प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जुगोस्लाव्हिया - सर्व्ह, क्रोट व स्लोव्हेन या तिन्ही लोकांचें मिळून जुगोस्लाव्हिया हें राष्ट्र बनलें आहे. १९१८ सालीं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेस या स्वतंत्र राज्याची मुहूर्तमेढ रोविली गेली. चेकोस्लोव्हेकियाच्या राज्याची प्राणप्रतिष्ठा अवघे दोन महिनेच अगोदर झाली होती. जुगोस्लाव्हियाच्या स्वतंत्र राज्याला पुढें कांहीं दिवसांनंतर यूरोपमधील प्रमुख राष्ट्रांनीं आपली मान्यता दर्शविली. जुगोस्लाव्हियाच्या राष्ट्रांत सर्व्हिया, माँटिनीग्रो, क्रोएशिया, स्लोव्हानिया, डालमेटिया, बनट, बक्क, बरंज, बोखियाहर्झेगोव्हिना इत्यादि देशांचा अंतर्भाव होतो. १९२१ सालीं या राज्याची लोकसंख्य १२१६२९०० होती.

जुगोस्लाव लोकांनीं आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याची चळवळ अगदीं अलीकडे चालू केली असें एक विधान करण्यांत येतें पण तें खरें नाहीं. १५ व्या शतकापासूनच या चळवळीला सूक्ष्म आरंत्र झाला होता. १६ व्या शतकामध्यें डालमेटियाच्या प्रदेशांत उस्कॉक जातीच्या चांचे लोकांनीं आपली स्वतंत्र वसाहत स्थापन केली होती, व त्याचप्रमाणें दक्षिण हंगेरी व स्लोव्हानिया येथें सर्व्हियन लोकांनीं वसाहती स्थापन केल्या होत्या. १७ व्या शतकांच्य पूर्वार्धात रगूसाच्या इव्हॅन गुंडुलिकनें व त्याच्या भोंवतालच्या कवींनीं सर्व्हिया व बोस्नियामधील लोकांशीं आपला रक्ताचा संबंध आहे अशी भावना जागृत करण्यास सुरुवात केली होती. क्रिझॅनिक नांवाच्या क्रोटमधील, कॅथॉलिक उपाध्यायानें, रशियांत असतांना अखिल स्लाव्ह लोकांच्या एकीकरणाची कल्पना प्रसृत केली होती.

पण या कल्पनांनां मूर्त स्वरूप देण्याचें कार्य नेपोलियननें घडवून आणलें. त्यानें स्लोव्हेनचा प्रांत क्रोएशिया व डालमेटिया यांमधील बराच भाग निराळा काढून, त्याला ईलिरियन राष्ट्र असें स्वतंत्र नांव दिलें व तें आपल्या फ्रेंच साम्राज्याशीं जोडून घेतलें. अर्थात त्याच्यानंतर त्याचा प्रयोग फारच थोडा वेळ टिकला पण त्याची ही कल्पना मात्र व्होडनिक कवीनें हातीं धरून, ती फैलावण्यास आरंभ केला. जूडेव्हिटगज नांवाच्या अद्वितीय पंडितानें या कल्पनेंत चैतन्य ओतलें. यानें वाङ्मयाच्या द्वारां सर्व्ह व क्रोट हे लोक एकत्रच आहेत व यांचें स्वतंत्र राज्य शक्य तितक्या लवकर निर्माण झालें पाहिजे अशी भावना जागृत केली. मग्यार लोकांकडून या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या कार्यांत अडथळा येईल हें तो पक्कें जाणून होता. पण त्यानें आपली चळवळ तेवढ्यामुळें थांबवली नाहीं. या त्याच्या चळवळीला हळू हळू लोक मिळूं लागले व माँटेनिग्रोचा युवराज पीटर यानेंहि या चळवळीला आपली पूर्णपणें संमति दर्शविली.

हंगेरीमध्यें या चळवळीच्या पुरस्कर्त्यांनीं जें बंड केलें त्यांत त्यांचा पूर्णपणें पराभव झाल्यामुळें हंगेरीनें यांच्यावर सुलतानशाही गाजविण्यास सुरुवात केली. या चळवळीचा जनक गज व जेलासिक यांनीं निराशेनें प्राण सोडले व ईलिरियन राष्ट्र स्थापण्याची कल्पना रसातळाला गेली. पण अशा रीतीनें ईलिरियन राष्ट्रस्थापनेची कल्पना नष्ट झाली तरी त्याच्या बदली जुगोस्लाव्ह लोकांनीं जुगोस्लाव्ह राष्ट्र स्थापण्याची चळवळ सुरू केली. बिशप स्ट्रासमेयर या प्रसिद्ध पंडितानें या चळवळीला पाठिंबा दिला व दक्षिण स्लाव्ह लोकांसाठीं, दक्षिणस्लाव्ह विद्यापीठ स्थापन केलें. या पीठांत जुगोस्लाव्हाच्या एकीकरणाच्या चळवळीच्या दिशेनें बौद्धिक प्रयत्न सुरू झाले. स्वतः स्ट्रासमेयरनें इतर राष्ट्रांत या चळवळीला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. सर्व्हियाचा राजा प्रिन्समायकेल व माँटीनीग्रोचा राजा प्रिन्सडॅनिलो यांनींहि या चळवळीला मदत करण्याचें आश्वासन दिलें.

पण स. १८६० च्या सुमारास या पॅन स्लाव्ह चळवळीला भयंकर धक्का बसला. प्रशियानें अपूर्व जय संपादन केल्यामुळें ऑस्ट्रियाचा पराभव होऊन ऑस्ट्रियाला हंगेरींशीं समेट करणें भाग पडलें. त्यामुळें हंगेरीला आपली सुलतानशाही या छोट्या राष्ट्रावर गाजविण्यास आयतीच संधि मिळाली. आपल्या राज्यांतील जुगोस्लाव्ह चळवळीशीं परराष्ट्रीय स्लाव्ह लोकांचा संबंध येऊं नये यासाठीं हंगेरीनें प्रयत्न केला. व्हिएन्नामध्यें पॅनस्लाव्ह चळवळीला विरोधक अशी पॅनक्रोट (विश्वकोट संघटनाची) चळवळ सुरू करण्यांत आली. १८८३-१९०३ सालापर्यंतच्या अवधींत दक्षिण स्लाव्ह लोकांनां फारच वाईट दिवस प्राप्त झाले. सर्व्हियाचा राजा मिलन यानें ऑस्ट्रिया- हंगेरीशीं गुप्त तह करून ऑस्ट्रिया- हंगेरीविरुद्ध जी चळवळ होईल ती दडपून टाकण्याविषयीं आश्वासन दिलें. जूगोस्लाव्ह लोकांमध्येंहि अंतःस्थ दुफळी माजली व त्यामुळें त्यांच्या चळवळींत जोम राहिला नाहीं.

पण १९०३ च्या सुमारास पुन्हां या चळवळीला बरे दिवस लाभण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. प्राग येथें असतांनां स्लाव्ह तरुणांवर प्रो. मसरिकच्या शिकवणीची विलक्षण छाप पडून त्यांच्या मनांत पुन्हां जूगोस्लाव्ह चळवळ सुरू करण्याची प्रेरणा उत्पन्न झाली. क्रोट व सर्व्ह लोकांनीं एकत्र झाल्याशिवाय गत्यंतर नाहीं अशी भावना विचारी माणसांत जागृत होऊं लागली; व त्याप्रमाणें त्यांनीं संघटना करण्यास सुरुवात केली. सर्व्हियन दरबारनेंहि या संघटनेला अनकूल मत दर्शविलें. याच सुमारास हंगेरींत राजा व प्रजा यांमध्यें वितुष्ट माजल्यामुळें या संघटनेच्या पुढार्‍यांनां नामी संधि मिळाली. क्रोएशियामधील ४० प्रतिनिधींनीं ट्रंबिक व सुपीलो यांच्या नेतृत्वाखालीं क्रोट व सर्व्ह यांच्यामधील एकीच्या अवश्यकतेचं महत्व प्रतिपादन केलें. सर्व्हियाच्या प्रतिनिधींनींही यास आनंदानें संमति दिली. क्रोट व सर्व्ह हे लोक एकराष्ट्रीय आहेत असा जाहीरनामा लवकरच काढण्यांत आला. हंगेरीनें साम-दाम-दंड- भेद या चारी शस्त्रांचा उपयोग करून पाहिला पण या एकीचा भंग झाला नाहीं.

बाल्कनयुद्धांत बाल्कन राष्ट्रांनीं तुर्कस्तानावर विजय मिळविल्यामुळें तर या एकीला चांगलाच जोर चढला. ऑस्ट्रिया हंगेरीनें ही एक भंग पावण्यासाठीं जुलुमाचा कळस करण्यास सुरुवात केली होती. पण सर्व्हियानें त्याला भीक घातली नाहीं. जुगोस्लाव्ह चळवळींत विद्यार्थ्यांचा खूप भरणा होता व त्यांचीं जहाल मतें त्यांच्या पुढार्‍यानांच पटत नव्हतीं. पण विद्यार्थ्यांनां आवरणें या पुढार्‍यांनां शक्य नव्हतें. या विद्यार्थ्यांनीं आपल्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंच्या पुढार्‍यांनां यमसदनाला पाठवण्याचे प्रयत्न करणासहि कमी केलें नाहीं. त्यांपैकीं कांहींनां यशहि आलें. या विद्यार्थ्यांपैकीं कांहींनीं सारजेव्हो येथें आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंडचा खून केल्यामुळें या हत्येचा भयंकर परिणाम होऊन महायुद्धाला सुरुवात झाली.

महायुद्धच्या प्रथम भागांत या जुगोस्लाव्ह लोकांचे भयंकर हाल झाले. यांच्यापैकीं हजारों लोकांनां मृत्यूचा मार्ग स्वीकारावा लागला. कित्येकांनां तुरुंगांत कोंबण्यांत आलें. मुद्रणस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य बंद करण्यांत आलें. बोस्नियामध्यें तर जुलमाची परमावनधी झाली. पण एवढ्यानेंहि धीर खचूं न देतां जुगोस्लाव्ह चळवळ जिवंत राहिली होती. महायुद्धास सुरुवात होण्यापूर्वीं, डॉ. ट्रंबिक, सुमिळोप्रभृति पुढारी ऑस्ट्रिया- हंगेरींतून पळून गेले होते. त्यांनीं परराष्ट्रांत या चळवळीला आरंभ केला. ठिकठिकाणीं या चळवळींसाठीं शाखा काढण्यांत आल्या. प्रथमतः या चळवळीचें मुख्य केंद्र रोमशहरीं होतें. पण तेथील सरकार जुगोस्लाव्ह चळवळीला विरुद्ध असल्यामुळें हें केंद्र बदलून लंडन येथें आणण्यांत आलें.

१९१५ सालीं लंडन येथें दोस्तसरकार व इटली यांच्यामध्यें गुप्त तह होऊन त्यांत इटलीनें दोस्तराष्ट्रांच्या बाजूनें महायुद्धांत भाग घेतल्यास त्याला जुगोस्लाव्हियन मुलखांतील बराच भाग देण्याचें दोस्तराष्ट्रांनीं कबूल केलें; त्यामुळें तर या चळवळीच्या पुरस्कर्त्यांच्या तोंडचें पाणी पलालें. पण एवढ्यानें धीर खचूं न देतां त्यांनीं रशियाशीं संधान बांधलें. रशियन सैन्यामध्यें २३००० सर्व्हियन लोकांचें एक पथक तयार झालें व या पथकानें डोब्रूजाच्या स्वारींत चांगला पराक्रम गाजविला. पुढें रशियाचा पराभव झाल्यावर इंग्लंड व फ्रान्सच्या सैन्यांत यांनीं नांवें नोंदविलीं व सॅलोनिकाच्या रणक्षेत्रांत यांनीं आपलें नांव गाजविलें. इकडे खुद्द ऑस्ट्रिया- हंगेरींतहि चार्लस राजा बादशहा झाल्यापासून वातावरण निवळूं लागलें होतें. त्यामुळें पार्लमेंटांतील, स्लोव्हेन, क्रोट व सर्व्ह लोकांच्या पुढार्‍यांनीं आपला जुगोस्लाव्ह पार्लमेंटरी क्लब स्थापन केला होता. यांनीं जुगोस्लाव्हच्या स्वातंत्र्यासाठीं खटपट करण्यास सुरुवात केली. अमेरिका युद्धांत पडल्यानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला महत्त्व प्राप्त झालें होतें व त्या तत्त्वाची कास धरून जुगोस्लॉव्ह लोकांनींहि आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याचा आग्रह धरला.

१९१७ सालच्या जुलै महिन्याच्या २० व्या तारखेस पसिक हा सर्व्हियाचा प्रधान व डॉ. ट्रंबिक यांच्यामध्यें गुप्त वाटाघाट होऊन त्यांत जुगोस्लाव्ह हें स्वतंत्र राष्ट्र होणें जरूर आहे, जूगोस्लाव्हियाचें अंतिम ध्येय स्वतःचें पूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करणें असून, या राष्ट्राची शासनपद्धति लोकसत्तात्मक व पार्लमेंटरी पद्धतीची असावी, सार्वत्रिक मतदानपद्धतीचा स्वीकार करण्यांत यावा, आड्रियाटिक समुद्र सर्वांनां खुला राखण्यांत यावा अशा प्रकारच्या अटी ठरवण्यात आल्या. ट्रंबिक वगैरे पुढारी परत सर्व्हियांत आले व त्यांचें मोठें स्वागत करण्यांत आलें. ही वाटाघाट ‘डेक्लेरेशन ऑफ कोर्फू’ या नांवानें प्रसिद्ध आहे. या डेक्लेरेशनला लॉईड जॉर्जनेंहि पाठिंबा दिला पण हंगेरीचें पार्लमेंट अद्यापीहि शुद्धीवर आलें नव्हतें. त्यांनीं आपल्या पार्लमेंटमध्यें जुगोस्लाव्हच्या प्रतिनिधींनां मज्जाव केला. त्यामुळें जुगोस्लाव चिडून गेले व त्यांनीं पुन्हा जोरानें आपली चळवळ सुरू केली. बोल्शेव्हिक रसियाशीं ऑस्ट्रिया- हंगेरीनें जी तहाची वाटाघाट सुरूं केली होती, त्या वाटाघाटीला आपल्या तर्फें स्वतंत्र प्रतिनिधी घेण्यांत यावे असें त्यांनीं प्रतिपादन करण्यास सुरुवात केली.

प्रथम इटली हा जुगोस्लाव्हियन एकाच्या विरुद्ध होता. पण प्रेसिडेंट विल्सन व लॉईड जॉर्ज यांच्या स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला देण्यांत आलेल्या पाठिंब्यामुळें, इटलींतहि ऑस्ट्रिया- हंगेरीमधील छोट्या राष्ट्रांनां स्वयंनिर्णय मिळावे असी इच्छा उत्पन्न झाली. लवकरच डॉ. ट्रंबिक व सिग्नॉर टोरे यांच्यामध्यें खाजगी खळबळ होऊन, इटली व जुगोस्लॉव्ह यांच्यामध्यें एकीच्या आवश्यकतेबद्दल चर्चा झाली. वाटाघाटींत इटलीनें जुगोस्लाव्हच्या स्वातंत्र्य चळवळीला मान्यता दिली. आड्रियाटिक समुद्र सर्वांनां खुला ठेवण्यासाठीं पुन्हां चळवळ करण्याचें दोघांनीं ठरविलें. ही वाटाघाट ‘पॅक्ट ऑफ रोम’ या नांवानें प्रसिद्ध आहे.

याच सुमारास प्राग येथें एक मोठी काँग्रेस भरली. या काँग्रेसला चेक, पॉलिश, इटालियन, रूमानियन, स्लोव्हाक व जुगोस्लाव प्रतिनिधी हजर होते. या सर्व प्रतिनिधींनीं स्वातंत्र्यप्राप्तीसाठीं परस्परांनां साहाय्य करण्याचें अभिवचन दिलें. अमेरिकेनें रोमच्या अ‍ॅक्टला संमति दिल्यानें तर जुगोस्लाव लोकांनां अधिकच उत्साह आला. जुगोस्लाव लोकांचा पुढारी कोरोसेक हा होता. यानें स्लाव लूब्लियाना येथें ऐक्यपरिषद भरविली व तींत स्लाव लोकांचें दृढ ऐक्य कसें होईल यासंबंधींची चर्चा केली. इकडे ऑस्ट्रियाची सत्ता हळहळू शिथिल होत होती. धान्याच्या टंचाईमुळें जिकडे तिकडे बेबंदशाही माजली होती. जुगोस्लाव्ह लोकांपैकीं एका बंडखोर टोळीनें डोंगराचा आश्रय करून ऑस्ट्रियन सैन्याला सतावून टाकण्यास सुरुवात केली होती. अशी बिकट परिस्थिति उत्पन्न झाल्यामुळें दक्षिण स्लाव्ह लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठीं ऑस्ट्रिया- हंगेरीनें आपले प्रयत्न सुरू केले. पण या प्रश्नाचा विचार वास्तविक जुगोस्लाव्ह लोकांच्या हितसंबंधाकडे दृष्टि ठेवून न करतां आपल्या साम्राज्याच्या हिताकडे लक्ष ठेवून केल्यामुळें या प्रयत्नाला यश आलें नाहीं. याच सुमारास शांततापरिषदेचें अधिवेशन भरण्याचें निश्चित झालें होतें. त्याला आपले स्वतंत्र प्रतिनिधी पाठविण्याचा जुगोस्लाव्ह लोकांनीं निश्चय केला.

प्रेसिडेंट विल्सननें ऑस्ट्रियाहंगेरीकडे स्वयंनिर्णयाच्या तत्वासंबंधीं एक खलिता पाठविला व त्या धर्तीवर सर्व राष्ट्रांनीं आपलें राज्यकारभाराचें ध्येय आंखावें असें कळविलें. ऑस्ट्रियाहंगेरीला या स्वयंनिर्णयाच्या तत्वाला मान्यता देण्याशिवाय गत्यंतरच नव्हतें. त्याप्रमाणें हुसारेकनें बादशाही जाहीरनामा काढून ऑस्ट्रियाचे जर्मन, चेक, जुगोस्लाव्ह, युक्रेनियन असे चार भाग पाडून या चारी भागांतील प्रतिनिधींनीं एकमेकांच्या सल्ल्यानें ऑस्ट्रियाचा राज्यकारभार चालवावा असें प्रसिद्ध केलें, पण ऑस्ट्रिया व हंगेरी या दोघांनींहि या तत्वाबरहुकूम वागविण्याचें ठरविल्याशिवाय या जाहीरनाम्याला संमति देण्याचें कोरोसेकनें नाकारलें. प्रेसिडेंट विल्सननें याच सुमारास ऑस्ट्रिया हंगेरीला खलिता पाठवून चेकोस्लाव्ह व जुगोस्लाव्ह लोकांनां स्वातंत्र्य देण्याविषयीं कळविलें. याचा फार परिणाम झाला. यामुळें जुगोस्लाव्ह लोकांनां फार आनंद झाला व त्या आनंदाच्या भरांत जुगोस्लाव्ह शिपायांनीं आपल्या अंगावरील ऑस्ट्रियाहंगेरीचीं पदकें भिरकावून दिलीं. बोस्निया व डालमेटिया प्रांतांतील लोकांनीं स्वातंत्र्य पुकारून आपलें राष्ट्रीयमंडळ बनविलें. क्रोटियन लोकांनीं फ्यूममधील हंगेरियन शिपायांनां निःशस्त्र करून फ्यूम आपल्या ताब्यांत घेतलें. लगेच आठवड्याच्या आंत क्रोटियानें आपलें स्वातंत्र्य पुकारलें. ऑस्ट्रिायानें यावेळीं मुत्सद्दीपणा लढवून आपलें सर्व आरमार जुगोस्लाव्हांच्या ताब्यांत देऊन त्यांनां आपल्याकडे वळविण्याचा व अशा रीतीनें इटलीमध्यें व जुगोस्लाव्ह राष्ट्रांमध्यें बिघाड आणण्याचा प्रयत्न केला व त्याला तात्पुरतें यशहि आलें. इटलीला जुगोस्लाव्हांच्या बद्दल मनांत संशय उत्पन्न झाला व तिनें जुगोस्लाव्हांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीविरुद्ध खटपट करण्यास प्रारंभ केला. सर्व्हियाचा प्रधान पासिक यानें पॅनस्लाव्हचें धोरण स्वीकारलें. पण डॉ. ट्रंबिक याला केवळ स्लाव्ह लोकांचेंच एकीकरण व्हावें असें वाटत नव्हतें. त्याची दृष्टि अखिल जुगोस्लाव्हांचें स्वतंत्र राष्ट्र स्थापित व्हावें अशी होती, त्यामुळें पासिक व ट्रंबिक यांच्यामध्यें बेबनाव उत्पन्न झाला. पासिकनें, सर्व्हियाला बोस्निया प्रांत मिळावा अशी खटपट चालू केली; पण सर्व्हियाचा अमेरिकेंतील परराष्ट्रमंत्री मिहज्लोव्हिक यानें पासिक व अमेरिका यांमधील पत्रव्यवहार दाबून ठेवल्यानें त्याला त्याच्या जागेवरून हांकून लावण्यात आलें. इंग्लंडमधील जोव्हानोव्हिक या परराष्ट्र मंत्र्यानें जुगोस्लाव्हैक्यासंबंधींची एक योजना तयार केली व त्या योजनेला बाल्फोरनें संमति दिली. पण पासिकला तें मान्य न झाल्यामुळें जोव्हानोव्हिक याला राजीनामा द्यावा लागला. अशा प्रकारची चमत्कारिक स्थिति शांततापरिषदेच्या सुरुवातीपूर्वींची होती.

पण याच सुमारास नवीनच गोष्ट घडून आली. झेग्रेव प्रांतानें आपलें स्वातंत्र्य पुकारलें व ट्रंबिक व त्याचे साथीदार यांनां आपले परदेशीय प्रतिनिधी या नात्यानें मान्यता दिली व स्वित्झर्लंड येथें जूगोस्लाव्हैक्यासंबंधीं चर्चा करण्यास त्यांनां अधिकार दिला. त्याप्रमाणें जिनीव्हा येथें जुगोस्लाव्हाचें प्रतिनिधी जमले व त्यांनीं वाटाघाट करून एक मुसदा तयार केला. या तयार केलेल्या मसुद्यावर पासिक, कोरोसेक, ट्रंबिक वगैरेंच्या सह्या होत्या. या मुद्यान्वयें जूगोस्लाव्ह हे स्वतंत्र राष्ट्र असून इतर राष्ट्रांशीं जुगोस्लाव्हचा समान दर्जा आहे असें जाहीर करण्यांत आलें. तरी पण जुगोस्लाव्ह लोकांतच अद्यापि दुफळी माजलेली होती. याच सुमारास इटलीला जुगोस्लाव्हांच्या टापूंमधील प्रदेश आपल्या ताब्यांत आणण्याची इच्छा झाल्यामुळें तीनें आपलें सैन्य लुब्लिजनच्या रोखानें रवाना केलें. हें संकट निवारण्यासाठीं झेग्रेबनें सर्व्हिया, माँटीनिग्रो इत्यादि राष्ट्रांची मदत मागितली. एवढेंच नव्हे तर जुगोस्लाव्ह संस्थानांत ऐक्य घडवून आणून जुगोस्लाव्हच्या राज्यकारभाराची धुरा सर्व्हियाचा राजा अलेक्झांडर याच्या हातांत दिली. त्यामुळें ऐक्याला इष्ट असा परिणाम घडून जुगोस्लाव्हचा राज्यकारभार चालविण्यासाठीं एक राष्ट्रीय मंडळ निवडण्यांत आलें. या मंडळाचें पोट्रिक व कोरोसेक हे अनुक्रमें प्रधान व उपप्रदान झाले, डॉ. ट्रंबिक यास परराष्ट्रमंत्रि निवडण्यांत आलें व णसिक, ट्रंबिक, झोल्गर यांनां शांततापरिषदेस प्रतिनिधि म्हणून धाडण्यांत आलें.

पण इटलीला जुगोस्लाव्ह राष्ट्राचें अस्तित्वच कबूल नव्हतें. जुगोस्लाव्हांनीं जें आपलें राष्ट्र स्थापलें त्यामुळें इटलीच्या अंगाचा तिळपापड उडून गेला. त्यानें जुगोस्लाव्ह व दोस्त राष्ट्रें यांच्याविरुद्ध टीकांचा भडिमार करण्यास सुरुवात केली. इकडे प्रेसिडेंट विल्सननें तर या परिषदेच्या पूर्वीं जे परस्पर राष्ट्रांतील गुप्त तह झाले असतील ते रद्द झाले आहेत असें जाहीर केलें. तर इटलीनें लंडनमध्यें इंग्लंड व दोस्तराष्ट्रें यांच्याशीं जो तह झाला होता तो तह अंमलांत आणण्यासाठीं दोस्तराष्ट्रांना आव्हान केलें. अशा दुहेरी कात्रींत सांपडल्यानें लाईड जॉर्ज व क्लेमंको यांची फार त्रेधा उडाली. इटली व प्रेसिडेंट विल्सन यांच्यामध्यें खडाजंगी उडण्याचा प्रसंग आला. इटली व जुगोस्लाव्हियामध्यें समेट व्हावा या इच्छेनें पुष्कळ उपसूचना शांततापरिषदेंत आल्या पण त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं फ्यूम बंदर व ऑड्रियाटिक समुद्रासंबंधींचा प्रश्न यांवर तर भयंकर रणें माजलीं. डी. अनंझियो यानें फ्यूम बंदर आपल्या ताब्यांत घेतलें व याला दोस्तराष्ट्रांच्या सैन्यांनींहि विरोध केला नाहीं. यामुळें विल्सन व दोस्तराष्ट्रें यांच्यामध्येंहि बेबनाव होण्याचा प्रसंग प्राप्त झाला शेवटीं डॉ. ट्रंबिक यानें स्वतःच इटालियन प्रधानाशीं या प्रश्नासंबंधानें खल करण्याचें ठरविलें. या वाटाघाटींत कांहीं तरी निष्पन्न होईल अशीं चिन्हें दिसूं लागलीं होतीं. पण डी. अनंझियो यानें डालमेटियावर स्वारी केल्यामुळें या वाटाघाटीला वाटाण्याच्या अक्षता मिळण्याचा रंग दिसूं लागला. पण अमेरिकन सैन्य व आरमार डालमेटियाच्या भागांत असल्यामुळें डी. अनंझियाचें कांहीं चाललें नाहीं इकडे खुद्द इटलींतहि नवीन प्रधानमंडळ अधिकारारुढ झाल्यामुळें, वातावरण निवळत चाललें होतें. विल्सनच्या सत्तेला ग्रहण लागत चाललें होतें. त्यामुळें इटालीला पुन्हां आशा उत्पन्न होऊन त्यानें जुगोस्लाव्हच्या प्रतिनिधीशीं पुन्हां बोलणें सुरू केलें व शेवटीं या भांडणाचा कसाबसा निकाल रॅपॅलोच्या तहानें लागला. या तहान्वयें इटलीला जुगोस्लाव्ह राष्ट्रांतील बराच भाग मिळाला. डालमेटियावरील आपला हक्क इटलीनें सोडून दिला. पण या तहान्वयें जुगोस्लाव्हच्या व इटलीच्या राज्याच्या हद्दी ठरविण्याच्यावेळीं पुन्हां विघ्नें येऊं लागलीं पण शेवटीं तींहि कशीबशीं मिटविण्यांत आलीं.

अशा रीतीनें जुगोस्लाव्ह राज्याची स्थापना झाली. पण अंतस्थ घटनेचें मोठें कार्य जुगोस्लाव्हियापुढें होतें. खुद्द या राष्ट्रांतच, रॅडिकल व डेमोक्रॅटिक असे दोन पक्ष होते; व त्यांची एकमेकांविषयी द्वेषबुद्धि होती, त्यामुळें जुगोस्लाव्हियाची नवीन घटना करण्याचें काम दुष्कर होऊन बसलें. या वादाचा निकाल लागे तों जी तात्पुरती राज्यघटना आंखण्यांत आली होती तींत वरील दोन्ही पक्षांचे सारखेच प्रतिनिधी होते, त्यामुळें प्रत्येक प्रश्नावर दुफळी माजेशेवटीं पासिक यानें तटस्थ पक्षाशीं एकी करून, नवीन राज्यघटनेचें बिल मंजूर करून घेतलें. सर्व्हियाच्या राजानें या घटनेप्रमाणें चालण्याची शपथ घेतली; व विरोधी बंडखोर पक्षाला चिरडून टाकण्याचा बेत केला. पण अशा तर्‍हेनें पक्षभेद व कलहांचा सुकाळ, जुगोस्लाव्हियाच्या राजकारणांत माजला असतांना, इतर दृष्टींनीं मात्र जुगोस्लाव्हियांची आस्ते सुधारणा होत चालली होती. सुदैवानें परराष्ट्रीय धोरणावर मात्र सर्व पक्षांचें पूर्ण ऐक्य होतें. १९२१ सालीं जुगोस्लाव्हियाचे प्रयत्न राष्ट्रांतील निरक्षरता नाहींशी करण्याकडे, व खाणी व शेतकी या प्रश्नांकडे लागलें होतें.

[संदर्भग्रंथ.- आर. डब्ल्यू सेटनवॅटसन- दि सदर्न स्लाव्ह क्वेश्चन (१९११); टेलर- दि फ्यूचर ऑफ दि स्लाव्हज (१९१६); बरक - क्रोट्स अँड स्लोव्हेनीज फ्रेंड्स ऑफ दि एंटिटी (१९१९); दि सदर्न स्लाव्ह लायब्ररी; लुजो व्हाज्नोव्हिक- डालमेटिया (१९२०); सिसिल- हिस्टरी ऑफ फ्यूम (१९१९)]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .