विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जेऊर - मुंबई. अहमदनगर जिल्ह्यांतील व तालुक्यांतील एक व्यापारी गांव. उ. अ. १९ १८’ व पू. रे. ७४ ४८’. अहमदनगरच्या ईशान्येस १३ मैलांवर पांच हजार लोकवस्तीचा हा गांव आहे. जवळच एका टेंकडीवर तीन देवळें असून एकावर इ. स. १७८१ मध्यें खोदलेला एक शिलालेख आहे. जेऊरच्या उत्तरेस दोन मैलांवर इमामपुर नांवाचा रहदारी बंगला आहे.