विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
जिरार :- मध्यप्रांत. जिल्हा वर्धा. हिंगणघाट तहशील. हिंगणघाटपासून २० मैलांवर हें मोठें खेडें आहे. क्षेत्रफळ ४००० एकर. लोकसंख्या ( सन १९०१) २२००. येथें शेख ख्वाजा फरीद नांवाच्या फकीराचें थडगें आहे. येथें खाण्याचीं पानें होतात. पूर्वी हें परगण्याचें ठिकाण होतें. हातमागावरील कापड व घोंगडया येथें तयार होतात.