प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जेसुइट लोक - हें नांव ‘सोसायटी ऑफ जीझस’ या नांवाच्या संस्थेंतील सभासदांस लावितात. ख्रिस्ती संप्रदायांपैकीं रोमन कॅथोलिक पंथाची अनुयायी असलेली ही संस्था सेंट इग्नेशियम लॉयोला नांवाच्या इसमानें १५३९ सालीं स्थापिली. या संस्थेचा उद्देश ख्रिस्तीधर्मशास्त्रवेत्या इसमांनीं निर्धनता, ब्रम्हचर्य व आज्ञाधारकपणा हीं तीन व्रतें पाळण्याची शपथ घेऊन स्वतःचें व शेजार्‍यांचें आध्यात्मिक कल्याण करण्याकरितां झटणें हा आहे. या संस्थेचे सभासद व मूळ संस्थापक इग्नेशियस यानें तयार केलेल्या नियमांप्रमाणें राहत व वागत असत, व या नियमांनां पोपची संमति मिळालेली होती. मार्टिन लूथर यानें जर्मनीमध्यें १५२० सालीं रोम येथील ख्रिस्ती धर्मगुरू पोप याचें आज्ञापत्र जाळून ‘प्रॉटेस्टंट पंथ’ म्हणून जें बंड उभारलें त्याचा प्रतिकार करण्याकरितां लूथरचा समकालीन इग्नेशियस यानें स्पेनमध्यें सदरहू संस्था स्थापिली. या संस्थेसंबंधीं नियम करतांना इग्नेशियसनें मोठें कडक लष्करी धोरण स्वीकारलें होतें कारण. लूथरचें बंड मोडण्याकरितां जुन्या ख्रिस्ती धर्मपंथाला धार्मिक व नैतिक स्वरूपाची लढाई चालविली पाहिजे असें त्याचें म्हणणें होतें. व त्याप्रमाणें जेसुइट संस्थेचा चालक एक मुख्य अधिकारी आमरण नेमून त्याच्या हाती अनियंत्रित सत्ता देण्याचा त्यानें नियम केला होता. तो लिहितो ‘या मुख्य अधिकार्‍याच्या सेन्यांतल्या कमांडर-इन- चीफच्या आज्ञांप्रमाणें हाताखालच्या सर्व लोकांनीं मुख्याला केवळ ईश्वराच्या जागी समजून त्याची वैयक्तिक बुद्धिमत्ता, नीतिमत्ता व सारासार विचारशक्ति यांविषयीं विचार मनांत न आणतां बिनतक्रार मानल्या पाहिजेत. कनिष्ठांनीं वरिष्ठापुढें आपलें सर्व म्हणणें अवश्य मांडलें पाहिजे व तें ऐकल्यावर वरिष्ठाची जी आज्ञा होईल ती शिरसावंद्य केली पाहिजे.’ धडधडीत पापकृत्य असेल तें खेरीजकरून इतर प्रत्येक बाबतींत कनिष्ठानें वरिष्ठाची इच्छा तीच आपली इच्छा इतकें तादात्म्य पावून वागलें पाहिजे. पापकृत्यच असेल तर प्रथम वरिष्ठापुढें स्वतःचें मत मांडावें, व त्याचाहि उपयोग न झाल्यास दुसर्‍या दोन तीन समंजस इसमांनां आपली शंका निवेदन करून ते सांगतील त्याप्रमाणें वागावें. इग्नेशियसचा दुसराहि एक नियम विशेष महत्त्वाची आहे. रोम येथील पोपच्या धर्मसत्तेविरुद्ध लूथरची मोहीम समाजांत बद्धमूल होऊं नये म्हणून जेसुइटांनीं सर्व लोकांत मिसळून उपदेश करीत रहावें; केवळ एकांतामध्यें ईश्वर चिंतनांत वेळ घालविल्यानें खरी आध्यात्मिकें उन्नति होणार नाहीं, असें त्यानें स्पष्ट बजावलें आहे.

सं स्थे ची र च ना व का र भा र.- या संस्थेमध्यें सहा दर्जांचें इसमन असत ते असे:- (१) नोव्हिस (नवशिक्या), (२)स्कोलॅस्टिक(विद्यार्थी), (३) टेंपोरेल को अ‍ॅड्ज्यूटर (ऐहिक सहकारी), (४) स्पिरिच्युअर को अ‍ॅड्ज्यूटर (आध्यात्मिक सहकारी), (५) प्रोफेस्ड ऑफ दि थ्री व्हाऊज (त्रैव्रतस्थ) व (६) प्रोफेस्ड ऑफ दि फोर व्हाऊज (चतुर्व्रतस्थ). नोव्हिस या सदरांत चौदा वर्षावरील इसमांना घेऊन त्यांनां एका अधिकार्‍याच्या देखरेखीखालीं दोन वर्षें ठेवीत व त्या काळांत त्यांच्या स्वभावांतील गुण दोषांची नीट परीक्षा करून लायक ठरल्यास त्यांनां दुसर्‍या वर्गांत घालीत, व त्यांनां धर्मोपदेशक (प्रीस्ट) किंवा गृहस्थाश्रमी(लेमन) या दोन भिन्न आयुष्यक्रमांपैकीं एक निश्चित ठरवून तदनुरूप पुढील शिक्षण देत असत. धर्मोपदेशक होणारांनां स्कोलॅस्टिक (विद्यार्थी) या सदराखाली शपथ घेऊन बरीच वर्षें अध्ययन व अध्यापन करीत राहावें लागें. शपथ घेणें ती ‘हे सर्व शक्तिमान् परमेश्वरा मी निर्धनता, ब्रम्हचर्य व संस्थेची सर्व काळ आज्ञा पाळण्याची शपथ घेतों, आणि या संस्थेंत आमरण राहण्याचें व सर्व बाबतींत संस्थेच्या नियमानुसार वागण्याचें वचन देतों व तें पुरें करण्याकरितां तूं मजवर पूर्ण कृपा कर.” या दुसर्‍या वर्गांत स्कोलॅस्टिकला प्रथम पांच वर्षें वाङ्मयात्मक विषयांचें शिक्षण, नंतर पांचसहा वर्षें उच्च शिक्षणाबरोबर अध्यापन आणि वयाच्या अठ्ठावीस तीस वर्षांपासून ईश्वरज्ञाना (थिआलजी) चा अभ्यास, येणेंप्रमाणें विद्यार्जन चौतीस छत्तीस वर्षें वयापर्यंत झाल्यावर प्रीस्ट बनून स्पिरिच्युअल को अ‍ॅडज्यूटर हा दर्जा प्राप्त होत असे. गृहस्थाश्रमी होऊं इच्छिणारांनां ‘टेंपोरेल को अ‍ॅडज्यूटर’ या सदरांत प्रवेश होण्याकरितां दहा वर्षांचा अभ्यासक्रम असे. प्रीस्ट झाल्यानंतर थोड्या वर्षांनीं ‘थ्री व्हाऊज’ (तीन व्रतें) पत्करणाराचा वरच्या दर्जांत समावेश होई आणि अखेर पंचेचाळीस वर्षें वय झाल्यावर शेवटचा ‘फोर व्हाऊज (चार व्रतें) घेणारांचा दर्जा संस्थेच्या सभासदाला मिळूं शकत असे. या शेवटच्या सर्वोच्च वर्गात फार थोड्या इसमांचा प्रवेश होई. या सर्व निरनिराळ्या दर्जाच्या सभासदांनां संस्थेच्या इमारतींतच राहावें लागे. या जेसुइट संस्थेच्या मुख्याला ‘जनरल’ म्हणत व तो नेहमीं रोम येथें राहत असे. संस्थेच्या प्रांत, जिल्हा व गांव येथीलसर्व शाखांचे अधिकारी नेमण्याचा अधिकार जनरलला असे. जनरलची नेमणूक मात्र मतदाराकडून निवडणुकीनें होत असे. प्रत्येक ठिकाणच्या जेसुइटला संस्थेच्या कार्यांसंबंधीं माहिती जनरला नियमितपणें द्यावीं लागत असे. जनरल हा जरी सर्वाधिकारी असे तरी पण त्याच्या मदतीला एक ‘कन्सल्टेटिव्ह कौन्सिल’ (सल्लागार मंडळ) असें. आणि सल्लागारांची निवड किंवा बडतर्फी करणें जनरलच्या हातीं नसल्यामुळें हें मंडळ जनरलचे दोष दाखवून योग्य सल्लामसलत व सूचना निर्भिडपणें देत असे. शिवाय संस्थेच्या सर्वसाधारण सभेला जनरलला तात्पुरता किंवा कायम बडतर्फे करण्याचा अधिकार आहे.

याप्रमाणें या संस्थेची घटना व नियम मोठ्या कौशल्यानें केले असल्यामुळें अंतस्थ कलह न माजतां जुन्या ख्रिस्ती धर्मात म्हणजे रोमन कॅथोलिक पंथांत नवीन सामर्थ्य उत्पन्न करण्याच्या कामीं या संस्थेनें फार वाखाणण्यासारखी कामगिरी केली. प्रॉटेस्टंट पंथाची लाट यूरोपभर पसणार अशीं चिन्हें दिसत होतीं त्यावेळीं ती लाट उत्तर यूरोपकडेच थोपवून धरण्याचें काम या संस्थेनें केलें. हें कार्य जेसुइटांच्या हातून झालें तें केवळ अंधश्रद्धेमुळें नव्हे तर शहाणपणा व दूरदर्शीपणामुळें झालें. ख्रिस्तीधर्मसुधारणेच्या म्हणजे प्रॉटेस्टंट पंथाच्या चळवळीला जोर चढण्याचें कारण ख्रिस्तीधर्मोपदेकांतील अज्ञान, आळस, व दुर्वर्तन आहे ही गोष्ट जाणून या संस्थेनें उच्च विद्यार्जन व सद्वर्तन या दोन्ही गुणांनीं संपन्न असे विद्यार्थी तयार करण्याकरितां स्वतःच्या शाळा, कॉलेजें स्थापलीं, इतकेंच नव्हें तर स्वतःचीं नवीं क्रमिक पुस्तकें तयार केलीं. सुमारें तीन शतकें जेसुईट लोक हे सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून यूरोपभर नांवाजलेले होते. त्यांचें खासगी वर्तन निर्द्रोष असे, उच्च शिक्षणामुळें धर्मोपदेशक होण्याची लायकी त्यांच्या अंगीं सर्वांहून अधिक असे; आणि वाङ्मयाच्या धार्मिक व इतर सर्व शाखांत ग्रंथलेखक म्हणूनहि त्यांची संख्या सर्वांत अधिक आहे. पण त्यांची सर्वांत अधिक स्पृहणीय कामगिरी यूरोपेतर खंडांतील दूरदूरच्या देशांत ख्रिस्तीधर्मप्रसारासंबंधाची होय. उत्तर अमेरिका, ब्राझिल, पाराग्वे, चीन, हिंदुस्थान वगैरे देशांत पाश्चात्य विद्या व ख्रिस्तीधर्म यांच्या प्रसाराची जी कामगिरी त्यांनीं एकनिष्ठेनें, निरलसपणें व आनदानें केली आहे तिशीं तुलना करण्यासारखी बौद्ध भिक्षूंखेरीज इतर कोणाहि धर्मीयांची कामगिरी नाहीं.

संस्थेवरील आक्षेप.- संस्थेच्या या उज्वल बाजूबरोबर दुसरी दूषणार्ह बाजूहि आहे. यांत विशेष महत्त्वाची गोष्ट ही कीं, ज्या रोमन कॅथॉलिक पंथाचें पुनरुज्जीवन करण्याचें श्रेय संस्थेस आहे. त्या पंथांतील लोकांनांहि जेसुइट लोक अप्रिय झाले. त्याचें कारण एकतर कॅथोलिक पंथी रुढिभक्त पण नीतिभ्रष्ट धर्माधिकार्‍यांनां आत्मसुधारणेचा जेसुइटांनीं केलेला उपदेश व स्ववर्तनानें घालून दिलेला धडा साहजिकच कटु व दुःसाध्य वाटूं लागला; आणि जेसुईटांच्या वाढत्या बळाबद्दल मत्सर आणि चढाईच्या वर्तनाबद्दल राग उत्पन्न झाला. तात्पर्य स्वतःचें महत्व व चैन कमी होणारसें पाहून कॅथोलिक चर्चमधील अधिकारी जेसुइटांचे विरोधी बनले. जेसुइटांचे दुसरे आक्षेपकनीति क्षेत्रांतले होत. ‘साधनांचें समर्थन साध्य करतें’ (एण्ड जस्टिफाईज दि मीन्स) म्हणजे साध्य चांगलें असलें कीं साधनें बरी वाईट असलीं तरी तें क्षम्य आहे हे तत्त्व जेसुइट संस्था उपदेशितो. कांहीं जेसुइटांनीं या म्हणीप्रमाणें वर्तन केलें असलें तरी सर्व संस्थेचें हें ब्रीदवाक्य होतें हा आरोप खरा नाहीं. कारण या तत्त्वानें चालल्यास कोणतीहि संस्था फार काळ टिकणें शक्य नाहीं. जेसुइटांविरुद्ध सर्वांत मोठा आरोप म्हणजे त्यांच्या राजकारणांतील उलाढाली. पुष्कळ जेसुइटांनां धर्मकारण व राजकारण प्रथक् ठेवतां आलें नाहीं ही गोष्ट खरी आहे. राजकीय प्रश्नांचें तात्विक विवेचन जेसुइटांच्या शाळेंत चाले व त्यांत जुलमी राजकर्त्यांच्या खुनांचें समर्थन केलें जात असे हेंहि खरें आहे. तथापि कोणत्याहि राजकीय खुनाच्या कटांत कोणाहि जेसुइटाचें प्रत्यक्षाप्रत्यक्ष अंग असल्याचा कसलाहि पुरावा नाहीं. फ्रान्समधून प्रॉटेस्टंट लोकांची हद्दपारी, तीस वर्षांचें युद्ध, इंग्लंडच्या इलिझाबेथ राणीविरुद्ध झालेले कट, वगैरे गोष्टींतील प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशीं जेसुइटांचे पत्रव्यवहार असत हें सिद्ध झालें आहे. तथापि सभासदांनीं असल्या कार्यांशीं बिलकुल संबंध ठेवूं नये असा सोसायटीचा सक्त नियम होता. सबब त्या नियमाविरुद्ध वागणार्‍या व्यक्तींच्या कृत्यांबद्दल संस्थेला जबाबदार धरणें योग्य नाहीं.

अ प क र्षा चीं का र णें.- या संस्थेचा पुढें सर्वत्र अपकर्ष होत जाण्याचीं मुख्य कारणें दोन पहिलें कारण संस्थेच्या सभासदांमध्यें खरोखर मोठ्या बुद्धिमत्तेच्या इसमांचा पुढील काळांत अभाव हें होय. या संस्थेचें हजारों सभासद होऊन गेले आणि सामान्य माणसापेक्षां त्यांचा शैक्षणिक दर्जा अधिक असे. तथापि मोठाल्या योजना तयार करून त्या कुशलतेने पार पाडण्यास लागणारी असामान्य बुद्धिमत्ता कोणाच्याहि अंगीं नव्हती. स्वतः संस्थेचा संस्थापक लायोला व सेंट फ्रॅन्सिस झेवियर हे दोनच पहिल्या प्रतीचे इसम होते. नंतरच्या इसमांत अनसेल्म, बेकन, रिचेल्यू यांच्या योग्यतेचा एकहि नव्हता. पास्काल, डेकार्टस्, व्होल्टेयर वगैरेंचें शिक्षण या संस्थेंत झालें पण ते महान् तत्त्ववेत्ते संस्थेंतून फुटून बाहेर पडले आणि सामान्यतः सर्व संस्थांची हीच दुःस्थिति असते. संस्थेला सतत थोर बुद्धिमान चालक कोठेंहि लाभत नाहींत. त्याचें कारण असें कीं, संस्थेचे उत्पादक जे नियम करून ठेवतात त्यांच्या कक्षेंत सर्व सभासद जखडून जाऊन स्वतंत्र कर्तबगारीला वाव राहत नाहीं आणि नियमांचें कुपण कोणी उल्लंघन करूं लागल्यास तो अप्रिय ठरून संस्थेतून बहिष्कृत होतो. हीच स्थिति जेसुइटांच्या संस्थेत असे. स्वतंत्रपणें भिन्न मतांची चर्चा करण्याचीहि संस्थेंत पूर्ण मनाई असे.

अपकर्षाचें दुसरें कारण म्हणजे जेसुइटांचा इतर धर्मपंथांशीं सहकारितेचा अभाव व स्वसंस्थेचें सर्वत्र वर्चस्व स्थापण्याची इच्छा. हें धोरण संस्थेचा दुसरा जनरल लेनेझ (१५५८-१६६५) यानें संस्थेच्या कार्यांत पक्कें करून टाकलें. स्वतःचा हेतु साधण्याकरितां जेसुइट लोक युक्तायुक्त कोणतीहि गोष्ट करण्यास तयार होत. हिंदुस्थान चीन देशांत त्यांनीं योजलेल्या युक्त्या व केलेलीं कृत्यें ख्रिस्ती धर्माला निःसंशय कमीपणा आणणारीं आहेत. हिंदुस्थानांतील ब्राम्हणवर्गाची सहानुभूति मिळावी म्हणून जेसुइटांनीं ब्राम्हणी पोषाख व राहणीहि स्वीकारली, व महारख्रिस्त्यांचीं धर्मकृत्यें करण्याचें नाकारून एक प्रकारें ख्रिस्ती धर्मांत जातिभेदाला स्थान दिलें. असल्या कृत्यामुळें जेसुइटांची सर्वत्र बदनामी झाली, ती इतकी कीं, १७७३ सालीं या जेसुइटांच्या संस्था अनेक देशच्या सरकारांनीं बंद पाडल्या. तथापि पुन्हां १८११ सालीं त्यांच्या पुनरुज्जीवनास परवानगी मिळाली. यावेळीं यूरोपांत प्रातिनिधिक राज्यपद्धति बर्‍याच देशांत झाल्यामुळें जेसुइटांनीं शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांखेरीज बाहेर राजकीय क्षेत्रांत शिरणें अशक्यप्राय झालें. तरीहि राजकीय उलाढाली व रोमन कॅथोलिक पंथाशीं विरोध यांनीं संस्थेस अपाय पोहोचतों, ही गोष्ट सर्व जेसुइटांनां पटलेली नव्हती. त्यामुळें १९ व्या शतकांतहि या संस्थेच्या शाखांवर अनेक संकटें आलीं.

इ ति हा स- इग्नेशियसच्या हयातींतच जेसुइट संस्था पोर्तुगाल, रोम, गोवा (हिंदुस्थान), स्पेन, जर्मनी, फ्रान्स इतक्या ठिकाणीं स्थापन झाल्या. १५४२ सालीं त्यांचें पहिलें कॉलेज कोईमब्रा येथें निघालें. याप्रमाणें पहिल्या चार जनरलांच्या कारकीर्दींत संस्थेची एकसारखी प्रगति होत गेली. पांचवा जनरल आक्वेव्हिवा (१५८१-१६१५) याच्या वेळीं संस्थेची बदनामी होण्यास सुरुवात झाली. तरीहि १६३९ सालीं संस्थेचा शतवार्षिकोत्सव साजरा करण्यांत आला. त्या वेळीं संस्थेच्या एकंदर आठशें शाखा व पंधरा हजार सभासद होते. पुढें फरान्समधील ह्युगुनॉट (फ्रेंच प्रॉटेस्टंट) पंथाशीं वैर केल्यामुळें जेसुइटांची अप्रियता बरीच वाढली. तथापि जेसुइटांवर सर्वांत मोठें संकट १७६७ सालीं आलें. स्पेनचा राजा तिसरा चार्लस यानें, त्याच्याविरुद्ध राजकीय कटांत जेसुइट सामील असल्याचा पुरावा मिळाल्यावरून स्वतःच्या राज्यांतील सर्व जेसुइट संस्था बंद पाडण्याचा हुकूम केला आणि स. १७७३ च्या सुमारास तर फ्रान्स, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया याहि देशांनीं जेसुइटांच्या संस्था बंद करण्याचा हुकूम केला. यावेळीं जेसुइटींचे एकंदर ४१ व प्रांत व २२५८९ सभासद होतो. जेसुइट संस्थेच्या कार्याला रोमच्या पोपांची प्रथमपासून अनुकूलता होती पण यावेळीं यूरोपांतले फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया वगैरे देशांचे बादशहा विरुद्ध गेल्यामुळें पोपांनांहि जेसुइटांविरुद्ध आज्ञापत्र (ब्रीव्ह किंवा बुल) काढावें लागलें. तथापि रशिया व प्रशिया या दोन देशांत परवानगी असल्यामुळें तेथील जेसुइटांच्या संस्था टिकून राहिल्या.

१८०१ सालापासून पोपांनीं जेसुइट संस्थांनां पु्नहां परवानगी देण्यास सुरुवात केली आणि लवकरच वरील सर्व देशांत जेसुईटांवरील बंदी दूर झाली. तथापि १९ व्या शतकांतहि मधून मधून एखाददुसर्‍या देशांत जेसुइटंविरुद्ध मनाईहुकूम सुटत असत. पण एकंदरीनें आतांपर्यंत पोपांची व लोकमताची जेसुइटांच्या कार्याला अनुकूलता मिळत आलेली आहे. १९१० सालीं फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, इटली, हॉलंड, बेल्जम, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड वगैरे यूरोपीय देशांत आणि इतर खंडांतील तिबेट, हिंदुस्थान, चीन, चपान, अबीसिनिया, ईजिप्त, कांगो, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, पेरू, मेक्सिको, ब्रिटिश साम्राज्य, वगैरे देशांत त्यांच्या संस्था असून एकंदर सभासदांची संख्या अजमासे २०००० होती. तसेच आजपर्यंत या संस्थेचे पंचवीस जनरल (मुख्य अधिकारी) झाले आहेत. [संदर्भ ग्रंथ- नीव्ह- दि जेसुइट्स. (क्रोटिन्यू- जॉलीच्या पुस्तकाचें भाषांतर), २ भाग, लंडन १८७९, निकोलिनी हिस्टरी ऑफ जेसुइट्स, रुल सेलेब्रेटेड जेसुइट्स, ए. रि. ए. मधील लेख.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .