प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

झांझीबार, बे ट.- झांझीबार हें बेट पूर्व आफ्रिकेंत ब्रिटिश संरक्षणाखालीं असून एका मुसुलमान सुलतानाच्या अंमलाखालीं आहे. १९०५ सालीं येथील सुलतानानें बेनाडीर किनार्‍यावरील ५ बेटांचा सार्वभौमत्वाचा हक्क इटलीस विकला. पेंबा आणि झांझीबार बेटांचें क्षेत्रफळ १०२० चौरस मैल आहे. १९२१ सालीं येथील लोकसंख्या १९८००० होती. झांझीबार हें बेट उ. स. ५० ४०’ आणि पू. रे. ६ ३०’ यांमध्यें प्रवाळ खडकावर आहे. याचें क्षेत्रफळ ६४० चौरस मैल असून हें नारळीच्या झाडांकरितां फार प्रसिद्ध आहे. नारिंग, डाळिंब, दालचिनी आणि लवंगांची झाडें येथें पुष्कळ आहेत. माकडें, जंगली डुकरें, पाणघोडे, उंट आणि बैल वगैरे जनावरें आढळतात. उष्णता आणि दलदलीमुळें येथील हवा यूरोपियन लोकांस मानवत नाहीं. दरसाल ६५ इंच पाऊस येथें पडतो. पूर्वेकडील बन्टु भाषा बोलणारे लोक मासे पकडण्यांत फार पटाईत आहेत. पश्चिमेच्या भागांत बाटे अरब, ग्रोओनी, पारशी, हिंदु आणि कोमोरो हे लोक राहतात. रबर, खोबरें, मिरची, तंबाखू आणि व्हॅनिला नांवाचीं फळें येथें होतात. येथील स्वालीजातीचें मजूर पहिल्यानें गुलाम होते. मोंबासा आणि दारसलेमच्या चुरशींमुळें येथील पिकाची भरभराट झाली व रेल्वे आणि सडका तयार करण्यांत आल्या. मुंबई आणि रंगूनहून येथें तांदूळ येतो. येथील लोकांचें मुख्य अन्न मासे आणि कॅसवा नांवाच्या झाडांच्या मुळ्यांचें पीठ हें होय.

येथें जकात ही वसुलीची मुख्य बाब आहे. १९१९ सालीं येथील वसूल ४०७००० पौंड होता व खर्च ३२३००० पौंड होता. पूर्वीं सोन्याचें नाणें येथें प्रचारांत होतें. हल्लीं हिंदुस्थानांतील रुपया व नोटा हें चलन सुरू आहे.

येथील लोक मुसुलमानी धर्माचे आहेत. ख्रिस्ती पाद्र्यांनीं येथें शाळा स्थापिल्या आहेत. प्राथमिक शाळांत आरबी व वरिष्ठ शाळांतून इंग्लिश भाषा शिकवितात. येथील सुलतानानें न्यायनिवाड्याचा हक्क ब्रिटिश सरकारला विकला (१८९२).

इतिहास:- पूर्वीं इराणी लोक व अरब लोक यांनीं जिंकलेल्या या बेटाच्या समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशास झेंज साम्राज्य असें नांव देण्यांत आलें. त्यावेळीं किल्बा हें राजधानीचें शहर होतें. यालाच पुढें झांझीबार नांव पडलें येथील लोक मुसुलमानी धर्माचे निग्रो आहेत. १५ व्या शतकाच्या शेवटीं, पोर्तुगीज लोकांनीं किल्बा आणि मोंबासा काबीज केल्यामुळें, झेंज साम्राज्यास उतरती कळा लागली. १६ व्या शतकाच्या शेवटीं, तुर्क आणि झिंबास लोकांनीं येथील शहरें उध्वस्त केल्यामुळें, पोर्तुगीज सत्तेचा र्‍हास झाल्यावर, मस्कतच इमामाची सत्ता येथें प्रस्थापित झाली. इ. स. १५०८ सालीं पोर्तुगीज लोकांनीं जिंकलेलें झांझीबार बेट १७३० सालीं अरबांच्या ताब्यांत आलें. १८३२ सालीं मस्कतच्या सय्यद सैद या नबाबानें झाझीबार हें राजधानीचें सहर केलें आणि १८३७ सालीं विश्वासघातानें मोंबासा घेतले. पुढें. (१८७०) याच घराण्यांतील राजांच्या कारकीर्दींत इंग्लंड, जर्मनी, आणि इटलीनें त्याच्या राज्याचा बराच भाग घेतला. पुढें येथील सुलतान हा इंग्लडंच वकीलाच्या तंत्रानें वागू लागला (१८६६-१८८७). पुढें झांझीबार हें इंग्लंडचें संरक्षित संस्थान म्हणून जाहीर करण्यांत आलें (१८९०). परंतु थोड्याच दिवसांत सय्यद खलीद या नबाबानें आपणास स्वतंत्र सुलतान म्हणून जाहीर केल्यामुळें ब्रिटिश सरकारनें त्याच्या राजवाड्यावर तोफांचा मारा करून त्याचा पाडाव केला व राज्यकारभार आपल्या हातांत घेऊन सुलतानास खासगी खर्चाकरितां सालीना १२०००० रुपयांचें पेन्शन देण्यांत आलें. १८९७ सालीं गुलामगिरीचा व्यापार बंद करण्यांत आला. पुढें पोलिटिकल एजन्ट आणि कान्सल हे दोन अधिकरी असल्यामुळें राज्यकारभार सुरळीत चालत नसे म्हणून फक्त एजन्टच नेमण्यांत आला. तेव्हांपासून तेथें सुधारणा होऊं लागल्या. इ. स. १९११ त सुलतान अली यानें गादीचा राजीनामा दिला व त्याचा मेव्हणा सय्यद खलीफ बिन हरून हा गादीवर आला. हाच सांप्रत सुलतान आहे. यानें गेल्या महायुद्धांत आपल्या हाताखालील मुसुलमानांनां शांत ठेविलें होतें. महायुद्धांत झांझिबारचें आसपास दर्यावर चकमकी झाल्या होत्या. त्यांत इंग्रजांच्या क्युपीड, खलीफा वगैरे वोटी जर्मन क्रूझर कोनिग्झबर्गनें बुडविल्या व झांझीबार येथील इंग्रज आरमाराची राळ उडविली. सुलतानानें ७०००० पौंड युद्धास मदत केली.

१९१३ सालपर्यंत झांझीबारच्या संरक्षित संस्थानचा राज्यकारभार इंग्लंडच्या परराष्ट्रखात्यामार्फत चालविला जात असे पण त्यानंतर (१९१३ नंतर) हें काम वसाहतखात्याकडे सोंपविण्यांत आलें. त्याप्रमाणें ब्रिटिश पूर्व आफ्रिकेचा गव्हर्नर, हा झांझीबारचा हायकमिशनरहि झाला व झांझीबारचा स्थानिक कारभार पाहण्यासाठीं मेजर पीयर्स यास रेसिडंट नेमण्यांत आलें. याशिवाय राज्यकारभाराच्या बाबतींत सल्ला देण्याकरिता एक सल्लागारमंडळ नेमण्यांत येऊन त्या मंडळाचें अध्यक्षपद सुलतानास देण्यांत आलें. सुलतानानें दिलेले निकाल, रेसिडेंटची मान्यता मिळाल्यास बंधनकारक मानले जातात.

श ह र.- बेटाची राजधानी झांझीबार शहर हीच असून तें बंदरहि आहे. हें शहर एका त्रिकोणी द्वीपकल्पावर वसलेलें आहे. येथील मनोरे मशीदी, सुलतानाचा वाडा आणि सरकारी कचेर्‍या फार प्रेक्षणीय आहेत. वाड्याच्या डाव्या बाजूस सांप्रत उयोगांत नसलेले जहाजासारखा आकाराचें तलाव आहेत. शहराच्या घाणेरड्या भागांत बाणी सींगाली, शिद्दी, हमाल, कोळी आणि बाटे वगैरे लोक राहतात. शहराच्या शंगानी नांवाच्या भागांत यूरोपियन व्यापारी आणि पाद्री राहतात. समुद्रांतून नेलेल्या तारांचे मुख्य ठाणें आहे. व त्यामुळें जगांतील सर्व बंदरांशी याचा संबंध जोडला गेला. थेट लंडनशीं आगबोटीची रहदारी स. १९१० त सुरू झाली. लवंगा आणि खोबरें येथून परदेशांत फार रवाना होतें. लवंगांच्या लागवडीखालीं १९१९ सालीं साठ हजार एकर जमीन असून, त्या सालीं एखंदर सत्तर लाख शेर लवंगाचें पीक आलें होते. लवंगांच्या खालोखाल नारळाची पैदास आहे. १९१९ सालीं येथें २५ लक्ष नारळीचीं झाडें होतीं. १९१८ त येथीन १,५१,००० पौंड किंमतीचें खोबरें निर्गत झालें. तांदूळ कापड, इमारती लांकूड, कातडीं, कोळशा आणि पेट्रोल यांची येथें आयात होते.

सय्यदसैद या सुलतानानें हें राजधानीचें शहर केल्यापासून (१८३२) येथील व्यापार पुष्कळ भरभराटीस आला. ब्रिटिश साम्राज्यांत समावेश होण्याच्या पूर्वींपासून येथें पाद्र्यांचे धर्मप्रसाराचें काम चालूच होतें. येथील व्यापार वाढल्यामुळें पूर्व आफ्रिकेंत येथूनच माल रवाना होतो.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .