प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जेम्स राजे - या नांवाचे राजे इंग्लंड व स्काटलंड हे दोन देश, अरेगॉन प्रांत (फ्रान्स) आणि माजोर्का बेट इतक्या ठिकाणीं होऊन गेले. त्यापैकी इंग्लंड व स्कॉटलंड येथील राजेच विशेष महत्त्वाचे आहेत. शिवाय जेम्स नांवाचा एक तोतया (ओल्ड प्रिटेंडर) इंग्लंडांत होऊन गेला.

इं ग्लं ड चे जे म्स रा जे - या नांवाचें एकंदर दोनच राजे झाले. ते इंग्लडच्या स्टुअर्ट घराण्यांतील असून तोतया जेम्सहि त्याच घराण्यांत झाला. त्यांचा राजकीय इतिहास ‘इंग्लंड’ या लेखांत दिला आहे.

पहिला जेम्स (१५६६-१६२५):- हाच मूळ स्कॉट्लडमधील सहावा जेम्स राजा असून इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीनंतर औरस वारस नसल्यामुळें नजीकचा वारस जेम्स हा इंग्लंड व स्काटलंड या दोन देशांचा संयुक्त राजा झाला. हा स्कॉटलंडची राणी मेरी (क्वीन ऑफ स्काट्स) व तिचा दुसरा नवरा डार्नले यांचा मुलगा होय. मेरीच्या संशयित दुर्वर्तनामुळें ती पदभ्रष्ट होऊन जेम्स हा एक वर्षाचा असतांना स्कॉटलंडचा राजा झाला. तो लहानपणापासून अगदी अशक्त होता. तथापि घोड्यावरून रपेट करण्याचा त्याला फार नाद होता. त्याला लॅटिन व फ्रेंच भाषांचें चांगलें ज्ञान व प्रॉटेस्टंट धर्मपंथाचें उत्तम शिक्षण देण्यांत आलें होतें. त्यामुळें तो विद्येचा चाहता पण घमेंडखोर बनला. वयांत आल्यावर त्यानें स्कॉटलंडांतील सरदारांची अरेरावी बंद करून सुव्यवस्थित राज्यकारभार सुरू केला. त्यानें उद्योगधंद्यास उत्तेजन दिलें व धर्मसत्तेला राजसत्तेच्या वर्चस्वाखालीं आणलें. येवढ्यावरूनच तो दुबळा राजा नव्हता किंवा पढतमूर्खहि नव्हता असें सिद्ध होतें. त्याचीं राजकारणांत ध्येय गाठण्यांचीं साधनें अयोग्य असल्यामुळें त्याचे खरे गुण पुढील पिढ्यांस विद्रुप भासतात. वक्रराजनीती (किंग- क्रॅफ्ट) चें शिक्षण त्याला मूळपासून मिळालें होतें. वचन देणें व तें मोडणें हा त्याचा नेहमीचा क्रम होता. शिवाय कुरूप शरीर, बडबड्या स्वभाव, स्कॉच स्नेह्यांवरील देणग्यांचा वर्षाव वगैरे गोष्टीमुळें तो इंग्लंडांत अप्रिय बनून अनियंत्रित राज्यकारभाराच्या प्रयत्‍नामुळें राजपक्ष व पार्लमेंटपक्ष यांच्यांमधील यादवी युद्धाचा त्यानें पाया घातला. स्पेन या कॅथोलिक देशाबरोबर सख्य जोडण्याचा प्रयत्‍न फसल्यामुळें त्याचीं कारस्थानें फारच हास्यास्पद ठरलीं. जेम्सला ग्रंथकर्ता म्हणून प्रसिद्ध होण्याची मोठी इच्छा होती म्हणून त्यानें बरेंच लिखाण लिहिलें. तें वाङ्मय या दृष्टीनें अगदीं सामान्य दर्जाचें असलें तरी इंग्लंडच्या राजावलींत विद्वत्तेच्या बाबतींत त्याचा नंबर बराच वर लागतो.

दुसरा जेम्स (१६३३-१७०१):- हा पहिल्या चार्लस् राजाचा मुलगा दुसर्‍या चार्लस राजानंतर १६८५ सालीं गादीवर आला. तो युद्धकलाकुशल होता. डच युद्धांत जय मिळवून त्यानें आरमारी लढाईंतलें कौशल्य व्यक्त केलें. पण त्याचें खासगी बर्तन चांगलें नव्हतें. शिवाय तो उघडपणें रोमन कॅथॉलिकपंथी बनला. राज्यावर आल्यावर त्यानें कॅथॉलिकांवरील नियंत्रणें दूर करण्याचा व त्यांनां अधिकाराच्या जागा देण्याचा क्रम सुरू केल्यामुळें राजकीय जुलूम व धार्मिक दुराग्रह यांनीं सर्व देशांत फार असंतोष माजला. त्याचें पर्यवसान स. १६८८ च्या राजक्रांतींत झालें. नंतर पळून जाऊन तो फ्रान्समध्यें राजाश्रयाखालीं राहिला. आयर्लंडमध्यें बंड उभारून गेलेलें राजपद पुन्हां मिळविण्याचा त्यानें प्रयत्‍न केला पण तो फसला. नंतर मरेपर्यंत तो मोठा साधुपुरुष बनून रोग बरे करण्याचे अद्भुत चमत्कार करीत फ्रान्समध्यें राहिला. त्याला अ‍ॅन हाइड नांवाच्या बायकोपासून आठ मुलें, मोडनाची मेरी या बायकोपासून सात मुलें आणि दुसर्‍या दोन उपस्त्रियांपासून कांहीं मुलगे व मुली मिळून बरींच अपत्यें होतीं.

जेम्स, थोरला तोतया (१६८८- १७६६):- हा दुसर्‍या जेम्सचा मुलगा बापानें राज्य गमावल्यावर फ्रान्सच्या राजाच्या आश्रयास राहिला होता, व फ्रान्सचा राजा चवदावा लुई याच्या मदतीनें त्यानें १७१५ सालीं राज्य परत मिळविण्याकरितां स्कॉटलंडमध्यें बंड केलें पण तें फसलें. १७१८ सालीं जेम्सनें पोलंडच्या राजघराण्यांतील मेरिआ क्लेमेंटिनाशीं लग्न करण्याचें ठरविलें. पण फ्रेंच राजा लुई यानें त्यास विरोध केल्यावर दोघांनीं इटलींत पळून विवाह लावला. पोपनें त्यांनां इंग्लडचे राजा राणी म्हणून मान देऊन राहण्यास राजवाडा व खर्चाकरितां १२००० क्राऊन इतकी वार्षिक नेमणूक दिली. जेम्सचें बायकोशीं पटलें नाहीं, व तीहि लवकरच वारली. जेम्सला दोन मुलगे होते.

स्का ट लं ड चे जे म्स रा जे.- या नांवाचे सहा राजे झाले. पहिल्या जेम्स:- (१३९४-१४३७) हा तिसर्‍या रॉबर्टचा मुलगा असून त्याला शिक्षणाकरितां फ्रान्सला धाडला असतां वाटेंत इंग्ल्डंच्या चवथ्या हेनरीनें कैदेत ठेविलें. तेथें त्याला चांगलें शिक्षण देण्यांत आलें. त्यानें मर्दानी-खेळांत तसेंच तत्त्वज्ञान व कायदेशास्त्र यांत प्राविण्य मिळविलें होतें. १४२३ सालीं ६०००० मार्क खंडणी घेऊन त्याला कैदेंतून मुक्त केलें व तो स्कॉटलंडचा राजा झाला. त्यानें पार्लमेंटच्या सभा भरवून कायदे पास करून घेऊन सनदशीर राज्यकारभाराचा पाया घातला. सरदारांची बेंडें मोडलीं. पण कांही सरदारांच्या कारस्थानमुळें १८३७ सालीं त्याचा खून झाला. एका इंग्रज सरदाराच्या जेन नांवाच्या मुलीशीं त्याचा विवाह झाला. त्याला दोन मुलगे, सहा मुली होत्या. त्याच्या विधवेनें पुनर्विवाह केला. जेम्सला संगीत व काव्यकलेचा नाद होता. त्यानें स्वतः कांहीं कविता केल्या.

जेम्स दुसरा (१४३०-१४६०):- पहिल्या जेम्सच्या वधानंतर त्याचा मुलगा दुसरा जेम्स हा गादीवर आला. तो सज्ञान होईतों आर्चिबाल्ड डग्लस हा त्याच्या नांवानें राज्यकारभार पहात असे. या अवधींत लिव्हिंग्स्टन व क्रिक्टन यांचें प्रस्थ माजलें होतें. डग्लस व क्रिक्टन यांच्यामध्यें वैर उत्पन्न झालें होतें. १४४३ सालीं विल्यम डग्लसनें राजाच्या नांवानें क्रिक्टनशीं ळडाई पुकारून क्रिक्टनचा पाडाव केला. १४४९ मध्यें जेम्सनें स्वतः आपल्या हातीं कारभार घेतला. त्यानें पहिल्या प्रथम लिाव्हिंगस्टनला कैद केलें व थोड्याच दिवसांत विश्वासघाताच्या आरोपावरून डग्लसचा शिरच्छेद केला. त्यामुळें डग्लसच्या पक्षपात्यांनीं बंड केलें. पण त्यांत त्याचा मोड झाला. इंग्लंडमध्यें या सुमारास आपापसांत कलह सुरू होऊन बंडाळी माजली होती. लौकरच ‘गुलाबाचें युद्ध’ सुरू झालें. या युद्धांत लँकॅस्टरच्या वतीनें जेम्सनें भाग घेतला होता. या लढाईंत राक्सबर्गच्या वेढ्यांत हा मारला गेला. याला तीन मुलगे व दोन मुली होत्या. हा लोकप्रिय राजा होता. याच्या कारकीर्दींत जमीनीसंबंधी कायदेशी, चलनी नाण्यांचा सुधारणाविषयक कायदा, न्यायखात्यांत सुधारणा इत्यादि गोष्टी घडून आल्या.

जेम्स तिसरा(१४५१-१४८८):- याचा राज्याभिषेक १४६० साली झाला. पण हा लहान असल्यामुळें त्याची आई त्याच्या वतीनें राज्यकारभार पहात असें. पुढें ती वारल्यानंतर अलेक्झांडर बॉईड व त्याचा भाऊ लॉर्ड बॉईड यांनीं राजास आपल्यास ताब्यांत आणून त्याच्या इच्छेविरुद्ध स्कॉटलंडचा राज्यकारभार चालविला. वयांत आल्यावर त्यानें स्वतःच्या हातांत राज्यसूत्रें घेतलीं व आपल्या राज्यांतील बलाढ्य सरदारांचा पराभव करून आपली सत्ता चिरस्थाई केली. हा जात्या शांतवृत्तीचा होता. आपल्या पदरीं हलक्या दर्जाचे खुशामती त्यानें ठेवले होते. त्यामुळें तो लोकांनां अप्रिय झाला. या खुशामत्यांच्या चिथावणीनें त्यानें आपल्या दोन्ही भांवांना पकडून अटकेंत ठेवलें. आल्बनी हा कैदेतून निसटून इंग्लंडला पळून गेला. इंग्लडचा राजा चौथा एडवर्ड यानें त्याला स्कॉटलंडचा राजा म्हणून मानण्याचें कबूल केले. त्यामुळें जेम्सनें इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारलें. पण इतक्यांत जेम्सच्या सरदारांनीं त्याला बंदिवान केल्यामुळें आल्बनीशीं तह करणें जेम्सला भाग पडले. पण पुनः आल्बनीनें एडवर्डशीं आपल्यास राज्यपद मिळविण्यासाठीं संधान बांधलें. पण याच सुमारास एडवर्ड वारल्यामुळें त्याचा बेत फसला व तो फ्रान्समध्यें पळून गेला. तेथें तो १४८५ सालीं वारला. जेम्स राजाला इंग्लंडशीं सख्यत्त्वाचें नातें जोडावयाची मनापासून इच्छा होती. पण त्याच्या सरदारांनां हें पसंत नव्हतें. शिवाय तो ख्यालीखुशालींत आपला वेळ दवडीत असल्यामुळें तो सरदारांनां फार अप्रिय झाला होता. त्यामुळें स्कॉटलंडमध्यें अंतस्थ बंड माजलें. जेम्सनें या सरदारांवर चाल केली. पण सौझीबर्न येथें त्याचा पराभव झाला. पुढें तो विश्वासघातानें मारला गेला. त्याला तीन मुलगे होते. जेम्सला गाण्याबजावण्याची व शिल्पशास्त्राची फार गोडी होती. एकांतवासाची त्याला फार आवड असे. राज्याच्या अंगीं आवश्यक लागणारी धडाडी त्याच्यामध्यें नव्हती.

जेम्स चौथा (१४७३-१५१३):- आपल्या बापाच्या मरणानंतर जेम्स हा गादीवर आला. बापापेक्षां त्याच्या अंगी धडाडी, मुत्सद्दीपणा हे गुण विशेष होते. आपल्या प्रजेला संतुष्ट ठेवण्यासाठीं तो फार जपस असे व त्यामुळें लोकांची त्याच्यावर फार भक्ति असे. तो राज्यावर आल्यावर कांहीं उपव्यापी सरदारांनीं त्याला सातव्या हेनरीच्या ताब्यांत देण्याचा कट केला. पण सुदैवानें तो फसला. हेन्रीनें त्याला आपली मुलगी देऊं केली. ती त्यानें प्रथम नाकारली. पण पुढें त्याचा व तिचा विवाह घडून आला. आपली सत्ता बळकट करून त्यानें यूरोपमध्यें आपली मान्यता वाढविण्याचा प्रयत्‍न केला पण आठवा हेनरी इंग्लडच्या गादीवर आल्यामुळें याला एक नवीनच प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला. हेनरीचा नक्षा उतरविण्यासाठीं जेम्सनें त्याच्याशीं लढाई पुकारली पण १५१३ साली फ्लॉडन येथें जी इतिहासप्रसिद्ध लढाई झाली तींत जेम्स हा मारला गेला. त्याला एक मुलगा होता व धर्मबाह्यसंबंधांपासूनहि दोनतीन मुलें झालीं होतीं.

जेम्स हा उदार, शहाणा व धडाडीचा राजा होता. त्याच्या कारकीर्दींत स्कॉटलंडमध्यें बर्‍याच इष्ट सुधारणा घडून आल्या. शिक्षणाला व वाङ्मयाला त्यानें उदराश्रय दिला. सांपत्तिक परिस्थिति याच्या कारकीर्दींत पुष्कळ सुधारली. तो मुत्सद्दी व शूर असल्यामुळें आपल्या राज्यांतलीं किरकोळ बंडें त्यानें मोडून टाकून स्कॉटलंडला प्रबळ केलें व यूरोपियन राजकारणांत आपला वचक बसविला. हा धार्मिक व देवभोळा होता. दानधर्माच्या बाबतींत तो मागेंपुढें पहात नसे. एकंदरींत हा लोकप्रिय राजा होऊन गेला यांत शंका नाहीं.

जेम्स पांचवा (१५१२-१५४२):- चौथ्या जेम्सच्या निधनानंतर हा जेम्स राज्यावर बसला. हा अज्ञान असल्यामुळें याच्या वतीनें याची आई राज्यकारभार पाहत असे. पण पुढें तिनें अँगसच्या अर्लशीं विवाह केल्यामुळें अल्बनीचा ड्यूक जॉनस्ट्र अर्ट याच्याकडे राज्यकारभाराचीं सूत्रें आलीं. हा इंग्लडचा वैरी होता. अँगस, व जेम्सची आई इंग्लंडची पक्षपाती होती. त्यामुळें या उभयंतांमध्यें भयंकर कलह माजले. १५२४ मध्यें पार्लमेंटनें जेम्सच्या हातांत कारभार दिला. १५२६ मध्यें अँगसनें जेम्सला आपल्या कैदेंत ठेवले. पण १५२८ मध्यें जेम्स निसटून गेला. व मोठें सैन्य जमवून त्यानें अँगसला स्कॉटलंडमधून हाकून लावलें. नंतर आपल्या पदरच्या बंडखोर सरदारांनां हात दाखून त्यांनां जेम्सनें वठणीवर आणलें. इंग्लडवरहि त्यानें किरकोळ हल्ले केले. शेवटीं १५३४ मध्यें इंग्लड व स्कॉटलंड यांच्यामध्यें तह झाला. हेनरीनें आपली मुलगी त्याला देऊं केली. पण त्याला फ्रेंच राज्यकन्या अधिक पसंद पडल्यानें त्यानें मॅडेलाईनशीं विवाह केला. पण ती थोडक्याच दिवसांत वारल्यामुळें त्यानें लुइ ऑफ ऑर्लीनच्या मुलीशीं लग्न केलें. फ्रेंचांच्या पक्षपातामुळें त्यानें इंग्लडंशीं विरोध आरंभरला. १५४२ मध्यें हेनरीनें स्कॉटलंडवर आपली सेना पाठविली. जेम्सला त्याच्या सरदारांचा पाठिंबा नसल्यानें त्याचा पराभव झाला, त्यामुळें मनाला धक्का बसून जेम्सनें प्राण सोडला. जेम्सला दोन मुलगे व एक मुलगी झाली. पण दोन्ही मुलगे अल्पवयांतच वारले. जेम्स हा धडाडीचा होता. तो सरदारांनां अप्रिय होता. तरी लोकांची त्याच्यावर भक्ति होती. तो धर्मशील व विद्वानांचा आश्रयदाता होता.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .