प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जीवनकार्यविचार, प्राणिविषयक :-  या विषयास आरंभ करण्यापूर्वी जीवन म्हणजे काय, याविषयीं विचार केला पाहिजे. जीवनपेशीकडून जी सतत चळवळ अगर धडपड तिच्या अंत:स्थितीचा परिस्थितीशीं मेळ घालण्यासाठीं चालू असतें, त्या चळवळीलाच जीवन अगर जीवित म्हणावें अशीं व्याख्या हर्बर्ट स्पेन्सरनें केली आहे, व अर्थात ही चळवळ प्रोटोप्लाझम  (जीवनरस)   युक्त जिवंत व्यक्तीकडूनच होणें शक्य आहे. केवळ जीवन या क्रियेचा विचार कर्तव्य असतां ती व्यक्ति कीटकादि क्षुद्र प्राण्यांपैकीं आहे अगर व्याघ्रमानवादि उच्च प्राण्यांपैकीं अगर प्राणिकोटी किंवा उद्धिज्जकोटी यांपैकीं आहे हा विचार दृष्टीआड केला पाहिजे कारण प्राण्याची आकाररचना यांचा विचार विकांस वादांत केलेला बरा, म्हणून या जीवनक्रियेचा जेवढया सोप्या व साध्या त-हेनें विचार करतां येईल तेवढाच विचार येथें वनस्पतिजीवनविचाराला उपोद्धात म्हणून केला पाहिजे. प्रथम जीवनाचीं मुख्य लक्षणें सांगून जीवनपेशी अगर सजीव व्यक्ति व निर्जिव वस्तू यांतील फरक निश्र्चित केला पाहिजे. प्राणिज अगर उदि्भज सजीव व्यक्तिचें शरीर अनेक जीवनपेशीच्या योगानें बनलेलें असते. या पेशीचे मोठाले समूह असून त्याचें जननपोषणवृद्धि हे व्यापार स्वतंत्रपणें व अव्याहतपणें त्या सजीव व्यक्तीच्या शरीरांत चालू असतात. तसेच त्यांनां अपघात, धोका, विषबाधा, आत्वविषशेषणामुळें आलस्य व मरण वगैरे आपत्ता आल्यानें त्या व्यक्तीचें 'जीवन' हि थांबण्याचा प्रसंग येतो हें पहिलें लक्षण होय. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, गंधक व नायट्रोजन या साधारण व परिचित मूलभूतद्रव्यानें नैट्रोजनविशिष्ट असा प्रोटीड नामक पदार्थ सजीव व्यक्तींच्या शरीरांत असतो. हा नैटोजनसंमिश्र पदार्थ सजीव व्यक्तीच्या शरीराखेरीज इतरत्र बनत नाही. याचप्रमाणें पिष्ट व वसायुक्त पदार्थांची उत्पत्ति ही या सजीव व्यक्तींत होते. परंतु त्यांची उत्पत्ति इतरत्र देखील होणें संभवनीय असतें. जीवनपेशींत कांहीं प्रकारचे क्षार व पाणी हींहि बनतात. इतक्या साधनांनीं व द्रव्यांनीं परिप्लुत असलेली परंतु त्या द्रव्यांतील वैयक्तिक व स्वतंत्र गुणाहून भिन्न गुणधर्माची ही सजीव व्यक्ति असते. आतां  सजीव व्यक्ति व निर्जीव वस्तू यांमधील फरक कोणता हेंहि बारकाईनें निश्र्चित केलें पाहिजे. निर्जीव वस्तूंत स्फटिकमय रचना असते व सजीव व्यक्तींत ती नसते हें एकदां प्रचलित मत अग्राहय, मिथ्या व आभासमय आहे. सजीवांमध्यें चैतन्य असणें  व निर्जीवांत तें नसणें हें लक्षण अधिक ग्राहय व सत्य आहे; तथापि त्यांतील अपवाद येथें कथन करीत नाहीं. शीत, उष्ण, क्षार, विद्युत् वगैरे बाह्य साधनानें सजीव व्यक्तींवर परिणाम होतो. तथापि भिन्न प्रकारचा तो निर्जीव वस्तूंवरहि होतो. प्रजोप्तादन हें लक्षण सजीव स्थितिदर्शक मानतां येतें. परंतु खनिज  (निर्जीव)  वर्गापैकीं पारा पडून त्याच्या बारीक गोळया बनतात. त्याचें पेशीवर्धनाच्या योगानें होणा-या प्रजोत्पादनाशीं साम्य जुळवून देतात. जीवनपेशीचें वर्धन या त-हेनें होतें व कोणतीहि जीवनपेशी अगोदरच्या पेशीपासून निर्मित झाली असली पाहिजे हें मत ती हल्लीं मान्य आहेच. म्हणून सजीव व निर्जीव यांतील मुख्य भेद रासायनिक स्वरूपाचा असून अतिसंमिश्र पदार्थ जो प्रोटीड तो सजीवांत सांपडतो, व निर्जीवांत सांपडत नाहीं एवढें लक्षांत ठेवलें पाहिजे. कांहीं त-हेचे किडे, कीटक, जंत वगैरे प्राणी वाळवून अगर बर्फांत ठेवले असतां मृतवत्  होतात. परंतु अनुकूल परिस्थितींत त्यांस ठेवतांच ते जिवंत होतात हा अनुभव आहे. तसेंच योगसाधन व प्राणायाम यांच्या अभ्यासानें जिव्हा तालुरंघ्रांत घालून मन अंतर्मुख करून समाधि लावली तर मृतप्राय स्थितींत योगी कित्येक दिवस असतो व पुढे तो समाधि उतरून शुध्दीवर येतो अगर जिवंत होतो. ही स्थिती खरी मानण्यास बरीच जागा आहे व यावरून सजीव व निर्जीव यांतील भेदांतील अनिश्र्चितता वाढविण्यास एक साधन उपलब्ध आहे असें म्हटलें तरी चालेल. तसेंच उत्तर व दक्षिण ध्रुवाकडील कांहीं प्राणी तेथील अति कडक हिंवाळा येण्याच्या सुमारास त्यांच्या अंगावरील लोंकर अति वाढून ते चारसहा महिने महानिद्रावश होतात तोहि प्रकार असाच आहे.
                                             वनस्पतिविषयक.
प्रथम सर्व जीवनास आधारभूत अशा जीवरसाचा अथवा चिद्रसाचा विचार करणें भाग आहे. त्याशिवाय तो विषय बरोबर समजणें शक्य नाहीं. सजीव व्यक्तींची जीवनकार्ये केवळ जीवरसावर अवलंबून असून वनस्पति-जीवरस व प्राणि-जीवरस हया दोहोंच्या मूलभूत गुणधर्मांत कोणताहि भेद नसतो. अन्नग्रहण , वर्धन व प्रजोप्तादन या गोष्टी सर्व साधारणपणें प्रत्येक सजीव व्यक्तींत आढळतात, व त्या गोष्टी म्हणजेच व्यक्तींचीं मुख्य जीवनकार्ये होत. हीं जीवनकार्ये केवळ जीवरसाच्या सचेतनत्वामुळेंच घडून येतात. म्हणून वनस्पती व प्राणी यांच्या प्रत्येक जीवनकार्याचा उत्पादक जीवरस आहे हें निश्र्चित होय. प्रत्येक सचेतन पेशींत जीवरस असतो. त्यामुळें त्या पेशीकडून कांहीं विशिष्ट जीवनकार्य घडूं शकतें. असल्या पेशीस अथवा पेशिसमुच्चयास इंद्रिय अशी संज्ञा देतात. अशा पेशीरूप् अगर पेशिसमुच्चयरूप् इंद्रियाकडून घडणा-या जीवनकार्याच्या मीमांसेस 'जीवनकार्य-विचार' असें म्हणतात.

जीवरस (प्रोटोप्लाझम) :- प्रत्येक सचेतन पेशीमध्सें तीन मुख्य भाग असतात. (१)   पेशिभित्तिका,  (२) पेशीद्रव्यें व (३)  जीवरस. हयामंध्यें महत्त्वाचा भाग म्हणजे जीवरस होय. तो फार पातळ नसून घट्टहि नसतो. तो पारदर्शक असून कणीदार अथवा रवाळ असतो. जीवरसांत 'केंद्र' म्हणून एक पिंड असून दुसरे अनेक जीवनपिंड असतात. मध्यभागीं जलस्थान असून त्यासभोंवतीं जीवरसाचा भाग किंचित घन झालेला असतो. हीच स्थिति पेशीभित्तिकेजवळ असते. त्यामुळें पेशिभित्तिकेस तसेंच जलस्थानास एक प्रकारचा आधार मिळतो. पेशिभित्तिका व जलस्थान हया दोहोंमधील जीवरसाचा भाग इतर जागेपेक्षां पातळ असतो; व हयाच पातळ रसांत जीवनपिंड असतात. केंद्र, जीवनपिंड, जीवरस हीं तिन्ही सजीव असून सर्व जीवनकार्ये हयांकडूनच होतात. जीवरसाचें खरें रासायनिक पृथक्करण सचेतन स्थितींत होणें शक्य नसून त्या स्थितींतील रासायनिक घटक कोणत्या स्वरूपाचे असतात हें सांगतां येणें कठिण आहे. सर्व साधारणपणें जीवरसांत कारबन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस असे मूलभूत पदार्थ आढळतात. हया मूल पदार्थापासून वेगवेगळे रासायनिक संयुक्त पदार्थ बनलेलें आढळतात. पण त्या सर्व पदार्थांतून कोणत्या विशिष्ट पदार्थांत सचेतन शक्ति असतें हें सांगणें शक्य नाहीं. हे पदार्थ केव्हांहि स्थिर नसतात. हयांमध्यें एकसारख्या घडामोडी होत असतात. हया घडामोडींचीं कारणें आंतर असोत अगर बाह्य असोत परंतु त्यांमुळें कधीं कधीं एखादि बाह्यशक्ति शरीरांत सांठते, तर कधीं शरीरांतील पूर्व शक्तीचा विकास होऊन तिचें रूपांतर होतें. हया घडामोडी फार व्यवस्थित रीतीनें चाललेल्या असतात. त्यांत बिघाड फार क्वचित् होतो. शारीरिक व रासायनिक घडामोडी सुसंगत चालणें हेंच सचेतनत्वाचें खरें लक्षण होय. जेव्हां असल्या घडामोडींत विसंगतात उत्पन्न  होते तेव्हांच त्यांतील चैतन्य नाहींसें होऊन मृतस्थिति उत्पन्न होते. बाहेरून अन्नद्रव्यें शोषण करणें, त्यांची योग्य जागी पाठवणी करून त्यांपासून सेंद्रिय पदार्थ तयार करणें, अनवश्यक वस्तूंचा त्याग करणें, श्र्वासोच्छवासद्वारां घडामोडीस लागणारी शक्ति पुरविणें अथवा नूतन उत्पत्तीस चलन देणें वगैरे सर्व जीवनकार्ये जीवरसाकडून अथवा केंद्रादिजीवनपिंडाकडून होतात. साध्या शर्करादि ओपट पदार्थापासून नायट्रोजनयुक्त पदार्थ तयार करणें, त्या पदार्थांचें सात्मीकरण करणें व तत्द्वारा जीवरस वाढविणें व पुन: तो जीवरस शरीरवृध्दीसाठीं खर्चणें हीं सर्व कार्ये जीवरसाकडून होतात. मूळचा जीवरस, मुळया, फांद्या, कळया, पानें, फुलें वगैरे अवयव उत्पन्न करण्यांत खर्चिला जाऊन पुन्हां नवीन जीवरस त्याच मार्गांनीं बनविणें हेंच जीवरसाचें खरें लक्षण होय. शरीरवृद्धि तसेंच वंशवृद्धि हें जीवरसाचे स्वाभाविक धर्म आहेत. वास्तविक वनस्पति अथवा प्राणि-शरीर हें जीवरसाचें परिणत रूप आहे. कारण शरीराचा प्रत्येक घटक भाग जीवरसाच्या घडामोडीचें फळ आहे. म्हणजे शरीरघटकपेशींत जीवरस प्रत्यक्ष आपल्या पूर्व अथवा रूपांतर स्थितींत असतो. शरीरवृद्धि करण्याच्या कामीं जीवरस सोयींसाठीं निरनिराळे खण तयार करून त्यांत तो थोडयाबहुत प्रमाणांत राहतो. असल्या खणास आपण पेशी म्हणतो. सचेतन स्थितींत पेशीपेशींचा परस्पर संबंध भित्तिकेंतून पसरणा-या जीवरसाच्या सूक्ष्म धाग्यामुळें कायम असतो. यामुळें सर्व शरीरांत जीवरसाची एकसूत्रता असते. या एकसूत्रतेमुळें एका ठिकाणीं घडणारी उत्तेजनरूपी संवेदना दुस-या जागीं पेशीपेशींतून सहज रीतीनें पोहोंचते. अशा प्रकारचा सर्व शरीरांत सार्वत्रिक संबंध असणें आवश्य व हितावह आहे.

केंद्र (न्यूक्लस):- जीवरसाच्या विशिष्ट पिंडास आपण केंद्र म्हणतो. जीवरसाचे घटक नेहमीं बदलणा-या स्थितींत असतात. परंतु केंद्राच्या क्रोमोडिया नांवाच्या घटकाच्या मूळ स्थितींत फारसा बदल होत नाहीं. अलिकडील शास्त्रीय शोधांतीं जीवनकार्याचें चालकत्व या केंद्रघटकाकडेच येत आहे. गुणपरंपरा चालू ठेवण्याचें काम केंद्रघटकांकडून होतें असा समज आहे.

हया केंन्द्रघटकाचें प्राकृतिक अगर रासायनिक विशिष्ट प्रकारचें स्वरूप् नेहमीं असतें असें मात्र म्हणतां येत नाहीं. केंद्ररसांत केंद्रबिंदू असतात. कारबन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैर मुख्य घटक केंद्रांत तसेंच जीवरसांत आढळतात. परंतु जीवरसांत फास्करस हा विशेष  आढळतो. शरीर-वृद्धिंत अथवा वंशवृद्धिंत केंद्रच पुढाकार घेतें. नवी पेशी उत्पन्न करण्याचें काम केंद्राकडूनच होते. पूर्वकेंद्राचा विभाग होऊन नवीन केंद्र उत्पन्न होतें व हयापासून नवी पेशी तयार होते. नवीन होणा-या पेशी एकाच शरीरांत राहिल्या तर पूर्व शरीर वाढूं लागतें. जर त्या पेशी स्वतंत्र होऊन आपलीं जीवनकार्ये करूं लागल्या तर वंशाची वाढ होते. शरीर-वृद्धि व वंश-वृद्धि हयांमध्येंच सर्व जीवनकार्याचा अंतर्भाव होतो.

जीवनपिंड ( प्लास्लिड्स) :-  जीवरसांतील केंद्रासारखे दुसरे महत्त्वाचे भाग म्हणजे जीवनपिंड होत. हे लहान मोठया आकाराचे असून त्यांचा रंगहि वेगवेगभ असतो. रंगाप्रमाणें जीवनकार्यांत त्यांचा वेगवेगळा उपयोग होतो. शर्करादि ओशट पदार्थांची उत्पत्ति हया जीवनपिंडाकडून होते. केंद्राप्रमाणेंच पहिल्या जीवनपिंडाचें विभाग होऊल नवीन जीवनपिंड उत्पन्न होतात.

पेशि-भित्तिका ( सेल वॉल) :-  जीवरसापासून पेशिभित्तिका उत्पन्न होते. तिचें रासायनिक घटक सत्वादि पदार्थांसारखेच असतात. पेशिभित्तिकेची वाढ आंतून बाह्यप्रदेशीं होते. पेशिभित्तिकेच्या पहिल्या सेंद्रिय घटकांत क्रमाक्रमानें निरिंद्रिय द्रव्यें जमून ती पुढें संकीर्ण होते. तिच्या वेगवेगळया कार्याप्रमाणें सेद्रिय घटाकंत रासायनिक फरक होऊन ती पुष्कळ वेळां लांकडासारखी बुळबुळीत तर कधीं बाटलीच्या बुचाप्रमाणें चिवट होते. तिची जाडी कमी अधिक असते. तिच्या प्राथमिक स्थितींत ती फार पातळ असते. परंतु जीवरसांतून पेशीघटकद्रव्याचे थर वरचेवर त्यावर जमून जाड होत जाते. परंतु थर कमीअधिक जाड झाल्यानें भित्तिकेस मळसुत्राकृति, वळीदार, खांचेदार, वगैरे आकार येतात. पेशीची जाडी व आकार ही केवळ पेशीकडून होणा-या जीवनकार्यावर अवलंबून असतात.

इंद्रियोत्पत्ति :- पेशीच्या सर्व भागीं जीवरस सारखा पसरलेला असतो असें वाटण्याचा संभव आहे; पण वस्तुस्थिति तशी नसते. एकाच पेशींतील जीवरसाच्या घटनेंत थोडेबहुत वैचित्र्य असतें. ह्या जीवरसाच्या वैचित्र्याच्या वैचित्र्यापासून प्राथमिक इंद्रियरचनेस आरंभ होतो. एक पेशीमय वनस्पतींतील इंद्रिय-रचनेचा शोध  १८६१ सालीं अर्नेस्ट ब्रूक नांवाच्या शास्त्रज्ञानें लाविला. पेशींतील जीवरसाचें कमी अधिक घनत्व तसेंच केंद्रादि जीवनपिंडाचें संकीर्णत्व म्हणजेच इंद्रियरचना असें त्याचें म्हणणें आहे. सूक्ष्म पेशींत सुद्धां श्रमविभाग अथवा कामाची वांटणी झालेली आढळते. पेशीच्या कांहीं एका भागाकडून एक कार्य होतें व दुसरें कार्य दुस-याकडून होतें. म्हणजे कार्यभिन्नतेप्रमाणें इंद्रियरचनेस सुरवात होते. जरी बाह्यत: एकपेशीमय वनस्पतींत सर्व जीवनकार्ये एकाच ठिकाणीं चालतात असें वाटतें तथापि तीं सर्व एकाच जागीं होत नसतात. त्यांतहि भिन्न भिन्न भाग भिन्न भिन्न कामें करीत असतात. ह्याच भिन्न भागांमध्यें इंद्रिय-रचनेचा उगम असतो.

एकपेशीमय वनस्पतींचीं सर्व कामें एका पेशींत होतात, पण बहुपेशीमय वनस्पतींत तीं कार्ये निरनिराहया पेशिसमुच्चयांत होतात. पेशि-विभाग होऊन नवीन पेशी उत्पन्न होतात व पेशींची संख्या वाढत जाते. सारख्या आकाराच्या पेशीचा संघ एकत्र होऊन तो विशिष्ट जीवनकार्यास उपयोगी पडूं लागतो. असल्या पेशिसंघास पेशिजाल म्हणतात. पुष्कळ पेशिजालें एकत्रित होऊन जो भाग तयार होतो त्यास अवयव अथवा इंद्रिय असें म्हणतात. निरनिराळया वनस्पतींमध्यें इंद्रीयांची वाढ कमी अधिक होते. उच्च वनस्पतींत आढळणा-या मूल, स्कंद, पर्ण इत्यादि इंद्रियांची उत्पत्ति पेशिजालांच्या संघटित भागापासून होते व प्रत्येकाचें जीवनकार्य वेगवेगळें असतें.

पेशींची असवश्यकता :-वेगवेगळया पेशीच्या ऐवजी एकच पेशि विस्तृत होऊन शरीरवृध्दीचें काम भागणार नाहीं काय ? वेगवेगळया पेशींमध्यें  जीवरस रहाण्याऐवजी एकाच पेशींत तो कां राहूं नये? वेगळया पेशी असण्याची जरूरी काय ? अशा प्रकारचे प्रश्र्न उत्पन्न होण्याचा संभव आहे. जीवरसांतील केंद्रास मोठ्या विस्तृत प्रमाणावर बनलेल्या पेशीमध्यें सर्व जीवनघडामोडीवर उत्तम रीतीनें ताबा ठेवितां येणार नाहीं. केंद्राची शक्ति मर्यादित भागावर चालू शकते. त्यामुळें सोयीसाठीं वेगवेगळे खण अगर पेशी उत्पन्न करून प्रत्येकांत वेगळे केंद्रादि जीवनपिंड उत्पन्न होतात. जीवनकार्य सुलभ रीतीनें व व्यवस्थितपणें चालण्यास एका पेशीपेक्षां अधिक  पेशी असण्यांत फायदा असतो व श्रमविभागास पूर्ण अवकाश मिळून हया स्थितींत जीवनकार्ये उत्तमप्रकारें चालतात. नाहीं तर एकाच ठिकाणीं निरनिराळया कार्यांची गर्दी होण्याचा संभव आहे व कादाचित् त्यामुळें परस्परांत विरोध उत्पन्न होण्यास वाव मिळेल. हयांचसाठीं पुष्कळ पेशी उत्पन्न होऊन पेशिजाल किंवा इंद्रिय यांची उत्पत्ति होण्यानें अधिक सोय होते. केंद्रादि जीवनपिंडांनां संकुचित जागेंत रहावें लागतें म्हणून जरी त्यांची शक्ति मर्यादित झाली, तथापि ती अधिक व्यवस्थित होते. पेशिभित्तिका जागजागीं उत्पन्न होऊन जीवरसांत ताजेतवानी कायम रहाते. निरनिराळया पेशीं उत्पन्न होण्याऐवजीं एकच पेशी विस्तृत होत राहिली तर त्यांतील जीवनपिंडास नैसर्गिक ग्लानी अगर वृध्दावस्था कालांतरानें येणें साहजिक आहे. परंतु नवीन पेशी उत्पन्न होण्यांत नवीन जीवनपिंडांची उत्पत्ति होते व त्या योगें त्याचा तरतरितपणा कायम रहातो. जुन्या पेशींतील जीवनपिंडास थकवा येत जातो व त्याप्रमाणें त्यांची जीवनकार्ये शिथिल होतात पण नवीन जीवनपिंड असल्यानें जीवनकार्यांत खंड पडत नाहीं. हे जीवनपिंड तरूण व कार्यक्षम असतात. हया कारणांमुळेंच जुन्या खोडाचा गाभा पोकळ व मृत झाला तथापि बाहयांगीं नवीन पेशींचा भरणा असल्यानें पानें, फुलें किंवा येणें बंद होत नाहीं. म्हणूनच वरचेवर नवीन पेशी उत्पन्न होण्यांत फायदा असतो.

जीवरसाच्या गरजा :- जीवरसाची पहिली गरज म्हणजे पाणी होय. पाण्याशिवाय जीवरसाचें अथवा जीवनपिंडाचें सचेतनत्व कायम रहाणें शक्य नाहीं. जीवरसाचें पोषण पाण्यावर अवलंबून असतें. पाण्यामुळें पेशींत टणकपणा येतो. रबरी फुग्यांत हवा भरल्यावर तो जसा टणक होतो, त्याप्रमाणें जीवरसांत पाणी आल्यावर पेशिभित्तिकेवर त्या पाण्याचा ताण बसून ती टणक होते. प्रथम पाणी जेव्हां जीवरसांत शिरतें त्यावेळीं तें त्यांत पूर्ण मिसळून  जातें. पण लवकरच जीवरस वेगळा होऊन जलस्थान उत्पन्न होतें व त्या जागीं पाण्याचा सांठा होतो. सर्व सचेतन पेशींत जलस्थानांची सोय असते. पाणवनस्पतींनां वाटेल तेव्हां पाणी मिळण्याचा संभव असूनहि त्यांमध्यें जलस्थानें असतात व ही जलस्थानें पेशिरसानें भरलेलीं असतात. म्हणजे केव्हांहि पाण्यासारख्या अत्यंत उपयुक्त पदार्थाची अडचण पडूं नये म्हणून त्या स्थितींत सुद्धां पाण्याची तरतूद वनस्पती करितात. दुसरी आवश्यक वस्तु म्हणजे शुद्ध हवा होय. जीवरसास व जीवनपिंडास खेळती हवा आवश्य मिळाली पाहिजे. हवा पाण्यांत विरून ती सर्व शरीरांत पसरते. हवेप्रमाणें अन्नाची जरूरी असते. अन्न सेंद्रिय असो अथवा निरिंद्रिय असो, तथापि तें शरीरांत शोषिलें जाण्यास अथवा पेशींतून दुस-या जागीं पसरण्यास पाण्याच आवश्यकता असते. म्हणजे सर्व वस्तूंत पाण्याचा उपयोग पहिल्या प्रतीचा असून त्याशिवाय कोणतेंहि जीवनकार्य होणें शक्य नाहीं.

जीवरसाच्या उत्पत्तीविषयीं निरनिराळीं मतें :- जीवरस व जीवनपिंड कसे उत्पन्न होतात हयाविषयीं विचार केला असतां सकृत् दर्शनी असें दिसून येतें कीं त्यांची उत्पत्ति पूर्व जीवरसापासून अथवा पूर्व जीवनपिंडापासून होते. पण जेव्हां अगदीं त्यांच्या मूल उत्पत्तीचा विचार आपण करूं लागतों तेव्हां मात्र ती उत्पत्ति कशी झाली हयाबद्दल आपली मति कुंठित होते. कांहीं तत्त्ववेत्त्यांच्या मतानें जीवनपिंडाचें अथवा जीवरसाचें अस्तित्व दुस-या गोलावर असून तेथून ते आपल्या भूगोलावर उल्कापाताबरोबर तारे पडण्याच्या झटक्यांत इकडे आले. जरी हें मत ग्राहय मानिलें तथापि त्या गोलावर सुद्धां प्रथम त्याची उत्पत्ति कशी झाली हा प्रश्र्न तसाच रहातो. कांहीं शास्त्रज्ञांच्या मतें एकदां असा एक अनुकूल काल होता कीं त्यामध्यें आपोआप निरिद्रिय द्रव्यापासून रासायनिक कार्ये घडून जीवनपिंड तयार झालें व पुढें क्रमाक्रमानें त्यांचे विभाग होऊन त्यांची वृद्धि होत गेली. कार्यकारणांचा शुष्क विचार न करतां परमेश्र्वरानें प्रथम जीवनपिंड उत्पन्न केले व त्यांनां स्वत:ची परंपरा वाढविण्याची शक्ति आहे, असें कांहींचें मत आहे. हया मतानें मनाचें कदाचित् समाधान होईल. परंतु जिज्ञासा खुंटून जाण्याचा संभव आहे व त्यामुळें शास्त्रीय शोधास आळा बसेल. कांहीचें मत असें आहे कीं हल्लीं ज्या प्रकारचे जीवनपिंड आपणास आढळतात तसे पिंड पूर्वी नव्हते. त्यांनां अति शीत अथवा अति उष्ण स्थिति मानवत असे. अगदीं साध्य निरिंद्रिय पदार्थापासून विकासक्रमांत हल्लीचे संकीर्ण जीवनपिंड क्रमाक्रमानें उत्पन्न झाले. निर्जिव पदार्थापासून स्थित्यंतरें होत होत प्रस्तुतचे जीवनपिंड तयार झाले. विकासवादाचा पुरस्कार करणारे डार्विन, हॅक्स्ले, वॅलेस वगैरे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते हयाच रीतीनें जीवनपिंडाच्या उत्पत्ती विषयीं लिहितात. डॉ. शफरसारखे रसायनशास्त्रज्ञ जीवनपिंड रासायनिक प्रयोगशाळेंत तयार करण्यासारखी स्थिति आली आहे असें जोरानें सांगत आहेत. नुकतेच ज्यांचे  सिद्धांत सर्व शास्त्रज्ञांस संमत झाले आहेत असे सुप्रसिद्ध डॉ. जगदीशचंद्र बोस म्हणतात कीं पदार्थांत निर्जीव व सजीव असा भेदभावच रहात नाहीं. त्या सर्वांमध्यें एकच प्रकारचें चैतन्य आहे. मात्र भिन्न भिन्न बाह्य कारणांनीं तें वेगवेगळया रीतीनें व्यक्त होतें. अर्थात् जीवनपिंडाची उत्पत्ति अमक्यापासून झाली असा वेगळा प्रश्न राहूं शकत नाहीं. ज्या पदार्थांस कांहीं कारणांमुळें विशिष्ट उत्तेजन मिळतें, ते पदार्थ त्या उत्तेजनानुसार विकास पावूं लागतात व या न्यायाप्रमाणें जीवनंपिंडाची उत्पत्ति झाली असावी.

जलशोषण :- सचेतन शरीरांतील जीवनपिंडाच्या शारीरिक व रासायनिक घडामोडीस पाण्याची आवश्यकता अत्यंत असते व तें पाणी शोषून घेणें हे एक प्रमुख जीवनकार्य आहे. जलशोषण करणें हा पाण्याशीं निकट संबंध येणा-या प्रत्येक सजीव पेशीचा स्वभावधर्म असून तो अगदीं सूक्ष्म अशा एक पेशीमय जलस्थ वनस्पतीपासून तों तहत मोठमोठया वृक्षांपर्यंत जवळ जवळ सारखाच असतो. अगदीं प्राथमिक जलस्थ साध्या वनस्पती म्हणजे पाण्यांतील तवंग किंवा समुद्र शैवालासारख जलरूह साधारणपणें आपल्या शरीराच्या सर्व पृष्ठभागाचा उपयोग पाण्याचें शोषण करण्याच्या कामीं करतात. परंतु भूस्थ वनस्पती ज्या मानानें वातावरणांत वाढूं लागल्या, त्यामानानें हया शोषक भागांचा संकोच होऊं लागला व शेवटीं पाण्याशीं अगदीं निकट सांनिध्य पावणारा जो भाग त्याची परिणति होऊन त्याचें एक स्वतंत्र इंद्रिय अगर अवयव बनलें. त्या अवयवासच सर्वसाधारणपणें 'मूळ' म्हणण्याचा प्रघात आहे. हया मूळातूनच जलशोषण होतें. मुख्य मुळावर पोटमुळया असून त्या सर्वांच्या अग्राजवळ हजारों शोषक-केंस असतात. हया शोषक-केंसांकडून जलशोषणाचें कार्य सुरू होतें. पाण्याचा अंश जमीनींतील सूक्ष्म कणांभोंवतीं बिलगलेला असतो. तेथून तो अंश वेगळा केला जाऊन शोषून घेण्याचें काम केंसांकडून होऊं शकतें. शेंकडों शोषक केंस शोषण करण्याचें काम करीत असल्यामुळें मोठमोठया वृक्षांसारख्या वनस्पतीस पाण्याचा पुरवठा होतो.

अन्योन्य रसाकर्षण अथवा रस संमिश्रण :- एक कमी व अधिक घन अशा दोन द्रवरूप रसांमध्यें फक्त एक सूक्ष्म चर्मपटल ठेविलें तर ते दोन्ही रस त्या चर्मपटलांतून एकमेकांकडे जाऊन परस्पर मिसळूं लागतात. ही क्रिया त्या रसद्वयांतील घनतेच्या भिन्नपणावर अवलंबून असते. रस-मिश्रणांत परस्पर विरूद्ध दिशेकडे जाणारे दोन प्रवाह सुरू होतात. पहिला प्रवाह पातळ रसांतून जास्त घन रसाकडे सुरू होतो, दुसरा प्रवाह उलट घनरसांतून पातळ रसाकडे असतो. प्रथमत: त्यामानानें पहिला प्रवाह सुरू होऊन दुसरा प्रवाह सुरू होण्यास कमी अधिक वेळ लागतो. हया रीतीनें मिश्रण सुरू झाल्यावर दोन्ही रसांची घनता सारखी होईपावेतों तें मिश्रण चालू असतें. दोन भिन्न घनतेचे रस परस्परांत हया प्रकारें मिसळणें हा त्यांचा शारीरिक स्वभावधर्म आहे. कित्येक वेळां एकच रस दुस-या रसाकडे अधिक जोरानें आकर्षिला जाऊन तो दुस-या रसांत पूर्णपणें मिसळतो व दुसरा पहिल्या रसाकडे आकर्षिला जातच नाहीं. असें झालें म्हणजे मिश्रण एकांगीं होतें.

शोषक -केंसांकडून होणारें अन्योन्य रसाकर्षण :- शोषक केसांच्या चारी बाजूंस भित्तिका असून आंतील अंगास जीवरसाचा पातळ कणीदार थर असतो. व मध्यभागीं जलस्थानांत पेशिरस असतो. शोषक केंसांचा संबंध जमीनींतील पाण्याशीं येतो. म्हणून जलस्थानांतील पेशीरसांत व जमीनींतील पाण्यांत 'अन्योन्य रसाकर्षण' सुरू होतें. त्यायोगानें जमीनींतून पाणी जलस्थानांत आकर्षिलें जातें. त्यास अडथळा पेशिभित्तिकेकडून होत नाहीं. जमीनींतील पाणी पुष्कळसें शोषिलें जाऊन ते जलस्थानांत सांठविलें जातें. मात्र हया ठिकाणीं एक विशेष  लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जलस्थानांतून पेशिरस क्वचितच बाहेर जातो. साध्या अन्योन्य रसाकर्षण - क्रियेंत रसांचें परस्पर मिश्रण अथवा आकर्षण होतें. पण हया क्रियेंत अशा ठिकाणीं एकांगीपणा रहातों. पेशिभित्तिकेच्या आंतील अंगास असणा-या जीवरसाच्या थरामुळें आंतून बाहेर पेशिरस जाण्यास अडथळा होतो. बाहेरून वाटेल तितकें पाणी जाऊ शकतें पण आंतील पेशिरसास बाहेर जाण्यास मार्ग मिळतोच असें नाहीं.

शोषणकार्यांतील जीवरसाची आवड :- पेशींतील जीवरसाचा थर जलशोषणास उत्तेजन देण्याच्या कामींच केवळ महत्वाचा आहे असें नाहीं, तर त्या पाण्यांत जीं  द्रव्यें विरलेलीं असतात तीं कितीं व कोणचीं शोषण करावयाचीं, हें ठरविण्याच्या बाबतींतहि त्याकडून मोठी महत्त्वाची कामगिरी घडते. पाण्यांत विरणा-या सर्वच क्षारांचा शिरकाव जीवरसांतून होतो असें कोणी समजूं नये. विरलेले क्षार पोषणकार्यास उपयोगी पडत असतील तरच ते जीवरसाच्या थरांतून जलस्थानांत येऊं शकतात. पुष्कळ वेळां विरलेल्या क्षारांच्या घनतेंत फरक होत गेला म्हणजे ते जीवरसांतून शोषिले जाऊं शकतात. प्रथम जरी त्यास अडथळा होत असे, तथापि पुढें त्यांच्या घनतेंतील फरकामुळें त्यांचा अपायकारक परिणाम नाहींसा होऊन तो पोषणकार्यास उपयोगी पडूं शकतो. म्हणूनच त्याला आंत शिरण्यांस हरकत रहात नाहीं. ग्लिसरिन हा पदार्थ साध्या स्थितींत जीवरसांत केव्हांहि शिरूं शकत नाहीं. परंतु तोच (ग्लिसरीन)  पदार्थ पुष्कळ वेळ पाण्यांत राहून त्याची घनता कमी झाली, तर जीवरसांत शिरण्यास योग्य होतो. प्रथम त्यामुळें जीवरसांत संकोच  उत्पन्न होऊन जलस्थानांतून पाणी बाहेर जाऊन पेशींतील ताण कमी होतो. पण पुढें घनतेंत फरक झाल्यावर जीवरसाची संकोच-स्थिती नाहींशी होऊन ग्लिसरीन हा पदार्थ साध्या पाण्याप्रमाणें वाटेल तसा आंत जाऊ शकतो. ग्लिसरीनप्रमाणेंच आलकोहल किंवा माद्यार्क जीवरसांत शिरूं शकत नाहीं. पण त्याची ही घनता फार कमी झाल्यावर तोहि साध्या पाण्यासारखा शिरूं शकतो. जीवरसांतून एखादा पदार्थ विरलेल्या स्थितींत जलस्थानांत शिरणें झाल्यास त्याचें प्रमाण फारच सूक्ष्म असलें पाहिजे. जीवरसात आवश्य लागणा-या क्षारांचेंच कांहीं एका विशिष्ट प्रमाणांत शोषण होऊं शकतें. पाण्याच्या परमाणूवर तसेंच त्यांत विरलेल्या क्षारांच्या परमाणूंवर जीव  चें आकर्षण भिन्न भिन्न प्रकारें होतें. म्हणून वनस्पतीमध्यें जमीनींतून पाणी शोषिलें जातें. त्यांतील क्षारांचें प्रमाण तसेंच त्या जमीनींतील पाण्याच्या क्षाराचें प्रमाण वेगळें असतें. एकाच जागीं वाढणा-या निरनिराळया जातींच्या झाडांची राख करून तिचें पृथक्करण करून पाहिल्यास असें दिसून येईल कीं तेथील पाण्यांत असणा-या क्षारांच्या प्रमाणाहून झाडांतील क्षारांचें प्रमाण निराळें असतें, एवढेंच नव्हे तर निरनिराळया जातींतहि हें प्रमाण आढळतें. अशा प्रकारें जमीनींतील पाण्यांत क्षारांचें कांहींहि प्रमाण असलें तरी ते पाणी आणि क्षार आपल्या इच्छेनुरूप् अगर गरजेनुरूप शोषण करण्याविषयीं जीवरसाची आवडरूपी शक्ति जीवनकार्यांत फार महत्वाची आहे. कारण त्यामुळें पाण्यांत एखादा क्षार अधिक प्रमाणांत असल्यास किंवा त्या क्षाराची जरूरी नसल्यास किंवा तो अपायकारक असल्यास जणू काय तें पाणी गाळून घेऊन त्या क्षाराचा त्याग करितां येतो. उलटपक्षी एखादा विशिष्ट क्षार फार कमी प्रमाणांत असल्यास तो योग्य प्रमाणांत शोषिला जाण्याची व्यवस्था मुळावरील शोषक केसांकडून केली जाते.

पेशींतील जीवरसाची घनता पेशिभित्तिकेजवळ असल्यानें जीवरसाचा थर त्या जागीं तयार होतो व हया थराचा आधार पेशिभित्तिकेस मिळतो. तसेंच जलस्थानासभोंवतीं सुद्धां जीवरसाची घनता अधिक होऊन जलस्थानांत पेशिरस संभाळून धरण्यासहि त्याचा आधार होता. द्रव स्थितींत बाहेरून पदार्थ आंत शिरणें अथवा पेशिरसांतून तो बाहेर जाणें ही गोष्ट जीवरसाच्या हया विशिष्ट घनतेवर अथवा घन पडद्यावर अवलंबून असते. जेव्हां एखादा पदार्थ पाण्याबरोबरवर पेशिभित्तिकेजवळ जीवरसाच्या थरांतून आंत शिरूं लागतो; तेव्हां तो पदार्थ आंत शिरला असतां फायदेशीर होणार असेल, तर त्याला अटकाव होत नाहीं. पण जर त्याची उपयुक्तता नसेल तर जीवरसामध्यें संकोच उत्पन्न होऊन जीवरस जलस्थानाकडे  सरकूं लागतो व जलस्थानांतून पाणी बाहेर जाऊं लागतें. त्या पदार्थास आंत शिरण्यास वाव मिळत नाहीं. तरी पेशिभित्तिकेंतून द्रव स्थितींत एखादा पदार्थ आला तथापि तो पुढें जलस्थानांत साठविण्यासाठीं पाठविला जाईलच असें नाहीं. जीवरसाच्या हया दोन्ही पडद्यांत अथवा थरांत एक विशिष्ट द्रवता उत्पन्न करण्याचा गुण असल्यानें पेशिभित्तिकेंतून आंत आलेला पदार्र्थ पुन्हां वेगळया प्रकारें विरला जाऊन मग तो जलस्थानांत शिरण्यास योग्य होतो. ही विशिष्ट द्रवता त्या पदार्थास न मिळाल्यास तो पदार्थ जीवरसांत शिरूं शकत नाहीं, म्हणजे हा विशिष्ट गुण जीवरसाच्या आवडीमुळें अथवा नावडीमुळें उत्पन्न होतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. ज्या पदार्थापासून पोषण कार्यास मदत होईल अशाच पदार्थास ती विशिष्ट द्रवता त्या जीवरसाच्या थरांतून मिळते व तेच पदार्थ आंत शिरूं शकतात. जीवरसाचे हे थर वरचेवर नवीन होत गेल्यामूळें त्यांचा विशिष्ट द्रवता उत्पन्न करणारा गुण कायम रहातो. म्हणून क्षारशोषणांत जीवरसाची आवड अथवा विशिष्ट शक्ति प्रधान कारण आहे.   

केशाकर्शण :- दिव्याच्या वातींत तेल खालून वर चढतें त्याप्रमाणें जमीनींत घुसलेल्या मुळयांच्या शोषक केसांत पाणी शिरून वर चढतें, असा कांहीं लोकांचा समज होता, पण हा समज चुकीचा आहे. कारण केशाकर्षण सुरू होण्यास केसांचीं तोंडें उघडी असावीं लागतात. उघडया तोंडांतून येथेंहि कदाचित् केशाकर्षण सुरू झालें असतें. पण शोषक केसांनां उघडीं तोंडें बिलकूल असत नाहींत. मोठमोठया शक्तीच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतून सुद्धां त्यांवर तोंडें असलेलीं दिसत नाहींत. अर्थात् केशाकर्षणास अशा स्थितींत नांव मिळत नाहीं. म्हणून शोषककेसांत पाणी शिरण्यास केशाकर्षण कारणीभूत होत नाहीं असें आतां सर्वसंमत व सिद्ध झालें आहे.

शोषक केंसांची उपयुक्तता :- मुळया जमीनींत घुसतांना त्यांनां सर्वच जमीनी मऊ व भुसभुसीत आढळतात असें नाहीं. कित्येक ठिकाणीं जमीन फारच टणक व कठिण असते. अशा स्थितींत मुळयांनां क्षारशोषक करणें तसेंच जमीनींत खोलवर घुसत जाणें मोठें कठीण जातें. परंतु हें काम शोषककेंसांमुळें फार सुलभ होतें. जमीन कितीहि कठिण असली तरी शोषक केंसांच्या शोषण शक्तीपुढें टीकाव धरूं शकत नाहीं. जेव्हां शोषककेसांतील पेशिरसांत व जमिनींतील क्षारयुक्त पाण्यांत अन्योन्य रसाकर्षण सुरू होतें; तैव्हां जलस्थानांतून सूक्ष्मप्रमाणांतून कर्बाम्ल बाहेर येतें. पाण्यांत न विरणा-या पदार्थास हया आंतून बाहेर येणा-या आम्लामुळें द्रवता उत्पन्न होऊन ते पदार्थ पाण्यांत विरतात व अन्योन्य रसाकर्शण-क्रियेंत ते पाण्याबरोबर जलस्थानांत शिरूं शकतात. खरोखर कठिण जमीनींतील क्षार विरविण्याकरितां हें आम्ल बाहेर येणें आवश्य असतें. हया रितीनें हे आम्ल निरूपयोगी न होतां उलट जमिनींतील क्षार विरविण्याकरितां हें आम्ल बाहेर येणें आवश्य असतें. हया रीतीनें हें आम्ल निरूप्योगी न होतां उलट जमिनींतील कठिण पदार्थास विरवून सोडण्यास त्याचा उपयोग होतो. हयाप्रमाणें त्या कठिण पदार्थावर शोषक केंसाची विद्रावक क्रिया सुरू झाली म्हणजे हळू हळू त्यांचें काठिण्य नाहींसें होत जातें. जरी जमिनींत पोषण कार्यास उपयोगी पडण्यासारखें पुष्कळ अन्नक्षार असतात. तथापि ते विरल्याशिवाय वनस्पतिशरीरांत जाणें शक्य नाहीं. म्हणून असे पदार्थ शोषणापूर्वी विरविले जाणें आवश्य आहे. विरविण्यास अम्ल पाहिजे. अर्थात् जलस्थानांतून कित्येक वेळां अन्योन्यरसाकर्शधक्रियेंत जें अम्ल बाहेर येतें, त्याचा उपयोग अशा वेळीं फार होतो. ही नैसर्गिक व्यवस्था नसती. तर जमिनींत उपयोगी पडण्यासारखे अन्नक्षार असूनहि त्यांचा उपयोग वनस्पति पोषणास कांहींहि झाला नसता. हया दृष्टीनें विचार केल्यास शोषक-केंसांची उपयुक्तात जीवनकार्यांत किती मोठी असते हें कळण्यासारखें आहे. सर्वच ठिकाणीं जलस्थानांतून अन्योन्य रसाकर्षण - क्रियेंत अशी आम्लें बाहेर येतात असें नाहीं. बाह्य परिस्थितीप्रमाणें क्षार विरविण्यास अम्ल बाहेर जाण्याची योजना जीवरसाकडून होते. कांहीं लोकांचा समज असा आहे कीं, प्रत्यक्ष अम्ल शरीरांतून बाहयांगीं येत नाहीं. पण सचेतन पेशींत श्र्वासोच्छावासक्रिया नेहमीं चालू असल्यानें जो कर्बाम्ल वायु बाहेर येतो, त्याचा पाण्याशीं  संबंध होऊन कर्बाम्ल रस तयार होतो व हा रस क्षार विरविण्यास उपयोगी पडतो. कसेंहि असलें तरी जमिनींतील कठिण क्षारावर हया आम्लाचा रासायनिक परिणाम होऊन ते विरतात व पुढें त्यांचा शिरकाव शरीरांत होऊन पोषणकार्यांत त्यांचा मोठा उपयोग होतो.

मूलजन्य शक्ति अथवा दाब :- अन्योन्य रसाकर्षण क्रियेनें जमिनींतून पाणी शोषिलें जाऊन जसें जसें तें जलस्थानांत साठूं लागतें तसतसा त्या पाण्याचा ताण पेशिभित्तिकेवर बसू लागतो. एक पेशीं पाण्यानें ताणली गेल्यावर त्याच प्रकारची स्थिति दुस-या पेशींत उत्पन्न होते. कारण त्या पेशींत व पहिल्या पेशींत अन्योन्य रसाकर्शण-क्रिया सुरू होऊन पहिल्या पेशींतून दुस-या पेशींत पाणी जमा होत गेल्यानें तेथील पेशिभित्तिकेवर पहिल्यासारखा ताण बसतो. एवढया वेळांत पुन: जमिनींतून नवीन पाणी पहिल्या पेशींत येतें. अशा रीतीनें पहिल्या पेशीपासून दुसरींत दुसरीपासून तिसरींत, तिसरीपासून चवथींत ती क्रिया, सुरू होऊन सर्व पेशींत पाणी भरलें जाऊन त्या ताणूं लागतात. याप्रमाणें ही तणावाची स्थिति मुळयांच्या सालींतील   (कॉटॅक्स)   प्रत्येक पेशींत उत्पन्न होतें. हया तणावांच्या संकलित परिणामामुळें तेथें एक विशिष्ट शक्ति उत्पन्न होते. ही मुळयांतील पेशींच्या तणावानें उत्पन्न होते म्हणून तिला 'मूलजन्यशक्ति' असें म्हणतात.

स्तंभासभोवतीं सालींचें वेष्ठन असल्याकारणानें त्या तणावजन्य शक्तीचा परिणाम स्तंभावरसुद्धां होतो. स्तंभांतील कष्टवाहिन्यांत हया तणावानें पेशिरसाचा उछ्वास होऊन सालींतील तणाव कमी होतो. परंतु पुन: नवीन पाणी तेथें जमून पुन: पूर्वीसारखा ताण उत्पन्न होतो. याप्रमाणें नवीन पाणी वरचेवर शोषिलें जाऊन त्या उच्छ्वास काष्ट वाहिन्यांत होऊन पाण्याची परंपरा एकसारखी कायम रहाते. ही मूलजन्यशक्ति म्हणजे शोषिल्या जाणा-या जाणा-या पाण्यामुळें उत्तेजित झालेल्या जीवरसाकडून मिळणारें एक प्रकारचें प्रत्त्युत्तर होय. हया शक्तीनें मूळांतून खेडांत व खोडांतून पानापर्यंत पेशिरस चढण्यास मदत होते.

मूलजन्यशक्तीचे चमत्कार :- कधीं कधीं कडू लिंब आपोआप फांटून त्यांतून पेशिरस वाहूं लागतो. पेशिरस अशा रीतीनें वाहण्यामुळें झाडाची खराबी होते. त्याचा परिणाम त्या झाडाच्या पोषणकार्यावर होऊन झाड वाळून जाण्याचा संभव असतो. झाड फांटून पेशीरस वाहूं लागणें हा मूलजन्यशक्तीचा एक चमत्कार आहे. पानांच्या अग्रांतून दवासारखे रस- बिंदू सकाळीं आलेले आढळतात. हयाचें कारण सुद्धां मूलजन्यशक्तीच होय. रात्रीं पानांतून बाष्पोच्छवास् होत नसल्याकारणानें पानाच्या अग्रांत आलेल्या पाण्याचा ताण अधिक होऊन कित्येक वेळां अग्राकडील पेशिभित्तिका फांटून जाते व खालून वर जाणारा पाण्याचा प्रवाह बाहेर गळून वाहूं लागतो. परंतु बाष्पोच्छ्वास सुरू असतां अशा प्रकारें पाणी वहाण्याचा संभव फार कमी असतो. कारण त्या स्थितींत पेशिभित्तिकेवर तणाव उत्पन्न होत नाहीं म्हणून ती फांटण्याची भीतीहि कमी असते. विनाकारण पेशिरस वाया जाणें हें एकंदरींत नुकसानकारक असतें. पेशिरसांत सेंद्रिय व निरिद्रिंय द्रव्यें असतात. असा पेशिरस जमविण्यास झाडाची शक्ति किती तरी खर्च झाली असते. परंतु जर तो पेशिरस जीवन-कार्यांत उपयोगी न पडतां केवळ बाहेर गळून जाईल तर झाडांचें नुकसान फार होईल.

कांहीं वेळां अशा बाहेर गळणा-या पेशिरसांतून निरूपयोगी पदार्थाचें विसर्जन होतें. पण त्याबरोबर पुष्कळ पोषणोपयोगीं पदार्थ गळल्यानें तोटा होतो. केवळ त्याज्य पदार्थ नाहीसें झाले असते तर फायदा झाला असता पण अशी स्थिति क्वचितच असते.

बाष्पोत्सर्जन अथवा बाष्पोच्छवास् :- जलस्थानांत अधिकाधिक पाणी जसजसें शोषिलें जाईल तसतसा त्या पाण्याचा उपसा होत जाणेंहि आवश्य आहे. पूर्व पाण्याचा उपसा होत गेल्याखेरीज नवीन पाणी शोषिलें जाणें शक्य नाहीं. नवीन पाणी वरचेवर आल्याखेरीज पोषणोपयोगी आवश्य क्षार शरीरांत कसे येत जाणार? शोषिल्या जाणा-या पाण्यांतील क्षारांचें प्रमाण फारच सूक्ष्म असतें. अशा स्थितींत जितकें पाणी वरचेवर शोषिलें जाईल तितक्या प्रमाणांत पौष्टिक क्षार शरीरांत येण्याचा संभव आहे. पाणी एकसारखें शरीरांत येत गेलें तर तें सगळें तेथें मावणें शक्य नाहीं. म्हणून पाण्याचा उपसा बाहेर होत जाणें अवश्य असतें. सूर्यप्रकाशांत शरीरांतील पाण्याची वाफ होऊन ती वाफ हवेंत मिसळते व त्यायोगें पाण्याचा उपसा होत गेल्यानें नवीन पाणी शिरण्यास मार्ग मोकळा होतो व त्याबरोबर आवश्य क्षारांचेंहि शोषण होतें. पेशिरसाच्या बाष्पीभवनास 'बाष्पोत्सर्जन' अथवा 'बाष्पोच्छ्वास' म्हणतात.

साध्या पाण्याचा बाष्पोच्छ्वास व पेशिरसाचा बाष्पोच्छ्वास हया दोहोंमध्यें फार फरक असतो. उष्णतेच्या कमी अधिक मानाप्रमाणें अथवा वा-याच्या कमी अधिक जोराप्रमाणें साध्या बाष्पोच्छ्वासांत पाण्याची वाफ होऊन हवेंत मिळते. ही क्रिया केवळ प्राकृतिक आहे. परंतु पेशिरसाच्या बाष्पोच्छ्वासांत वेगळा प्रकार आढळतो. पेशिरसाची वाफ होणें अथवा ती अमुक एक विशिष्ट प्रमाणांत होणें ही गोष्ट केवळ उष्णतेवर अवलंबून नसते. पेशि-रसाची वाफ होऊन हवेंत मिसळणें व त्यामुळें नवीन प्राणी शोषण्यास मदत होणें अथवा अन्न -क्षारादि पदार्थ शोषिले जाणें वगैरे गोष्टी केवळ जड स्वरूपाच्या नसून त्या शरीरांतील जीवनपिंडांच्या जीवनात्मक रासायनिक घडामोडीप्रमाणे होत असतात. परिस्थितीप्रमाणें पेशिरसाची वाफ कमी अधिक होऊं देणें अथवा ती अजिबात बंद करणें, तसेंच ती बाहेर जाण्याचा मार्ग खुला ठेवणें अथवा न ठेवणें वगैरे कार्ये जीवनपिंडाच्या उत्तेजनकार्यावर अवलंबून असतात. म्हणूनच साधें बाष्पीभवन व वनस्पति-शरीरांत होणारा बाष्पोच्छ्वास हया दोन्ही कार्यांत मोठा भेद असतो. एक कार्य केवळ जड तर दुसरें जीवनात्मक आहे.

बाष्पोत्सर्जनाचे  फायदे :-पेशिरसाचा बाष्परूपी उच्छ्वास झाल्यानें नवीन पाणी शरीरांत शिरण्यास एक प्रकारचें उत्तेजन मिळतें व त्याबरोबर अन्न-क्षारांचें शोषण होतें. अशा ठिकाणीं पेशिरसास बाष्परूप देण्याची काय जरूरी आहे, तर बाष्परूपानें केवळ पाणी नाहींसें होऊन निरिद्रिय अन्न-क्षार शरीरांत शिल्लक राहतात. हया रीतीनें अन्नक्षार शरीरांत राखून पाण्याची तेवढी बाष्परूपानें विल्हेवाट लागते.

बाष्पोच्छ्वासानें शरीरांतील उष्णता विशिष्ट अंशापेक्षां अधिक वाढत नाहीं. सूर्यप्रकाशांत पानें, फांद्या, खोड वगैरे भाग एकसारखे तळपत राहिल्यानें त्यांच्या शरीरांतील उष्णतेचें प्रमाण फारच वाढलें असतें. पण वस्तुस्थिति उलट आढळते. बाष्पोच्छ्वास-क्रियेंत पुष्कळशी उष्णता खर्च होऊन फाजील उष्णतेचा अपायकारक परिणाम टाळिला जातो. नाहीं तर त्या उष्णतेनें शरीरांतील नाजूक जीवनपिंडादि पदार्थ मृत होऊन सर्व जीवनकार्ये बंद पडलीं असतीं. यद्यपि सूर्यप्रकाशरूपी कांहीं शक्ति सेंद्रियपदार्थोत्पत्तींत खर्च होते तथापि उरलेल्या उष्णतेचा परिणामहि जीवनपिंडावर अपायकारक झाल्याशिवाय राहिला नसता. पण बाष्पोच्छ्वासांत ती उरलेली उष्णता खर्च होऊन आपोआप तो अपायकारक परिणाम टाळिला जातो. हया दृष्टीनें विचार केल्यास बाष्पोच्छ्वासानें एक मोठीच कामगिरी साधते हयांत संशय नाहीं.

बाष्पोच्छ्वास व त्वग्रंध्र :- पेशिरसाची वाफ झाल्यावर ती 'त्वग्-रंध्र' नांवाच्या विशिष्ट छिद्रांतून शरीराबाहेर जाते. त्वग्-रंध्रांची योजना केवळ बाष्पोच्छ्वासाठीं असते असें म्हणतां येणार नाहीं. त्वग्-रंध्राचा उपयोग, शर्करादि सेंद्रियपदार्थोत्पत्तीस आवश्य असणारा कर्बाम्ल वायु शरीरांत शोषणें अथवा आंतून आक्सिजन वायू बाहेर सोडणें, त्याचप्रमाणें श्र्वासोच्छवास-क्रियेंतील वायूच्या फेरबदलास वाव देणें वगैरे गोष्टींकडे होतो. हया गोष्टींबरोबर बाष्पोच्छ्वास कार्यासहि त्यांतून वाट मिळते. पेशिरसाची वाफ झाल्यावर प्रथम ती पेशिमध्यें पोकळयांत अथवा वात्-स्थानांत जमते. सर्व वातस्थानांचा परस्पर संबंध असून त्यांचीं बाह्य अंगें म्हणजे त्वग्-रंध्रें होत. अर्थात वातस्थानांत जमणारी वाफ हया त्वग्-रंध्रांतून पडते. त्वग्-रंध्र उघडणें अथवा बंद होणें हें त्वग्-रंध्राजवळील रक्षकपेशींच्या कमी अधिक तणावावर अवलंबून असतें.  जेव्हां रक्षकपेशींतील पेशिरसामुळें पेशिभित्तिकां तणाणूं लागते त्यावेळी त्वग्-रंध्र अधिक उघडें अथवा विस्तृत होतें. रक्षकपेशीच्या भित्तिकेची रंध्राकडील बाजू अधिक जाड असल्यानें तणावाचा परिणाम त्या बाजूवर फारसा होत नाहीं. उलट दुस-या बाजूची भित्तिका पातळ असल्याकारणानें त्यावर तणावाचा जोर पडून ती अधिकच ताणली जाते. हया स्थितींत दुसरी बाजू तणावाकडे कलल्यामुळें रक्षकपेशिद्वयांतील त्वग्-रंध्र अधिक खुलें होतें व त्यांतून आंतील अंगास असणा-या वातस्थानांतील वाफेस बाहेर पडण्यास आपोआप मार्ग खुला होतो. जर रक्षकपेशिद्वयांत तणाव उत्पन्न होणार नाहीं तर तिच्या दोन्ही बाजू सारख्या ढिल्या राहून त्यांतील त्वग्-रंध्र जवळ जवळ बंद राहील.

त्वग्-रंध्रांत बाहेरून वायू आंत शिरतो म्हणून तें उघडतें असें नाहीं. केवळ बाह्यत्वचेच्या रक्षकपेशीच्या कमी अधिक तणावाप्रमाणें त्वग्-रंध्र विस्तृत अथवा संकुचित होतें. कमी अधिक संकोचाप्रमाणें अथवा विकासाप्रमाणें बाहेरून वायुशोषिण्यास सुद्धां अडथळा होतो व त्यायोगें कारबनकर्बविपाक अथवा संस्थापन किंवा श्र्वासोश्र्वास हयासारख्या जीवनकार्यांत अडथळा उत्पन्न होत असतांनां सुद्धां बाष्पोच्छ्वासास सोय व्हावी म्हणून त्वग्-रंध्रें बंद अगर उघडी ठेवलीं जातात. हयावरूनच जीवनकार्यांतील बाष्पोच्छ्वासाचें महत्त्व लक्षांत येण्यासारखें आहे. प्रकाशामुळें त्वग्-रंध्र उघडें रहाण्यास अप्रत्यक्षरीतीनें एक प्रकारचें उत्तेजन मिळतें. कारण रात्रीं तसेंच दिवसां शोषण-कार्य मुळाकडून चालू असतें व त्याप्रमाणें रक्षकपेशींत तणाव उत्पन्न होऊन रात्रींसुद्धां त्वग्-रंध्र उघडें राहिलें पाहिजे. पण रात्रीं त्वग्-रंध्रें उघडीं असत नाहींत. दिवसां रक्षकपेशींतील जीवनपिंड  प्रकाशनें उत्तेजित होऊन ते अधिक पाणी शोषून घेतात व त्यायोगें पेशींत अधिक ताण उत्पन्न होऊन त्वग्-रंध्रें खुली होण्यास मदत होते. रात्रीं प्रकाशाचा अभाव असल्यानें जीवनपिंडांस प्रकाशाचें विशिष्ट उत्तेजन मिळत नाहीं व त्याचा परिणाम रात्रीं रक्षकपेशींत कमी शोषण होऊन ताणहि दिवसासारखा उत्पन्न होत नाहीं. अर्थांत अशा स्थितींत त्वग्-रंध्रें खुलीं राहणें शक्य नसतें. म्हणजे प्रकाशाचा अप्रत्यक्ष उपयोग तीं खुलीं राखण्यास होतो.

पानाच्या वरील बाजूपेक्षां खालील बाजूवर हजारों त्वग्-रंध्रें असतात म्हणून त्या बाजूंतून बाष्पोच्छ्वास अधिक होतो हें निराळें हे सांगण्याची जरूरी नाहीं.

बाष्पोत्सर्जन व परिस्थिति :- बाष्पोत्सर्जन परिस्थिती प्रमाणें कमी अधिक जोरानें चालतें. हवेंत उष्णतेचें प्रमाण अधिक झालें असतां बाष्पोत्सर्जन अधिक होतें पण उलट तेंच प्रमाण कमी झालें किंवा हवा थंड झाली तर त्याचा परिणाम बाष्पोत्सर्जनावर होतो. दमट हवेपेक्षां कोरडया हवेंत तें अधिक होतें. कोरडया हवेप्रमाणेंच सोसाटयाचा वारा सुटला असतां बाष्पोत्सर्जन अधिक होऊन पानें गळल्यासारखी होतात. कोरडया हवेंत जरी बाष्पोत्सर्जन अधिक होतें, तथापि कोरडया जमीनींतील रोपटयांतून तें कमी होतें. हयाचप्रमाणें सर्द जमीन व सर्द हवा हया दोन्ही स्थितींत बाष्पोत्सर्जन अगदीं उलटरीतीनें चालतें. जेव्हां जमिनींत पाणी पुष्कळ असतें अशा वेळीं मुळांकडून अधिक पाणी शोषिलें जाते; व अर्थात् त्या प्रमाणांत बाष्पोत्सर्जन अधिक होतें. पण उलट जमीनींत पाणी असलें तर कमी पाणी शोषिलें जाऊन बाष्पोत्सर्जन कमी होतें. तसेंच जमीनींतील विशिष्ट क्षारावरसुद्धां बाष्पोत्सर्जन कांहीं अंशीं अवलंबून असतें. प्रखर प्रकाशांत बाष्पोत्सर्जन अधिक होंऊ लागतें. अशा स्थितींत बाष्पोत्सर्जनांत खर्च होण्या-या पाण्यापेक्षां कमी पाणी मुळयाकडून शोषिलें जाईल तर त्याचा वाईट परिणाम वनस्पतीस भोगावा लागतो. हा वाईट परिणाम टाळावा म्हणून जीवनपिंडास बाष्पोत्सर्जन बंद करण्याची सोय करणें भाग पडतें. कोंवळया पानावर एक प्रकारचे संरक्षक आवरण उत्पन्न करून बाष्पोत्सर्जन कमी केलें जातें.

आवरणामुळें प्रकाशाची आंच आंत कमी पोहोंचते म्हणून पेशिरसाची वाफसुद्धां त्या प्रमाणांत कमी होते. कित्येक वेळां मेणासारख्या पदार्थाचा लेप पानावर तयार केला जातो. मेण हा पदार्थ उष्णतावाहक नसल्यामुळें प्रकाशाची उष्णता आंतील भागात शिरत नाहीं, व त्यामुळें पेशिरसाची वाफ कमी होते. कित्येक वेळां कडक प्रकाशानें जीवनपिंड उत्तेजित होऊन प्रकाशांत सुद्धां त्वग्-रंध्रें बंद करतात. कांहीं ठिकाणीं त्वग्-रंध्रांजवळ शेंकडों केंस उत्पन्न होऊन वाफ बाहेर जाण्याचे मार्ग बंद होतात. कांहीं ठिकाणीं पानावर दाट केंस वाढून पानास पोहोंचणारी उष्णता कमी केली जाते. ज्या ठिकाणीं पाणी फार कमी पडतें पण प्रकाश कडक  पडतो अशा ठिकाणीं उत्पन्न होणा-या वनस्पतींच्या पानाचा आकार फार लहान केला जातो. पानांचा आकार लहान झाल्यामुळें तितक्या प्रमाणांत बाष्पोत्सर्जन कमी होतें. कांहीं पानें कांटयांसारखीं संकुचित व अनुकुचिदार होतात. त्यामुळें बाष्पोत्सर्जन फार कमी होतें. कडक उन्हाळा फार दिवस टिकला असतां वनस्पतींतून फाजील बाष्पोत्सर्जन होण्याची भीति असते. अशा स्थितींत बाष्पोत्सर्जनाची साधनें जीं पानें, तींच अजीबात गाळून तें कमी केलें जातें. पानें गळल्यानें शर्करादि पदार्थोत्पत्तीस अडथळा येतो तथापि फाजील बाष्पोत्सर्जनानें सुकून जाण्याच्या ऐवजीं किंचितकाल जीवनपिंड संकुचित व सुप्त स्थितींत ठेवणें बरें.

एक मृत व एक सजीव अशा दोन सारख्या आकाराच्या पानांतून बाष्पोत्सर्जन कसें होतें हयाचें परीक्षण केल्यास असें आढळून येईल कीं मृत पानांतून बाष्पोत्सर्जन अधिक जोरानें होतें. हयाचें कारण त्यांत बाष्पोत्सर्जन कमी अधिक करणारे जीवनपिंड असत नाहींत. पण सजीव पानांत जीवनपिंड असल्यानें पाण्याच्या पुरवठयाप्रमाणें अथवा इतर परिस्थितीप्रमाणें बाष्पोत्सर्जन कमी अधिक होत असतें.

पेशिरसाचा उत्प्रवाह :- मोठमोठया दोन दोनशें फूट उंच वाढणा-या वृक्षांच्या शेंडयाकडे असणा-या फांद्यांत अथवा पानांत मुळाकडून शोषिलें जाणारें पाणी कसें पोहोचतें हा मोठा प्रश्न आहे. हयाविषयीं निरनिराळया शास्त्रज्ञांचीं मतें वेगवेगळीं आहेत. 'झाडांत पाणी कसें वर चढतें,' हा प्रश्न अजून जसा सुटावा तसा सुटलेला नाहीं. बाह्य हवेच्या विशिष्ट दाबामुळें अगर वजनामुळें मुळयांमध्यें पाणी वर चढतें असें कांहींचें मत आहे. परंतु पदार्थविज्ञान-शास्त्रांत ठरविलेली हवेच्या दाबाची किमान मर्यादा तीस फुटांपेक्षां अधिक नाहीं. अर्थात् दोन दोनशें फूट पाणी वर चढणें केवळ हवेच्या दाबामुळें वनस्पति-शरीरांत घडून येतें हें सर्वांना पटत नाहीं. कांहींच्या मतानें केशाकर्षण-क्रियेनें वाहिनींतून पाणी वर चढत असावें परंतु वाहिनींची परंपरा मुळापासून शेंडयापर्यंत सारखी नसते. शिवाय कांहीं विशिष्ट मर्यादेपलीकडे केशाकर्षण क्रियेचा प्रभाव चालत नाहीं. म्हणून इतक्या लांबवर पाणी चढण्यास केशाकर्षण कारणीभूत होत असेल असें संभवत नाहीं. केवळ अन्योन्य –रसाकर्षण-क्रियेनें पाणी इतक्या दूरवर पसरत असेल अशी कल्पना केली, तर ती क्रिया फार सावकास होणारी असते व अशा स्थितींत त्या क्रियेनें इतकें पाणी मुळांतून शेंडयापर्यंत अव्याहतपणें इतक्या लवकर होणें कठिण दिसतें. तसेंच अन्योन्य-रसाकर्षण -क्रियेस चालन देणारे भिन्न घनतेंत विरलेले पदार्थ अमूक एक ठाम प्रमाणांत चोहोंकडे पसरलेले आहेत असें कांहीं सांगवत नाहीं. मूलजन्यशक्तीनें पाणी नेहमींच चढत असेल असेंहि गृहित धरतां येत नाहीं. कारण जेव्हां वातोत्सर्जन-क्रिया जोरांत चालूं असते अशा वेळीं मूलजन्यशक्ति अगदीं सूक्ष्म स्थितींत असते. डिक्सन, जॉली, अस्कनसी वगैरे शास्त्रज्ञांच्या मतानें मुळांतून पाणी वर खेचिलें जाण्यास पानांतील बाष्पोत्सर्जन पुरेसें आहे. पानांतील बाह्यांगाकडे असणा-या पेशांतील पेशिरसाची प्रकाशाच्या उष्णतेनें वाफ होऊन ती पानांतील वातस्थानांत जमूं लागतें. अशा वेळीं तेथील पेशीरस घन होऊ लागतो. पण हयाच वेळीं इतर पेशींतील पेशिरस घन असत नाहीं अर्थात् त्या दोन्ही पेशिरसांत अन्योन्य-रसाकर्शण सुरू होतें व खालून पेशिरस वर चढूं लागतो. हीच परंपरा खालीं जमीनींत असणा-या मुळयापर्यंत पोहोंचते व त्या सर्वांतून पेशिरस हयाच रीतीनें वर चढतो. ही विचार सरणीं एकंदरींत बरी दिसतें. पण जसें जसें बाष्पोत्सर्जनानें एकीकडून पाणी नाहीसें होईल त्याप्रमाणें खालून अन्योन्य-रसाकर्शण क्रिया चालू असली पाहिजे. नेहमीं ही क्रिया फारच सावकाशरीतीनें होते. अर्थात् इतक्या जलद पाण्याचा एकसारखा प्रवाह ह्याच एका क्रियेंनें चालू राहील असें कधींहि म्हणवत नाहीं. कित्येक वेळां बाष्पोत्सर्जन-क्रिया चालूं नसतांनासुद्धां पाणी खालून वर चढत असतें. अशा स्थितींत बाष्पोत्सर्जनानेंच पाणी वर चढतें ही उपपत्ति कशी टिकणार? कित्येक जागीं अन्योन्यरसाकर्षण-क्रिया एका विशिष्ट दिशेनें होण्यासारखी स्थिति असून सुद्धां प्रवाह उलटा जातो. एकंदरींत अमुक एक विशिष्ट क्रियेनें पाणी वर चढतें हें निश्र्चित सांगतां येत नाहीं कांहींनी केवळ सचेतन पेशींकडून हे कार्य केलें जातें असें प्रतिपादिलें पण स्टॉसबरनें हयाविषयीं प्रयोग केला. त्यानें कांहीं कलमें मोरचुदाच्या पाण्यांत ठेवून त्यांचा त्यावर कसा काय परिणाम होतो हें पाहिलें. मोरचुदाचा अंश पानापर्यंत येऊन पोहोंचलेला त्याला आढळून आला. तो वर येतांना मध्यंतरीं असणा-या सर्व पेशी मृत झाल्या हयावरून त्यानें अनुमान बसविलें कीं सचेतन पेशींकडूनच पाणी वर चढविलें जातें असें नाही. हयाचप्रमाणें मुळयांवर आधणाचें पाणी ओतून त्यांतील पेशी मारून टाकिल्या तथापि  सुद्धां पानांतून बाष्पोत्सर्जन एकदां सुरू झालें म्हणजे मागाहून सचेतन पेशींची हया कार्यांत फारशी जरूरी नाहीं. डॉ. बोस यांनीं हयासंबंधी एक निराळीच उपपत्ति दिली आहे. सचेतन पेशींच्या जीवनक्रियेनेंच पाणी मुळयांतून शेंडयापर्यंत चढत जातें असें त्यांचें म्हणणे आहे. मात्र घडामोडी निरनिराळया उत्तेजनापासून उत्पन्न होतात. जमीनीशीं मुळयांचा संबंध येणें तसेंच त्या जमीनींत घुसतांना त्यांच्या वाढत्या भागाची घासून झीज होणें अथवा शोषक-केंसाकडून अन्योन्यरसाकर्शणक्रियेनें पाणी शोषून घेतल्यावर पेशींत ताण उत्पन्न होणें किंवा जमीनींत वेगवेगळे रासायनिक क्षार असणें पुरें होतें असें नाहीं. तर निरनिराळया उत्तेजनांच्या संकलित परिणामामुळें पेशिरस वर चढतो. वनस्पति-शरीरांत उत्तेजन ग्रहण करणारीं पेशिजालें सर्व जागीं असतात. त्यांनां एकदां आरंभीं उत्तेजन मिळालें म्हणजे तें पुढें एका पेशिजलापासून दुस-यास व दुस-यापासून तिस-यास पोहोंचत जातें. उत्तेजनाप्रमाणें पेशिरसाचा प्रवाह एका पेशिजलापासून दुस-यांत चालू होतो.


एका पेशीस उत्तेजन मिळाल्यावर त्यांतील जलस्थानाचा संकोच होऊन पेशिरस दुस-यांत जातो. परंतु पुन्हां त्याच वेळीं पहिल्या पेशींस उत्तेजन मिळून पूर्वीसारखाच संकोच उत्पन्न होतो. अर्थात् त्याबरोबर पेशिरस पुन: दुसरीकडे जातो. याप्रमाणें सारख्या वेळेच्या अंतरानें एकसारखीं उत्तेजनें पहिल्या पेशीस मिळतात व त्याप्रमाणें प्रवाह सारखा पुढें जातों. जसे ह्दयांत सारख्या वेळेच्या अंतरानें सारखे धक्के मिळत गेल्यामुळें रक्ताचा प्रवाह दूरदूर पसरतो.  त्याच प्रमाणें मुळयांमध्ये अग्राकाडील भागांतील उत्तेजनजन्य संकोचधक्क्यानें पेशिरस खालून शेंडयाकडे चढत जातो.  उत्तेजनजन्य-संकोच खालून वर अधिक लवकर होतो.  म्हणजे उत्तेजनजन्य संकोचानें पेशिरसांचा प्रवाह खालून वर अधिक झपाट्यानें जाऊं शकतो.  जर कांही कारणानें मुळयांच्या अग्रास उत्तेजन मिळण्याऐवजी वर पानाकडे मिळूं लागलें तर संकोचाची दिशा वरुन खालीं होईल पण प्रयोगानें असे सिध्द झाले आहे की वरुन खालीं येणारा संकोच-जन्य-प्रवाह सावकाश चालतो.  त्यांत खालून वर जाण्यांत दिसणारी त्वरा आढळत नाही.  पेशिरसाचा प्रवाह व उत्तेजनाची दिशा ह्या दोहोंचा फार निकट संबंध आहे.  वाहिन्यांतून पेशिरसाचे प्रवाह तसेंच उत्तेजनांचा प्रवाह हे सारख्याच झपाट्यानें चालतात.  प्रवाहास आडव्यापेक्षां लंब दिशा अधिक सोयीची असते.  जरी आरंभी उत्तेजनजन्य-संकोचानें पेशिरसास चालन मिळतें, तथापि बाष्पोत्सर्जन, अन्यान्यरसाकर्षण, मूलजन्यशक्तीचा ताण वगैरे गोष्टींनी ते चालन अधिक जोरानें चालूं होते.  शरीरांतील सर्वच अचेतन पेशींत जीवन घडामोडी सारख्या जोरानें होत असतात असें नाही.  म्हणून जेथें जेथें अधिक कार्यशील पेशी असतील तेथें अधिक जोरानें उत्तेजनजन्य संकोच उत्पन्न होऊन पेशिरस पुढें पुढें ढकलिला जातो.  पशिरसाच्या उत्प्रवाहासंबंधीं ही डाकटर साहेबांची उपपत्ति अधिक सयुक्तिक दिसते.    

अन्नक्षार – वनस्पतीचीं अन्न-द्रव्यें व निरिंद्रिय अशीं दोन प्रकारची असतात.  निरिंद्रिय क्षार जमीनीतून शोषिले जातात व सेंद्रिय अन्न शरीरांत तयार केलें जातें.  जमीनींत नाना प्रकारचे क्षार पाण्यांत विरणारे असतात म्हणून ते त्या जमीनींत उगवणा-या वनस्पतीमध्यें असतातच असें नाही.  अल्युमिनीयम धातुचे क्षार बहुतेक जमीनीत असतात पण पुष्कळ वनस्पतींत त्यांचा अंशसुद्धां आढळत नाहीं.  समुद्राच्या पाण्यांत आयोडिनचा अंश फारच थोडा असतो परंतु समुद्रशैवालांत त्या क्षारांचे प्रमाण पुष्कळ सांपडतें.  ह्यावरुन अवश्य क्षारांचें शोषण करुन ते क्षार जलस्थानांत वनस्पती सांठवितात.  व्यक्ती तितक्या प्रकृती अशा स्थिती असल्यामुळें वनस्पतींच्या क्षारशोषणांत भिन्नता आढळते.  एकाच जमीनींत उगवणा-या एकाच जातीच्या वनस्पतींमध्ये सर्व निरिंद्रिय क्षार सारख्याच प्रमाणांत शोषिले जातात असें नाही.  क्षार-शोषण प्रत्येक वनस्पतींच्या जीवन-व्यापारावर अवलंबून असतें.

क्लोरीन (इर), गंधक, फास्फरस (स्फुर), सिकेला (सिकत), पोटॅशियम  (पालश), सोडियम् (सिंधु), कॅलशियम् (खट), मॅग्रेशियम् (मग्न), लोह, मॅगनीझ् (मंगलिक), वगैरे धातूंचे खार थोड्याफार प्रमाणांत पुष्कळ वनस्पतींत आढळतात.  ह्या सर्व क्षारांचा उपयोग सारखा होतो असें नाहीं. ल्युकन्य नांवाच्या शास्त्रज्ञाने वनस्पतीस कोणत्या क्षारांची अवश्यकता आहे.  हें सप्रयोग कांही वनस्पतीविषयीं ठरविलें.  इतरांनीहि प्रयोग करुन कांही विशिष्ट क्षारांची अवश्यकता सिद्ध केली.  सर्वसाधारण रीतींने प्रत्येक वनस्पतीस नायट्रोजनक्षार, गंधकक्षार फॉस्परिकक्षार तसेंच पोट्शियशियम् क्यलशियम् व लोह ह्या धातूंच्या क्षारांची अत्यंत अवश्यकता आहे असें सर्वमान्य सिद्ध झालें आहे.

पोटँशियम् क्षारामुळें वनस्पतीस चांगली पुष्टता मिळून फुलें व फळें येतात असा अनुभव आहे.  जर जमीनींत पोटॅशियम् धातूचा अभाव असता तर त्या ठिकाणच्या वनस्पती सुकूं लागतात व त्यांस फुलें येत नाहींत.  पोटेशियम क्षारानें सेंद्रिय पदार्थांच्या उत्पत्तीस चालन मिळतें व सेंद्रिय पदार्थ बनत गेल्यावर शरीरास पुष्टी मिळते.

मॅग्नेशियम् धातूच्या क्षाराचा उपयोग पोटॅशियम क्षाराप्रमाणेंच नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ बनविण्यास होतो.  हरित् द्रव्याच्या घटकपदार्थांत मॅग्नेशियम क्षार आढळतो.  हरितद्रव्याचा उपयोग कर्बनसंस्थापनक्रियेस फारच मोठा होतो. अर्थात् मॅग्नेशियम क्षाराचेंहि महत्व तितकेंच अधिक आहे. 

कॅलशियम् क्षाराचा उपयोग संरक्षक असतों.  नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ उत्पन्न करण्यास ह्याचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही.  वाढत्या कोंबांत कॅलशियम् क्षाराचें नांवहि आढळत नाही.  परंतु त्याच जागीं पोटॅशियम् किंवा मॅग्नेशियम क्षार आढळतात.  म्हणून जीवरसाच्या वाढीस ह्या क्षारांची अवश्यकता नसते.  परंतु शरीरांत उत्पन्न होणा-या आक्सेंलिक अम्लासारख्या विषारी अम्लांचा विघातक परिणाम नाहींसा करण्यास क्यालशियम् क्षाराचा उपयोग होते.  स्किंपर व पेफर ह्या शास्त्रज्ञ-द्वांनी क्यालशियम् क्षाराविषयीं पुष्कळ शोध केले आहेत.  ह्या क्षाराच्या अभावानें पानावर पिंवळट रंगाचे चट्टे उत्पन्न होतात व ती पानें सेंद्रिय पदार्थोत्पत्तीस निरुपयोगी होतात.  अर्थात् ह्या क्षाराचा उपयोग संरक्षकच आहे असें म्हणणें भाग पडतें. 

लोहक्षारानें जीवनपिंडांत हरित्-दव्य उत्पन्न होतें.  हरित्-जीवनपिंडांत लोहक्षारांचें प्रत्यक्ष अस्तित्व असत नाही.  तथापि त्या क्षाराचा अभाव जमीनींत झाली की तेथींल पानें पिवळीं होऊन लागतात.  जीवनपिंडास लोहक्षारानें एक प्रकारचें उत्तेजन मिळून त्याचा उपयोग हरित्-द्रव्य उत्पन्न करण्यांत होतो. मॉलिश व बेनेस्की ह्या शास्त्रज्ञांनी असें सिद्ध केलें आहे कीं केवळ हिरव्या उच्च वनस्पतींनांच लोहक्षाराची अवश्यकता असते असें नाहीं तर हरित्-द्रव्य नसणा-या आलिंब-वर्गाचें सुद्धां लोकक्षाराशिवाय चालत नाही. 

ह्या चार क्षारशिवाय नायट्रोजनक्षार, गंधकक्षार व फॉस्परस-क्षार यांची मोठी आश्यकता असते.  हे क्षार जीव रसाचे अथवा जीवरसांतील केंद्राचें मुख्य घटक होत.
हवेमध्यें शेंकडा ८० टक्के नायट्रोजन वायूचें प्रमाण असून त्याचा प्रत्यक्ष उपयोग वनस्पतींनां होत नाहीं. म्हणून ते क्षार जमीनींतून शोषून घेणें भाग असतें. ज्या जमीनींत हया क्षाराची कमतरता असते तेथील वनस्पती पुष्ट होत नाहींत. प्रत्यक्ष जीवरसाच्या मुख्य घटकांत तोटा पडूं  लागल्यानें नवीन वाढ होणें कठिण होतें. हीच स्थिती गंधक व फॉस्फरस क्षारांच्या अभावानें उत्पन्न होते. हेहि क्षार इतरांप्रमाणें जमीनींतूनच शोषून घ्यावे लागतात. गंधकक्षार केंद्रांत असत नाहींत पण जीवरसांत असतात. केंद्रांत फॉस्फरस क्षार आढळतात. त्यांचा त्या ठिकाणीं कोणता प्रत्यक्ष उपयोग असतो हें कळत नाहीं. प्राणिवर्गाच्या मज्जातंतूमध्यें सुद्धां फॉस्फरसक्षार आढळतात व मुद्दाम फॉस्फरस पदार्थ असणारीं बीजें अथवा फळें अधिक खाण्यांत यावीं असें डॉक्टर लोक सांगतात. त्यायोगें मज्जातंतूंनां पुष्टी मिळते असें त्यांचें म्हणणें आहे. यावरून कदाचित् पेशींतील केंद्र फॉस्फरसाचें स्थान असल्यानें तें मज्जातंतूंचें काम देणारें स्थान असावें असा कित्येकांचा तर्क आहे.

हे क्षार शोषणास पाण्याची आवश्यकता असते हें पूर्वी सांगितलेंच आहे. पाण्याचे घटक आक्सिजन व हायड्रोजन असतात हें निराळें सांगण्याची जरूरी नाहीं. हयाशिवाय हवेंतून कारबन व आक्सिजन असे दोन पदार्थ वायू- स्वरूपांत षोशावे लागतात. म्हणजे कारबन हायड्रोजन, आक्सिजन व नायट्रोजन तसेंच गंधक, फॉस्फरस, पोटेशियम, मॅग्नेशियम्, कॅलशिअम् व लोह अशीं दहा द्रव्यें वेगवेगळया स्वरूपांत वनस्पतींत आढळतात. हया द्रव्यांखेरीज व्यक्तिमात्र वनस्पतींत कांहीं विशिष्ट  द्रव्यें आढळतात. कूटू नांवाच्या वनस्पतींस क्लोरीन-द्रव्याची आवश्यकता असते व त्याप्रमाणें तो पदार्थ त्यांत साठविलेला आढळतो. गवतामध्यें सिलिका द्रव्य असतें. म्हणजे व्यक्तिमात्र वनस्पतींत आढळणा-या विशिष्ट द्रव्यांचा विचार बाजूस ठेविला असतां वरील दहा द्रव्यें प्रत्येक वनस्पतींत आवश्य असतात. पैकीं कारबन व आक्सिजन हे दोन पदार्थ केवळ जमीनींतून क्षारस्थितींत पाण्याबरोबर षोशावे लागतात. हया दहा पदार्थापासून निरनिराळे सेंद्रिय पदार्थ तयार होतात. व त्याच सेंद्रिय -पदार्थांचे सर्व वनस्पति शरीर बनलेलें असतें. त्या पदार्थांत सेंद्रियत्व उत्पन्न करणा-या षेंकडों रासायनिक घडामोडी वनस्पतीच्या शरीरांत अव्याहत चाजू असतात. व अशा घडामोडी म्हणजेच त्यांचीं जीवनकार्ये होत. हया घडामोडीस प्रथम जीवनपिंडाकडून चालना मिळतें व एकदां तें कार्य सुरू झालें म्हणजे तें एकसारखें चालू होतें.

हरित्-द्रव्ययंत्र :- हवा, पाणी व अन्न क्षार हया त्रयींपासून वनस्पती आपल्या शरीरांत सेंद्रिय अन्न तयार करितात. सेंद्रिय अन्न तयार करण्यास योग्य अशी विशिष्ट रचना त्यांच्या शरीरांत असते त्यास हरित्-द्रव्य-यंत्र म्हणतात. हया यंत्रांत पुष्कळ हरित्-जीवनपिंड असतात. प्रत्येक हरित्-जीवनपिंड जीवरसात्मक असून त्यांत हरितद्रव्य असतें. हरित्-द्रव्यामुळेंच पानास रंग येतो. हरित्-जीवनपिंडापासून हरित्-द्रव्य वेगळें करतां येतें. मद्यार्क  (आलकोहल),  ईथर, क्लोरोफॉर्म, बेनझोल, सारख्या रसांत हिरवीं पानें ठेवून हरित्-द्रव्यजीवनपिंडांपासून वेगळें केलें जातें. सोडा, पोटॅश वगैरे पदार्थांचा अंश असलेल्या पाण्यांत हिरवीं पानें ठेविलीं असताहि हरित्-द्रव्य वेगळें होतें. हरित्-द्रव्य उत्पन्न होण्यास लोह-क्षार लागतात. लोहांश नसलेल्या जमीनींतील उगवणा-या वनस्पतींचीं पानें फिकीं होतात. लोहक्षाराप्रमाणेंच हरित्-द्रव्योत्पत्तीस प्रकाशाची आवश्यकता असते. म्हणूनच अंधा-या जागीं अथवा सावलींत वाढणा-या वनस्पती फिकट होतात. प्रकाशानें पानांतील जीवनपिंड उत्तेजित होऊन हरित्-द्रव्य त्याजकडून उत्पन्न केलें जातें. हरित्-द्रव्यें असलेल्या रसावर प्रकाश पडला, तर त्यांतील कांहीं किरण शोषून घेण्याची शक्ति त्यास असते. तसेंच तो रस प्रकाशांत दोन वेगळया बाजूनें पाहिला तर तो दोन वेगळया रंगांचा दिसतो. प्रकाशाच्या पलीकडील बाजूस तो हिरवा जशाचा तसाच दिसतो; पण जिकडे त्याचें परावर्तन होतें त्या बाजूस तो रस लाल रक्तासारखा दिसतो. हया उलट ताजें रक्त दिसतें. म्हणजे तें प्रकाशाकडील बाजूस लाल व परावर्तन होणा-या बाजूस हिरवें दिसतें.

वनस्पति -भेदाप्रमाणें हरित्-जीवनपिंडास वेगवेगळा आकार येतो. कांहीं पाणकेशांच्या जीवरसांत हरित्-द्रव्य पूर्ण विरलें जाऊन त्यास कोणताहि विशिष्ट आकार येत नाहीं. पंरतु स्पायरोगायरासारख्या पाणकेशांत हरित्-जीवनपिंड मळसूत्राकृती होतात. झिग्नियामध्यें  त्यास नक्षत्रासारखा आकार येतो. उच्च वर्गांत साधारणपणें त्यास वाटोळा आकार असतो. उच्च वर्गांत अवयव रचना पूर्णत्वास पोहोंचल्यामुळें हरित्-जीवनपिंड साधारणपणें पानांत विशेष  आढळतात. परंतु हयांतहि मध्यांगीं ते पुष्कळ असतात. वरील भागापेक्षां खालील भाग अधिक फिका असतो. बाह्यत्वचेंत हे पिंड सहसा आढळत नाहींत. त्वग्-रंध्राच्या रक्षक-पेशींत मात्र हे असतात. मंद प्रकाशांत हरित्-जीवनपिंड पूर्ण रीतीनें चोहोंबाजूंकडे पसरतात व ही स्थिति कर्वविपाकास अथवा संस्थापनेस अधिक चांगली असते. प्रकाश कडक असेल तर त्यांची तीव्रता  टाळण्याकरितां पानांतील बाहयांगास असणारे हरित्-जीवनपिंड आंतील बाजूस वळून त्यांचें पुंज तयार होतात.  पुंज बनल्यानें कडक प्रकाशापासून त्यांचें संरक्षण होते. कडक प्रकाशांत पानांचा पृष्ठभाग एका बाजूला वळून त्यांच्या शक्य तितक्या थोडया भागावर प्रकाश पडेल अशी व्यवस्था होते. म्हणजे ज्या प्रकारें कडक प्रकाशामुळें स्वत:चें नुकसान न होतां प्रकाश अधिक शोषिला जाऊन सेंद्रिय पदार्थ बनविण्याचें मुख्य कार्य उत्तम रीतीनें साधेल, त्याप्रमाणें ते जीवनपिंड योग्य ती तजवीज करतात.

किरणाचें पृथक्करण :- कांचेच्या त्रिपार्श्र्वावर प्रकाश पडला असतां त्या प्रकाशाचें विघटन अथवा पृथक्करण होऊन त्यापासून  रंगी बेरंगी सात प्रकारच्या किरण-शलाका उत्पन्न होतात. प्रकाशाचे निरनिराळया रंगांतील किरण निरनिराळया  लांबीच्या लहरींचे आहेत हें त्यांच्या पृथक्कृत स्थितींत स्पष्ट दिसतें. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, निळा व जांभळा अशा निरनिराळया रंगांचे सात किरण मिळून पांढरा किरण बनतो व असे पांढरे किरण कांचेच्या त्रिपार्श्र्वावर पडले असतां त्यांचे सात घटककिरण वेगवेगळे होतात. पृथक्कृत प्रत्येक किरणाचा परावर्तन-शक्ति वेगवेगळी असते.

किरण व हरित्-जीवनपिंड ह्यांचा परस्पर संबंध :- ज्या प्रकारें कांचेच्या त्रिपार्श्र्वानें किरणाचें पृथक्करण होतें, त्याप्रमाणेंच हरित्-जीवनपिंडानें सुध्दा किरणाचें पृथक्करण होते. मात्र या दोहोंत फरक असतो. पहिल्या पृथक्करणांत साती किरण वेगवेगळे दिसतात.  पण दुस-या पृथक्करणांत कांहीं किरणांचें शोषण होऊन केवळ उरलेले किरणच वेगळे दिसतात. त्रिपार्श्र्वास किरण शोषण करण्याची शक्ति नाहीं परंतु पानांतील हरित्-जीवनपिंडास तशी शक्ति आहे कांच त्रिपार्श्र्वांत पोकळी करून त्यांत हरितद्रव्य रस भरला व त्यायोगानें किरणांचें पृथक्करण कसें होतें हें पाहिलें असतां असें आढळेल कीं नेहमीं वेगळया होणा-या सात किरणांपैकीं फक्त नारिंगी, पिवळे व हिरवे या तीनच रंगाचें किरण वेगळे होतात. व बाकीचे चार रंगांचे तांबडे, अस्मानी, निळे व जांभळे हे कमी अधिक प्रमाणांत हरित्-द्रव्य रसाकडून शोषिले जातात व उरलेले तीन न शोषिले गेल्यामुळे वेगळें झालेले दिसतात; म्हणजे त्रिपार्श्र्वाच्या पोकळींत ठेविलेल्या हरित्-द्रव्य रसांतील हरित्-जीवनपिंडाकडून प्रकाशाचे कांहीं किरण शोषिले जाऊन उरलेले किरण वेगळे होतात. ही विशिष्ट शक्ति जीवन कार्यांत फार उपयोगी पडते. ह्या रीतीनें प्रकाशांतील किरणें शोषून त्यांचा उपयोग सेंद्रिय पदार्थोत्पत्तीस लागणा-या आवश्य शक्तिचा पुरवठा करण्याकडे होतो. प्रकाशांतील सात किरणांपैकीं केवळ चार किरण कर्बसंस्थापन-कार्यास अथवा कर्बविपाकास फार उपयोगी पडतात असा अनुभव आहे. मात्र हे किरण सारख्या रीतीनें शोषिले जातात अथवा ते सारखेच उपयोगी पडतात असें नाहीं. सर्व किरणांत तांबडे किरण सात्विक पदार्थोत्पत्तीस अधिक उपयोगी पडतात व ते त्या मानानें जीवनपिंडाकडून अधिक शोषिले जातात. त्या खालोखाल अस्मानी व पुढें निळे व जांभळे अशा क्रमाक्रमानें उपयोगी पडतात व हाच अनुभव किरण शोषणांत दृष्टीस पडतो. प्रकाशांतील उपयुक्त किरण शोषण करून त्यांचा उपयोग सात्विक पदार्थ बनविण्यास करणें हें जीवनकार्यांतील एक महत्तवाचें कार्य असल्यानें हरित्-जीवनपिंडांचे अथवा त्यांतील हरित-द्रव्याचें इतकें महत्त्व असतें.

कारबन संस्थापन :- पानावर असणा-या त्वंग्र-रंध्रातून हरित-जीवनपिंडाच्या साहाययानें हवेंतील कर्बाम्लवायु शोषिला जातो. तो वायु पानांत आल्यावर पानाच्या घटकपेशिजालांत असणा-या पाण्याशीं अथवा पेशिरसाशीं संयोग होऊन त्याचें कर्बाम्ल तयार होतें. पेशिरसांत मुळयाकडून शोषिलेले पोटयाशियम क्षारादि पदार्थ असतात. जरी या पदार्थांचा प्रत्यक्ष उपयोग संस्थापन-कार्यांत नसतो तथापि या विशिष्ट पदार्थांच्या अभावीं कर्बसंस्थापन कार्य होऊं शकत नाहीं म्हणजे असले उपयुक्त शोषित क्षार अप्रत्यक्ष रीतीनें कर्बसंस्थापन कार्यास आवश्य असतात. पेशिरसांतील या कार्यास प्रत्यक्ष उपयोगी पडणारा पदार्थ म्हणजे पाणी होय. या पाण्याचा कर्बाम्लवायूशीं संयोग होऊन झालेल्या कर्बाम्लाचें पृथक्करण हरित्-जीवनपिंडाकडून केलें जातें. एक भाग कर्ब  (कार्बन) व दोन भाग उज्ज (हायड्रोजन) व तीन भाग प्राण  (ऑक्सिजन )  असे घटक पदार्थ असतात. त्यांपासून एक भाग कारबन, दोन भाग हायड्रोजन व एक भाग ऑक्सिजन असे वायू असलेला एक फारमलडिहाइड नांवाचा संयुक्त पदार्थ तयार होतो; व सुटया ऑक्सिजनचे दोन भाग मोकळे होतात. हे ऑक्सिजनचे भाग हवेंत मिसळतात व ताबडतोब फारमलहिडाइड पदार्थाच्या दृढीकरणानें त्यापासून एक प्रकारची साखर तयार होते.  साखरेचें पुढें सत्व बनतें. शरीरांत सत्व हाच पहिला दृष्य पदार्थ होतो. कांहीं शास्त्रज्ञांच्या मतानें कर्बाम्लवायू पानांत आल्यावर त्याचें कर्बाम्ल तयार होण्याची आवश्यकता नसते. त्या कर्बाम्लवायूचेंच पृथक्करण होतें. कर्बाम्लवायूमध्यें एक भाग कर्ब व दोन भाग प्राण  ( ऑक्सिजन)   असे घटक पदार्थ असतात. त्यांपासून कर्बएकप्राणिद  ( कारबन  मोनास्काइड )  म्हणजे एक भाग कर्ब व एक भाग प्राण  ( ऑक्सिजन)   असे वायू असणारा एक संयुक्त पदार्थ व एक भाग सुटा ऑक्सिजन अशा प्रकारचें त्याचें पृथक्करण होतें. कर्बाम्ल वायूप्रमाणेंच पानांत येणा-या पाण्याचेंहि हायड्रोजन दोन भाग व ऑक्सिजन एक भाग असें पृथक्करण होतें. पहिला कर्बएकप्राणिद  ( कारबन मोनास्काइड)   व उज्जचे दोन भाग यांचा कांहीं विशिष्ट प्रमाणांत रासायनिक संयोग होऊन त्यापासून एक भाग कर्ब, दोन भाग उज्ज व एक भाग प्राण असा एक सेंद्रिय पदार्थ तयार होतो व उरलेल्या प्राणाचे दोन्ही भाग मोकळे राहून हवेंत मिसळतात. हा तयार होणारा सेंद्रिय पदार्थ एक प्रकारच्या साखरेसारखा असतो अथवा फारमलडिहाइडसारखा विषारी पदार्थ तयार होतो. मात्र पुढें फारमलडिहाइडपासून लगेच साखर होते व साखरेपासून सत्त्व बनतें.

फारमलडिहाइड हा विषारी पदार्थ असल्याकारणानें तिचें अस्तित्व सजीव शरीरांत अथवा जीवनपिंडांत मानणें योग्य नाहीं असें कांहीं शास्त्रज्ञांनां वाटतें. पोलॉसी नांवाच्या शास्त्रज्ञानें हिरव्या सचेतन पानांत फारमलडिहाइड पदार्थाचें अस्तित्व फार सूक्ष्म प्रमाणांत वरचेवर आढळतें असें सिद्ध केले आहे. तसेंच प्रकाशामध्येंच फारमलडिहाइड पदार्थ पानांत तयार होतो. एरव्ही अंधारांत हा तयार होत नाहीं असें त्याच्या पाहण्यांत आलें आहे. यावरून हा पदार्थ हरितजीवनपिंडाकडून पानामध्यें कर्ब-संस्थापन क्रियेस प्रथम तयार केला जातो व पुढें त्यांचें दृढीकरण होऊन साखर होते व त्यास सत्त्वाचें दृष्य रूप येतें. यारीतीनें फारमलडिहाइड पदार्थाचा विषारीपणा जीवनपिंडास जाचक होत नाहीं.

साखर फारमलडिहाइड पदार्थापासून बनते पण साखरेपासून सत्त्व बनण्याची आवश्यकता कोणती अथवा त्यापासून फायदा कोणता असा प्रश्न उद्भवूं शकतो. तसेंच साखर ही विरणारी असल्यानें पानांत तयार झाल्यावर ती दुस-यां जागीं सुद्धां सहज जाऊं शकते. त्यास उत्तर एवढेंच देतां येईल कीं कर्ब-संस्थापन होत असतांना साखर बनण्याचें प्रमाण बरेंच मोठें असतें. ह्याच वेळीं जरी साखर  दुसरीकडे पाठविण्याची तजवीज केली तरी ती सर्व लवकर पानांतून दुसरीकडे जाणें शक्य नसतें व त्या अवधींत तिचें प्रमाण पानांत अधिकाधिक होत गेलें तर त्याचा परिणाम जीवनपिंडावर तसेंच जीवरसावर होऊं लागतो; त्यामुळें त्यांच्या कार्यांत अडथळा उत्पन्न होतो व तितक्या प्रमाणांत नवीन साखर उत्पन्न होण्याचें काम बंद होईल. म्हणून थोडया वेळाकरितां त्या साखरेचे अविद्राव्य सत्वकण बसल्यानें जीवनपिंडाचें  कार्य पूर्वीसारखेच झपाटयानें चालू राहतें. व्हाइन्स नांवाच्या शास्त्रज्ञानें साखरेपासून सत्त्वकण बनण्यासंबंधी निराळी उपपत्ति दिली आहे. तो म्हणतो प्रथम विघटीकृत घटकापासून फारमलडिहाइड तयार होतें व त्याची साधी साखर बनते. हया साखरेच्या रसाशीं नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस हें पदार्थ मिसळून नायट्रोजनयुक्त प्रतीद  ( प्रोटीड) अगर ओजस पदार्थ तयार होतो.  नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस हें पदार्थ क्षारस्थितींत मुळांतून शोषिले जाऊन पानांत येतात अथवा पहिल्या प्रतीद पदार्थांचें पचन होऊन हे नायट्रोजनादि पदार्थ पानांत मोकळया स्थितींत आढळतात.  त्यांचा साखरेच्या रसाशीं रासायनिक संयोग होऊन ओजस पदार्थ तयार होतो.  हा प्रतीद पदार्थ जीवनपिंडाकडून पचविला जाऊन त्याचें जीवनपिंडाशीं पूर्ण सात्मीकरण होतें. पण लवकरच जीवनपिंडाकडून सत्त्वाची उत्पत्ति होऊन त्यास दृष्य सत्त्वकणाचें घनस्वरूप प्राप्त होतें. हयाच रीतीनें तेल, सेल्युलोज, वगैरे पदार्थ उत्पन्न होतात. बीजामध्यें तसेंच रताळीं, बटाटे वगैरे कंदादि भागांत जेव्हां जेव्हां पौष्टिक अन्नाची सांठवण होते, तेव्हां हयाच रीतीनें जीवनपिंडाकडून तें पौष्टिक अन्न वेगळें होऊन त्या विशिष्ट भागांत सांठविलें जातें. म्हणजे प्रथम जीवनपिंडाकडून एखाद्या विशिष्ट स्थितींत सात्मीकरण झाल्यापासून पुन्हां तो पदार्थ जीवनपिंडाच्या शरीरापासून वेगळा होतो. प्रत्यक्ष साखरेपासून सत्त्व तयार होतें असें आतां कोणी म्हणत नाहींत. जीवनपिंडाच्या प्रत्यक्ष साहायानें त्यांच्या शरीरापासून असले पदार्थ उत्पन्न होतात असें सर्वसंमतसिद्ध झाले आहे.

प्रकाश व कर्बसंस्थापन :- हवेंतील कर्बाम्ल वायु शोषिला जाऊन त्यांतील पदार्थांचें संस्थापन वनस्पती शरीरांत होतें. केवळ कर्ब अशा स्वतंत्र स्थितींत त्यांचे संस्थापन होत नाहीं. कोणत्याना कोणत्या तरी सात्त्विक सेंद्रिय पदार्थांत तें होत असतें. वनस्पति-शरीरांत पाण्याचा भाग तीनचतुर्थांशापेक्षां अधिक असतो. हा भाग सोडून उरलेल्या कोरडया भागांत निम्याहून अधिक केवळ कार्ब पदार्थाचा भाग असतो. इतका सगळा कर्ब पदार्थ हयाच रीतीनें शरीरांत संस्थापित होतो. हें संस्थापनकार्य केवळ दिवसां प्रकाशांत चालतें. हें कार्य घडवून आणण्यास हरित्-जीवनपिंड व प्रकाश हींच कारणीभूत होतात. कर्बाम्ल वायूचें तसेंच पाण्याचें विघटीकरण हरित्जीवनपिंडाकडूनच प्रकाशांत होऊं शकतें. हया विघटीकरणकार्यास पुष्कळ शक्ति खर्च होते. कर्बाम्लवायूपासून कर्बएकप्राणिद    कारबन मोनास्काइड      बनण्यास अति उष्णतेची आवश्यकता असते. रसायन-प्रयोगशाळेंत असा पदार्थ बनविण्यास एक हजार सेंटिग्रेडहून अधिक उष्णतारूपी शक्तीची जरूरी लागते. इतकी उष्णतारूपी शक्ति बनस्पतीमध्यें कोठून उत्पन्न होते? वनस्पतिशरीरांत इतकी उष्णता  प्रकाशांतून मिळण्याची सोय असते. हरित्-जीवनपिंड प्रकाशांतील किरण शोषून यास उष्णतेच्या स्थितींत आणतात व अशा उष्णतेच्या शक्तिनेंच  विघटीकरण कार्य होत असतें म्हणजे सूर्यबिंबापासून निघणारा प्रकाश वनस्पतीस पोहोंचल्यावर त्यांचें शोषण होतें व पुढें त्यांचें रूपांतर होतें हा शक्तिाचा पुरवठा प्रकाशांतून झाला नसता तर सर्व जीवनकार्ये बहुतेक बंद पडलीं असतीं. सूर्यनारायण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीनें सर्व सचेतन सृष्टीस पोषण देतो. वनस्पतीची वाढ सुद्धां अप्रत्यक्षरीतीनें सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. सर्व प्राणिवर्ग पोशणासाठीं वनस्पतीवरच अवलंबून असतो. कांहीं प्राणी मांसाहारी असतील पण त्या मांसाहारी प्राण्यांचें भक्ष्य अन्य प्राणी प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष वनस्पतीवर अवलंबून असतील. अर्थात् सर्व सचेतन सृष्टीचें जीवन सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. तोच जगांतील सर्व सेंद्रिय  पदार्थांचा उत्पादक आहे. त्याशिवाय नवा सेंद्रिय पदार्थ अस्तित्वांत येणें शक्य नाहीं.

कर्बाम्लवायूचा पुरवठा :- सर्व सेंद्रिय पदार्थांत  कर्ब हा एक आवश्य भाग असतो, किंबहुना सेंद्रियत्व येणें म्हणजे कर्बपदार्थाशीं एकरूप होणें होय असें कांहींनीं म्हटलें आहे. अर्थात् सर्व सेंद्रिय पदार्थ बनण्यास  केवडया तरी कर्बाम्ल वायूची जरूरी पाहिजे. हवेंत त्या वायूचें प्रमाण फारच सूक्ष्म असतें. तेव्हां एवढा पुरवठा कोठून होतो? पृथ्वीवरील ज्वालामुखी पर्वतांपासून  पृथ्वीच्या पोटातील कर्बाम्ल वायूचा लोट सारखा बाहेर पडतों. तसेंच ज्वालाप्रवाही झा-यांतून तो वायू बाह्य हवेंत मिसळत असतो. सर्व सजीव सृष्टीच्या श्र्वासोच्छवासाबरोबर बाहेर पडणा-या कर्बाम्लवायूचेंहि प्रमाण लक्ष्यांत घेण्यासारखें आहे. इतक्या सर्व ठिकाणाहून मिळणारा हा वायू एकत्र झाल्यावर हवेंतील त्या वायूचें प्रमाण वास्तविक किती तरी वाढलें पाहिजे. परंतु हवेंतील त्या वायूचें प्रमाण नेहमीं एक सारखेच असतें. त्याचें कारण वनस्पतींकडून हा वायु शोषिला  जाऊन त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनतात हें होय. हवेंतील कर्बाम्लाचें प्रमाण जें आज हजारों वर्षें सारखें कायम आहे तें केवळ हीं दोन परस्परविरोधी कार्यें घडत असल्यामुळेंच आहे. सचेतन सृष्टीचा श्र्वासोच्छ्वास व वनस्पति-शरींरांत होणारें कर्ब -संस्थापन हीं दोन कार्ये परस्परविरोधी आहेत. एकानें कर्बाम्लाचें प्रमाण वाढलें पाहिजे पण त्याच्या उलट दुसरी क्रिया वनस्पति शरीरांत होत गेल्यानें पहिलीचा परिणाम नाहींसा होतो व हया कारणामुळेंच वायूची समता आज लाखों वर्षे बिघडली नाहीं. एखाद्या विशिष्ट जागीं कांहीं कारणानें हया वायूचें प्रमाण अधिक होण्याचा संभव आहे. पण हवा खेळती असल्यानें तो वायू दुसरीकडे पसरला जाऊन पूर्वीचेंच प्रमाण कायम राहतें.  हल्लीं आढळणारें वायूचें प्रमाण पूर्वीपेक्षां फार कमी आहे. प्राचीन काळीं वनस्पतींची वाढ फार विस्तीर्ण होई. त्या काळीं वाढलेल्या वनस्पतींची अरण्यें जशीच्या तशींच कांहीं जागीं भूकंपासारख्या कारणांनीं जमीनीखालीं दडपलीं जाऊन त्यांच्या दगडी कोळशाच्या खाणी तयार झाल्या. तो काळ फार प्राचीन असावा. परंतु कालानुसार तें प्रमाण कमी होत जाऊन आज प्रस्तुतच्या स्थितीस पोहोचलें व त्या प्रमाणांत वनस्पतींची वाढ कमी झाली.

कर्बसंस्थापनकार्यात त्वग्-रंध्राचा उपयोग :- कर्बाम्ल वायु शोषण करून घेण्यास त्वगरंध्राचा मार्ग उपयोगी पडतो. पाणवनस्पतीमध्यें जें बाहयांगीं आवरण असतें त्यांतून हा वायु आंत शिरण्यास अडचण पडत नाहीं. जमीनीवर उगवण्याच्या वनस्पतींमध्यें त्वग्-रंध्राचा विशिष्ट योजना असते व त्यांतून तो वायु आंत शोषण घेण्यास सोय होते. प्रकाशांत त्वग्-रंध्रें उघडीं असतात. म्हणून प्रकाशांतच त्या रंध्रांतून त्या वायूचें शोषण होऊं शकतें. त्वग्-रंध्रें बंद असलेल्या स्थितींत तो वायु शोषिला जाणें शक्य नसतें. हा वायू शोषिला गेल्याशिवाय कर्बसंस्थापन कार्य घडणार नाहीं. अर्थात् प्रकाश, त्वग्-रंध्रें व हा वायु हया तीन्हींचा हया कर्बाशीं अत्यंत निकट संबंध असतो.

नायट्रोजनयुक्त प्रतीद  (प्रोटीड)   पदार्थ - ओजस पदार्थ :- वनस्पति-शरीरांत केवळ, सात्विक सेंद्रिय पदार्थ असतात असें नाहीं, तर इतर सेंद्रिय  पदार्थंहि त्याबरोबरच आढळतात. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्यें  नायट्रोजनयुक्त पदार्थ अधिक महत्त्वाचें आहेत; कारण त्यापासून प्रतीद ( पोटींड)  किंवा ओजस् पदार्थ तयार होतात व हेच जीवरसाचे अथवा जीवनपिंडाचें खरे घटक होते.  सात्विक पदार्थांचा उपयोग प्रतीद पदार्थ बनण्यास होतो किंवा जीवनकार्यास आवश्य लागणा-या शक्तीचा पुरवठा करण्यांत होतो. सात्विक पदार्थावर विशिष्ट रासायनिक कार्य घडून त्यांत नायट्रोजन, गंधक व फास्फरस हीं दुसरीं द्रव्यें मिसळून त्यापासून प्रतीद पदार्थ तयार होतो.

हवेंमध्यें शेंकडा ८० टक्के नायट्रोजन -वायूचें प्रमाण असूनहि त्या वायूचा प्रत्यक्ष उपयोग वनस्पतींनां नायटोजनाकरितां जमीनींतून नायट्रोजनक्षार मुळयांकडून शोषून घ्यावे लागतात. हा शोध  प्रथम बोसिंगॉल्ट नांवाच्या शास्त्रज्ञानें लाविला. जमीनींतून द्रवस्थितींत मुळयान्वये नायट्रोजन क्षार इतर क्षारांबरोबर शोषिले जातात. ते शरीरांत आल्यावर त्यांवर रासायनिक क्रिया सुरू होऊन त्यांचें नत्राम्ल तयार होतें. हयाचप्रमाणें गंधकाचे  क्षार शोषिले जाऊन त्यांचें गंधकाम्ल तयार होतें. हीं दोन्ही अम्लें व साधा फारमलडिहाइडसारखा पदार्थ अथवा साधी साखर हयांचा रासायनिक संयोग होऊन त्यापासून प्रतीद पदार्थ उत्पन्न होतो.

कित्येक शास्त्रज्ञांच्या मतानें जमीनींतील नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थांवर सूक्ष्म जंतूंच्या विद्रावणक्रियेनें अमोनिया  वायू मोकळा होतो व ह्या अमोनिया वायूवर हवेंतील आक्सिजन वायूचा परिणाम होऊन नायटेट-क्षार तयार होतात व ते मुळयान्वयें वनस्पतीच्या शरीरांत शोषिले जातात. शोषिले नायट्रेट-क्षारापासून पुन्हां अमोनिया मोकळा होऊन ॲमिडो-ॲसिड तयार होतें, व हयाच सात्विक पदार्थांशीं संयोग होऊन त्यांग गंधकाम्लाचें मिश्रण झालें म्हणजे प्रोटीड पदार्थ बनतो. पहिल्या उपपत्तीपेक्षां ही उपपत्ति पुष्कळ शास्त्रज्ञांस मान्य आहे. कारण वनस्पति शरीरांत ॲस्फरॅजिनसारखे ॲमिडो-ॲसिड पदार्थ पुष्कळ वेळां आढळतात. झाडाच्या वाढत्या भागांत हे पदार्थ आढळत नाहींत. कारण त्या जागीं वाढ होत असल्यानें पुष्कळ नवीन जीवनपिंड व जीवरस बनण्याची आवश्यकता असते; म्हणून त्या भागांतील सर्व ॲस्फरॅजिनसारख्या ॲमिडों-ॲसिडाचा सात्विक पदार्थांची संयोग होऊन प्रतीद पदार्थ बनतात व हया तयार झालेल्या प्रतीद पदार्थांचें सात्मीकरण होऊन जीवरसाची व जीवनपिंडाची वाढ होते. हया कारणानें वाढत्या भागांत ॲस्फरेजिनसारखे खुले नायट्रोजन पदार्थ आढळत नाहींत. तो वाढता भाग अंधारांत असला तर त्या भागांत ॲमिडो-ॲसिड पदार्थ आढळूं लागतात. हयाचें कारण असें की तो वाढता भाग सूर्यप्रकाशांत नसल्यानें सात्त्विक पदार्थांची उत्पत्ति होऊं शकत नाहीं. अर्थात् सात्त्विक पदार्थाच्या अभावीं त्या ॲस्फरॅजिन पदार्थाचा रासायनिक संयोग त्यांशीं न होऊन ते पदार्थ मोकळया स्थितींत आढळणें साहजिक आहे. जेव्हां वाढता भाग प्रकाशांत असतो त्यावेळीं सात्विक पदार्थ उत्पन्न होऊन मोकळया ॲस्फरॅजिन किंवा ॲमिडो-ॲसिड सारख्या पदार्थाशीं रासायनिक संयोग होतो. संयोगानें उत्पन्न होणा-या प्रोटीड पदार्थांचें पर्यवयन जीवरसांत होतें म्हणून त्यावेळीं असलें ॲस्फरॅजिनसारखे पदार्थ मोकळें असूं शकत नाहींत. पण अंधारांत हयाच्या उलट स्थिती होतें.

वनस्पति -शरीरांत ॲस्फरॅजिन पदार्थ दोन रीतीनें उत्पन्न होण्याचा संभव आहे. पूर्व प्रोटीड पदार्थाचें पचन व विघटीकरण होऊन ॲस्फरॅजिन पदार्थ उत्पन्न होऊं शकतात; किंवा जमीनींतून नायट्रेड-क्षार शोषिल्यावर त्यापासून अमोनिया वायू मोकळा होऊन ॲस्फरॅजिन पदार्थ उत्पन्न होतात. अशा रीतीनें उत्पन्न होणा-या ॲस्फरॅजिन पदार्थापासून सात्विक पदार्थाच्या रासायनिक संयोगानें प्रतीद पदार्थ बनूं शकतात.

प्रतीद पदार्थाचें उत्पत्तिस्थान :- हें पदार्थ अमुक एका विशिष्ट जागींच तयार होतात असें नाहीं. वनस्पतीच्या सर्व सचेतन पेशिजालांत  हे पदार्थ होऊं शकतात. एखाद्या विशिष्ट भागांत ते अधिक बनतात  तर दुस-या जागीं त्यांच्या उत्पत्तीचें प्रमाण फार कमी असतें. साधारणपणें पानांत अथवा पानासारख्या हिरव्या भागांत हयांची उत्पत्ति अधिक होते. स्किंपर नांवाच्या शास्त्रज्ञाचें असें म्हणणें आहे की हया पदार्थांची उत्पत्ति हरितजीवनपिंड व सूर्यप्रकाश  हयांवर अवलंबून आहे. खरोखर हया पदार्थाच्या उत्पत्तीस सूर्यप्रकाशाचा किंवा हरितजीवनपिंडाचा अप्रत्यक्षच उपयोग असतो. केवळ प्रकाशांत हरित्-जीवनपिंडाकडून हे पदार्थ बनतात असें म्हणणे चुकीचें होईल. अंधारांत सुद्धां प्रतीद पदार्थ बनूं शकतातं. आलिंब वर्गातील वनस्पती नायटेट-क्षारापासून आपल्या शरीरांत हे पदार्थ अंधारांत बनवूं शकतात. सात्विक पदार्थोत्पत्तीस आवश्य लागणारी  शक्ति सूर्यकिरणांतून मिळते. तशी शक्ति प्रतीद पदार्थ बनविण्यास कोठून मिळते? सात्विक पदार्थोत्पतींत सूर्यकिरणरूपीं शक्ति गुप्तस्थितींत सांठविली जाते. त्या सांठविलेल्या शक्तीचाच उपयोग हया कामीं होतो. कारण ती गुप्त शक्ति दृष्य स्थितीस आणणारी एक स्वतंत्र जीवन क्रिया अहोरात्र वनस्पति-शरीरांत चालूं असते. त्यामुळें सूर्यप्रकाश अप्रत्यक्षरीतीनें प्रतीद-पदार्थोप्तत्तीसहि कारणीभूत होतो. कांहींच्या मतानें ह्या सूर्यप्रकाशाचा प्रत्यक्षहि उपयोग होऊं शकतो. प्रकाशांतील अस्मानी किरणाकडून हे पदार्थ बनण्यास सहाय्य होतें.


प्रतीद पदार्थाच्या रासायनिक पृथक्करणांत कारबन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन अशीं द्रव्यें आढळतात. तसेंच कांहीं ठिकाणीं फॉस्फरस व गंधक हींहि आढळतात,प्रतीद पदार्थाच्या राखेंत क्लोराइड, फास्फेट, सल्फेट, कारबोनेट वगैरे असून कॅलशिअम, मॅग्नेशियम्, लोह व पोटॅशियम् क्षारांचाहि किंचित् अंश सांपडतो. वनस्पति-शरीरांत  प्ररतीद पदार्थास नेहमीं विशिष्ट वेगळा आकार येतो असें नाहीं. बहुतेक वेळां ते पदार्थ जीवरसाशीं सात्मीकृत झालेले असतात. कांहीं बीजांत नैसर्गिकपणेंच ते जीवरसापासून वेगळे होऊन त्यास विशिष्ट स्फटिकाकृति येते. एरंडीसारख्या सतैल बीजांत खाऊच्या पुडयासारखा अथवा मथुरी चंबूसारखा आकार प्रतीद पदार्थास येतो. कांहीं ठिकाणीं साधारण लहानमोठा, वाटोळा आकार येतो.


अन्नशोषणार्थ कांहीं खटपटी :- स्वत: सेंद्रिय अन्न तयार करितां येत नाहीं अशा कांहीं वनस्पतींनां सेंद्रिय अन्नासाठीं दुस-यावर अवलंबून राहावें लागतें. अशांनां परावलंबी वनस्पती अथवा वृक्षादनी म्हणतात. अमरवेल नांवाच्या वनस्पतीस नेंहमीं दुस-या वृक्षाची जरूरी असते. तिला कर्बाम्ल शोषून  स्वत:च्या शरीरांत कर्बसंस्थापन करितां येत नाहीं. कर्ब संस्थापन क्रियेस अत्यंत आवश्यक जें हरितद्रव्य तें त्या वनस्पतींमध्यें फारसें असत नाहीं. ती वनस्पति पिवळट असते. मांसाहारी वनस्पतीसुद्धां ह्याच मालिकेंत  येतात. त्या स्वत: सेंद्रिय अन्न तयार करण्याच्या भानगडींत न पडतां त्यांनां कीटकादि खाणेंच आवडतें. लहान किडे व कीटक भुलून त्यांच्या भक्ष्यस्थानीं पडण्यास मधुर रसोत्पादन करण्याची नैसर्गिक सोय त्यांच्या शरीरांत असते. मधुर रसास लुब्ध होऊन ते कीटक एकदां त्यांच्या तावडींत सांपडेल म्हणजे पुन्हां त्यांना बाहेर जाणें केव्हांहि शक्य नसतें. किडे पकडण्यासाठीं त्यांची शरीरचना विशिष्ट प्रकारची होते. कांहींच्या पानांचा देंठ पोकळ होऊन त्या पोंकळींत पाचक रस जमतो. देंटाचा वरील भाग झांकणासारखा बनलेला असतो. मात्र तें झांकण उघडें असतें. त्या उघडया भागांतून रस पिण्याकरितां किडे त्या पोकळींत शिरतात. किडे आंत गेल्यावर वरील झांकण बंद होतें. आंतील रसांत ते किडे मरून जातात. हळूहळू त्यांच्या शरीरावर त्या अम्लरसांचा परिणाम होऊन त्या किडयांच्या शरीरांतील सर्व सेंद्रिय पौष्टिक भाग विरून त्याचें वनस्पति शरीरांत पूर्ण शोषण होतें.

कांहीं मांसाहारी वनस्पतींच्या बाह्यांगांवर चारी बाजूंस पिंडमय केंस असून त्या आकर्षक होतात. केंसाच्या कोणत्याहि भागीं किडा बसला तर तो केंस मध्यांगाकडे कलून किडा मध्यबाजूकडे आणिला जातो. हयावेळेस केंसांतून स्वादिष्ट, चिकट रस उत्पन्न होऊन त्यायोगें तो किडा पूर्णपणें पकडला जातो. पळून जाण्याकरितां जसाजसा तो किंडा धडपउ करुं लागेल तसतसा अधिकाधिक रस चोहोंकडून येऊन त्याची धडपड व्यर्थ होते. ह्या रसांत तो किडा शेवटीं मरतो व त्याचें शरीर त्या रसांत विरघळून पहिल्याप्रमाणें त्याचें शोषण होतें. किडा केंसावर बसल्याचें ज्ञान त्या वनस्पतीस तात्काल होऊन प्रथम मध्यभागीं त्याला खेंचून चारी बाजूंकडून रस  उत्पन्न करण्याची तजवीज  होते. केंसाच्या बाजूवर जीवनपिंड असतात. केंसावर किडा बसल्यानें ते उत्तेजित होऊन त्यांतून  रस स्त्राव होऊं लागतो. त्या किडयांच्या शरीरांतील सर्व उपयोगी पडण्यासारखा भाग शोषून झाल्यावर ती वनस्पति पुन्हां नवीन किडयाची वाट पाहूं लागते.

कित्येक वेळां दोन परस्पर भिन्न जातीच्या वनस्पतीचें साहचर्य होऊन त्यांपासून परस्पर फायदा होतो. त्यांपैकीं एक वनस्पति एक कार्य करिते. त्या दोन्हींचा परस्पर उपयोग असल्यामुळें त्या दोन्ही एकत्र राहूं इच्छितात. जें कार्य एकीला करितां येतें तें कार्य दुसरीकडून होणें शक्य नसतें. तसेंच दुसरीचें कार्य पहिलीस करितां येत नाहीं. पण त्या दोन्ही एकत्र राहिल्यानें दोन्हींच्या विशिष्ट गुणामुळें परस्पर फायदा होतो. अशा विशिष्ट संयोगास सहकारी साहचर्य असें म्हणतां येईल.

पाणकेशवर्ग व  आलिंबवर्ग हयांमध्यें पुष्कळ वनस्पतींचा अशा प्रकारचा सहकारी संबंध येतो. पाणकेशांत हरितजीवनपिंड असल्याकारणानें, त्यांनां सात्विक सेंद्रिय पदार्थ बनवितां येतात. आलिंबवर्गांत त्यांचा अभाव असल्यामुळें ती गोष्ट त्यांनां साध्य नाहीं. परंतु हवेंतून पाणी अथवा ओलावा आलिंब-वनस्पतींनां आपल्या धागयान्वयें शोषितां येतो. असल्या भिन्नधर्मीय दोन वनस्पतींचा संबंध एकत्र आला असता, दोन्हीकडून दोन विशिष्ट कार्ये घडून दोहोंचाहि फायदा होतो. शिलावल्क अशाच पाणकेशीय व आलिंब-वर्गांतील वनस्पतींच्या साहचर्यानें उत्पन्न होतें. शिलावल्क-वनस्पति म्हणजे दोन भिन्नवर्गीय वनस्पतींचा गुच्छच होय. त्या भिन्नवर्गीय वनस्पती एकत्र राहिल्यानें दोहोंची जीवनकार्ये सुरळीत चालतात.

कांहीं वनस्पतींच्या मुळयांवरील शोषक केंस कित्येक वेळां कांहीं कारणांनीं मरून जातात. अशा स्थितीत शोषक केंसाचें काम दुस-या रीतीनें झालें नाहीं तर त्या वनस्पतींची उपासमार होऊन त्या मरून जातील. परंतु त्या मुळयांचा व जमिनींत असणा-या कांहीं विशिष्ट आलिंब वनस्पतीचा साहचर्य संबंध होऊन परस्पर फायदा होतो. जमिनींतील आलिंब वनस्पती त्या मुळयांत घुसून आपण त्यांतून अन्नशोषण करतात पण त्याबरोबर त्यांच्या धाग्याकडून जमिनींतून क्षारयुक्त पाणी शोषिलें जाऊन तें त्यांच्या मुळयांत येतें. जरी यामुळें यांतील थोडेसें सेंद्रिय अन्न नाहींसें झालें तथापि क्षारयुक्त  पाण्याचा पुरवठा त्याकडून झाल्यानें त्या मुख्य वनस्पतीचा तोटा होत नाहीं. कारण त्यावेळीं पाणी शोषण करणारे त्यांच्या मुळयावरील शोषक केंस नाहींसें झालेले असतात. परंतु हा विशिष्ट संबंध घडून दोघांचाहि फायदा होतो. ही स्थिति जंगलांत उगवणा-या मोठमोठया उच्चवर्गीय वनस्पतीमध्यें सुद्धां आढळते. जर साहचर्यस्थितींत एक वनस्पति कांही कार्य न करतां केवळ दुस-यावर सेंद्रिय अन्नासाठीं अवलंबून राहील  तर मात्र तो संबंध नुकसानकारक होतो. पण संबंध झाल्यावर दोन्ही वनस्पती थोडीबहुत परस्परांस मदत करतील तर असा संबंध केव्हांहि नुकसानकारक होत नाहीं. अमरवेल दुस-या वृक्षावर उगवून त्यामध्यें आपले शोषक धागे घुसविते व ततद्वारां स्वत:चें केवळ पोषण करते. त्यामुळें अमरवेलीच्या आश्रयदात्या पोषक वृक्षाचा नाश लवकरच होतो. जेव्हां एखाद्या वनस्पतीवर आलिंबवर्गीय रोग पडतो तेव्हां सुद्धां अशाच प्रकारची स्थिती उत्पन्न होते. आश्रयदात्या वनस्पतींनें मेहनत करून स्वत:करितां सेंद्रिय अन्न उत्पन्न करावें पण रोगोत्पादक दुस-या वनस्पतीनें त्या अन्नावर ताव मारून त्याचा खुशाल उपयोग करावा ही स्थिति रोगपीडित वनस्पतीमध्यें आढळतें.

बांडगुळें परावलंबी असतात, पण त्यांमध्यें हरितजीवनपिंड असल्याकारणानें त्यांनां स्वतंत्रपणें कर्ब-संस्थापन कार्य करतां येते. त्यांचा जमीनीशीं प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळें ती ज्या झाडावर उगवतात. त्यांतून क्षार व पाणी एकढयाच वस्तू शोषून घेतात. म्हणजे अमररवेलापेक्षां बांडगुळापासून कमी नुकसान होतें. जेव्हां आश्रयवृक्षांचीं पानें गळून सर्वत्र  शिथिलता उत्पन्न होते, अशा वेळीं स्वत:च्या पानांत तीं सेंद्रिय पदार्थ बनवितात. व स्वत:ची गरज भागवून उरलेलें सेंद्रिय अन्न आश्रयदात्या वृक्षासहि पोहोंचवितात. म्हणजे नेहमीं आश्रयदातया वृक्षांतून जें कांहीं घेतलें जातें, त्याचा मोबदला किंवा स्वत:स आश्रयदात्या वृक्षांकडून सुरळीतपणे क्षारयुक्त पाणी मिळत जावें म्हणून त्यावेळी त्याला थोडीबहुत मदत केली जाते.

शिंबीवर्गांतील वनस्पतीच्या मुळयांवर फोडासारख्या लहान लहान गुठळया येतात. या गुठळया  म्हणजे सूक्ष्म जंतूचे पुंज होत. हया सूक्ष्म जंतूंस हवेंतील खुला नायट्रोजन वायु शोषण करून स्व-शरीरांत नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ तयार करण्याची शक्ति असते. ते सूक्ष्मजंतू त्या मुळयांतून सेंद्रिय पदार्थ भक्षण करून शरीर-पोषणसाठीं त्या मुळयावर अवलंबून असतात पण स्वत: हवेंतून नायट्रोजन शोषून नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ त्या मुळयांत आयते तयार करून ठेवितात. अर्थात् मुळया व ते सूक्ष्म जंतू हयांचा परस्पर 'देवाण व घेवाण' अथवा सहकारी संबंध येतो व त्यामुळें दोहोंचाहि परस्पर फायदा होतो.

जेव्हां वनस्पतींनां स्वत: जमीनींतून क्षारादि पदार्थ शोषून स्वतंत्रपणें सेंद्रिय अन्नें बनवितां येतात, तेव्हां त्यांनां दुस-या वनस्पतींचीं जरूरी नसते. पण जेव्हां स्वत:ची एखादी बाजू लंगडी  असते अशा वेळेस त्यांनां दुस-याची मदत पाहिजे असते. सूर्यप्रकाशांत हरित्-जीवनपिंडाकडून -सात्विक सेंद्रिय पदार्थ तयार करणें हा सर्वसाधारण हरित्-वनस्पतींचा स्वभावधर्मच आहे. तसेंच सात्विक पदार्थापासून नायट्रिक व स्ल्फ्युरिक अम्लांच्या संयोगानें प्रतीद-पदार्थ बनविणें हाहि त्यांचा जातिस्वभावच समजला पाहिजे. पण हया स्वभावाविरूद्ध कांहीं वनस्पती वागतात, अशा वेळीं त्यांमध्यें कांहीं व्यंग उत्पन्न झाले असतें. एक वनस्पति दुस-या  वनस्पतीवर आपला जीवन कारभार चालविते, ह्याचा अर्थ असा कीं तिची स्वतंत्रपणें पोषण होण्यासारखी नैसर्गिक स्थिति नसते. त्यामुळें तिला परावलंबी होणे भाग पडतें. दुस-या वनस्पतीवर सुलभतेनें जीवन चालेल अशी व्यवस्था त्या परावलंबी वनस्पतींत आपोआप उत्पन्न होते. प्राण रक्षणास लागणारें सेंद्रिय अन्न त्या वनस्पतीला कोठून तरी मिळविणें भाग असतें. तें प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणें मिळविण्यासंबंधीं खटपट सर्व सचेतन सृष्टींत आहोरात्र चालू असते. कोणी दुस-यास लुबाडून तें मिळवितात, तर कोणी तें स्वत: निराळया रीतीनें तयार करितात. इतकाच काय तो दोन्ही मार्गांत फरक असतो.

पाचक अथवा विघटक रस :- कर्ब संस्थापन क्रियेंनें वेगवेगळया प्रकारच्या सात्विक पदार्थांची उत्पत्ति होते. सत्त्व, साखर, सेल्युलोज  (पेशिकद्रव्य),  इन्युलिन्, सभेद  (मेदयुक्त, मेदस )  पदार्थ वगैरे निरनिराळया प्रकारचे पदार्थ वनस्पति-शरीरांत आढळतात. ह्यांचीं उत्पत्ति प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें कर्ब-संस्थापन क्रियेवर अवलंबून असते. हया सर्व पदार्थांत कर्ब  (कार्बन   ) हा प्रधान घटक असतो, एवढेंच नव्हें तर सर्व सेंद्रिय पदार्थांत कारबन पदार्थ प्रधान घटक असतो. वनस्पति-शरीरांत असा एकहि सेंद्रिय पदार्थ नाहीं कीं त्यांत कर्ब पदार्थाचा अंश नसतो. ह्या कर्बविशिष्ट सेंद्रिय पदार्थाचा उपयोग वनस्पति -जीवनांत अन्न ह्या दृष्टीनें फार मोठा असतो. नायट्रोजनयुक्त प्रतीद पदार्थांत सुद्धां कर्ब पदार्थांचें अंग असतें. सात्विक पदार्थापेक्षां नत्रयुक्त प्रोटीड-पदार्थ अधिक महत्त्वाचे असतात. कारण त्यापासून पुढें प्रत्यक्ष जीवरसाची उत्पत्ति होते.

ज्या ज्या भागांत वरील सेंद्रिय पदार्थांचा सांठा झालेला असतो, त्याच ठिकाणीं त्या पदार्थाचें पचन होण्यास अथवा पचन होण्यासारखी स्थिति उत्पन्न करण्यास पाचक द्रव्याची योजना झालेली असते. विशिष्ट सेंद्रिय पदार्थांस विशिष्ट रासायनिक बाधक द्रव्याची जरूरी असते. एकच पाचक द्रव्य सर्व ठिकाणीं सारखें उपयोगीं पडतें असें नाहीं. रताळीं, बटाटे, मका, गहूं वगैरे पाचक पदार्थांत सत्त्व सांठविलेलें असतें. केव्हां असल्या सत्त्वाचा उपयोग उगवत्या बीज गर्भास व्हावयाचा असतो, अशा वेळीं त्या जागीं असणा-या पाचक-द्रव्याचा परिणाम त्यावर होऊन त्याचा एक प्रकारचा सत्वरस अगर शर्करारस तयार होतो व ह्याच स्थितींत त्याचा उपयोग बीज-गर्भात होऊं शकतो. सत्त्व हा पदार्थ पाण्यांत विरणारा नाहीं व कोणतीहि वस्तु पाण्यांत विरल्याशिवाय तिचा उपयोग होऊ शकत नाहीं. अर्थात् सत्त्वास शर्करा-रस स्थिति आणणें आवश्य असते. ही स्थिति उत्पन्न करणारें.

‘डायस्टेज’ नांवाचें पाचक द्रव्य असतें. जेथें जेथें सत्वाचा सांठा असतो, त्या त्या जागीं ह्या पाचक द्रव्याची योजना झालेली असते. जेव्हां पाण्याचा ओलावा बीजास मिळतो तेव्हां त्या ओलाव्यानें त्यांतील पाचक द्रव्य उत्तेजित होऊन आपली विघटक क्रिया सत्वावर करितें व त्याचा परिणाम असा होतो कीं, हळूहळू पूर्वींचे न विरणारे सत्वकण पाण्यांत विरून त्यापासून शोषणास योग्य असा शर्करा- रस तयार होतो. हें डायस्टेज पाचक द्रव्य बीजांतून पाण्यांत अथवा ग्लिसरीनांत वेगळें काढितां येतें व पुढें अलकोहलाचा उपयोग केला तर तळाशीं त्या द्रव्याचा साखाहि वेगळा होतो. डायस्टेजासारखीं इन्युलेज, ग्ल्यूकेज, सायटेज वगैरे पुष्कळ पाचक द्रव्यें शास्त्रवेत्त्यांनीं शोधून काढिलीं आहेत. खजूर, सुपारी वगैरे बीजांत सेल्युलोज नांवाचे पौष्टिक पदार्थ असतात. ह्यांस विरविणारें पाचक द्रव्य सायटेज नांवाचें असतें. इन्युलिन नांवाचा सेंद्रिय पदार्थ डालिया वनस्पतीच्या मुळ्यांत पुष्कळ आढळतो. ह्या मुळ्या स्पिरिट अथवा अलकोहल ह्यांमध्यें ठेविल्या तर त्या इन्युलिन पदार्थाच्या स्फटिकाकृति बनतात. ह्याची फलशर्करा तयार करणारें पाचक द्रव्य इन्युलेज होय. इनव्हरटेज नांवाच्या पाचक द्रव्यानें इक्षु- शर्करेचे लेव्ह्युलोज, डेक्सट्रोजसारखे पदार्थ तयार होतात. ऊंस चुकंदर (बीट), वगैरेमध्यें असली इक्षु- शर्करा पुष्कळ असते. वनस्पति शरीरांत तैलादि समेद (मेदयुक्त) पदार्थ कसे उत्पन्न होतात? ज्या पेशींत कर्बसंस्थापन होतें त्या पेशींत केव्हांहि तैलादि समेद पदार्थ सहसा नसतात. परंतु पुष्कळ बीजांत तैलादि पदार्थ सांठविलेले असतात. हे पदार्थ कर्ब पदार्थापासून तयार होतात ह्यांत संशय नाहीं. कारण पानांतील हरित्-द्रव्यांकडून शोषिल्या जाणार्‍या कर्बाम्ल वायूपासून जे कर्ब तयार होतात त्यांवर कांहीं विशिष्ट रासायनिक कार्यें घडून कांहीं ठिकाणीं त्यांचें पर्यवसान हे तैलादि पदार्थ उत्पन्न करण्यांत होतें. असले तैलादि समेद पदार्थ जेव्हां बीजांत अथवा बीजासारख्या दुसर्‍या भागांत सांठलेले असतात तेव्हां त्यांस ‘लायपेज’नांवाच्या पाचक द्रव्यानें द्रवरूप येतें. ह्या पाचक द्रव्यानें त्यापासून मेदाम्ल व ग्लिसरीन बनून तीं दोन्ही पाण्यांत विरघळतात पण पुढें त्या मेदाम्लापासून साध्या द्रवरूप कार्बन पदार्थांत होऊन त्याचें पचन होतें.

तैलादि समेद पदार्थांप्रमाणेंच नायट्रोजनयुक्त प्रतीद पदार्थांचेहि ट्रिपसीन नांवाच्या पाचक रसानें पचन होऊन जीवरसाशीं त्यांचें सात्मीकरण होतें. सात्मीकरण झाल्यावर मागें अ‍ॅमिडोअ‍ॅसिड नांवाचीं द्रव्यें शिल्लक राहतात. एरंडीसारख्या बीजांत प्रतीद- पदार्थास विशिष्ट स्फटिकाकृति येते. इतर ठिकाणीं त्यास अमुक एक आकार येतो असें नाहीं. प्राणि-शरीरांत प्रतीद पदार्थाचें पचन होण्यास अशाच ट्रिपसीन द्रव्याची जरूरी असते. वास्तविक वनस्पतींच्या व प्राण्यांच्या अन्नांत फरक नसल्यानें या अन्नाचें पचन होण्यास दोहोंतहि एकच प्रकारचीं पाचक द्रव्यें असतात. अन्नभेदाप्रमाणें भिन्न पाचक द्रव्याची जरूरी असते. प्राणिशरीराची रचना भिन्न असल्यानें त्यांत पाचक द्रव्यें उत्पन्न करणारे विशिष्ट पिंड असतात व त्यांतून जरूरीच्या वेळीं तसलीं द्रव्यें अगर रस उत्पन्न होण्याची नैसर्गिक तजवीज होत असते. पण वनस्पति शरीरांत तशा प्रकारचे विशिष्ट पिंड असत नाहींत. पण जेथें पौष्टिक अन्नाचा सांठा असतो, त्याच ठिकाणीं त्या अन्नाबरोबरच पाचक द्रव्याचा सुद्धां सांठा होतो. जेव्हां पाण्याचा ओलावा त्यास मिळतो, त्यावेळीं तीं पाचक द्रव्यें उत्तेजित होऊन तीं आपलीं विघटक अथवा पाचक कार्यें सुरू करतात. पाचक द्रव्यानें अविद्राव्य पदार्थास द्रवता येऊन तो पदार्थ द्रवस्थितींत वनस्पति- शरीरांत पेशीपासून पेशींत पसरत जातो. कांहीं पदार्थांचा तात्काल उपयोग होतो व कांहीं पदार्थ अडचणीसाठीं अथवा पुढील उपयोगासाठीं झाडांच्या कांहीं भागांत सांठविले जातात. ह्या सेंद्रिय पदार्थांत प्रधान घटक कार्बन पदार्थ हा असतो. हा पदार्थ हवेंतून शोषिला जाऊन प्रकाशरूपी शक्तीमुळें शरीरांत संस्थापित होतो. ह्या कार्यांत प्रकाशांतील शक्ति त्या पदार्थांत गुप्त रीतीनें साठविली जाते व तीच शक्ति श्वासोच्छवास कार्यांत मोकळी केली जाऊन ती सर्व जीवनकार्यास उपयोगी पडते.

श्वा सो च्छ वा स.- सचेतन शरीराच्या अवश्य जीवनकार्यापैकीं श्वासोच्छवास ही एक फार महत्त्वाची क्रिया आहे. शरीर सचेतन आहे तोंपावेतों ही क्रिया अव्याहतपणें चालू राहते. ह्या क्रियेंत कांहीं प्रमाणांत बाह्य हवेंतून शरीरांत आक्सिजन वायूचें शोषण होऊन उलट शरीरांतून कर्बाम्ल वायु व किंचित पाण्याचा अंश बाहेर येतो; बाह्य हवेंतून शोषून घेतलेल्या आक्सिजन वायूमुळें जीवरसाच्या घटकद्रव्यावर रासायनिक कार्यें घडून शेवटीं त्यापासून कर्बाम्ल वायू व पाणी हीं उत्पन्न होतात. व ह्या दोहोंच्या बाह्यांगीं उच्छवास होतो. जीवरसाचीं घटक द्रव्यें नेहमीं अस्थिर असतात. त्यांमध्यें एकसारखी घडामोड होत असते. शोषिलेल्या आक्सिजन वायूचा जीवरसाच्या घटक द्रव्याशीं संयोग होऊन पूर्वीपेक्षां त्यामध्यें अधिकच अस्थैर्य उत्पन्न होतें. त्यायोगें जीवरसाच्या घटक द्रव्यांत विघटीकरण सुरू होऊन त्यापासून साधे व संकीर्ण संयुक्त पदार्थ उत्पन्न होऊं लागतात. त्यांपैकीं कांही संयुक्त पदार्थ पुन्हां जीवरसांत सात्मीभूत होतात. ह्या रीतीनें तयार होणार्‍या साध्या पदार्थांत कर्बाम्ल वायू व पाणी ह्यांची उत्पत्ति होते. जीवरसास आक्सिजन वायु मिळाला नाहीं तर त्याचीं जीवनकार्यें बंद होतात. जीवरसाचें चैतन्य कायम राखण्यास प्राणवायूची आवश्यकता असते. प्राणवायूचा जीवरसाशीं संबंध आल्यावर जीवनकार्य करण्यास त्यास उत्तेजनात्मक शक्ति मिळते. शरीरांत सांठविलेल्या सेंद्रिय पदार्थांचें विघटीकरण करून त्यांत उत्पन्न होणार्‍या शक्तीनें जीवनकार्यास चालन देणें हेंच श्वासोच्छवास क्रियेचें मुख्य कार्य असतें. ह्या क्रियेंत एका वायूचें अंतःशोषण होऊन आंतून दुसर्‍या प्रकारचा वायु बाहेर पडतो म्हणून ह्यास ‘श्वासोच्छवास’ क्रिया म्हणतात. ही क्रिया सवेतनत्वाची खूण समजली जाते. दिवसां, रात्रीं, सुप्तावस्थेंत किंवा जागृतावस्थेंत ही क्रिया शरीर मृत होईपर्यंत चालू असते. ही क्रिया थांबणें म्हणजे मृत्यु येणें होय.

श्वासोच्छवास आणि कर्बसंस्थापन - तुलना:- कर्बसंस्थापन क्रियेंत तयार होणार्‍या सेंद्रिय पदार्थांत प्रकाशाची किरणरूपी शक्ति गुप्त रीतीनें एकवटली जात असते. ती शक्ति श्वासोच्छवास क्रियेंत मोकळी केली जाऊन जीवनकार्यें अव्याहतरीतीनें चालू राहतात. प्रकाशाच्या शक्तीचें रूपांतर सेंद्रिय पदार्थांत कर्ब-संस्थापन क्रियेंत होतें. पण ही शक्ति पुनः मोकळी होऊन जीवनकार्यास उपयोगी पडते. कर्बसंस्थापन व श्वासोच्छवास ह्या दोन कार्यांचा अति निकट संबंध आहे. एक कार्य नेहमीं चालूं असतें पण दुसरें कार्य कांहीं विशिष्ट परिस्थितींतच चालूं शकतें; एकास प्रकाशाची अत्यंत जरूरी तर दुसर्‍यास प्रकाश असो वा नसो तरी तें कार्य चालू राहतें. एकीनें कर्बाचे नवीन नवीन संयुक्त पदार्थ बनविले जातात अर्थात् त्यायोगें शरीराचें वजनहि पूर्वींपेक्षां अधिक होतें पण दुसर्‍या क्रियेनें त्या बनविलेल्या पदार्थांत विघटीकरण सुरू होऊन कर्बाम्लवायु व पाणी हीं द्रव्यें उत्पन्न केलीं जातात. एकानें नव्या पदार्थांची घटना होतें, व दुसर्‍याकडून त्यांचा विघात होतो. असल्या विघातक क्रियेनें जरी जीवरस कमी कमी होत जातो, तथापि ह्या विघातक क्रियेंत बाहेर मोकळ्या होणार्‍या शक्तीनें नवीन संघटनात्मक कार्यास चालन मिळून अधिकाधिक जीवरस उत्पन्न होत जातो. सर्व सचेतन पेशींत अशा प्रकारची घडामोड चालू असते. सर्व सचेतन पेशींत श्वासोच्छवास क्रिया चालू असते. पण कर्ब संस्थापन क्रिया मात्र पेशींत चालते असें नाहीं. ह्यास विशिष्ट जागा व विशिष्ट परिस्थिति ह्यांची आवश्यकता असते. जीवरसाकडून संस्थापित शक्तीचा विकास करणें हेंच श्वासोच्छवासाचें खरें स्वरूप आहे. श्वासोच्छवासांत शोषिल्या जाणार्‍या प्राणवायूचा प्रत्यक्ष परिणाम जीवरसाच्या घटक पदार्थावर होतो, व त्यामुळें मोकळ्या होणार्‍या शक्तीनेंच इतर सर्व जीवनकार्यें चालतात.

यावरून श्वासोच्छवासक्रियेचें महत्व कळून येणार आहे. कांहीं वेळ इतर जीवनक्रिया बंद राहिल्या तरी चालण्यासारखें असतें पण ही क्रिया चालूं असणें अवश्य असतें, कारण ह्या क्रियेवर इतर सर्व क्रियांचा आधार असतो.

श्वासोच्छवासास मोकळी हवा पुरविण्याची सोय:- शरीराच्या सर्व सचेतन पेशींतून श्वासोच्छवासाची क्रिया चालू असते पण त्यांतील कित्येक पेशी अंतस्थ असतात. अशा पेशींनां ऑक्सिजनवायु मिळण्याची सोय कशी होते? खुली हवा सर्व शरीरांत खेळती राहण्यास योग्य अशी शरीरांतर्व्यवस्था होत असते. पानांतील त्वगरंध्रांतून बाह्य हवा आंत शिरल्यावर ती वातस्थानांत जते. वातस्थानें शरीरांत चोहोंकडे असून त्यांचा परस्परांशीं संबंध जुडलेला असतो. त्यामुळें त्वग्- रंध्रांतून शिरणारी हवी वातस्थानांतून चोहोंकडे पसरत जाते व ततद्वारा अंतःस्थ व खोल भागीं असणार्‍या सचेतन पेशीस खुली हवा मिळण्याची सोय होते. हीं वातस्थानें उत्पन्न करण्याची व्यवस्था नैसर्गिक असते. ह्या वातस्थानांतून बाह्य हवा व शरीरांत उत्पन्न होणारे कर्बाम्लाहि वायू ह्यांचा परस्पर संबंध येऊन ते आंत बाहेर खेळते राहतात. ह्या वातस्थानांतील खेळती हवा व बाह्य हवा अगदीं एकच प्रकारची असते असें नाहीं. भिन्न अवयवांत तसेंच भिन्न परिस्थितींत वातस्थानांतील खेळत्या हवेंत बदल होत जाणें साहजिक आहे. कर्बसंस्थापनेस उपयोगी पडणारा कर्बाम्लवायु अथवा स्वासोच्छवासक्रियेसाठीं शोषिला जाणारा प्राणवायू किंवा ह्यांत उलट उत्पन्न होणारा कर्बाम्लवायू वगैरे वायू त्वग्-रंध्रांतून व वातस्थानांतूनच खेळते राहतात. पाण्यांत उगवणार्‍या वनस्पतींमध्यें त्वगरंध्रें असत नाहींत. अशा ठिकाणीं बाह्य हवा शरीरांत शिरण्यास अडचण पडते. म्हणून अशा वनस्पतीवर नेहमीं येणारें ‘त्वक्कवच’ येत नाहीं व पेशिभित्तिकेंतून पाण्यांत विरलेली हवा आंत शिरते.

कांहीं ठिकाणीं अडचण पडूं नये म्हणून प्रसंगाकरितां वातस्थानें मोठीं होऊन तीं हवेनें पूर्ण भरून जातात. ह्या हवेचा उपयोग त्यांनां वाटेल तेव्हां करितां येतो. कमळ, कांदे, वगैरेमध्यें पानांच्या देठांत हवा भरलेली असते.

मोकळ्या हवेशिवाय श्वासोच्छवास चालणें, मोकळ्या हवेशिवाय, निदान उच्चवर्गीय अशा वनस्पतींत श्वासोच्छवास चालणें शक्य नसतें. कांहीं क्षुद्र आलिंबवर्गीय वनस्पतीमध्यें श्वासोच्छवासास मोकळ्या प्राणवायूची जरूरी नसते. ज्या सेंद्रिय पदार्थावर त्या आलिंब वनस्पतींचें पोषण चालतें, त्यांतूनच त्यांनां श्वासोच्छवासासाठीं प्राणवायू मिळवितां येतो. उंसाचा रस उघडा असला म्हणजे तो एक दोन दिवसांनीं फसफसून आंबट होऊं लागतो. ह्याचें खरें कारण, म्हणजे त्या रसांत उत्पन्न होणार्‍या विशिष्ट किण्व वनस्पतींची श्वासोच्छवास क्रिया होय. रसांत शर्करा ही खाद्य वस्तु असते. ह्या खाद्य वस्तूवर हवेंतील किण्वादि वनस्पतींच्या सूक्ष्म जननपेशी अथवा बीजकल्पें उगवून त्यांची तेथे श्वासोच्छवास क्रिया सुरू होते. अशा वेळीं त्यांच्या पुष्कळशा पेशी त्या रसांत पूर्ण बुडालेल्या असतात. त्यांनां हवेंतून आक्सिजन वायु शोषून घेण्याची जरूरी भासत नाहीं. आक्सिजनासाठीं रसांतील सेंद्रिय पदार्थाचें विघटीकरण त्या सुरू करितात. विघटीकरण चालूं झाल्यावर त्या संकीर्ण पदार्थांतील आक्सिजनचा उपयोग श्वासोच्छवास कार्यास होतो. निराळा मोकळा आक्सिजनवायु हवेंतून न शोषण करितां त्या संकीर्ण पदार्थांतीलच तो वायु ह्या कार्यास उपयोगी पडतो. विघटीकरणांत कर्बाम्ल, अलकोहलादि पदार्थ उत्पन्न होतात. या रीतीनें श्वासोच्छवास करतां येण्याच्या शक्तीमुळें त्यांचा उपयोग पिण्याची दारू तयार करण्याकडे होतो. किण्व वनस्पतीसारख्या अशा दुसर्‍या पुष्कळ आलिंबवर्गीय वनस्पती आहेत कीं ज्यांनां मोकळ्या ऑक्सिजनची जरूरी नसून त्या स्वतंत्रपणें सेंद्रिय पदार्थांत विघटीकरण सुरू करून आपली श्वासोच्छवासक्रिया चालवूं शकतात. वस्तु सडूं लागली असतां याच प्रकारें सूक्ष्मजंतूंची श्वासोच्छवासक्रिया चालू असते. सेंद्रिय वस्तु सडूं लागली म्हणजे तिच्यावर पोसल्या जाणार्‍या सूक्ष्मजंतूंच्या विघटीकरणशक्तीनें वेगवेगळ्या रासायनिक क्रिया सुरू होऊन शेवटीं कर्बाम्ल, पाणी किंवा नायट्रोजनासारखीं साधीं द्रव्यें उत्पन्न होतात. विघटीकरणांत त्यास मिळणार्‍या ऑक्सिजन वायूवर त्यांची श्वासोच्छवासक्रिया चालते. म्हणून फसफसणें, आंबणें किंवा सडणें या सर्वांस मूलभूत कारण म्हणजे ‘श्वासोच्छवास’ क्रिया होय. या सर्व क्रियांत अंतिम उत्पन्न होणारे पदार्थ एकच प्रकारचे असतात. साध्या श्वासोच्छवासक्रियेस मोकळ्या ऑक्सिजनची आवश्यकता असते पण जेव्हां तो प्रत्यक्ष त्या स्थितींत मिळत नाहीं तेव्हां सेंद्रिय पदार्थांत विघटीकरण सुरू करून त्यांतील ऑक्सिजनचा उपयोग श्वासोच्छवासक्रियेकडे करतात.

उच्च वर्गात सुद्धां कित्येक वेळां बीजें उगवतांना अशा प्रकारें श्वासोच्छवासक्रिया सुरू होते. पावट्यासारखीं बीजें उगवतांना अलकोहलादि पदार्थ उत्पन्न होतात. मात्र त्यांनां मोकळा वायु त्या स्थितींत मिळूं देतां उपयोगी नाहीं. कांहीं विवक्षित वेळेपलीकडे त्यांनां मोकळा वायु मिळालाच पाहिजे नाहींतर बीजें मरून जातात. अशा स्थितींत चालणार्‍या श्वासोच्छवासक्रियेस अंतःश्वासोच्छवास असें म्हणतात. खरोखर दोन्ही श्वासोच्छवास कार्यांत तत्त्वतः फरक नसून ते केवळ ऑक्सिजनवायु मिळविण्याचे दोन मार्ग आहेत.

श री रा च्या घ डा मो डीः- श्वासोच्छवासक्रियेनें शरीरांतील सेंद्रिय पदार्थ मोडिले जातात. म्हणजे श्वासोच्छवासक्रिया विघातक आहे, पण त्याबरोबर हेंहि सुचविणें अवश्य आहे कीं त्यामुळें मोकळ्या होणार्‍या शक्तीनें जीवनकार्य व्यवस्थित चालून शरीरावयव घटनात्मक कार्यास उत्तेजन मिळतें. असल्या विघातक परंतु उत्तेजक क्रियेनें जीवरसाच्या घटक द्रव्यांचें विघटीकरण होऊन तीं कमी होत जातात पण त्याबरोबर दुसरीकडून नवीन जीवरस तयार होण्याची तजवीज होत असते. नवीन सेंद्रिय पदार्थ बनणें व त्यांपासून रूपांतर होत जाऊन शेंवटीं त्याचें जीवरसोत्पादनांत पर्यवसान होणें ही सर्व कार्यें घटनात्मक आहेत व ह्यांस श्वासोच्छवास- क्रियेकडून उत्पन्न होणार्‍या शक्तीमुळें चालन मिळतें. जीवरस तयार झाल्यावर त्यापैकीं कांहीं श्वासोच्छवासाच्या विघटीकरणांत नाहींसा होतो. परंतु नवीन जीवरसहि त्याबरोबरच उत्पन्न होत असतो. असल्या घडामोडीनें नुकसान होत नाहीं. शरीरस्वास्थ्यास असल्या घडामोडी नेहमीं चालू राहणें अवश्य आहे. नुसती विघातक क्रिया चालून नवीन सेंद्रिय पदार्थत्पादनाची परंपरा कायम न राहिली तर मात्र त्यायोगों नुकसान झालें असतें. केवळ विघातक क्रिया चालून कांहीं फायदा नाहीं. त्याबरोबरच घटनात्मक कार्यें चालून अधिक सेंद्रिय पदार्थ उत्पन्न झाले पाहिजेत. ह्या सर्वांचें अंतिम ध्येय म्हणजे जीवरसोत्पादन होय. जीवरस शरीरांत अधिक उत्पन्न होत गेला म्हणजे खरी शरीर वृद्धि झाली. जीवरस अधिक उत्पन्न झाल्यावर नवीन वाढ होऊं लागते. शरीर- घटक भाग उत्पन्न करण्यांत जीवरस खर्चिला जातो पण तो जीवरस घटनात्मक क्रियांनीं पुन्हां नवीन बनतो. वनस्पतीचे मुळ्या, खोड, पानें, फुलें, फळें वगैरे सर्व अवयव जीवरसाकडूनच उत्पन्न होतात. हे अवयव तयार होतांना जीवरसाचीं रूपांतरें होत होत शेवटीं त्यास विशिष्ट प्रकारचा कायम आकार येतो. ह्या रीतीनें जीवरस खर्चिला जाणें हें जीवन- दृष्ट्या फायदेशीर होतें. कारण त्यायोगें शरीर- घटक भाग निरनिराळे बांधिले जाऊन शरीर वृद्धिंगत होते. एका पेशीपासून दुसरी पेशी उत्पन्न होणें किंवा पुष्कळ पेशींचा संघ एकत्र होऊन पेशिजालें व अवयव तयार होणें, ह्या सर्व गोष्टी शरीर वृद्धीसंबंधीं असून शरीरांत चालणार्‍या घडामोडींचीं द्योतक चिन्हें होत. अशी घडामोड झाल्याखेरीज शरीर वृद्धि होणें शक्य नाहीं. अधिक घटनात्मक क्रिया चालून अधिक जीवरस उत्पन्न होईल. तो जीवरस स्थिर राहणें शक्य नाहीं. त्याचें विघटीकरण होऊन त्यास स्थिर आकार येत जातो व ह्या स्थिर आकारासच आपण ‘वाढ’ म्हणतो.

वाढः- बीं रुजून रोपा तयार झाला व त्यावर खोड, फांद्या, पानें वगैरे भाग दिसूं लागले म्हणजे त्या स्थितीस आपण त्या बीजाची वाढ झाली असें समजतों. तसेंच पेशीपासून पेशी उत्पन्न होऊन त्या सर्व पेशींचा संघ एकत्र राहून मुख्य शरीराचा भाग मोठा होऊं लागला म्हणजे त्याची वाढ झाली अथवा वनस्पति एक पेशिमय असली पण तिचा पूर्वींचा सूक्ष्म आकार नाहींसा होऊन तिला मोठा आकार आला, तरी सुद्धां त्या पेशीची वाढ झाली असें समजतात. आतां ह्या सर्व स्थितींत असें आढळेंल कीं अन्यद्रव्यें शोषिल्यावर त्यास सेंद्रियत्व येऊन त्याचें जीवरसाशीं सात्मीकरण होतें व त्यामुळें अधिक जीवरस उत्पन्न होतो व जीवनपिंडांची संख्याहि अधिक होते. म्हणजे निरनिराळ्या पेशींची वाढ अथवा एखाद्या मोठ्या शरीराची वाढ हीं केवळ त्यांतील जीवरसाच्या व जीवनपिंडाच्या वाढीवर अवलंबून असते. वाढ म्हणजे केवळ मोठा आकार असें म्हणतां येणार नाहीं. पेशींत पाणी शोषिलें जाऊन त्यांस मोठा आकार येतो व त्या पाण्याचा उपसा दुसर्‍या पेशींत झाल्यावर पु्न्हां तो आकार संकुचित होतो. म्हणून नुसता आकार मोठा होणें हेंच केवळ खर्‍या वाढीचें चिन्ह नव्हें. रताळ्याच्या किंवा बटाट्याच्या गांठींत सेंद्रियान्नें जमून त्यांस मोठा आकार येतो व त्यांचें वजनहि अधिक होतें, पण जोंपर्यंत त्यांत नवीन जीवरसाची अगर जीवन- पिंडांची उत्पत्ति होत नाहीं तोपर्यंत त्यांत खरी वाढ झाली असें म्हणतां येणार नाहीं. कारण केवळ सेंद्रियान्नें एकेजागीं असणें म्हणजे जीवरस नव्हे त्या सेंद्रिस अन्नांत जीवरसाची स्थिति येण्यास किती तरी जीवनात्मक रासायनिक क्रिया झाल्या पाहिजेत. बीजामध्यें सुद्धां सेंद्रिय अन्नाचा साठा असून तीं फुगलेलीं असतात. पण जेव्हां तीं बीजें अथवा वर सांगितलेल्या बटाट्यांच्या गांठी उगवूं लागतात त्यावेळीं त्याचें वजन जरा कमी झालें तथापि त्यांतील जीवरस अधिक होऊं लागतो. तेव्हां त्यांची खरी वाढ सुरू होते. त्या सेंद्रिय अन्नाचें पचन जीवरसाकडून होऊन अधिक जीवरसोत्पादन होतें व पुढें त्या जीवरसाचा खर्च नवीन पेशी किंवा पेशिजालें उत्पन्न करण्यांत होतो व हळू हळू पूर्व शरीर वाढत जातें. जीवरसाची उत्पत्ति होईपावेतों त्यामध्यें घटनात्मक कार्यें चालतात व पुढें जीवरसाचा खर्च होऊं लागून नवीन पेशी किंवा पेशिजालें तयार होऊं लागतात, त्यावेळीं विघटना सुरू होते. वाढींत घटनात्मक व विघटनात्मक कार्यांचा अंतर्भाव होतो. त्या दोन्ही कार्यांचें मूर्त स्वरूप म्हणजे शरीर- वृद्धि होय. म्हणून वाढ ही साधी एकच क्रिया नसून ती दुसर्‍या अनेक क्रियांची द्योतक आहे. घटना अगर विघटना होण्यास एकसारखें चालन मिळालें पाहिजे. हें चालन अगर उत्तेजन बाह्यपरिस्थितीनें जीवरसावर व जीवपिंडावर होऊन त्यांच्याकडून प्रत्युत्तररूपी वाढीचें कार्य होतें. मात्र तें प्रत्युत्तर तात्काल उत्तेजनास असो अथवा पूर्वीच्या निरनिराळ्या उत्तेजनांच्या समुच्चयास असो. घटना व विघटना हीं दोन्ही उत्तेजनप्रत्युत्तररूपींच कार्यें होत व वाढसुद्धां त्यावरच अवलंबून असते.

वाढीस लागणार्‍या अवश्यक गोष्टी, अन्नः- अवश्य पदार्थांत अन्नास पहिला मान असतो. अन्नाशिवाय जीवरस व जीवनपिंड वाढणें अथवा पुष्ट होणें शक्य नाहीं. भरपूर अन्न मिळाल्यावर त्याचें पूर्ण पचन अथवा सात्मीकरण होऊन जीवरसाची परंपरा कायम राहते व त्यामुळें नवीन घटनात्मक कार्यास जोर मिळतो. अन्नाच्या अभावीं जीवनकार्यें शिथिलं होतात. म्हणून ज्या ठिकाणीं नवीन वाढ होत असते त्या जागीं अन्नरस- प्रवाह सारखा येत राहणें आवश्य असतें.

पाणीः- अन्नाइतकीच वाढीस पाण्याची आवश्यकता असते. कारण पाण्याविना शोषणादि जीवनकार्यें चालू शकणार नाहींत. पेशींत पाणी भरल्याशिवाय पेशिभित्तकेवर तणाव उत्पन्न होणार नाहीं व तणावाशिवाय पेशींच्या वाढीस उत्तेजन मिळणार नाहीं. म्हणजे प्रत्येक सचेतन पेशीच्या वाढीस पहिले उत्तेजन केवळ पाण्यानें उत्पन्न होणार्‍या तणावामुळें मिळतें. तणावानें बाह्यांगीं फुगलेली पेशिभित्तिका फाटण्याचा संभव असतो. परंतु ही स्थिति येऊं न देण्याकरतां पेशींतील जीवनपिंडाकून सेल्युलोज द्रव्यचा थर भित्तिकेच्या आंतील अंगास जमविला जातो व त्यामुळें पेशिभित्तिका अधिक जाड व टणक होते. अर्थात् अधिक पाणी शोषिलें जाऊन अधिक तणाव सहन करण्यासारखी ताकद त्यांत उत्पन्न होते. म्हणजे तणावामुळें पेशिभित्तिकेच्या वाढीस सुरुवात होते व तीस वेगवेगळा आकार येत जातो. पाण्यानें जी स्थिति एका सचेतन पेशींत उत्पन्न होते तीच स्थिति हळूहळू इतर पेशींत उत्पन्न होऊन त्यांचीहि वाढ होत जाते. वाढत्या कोंबांत अन्न पाण्यांतून येतें. सेंद्रिय अन्न तयार झाल्यावर तें वाढत्या कोंबांत पेशींतून पसरणें किंवा त्याची पुढील जीवरसांत विल्हेवाट होणें ह्या सर्व वाढीच्या गोष्टी पाण्यावर अवलंबून असतात.

उष्णता:- जीवरसाच्या व जीवनपिंडाच्या घटनात्मक कार्यास कांहीं विशिष्ट उष्णतेची जरूरी असते. मात्र भिन्न वनस्पतीमध्यें वाढीसंबंधीं उष्णतेचें प्रमाण भिन्न असतें. अति कडक उष्णतेच्या अगर थंडीच्या स्थितींत वाढ अजीबात थांबते. आर्टिक महासागरांतील उष्णतेच्या अंशाचें प्रमाण कांहीं जागीं जवळ जवळ शून्य असतें. तथापि त्या ठिकाणीं कांहीं पाणकेशाच्या जाती वाढूं शकतात. बॅक्टिरियासारक्या सूक्ष्म वनस्पती उकळणार्‍या पाण्यांत सुद्धां दमधरून वाढूं शकतात. त्या विशिष्ट पाणकेशांची थंडी अथवा बॅक्टिरियांची उष्णता ह्या दोन्ही स्थिती साध्या वनस्पतींनां केव्हांहि मानवणार नाहींत. उष्णतेमुळें जीवनपिंडांस कमी अधिक जोराचें उत्तेजन मिळून त्यांच्या घटनात्मक कार्यांत फरक होत जातो.

मोकळी हवा:- वाढीस ऑक्सिजन वायु अवश्य लागतो हे निराळें सांगण्याची जरूरी नाहीं. कारण त्याशिवाय श्वासोच्छवास क्रिया चालणें शक्य नाहीं. व श्वासोच्छवास क्रियेनेंच सर्व घटनात्मक कार्यास शक्ति पुरविली जाते. ऑक्सिजन वायु हा वनस्पतींनां प्रत्यक्ष खाद्य पदार्थ म्हणून उपयोगी पडतो असें नाहीं तर त्यायोगानें पूर्वीं सांठविलेल्या सेंद्रिय पदार्थाचें विघटीकरण सुरू होऊन घटनात्मक कार्यांस शक्ति पुरविली जाते.

सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता असूनहि सचेतन पेशींची वाढ सर्वकाळीं सारखी होईल असें नाहीं. वाढीचा प्रारंभ सूक्ष्म प्रमाणांत होऊन ती पूर्णावस्थेस पोहोंचते व पुन्हां कमी कमी होत शेवटीं अगदीं नाहींशी होते. उत्पत्ति, परिणति व लय ह्या तीन्ही स्थिती प्रत्येक ठिकाणीं सारख्याच आढळतात. वाढत्या भागांतील पेशींत जीवरस व जीवनपिंड अधिक अस्थिर असतात. त्यामुळें तेथें पेशि विभाग एकसारखा होत जाऊन पुष्कळ नवीन पेशींची उत्पत्ति होते. पण ही पेशि विभाग शक्ति एकाच ठिकाणीं फार वेळ टिकणें शक्य नसतें. जुन्या पेशींतील ती शक्ति नाहींशी होऊन ती केवळ नवीन उत्पन्न होणार्‍या पेशींमध्यें आढळते व हळूहळू जुन्या पेशींनां कायमचें स्वरूप प्राप्त होतें. वरचेवर नवीन पेशींची उत्पत्ति होत गेल्यानें शरीरवृद्धि होते व ह्याच रीतीनें सर्व अवयवांची वाढ होते.

प्रथम पेशीची विभाग शक्ति जोराची असल्यामुळें शेंकडों नवीन पेशी उत्पन्न होतात. त्यांतील जीवरस व जीवनपिंड एकसारखे वृद्धिंगत होत असतात. पण कांहीं कालानें ती शक्ति कांहीं विशिष्ट पेशींतच संकलित होते व पुढें पुढें तेथून तीहि नाहींशी होते. ह्या स्थितींत त्या अवयवांस पूर्ण व कायम स्वरूप प्राप्त झालेलें असते. तसेंच अवयवाच्या प्रत्येक बाजूच्या पेशीची वाढ एकसारखी होते असें नाहीं. त्यामुळें बाजूबाजूच्या वाढींत सुद्धां फरक होतो. हंसराजाच्या पानांत अग्राकडून बुडाकडे एक खोपेवजा गुंडाळी झालेली असते. ह्याचें कारण असें कीं पोटाकडील बाजूपेक्षां पाठीकडील बाजूच्या पेशी अधिक तणाणल्या जाऊन त्यांची त्या बाजूची वाढ अधिक होते. ह्यामुळें त्या पानाची अग्राकडून बुडाकडे गुंडाळी बनते. पुढें पोटाकडील अथवा वरील बाजूच्या पेशी अधिक तणाणूं लागतात व वाढीचें क्षेत्र बदलतें तेव्हां आपोआप ती गुंडाळी सुटून पान सरळ, उभें व ताठ होत जातें. अर्थात् बाजूच्या वेगवेगळ्या वाढीनें असा फरक होतो.

प्रकाश, जमीनींतील क्षार, हवा, गुरुत्वाकर्षण, पाणी वगैरे निरनिराळ्या गोष्टींचा परिणाम अप्रत्यक्षरीतीनें शरीर वृद्धीवर होतो व त्यायोगें शरीरास वेगवेगळे आकार प्राप्त होऊन ते वेगवेगळ्या दिशेकडे पसरतात. मुळ्यांची वाढ जमीनींत होणें किंवा फांद्या व पानें जमीनीबाहेर हवेंत पसरणें वगैरे वाढीचे चमत्कार वरील कारणामुळें घडून येतात.

सं वे द ना अ थ वा ज्ञा न.- वनस्पतीच्या सभोवतालची परिस्थिति केव्हांहि एकसारखी फार वेळ टिकणें शक्य नाहीं. त्यांत बदल सारखा होत असतो. बदलाप्रमाणें वनस्पतीस वेगवेगळें उत्तेजन मिळून परिस्थिति व त्या वनस्पतीचा जीवनक्रम ह्यांमध्यें एकवाक्यता उत्पन्न होते. वेगवेगळ्या उत्तेजनाप्रमाणें वनस्पति आपला जीवनक्रम बदलीत असते. अन्नद्रव्यांत कांहीं विघातक पदार्थ असला कीं ताबडतोब त्याचा परिणाम जीवरसावर व जीवनपिंडावर होतो. उपासमार झाली अथवा श्वासोच्छवास- कार्यांत ऑक्सिजन वायूच्या कमतरतेमुळें अडचण पड़ूं लागली, किंवा हवेमध्यें उष्णतेचें प्रमाण कमी अधिक वाढूं लागलें तर त्या त्या विशिष्ट गोष्टीप्रमाणें वनस्पतीवर चांगला अथवा वाईट परिणाम होऊं लागतो. म्हणजे वनस्पतींचीं जीवनात्मक कार्यें जीवरसाकडून अथवा जीवनपिंडाकडून वेगवेगळ्या परिस्थितीप्रमाणें बदललीं जातात. ह्या बदलण्याचा अर्थ एवढाच घ्यावयाचा कीं परिस्थितीची जाणीव जीवरसास अगर जीवनपिंडास होते. बाह्य उत्तेजन स्वीकारून त्यास प्रत्युत्तर देणें अथवा तें उत्तेजन मिळालें आहे ह्याची अन्य रीतीनें खात्री पटविणें वगैरे क्रियांमध्येंच जाणीवेचा अंतर्भाव होतो. जमीनींत बीजें वेडीं वाकडीं उगवत असलीं तरी नेहमीं मुळ्यांचा मोड जमीनींत घुसणें व खोडाचा अंकूर जमीनीबाहेर वाढणें, तसेंच फांद्या लांब आंखूड होणें, किंवा पानें एकमेकाखालीं न येतां तीं साधारणपणें प्रकाशाकडे कलतीं राहणें वगैरे चमत्कार उत्तेजन- प्रत्युत्तर कार्याचीं द्योतक रूपें आहेत. उत्तेजनादि कार्यांचा संकलित परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो. कित्येक वेळां उत्तेजन मिळण्याचें ठिकाण वेगळें व त्यास प्रत्युत्तर मिळण्याची जागा वेगळी असें होतें. म्हणजे त्या दोन्ही कार्यांची जागा एकच असते असें नाहीं. ह्यावरून असें म्हणतां येईल कीं परिस्थितीचें ज्ञान वनस्पतीस मिळून त्या ज्ञानाप्रमाणें कमी अधिक फरक त्यांच्या शरीररचनेंत होतो. पाण्याच्या शोधार्थ मुळ्या लांबवर पसरत जाणें, प्रकाशाकडे फांद्या कलत्या राहणें, कीटकभक्षक ‘ड्रासेरा’ वनस्पतीच्या केसांतून मधुर रसस्पर्श झाला असतां वाहूं लागणें, लाजाळूचें लाजणें, सूर्यकमळाचें प्रकाशाप्रमाणें माना फिरविणें वगैरे गोष्टी वनस्पतींनां ज्ञान ग्रहण करण्याची शक्ति असल्याबदलचीं प्रत्यक्ष उदाहरणें आहेत.

ज्ञानतंतूः- विशिष्ट प्रकारचें ज्ञान एकदां झाल्यावर तें दुसर्‍या जागी पोहोचविण्याची योजनाहि शरीरांत असते. मात्र वनस्पतिशरीरांत प्राणिवर्गापेक्षां ही योजना वेगळ्या तर्‍हेची असते. प्राणिवर्गांत ज्या ज्ञानतंतूकडून जागचें ज्ञान दुसर्‍या जागीं पोहोंचविलें जातें त्या ज्ञानतंतूंचें जाळें सर्व शरीरांत पसरलेलें असून जागजागीं त्यांचे विशिष्ट पुंजके असतात व सर्वांचा संबंध डोक्यांत असतो. अशा प्रकारची ज्ञान वाहण्याची रचना वनस्पति- शरीरांत असणें शक्य नाहीं. पण सचेतन अशा पेशींचा सर्व शरीरांत संबंध आल्या. कारणानें त्यांतील जीवरसांतून अगर जीवनपिंडाकडून एका ठिकाणचें ज्ञान दुसर्‍या जागीं पोहोचविलें जातें. शरीरांतील सर्व सचेतन पेशींतील जीवरसाचा परस्पर संबंध असतो व हा संबंध जोंपावेतों कायम असतो, तोपर्यंत त्यांतून ज्ञानवाहनास फार उत्तम सोय असते. जीवरसाच्या घटकपदार्थांत संकोच अगर विकास होऊन ततजन्य फरकाचें ज्ञान चोहोंकडे पोहोचविलें जातें. थंडीमुळें अथवा उष्णतेनें ज्ञान पोहोचण्याच्या गतींत फरक होतो. फार कडक उत्तेजन मिळालें असतां त्यापासून उत्पन्न होणारा संकोच अगर विकास तितक्याच जोराचा असतो. थकव्यामुळें ज्ञानशक्तिहि मंदावते. जर ज्ञानतंतूचें काम केवळ एका जागचें उत्तेजन दुसर्‍या जागीं पोहोंचविणें एवढेंच असेल तर वनस्पति शरीरांत सुद्धां ज्ञानतंतू असतात. सचेतन पेशी, पशिमालिका अगर परंपरा, कीं ज्यांतून ग्रहण केलेलें उत्तेजन दुसर्‍या जागीं पोहोंचविलें जातें व उलट त्या उत्तेजनास मिळणारें प्रत्युत्तर तशाच मार्गें पोहोंचतें, त्यांसच ज्ञानतंतु म्हणणें भाग आहे. ही ज्ञानतंतु रचना संकीर्ण नसून वनस्पतीच्या साध्या जीवनास योग्य तशीच ती असते.

वं श वृ द्धि.- पेशींच्या कमी अधिक वाढीप्रमाणें वनस्पति कमी अधिक प्रमाणांत मोठी होते. जोपर्यंत नवीन वाढणार्‍या पेशी एकाच शरीरांत राहतात, तोंपर्यंत एकाच व्यक्तीची वाढ होत असते. परंतु जेव्हां पेशिविभागानें उत्पन्न होणार्‍या नवीन पेशी परस्पर वेगळ्या होऊन आपला जीवनव्यवहार स्वतंत्ररीतीनें चालवूं लागतात, त्यावेळीं पुष्कळ व्यक्तींची वाढ होते. जेव्हां पेशी एकत्र राहतात, तेव्हां त्यांकडून होणार्‍या जीवनकार्यांचा उद्देश एकाच व्यक्तीच्या स्वास्थ्यासंबंधीं असतो. पण वेगळें शरीर उत्पन्न झालें कीं प्रत्येकाचा जीवनक्रम वेगळा होतो. वेगवेगळीं स्वतंत्र कार्यक्षम शरीरें उत्पन्न होणें म्हणजे वंशवृद्धि होणें होय. जीवनकार्यापैकीं वंशवृद्धि होणें हें एक फार महत्त्वाचें आवश्यक कार्य आहे. प्रत्येक शरीरास मरण अगर लय ही स्थिति केव्हां ना केव्हां तरी प्राप्त होते. जर मरण ही स्थिति नैसर्गिक आहे तर प्रजोत्पादन अगर पुनरुत्पत्ति करून मरणामुळें होणार्‍या वंश-हासाचें नुकसान भरून काढणें ही स्थिति सुद्धां साहजिकच आहे. एकच शरीर अव्याहतपणें सचेतन राहिलें तर वंशवृद्धीची जरूरी नाहीं. पण ती गोष्ट शक्य नसते. म्हणून शरीर नाहीसें होण्यापूर्वीं त्यापासून ततसदृश नवे शरीर उत्पन्न होणें अवश्य असतें. क्वचित् प्रसंगीं एखादी वनस्पति रोगरहित राहून भरपूर अन्न मिळून पुष्कळ काळ वांचू शकेल. ह्या स्थितींत तिला वंशवृद्धि करण्याची आवश्यकताहि वाटणार नाहीं. परंतु कारणपरत्वें अन्नग्रहणादि व्यवहारांत फरक पडून शरीर- वृद्धि थांबेल व ही स्थिति पुढें राहिली तर तें पूर्व शरीर ढासळून समूळ नष्ट होण्याची भीति असते. अर्थात् ही प्रतिकूल स्थिति प्राप्त होण्यापूर्वीं अथवा त्या स्थितीचा प्रारंभ होतांच ताबडतोब वंशवृद्धीची तजवीज करणें अवश्य असतें. ही तजवीज करीत असतांना केवळ एकच नवीन शरीर उत्पन्न न करतां शेंकडों नवीन शरीरें उत्पन्न करणें अवश्य असतें. कारण ह्या उत्पन्न केल्या जाणार्‍या शरीरांपैकीं शेंकडों शरीरें जीवनस्पर्धेंत नाहींशीं होण्याचा संभव असतो. नाहींशीं होऊन उरलेल्यापैकीं निदान एखादें दुसरें तरी वंशवृद्धीस उपयोगीं पडावें म्हणून ही योजना असते. एखादेंच शरीर उत्पन्न झालें व पुढें कांहीं कारणानें तें नाहीसें झालें तर वंश खुंटून ती पूर्व वनस्पति अस्तित्वांत होती किंवा नव्हती अशी स्थिति उत्पन्न होण्याचा संभव आहे. पूर्व वंशाची परंपरा सतत पुढें चालविणें हें सर्व जीवनकार्यांचें अंतिम ध्येय आहे असें वाटतें. ह्या कार्यांत आत्मरक्षणाचा अंतर्भाव होतो. पोषण व पुनरुत्पादन हींच कार्यें सचेतनत्वाचीं खरीं लक्षणें होत व ह्याहि कार्यांत आत्मरक्षणाचा हेतु असतो. आत्मरक्षणास शरीरवृद्धि तसेंच वंशवृद्धि घडवून आणणें अवश्य असतें. केवळ एकाच गोष्टीवर तें कार्य होऊं शकणार नाहीं. म्हणून शरीरवृद्धीनंतर वंशवृद्धि व पुनः वंशवृद्धींत शरीरवृद्धि होऊं देणें अवश्य असतें.

वंशवृद्धीचे प्रकारः- वंशवृद्धि वेगवेगळ्या रीतीनें होत असते. कांहीं ठिकाणीं वनस्पतीच्या मुग्ध कालिका वंशवृद्धीस उपयोगी पडतात. यांनां ‘डोळे’ असें म्हणतात. अळू, गुलछबू, केळ वगैरेंमध्यें असल्या डोळ्यांकडून वंशविस्तार होतो. जमिनीवर पसरत जाणारी गवताची प्रत्येक धांवती फांदीसुद्धां अशाच रीतीनें वंशवाढीस उपयोगी पडते. जाई, जुई, मोगरा वगैरे फुलझाडांच्या फांद्या जमिनीवर पसरून जागजागीं त्यापासून मुळ्या फुटतात व अशा मुळ्या फुटलेल्या फांद्यांची स्वतंत्र रोपटीं तयार होतात. कलमापासून अगर फांद्यांपासून जीं झाडें तयार होतात त्यांचे मुख्य कारण म्हणजे त्यावरील डोळेच होत. रताळीं, गोराडू, बटाटे, ऊंश वगैरे पिकांत नेहमीं वंशवृद्धीस डोळ्यांचाच उपयोग असतो.

जेव्हां खोडावर अगर फांद्यावर असल्या कळ्यांची उत्पत्ति होऊं लागते त्यावेळीं ती उत्पत्ति केवळ शरीरवृद्धीसाठींच असते. कळ्या वाढून त्यांच्या फांद्या होणें हें लक्षण केवळ शरीरवृद्धीचेंच आहे. पण कारणपरत्वें शरीरवृद्धि करणार्‍या कळ्यापासून वंशवृद्धि साधते. अशा ठिकाणीं शरीरवृद्धि व वंशवृद्धि या दोहोंत फरक नसतो. याचें कारण म्हणजे वनस्पतीचें शरीर हें एकत्र राहणार्‍या पुष्कळ पेशींचा संघ होय. संघातींल कांहीं पेशी स्वतंत्र होतात व आपला जीवनक्रम स्वतंत्र चालवितात. त्यांपैकीं पुष्कळ एकत्रच राहून तो संघ पुष्ट करतात. सूक्ष्म वनस्पतींत पोषण व पुनरुत्पादन हीं दोन्हीं कार्यें प्रत्येक पेशींत होऊं शकतात. पण ही प्रत्येक पेशीची नैसर्गिक स्वायत्तता पुढें राहत नाहीं. उच्च वर्गांत पेशीच्या कामाची वांटणी होऊन अशी स्वायत्तता प्रत्येक पेशींत टिकणें शक्य नसतें. त्यांपैकीं कांहीं विशिष्ट पेशींनांच ती गोष्ट साध्य असते. जेथें सूक्ष्म वनस्पतींत पेशिविभागानें उत्पन्न होणार्‍या प्रत्येक पेशीस स्वतंत्र जीवन चालवितां येतें त्या ठिकाणीं केवळ पेशिविभाग वंशवृद्धीस पुरेसा होतो. कांहीं ठिकाणीं श्रमविभागाच्या तत्त्वाप्रमाणें कांहीं पेशी पोषणकार्य करतात व कांहीं केवळ पुनरुत्पत्तीचें कार्य करतात. म्हणजे सर्व पेशींची पूर्वींची उपजत पुनरुप्तादनशक्ति कांहीं विशिष्ट पेशींमध्येंच संकलित होते. यांपैकीं कांहींनां स्वतंत्रपणें नवीन व्यक्ति बनतां येते. योग्य स्थितींत मूळ शरीरापासून त्या स्वतंत्र होऊन प्रत्येकीं नवें शरीर उत्पन्न होतें. असल्या पुनरुत्पादन साधणार्‍या पेशीस जननपेशी म्हणतात. जातिभिन्नत्वाप्रमाणें त्याहि पुष्कळ प्रकारच्या असतात.

कांहीं जननपेशींचा उद्भव ओलसर जागेंतच चांगला होतो. पाण्यांत योग्य जागा मिळविण्यासाठीं कांहीं जननपेशीस वल्हीवजा शेंपट्या असतात. कोरड्या जागेंत इकडून तिकडे वार्‍याबरोबर उडून जाण्यासारखें कांहींचें शरीर हलकें झालेलें असतें. तसेंच हवेचा बरा वाईट परिणाम होऊं नये म्हणून एखादें दुसरें आवरणहि त्यांवर येतें.

ह्याहून निराळाच एक पुनरुत्पत्तीचा प्रकार आढळतो. त्यामध्यें दोन पेशींचा संयोग होऊन एक वेगळी पेशी उत्पन्न होते व तिला वंशवृद्धि करण्याची शक्ति असते. ती संयुक्त पेशी योग्य परिस्थितींत वाढून तिजपासून पहिल्या शरीरासारखा एक विसृत रोपा तयार होतो. संयोग पावणार्‍या त्या दोन्हीं पेशी कित्येक वेळां सारख्या कार्यक्षम असतात. त्यावेळीं साधारणपणें दोन्हींच्या आकारांत फरक नसतो. पण कांहीं ठिकाणीं संयोग पावणार्‍या पेशींच्या आकारांत व कार्यक्षमतेंत पुष्कळ भेद असतो. उच्चवर्गीय वनस्पतींत हा भेद स्पष्ट व तीव्र असतो. त्यास पुरुष व स्त्रीं लिंगदर्शक नांवेंहि देतां येतात. स्त्रीपुरुष- तत्वांचा एकजीव होऊन त्यापासून गर्भ होतो व पुढें त्यास बीजस्थिति प्राप्त होते. ह्या लिंगदर्शक विशिष्ट पेशी फुलांत असतात म्हणून फुलें हीं वनस्पतींचीं जननेंद्रियें होत. फूलें झाडावर येऊन वंश वृद्धीची तजवीज होते. साधारणपणें शरीराची वाढ चांगली पक्व झाल्यावरच मोहोर व फुलें येऊं लागतात. अर्थात् प्रथम शरीर वाढ पूर्ण होणें हें वंश वृद्धीचें पहिलें साधनय होय. शरीर संकीर्णतेप्रमाणें पुनरुज्जीवन साधणार्‍या अवयवांतहि संकीर्णता येऊं लागते. स्पायरोगायरासारख्या दोन साध्या पाणकेश वनस्पतींत पुनरुत्पत्तीच्या अवयवांत संकीर्णता अगदी नसतें. त्यापैकीं कोणत्याहि दोन समारोसमोर असणार्‍या पुनरुत्पादन करणार्‍या पेशी तें कार्य सहज करूं शकतात. पुनरुत्पत्तीच्या वेळीं त्या पेशींतील जीवरसादि सर्व पदार्थ एकत्र संकुचित होतात. दोन्ही पेशी परस्परांकडे वाढून त्यांतील पदार्थांचा संयोग होतो. एका पेशींतील जीवरसादि पदार्थ दुसर्‍या पेशींत जातात व येथें असणार्‍या पदार्थांशी पूर्ण एकजीव होतात. व त्यापासून एक नवीन संयुक्तपेशी तयार होते. ती नवीन पेशी कांहीं काल विश्रांती घेऊन पुढें योग्य कालानें आपोआप वाढून तिजपासून नवीन वनस्पति उत्पन्न होते. ह्या उदाहरणांतील मूळच्या दोन्ही पेशी सारख्याच आकाराच्या व सारख्याच कार्यक्षमतेच्या असतात.

फुलांतील विशेष महत्त्वाचे भाग म्हणजे पुंकेसर व स्त्रीकेसर होत. पुष्पकोश आंतील भागाच्या संरक्षणास उपयोगी पडतो. पुष्पमुगुटाचा उपयोग अप्रत्यक्ष रीतीनें गर्भधारणेस होतो. पण प्रत्यक्ष कार्यकारी पुंकेसर व स्त्रीकेसरच होत. पुंकेसराचे पराग स्त्रीकेसराग्रावर पडून त्याची वाढ होते व त्यापासून परागनलिका तयार होते. ही परागनलिका बीजाण्डांतील गर्भकोशापर्यंत पोहोंचून त्यांतील पुंतत्व- केंद्र आंत शिरतें. ही स्थिति येईपर्यंत गर्भकोशांतील स्त्रीतत्त्व- गर्भाण्ड संयोगास तयार होतें. पुंतत्त्व केंद्र व स्त्रीतत्त्व- गर्भाण्ड ह्यांचा संयोग होतो व ह्या कार्यास गर्भधारणा असें म्हणतात. साधा संयोग व गर्भधारणा ह्या दोन कार्यांत तत्त्वतः फरक नसतो. एकजीव होणार्‍या केंद्रांचा आकार भिन्न असून प्रत्येकाचें कार्य वेगळें असतें. गर्भसंस्कार झालेल्या स्त्रीतत्व- गर्भाण्डापासून बीज उत्पन्न होतें व पुंतत्व केंद्राचें काम केवळ त्या गर्भाण्डाशीं एकजींव होऊन बीजोत्पादनास उत्तेजन देण्यासंबंधीं असतें. अशा प्रकारचें उत्तेजन मिळाल्याखेरीज केव्हांहि गर्भाण्डापासून बीजोत्पादन होत नाहीं. साध्या संयोग कार्यांत संयोग पावणार्‍या दोन केंद्रांच्या आकारात भेद नसतो. तसेंच अमुक व केंद्रापासून बीज उत्पन्न होतें असेंहि नाहीं. जें केंद्र स्वतःची जागा सोडून दुसर्‍याकडे जातें व त्याच्याशीं एकजीव होतें, अशा वेळीं जागा न सोडणार्‍या केंद्रापासून बीज उत्पन्न होतें व त्यासच वाटल्यास स्त्रीतत्व गर्भाण्ड म्हणतां येईल. खरोखर संयोगकार्यांत अशा प्रकारचा कोणता भेदाभेद नसतो.

स्त्री- पुरुष असा लिंगभेद कां असावा?- ह्या प्रश्नाचें उत्तर देणें कठिण आहे. स्त्रीपुरुषलिंगभेद केवळ श्रणविभागातत्त्वानें उत्पन्न झाला असावा. विशिष्ट पेशीस विशिष्ट प्रकारचें कार्य दुसर्‍यापेक्षां सहज करतां येतें व त्याप्रमाणें कार्यांची वांटणी होते. ह्या तत्त्वावर स्त्रीपुरुषलिंगदर्शक अशा कामांची वांटणी झाली असावी. असा भेदभाव उत्पन्न होण्यापूर्वीं शरीरांतून कांहीं विशिष्ट पेशी बाहेर पडून एकमेकांशीं संयोग पावतात व त्या संयुक्तपेशींकडून वंशवृद्धीचें कार्य होतें. संयोग घडवून आणण्यास त्या पेशी परस्पराजवळ येणें अवश्य असतें. अर्थात् त्यांनां गति उत्पन्न करण्याजोगी शरीरचना मिळते अथवा वल्हीवजा शेपट्यांची सोय करणें भाग असते. ह्याहून उच्च दर्जाच्या वनस्पतींतीत संयोगास अशा पेशी उत्पन्न केल्या जातात. परंतु त्यांच्या आकार व चलनकार्यांत भेद उत्पन्न होतो. पुढील उत्पन्न होणार्‍या असल्या पेशींत हा भेद अधिक स्पष्ट व दृढ होतो. एकीचा आकार मोठा होऊन तींत पौष्टिक द्रव्यें सांठविण्याची सोय होते. ह्या पौष्टिक द्रव्यांचा उपयोग संयुक्त पेशीच्या जननस्थितींत होतो. दुसरीचा आकार बारीक राहतो व ती पेशी चलन कार्य अधिक चांगलें करूं शकते. अर्थात् ह्या वेळीं त्या दोन पेशींत श्रम विभाग अगर कामांची वांटणी होऊं लागते व त्याच कारणानें पुढें स्त्री- पुरुषभेद उत्पन्न होतो. मोठा आकार, अन्नसामुग्री व चलनाभाव ह्या गोष्टी स्त्री- पेशींत दृढ होतात व सूक्ष्म आकार, अन्नभाव व गति क्षमता हीं लक्षणें पुरुष-पेशींत वृद्धिंगत होतात. एकदां ह्या गोष्टी पूर्णपणें प्रस्थापित झाल्यावर पुढील वरच्या दर्जाच्या वनस्पतीमध्यें स्त्रीपुरुष- लिंगदर्शक जननेंद्रियें ह्या श्रमविभागतत्त्वावरच बनत जातात व त्यांत अधिकाधिक भेद उत्पन्न होत जातो. मात्र गर्भधारणा सहज रीतीनें घडून येईल अशी रचना प्रत्येकीस येत जाते. विशिष्ट रचना असणें ही गोष्ट दुय्यम महत्त्वाची आहे. जेणेंकरून पुंतत्वपेशीस सहजरीतीनें स्त्रीतत्वपेशींशीं अगर गर्भाण्डाशीं संभोग पावतां येईल ती रचना प्रत्येकास मिळते. केवळ श्रमविभाग तत्वावरच तो लिंग -भेद उत्पन्न होतो. स्त्री पुरुषलिंगभेदामुळें अर्भकाची सोय होते, ज्या पेशीमुळें अथवा पेशिरचनेमुळें उत्पन्न होणार्‍या अर्भकास पोषण व संरक्षण या दृष्टीनें प्राथमिक सोय होते, त्या पेशीस अगर पेशिरचनेस स्त्रीलिंगदर्शक इंद्रिय समजणें योग्य आहे. उलट संयोगास अथवा गर्भधारणेस ज्या पेशीकडून अथवा पेशिमालिकेकडून प्रत्यक्ष चालन मिळतें त्यास पुरुषलिंगदर्शक इंद्रिय मानावें लागेल. स्त्री गर्भधारणा की ते व पुरुष गर्भसंस्कार करतो. एकाचें काम गर्भ धारण करण्याचें असून दुसर्‍याचें गर्भसंस्कार करण्याचें असतें. ह्या दोन भिन्न कार्याप्रमाणें प्रत्येकाची रचना व ठेवण हीं वेगवेगळीं होतात.

वंश- वृद्धींत संयोगाचें महत्त्वः- वंशृ वृद्धीच्या वेगवेगळ्या प्रकारांत संयोग व गर्भधारणा अधिक संकीर्णतेचीं असतात. तथापि सुद्धां वनस्पती त्या मार्गाचा अवलंब करून वंश- विस्तार करीत असतात. संयोगानें उत्पन्न होणार्‍या नवीन अंकुरांत अधिक जोम व प्रगमनशीलता आढळते व जीवनस्पर्धेंत ह्याच गुणांची आवश्यकता असल्यामुळें वनस्पती प्रसंगवशात् त्या संकीर्णमार्गाचें अवलंबन करून बीजोत्पादन करितात. आलिंब अगर पाणकेश ह्यासारख्या साध्या वनस्पतींतील पुनरुत्पादन कार्य साधणार्‍या जननपेशी व संयोगजन्यपेशी ह्या दोहोंची तुलना केल्यास संकटसमयीं कार्यशील कोण हें सहज कळून येतें. संयोगजन्य पेशींत अधिक दमदारपणा असून प्रतिकूल स्थितींत न उगवतां स्वस्थपणें विश्रांति घेऊन अनुकूल स्थिति येईपावेंतों त्या वाट पाहूं शकतात. पण ती शक्ति सर्व जननपेशींत नसते. म्हणून संयोग साधून प्रतिकूल कालांत संकटास तोंड देणार्‍या पेशीकडून प्रसंगवशात् वंश-वृद्धि करणें अधिक साहजिक आहे. प्रतिकूल काल नसेल तर बहुतेक संयोगाचा अवलंब वनस्पती करीत नाहींत. जेव्हां संयोगाशिवाय अन्यमार्गानें वंश-वृद्धि होते तेव्हां पूर्व शरीराच्या शाखा अगर पेशी वेगळ्या होऊन त्या स्वतंत्रपणें वाढतात. ह्या रीतीनें उत्पन्न होणार्‍या रोपड्यांत पूर्व रोप्याचेच गुण तंतोतंत उतरतात. जर सभोंवतालची परिस्थिती एकसारखी कायम राहिली व त्यांत बदल झाला नाहीं, तर ह्या रीतीनें वंश-वृद्धि होण्यांत तोटा नाहीं. पण नेहमीं परिस्थिती एकसारखी कायम टिकणें शक्य नसतें. त्यांत बदल होणें साहजिक आहे. अर्थात् त्या बदलणार्‍या स्थितीस योग्य अशी योजना म्हणजे संयोगानें वंशवृद्धि करणें होय. ह्यायोगें उत्पन्न होणार्‍या अंकुरांत स्त्रीपुरुषाचे गुण एकवटले जाऊन त्यांचा उपयोग बदलणार्‍या परिस्थितींत कायदेशीर होतो. जीवनकलहांत टिकणार्‍या गुणांचा परिपाक ह्या योगानें होतो. तसेंच पूर्वशाखेपासून नवीन शाखा वाढून जर वंश-वृद्धि एकसारखी होत गेली तर कांहीं कालानें त्या वनस्पतींत एक प्रकारचा शिथिलपणा येतो. हें शैथिल्य नाहींसें करण्यास प्रसंगविशेषीं संयोग होऊन वंशवृद्धि होणें अवश्य असतें. संयोगजन्य पेशींत स्त्रीपुरुषांचे कांहीं विशिष्ट गुण एकत्र होऊन त्या वनस्पतीची सुस्थिति कायम राहण्यास एक प्रकारचें उत्तेजन मिळतें. निरनिराळ्या गुणांचें एकीकरण होणें हाहि उद्देश संयोगानें साधितो. बाह्यतः बीजांत आईबापांपेक्षां फारसा फरक असेल असें वाटत नाहीं. परंतु वस्तुस्थिति वेगळी असते.

संकर साधण्यास निसर्गाची मदतः- एकाच फुलांत पुंकोश व स्त्रीकोश ह्या दोहोंची योजना असल्याकारणानें त्याच फुलांतील परागकणामुळें स्त्रीतत्वकेंद्राचें गर्भींकरण होऊन बीजोत्पादन नेहमीं होत असेल अशी कल्पना होते. पण निसर्गांत पुष्कळ वेळां ह्याहून भिन्न प्रकार आढळतो. भिन्न फुलातील स्त्रीपुरुष तत्व- केंद्रांचा संयोग होऊन बीजोत्पादन व्हावें अशी नैसर्गिक योजना असते. कांहीं फुलांत पुंकेसरांतील परागण व स्त्रीकोशांतील बीजाण्डें ह्या दोहोंची पक्क होण्याची वेळ भिन्न असते. परागकण स्त्रीकेसराग्रावर पडून सुद्धां कांहीं वेळां स्त्रीकोशांतील बीजाण्डें पक्व नसल्यामुळें त्यांची परागनलिका बनून पराग- वाहिनींत शिरण्यास प्रोत्साहन मिळत नाहीं. ह्या स्थितींत ते परागकण वाया जातात. परंतु असले परागकण वार्‍यानें उडून साहजिक दुसर्‍या फुलांवर पडले व त्यावेळीं तेथील बीजांण्डें पक्व व परागोत्सुक असलीं तर त्या परागकणांचा उपयोग होऊन तीं बीजाण्डें गर्भीकृत होतात. म्हणजे त्या दोहोंची पक्व होण्याची वेळ भिन्न असल्यानें संकर साधण्यास निसर्गाकडूनच मदत होते. कांहीं फुळांची ठेवण अशी असते कीं पुंकेसरावरील परागपिटिका बाह्यांगास कललेल्या असून त्यांतील परागकण बाहेर पडतात, त्यामुळें त्यांचा उपयोग त्या फुलांतील बीजाण्डांस कांहींच होत नाहीं. अशा ठिकाणीं फुलांतील पुंकेसराची विशिष्ट ठेवण म्हणजे एक त-हेनें संकर साधण्यास मदतच होय. कित्येत फुलांत स्वतःच्या पराग कणांचा उपयोग गर्भधारणेस होत नाहीं व कित्येकवेळां उलट ते सहजगत्या आंतील स्त्रीकेसाग्रावर पडले तर तो स्त्रीकोश खुरटून जातो म्हणजे स्वतःचे परागकण स्वतःस विषारी होतात. पण त्यास दुसर्‍या फुलांतील परागकण मिळाले तर त्यांचा उपयोग होऊन बीजोत्पाद होतें. म्हणजे त्या स्त्रीकोशास बीजें उत्पन्न करण्याची शक्ति नसतें असें नाहीं. अर्थात् स्वतःच्या स्त्रीपुरुषतत्वपेशींचा परस्परास उपयोग न होतां दुसर्‍या फुलास होतो. तेव्हां अशा ठिकाणीं संकर साधणें हाच एक उद्देश दिसतो. पाकळ्यांचे भपकेदार रंग व सुवास त्यांची रचना, मधोत्पादक पिंड, तसेंच फुलांच्या उमलण्याच्या वेगवेगळ्या वेळा वगैरे गोष्टी अप्रत्यक्षपणें संकर घडवून आणण्यास मदत करतात. फूलपांखारासारख्या कीटकांकडून परागकण एका फुलापासून दुसर्‍या फुलास पोहोचविणें व ततद्वारां संकर घडवणें ह्या कार्यांत निसर्गाचीच मदत असते. पराग पोहोंचविण्यास वारा, पाण्याचा प्रवाह अथवा किडे उपयोगी पडतात. मात्र हें कार्य त्याकडून सुरळीत व व्यवस्थित होण्यास त्यांची ठेवण, आकार, रंग, सुवास वगैरे गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या आढळतात.

संकर होऊन उत्पन्न होणार्‍या बीजांत अधिक जोम व तरतरीतपणा असतो. ह्याचें कारण असें दिसतें कीं दोन भिन्न सजातीय वनस्पतींच्या स्त्रीपुरुषतत्व- पेशींचा संयोग झाल्यानें उत्पन्न होणार्‍या बीजांवर अधिक उत्तेजक परिणाम होत असावा व त्यामुळें बीजांकुरांत अधिक जोम येत असावा. सारांश शरीर- वृद्धि व वंशवृद्धि हीं दोन कार्यें म्हणजेच जीवन होय व ह्यांतच इतर सर्व साधनीभूत कार्यांचा अंतर्भाव होतो. स्थूलमानानें विशिष्ट कार्य विशिष्ट इंद्रियाकडून होतें व ह्याच गोष्टीचें ठोकळ वर्णन या निबंधांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .