे याकडे वळूं. पूर्वी शिल्लक असलेल्या ग्रंथांचें स्वरूप सांगितलें आहे त्यावरून प्राचीन अवेस्ता ग्रंथांतील मुख्य व महत्त्वाचा भाग अद्यापिही शिल्लक आहे असें दिसतें. कारण २१ नस्कांपैकीं वेंदीदाद व स्तोतयश्त व बकान यश्ताचा महत्वाचा भाग हें तीन नस्क संपूर्ण उपलब्ध आहेत. बक, हाधोक्त, विष्तास्त सास्त व हूस्पारम या चार नस्कांचा महत्त्वाचा भाग अद्यापि उपलब्ध असून त्याशिवाय इतर नस्कांमधील थोडा थोडा भाग उपलब्ध आहे. याशिवाय बाकींचे नष्ट नस्क अवेस्तन भाषेंत उपलब्ध नसले तरी पहलवी भाषेंत भाषांतराच्या रूपानें तें अस्तित्वांत आहेत व या भाषांतराच्या सहाय्यानें त्यांतील मजकूर कळतोच.

अ वे स्तां ती ल वि ष य. मां ड णी व का ळ.- हल्लींच्या उपलब्ध अवेस्ता ग्रंथांच्या अंतरंगाची माहिती ज्ञानकोश प्रस्तावना खंड, भाग ३, उत्तरभाग प्रकरण ८ पृष्ठें ९८-९९ यामध्यें दिलेली आहे. कालासंबंधीं वर दिलेल्या प्रकरणांतील १००-१०१ पानें पहा.

अ वे स्तां ती ल वृ त्तें.- अवेस्तांतील वृत्तांचें निरीक्षण केल्यास अवेस्तांतील भाग कोणकोणत्या वेळीं लिहिले गेले याचें अनुमान करतां येतें. अवेस्तांतील अगदीं जुना जो भाग आहे तो छंदाबद्ध आहे. व त्यानंतर मागाहून लिहिण्यांत आलेला भाग हा गद्य आहे असें दिसतें. गाथा वाड्मय हा छंदोबद्ध भाग असून त्याचें याहि बाबतींत वैदिक ग्रंथांशीं साम्य आहे. अवेस्तामधील छंदोबद्ध भाग म्हणजे गाथावाड्मय. त्याशिवाय दुसरा कोणता छंदोबद्ध भाग नाहीं अशी प्राचीनांची समजूत होती पण यूरोपीयन पंडितांनीं गाथावाड्मयानंतरच्या वाड्मयांतहि मधून मधून छंदोबद्ध भाग दृष्टीस पडतात असें सिद्ध केलें आहे. अवेस्तांतील पद्यवाड्मय हें अष्टाक्षरी वृत्तांत लिहिलेलें आढळतें. याशिवाय इतर वृत्त वापरलेलें क्वचितच आढळून येतें.

अ वे स्ता ची भा षा.- अवेस्ता ज्या भाषेंत लिहिला गेला त्या भाषेचें अवेस्तन नांव आहे. इंडोजर्मानिक भाषासमूहाच्या इराणी शाखेची ही भाषा असून तिचें संस्कृतशीं विलक्षण साम्या आहे; व हें अवेस्ता ग्रंथाच्या प्रामाण्यनिश्चयाचें एक बलवत्तर साधन झालें आहे. ध्वनिशास्त्रदृष्ट्या अवेस्तन भाषेंतील व संस्कृत भाषेंतील स्वरांमध्यें पुष्कळ साम्य आहे. ई व ओ या स्वरांचे अवेस्तन भाषेंत पुष्कळ प्रकार होतात तसें संस्कृतमध्यें होत नाहींत. शब्दाच्या शेवटचे स्वर ओ खेरीजकरून सर्व र्‍हस्व आहेत. संस्कृतमध्यें तसा प्रकार नाहीं. अवेस्तन भाषेंतील कांहीं व्यंजनें संस्कृत व्यंजनांशीं साम्य दाखवितात पण बर्‍याच व्यंजनांचे संस्कृत व्यंजनांशी ध्वनिसाम्य आहे. संस्कृत 'स' चें अवेस्तांत 'ह' हें रूप होतें. अशा रीतीनें संस्कृत व अवेस्तन भाषांमध्यें पुष्कळच साम्य असल्यामुळें अवेस्तन शब्दप्रयोगांचें संस्कृतांत सहज रूपांतर करतां येतें. वैदिक संस्कृत भाषेप्रमाणेंच अवेस्तन भाषेंतहि प्रत्ययांची समृद्धि आहे. वाक्यरचनेच्या बाबतींत, संस्कृतमध्यें व अवेस्तन भाषेमध्यें थोडा फार महत्त्वाचा फरक आढळून येतो.

अवेस्ता ग्रंथांत दोन पोटभाषांचें अस्तित्व दृग्गोच्चर होतें. एक गाथांची जुनी भाषा व दुसरी नंतरच्या वाड्मयांत आढळून येणारी भाषा. पहिलीला गाथाअवेस्तन भाषा असें नांव आहे व दुसरीचें कनिष्ठ अवेस्तन नांव आहे. गाथाअवेस्तन भाषा आणि कनिष्ठ अवेस्तन भाषा या दोन भाषांमधील फरक वैदिकसंस्कृत व अभिजातसंस्कृत यांमधील फरकाप्रमाणें आहे. गाथांची भाषा फार शुद्ध असून वाक्यरचनाहि पण तितकीच शुद्ध असते. शब्दाच्या शेवटचा स्वर दीर्घ करण्यांत येतो. कनिष्ठ अवेस्तनभाषा मिश्र आहे. अपभ्रष्ट शब्द तींत बरेच येतात.

लि पि.- अवेस्तन भाषेच्या मानानें अवेस्तन लिपि ही बरीच मागाहूनची असावी असें दिसून येतें. या भाषेंतील अक्षरें सस्सानियन काळांतील पहलवी लिपीपासून घेतलीं असावींत असें दिसून येतें. या लिपींत उर्दूप्रमाणेंच उजवीकडून डावीकडे ओळ वाचावयाची असते. मूळच्या अवेस्तन लिपीसंबंधाची माहिती अद्यापि उपलब्ध नाहीं. अवेस्ता ग्रंथाचें पहलवीमध्यें रूपांतर सस्सानियन काळांत झालें. त्यावेळी अवेस्ता समजण्याची देखील अडचण पडूं लागली होती. अवेस्तावर कांहीं टीकाग्रंथ झाले होते असें दिसतें; व अशा प्रकारचे टीकाग्रंथ मुसुलमानी अमदानींत म्हणजे ख्रिस्ती शकाच्या आठव्या नवव्या शतकांत देखील झाले होते याबद्दल पुरावा सांपडतो. पहलवीमध्यें रूपांतर झालेल्या भागांपैकीं, संपूर्ण यश्न, विस्परेद, वंदीदाद व इतर थोडा भाग उपलब्ध आहे. अवेस्ताचें शब्दश: भाषांतर व क्वचित् ठिकाणीं विवरणार्थ टीपा असें या रूपांतराचें स्वरूप आहे. मूळ अवेस्तांतील वाक्यरचना देखील जशाच्या तशा भाषांतरांत ठेवण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला आहे, व ज्या ठिकाणीं अशक्य होईल त्या ठिकाणीं तेवढे नवीन प्रत्यय निर्माण करण्यांत आले आहे. या पहलवी भाषांतरावरून प्राचीन काळीं या झरथुष्ट्रांच्या धर्मासंबंधीच्या आपल्या कोणत्या कल्पना होत्या, अवेस्तामधील धर्मविषयक कायद्यांचा तत्कालीन लोक कशाप्रकारें अर्थ लावीत असत, तत्कालीन आचारविचार काय होते यासंबंधींची माहिती मिळते व या दृष्टीनें या भाषांतराचें फार महत्त्व आहे. याशिवाय अवेस्तांतील एखाद्या क्लिष्ट शब्दाचा अर्थ या पहलवी रूपांतरावरून समजतो, या दृष्टीनेंहि या भाषांतराचें महत्त्व आहे. या भाषांतरांत पुष्कळ अशुद्धें व चुका आहेत व त्यांत कांहीं कांहीं ठिकाणीं विचित्र अर्थ करण्यांत आला आहे हें खरें तथापि त्यामुळें त्याचें महत्त्व कमी होत नाही. अवेस्तन वाक्यरचनेबरहूकूम पहलवी भाषांतरांतहि तशीच वाक्यरचना करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आल्यामुळें भाषांतर फार बांजड झालें आहे. इ. स. १२०० च्या सुमारास, धवल नांवाच्या एका पारशी पाद्याच्या नेर्योसंघ नांवाच्या मुलानें या पहलवी भाषांतराचें संस्कृतमध्यें रूपांतर केलें. हें भाषांतर करतांना यानेंहि पहलवी वाक्यरचना संस्कृतमध्यें तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न केल्यानें संस्कृत भाषांतर फार क्लिष्ट झालें आहे संस्कृतांतील संधि-नियमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलें आढळतें. सुमारें १६००-१८०० च्या सुमारास खोर्द अवेस्ताच्या पहलवी भाषांतराच्या कांहीं भागांचे अर्वाचीन पर्शुलिपींत रूपांतर करण्यांत आलें. तसेंच १९ व्या शतकांत या पहलवी रूपांतराचीं गुजराथीं भाषेंत दोन रूपांतरें झालीं व त्यांत बरींच चांगलीं वठलीं आहेत.

त्यानंतर पाश्चात्य यूरोपीय पंडितांचें याकडे लक्ष्य वेधलें. अवेस्ता ग्रंथाची मूळ लिपि शिकून त्या ग्रंथाचें भाषांतर करण्याचा पहिला मान अ‍ॅनक्कोटिल डू पेरा या फ्रेंच विद्वानास देणें जरूर आहे. त्यानें हिंदुस्थानांत येऊन अतिशय संकटांत दिवस काढून मोठ्या खटपटीनें इराणी भटजीजवळ या ग्रंथाचें अध्ययन केलें; त्या ग्रंथाच्या कांहीं प्रती मिळविल्या व त्या धर्मांतील विधींचांहि त्यानें थोडाफार परिचय करून घेतला. पारीस येथें परत आल्यानंतर त्यानें सतत दहा वर्षें या ग्रंथाचें अध्ययन करून १७७१ सालीं या ग्रंथाचें सटीक भाषांतर केलें.

या भाषांतरामुळें यूरोपमध्यें खळबळ उडून गेली. पुष्कळ लोकांनीं डू पेरानें मिळवलेल्या ग्रंथाच्या खोटेपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. यामध्यें सर जोन्स हा प्रमुख होता. त्यानें डू पेराला मिळालेली प्रत, साफ खोटीं असून त्याला पारशांनीं चकविलें असें प्रतिपादन केलें. त्याच्या उलट फ्रान्समध्यें डू पेराला पुष्कळ अनुयायी मिळाले व जर्मनीतील विद्वान क्लूकर यानें तर या डू पेराच्या भाषांतराचें रूपांतर करून व त्यांत भरपूर माहितीची भर घालून तें पुस्तक प्रसिद्ध केलें.

१८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचें इकडे लक्ष्य वेधलें. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असें डू पेरा वगैरे विद्वानांनीं सिद्ध केलेंच होतें. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वत:इराणमध्यें गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्यें व संस्कृतमध्यें बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.

यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत बर्‍याच चुका त्याला आढळल्यामुळें त्यानें नर्योसंघाच्या संस्कृत रूपांतराच्या सहाय्यानें अवेस्ता वाचला व डू पेराच्या भाषांतरांतील पुष्कळ चुका दुरुस्त केल्या. यानंतर या दिशेनें व विशेषत: अवेस्तन लिपीसंबंधानें वॉप, हॉग, विंडीशमन, वेस्तरगार्ड, रोट, स्पीजेल इत्यादि पंडितांनीं फार प्रयत्‍न केले. या पंडितांमध्यें, अवेस्ता ग्रंथाची माहिती करून घेण्याच्या कामीं, प्राचीन टीकाग्रंथाचा व तत्कालीन इतर उल्लेखांचा आश्रय करावयाचा अगर तौलनिक भाषाशास्त्राचें साहाय्य घ्यावयाचें यासंबंधीं वाद माजला होता. पण दोन्ही साधनें सापेक्ष व परस्परसाहाय्यकारी आहेत व त्या दोहोंचाहि उपयोग करून घेणें जरूर आहे हें मत हल्लीं प्रस्थापित झालें आहे. ['पारशी' पहा.]

[संदीर्भग्रंथ:- मिलस-गाथाज (लिपझिग १८९२-९४); बोर्नाफ-वेंदांदाद सादे (पारिस १८२९-४३); अ‍ॅटिया-वेंदीदाद सादे (बाँबे १९०१); संजाना-नीरंगस्तान (मुंबई १८९४); जमस्पजी अँड हॉग-ओल्ड झंद-पहलवी ग्लॉसरी; अ‍ॅन क्वेटिल डू पेरॉ-झेंद-अवेस्ता औव्रेजर झोरोआस्ट्रे २ व्हॉल्यूम्स, पारिस १७७१; क्ल्यूकर-झेंद-अवेस्ता, (इंग्रजी भाषांतरकार-ब्लीक ३ भाग, लंडन १८६४); डॉर्मस्टेटर-झेंद-अवेस्ता (सेक्रेडबुक्स ऑफ दि ईस्ट सीरीज); जॅक्सन-अवेस्ता ग्रामर-स्टलर्ट १८९१; कांगा-प्रॉक्टिकल ग्रामर ऑफ दि अवेस्ता लँग्वेज (बांबे १८९१); संजाना-दि पहलवी व्हर्शन ऑफ दि अवेस्ता वेंदीदाद (बाँबे १८९५); भरूचा-कलेक्टेड संस्कृत रायटिंग्ज ऑफ दि पारशीज (बांबे १९०६; वेस्ट-कंटेंटस ऑफ दि नस्क; हॉग-एसेज ऑन दि पारशीज, लंडन १८८४; ब्राऊन-लिटररी हिस्ट्रिरी ऑफ पर्शिया, लंडन १९०२; संजाना-झरुथुष्ट्र अ‍ॅड झरथुस्ट्रियानिझम इन अवेस्ता (लिपझिग १९०६); मनोहर विष्णू काथवटे-पार्शांचा इतिहास.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .