प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झांशी, जि ल्हा- हा जिल्हा संयुक्तप्रांतात, झांशी विभागांतींल नैर्ॠत्य बाजूस उत्तर अक्षांश २४ ११’ ते २५ ५०’ व पूर्व रेखांश ७८ १०’ ते ७९ २५’ या दरम्यान असून याचें क्षेत्रफळ ३६२८ चौरस मैल व लोकसंख्या (स. १९२१) ६०६४९९ आहे. या जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग पूर्वपश्चिम असून, त्याच्या उत्तरेस ग्वाल्हेरचें संस्थान व जालन जिल्हा; पुर्वेस धसान नदी; दक्षिणेस ओरछा संस्थान आणि पश्चिमेस दतिया, ग्वाल्हेर हीं संस्थानें आहेत. डुबरें, नीलगाई, काळवीट, चितळ, सांबर, लांडगे वगैरे प्राणी आढळतात. या जिल्ह्यांतील हवा कोरडी व आणि उष्ण आहे. पावसाची सरासरी ३१ इंच आहे. हिवाळ्यांत या जिल्ह्यांत वारंवार. गारांचा वर्षाव होतो.

प्राचीन इतिहासः- हल्लीं झांशी जिल्हा ब्रिटिश बुंदेलखंडांत मोडतो. प्राचीनकाळीं याच्या उत्तरेकडील प्रदेशांत परिहार व काठी रजपूत आणि दक्षिणेकडील भागांत गोंड लोकांची वस्ती होती. नवव्या शतकांत महोबाचे चंदेल्ल उदयास येऊन, अकराव्या शतकांत त्यांनीं आपला राज्यविस्तार बराच केला. त्यावेळीं त्यांनीं बांधलेलीं तळीं व देवळें अद्यापि दृष्टीस पडतात. सन ११८२ सालीं पृथ्वीराजनें चंदेल्ल राजाचा पराभव केला; पुढें (म. १२०२-३) कुतुबुद्दीनानें व अल्तमशनें (स. १२३४) या प्रांतावर पुष्कळ स्वार्‍या केल्या. यानंतर या प्रदेशांत बरेच दिवस बंडाळी माजून राहिली होती. खंगार (खेंगर) नांवाच्या एका वन्य जातीचा या भागावर कांहीं दिवस ताबा होता. त्या काळांतच ओरछा संस्थानांतील करारचा किल्ला त्यांनीं बांधला. तेराव्याव चवदाव्या शतकांत बुंदेल्यांची सत्ता वाढली व त्यांनीं खंगारांस हाकून दिलें. या बुंदेल्यापैकीं एका रुद्रप्रतापाची स्वतंत्र सत्ता बाबरानें मान्य केली होती. पुढें (१५३१) या रुद्रप्रतापाचा पुत्र भारतीचंद यानें ओरछा शहर वसविलें. उत्तरोत्तर बुंदेल्यांच्या सत्तेचा उत्कर्ष होऊं लागला व मोंगलाचें व त्याचें तंटे वारंवार झाले. सतराव्या शतकाच्या प्रारंभीं ओरछा संस्थानचा राजा वीरसिंग देव यानेंच झांशीचा किल्ला बांधला.

या जिल्ह्याचा दक्षिणेकडील प्रदेश रुद्रप्रतापाच्या दुसर्‍या वंशजाकडे होता, त्यानें चंदेरीचें राज्य स्थापिलें. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धांत चंपतरायानें बुंदेल्यांची तिसरी शाखा स्थापली. त्याचा पुत्र छत्रसाल यानें झांशी जिल्ह्याच्या बर्‍याच भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. सन. १७३४ त छत्रसाल हा मरण पावल्यावर मराठ्यांस या राज्याचा तिसरा भाग मिळाला व त्यांनीं बाकीचा बहुतेक भाग ओरछाच्या राजापासून जिंकून घेतला (१७४२). झांशीवर पेशव्यांची सत्ता सुमारें ३० वर्षें राहिली होती. १८१७ सालीं पेशव्यांनीं बुंदेलखंडावरील आपलें स्वामित्व सोडून तो प्रांत ईस्ट इंडिया कंपनीस दिला व त्याच वर्षीं कंपनीनें तेथील मराठे सरदारांचे हक्क वंशपरंपरेचे आहेत ही गोष्ट मान्य केली.

इ. स. १८६१ मध्यें चंदेरी जिल्ह्याचें नांव बदलून ललितपुर असें ठेवण्यांत आलें. त्याच वर्षीं बटवा नदीच्या पश्चिमेकडील भाग, झांशी गांव व किल्ला शिंद्यांनां देण्यांत आला. परंतु पुढें (१८८६) झांशी गांव, किल्ला व आणखी ५८ खेडीं शिंद्यांनीं इंग्लिशांस परत दिलीं व त्याबद्दल ग्वाल्हेरचा किल्ला, मुरार छावणी व कांहीं खेडीं शिंद्यांस मिळालीं. झांशी आणि ललितपुर हे जिल्हे १८९१ सालीं एकत्र करण्यांत आले.

या जिल्ह्यांत पुराणवस्तू पुष्कळ सांपडतात. या जिल्ह्यांत ९ मोठीं गावें व १३३१ खेडीं आणि सहा तहशिली आहेत. त्यांचीं नांवें:- झांशी, महु, गरोथा, मोथ, ललितपुर आणि महरोणी. येथें शेंकडा ९३ हिंदु लोकांची वस्ती असून शेंकडा ९९ लोक बुंदेली भाषा बोलतात. जिल्ह्याचें एकंदर उत्पन्न साडे नऊ लाखांपर्यंत आहे. या जिल्ह्यांत गहूं चांगला पिकतो, ज्वारी, हरभरा वगैरें पिकेंहि येथें होतात. झांशी हें रेल्वेचें मोठें स्टेशन असल्यानें येथें मोठा व्यापार चालतो.

त ह शी ल.- झांशी जिल्ह्यांतील एक तहसील. उत्तर अक्षांश २५ ८’ ते २५ ३७’ व पूर्व रेखांश ७८ १८’ ते ७८ ५३’. क्षेत्रफळ ४९९ चौरस मैल. लोकसंख्या दीड लक्ष. हींत ३ गांवें व २१० खेडीं आहेत. जमीनमहसूल सव्वा लक्ष रुपये व एकंदर उत्पन्न दीड लक्ष आहे.

श ह र.- हें झांशी जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण जी. आट. पी. रेल्वेवर मुंबईहून ७०२ मैल अंतरावर आहे. लोकसंख्या ५६ हजार. ओरछाचा राजा वीरसिंगदेव यानें हें शहर वसवून येथील किल्ला बांधला (१६१३). इ. स. १७४२ पर्यंत हा गांव बुंदेल्याकडे होता, परंतु त्या सालीं छत्रसाल याच्या मृत्युपत्रानें हा गांव मराठ्यांकडे आला. मराठ्यांनीं किल्ल्यांतील कांहीं भाग वाढविला. पुढें कांहीं महिने हा किल्ला अयोध्येचा नबाब सुजा उद्दौला याजकडे होता. परंतु इ. स. १७६६ त तो पुन्हां मराठ्याकडे आला. १८८६ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें इंग्रज सरकारची लष्करी छावणी आहे. पितळेचीं भांडीं करण्याचे कारखाने येथें आहेत.

इतिहास, झांशीची स्थापना (स. १७४२):- माळवा व बुंदेलखंड हे दोन प्रांत दिल्लीच्या हमरस्त्यावर आहेत. त्यामुळें मराठी साम्राज्य वाढविण्यासाठीं ह्या दोन प्रांतांचें स्वामित्व काबीज करण्याकडे मराठ्यांनीं व (विशेषतः बाजीराव पेशव्यानें) लक्ष दिलें. शिंदेहोळकरांनीं माळव्यांत उद्योग चालू केल्यावर, लवकरच बाजीरावानें (१७३४) छत्रसालापासून कांहीं प्रांत मिळवून येथें मराठ्यांची सत्ता कायमपणें स्थापिली. बाजीरावाच्या वेळेस छत्रसालाशीं बुंदेलखंडच्या राज्यापैकीं एक विभागाचा ठराव झाला होता; परंतु प्रत्यक्ष वांटा झाला नाहीं. महाराष्ट्रांतून कोणी सरदार येऊन सालीना सहा लक्षांप्रमाणें पाचं सात वर्षांची खंडणी वसूल करीत असे. पुढें (स. १७४२) मल्हार कृष्ण व राणोजी शिंदे असे उभयंता सरदार आले असतां व त्यांचा झांशीस मुक्काम झाला असातं रात्री बुंदेले ओर्च्छेकर यांनीं छापा घालून मल्हार कृष्णाचा खून केला व मराठ्याचा पराभव केला. तेव्हां पुण्याहून नारोशंकर राजेबहाद्दर याची रवानगी झाली. त्यानें प्रथम ओर्च्छास (वोडसा) येऊन लढाई करून व तेथील राजास कैद करून राजधानीवर गाढवाचा नांगर फिरविला. याच वेळीं झांशी मराठ्यांनीं घेतली. मल्हार कृष्णाच्या वंशजास बरूवा सागराची जहागीर मिळाली. मल्हार कृष्णाचा भाऊ अंताजी कृष्ण, दोन मुलगे व जांवई वगैरे सारें कुटुंबच ओरछेकरानें कपटानें ठार मारिलें होतें; म्हणून पेशव्यांनीं त्याच्या वंशजास जहागीर दिली. नारोशंकरानें स. १७४२-५६ पर्यंत झांशी प्रांताचा बंदोबस्त ठेविला. पुढें तो देशीं आल्यावर महादजीपंत हा सुभेदार झाला. त्यानें खंडेरावापाशीं तलाव बांधिला आहे. तो १७६० पावेतों होता. त्याच्या नंतरचा बाबुराव कोन्हेर सुभेदार हा १७६५ पावेतों राहिला; यावेळीं राजेबहाद्दराच्या वेळेपेक्षां वसूल कमी झाला. पुढें विश्वासराव लक्ष्मण आला. तो १७६५ पर्यंत होता. त्याच्या वेळेस मुलूख बेचिराख झाला. नंतर रघुनाथराव हरि नेवाळकर, जुन्नर सुभ्याचे सुभेदार, हे मोठे शूर व दक्ष असल्यानें त्यांची नेमणूक झाली (१७७०). त्यांनीं पुन्हां ओर्च्छाच्या राजाचें पारिपत्य केलें. रघुनाथरावानें आपला भाऊ शिवरामपंत याच्या नांवें सुभ्याचीं वस्त्रें पुण्याहून आणवून आपण जलसमाधि घेतली (१७९५). रघुनाथरावानें २५ वर्षें कारभार केला.

ज्या जागेवर हल्लीं झांशीचा किल्ला आहे, त्या ठिकाणीं पूर्वीं बळवंतनगर  नांवाचें लहान गांव होतें. नारोशंकरानें झांशीचा किल्ला ताब्यांत घेऊन तेथें आपलें वास्तव्य केलें, आणि किल्ल्यास लागूनच झांशीं हें नवीन शहर वसविलें. त्यानें ओर्च्छाच्या लोकांकडून जबरीनें झांशीं शहरांत वस्ती करविली आणि दक्षिणेंतूनहि पुष्कळ नवीन कुटुंबें आणून झांशीची वसाहत केली. गंगायमुनांच्या मधील सुपीक दुआबांत जाण्याचा हमरस्ता झांशीवरून असल्यामुळें थोड्याच अवधींत झांशीचा व्यापार वाढून तें शहर फार सधन झालें.

झांशी १८५७ सालच्या वेळचीः- विष्णुभट गोडसे वरसईकर यानें १८५७ च्या गर्दीत स्वतः पाहिलेली झांशीची हकीकत, माझा प्रवास या पुस्तकांत नमूद केली आहे. तीवरून त्यावेळचें पुढील वर्णन दिलें आहे. हें शहर उत्तर हिंदुस्थानांत फार सुरेख व टुमदार आहे. तेथील किल्ला मोठा बळकट असून तो शहराच्या पश्चिम बाजूला एका लहानशा डोंगरावर आहे. पायथ्याशीं सभोंवार रुंद व खोल खंदक पाण्यानें भरलेला असल्यामुळें एकाच बाजूनें आत जाण्यास रस्ता असे. डोंगराच्या माथ्यावर चुनेगच्ची तट (२० फूट रुंदीचा) सभोंवार बांधून आत ४००० मनुष्य राहील इतकी जागा आहे. किल्ल्याचा गरगंज नांवाचा बुरूज ८० हात औरस चौरस असून तो १२५ हात उंचीचा होता; त्यावर सतत चार तोफा आणि संस्थानचें निशाण असे. किल्ल्यांत एकंदर ५१ तोफा होत्या. त्यांत कडक बिजली, भवानीशंकर वगैरे प्रख्यात होत्या. पाण्याची टांकीं पुष्कळ होती. मुख्य सरकारी वाडा पांच मजली व आठ चौकी असून सभोंवती निरनिराळ्या कामाचे बंगले होते. वाड्याच्या पश्चिमेस शिपाई लोकांचें कवाईत वगैरे करण्यासारखें विस्तीर्ण मैदान असून त्यांत चिंचेचीं झाडें पुष्कळ होतीं. तटाच्या बुरुजाखालीं मोठीं तळघरें असून त्यांत धान्य व दारूगोळा ठेवीत; मुख्य वाड्याचें काम जुनें, मजबूत व सुरेख होतें व तो इतका विस्तीर्ण होता कीं सर्व दालनांची व इतर ठिकाणांचीं माहिती होण्यास सुमारें एक महिना लागे. वाड्याच्या दक्षिण बाजूचा बंगला फार उंच व सात मजली होता, व उत्तरेकडे एक पाण्याचा चोपडा (हौद) होता, व त्यास पाणी महामूर होतें. त्याच जागेंत एक मोठी विस्तीर्ण  व रमणीय बाग असून तींत एक लहानसा बंगला होता. त्यास शंकरकिल्ला म्हणत.

किल्ल्याच्या नैर्ॠत्य कोनापासून दक्षिण बाजूनें पूर्वेकडे व वायव्य कोनापासून उत्तरबाजूनें पश्चिमेकडे असा शहरचा ४॥ मैल घेराचा कोट गेला होता. तोहि उंच, रुंद व मजबूत असून मधूनमधून त्यास बुरूज होते. त्यास अंबारीसह हत्ती जाण्यासारख्या पांच वेशी मुख्य होत्या, बाकी लहान दरवाजे बरेच होते. किल्ल्याच्या पूर्वेंस कोटाच्या आंत बरेंच मैदान टाकून शहरास आरंभ झाला असून शहराची वस्ती दाट आणि रस्तेहि अरूंद होते. मात्र कोष्टीपुरा, हलवाईपुरा वगैरे कांहीं मुख्य मुख्य भाग उंच उंच हवेल्यांनीं भरलले असून सुरेख होते. शहराच्या मध्यभागीं भिढ्याचा मोठा बाग असून त्यांत पांच सहा मोठ्या विहिरी होत्या. याच बागेंत पुढें  बीजन झालें त्यावेळीं हजार लोक तीन दिवस अडकून राहिले होते. शहरांतील मुख्य सरकारी वाडा चार चौकी असून त्याचें काम पहाण्यासारखें होतें. शहराच्या दक्षिण दरवाज्याबाहेर एक मोठा तलाव असून त्यांत महालक्ष्मीचें एक टोलेजंग देऊळ होतें. ही देवी झांशीवाल्यांची कुलस्वामिनी असल्यामुळें देवस्थानाचा नंदादीप, पूजा, चौघडा वगैरेंचा बंदोबस्त फार मोठ्या खर्चाचा ठेविला होता. आषाढापासून तों चैत्रापर्यंत देवीस जाणें तें होडीतून जावें लागत असे.

लोक श्रीमान, उद्योगी व कसबी होते. त्यावेळीं गालीचें, रेशमी वस्त्रें व पितळीं सामान या शहरासारखें दुसरें कोठें होत नसें. तसेच कागदावर चित्रें काढण्याचेंहि काम येथें अप्रतिम होत असे. शहरांत ब्राह्मणांचीं घरें सुमारें ३०० असून ब्राह्मणाला शहर फार चांगलें असे. दक्षिणेंत पुणें व उत्तरेस झांशी अशीं तेव्हा म्हणच पडून गेली होती. झांशी बुंदेलखंडांतला भाग असल्यामुळें येथील स्त्रिया सुरेख व विशेषेकरून विशाळ व काळ्याभोर डोळ्यांच्या असतात व पुरुष नेभळे दिसतात.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .