विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
झितोमीर - रशिया. उक्रैनिआ राज्यांतील प्रांताचें एक मोठें शहर. लो. सं. (१९१३) ९६८००. या शहरांत एकतृतीयांशांपेक्षां अधिक लोक यहुदी आहेत, आणि रशियामध्यें जीं हिब्रु पुस्तकें प्रसिद्ध होतात त्यांतील निम्यापेक्षां अधिक या शहरांतील दोन छापखान्यांतून बाहेर पडतात हें फार जुनें शहर आहे. ९ व्या शतकाच्या अगोदर हें स्थापन झाले. हें रशियाच्या ताब्यांत रशियानें जेव्हां युक्रेन प्रांत सर केला तेव्हां त्याबरोबर आलें.