प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जिजाबाई :- मराठी साम्राज्याचा संस्थापक जो शिवाजी त्याची ही आई. निजामशाहींतील सरदार शिंदखेडचा रहाणारा लुखजी जाधव याची जिजाबाई ही मुलगी. हिच्या आईचें नांव म्हाळसाबाई. जिजाबाईचा जन्म स. १५९५ त झाला. ही चार वर्षांची असतां  (१५९९),  शिमग्याच्या सणांत रंगपंचमीच्या दरबारांत मालोजी भोंसले वेरूळकर  ( हा लुखुजीच्या पदरीं नौकर होता)   याचा पुत्र शहाजी व ही यांचा जोडा पाहून थट्टेनें लुखजीनें त्यांचें लग्न लावावें असें म्हटलें. तेंच खरें धरून मालोजीनें जिजाला मागणी घातली; परंतु लुखजीनें म्हाळसाबाईच्या सांगण्यावरून तें नाकारिलें. तेव्हां मालोजीनें निजामशहाकडून लुखजीस प्रेष लावून हें लग्न घडवून आणलें (१६०४).  पुढें शहाजी हा निजामशाहीचा सर्वाधिकारी झाल्यावर त्याचें व जाधवांचें वांकडें आलें. माहुली किल्ल्यावरून शहाजी विजापुरकडे परत जात असतां दिवस भरत आल्यामुळें जिजाबाईस शिवनेरी येथें शहाजीनें ठेविलें; शिवनेर त्याच्या ताब्यांत होती. नव-याचें व बापाचें वांकडें आल्यामुळें जिजाबाई सदोदित शहाजीबरोबरच  ( स्वा-याशिका-यांतहि)  असे. तिला शिवाजीच्या पूर्वी तीन चार मुलें झालीं होतीं; परंतु ती अल्पवर्या होऊन वारली. नंतर संभाजी हा पुत्र झाला (१६२३.) त्याचें लग्न शिवनेरीच्या किल्लेदाराच्या मुलीशीं झालें   (१६३०.)   या सुमारास जिजाबाई ही लुखजीच्या हातीं लागली होती. परंतु तिनें शिंदखेडास जाण्याचें नाकारल्यावरून त्यानें शिवनेरीसच तिला ठेविलें. संभाजीच्या लग्नाच्या प्रसंगींच शिवाजीचा जन्म मित्ती शके १५५१ फाल्गुन वद्य ३ स.  ( १९ फेब्रुवारी स. १६३० जुनी पद्धति)  झाला. या सालीं शहाजीनें तुकाबाई इच्याशीं लग्न लाविलें होतें. पुढें जिजाबाईस तिचा चुलता जगदेव यानें आपल्या घरीं नेलें. मध्यंतरीं मोंगलांनीं शहाजीचा अपमान करण्याकरितां तिला शिवाजीसह पकडलें होतें.  (१६३३). परंतु जगदेवाच्या सांगण्यावरून त्यांनीं तिला मुक्त केलें. तेव्हां शहाजीनें तिला पुणतांब्यानजीक विजापुर येथें सुरक्षित नेऊन ठेविलें   (१६३४).  निजामशाही नष्ट झाल्यावर स्वतंत्र राज्य स्थापण्याचा शहाजीचा विचार होता व त्यास अनुसरून त्यानें अनेक उलाढाल्या केल्या. त्या व लुखजीच्या बहुतेक उलाढाल्या जिजाबाईच्या डोळयाखालून गेल्या होत्या. राजकरणाचें शिक्षण तिला शहाजीकडून प्राप्त झालें होतें. शहाजीला अनेक कारणांमुळें स्वतंत्र राज्य स्थापितां आलें नाहीं. तेव्हां शिवाजीकडून स्थापवावें असें ठरवून शहाजीनें ती कामगिरी जिजाबाईच्या हातून  (आपल्या अंत:स्थ मदतीच्या जोरावर )  करविण्याचें ठरविलें व ती तिनें पार पाडली असें कै. वासुदेवशास्त्री खरे वगैरे इतिहासज्ञांचें मत आहे. गागाभटटानें तिला शिवराजप्रशस्तींत जनजीवनदानहेतु व सकलारिविनाशिनी हीं विशेषणें लाविलीं होतीं. महाबळेश्वरास ता. ६ जानेवारी १६६५ रोजीं सूर्यग्रहणाच्या दिवशीं जिजाबाईची तुळा झाली होती.


जिजाबाई ही मानी, निश्चयी, धाडसी व स्वतंत्रवृत्तीची होती. शहाजीच्या सल्ल्यावरून ती शिवाजीस लहानपणापासून घेऊन पुणें येथें राहिली. तिनें शिवाजीस राजास आवष्यक असें सर्व प्रकारचें शिक्षण दिले. महाभारत, रामायणादि पुराणांतील कथा व आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या गोष्टी सांगून, तसेंच भोंसल्यांच्या कुळांत शककर्ता निर्माण होऊन तो हिंदूचें स्वतंत्र राज्य स्थापन करणार आहे असा देवीचा वर मालोजीस मिळाल्याचीहि गोष्ट सांगून तिनें बालशिवाजीच्या मनांत राज्यसंस्थापकाचे गुण व शककर्ता तो मीच ही भावना निर्माण केली. कथापुराणें, साधुसंतांचीं दर्शनें वगैरे धार्मिक गोष्टींकडेहि तिनें त्याचें चित्त लाविलें होतें. ती स्वत: शूर असून, तिला लिहितां वाचतां येत असे. तिनें स्वत:च्या अखत्यारींत पुष्कळ कारभार उरकले होते. शहाजी कर्नाटकांत असतां व शिवाजी लहान असतां, पुण्याकडील जहागिरीचा सर्व कारभार ती जातीनें पहात असे; तिनें न्यायनिवाडेहि केले होते. शिवाजी मोठा झाल्यावरहि मोठमोठया मसलतींत ( उ. शहाजीची कैद)   व महत्त्वाच्या घडामोडींत तो तिची सल्लामसलत घेत असे. समाजसुधारणेच्या बाबतींतहि तिनें त्या काळीं अघाडी मारली होती. फलटणचा बजाजी निंबाळकर हा मुसुलमान झाल्यानंतर जिजाबाईनें समस्त मराठा मंडळ मिळवून त्याला शुद्ध करवून त्याच्या मुलास  (महादजी)  आपली नात  (शिवाजीची मुलगी सखुबाई) दिली (१६५७). पुढें  शिवाजीशीं तह करण्याकरितां विजापूर दरबारानें शहाजीस पाठविलें. त्यावेळीं या पतिपत्नींची  (जवळ जवळ १५।२० वर्षांनीं)  भेट झाली. आपण मनांत धरलेला स्वराज्यस्थापनेचा हेतु, जिजाबाईनें शिवाजीकडून पार पाडविल्याचें पाहून शहाजीला फार समाधान वाटलें  (१६६२).   सहा महिने शहाजी इकडे राहून नंतर परत गेला. पुढें थोडयाच दिवसांत शहाजी वारल्यामुळें  (१६६४), जिजाबाई सती जात असतां तिला शिवाजीनें मोठया आग्रहानें राहविले. अफझल मेल्यावर या एकंदर प्रसंगावर जिजाबाईनें अज्ञानदास  (पहा)  शाहिराकडून एक पोवाडा रचविला. शिवाजीनें तिच्या तैनातीसाठीं   (देवतार्चन, दानधर्म वगैरेचें)  एक स्वतंत्र खातें   (दिवाण, चिटणीस, फडणीस, पोतनिस, पुराणिक)   च ठेविलें होते. प्रजेचा परामर्श शिवाजीपेक्षांहि ती जास्त घेई. सईबाई वारल्यामुळें लहानग्या संभाजीची काळजी सर्व प्रकारें जिजाबाईच करी. पुढें मनांत बाळगलेला शेवटचा हेतु  (शिवाजीचें राज्यारोहण) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६  रोजीं पाहून, अकरा दिवसांनीं जेष्ठ वद्य नवमीस बुधवारीं दोन प्रहरीं रायगडच्या खालीं पाचाड येथें राजमाता जिजाबाई दिवंगत झाली ( ता.  १७ जून १६७४.) तिच्या नांवाची जिजापूर म्हणून एक पेठ पुणें शहरापासून जवळ असलेल्या पाषाण नांवाच्या गांवाजवळ वसलेली होती, तेथील महादेवाच्या देवळाचा जीर्णोध्दार तिनें केला होता.  (शिवदिग्विजय, सप्तप्रकरणात्मक चरित्र; मराठी रियासत, पु. १; वुसातनेसळातीन तंजावरचा शिलालेख; भा. इ. सं. मं. चतुर्थसंमेलनवृत्त.)


जिजाबाई (धाकटी) :- ही कोल्हापूरकर पहिल्या संभाजीची बायको व ताराबाईची सून. या सासवासुनांचें फार वांकडें होतें. हिचा व इचलकरंजीकर अनूबाईचा ऋणानुबंध असे. वारणातीरीं झालेल्या लढाईंत श्रीनिवासराव प्रतिनिधीनें संभाजीचें सर्व कुटुंब कैद केलें होतें, त्यांत ही होती. पुढें हिला व हिच्या सवतींनां पन्हाळयास पोहोंचविण्यांत आलें. ही बाई फार हुशार व राजकारणी होती. संभाजी बहुधां हिच्याच सल्यानें वागे. हिनें भगवंतराव आमात्यास लिहिलेलीं राजकारणविषयपर बरींच पत्रें प्रसिद्ध आहेत. ही स्वभावानें क्रूर असून कडक शिक्षा करणारी, फार धोरणी, स्वकार्यसाधनांत मार्गांच्या न्यायान्यायाकडे न पहाणारी, संशयी अशी होती. कोल्हापुरचें राज्य स्थापण्याचें बरेचसें श्रेय तिला आहे. शाहूच्या वेळीं व पुढें थोरल्या माधवरावाच्या वेळीं कोल्हापुरराज्याचा बचाव हिच्याचमुळें झाला. ताराबाईप्रमाणें ही दृष्टी नसून प्रसंगीं तडजोड करून कार्य साधणारी होती. इ.स. १७३० च्या सुमारास तिचें व राजमंडळाचें वांकडें आलें होतें. ही जुलमी होती. एकदां तर हिनें करवीरच्या शंकराचार्यांच्या मठाच्या जागेंतच स्मशानाच्या भिंती घातल्या. त्याबद्दल आचार्यांनीं थेट पुण्यास पेशव्यांकडे फिर्यादी केल्या; पेशव्यांनीं तिला याबद्दल सांगितलें. पण तिनें आपला हेका तडीस नेला. ती थोडीशी ब्रह्मद्वेष्टीहि होती. हिनें नानासाहेब पेशवे यांच्याकडून कोल्हापूरचें राज्य राखीन असें वचन घेतलें होतें. या वचनामुळेंच पुढें रावबाजीच्या कारकीर्दीत कोल्हापुरकरांनीं पेशव्यांच्या राज्यांत अतिशय धुमाकूळ घातला असतां, व कोल्हापुरचें राज्य नामशेष करण्याचें सामर्थ्य परशुरामभाऊसारख्या सेनापतीच्या अंगीं असतांहि हें राज्य खालसा करण्याचें पेशव्यांच्या मनांत आलें नाहीं. नानासाहेब पेशव्यांनीं या बाईला पुण्यास आणून तिचा मानसन्मान केला होता. हिचें माहेर तोरगलकर शिंदें घराण्यांतील होतें. हिच्याच भीतीनें रामराजास पानगांवीं गुप्तपणें ठेवण्यांत आलें होतें. त्याला ठार मारण्यासाठीं तिनें एकदां बावडयावर स्वारीहि केली. संभाजी निपुत्रिक मेल्यावर हिनें शिवाजी नांवाचा पुत्र दत्तक घेऊन राज्यकारभार आपल्या हातीं घेतला. प्रथम पेशव्यांनीं या दत्तकास हरकत घेतली होती. हिच्याच कारकीर्दींत इंग्रजांनीं मालवणचा किल्ला घेऊन कोल्हापुर दरबाराशीं तह केला. मालवण गेल्याबद्दल तिला फार वाईट वाटलें व तिनें तो परत घेण्याबद्दल सक्तीचें हुकूम सोडले. ही पन्हाळयाच्या देवीला जिवंत माणसाचा बळी नेहमीं देत असे. ''बळी देण्यासाठीं नवीं नवीं माणसें मिळविण्याकरितां जिजाबाई रात्रौ नेहमीं पन्हाळयाच्या आसपास हेरांच्या टोळया रवाना करी आणि गडाच्या आंतील एका गढींत एका ठिकाणीं बळी देत.'' ही स. १७७२ त मरण पावली. ( इचलकरंजीचा इतिहास; डफ; मराठी रियासत भा. २; मोडककृत कोल्हापुर ग्याझेटियर; म. इ. सा. खंड ८.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .