प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झुलुलंड - दक्षिण आफ्रिका. नाताळ विभागांतील एक प्रांत. हा प्रांत दक्षिण अक्षांश २६० ५०' ते २६० १५' आणि पूर्व रेखांश ३०० ४०' ते ३३० यांच्या दरम्यान आहे. याचें क्षेत्रफळ १०४२४ चौ. मै. आहे याच्या आग्नेयीस हिंदी महासागर आहे; उत्तरेस व वायव्येस युट्रेच, व्हिहीड व स्वाझिलंड हीं आहेत. ईशान्य किनार्‍यावर असलेल्या रेतीच्या टेंकड्यांच्या पलीकडे सेन्टलुशीआ व कोशी नांवाचे तलाव आहेत. पोंगोला, मॅपुटा, उम्गावुमा, अमकुझी, अमफोलोसी, अम्ल्हाटुझी, ब्लड, बफेलो व ट्युगेला ह्या नद्या या प्रांतांतून वहातात. येथील हवा समशीतोष्ण असून येथें एकंदर पाऊस ४७ इंच पडतो. १९०४ सालीं येथील लोकसंख्या २३०००० होती, पैकीं १६९३ गोरेलोक व एतद्देशीय झुलु लोकांशिवाय २००० बासुटॉस लोक होते. मॅझिटु, मरॅव्ही, वेगॉनी, मेटेबल, मॅव्हिटी आणि अबेझांझी लोकांनीं या प्रांतावर स्वार्‍या करून पूर्व व मध्य अफ्रिकेचा बराच भाग काबीज केला. चाकाचे मुख्य अधिकारी मॉसिलीकेट्झ व सुंगनडबा यांच्या बंडांत सामील होऊन मेटेबल व अँगोनी लोकांनीं देशांतर केलें. गुरें ही येथील मुख्य दौलत समजली जाते.

झु लु लो क.- या लोकांची स्वतंत्र जात म्हणून मोडत चालली असली तरी अद्यापि लिंपोपो आणि मध्य झांबेझी यांमधील प्रदेशांत यांचें वर्चस्व आहे. काफिर झुलूंच्या माहितीकरितां 'काफीर' पहा.

बहुपत्‍नीत्वाची चाल झुलु लोकांत रूढ असल्यामुळें, वारसासंबंधीं भानगडी उद्भवतात. तरी यांचा वारसाचा कायदा फार उत्तम रितीनें तयार केला आहे. यांच्या खासगी मालमत्तेंत बहुश: गुरेंढोरें यांचाच समावेश होतो. लग्नाच्या वेळीं वधूबद्दल तिच्या बापाला मोबदल्यादाखल गुरेढोरें देण्याची चाल झुलु लोक पाळतात. झोंपड्यांचा समूह त्यांच्या प्रमुख नायकाच्या अधिपत्याखालीं असतो. हा नायक, मूळसंस्थापक अगर 'पेट्रिआर्क' असून स्वजातिबांधवांच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल तो जबाबदार असतो. एकाहून अधिक झोंपड्यांच्या समूहावरहि या नायकाची सत्ता चालू शकते. याच्यावरचा अधिकारी म्हणजे जातीचा मुख्य पुरुष होय. त्याच्याहि वरचा अधिकार झुलुलंडच्या राजाला होता; परंतु सांप्रत तो कमिशनरच्या हातांत आहे. ल्होनिप पद्धतीनुसार, झुलु स्त्री आपली व आपल्या नवर्‍याच्या आई-बापांची भेट होऊं न देण्याची काळजी घेते. त्याचप्रमाणें, आपल्या नवर्‍याच्या कुटूंबांतील प्रमुख व्यक्तींच्या नांवांत आढळणारे शब्द झुलु स्त्री कधींहि उच्चारीत नाहीं. उदाहरणार्थ तिच्या दिराचें नांव, यून्कोमो असलें तर गाय या शब्दाला झुलु भाषेंत असलेला इन्कोमो शब्द ती कधींच उच्चारावयाची नाहीं. गाईचा उल्लेख करण्याची जर तिजवर पाळी आली तर ती दुसरा एखादा शब्द हुडकून काढून तो ती योजील. वर सुद्धा आपल्या सासूसासर्‍यासंबंधी हाच नियम पाळतो.

नजीकच्या देशांत अद्याप प्रचारांत असलेलीं चेटकाची बाधा घालविणारे लोक पदरीं ठेवण्याची पद्धत, झुलुलंडमध्येंहि एके काळीं प्रचारांत होती. एखाद्या माणसास जर कोणी चेटुक केलें तर हे लोक जादूटोणा करून तें घालवीत. परंतु किटिवायो नामक गृहस्थानें ही पद्धत मोडून चेटकी म्हणून गणल्या जाणार्‍या कैद्यांकरितां निराळ्या झोंपड्या बांधल्या आणि त्यांची राहण्याची व्यवस्था या झोंपड्यांतून केली. २० व्या शतकांतील प्रारंभींच्या वर्षांत ही पद्धत बहुतेक नामशेष होण्याच्या मार्गास लागली. ही जात बंटु जातीचा एक पोटवर्ग असल्यानें यांची भाषा, धर्म वगैरेंची माहिती बंटु जातीवरील लेखांत आढळेल.

श ह रें.- एशोवी शहराची लो. सं. १९०४ त १८५५ होती. कर्नल पीअर्सनला झुलु लोकांनीं १८७९ त येथेंच वेढलें. एशोवीच्या ईशान्येस २५ मैलांवर बोअर लोकांच्या मुलुखांत मेलमॉथशहर आहे. सोमकेली हें सेंट लुशीआ काळेशाच्या खाणीचें मुख्य ठिकाण आहे. या देशाला बंदर मुळींच नाहीं. नीटनेटक्या सडकांनीं मोठमोठीं शहरें जोडलीं आहेत. टुगेला नदीमार्गावर नाताळ व झुलुलंडचे रस्ते येऊन मिळतात. १९०४ सालीं येथें रेल्वे सुरू झाली.

मका, ज्वार, तंबाखु, साखर, चहा व कॉफी ह्या जिनसा येथें होतात. सोनें, तांबें, लोखंड, कोळसा हे खनिज पदार्थ येथें सांपडतात. येथील मुख्य सत्ता प्रांतिक मंडळाकडे आहे. किरकोळ बाबतींत हें संघटिक पार्लमेंटला जबाबदार आहे. १८९५ सालीं इंग्वाधुमा देश ब्रिटिश राज्यास जोडला गेला. येथील प्रत्येक झुलु नवर्‍याला प्रत्येक पत्‍नीमागें १४ शिलिंग प्रमाणें कर द्यावा लागतो. १९०६ सालापासून १६ वर्षावरील प्रत्येक मनुष्यावर १ पौंड कर लादण्यांत आला.

इ ति हा स.- १७ व्या शतकाच्या प्रारंभीं झुलु लोक व्हाइट अंफोलोसी नदीच्या खोर्‍यांत येऊन राहिले. १७५६ सालीं यूरोपियन व झुलु लोकांत चकमक होऊन 'डॉडिंगटन' बुडालें. बचावलेले लोक सेन्टलुशीनाच्या किनार्‍यावर आले. त्यांच्या सांगण्यावरून येथील लोक फार गर्विष्ठ व हट्टी असावे असें वाटतें. १८ व्या शतकाच्या शेवटीं झुलु लोकांचें महत्त्व फारच कमी झालें. यावेळेस अबाटेप्वा लोक बलिष्ठ होते, त्यांचा मुख्य डिंगि केपकॉललनींत रहात असे. त्यानें डेलागाआवे येथील पोर्तुगीज लोकांशीं व्यापार सुरू केला. १८१० सालीं सेंझांगाकोनाच्या मरणानंतर त्याचा मुलगा चाक याला मिळाला व त्याच्याच मदतीनें अमे झुलूंचा राजा झाला. १८१२ सालीं अमटेप्वा आणि झुलु लोकांनीं अमांगवाना लोकांनां बफेलो नदीच्यापार हांकलून दिलें. अनव्डांव्डी लोकांचा पुढारी सिव्झीडे यानें याच वेळेस डिंगिसवेयोला पकडून ठार केलें. उमटेप्वाचें सैन्य चाकच्या ताब्यांत आल्यावर त्यानें अनव्डांव्डी लोकांनां जिंकून लष्करांत पुष्कळ सुधारणा केल्या.

स्वागेंडबा व मणीकुसा यांचा पराभव केल्यावर १८२० सालीं सर्व नाताळ चाकच्या ताब्यांत आलें. पुढें झुलु सेनापति मॉझिलीकेटझनें व्हाल आणि लिंपोपो नद्यांमधील मुलुख उध्वस्त केला. पोंगोलो व उमकेमांझी नद्यांमधील मुलुख चाकच्या ताब्यांत होता. जमिनीवर ड्रेकनबर्गपर्यंत त्याचाच मुलूख होता.

चाकनें १८२४ सालीं देणगा म्हणून फे. एफ. जी. फेअरबेलला पोर्ट नाताळ दिलें. यावेळेस चाकला झालेली जखम एका यूरोपीयनानें बरी केली. केपटाउन व ब्रिटिश सरकार यांच्यामध्यें राजकारणासंबंधीं दळणवळण सुरू करण्याकरितां सोटोबीला इंग्लंडच्या राजाकडे पाठविलें, परंतु लगेच पोर्ट एलिझाबेथपासून त्याला परत यावें लागलें. पुढें चाकनें पोंडो देश उध्वस्त केला आणि १८२८ सालीं तो डिंगान व आम्थ्लांगान या सावत्र बंधूंकडून मारला गेला. पुढें डिंगान गादीवर आला, हा फार चैनी व दुष्ट होता झुलुलँडमधील पळपुट्यांनां आश्रय देणार नाहीं एवढ्या अटीवर
१८३५ सालीं यानें ब्रिटिश वसाहतवाल्यांनां पोर्ट नाताळ येथें धर्मप्रसारक संस्था स्थापण्यास परवानगी दिली. १८३७ सालीं हीच परवानगी अमेरिकन धर्मप्रसारक मंडळीला देण्यांत आली. याच सालीं बोअर लोकांनां येथें राहण्याची परवानगी मिळाली. १८३८ सालीं डिंगाननें बोअर लोकांची कत्तल केली. पण अँड्रिअस प्रिटोरिअसनें त्याच्या सैन्याचा पाडाव केला. स्वित्झर्लंडमध्यें डिंगान मारला गेल्यावर बोअर लोकांनीं पांडाला गादीवर बसविलें.

१८४३ सालीं यानें ब्रिटिशांनां अप्परटुगेलो व बफेलो नद्यांमधील मुलुख व सेन्टलुआबे दिला. बोअर लोकांशीं यानें पुष्कळ लढाया केल्या. स्वाझी लोकांशीं यानें युद्ध केलें. पांडाचे मुलगे सिटीवेयो व अंबुलाझी यांच्यामध्यें यादवी सुरू झालीं तींत अंबुलाझी पडला. सिटीवेयोच्या कारकीर्दींत इंग्लिश, जर्मन व नॉर्वेंजिअन धर्मप्रसारक संस्था येथें स्थापण्यांत आल्या.

युट्रेच प्रजासत्ताक मुलुखांतील बोअर मंडळानें सिटीवायोला कांहीं मुलुख मागितला. युट्रेच येथें पळून गेलेल्या सिटीवायोच्या भावाला (अमटाँगोला) परत दिल्यास सरहद्दीवरचा मुलूख देऊं असें जाहीर केल्यावर त्यांनीं भावास परत दिलें व ठरलेला मुलूख ताब्यांत घेतला. अमटाँगो पुन्हां पळून गेल्यावर सिटीवायोनें दिलेला मुलूख परत मागितला. याच वेळेस स्वाझी लोकांनीं बोअर लोकांनां दिलेला मुलूख झुलु
लोक मागूं लागले. अशा रीतीनें उत्पन्न झालेलें वैमनस्य मिटविण्याकरितां नाताळला लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक करण्यांत आली पण त्यांत त्याला यश आलें नाहीं.

सिटीवायो जरी लायक होता तरी आपलपोट्या व घमेंडी होता. यानें ठरवलेल्या लोकांशीं लग्न केलें नाहीं म्हणून यानें बर्‍याच मुलींची कत्तल केली म्हणून नाताळ
सरकारची त्याच्यावर इतराजी झाली. त्याच वेळेस सिटवियो आणि ट्रान्सव्हाल यांच्यामधील सरहद्दीविषयीं कांहीं तंटा चालला होता. १८७७ सालीं ट्रान्सव्हाल ब्रिटिशांच्या ताब्यांत गेल्यावर पूर्वीं चालू असलेल्या सरहद्दीविषयींचा तंटा सुरू झाला. सरहद्दीवरील बोअर लोक जागा सोडून गेल्यास त्यांनां मोबदला मिळावा व तेथें राहिल्यास त्यांचे रक्षण व्हावें ह्या मुख्य कमिशनर सर बार्टल फ्रेअरच्या अटी सिटीवायोस पसंत नसल्यामुळें युद्ध सुरू झालें. लॉर्ड चेल्म्सफर्डनें झुलुलंडवर स्वारी केली. इसानध्ल्वना येथें ब्रिटिशांचा पराभव झाला परंतु रॉकड्रिफ्ट येथें झुलू लोकांचा त्यांनीं पाडाव केला. जिंगीन ल्होव्हो व कँबुला येथे झालेल्या लढायांत ब्रिटिशांचीच फत्तो झाली. ब्रिटिश सैन्याबरोबर आलेला फ्रान्सचा राजपुत्र लुइ नेपोलिअन या युद्धांत पडला. नंतर उलंडी येथील लढाईमध्यें ब्रिटिशांचीच फत्ते झाली.

वूल्स्लेनें सिटीवायोला गादीवरून काढलें व ११ सरदारांस हा देश वांटून दिला आणि त्यांच्यावर देखरेख करण्याकरितां ब्रिटिश रेसिडेंट नेमला. केवळ यामुळेंच युसिबेपु,
हामु आणि उसुल्स (राजपक्ष) यांमध्यें झालेल्या युद्धानंतर सिटिवायो पुन्हां राजा झाला. युसिबेपु ह्याच्या लोकानीं उलंडीवर स्वारी केली, त्यावेळीं सिटीवायो येथून पळून गेला. १८८४ सालीं तो मरण पावला. बोअर लोकांच्या मदतीनें सिटीवायोचा मुलगा डिनी झुलूनें युसिबेपु लोकांचा पराभव केला. परंतु मदत केल्याबद्दल मध्यझुलुलंडमधील बराच मुलूख बोअर लोकांनां द्यावा लागला. यानंतर प्रजासत्ताक पद्धति येथें सुरू झाली. नाताळमधील व्हीहौड पूर्वीं उसुटस लोकांच्या ताब्यांत होतें.

नवीन प्रजासत्ताक मुलुख वगळून सर्व झुलुलंड १८८७ सालीं ब्रिटिश राज्यास जोडलें गेलें. याबद्दल डिनी झुलूनें बंड केलें पण त्यांत त्याचा पराभव होऊन त्यास सेंट हेलिना येथें हद्दपार करण्यांत आलें. १८०० सालीं झुलुलंड व टोंगालंडमधील अर्धवट स्वतंत्र मुलुख झुलुलंडला जोडला. १८९५ सालीं झंबान व उमटेजिझा सरदारांच्या मुलखांचा या देशांत समावेश झाला. या वेळेस टोंगोलंड ब्रिटिशांचें रक्षित संस्थान झालें.

१८९७ सालीं झुलुलंड नाताळ सरकारच्या ताब्यांत गेलें. १८९८ सालीं डिनीझलु परत आला. १८९९ पासून १९०२ पर्यंत बोअर व झुलू लोकांमध्यें युद्ध झालें त्यांत झुलू लोकांची फत्ते झाली. १९०१ सालीं लुइबोथानें नाताळवर स्वारी करण्याचा प्रयत्‍न केला पण त्यांत त्यालस यश आलें नाहीं. १९०५ सालीं प्रत्येक तरुण पुरुषावर १ पौंड कर बसविला. म्हणून येथील लोकांनी बंड केलें. बंडखोरांचा पुढारी बंबाट हा कांधला येथें पळून गेला. याच वेळेस सिननंदा बंडांत सामील झाला. सर डंकन मॅकेन्झीनें बंडखोरांचा पराभव केला. यांत बंबाटचा अंत झाला व सिगनंदा शत्रुला वश झाला. बंबाटच्या बंडांत सामील असल्याबद्दल डिनीझुलूला ४ वर्षांची शिक्षा झाली. १९१० सालीं बोथाप्रधानमंडळानें बंधमुक्त केल्यावर यास ५०० पौंडांचें पेन्शन मिळालें. [गिब्सन-दि स्टोरी ऑफ दि झुलूज; फरेर-झुलुलंड अँड दि झुलूज; मिट्फोर्ड-थ्रू दि झुलु कन्ट्री.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .