प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जुगार -  मनुष्यप्राण्यानें करमणुकीकरितां जे अनेक प्रकारचे खेळ शोधून काढले आहेत त्यांत यदृच्छाधीन असलेले किंवा नशीबाचे खेळ (गेम्स ऑफ चान्स) हा एक प्रकार आहे. असल्या खेळांत यशापयश खेळणारांच्या कौशल्यावर अवलंबून नसतें, तर काकतालीयन्यायवत् असतें. सोंगट्या, फांसे, पत्ते, हे बह्रंशीं या जातीचे खेळ होत. असले खेळ फार पुरातन म्हणजे मानवोत्पत्तीइतके जुने आहेत. भविष्य काळांतील अज्ञात गोष्टी जाणण्याच्या प्रबळ इच्छेमुळें हें मनुष्याला सुचले असावेत. चिठ्ठ्या टाकून भविष्य जाणण्याचा प्रयत्न करणें याच्यासारखाच हा प्रयत्न आहे. याप्रमाणें हे खेळ अस्तित्वांत आल्यावर या खेळांनां उत्तेजन यावें म्हणून कांहीं मालमत्ता, पैसा, पणास लावावा ही प्रवृत्ति होते. ही पण लावून हरजितीचा खेळ खेळण्याची प्रवृत्ति वैदिक आर्यांत व परंपरेनें सर्व भारतीयांत दिसून येते. असें द्यूत किंवा जुगार खेळून सर्वहानि झालेल्या एका माणसाचें दुःख ॠग्वेदांतील एका सुप्रसिद्ध सूक्तांत (१०. ३४) वर्णिलें आहे. द्यूताची आवड भारतीयांत किती वाढली होती व त्याला शिष्टसंमतत्त्व किती प्राप्त झालें होते, ही गोष्ट महाभारतांतील नलदमयंती व कौरवपांडव यांच्या कथांवरून स्पष्ट दिसते. मृच्छकटिक नाटकांतील दुसर्‍या अंकांत द्यूत खेळणारांचें भांडण चांगलें वर्णिलें आहे. प्राचीन ग्रीक व जर्मन लोकांतहि फाशांचें द्यूत फार प्रिय असे. सामान्यतः असें दिसतें कीं, मृगया, युद्ध व वाणिज्य यांवर जीवन चालविणारे लोक द्यूतप्रिय असतात, कारण त्यांची सांपत्तिक स्थिति फार अनिश्चित असते व म्हणूनच ते आकस्मिक द्रव्यप्राप्ति करून घेण्याला लोलुप असतात. उलटपक्षीं कृषिजीवी म्हणजे स्वकष्टानें उपजीविका करणारे लोक अत्यंत परिश्रमानें मिळविलेलें द्रव्य जुगारीनें म्हणजे यदृच्छाधीन खेळानें गमावण्यास तयार नसतात.

ग्रीक लोकांत होमरकाळीं चार बाजू असलेल्या फाशांनीं व नंतरच्या काळांत सहा बाजूंच्या फाशांनीं खेळत. रोमन लोक नाण्यांनीं (हेड ऑर टेल). व फांशांनीं द्यूत खेळत, ईजिप्त, बाबीलोनिया, चीन वगैरे देशांत प्राचीन काळांत जुगार होती. इस्त्रायल लोक मात्र पूर्वीं बराच काळ कृषिजीवी असल्यामुळें त्यांच्यामध्यें हें व्यसन नव्हतें.

जु गा री चे प्र का र.- जुगार खेळण्याची दुष्ट इच्छा तीन कारणांनीं होते: (१) द्रव्यप्राप्तीची इच्छा, (२) करमणूक व (३) युयुत्सा किंवा लढण्याची नैसर्गिक प्रवृत्ति. धिम्मेपणानें कष्ट करून द्रव्यार्जन करण्याचा माणसाला जात्याच कंटाळा येतो व अनायासें धनप्राप्ति व्हावी अशी इच्छा असते. रोजच्या ठराविक जीवनक्रमाचा कंटाळा आल्यामुळें कांहीं करमणूक असावी असें वाटतें. पण यशापशय यदृच्छाधीन असलेल्या खेळांत यशस्वी इसमावर ईशकृपा आहे असा समज होतो; आणि उलटपक्षीं अपयशीं माणसाकडे कांहीं कमीपणा किंवा दोष येत नसल्यामुळें त्यांत मानहानि वाटत नाहीं. इतकेंच नव्हे बर्‍याच वेळां अपयश आलेल्या इसमाला एकदम यश मिळून सर्व पारडें फिरण्याची अखेरपर्यंत आशा असते.

जुगारीचे अनेक प्रकार आहेत, पण कोणत्याहि प्रकारांत गमावणारे जितकें द्रव्य घालवितात त्यांपेक्षां जिंकणार्‍यानां नेहमीं कमीच मिळतें. जुगारीचा मुख्य प्रकार घोड्यांच्या शर्यती. याला सुधारलेल्या देशांतहि कायद्यानें परवानगी दिलेली असल्यामुळें ही जुगार फार मोठ्या प्रमाणांत चालते. इंग्लंडमध्यें घोड्यांच्या शर्यती नाहींत असे वर्षांतून फार तर १० दिवस जातात. फ्रान्स देशांत १९१० सालीं १३० लक्ष पौंड पैसा या जुगारींत लावला गेला; आणि इंग्लंडमध्यें निदान फ्रान्समधील रकमेच्या तिप्पट तरी रक्कम लावली जाते. शिवाय प्रत्यक्ष शर्यतीच्या मैदानावर हजर न राहतां त्या शर्यतींत ‘स्टार्टिंग प्राइझच्या’ पद्धतीनें पैसे लावणारे इसम हजर इसमांच्या दुप्पट तरी असतात. ही सर्व रक्कम लक्षांत घेतां इंग्लंडमध्यें नुसत्या घोड्यांच्या शर्यतीच्या जुगारींत ५६० लक्ष पौंड पणास लागतात. या शर्यतीशिवाय जुगारीचे अनेक प्रकार आहेत ते (१) फुट-बॉलवरचे कूपन- बेटिंग, (२) क्रिकेटमधील बोलिंग, (३) सायकलच्या शर्यती, (४) इतर मर्दानी खेळ, (५) पत्त्याचे ब्रिज वगैरे डांव, (६) नाण्यांच्या हेड टेलची जिताजित, वगैरे. खाणींच्या प्रदेशांत जुगारीचे अड्डे पुष्कळ असतात व तेथें हा शेवटचा जुगारीचा प्रकार फार चालतो. घोड्यांच्या शर्यतीशिवाय इतर जुगारीच्या प्रकारांनां कायद्याची मनाई असल्यामुळें अर्थात हे प्रकार चोरून केवळ गुप्त ठिकाणीं चालतात. या सर्व ठिकाणची रक्कम जमेस जर धरली तर एका इंग्लंड देशांत दरसाल अदमासे १० कोटी पौंड जुगारींत उडत असले पाहिजेत. शिवाय सट्टेबाजारांतील दलाली. सट्टेबाजी व जुगार यांत एक महत्त्वाचा फरक असल्यामुळें तिचा धंजा हा जुगारीचाच प्रकार आहे, पण जुगारीच्या कायदेशीर व्याख्येंत येत नाहीं. जुगारीच्या व्यवसायानें दळणवळणाच्या रेल्वे, पोस्ट तार, वगैरे आधुनिक सुधारलेल्या साधनांचा तसेंच छापखान्यांचा उपयोग करून घेतला आहे. इतकेंच नव्हें तर सार्वत्रिक शिक्षणसंस्थांची जुगारीला मदतच होते: कारण निरक्षर समाजांत जुगारीचे प्रकार कमी चालतात.

कायद्याचें नियंत्रणः- जुगारीचा नाद अनर्थावह आहे याबद्दल मतभेद नाहीं. इंग्लंडचा मुख्यम प्रधान लार्ड बीकन्सफील्ड यानें असे म्हटलें आहे कीं, जुगार म्हणजे राष्ट्राचा नैतिक अधःपात करणारें एक अजस्त्र एंजिन आहे.” या व्यसनाच्या पायीं इंग्लंडमध्यें एका दहा वर्षांत (१८९५ ते १९०५) १५६ आत्महत्या, व ७१९ चोर्‍या झाल्या आणि ४४२ दिवाळीं निघालीं. सुधारलेल्या देशांत कायद्यानें जुगारीला प्रतिबंध केलेला असतो. इंग्लंडमध्यें जुगारीविरुद्ध कायदा प्रथम स. १६६५ मध्यें झाला. स. १६९८ मध्यें लॉटरींनां बेकायदा ठरविण्यांत आलें. १८४५ व १८५३ च्या कायद्यानें सार्वजनिक जुगारीचीं गृहें नष्ट केलीं. तरी जुगारीचें प्रमाण वाढतच होतें. म्हणून स. १९०१ मध्यें एक कमिटी नेमली गेली. तिनें घोड्यांच्या शर्यतींच्या जुगारींनां परवानगी देण्याची शिफारस केली व इतर सर्व प्रकार बंद करण्याकरितां अधिक कडक कायदे सुचविलें. घरांतून चालणारी खाजगी जुगार बंद करणें शक्य नसलें तरी जुगारीच्या योगानें झालेल्या कर्जाबद्दल कोर्टांत फिर्याद चालणार नाहीं असा कायदा आहे. इंग्लंडमधील १९०६ सालच्या ‘स्ट्रीट बेटिंग अँक्स’नें या व्यसनावर व्यापक नियंत्रण आहे. या गुन्ह्यास पहिल्या वेळीं १० पौंडपर्यंत, दुसर्‍या वेळीं २० पौंड व तिसर्‍या वेळीं ३० पौंड किंवा ३ महिनेपर्यंत साधी किंवा सक्तमजुरी कैद अशा प्रकारच्या शिक्षा ठेवल्या आहेत.

हिंदुस्थानांत प्राचीन राजेच द्यूत खेळत असत. तथापि स्मृतिकारांच्या काळीं जुगारीला कायद्यानें प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केलेला दिसतों. दिवाणी कायद्यांत द्यूतमद्यादि व्यसनामुळें बापानें केलेलें कर्ज फेडण्याची जबाबदारी पुत्रावर नसे. शिवाय द्यूत खेळणें हा गुन्हा ठरवून त्याला हात तोडणें ही शिक्षा सांगितली आहे. मध्ययुगीन राज्यांत व मोंगलमराठे अमदानींत मनुस्मृतीचाच कायदा रूढ होता व त्यामुळें कौरवपांडवादिकांच्या द्यूतासारखे मोठाले राजेरजवाड्यांचे किंवा सामान्य जनसमाजांतले द्यूतप्रसंग ग्रंथांत नमूद नाहींत. ब्रिटिश अमदानींत येथें इंग्लंडच्या कायद्यासारखेच कायदे आहेत.

सूमात्रामध्यें जुगारीला कायमची मनाई आहे, पण कांहीं विशिष्ट प्रसंगी कोंबड्यांच्या झुंजीच्या जुगारीला परवानगी ठेवलेली आहे. चीनमध्ये जुगारीच्या गुन्ह्याला मरणाची शिक्षा असे. इस्लामी कायद्याचा जुगारीला प्रतिबंध आहे.

नै ति क आ क्षे प.- बेसुमार जुगार खेळणें दुष्परिणामी असतें याबद्दल मतभेद नाहीं. पण मर्यादित प्रमाणांवर जुगार खेळणें हें सुद्धां आक्षेपार्ह आहे. जुगारीच्या व्यवसायांत पैशाची मोठी उलाढाल होत असली तरी त्यानें अर्थशास्त्रदृष्ट्या समाजाच्या संपत्तींत यांत्किंचितहि भर पडत नाहीं. करमणुकीखातर जुगार खेळणें हेंहि नैतिकदृष्ट्या समर्थनीय नाहीं; कारण पैसे कमावणारांनां सुख होते पण पैसे गमावणारांनां दुःख होतें. सबब हा असुरी जातीचा आनंद होय; त्यानें मनुष्य कठोर व स्वार्थी बनून त्याचा नैतिक अधःपात होत जातो. आयतें धन मिळविण्याची मनःप्रवत्ति जुगारीमुळें बळावते, आणि विद्याकलानैपुण्य, न्यायप्रियता, जबाबदारी वगैरे उच्च प्रकारच्या गुणांचा अभाव होतो. मालमत्तेची तफदील होण्याचे न्याय्य मार्ग (१) दान, (२) श्रम आणि (३) अदलाबदल (एक्सचेंज) हे तीन होत. जुगारीमध्यें कोणताहि मोबदला किंवा किंमत न देतां द्रव्यहरण होतें, सबब ती एकप्रकारची उभयतांच्या संमतीनें चाललेली दरोडेखोरीच होय.

व्यापारांतील सट्टेपद्धति ही जुगार नव्हें. यदृच्छा (चान्स) सट्ट्याच्या व्यापारांत असते असें म्हणतात, पण तें खरें नाहीं. मालाच्या किंमतींची चढउतार ही व्यापारी जगांतील घडामोडीवर अवलंबून असते, त्यामुळें किंमतीमध्यें काय फेरफार होतील त्यांचा अदमास उर्फ भविष्य कळण्यास जगांतील व्यापाराची माहिती व अर्थशास्त्राचें ज्ञान लागतें. पुढें भाव वाढतील म्हणून आगाऊ खरेदी करणें हें समाजदृष्टट्याहि आवश्यक व न्याय्य आहे. उलटपक्षीं जुगारीनें कोणतेंहि समाजहित साधलें जात नाहीं. सट्टेबाजींत सुद्धां मालाची देवघेव करण्याचा खरोखर उद्देश नसेल तर ही कायदेकोर्टांत जुगारच समजली जाते. विमानकंपन्यांचा धंदा ही जुगारच आहे असा आक्षेप घेतात, पण ती चूक आहे. कारण धोका टाळणें हाच विम्याचा उद्देश असल्यामुळें त्यामुळें जीवित अधिक सुरक्षित होतें. जुगारीनें मात्र धनहानि हा एकच दुष्परिणाम सदासर्वदा ठरलेला आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .