प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जोधपुर, सं स्था न.- यास मारवाड असेंहि नांव असून हें राजपुतान्यांतील सर्वांत मोठें संस्थान आहे. यांचें क्षेत्रफळ ३४९८६ चौरस मैल असून तें उत्तर अक्षांश २४ ३७’ ते २७ ४२’ व पूर्व रेखांश ७० ६’ ते ७५ २२’ या दरम्यान वसलेलें आहे. लोकसंख्या (१९२१) १८४१६४२ असून, खुद्द जोधपूर शहरची वस्ती ७३४८० आहे. संस्थानचें उत्पन्न १ कोटी १५ लक्षांचें आहे व खर्च १ कोटीचा आहे. याच्या उत्तरेस बिकानेरचें संस्थान; वायव्येस जेसमीर; पश्चिमेस सिंधप्रांत; नैर्ॠत्येस कच्छचें रण; दक्षिणेस पालनपूर आणि शिरोही; आग्नेयीस उदेपूर; पूर्वेस अजमीर मेरवाडा आणि किशनगड; आणि ईशान्येस जयपूर संस्थान आहे. या संस्थानचा बहुतेक सर्व प्रदेश ओसाड आणि वालुकामय आहे. अरवली डोंगराच्या आसपास म्हणजे संस्थानच्या ईशान्येस, पूर्वेस व आग्नेयीस कांहीं सुपीक जमीन आहे. उत्तर व वायव्येकडील भाग ओसाड व वालुकामय असून , त्यास ‘थळ’ असें म्हणतात; या भागांत २००-३०० फूट खोल खणावें तेव्हां पाणी लागतें. राज्यांत ठिकठिकाणीं टेंकड्या आहेत. पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील कांहीं भागांत जंगल आहे. इकडे रानटी प्राणी पुष्कळ प्रकारचे आढळतात. पूर्वीं सिंह या भागांत होते, हल्लीं नाहींत. वाघ, सांबर, अस्वल हे अरवली पर्वतांत सांपडतात. त्याचप्रमाणें रानडुकरें, लांडगे इत्यादि प्राणीहि आहेत.

येथील हवा पावसाळ्यांत देखील कोरडी असते. उन्हाळ्यांत उन्हाळा अति कडक असतो रोगराई विशेषषीं नसते. हिवाळ्यांत कधीं कधीं ३० अंशावर पारा असतो. जोधपूर शहरांत १८९६ सालापासून एक वेधशाला स्थापन करण्यांत आली आहे. तारीख १० जून सन १८९७ रोजीं वेधशाळेंतील उष्णतामापक यंत्राचा पारा १२१ अंशांवर चढला होता; तसेंच २९ जानेवारी इ. स. १९०५ रोजीं २८ अंशावर पारा होता. नैर्ॠत्येकडील व ईशान्येकडील प्रदेशांत पावसाळा अगदींच अनिश्चित असतो. पावसाची दरवर्षाची सरसारी १३ इंच आहे.

इतिहासः- जोधपुरचा महाराजा हा रजपुतांतील राठोड वंशाचा मुख्य असून , श्रीरामचंद्रापासून आपला वंश उत्पन्न झाला आहे, असें या वंशाचें म्हणणें आहे. रामापासून ५६ वा पुरुष मुळराज याला हें घराणें आपला कूटस्थ म्हणतात. तो प्रथम निपुत्रिक होता. पुढें त्यानें तपानें राहटेश्वरी देवी प्रसन्न केली व तिच्या आशिर्वादानें त्याला पुत्र झाला. त्याचें नांव राहटेश्वर. राहटेश्वरामुळें वंशाचें नांव राहटोड पडलें. या वंशाचें पूर्वींचें नाव राष्ट्र असें असून यासच पुढें निरनिराळीं (राष्ट्रकूट वगैरे) नांवें प्राप्त झालीं. अशोकाच्या कांहीं शिलाशासनांत हे दक्षिणेंतील राज्यकर्ते आहेत, असा या वंशाचा उल्लेख सांपडतो. तथापि पांचव्या अगर सहाव्या शतकांतील अभिमन्यु नामक राजापासून या वंशाचा बराच संगतवार इतिहास सांपडतो. इ. स. ९७३ पूर्वीं, सुमारें चार शतकाच्या अवधींत राष्ट्रकूट वंशांतील १३ राजांनीं दक्षिणेंत राज्य केलें परंतु, त्यावर्षीं चालुक्यांनीं त्यांस हांकलून दिलें. त्यावेळीं (नवव्या शतकांत) यांच्या एका शाखेनें कनोज येथें तेथील राजाच्या आश्रयानें वास्तव्य केलें. येथें सुमारें २५ वर्षें अज्ञातवासांत काढल्यावर त्यांनीं आपल्या आश्रयद त्यांनांच अर्धचंद्र देऊन, आपण स्वतः गहरवार नांवाचें राज्य स्थापलें. यापूर्वीं कनाजचें राज्य स. ४७० मध्यें नयनपाळानें स्थापिलें होतें. त्या घराण्यानें ७०० वर्षें कनोजचें राज्य केलें होतें. त्या घराण्यांतील शेवटचा राजा जयचंद याचा पराभव ११९४ सालीं महमदघोरीनें केला; राजा जयचंद आपला जीव वाचंविण्याच्या इराद्यानें निघाला असतां मध्येंच गंगा नदींत बुडाला. राजा जयचंदाचे सरदार व आप्तवर्ग मुसुलमानी अंमलाच्या विरुद्ध असल्यामुळें त्यांनीं राजपुतान्यांतील जंगलाचा आश्रय घेतला. पुढें जयचंदाचा नातु (कोणी पुतण्या म्हणतात) सिहाजी यानें द्वारकेच्या यात्रेचें मिष करून स्वार्‍या करून मल्लाणींतील खेरांनां, गोहेलांनां व पालीच्या ब्राम्हणांनां जिंकून, लुनीच्या प्रदेशांत खेरवाडा येथें राठोडांचें निशाण (इ. स. १२१२) रोवलें व एकप्रकारें जोधपुरच्या राज्याची स्थापना केली. कोलू मंदच्या राजास यानें राज्य मिळवून दिल्यामुळें त्यानें आपली बहीण याला दिली होती. राठोड रजपूत याच वेळीं प्रतम मारवाडांत आले असें नाहीं, दहाव्या शतकांत हथुंडी येथें राठोडांचे एक राज्य होतें. (‘बाली’ वरील लेख पाहा).

सिहाजीच्या वेळीं या प्रदेशाच्या पुष्कळ भागांवर परिहार, गोहेल, चव्हाण अथवा परमार रजपूत यांचीं राज्यें होतीं. सिहाजीनंतर गादीवर बसलेले राजे, आसपासच्या लोकांशीं लढाई करण्यांत गुंतले होते. सिहाजीचा पुत्र अश्वत्थामा यानें राज्य वाढविलें व दुसरा पुत्र सोनिंग यानें ईदर येथें निराळें राज्य स्थापिलें. तिसर्‍या मुलानें ओकमुंद येथें गादी स्थापिली. अश्वत्थामाच्या ८ मुलांनीं निरनिराळीं घराणीं स्थापिलीं. त्यांपैकीं आज चार चालू आहेत. त्याचा वडील पुत्र दूहर, त्याचा रायपाळ, त्याचा कन्हूळ, त्याचा जल्हण, त्याचा थीदो, त्याचा सल्किो व त्याचा बिरण होय. या सर्वांनीं आपलें राज्य वाढविलें. बिरणचा पुत्र राजा राव चोंडा यानें परिहारच्या राजापासून १३८१ सालीं मंदोर घेतलें व त्याच्या मुलींशीं विवाहसंबंध करून, आपल्या राज्यास व नवीन घेतलेल्या मुलुखास बळकटी आणली. मंदोर ही राठोडांची राजधानी सुमारें ७८ वर्षें होती. निरनिराळ्या ठिकाणीं स्वार्‍या करण्यांकरितां हें फार सोयीचें ठिकाण होतें. चोंडा इ. स. १४०९ मध्यें मरण पावला. परंतु, मरण्यापूर्वीं त्यानें नागर व इतर कांहीं ठिकाणें आपल्या राज्यास जोडलीं होतीं. याला चौदा पुत्र होते, त्यांतील रणमल्ल हा, त्याच्या मागून गादीवर आला. उदेपुरकर राणा लाखाचा मेव्हणा असून, याचा बराच काळ चितोड येथें गेला.

लाखा मेल्यावर यानें उदेपूरच्या राजकारणांत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्‍न केला, परंतु त्यांत तो मारला गेला. रणमल्लानें उदेपूर मोकलजी राण्याचा वध करण्याचा विचार केला होता, त्यामळें त्याचा असा नाश झाला व त्याचें बरेंचसें राज्य उदेपूरवाल्यांनीं काबीज केलें. त्याच्या मागून राव जोध हा गादीवर बसला. यानें इ. स. १४५५ मध्यें सोजत ठिकाण खालसा केलें व इ. स. १४५९ मध्यें जोधपुर शहर वसवून तेथें राजधानी केली व उदेपुरकराकडून आपला गेलेला पुष्कळ प्रांत परत मिळविला. यानें प्रजेस फार सुख दिलें. याला १४ पुत्र (कोणी १७ होते असें म्हणतात) होते; पैकीं वडील पुत्र सातल हा त्याच्या आधींच वारल्यामुळें दुसरा पुत्र सूरजमल्ल हा त्याच्या मागें इ. स. १४८९ च्या सुमारास गादीवर बसला. यानें २७ वर्षें राज्य केले. त्याला पांच पुत्र होते. एकदां पिपारच्या जत्रेंत, १२० राठोड कुमारिकांनां पठाण लोक पळवून नेत होते, त्या वेळीं (१५१६) झालेल्या चकमकींत हा सूरजमल्ल प्राणास मुकला. त्यानंतरच्या रावगंगानें (१५१६- १५३२) मेवाडच्या निशाणाखालीं, बाबराशीं लढाई करण्याकरितां आपलें राठोड सैन्य पाठविलें होतें. त्यावेळीं खानुआ येथील रणांगणांत (१५२७) रावगंगाचा नातु रायमल्ल व बरेच राठोड सरदार मारले गेले. गंग हा १५३२ सालीं मेला. त्याच्या मागचा राव मालदेव (१५३२- १५६९) याच्या कारकीर्दींत या राज्याची सत्ता शिखरास पोहोंचली. हा योद्ध व मुत्सद्दीहि होता. ज्यावेळीं हुमायून बादशहा पदच्युत झाला, त्यावेळीं त्यानें मालदेवाचा आश्रय घेण्याचा प्रयत्‍न केला. परंतु मालदेवानें त्यास आश्रय दिला नाहीं. मारवाड जिंकण्याच्या उद्देशानें शीरशहानें (१५४४) ८०००० सैन्य मालदेवाविरुद्ध पाठविलें. यावेळीं ज्या लढाया झाल्या, त्यांत मालदेवानें शीरशहावें अत्यंत नुकसान केलें. त्यानें मुसुलमानांपासून अजमेर व नागोर परत घेतलें. जोधपुर शहराभोंवती तट बांधला व राज्यांत सर्वत्र गड कोट बांधलें. पुढें हुमायुनाच्या वेळचा सूड घेण्यासाठीं म्हणून अकबरानें या प्रांतावर स्वारी करून व शिकस्तीचा प्रयत्‍न करून मरेट, मालकोट आणि नागर किल्ले काबीज केले (१५६१). पुढें १८वर्षें मालदेव लढतच होता. शेवटीं नाइलाजानें अकबराशीं तह करण्यासाठीं मानी मालदेवानें आपण स्वतः न जातां आपल्या चंद्रसेन पुत्रातर्फें खटपट चालविली. पण स्वतः मालदेव आला नाहीं, यामुळें अकबर चिडला व त्यानें जोधपुरास वेढा दिला. तेव्हां मालदेवानें मोठ्या कष्टानें वडील पुत्र उदेसिंगास आपल्या वतीनें अकबराच्या दरबारांत मुजरा करण्यास पाठविलें. पण तिकडे चंद्रसेनानें अकबराशीं लढाई सुरू ठेऊन त्यांत आपला प्राण दिला. यानंतर वरील अपमानानें व पुत्रशोकानें मालदेव लवकरच मरण पावला (१५७३). तेव्हां त्याच्या पुत्रांत गादीबद्दल तंटा सुरू झाला. त्याला एकंदर १२ पुत्र होते. त्यांपैकीं उदेसिंगास गादी मिळाली. याच्या कारकीर्दींत मारवाडचें स्वातंत्र्य नष्ट झालें. तो मुसुलमानांचा नुसता ताबेदार होऊन न राहतां त्यानें आपली बहीण जोधबाई हिचें अकबराशीं व आपली मुलगी मानबाई हिचें राजपुत्र सेलीमशी लग्न लावलें. मात्र याबद्दल त्यानें अकबराकडून आपले पूर्वींचे प्रांत (अजमीर खेरीजकरून) परत मिळविले; शिवाय माळव्यांतील कांहीं सुपीक जिल्हे त्यास मिळून ‘राजा’ हा किताब मिळाला. तो अकबराला नेहमीं सैन्याची मदत करी. यानें ३३ वर्षें राज्य केलें. त्याला ३४ मुलें होतीं. त्यांच्या मागून त्यांतील सूरसिंग हा राजा झाला (१५९५- १६२०). त्यानें शिरोहीच्या रावाचा पराभव करून गुजराथ काबीज केला त्याचा वडील पुत्र गजसिंग यानें लहानपणी झालूरच्या वेढ्यांत यश मिळविल्यानें जहांगिरानें त्याला तलवार बक्षीस दिली. सूरसिंहानें जोधपुरास विशेष शोभा आणली. शेवटीं त्यानें आपल्या वंशजांनीं नर्मदेपलीकडे जाऊं नये अशी शपथ एका स्तंभावर कोरून ठेविली. तो १६२० सालीं मेला. त्याला ६ पुत्र होते. त्याला सवाई राजा असा किताब जहांगिरानें दिला होता. नंतर त्याचा पुत्र गजसिंग हा (यावेळीं बर्‍हाणपुरास होता) जोधपुरास जाऊन गादीवर बसला. गजसिंगास दख्खनची सुभेदारी मिळाली, शिवाय ‘दलभजन’ आणि ‘दलथंभन’ हे किताब मिळाले. गजसिंग हा शहाजहानानें बापाविरुद्ध बंड केलें असतां, त्याला न मिळतां जहांगिरास मिळाला व बुंदीकोटा, जयपूर वगैरे राजाच्या मदतीनें गजसिंगानें हें बंड मोडलें. त्यामुळें जहांगिराची त्याच्यावर फार मर्जी बसली. पुढें तो गजुराथेंतील बंडाळी मोडीत असतां १६३८ सालीं एका लढाईंत मारला गेला. त्याच्या मागें त्याचा दुसरा पुत्र जसवंतसिंग हा गादीवर आला (इ. स. १६३८- १६७८). हा प्रथम मांळव्याचा सुभेदार होता. त्यावेळीं (१६५८) अवरंगझेब व मुराद यांनीं आपल्या बापाविरुद्ध बंड उभारलें होतें व तें मोडण्याच्या कामावर याची नेमणूक झाली होती. तेथें बेफिकीरीमुळें त्याचा परभाव झाला. पुढें त्यानें अवरंगझेबाला सुजाविरुद्ध वरवर मदत केली परंतु प्रत्यक्ष लढाईंत तो अचानक उलटला; व औरंगझेबाची छावणी लुटून, जोधपुरास निघून गेला. पुढें हा दक्खन आणि गुजराथचा सुभेदार होता. आपल्या मार्गांतील हा काटा नाहींसा व्हावा म्हणून (१६७८) अवरंगझेबानें त्याची अफगाणच्या मोहिमेवर योजना केली. तिकडेच तो जमरूड येथें मरण पावला. (जास्त माहिती जसवंतसिंग या नावाखालीं पहा). नंतर त्याचा पुत्र अजितसिंग हा गादीवर बसला.

जसवंत वारला तेव्हां अजितची आई त्याच्या वेळीं ७ महिन्यांची गरोदर होती. ती प्रसूत झाल्यावर तिनें मारवाडची वाट धरली. परंतु वाटेंत दिल्लीस अवरंगझेबानें तिला जबरीनें ताब्यांत घेण्याचा प्रयत्‍न चालविला. तेव्हां तिचा विश्वासू सरदार दुर्गादास यानें अवरंगझेबाकडून बायकामुलांची परवानगी मिळवून त्या घोळक्यांत या मायलेंकरांस जोधपुरकडे पाठविलें व एक तोतया अजित व त्याची आई दिल्लीस ठेविली. अखेर हें कपट उघडकीस आलें, तेव्हां अवरंगझेबानें जोधपुरावर सैन्य पाठविलें परंतु अजित हातीं लागेना, तेव्हां त्या खोट्या मायलेकरांसच त्यानें मुद्दाम खरें मानून त्या तोतया मुलालाच जोधपुरचा मालक म्हणून पुष्कळ वर्षें वागविलें, व पुन्हां मारवाडवर स्वारी करून जोधपूर व इतर मोठीं गांवे लुटलीं, पुष्कळ देवळांचा नाश केला व सर्व राठोड वंशानें इस्लाम धर्म स्वीकारावा असें एक फर्मान काढलें. यामुळें सर्व रजपूत दुर्गादासाच्या सल्ल्यानें एकत्र झाले व त्यांनीं बहुतेक सर्व लढायांत अवरंगजेबाचा मोड करून त्यास परतविलें. दुर्गादासानें तर अवरंगझेबाच्या विरुद्ध अकबरास उठविलें व शेवटपर्यंत अवरंगझेबास चैन पडूं दिलें नाहीं. अखेर तो मरण पावल्यावर अजितसिंगानें जोधपुरावर चाल केली व तेथील मुसुलमानी सैन्याचा मोड करून राजधानी आपल्या ताब्यांत घेतली (१७०७). दुसर्‍याच वर्षीं उदेपुर, जोधपुर व जयपुर हीं राज्यें एकत्र होऊन त्यांनीं मुसुलमानी अंमल झुगारून द्यावयाचें ठरविलें. जोधपुर आणि जयपुर येथील राजघराण्यांनीं मोंगलांशीं लग्नसंबंध केल्यामुळें, उदेपुरच्या राजघराण्यांशीं त्यांचें लग्नसंबंध होत नसत, ते पूर्ववत सुरू व्हावे, अशी एक अट, ही जूट होत असतांना घातलेली होती. या जुटीनें सांभर येथें बहादुरशहाचा सपाटून पराभव केल्यानें त्यानें लवकरच या दोस्तांशीं तह केला (१७०९). अजित हा बापाप्रमाणें शूर, धाडसी व उत्साही होता. मुसुलमानांच्या विषयीं त्याच्या अंगांत फार द्वेष होता. त्यानें त्याप्रमाणें दिल्लीपतीस सतत त्रास दिला. त्याच्या अनेक फौजा त्याच्या वर आल्या, परंतु त्यानें त्यांचा पराभव केला. प्रजेस सुख दिलें व बहुतेक सारें मारवाड मुसुलमानांच्या हांतून सोडविलें. सुरसिंग, गजसिंग, यशवंतसिंग, अजितसिंग असे चार राजे एकामागें एक पराक्रमीं होऊन गेले.

सय्यद बंधूंच्या वेळीं अजितसिंगास रीतीप्रमाणें मुजरा करण्यास दिल्लीस बोलाविलें परंतु तो गेला नाहीं. त्यामुळें जोधपुर त्याच्यापासून जबरदस्तीनें घेण्यांत आलें. त्याचा वडील पुत्र अभयसिंग यास ओलीस म्हणून दिल्लीस नेण्यांत आलें. त्याशिवाय त्याला आपली मुलगी, फर्रुकशियर यास द्यावी लागून स्वतः दिल्लीदरबारांत हजर राहावें लागलें. पुढें कांहीं काळ दरबारांतील घालमेलींत अजितसिंगाचें थोडेंबहुत अंग होतें. फर्रुकशियरच्या खुनानंतरच्या सय्यदांच्या बेतांनां अनुकूल न होता, अभयसिंगास मागें ठेवून तो जोधपुरास परत आला (१७१९). लगेच (१७२१) त्यानें अजमीर काबीज केलें व तेथें आपल्या नांवाचें नाणें पाडलें. परंतु दोन वर्षांनीं महामदशहानें अजमीर घेतलें. मध्यंतरीं, जोधपूर राज्याचा नाश न व्हावा व आपली बढती होण्यास विलंब होऊ नये म्हणून अभयसिंगाने आपल्या पित्याचा खून करावा, अशाविषयीं दिल्लीपतीकडून त्याचें मन वळविण्यांत आलें; व त्याप्रमाणें त्यानें आपला भाऊ बखतसिंग याजकरवीं तें अमानुष कृत्य पार पाडलें (१७३१). त्यानंतर अभयसिंगानें सुमारें २६ वर्षें राज्य केलें. अहमदाबाद सर करण्यांत (१७३१) व सरबुलंदखानाचें बंड मोडण्यांत, यानें अहमदशहास बरीच मदत केली होती. याची कारकीर्द बखतसिंगाशीं लढण्यात गेली. हा स्वतः आळशी, क्रूर व व्यसनी होता. गुजराथेंतील कांहीं सुपीक प्रांत त्यानें आपल्या राज्यास जोडले. टॉड म्हणतो कीं, “पितृहत्येबद्दल हें जें बक्षीस मिळालें तेंच मारवाडच्या सर्व गृहकलहास कारण झालें.”

इ. स. १७५० मध्यें अभयसिंग मरण पावल्यावर अभयिंसग याचा पुत्र रामसिंग हा गादीवर बसला. परंतु तो अल्पवयी (१९ वर्षांचा) असल्यानें अविचारानें त्यानें बखतसिंगाची जहांगीर जप्त करून त्यावर स्वारी केली, परंतु त्यांत त्याचाच पराभव झाला व तो उज्जनीस पळून गेला, त्यावेळीं जयप्पा शिंदे तेथें होता; त्याची मदत घेऊन तो या प्रांतावर स्वारी करणार, इतक्यांत बखतसिंग मेला (कोणी म्हणतात कीं त्यास मावशीकडून विषप्रयोग झाला). बखतसिंग हा उदार व शूर होता. पितृहत्येच्या पातकाखेरीज त्याच्या हातून दुसरें वाईट काम घडलें नाहीं. त्यानें ३ वर्षें राज्य करून बर्‍याच सुधारणा केल्या. जोधपूरची तटबंदी पुरी करून राज्याचें उत्पन्न अनेक प्रकारांनीं वाढविलें. यानंतर बखतसिंगाचा पुत्र विजयसिंग गादीवर बसला. मराठ्यांनीं रामसिंगास मदत केली व त्यानें (१७६१) मेरट येथें विजयसिंगाचा पराभव केला. पुढें जयाप्पाचा खून झाल्यामुळें मराठ्यांनीं रामसिंगाला हांकलून देऊन विजयसिंगापासून अजमीरचा किल्ला व प्रांत घेऊन त्यावर खंडणी बसविली. यावेळीं मराठेच संस्थानचे मालक बनले. रामसिंग जयपूर येथें आश्रयास राहिला; तेथेंच तो १७७३ सालीं मेला. यानंतर कांहीं वर्षे मारवाडांत स्वस्थता होती. परंतु लवकरच विजयसिंहानें मारवाडांत धुमाकूळ घातला. त्यानें आपले सरदार डोईजड झाले म्हणून त्यांनां एका निमित्तानें एकत्र करून सरसकट सर्वांचे खून करविले तेव्हां प्रजा खवळून जाऊं नये म्हणून त्यानें अटकेकडे स्वारी करून अमरकोट घेतलें, तसेंच जसलमीर व मेरवाड या संस्थानिकांनीं मारवाडचा काहीं प्रांत बळकाविला होता तोहि सोडविला; आणि मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थानें करूं लागला. तेव्हां मराठ्यांचाहि स्वार्‍या त्यांच्या प्रांतावर होऊं लागल्या. त्यामुळें पुन्हां एकदां मेवाड, जोधपूर आणि जयपूर हीं राज्यें मराठ्यांविरुद्ध एकत्र झालीं. इ. स. १७८७ मध्यें तुंग येथील लढाईंत शिंद्यांची पिच्छेहाट होऊन त्यांस अजमीर प्रांत थोडे दिवस सोडावा लागला. परंतु लवकरच (१७९१) शिंद्यानें रजपुतांचा पाटण (जून) व मेरट (सप्टेंबर) येथें पराजय केला व खुद्द जोधपुरावर ६० लाख खंडणी लादली व अजमीर परत मिळविलें. यापुढें विजयसिंग एका राखेच्या नादानें वागूं लागला. त्यामुळें फार अव्यवस्था माजली. तेव्हां सरदारांनीं तिचा खून केला. त्यानंतर विजयसिंग लवकरच मरण पावला व त्याच्यामागून त्याचा पुत्र भीमसिंग गादीवर आला (१७९३). त्यानें १० वर्षें राज्य केलें. भीमसिंगाला ६ भाऊ होते. भीमसिंग हा चवथा होता. त्यानें आपल्या सर्व भावांनां त्यांच्या मुलांसह ठार केलें. फक्त एक पुतण्या मानसिंग हा पळून झालूर येथें गेला. भीमसिंगानें झालूरास वेढा दिला. वेढा पुष्कळ दिवस चालू होता. पण झालूर पडलें नाहीं. इतक्यांत भीमसिंग एकाएकीं मेला (१८०३) व मानसिंग राजा झाला.

इंग्रजांनीं मानसिंगापाशीं मराठ्यांच्या विरुद्ध तहाची वाटघाट सुरू केली; पण त्यानें ती धुडकावून यशवंतराव होळकरास मदत केली. याच सुमारास अमीरखान पठाणानें त्याच्या राज्यांत लुटालूट चालविली. उदेपूरच्या कृष्णाकुमारीच्या प्रकरणांत, जयपूरशीं मानसिंगानें लढाई सुरू केली. तेव्हां पेंढारी अमीरखानानें प्रथम जयपूरचा पक्ष व नंतर जोधपूरचा पक्ष स्वीकारला; व शेवटीं जोधपूरच्या राज्याचा कारभार दोन वर्षें स्वतःच बळकावून तेथील सर्व खजिना लुटून, आपण निघून गेला. भीमसिंगाला एक ढोकलसिंग म्हणून पुत्र होता; त्याला शेखावतीच्या अनेक सरदारांनीं मदत दिली. त्यांच्यासह ढोकल हा याच वेळीं मानसिंगावर चालून आला. तेव्हां मानसिंगानें वेडाचें ढोंग केलें व आपला पुत्र छत्रसिंग याच्या हातीं राज्य सोंपविलें. तेव्हां इंग्रजांनीं छत्रसिंगाशीं बोलणें सुरू केली. इ. स. १८१८ मध्यें इंग्लिशांचा व या संस्थानचा तह झाला. त्याअन्वयें जोधपूरनें सालीना १०८००० रुपये खंडणी इंग्रजास द्यावी व जरूर लागेल तेव्हां १५०० घोडेस्वारांची मदत त्यांनां करावी व त्याबद्दल इंग्रजांनीं संस्थानचें रक्षण करावें असें ठरलें. यानंतर छत्रसिंग लवकरच वारला; तेव्हां मानसिंगानें वडेपणाचें ढोंग झुगारून, स्वतः कारभार हातीं घेतला; व लगेच जे लोक त्याच्या विरुद्ध होते त्या सर्वांस त्यानें ठार केलें, प्रजेवर जुलूम करून एक कोट रुपये प्रजेपासून उकळले; राज्यांत बेबंदशाही माजली, पुष्कळ सरदार या जुलमामुळें परराज्यांत पळून गेले व त्यांनीं इंग्रजांची मदत मागितली. इंग्रजांनीं मानसिंगाला दपटशा देऊन त्यानें जप्त केलेल्या सरदारांच्या पुष्कळ जमिनी परत देवविल्या. इ. स. १८२७ मध्यें ढोकलसिंगास पुढें करून पुन्हां सरदारांनीं बंड केलें, परंतु तें मोडण्यांत आलें. अखेर (१८३९) राज्यांत अत्यंत असंतोष पसरल्यामुळें इंग्रजांनीं मध्यें पडून जोधपुरावर सैन्य पाठवून पांच महिने जोधपुरचा लष्करी ताबा घेतला. तेव्हां मानसिंगानें योग्य रीतीनें राज्यकारभार करूं असा करार केला. या तहानें त्याच्या दरबारीं पोलिटिकल एजंट (इंग्रजांचा) येऊन बसला व जोधपुरचें स्वातंत्र्य नष्ट झालें. पुढें ४ वर्षांनीं तो निपुत्रिक मेला. तेव्हां ढोकलसिंगानें आपला हक्क पुढें आणला, परंतु तो मान्य झाला नाहीं. मारवाडांतील अहमदनगर या जहागिरीचा मालक तखतसिंग यांस दत्तक घेऊन गादीवर बसविण्यांत आलें (१८४३.)

तखतसिंग हा अजितसिंहाचा पणतु होता. तखतसिंगानें १८५७ सालीं इंग्लिशांस चांगली मदत केली. परंतु पुढें राज्यांत अव्यवस्था झाल्यामुळें (१८६८) हिंदुस्थान सरकारास कारभारांत पुन्हां हात घालावा लागला. तखतसिंग धनलोभ व आळशी निघाल्यानें त्याच्या अधिकार्‍यांनीं प्रजेस फार त्रास दिला. अखेर तो १८७३ सालीं मरण पावला. त्याच्या मागून (वडील पुत्र) जसवंतसिंग गादीवर आला. जोधपूरच्या महाराजास पूर्वीं १७ तोफांची सलामी होती, ती याच्या कारकीर्दींत प्रथम १९ व नंतर २१ पर्यंत वाढविण्यांत आली. हा इ. स. १८९५ मध्यें मरण पावला. याच्या मागून त्याचा एकुलता एक अज्ञान पुत्र सरदारसिंग गादीवर बसला. त्याला इ. स. १८९८ मध्यें सर्व अधिकार मिळाले. तो अज्ञान असतां सर्व कारभार त्याचा चुलता महाराज सर प्रतापसिंग (ईदरचा महाराज) पहात असे. त्याच्या कारकीर्दींत पुष्कळ सुधारणा झाल्या. तो १९११ सालीं वारल्यावर त्याचा वडील पुत्र सुमेरसिंग बहादुर गादीवर आला. यावेळीं त्याचें वय १४ होतें व राज्य कारभार कौसिंल ऑफ रीजन्समार्फत चालत असे. कौंसिलचा अध्यक्ष सर प्रतापसिंग होता. या कामासाठीं त्यानें आपल्या ईदरच्या राजसिंहासनाचा राजीनामा दिला होता. गेल्या महायुद्धांत सुमेरसिंग व प्रतापसिंग यांनीं इंग्रज सरकारास फार मदत केली. ते दोघे स्वतः यूरोपांत रणांगणावर गेले होते. महाराज वयांत येऊन त्याला के.बी. ई. ची पदवीहि मिळाली होती. त्याला स. १९१६ त संस्थानची सर्व अखत्यारी मिळाली. परंतु तो थोड्याच दिवसांनीं मरण पावला (ऑक्टोबर १९१८). त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ महाराजा उमेदसिंग गादीवर बसला. ही सध्यां अज्ञान असल्यानें राज्यकारभार वरीलप्रमाणेंच रीजन्सी कौन्सिलमार्फत चालतो.

संस्थानांत प्राचीन अवशेष पुष्कळ ठिकाणीं (बालीं, भीनमाळ, दिडवाण, जालोर, मंदोर, नाडोल, नागर, पाली, राणपुर आणि साद्री वगैरे) सांपडतात. यांत १९११ सालीं २५ शहरें व ४०८८ गांवें होतीं. ब्रिटीश मुलखांतील मेरवाडा जिल्ह्यांतील २१ खेड्यांवर जरी हिंदुस्थान सरकारचा ताबा चालतो तरी जोधपुर दरबारच्या १८८५ सालच्या तहान्वयें संस्थानचें कांहीं अधिकार त्या खेड्यांवर चालतात. त्याप्रमाणें सांभर गांवावर जोधपुर व जयपुर या दोन्ही संस्थानांचा अधिकार चालतो. संस्थानांत तेवीस हुकूमत जिल्हे आहेत.

या संस्थानांत शेंकडा ८३ लोकवस्ती हिंदूंची आहे. येथें मुख्यत्वेंकरून मारवाडी भाषा बोलतात. बहुतेक सर्व प्रदेश रेताड आहे. या संस्थानांत कांहीं ठिकाणीं उंट नांगरास जोडतात. बाजरी, ज्वारी, मठ, मका, तीळ, आणि कापूस हीं मुख्य पिकें होत. रब्बीचीं पिकें (गहूं, हरभरा, मोहरी वगैरे) सुपीक जमीनींत होतात. या संस्थानांत सुमारें ३५५ चौ. मैल जंगल आहे. या प्रदेशांत मीठ बरेंच सांपडतें. तें खाणींतून काढण्याचें बहुतेक सर्व हक्क ब्रिटिश सरकाराकडे आहेत सांभर तलावाजवळ माक्राण येथें संगमरवरी दगड सांपडतो.

या संस्थानांत विशेष महत्त्वाचे असे उद्योगधंदे नाहींत. संस्थानांतून मीठ, जनावरें, कातडीं, हाडे, लोंकर, कापूस, गळिताचीं धान्यें, संगमरवरी दगड, कुरुंदाचा दगड वगैरे बाहेर जातात. मारवाडी घोडे राजपुतान्यांत प्रख्यात आहेत. राजपुताना- माळवा- रेल्वे ही संस्थानच्या आग्नेयीकडील भागांतून जाते. तसेंच जोधपूर- बिकानेर रेल्वेचा एक फांटा संस्थानच्या मालकीचा आहे. या फांट्याची एकंदर लांबी ४५५ मैल असून हा फांटा संस्थानांत मुख्य ठिकाणीं खेळवला आहे. यास एक कोटी बावीस लक्ष रुपये भांडवल खर्च झालें आहे.

या संस्थानांत पाऊस नेहमीं कमी पडतो, त्यामुळें दुष्काळ वारंवार पडतात. साधारण आठ वर्षांनीं एकदां दुष्काळ पडावयाचा अशा अर्थाची एक म्हण इकडे प्रचारांत आहे. संस्थानांत जसवंतसागर नांवाचा एक तलाव आहे. संस्थानचा कारभार कौंसिलच्या मार्फत येथील महाराज पहात असतात. या संस्थानांत पूर्वीं चांदीचें नाणें पाडीत. त्यास ‘विजयशाही’ व ‘इक्तीसंद’ अशीं नांवें होतीं. परंतु ब्रिटिश नाण्यापेक्षां त्यास बाजारांत किंमत कमी येऊं लागल्यामुळें संस्थाननें ब्रिटिश नाणें सरसहा सुरू केलें. यांत फक्त ६९० खालसा गांवें असून, त्यांवर दरबारचा प्रत्यक्ष अधिकार चालतो. बाकींचीं गांवें जहागिरदार, भुमिया, इनामदार, चारण, ब्राम्हण धार्मिक संस्था वगैरेंच्या मालीकींचीं आहेत. यांच्यापासून दरबारास उत्पन्न मिळण्याचे मार्ग निराळे आहेत. पूर्वीं सरकारसारा ऐनजिनसीं देण्याची वहिवाट होती. परंतु इ. स. १८९४ पासून खालसा गांवांत सारा नाण्यांत घेण्याची वहिवाट सुरू झाली. इतर ठिकाणीं कोठें कोठें सार्‍याबद्दल अद्यापि धान्य घेण्याची वहिवाट आहे.

श ह र.- हें जोधपूर संस्थानची राजधानी. उ. अ. २६ १८’ व पू. रे. ७३ १’. हें जोधपूर- बिकानेर रेल्वेवरचें स्टेशन आहे. हें दिल्लीहून ३८० मैल व मुंबईहून ५९० मैल असून येथील लोकसंख्या (१९२१) ७३४८० आहे. १४५९ सालीं राव जोधानें हें शहर वसविलें. जुन्या शहराभोंवती तट असून त्यास चार वेशी आहेत. हें जुनें शहर अर्वाचीन शहराच्या आग्नेयीस आहे. अर्वाचीन शहर एका डोंगराच्या पायथ्याशीं घोड्याच्या नालाच्या आकाराप्रमाणें वसलें असून त्यावर किल्ला आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धांत किल्ल्यांस भक्कम तट बांधला असून सहा वेशी आहेत. राजपुतान्यांतील किल्ल्यांत हा किल्ला प्रेक्षणीय आहे. किल्ल्यांतील मोतीमहाल, फत्तेमहाल वगैरे इमारती पहाण्यासारख्या आहेत. शहरांत देखील मोठमोठे राजवाडे असून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत बांधलेलें कुंजबिहारीच्या मंदिराचें खोदकाम फारच सुंदर आहे.

जोधपूर येथें व्यापार बराच चालतो पण स्थानिक उद्योगधंदे महत्त्वाचे नाहींत. १८८४ सालापासून येथें म्युनिसिपलिटी स्थापन झाली आहे. शहरांतील मैला वगैरे काढण्याकरितां शहराभोंवतीं ट्रॅम्बेची योजना करून घाणीची व्यवस्था विशेष स्वच्छरीतीनें केली आहे. जसवंतकॉलेज, दरबारहायस्कूल, रजपूतस्कूल व ह्यूसनगर्लस्स्कूल या मुख्य शिक्षणसंस्था आहेत. [इंपे. ग्याझे. पु. १४: गोडबोले संस्थांनाचा एतद्देशीय इतिहास; टॉड राजस्थान; टाईम्स इयर- बुक (१९२२); सेन्ससरिपोर्ट (१९२१); डफ- हिस्टरी ऑफ दि मराठाज.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .