विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जुनापाणी - मध्यप्रांत. नागपूर जिल्हा व तहशील. नागपूरच्या पश्चिमेस ७ मैलांवर हें लहानसें खेडेंगाव असून या गांवाच्या आसपास दगडी वर्तुळें पुष्कळ आहेत. दगड फार मोठमोठे नसतात. पूर्वीं गुरें राखणार्‍या जाती निरनिराळ्या ठिकाणीं भटकत असत. त्यावेळच्या त्या लोकांच्या या रहाण्याच्या जागा असाव्या असा कित्येकांचा समज आहे. कधीं कधीं या दगडाखालीं लोखंडी खिळे व कांहीं हत्यारें सांपडतात.