प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जाहिरात :- विसावें शतक हें जाहिरातीचें युग असें मानतात व तें पुष्कळ अंशीं खरेंहि आहे. आधुनिक व्यापारी जगांत जाहिरातीला अंदाजाबाहेर महत्त्व प्राप्त झालें आहे. 'कलियुगांतील पंधरावी विद्या' असें जें रा. न. चिं. केळकर यानीं एके ठिकाणीं जाहिरातीचें वर्णन केलें आहे तें अगदीं समर्पक आहे. पाश्चात्य  देशांतच काय पण भौतिक सुधारणेंत फार पाठीमागें असलेल्या आपल्या हिंदुस्थानांतहि शहरांतूनच नव्हे तर खेडोपाडींहि जाहिरातींचा सुळसुळाट झालेला दृष्टीस पडतो;  व प्रत्यहीं जाहिरातीची लोकप्रियता व प्रसार वाढत चालल्याचें दिसून येतें.

फायद्याशिवाय अथवा जरूरीशिवाय कोणीहि एखादी नवी गोष्ट करीत नाहीं, हा मनुष्यमात्राचा स्वभावधर्म आहे. जाहिरातीमध्यें  वरील कोणता तरी हेतु साध्य होत  असल्याशिवाय त्याची इतकी वाढझालीच नसती. जाहिरातीला आज जें विलक्षण महत्त्व प्राप्त झालें आहे त्याचें कारण जाहिरात देण्याची आज जरूरी भासूं लागली आहे एवढेंच नसून जाहिरातीपासून बराच फायदा आहे अशी लोकांची खात्री पटत चालली आहे. हेंहि दुसरें आणि महत्त्वाचें कारण होय. जाहिरातीची उपयुक्तता लोकांनां पटत चालल्यामुळें,अमेरिकेंत या शास्त्राचा शिक्षणक्रमांत समावेश करण्यांत आला आहे; व या विषयाचा शास्त्रीय पद्धतीनें अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. व्यापाराच्या वाढीला जाहिरात हें महत्त्वाचें साधन होऊन बसल्यामुळें त्या साधनाचा शास्त्रीय पद्धतीनें अभ्यास करण्याची जरूरी विद्वांनां भासूं लागली आहे.

जहिरातीचा उगम अगदीं अलीकडे झाला ही गोष्ट खरी आहे. पण पूर्वीच्या काळींहि जाहिरातींची कल्पना अगदींच अपरिचित होती असें नाहीं. हल्ली ज्याप्रमाणें या साधनाला महत्त्व प्राप्त झालें आहे. त्याला शास्त्रीय स्वरूप देण्यांत आलें आहे, त्या प्रकारची स्थिति प्राचीन काळीं नव्हती; पण जाहिरातीच्या मुळाशीं असलेलें तत्त्व प्राचीन काळींहि लोकांनां संमत होतें असें दिसून येतें. पूर्वीच्या काळचे व्यापारी लोक आपल्या मालाचा खप वाढविण्यासाठीं, निरनिराळया लोकांनां आपला माल दाखविणें, आपल्या परिचयाच्या मंडळींकडून त्या मालाची शिफारस करविणें इत्यादि उपाय अंमलांत आणीत असत. निरनिराळया उत्सवाच्या प्रसंगीं अगर जत्रांच्या प्रसंगीं आपला माल तेथें नेऊन त्या ठिकाणीं जमलेल्या, निरनिराळया स्थानाहून आलेल्या लोकांत आपल्या मालाचा प्रसार करीत असत. तात्पर्य या ना त्या कोणत्यातरी स्वरूपांत या जाहिरातीची कल्पना तत्कालीन लोकांत प्रसृत होती. फक्त इतर साधनांची त्यावेळीं अनुकलता नसल्यामुळें त्या कल्पनेच्या वाढीला यथोचित अवसर मिळाला नाहीं. प्राचीन काळीं हल्लीप्रमाणें दळणवळणाचीं साधनें विपुल नव्हतीं. मुद्रणकलेचा जन्म अद्यापि झाला नव्हता. वृत्तपत्रांची सोय नव्हती. अर्थात् जाहिरातीला अत्यंत उपयुक्त साधनांचा त्या वेळीं अभाव असल्यानें या शास्त्राला हल्लीचें स्वरूप् प्राप्त होणें अशक्य होतें.

१५ व्या शतकांत मुद्रणकलेचा जन्म झाल्यानंतर जाहिरातीची कला झपाटयानें वाढूं लागली. इंग्लंडमध्यें स. १६२२ च्या मे महिन्यांत पहिलें वृत्तपत्र प्रसिद्ध झालें. त्यानंतर २५ वर्षांनीं म्हणजे स. १६४८ मध्यें वृत्तपत्रांतून पहिली जाहिरात फडकली. ही जाहिरात खालीलप्रमाणें होती. 'डिव्हाईन चर्च ऑफ इंग्लंड या नांवाचें इंग्लंडच्या पाद्यांनीं नांवाजलेलें, लंडन शहरांतील प्रसिद्ध अधिका-यांनीं संग्रहित केलेलें, दुरुस्त्या करून वाढविलेलें, इंग्लंडच्या प्रधानमंडळाविरूद्ध घेतल्या गेलेल्या आक्षेपांनां समर्पक उत्तरें ज्यांत सांपडतील असें. जोसेफ हॅनस्कॉट आणि जॉर्ज कॅल्व्हर्ट यांच्याकरितां छापून प्रसिद्ध केलेलें पुस्तक आहे. याच्या प्रती स्टेशनर्स हाल व ओल्ड चेंजमधील गोल्डन फ्लीस येथें मिळतील.'

प्रथम प्रथम पुस्तकांच्या व औषधांच्याच जाहिराती वर्तमानपत्रांतून चमकत असत. पण पुढें सर्व प्रकारच्या जाहिराती वृत्तपत्रांतून चमकूं लागल्या. मुद्रणकलेचा प्रसार सर्व राष्ट्रांतून होतांच जाहिरातीच्या कलेचाहि प्रसार झपाटयानें होऊं लागला. या विद्येंत अमेरिकेनें सगळयांत आघाडी मारली. जाहिरातीला शास्त्रीय स्वरूप देण्याचें सर्व श्रेय अमेरिकेला दिलें पाहिजें. अमेरिकेंत सालिना जाहिरातीवर ६० । ७० कोटी डॉलर्स खर्च होतात. इंग्लंडमध्यें जाहिरातींवर सालिना दहा कोटी पौंड खर्च होतात. यावरून जाहिरातींचा व्याप किती प्रचंड आहे हें दिसून येतें.

इतका अतोनात खर्च जाहिरातींवर करण्यांत जाहिरातीपासून काय फायदे होतात असा कोणी प्रश्न केल्यास तो अयोग्य होणार नाहीं. पण जाहिरातीपासून कोणते फायदे होतात हें पहाण्यापूर्वी जाहिरातीचें प्रयोजन काय हें थोडक्यांत पाहिलें पाहिजे. जाहिरातीचे मुख्य उद्देश म्हणजे  (१)  आपला माल  गि-हाइकाच्या नजरेस प्रामुख्यानें आणणें व  (२)  तो ज्याची विकत घेण्याची इच्छा नसेल त्याच्याहि गळीं उतरविणें: हे दोन्हीहि उद्देश महत्त्वाचे असले तरी त्यांतल्यात्यांत दुसरा उद्देश अधिक महत्त्वाचा आहे. कारण माल कितीहि चांगला असला अगर लोकांच्या डोळयांत तो भरला तर प्रत्येकजण तो घेईलच असें नाहीं. फार झालें तर तो त्या मालाची शिफारस करील पण नुसत्या तोंडी शिफारसीनें त्या मालाचा खप व त्यापासून व्यापा-यांनां द्रव्यप्राप्ति थोडीच होणार आहे. अर्थात् तो माल जेणेंकरून गि-हाइक विकत घेईल अशा प्रकारची युक्ति अमलांत आणली पाहिजे. यासाठीं गि-हाइकाला मोह पडेल अशा प्रकारची जाहिरात देणें हा एक महत्त्वाचा उपाय आहे. अर्थात् ज्या मानानें ज्याची जाहिरात लोकांनां अधिक पसंत पडेल त्याचाच माल अधिक खपणार हें उघड आहे. यामुळें कोणती जाहिरात लोकांनां पसंत पडेल इकडे व्यापा-यांचें लक्ष्य जाऊं लागलें. त्यामुळें या जाहिरातीच्या विद्येचा शास्त्रीय रीतीनें अभ्यास करण्याची आवश्यकता भासूं लागली. गि-हाइकांनां कोणत्या प्रकारची जाहिरात पसंत पडेल या विषयाचा विचार करतां करतां मनुष्याच्या अध्ययन करण्याचर जरूरी उत्पन्न होणें क्रमप्राप्तच झालें. अशा रीतीनें या विद्येचा निरनिराळया अंगांनीं अभ्यास सुरू झाला. या विद्येच्या अभ्यासकांच्या मतें जाहिरातीमध्यें खालील गोष्टींचा समावेश झाला पाहिजे.

(१)    जाहिरात चित्ताकर्षक असली पाहिजे. हें जाहिरातीचे आद्य लक्षण होय. जाहिरात जर चित्ताकर्षक नसेल तर लोकांचें लक्ष्य तिकडे वेधणार नाहीं; व त्यामुळें जाहिरात देणा-याचा माल फार खपणार नाहीं. हल्लीं तर जिकडे तिकडे जाहिरातींनां पीक आल्यामुळें, लोक जाहिराती वाचण्याचा कंटाळा करतात. अशा वेळीं त्यांचें लक्ष्य त्यांची इच्छा नसतांहि ज्यामुळें वेधलें जाईल अशा चित्ताकर्षक त-हेची जाहिरात असली पाहिजे. हल्लींच्या व्यापारी चढाओढीच्या युगांत ज्याची जाहिरात अधिक भपकेदार त्याच्या वस्तूचा खप अधिक अशी स्थिति झाली आहे. त्यामुळें जाहिरात देणा-या व्यापा-यानें आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या जाहिरातीपेक्षां आपली जाहिरात कशी भपकेदार होईल, कोणत्या स्थळीं,अगर कोठें दिली असतां ती लोकांच्या चटकन नजरेंत भरेल या सर्वांचा काळजीपूर्वक विचार करून जाहिरात दिली पाहिजे. नवीन नवीन साधनांच्या व सुधारणांच्या वाढीबरोबर जाहिरातीचें क्षेत्र व्यापक झालें आहे. नवीन नवीन जाहिरातीचीं साधनें अस्तित्वांत आलीं आहेत. चित्रांच्या द्वारें, विद्युत्प्रवाहाच्या सहाययानें, फोर्नोंच्या द्वारें, अशा अनंत त-हांनीं मालाची जाहिरात देण्यांत येऊं लागली आहे. यामुळें जाहिरात देण्याचें काम दररोज कठीण होत चाललें आहे. ( २)  जाहिरात मार्मिक व सूचक असली पाहिजे. जाहिरात द्यावयाची ती अगडबंब शब्दांनीं व भाकड वर्णनांनीं भरली नसली पाहिजे. तर जाहिरात चटकदार असली पाहिजे जाहिरात वाचतांच वस्तूचें फायदें काय आहेत हें ताबडतोब गि-हाइकाच्या लक्ष्यांत आलें पाहिजे.   (३) जाहिरात लोकांच्या मनांत कायम राहील अशा प्रकारची असली पाहिजे.  (४)  जाहिरातीवरून लोकांनां त्या वस्तच्या गुणाबद्दल खात्री पटली पाहिजे.  ( ५)   जाहिरात लोकांच्या मनोवृत्तींनां बरोबर पटेल अशी असली पाहिजे. ( ६) जाहिरात जुन्या वस्तूंचा खप  वाढविणारी व नवीन वस्तू वापरण्याची चटक लावणारी असली पाहिजे.

जहिरातीचीं साधनें :- जाहिरातीचीं मुख्य लक्षणें सांगितल्यावर जाहिरातीचीं साधनें कोणतीं आहेत त्यांचा विचार करूं. हल्लीचा जाहिरातदार मुख्यत: खालील साधनांचा उपयोग करतांना आढळतो.    (१)  मासिकें, वृत्तपत्रें  इत्यादि;   ( २)   भिंती, दिवे, फळे इत्यादि;  (३ ) पत्रें व माहितीपत्रें;  (४) कॅटलॉग, व  (५)  नाटकें, सिनेमा इत्यादि.

यांत वृत्तपत्रें, मासिकें यांचा नंबर सर्वांत पहिला लागतो. पाश्र्चात्य  व पौर्वात्या देशांतहि वर्तमानपत्रें व मासिकें यांचा खप वाढत्या प्रमाणावर असल्याकारणानें वृत्तपत्रवाचकांची संख्या सारखी फुगत असल्यामुळें अशा वृत्तपत्रांतून व मासिकांतून जाहिरात देणें हें फार फायद्याचें असतें. हल्लींच्या वृत्तपत्रांच्या उत्पन्नाची जाहिरात ही मोठी बाब होऊन बसली आहे. वृत्तपत्रकार जाहिरातदारांच्यासाठीं पुष्कळ सवलती द्यायला तयार असतात, याचें कारण त्यांनां वर्गणीदारांपेक्षां जाहिरातदारांच्या जाहिरातीपासून होणारें उत्पन्न अधिक असतें. ज्या वृत्तपत्राचा अगर मासिकाचा खप सर्वांत मोठा असेल त्याच वृत्तपत्राकडे व मासिकाकडे जाहिरातदार मिळतात, वाचकांनां अगदीं थोडक्या किंमतींत पुष्कळसा मजकूर वाचावयास मिळतो व जाहिरातदाराला जाहिरात दिल्यापासून फायदा होतो. असें हें परस्परावलंबनाचें नातें आहे.

या वृत्तपत्रांच्या व मासिकांच्या साधनाशिवाय दुसरें जाहिरातीचें साधन म्हणजे गांवांतील मुख्य मुख्य भागांतून भिंतीवरून जाहिराती लावावयाच्या अगर त्या भिंतीवरच जाहिरात रंगवावयाची; आगगाडयांमधून, गाडयांच्या बाहेरच्या बाजूंवर जाहिराती चिकटवावयाच्या अशा एक ना दोन, पुष्कळच त-हा सांगता येतील. अशा प्रकारच्या भिंतींवर अगर फळयांवर जाहिराती देण्यानें मालाचा खप पुष्कळ वाढतो. रस्त्यानें जाणा-या येणा-यांच्या नजरेस नित्य तीच जाहिरात पडत असल्यामुळें ती जाहिरात पहाणा-यांच्या मनांत ताजी रहाते व त्यामुळें, त्या जाहिरातींतील माल एखाद्यास खरेदी करावयाचा असल्यास तो त्याच दुकानांत नेमका जातो. वृत्तपत्रांतून अगर मासिकांतून जाहिरात देण्याइतकाच या प्रकारानें फायदा होतो. पण घरांच्या अगर सार्वजनिक भिंतीवर चित्रें काढणें, जाहिराती चिटकविणें, यामुळें शहराचा साधेपणा व सौंदर्य कमी कमी होत जातें, असें कांहीं विद्वानांनीं प्रतिपादन करण्यास सुरूवात केली आहे. कांहीं कांहीं भिंतीवरच्या चित्रांत अश्लीलपणा असतो. त्यामुळें लोकांच्या मनावर वाईट परिणाम होण्याचा संभव असतो. या दोन दृष्टीनीं ही दुसरी पद्धत अनिष्ट असल्यामुळें त्याला आळा घालण्यासाठीं प्रयत्न सुरू करण्यांत आले आहेत. निदान अगदी अष्लील जाहिरात असेल तर ती कायद्यानें बंद करता येते. स. १८९३ मध्यें लंडन येथें स्कापा नांवाची सार्वजनिक ठिकाणीं जाहिरात देण्याच्या अनिष्ट परिणामाला आळा घालण्यासाठीं एक राश्टीय सभा स्थापन झाली. या संस्थेनें आपलें हें कार्य सुरू केल्यामुळें या प्रकाराला आळा बसत चालला आहे. स. १८९४ च्या लंडन बिल्डिंग्स ॲक्टनें, लंडन काउंटी कौन्सिलनें इमारतीच्यावर तीन फुटांपेक्षा अधिक उंचीवर अगर मोठा खांब रोवून त्याच्यावर जाहिरात लावण्याला बंदी केली आहे. त्याचप्रमाणें दुस-या एका कायद्यानें, विद्युत्प्रकाषद्वारां अगर सर्च लाईटच्या सहाय्यानें  लोकांच्या नजरेस आपली जाहिरात आणण्याची मनाई केली आहे. स. १८५३ मध्यें गाडयांच्या अगर मोटारीच्या दोन्हीं बाजूंवर जाहिराती छापण्याला प्रतिबंध करण्यांत आला. सार्वजनिक जागीं मोठया अक्षरानें जाहिरात देण्यानें जर त्या भागाचें सौंदर्य कमी होत असेल तर ती जाहिरात लावूं न देण्यासाठीं एडिंबरोमध्यें स्वतंत्र कायदा करण्यांत आला व इंग्लंडमध्यें तसाच कायदा होण्याची चिन्हें दिसत आहेत.

सार्वजनिक भिंतीवर, जाहिराती डकविण्याच्या बाबतींतहि हळू हळू कायदे होऊं लागले आहेत. स. १८३९ च्या मेट्रोपोलिटन पोलिस ॲक्टान्वयें अनधिकृत जागीं जाहिरातीं डकविण्याला बंदी करण्याचा हक्क पोलिसांनां देण्यांत आला आहे. दि इंडिपेंडट ॲडव्हार्टाइंजिंग ॲक्टान्वयें अश्लील जाहिरातीबद्दल खटला करण्याचा हक्क नागरीकांनां देण्यांत आला आहे. स्टेशनावर ज्या अनेक जाहिराती चिकटविण्यांत येतात त्यानें उतारूंचा गोंधळ उडतो या सबबीबर त्यांनां आळा घालण्याचीहि चळवळ सुरूं झाली आहे. पण या चळवळीस अद्यापि यश आलेलें नाहीं व येण्याचाहि रंग दिसत नाहीं.

याशिवाय गि-हाइकाकडे आपल्या मालाच्या वर्णनाचीं पत्रें पाठविणें, आपल्या मालाचा कॅटलाग पाठविणें, इत्यादीहि अनेक प्रकार आहेत.

सार्वजनिक जागीं जाहिरात देण्याबद्दलचे नियम इतर देशांतूनहि झाले आहेत त्यांचीहि थोडक्यांत माहिती देणें जरूरीचें आहे.

फ्रान्स :- खासगी इमारतीवर जाहिरात चिकटवूं देणें न देणें हें त्या इमारतीच्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून असतें. सार्वजनिक जागीं सरकारी जाहिरातींशिवाय कोणत्याहि इतर जाहिराती चिकटविण्याची बंदी आहे. सरकारी जाहिराती पांढ-या कागदावर व इतर जाहिराती रंगीत कागदावर लिहिलेल्या असल्या पाहिजेत असा कायदा आहे. जाहिरातीचा आकार,  वगैरे बाबी ठरविण्याचा म्युनिसिपालिटयांनां अधिकार आहे. अश्लील अगर आक्षेपार्ह जाहिराती लावूं न देण्याचा पोलीसांनां पूर्ण हक्क आहे. शोभिवंत स्थानांच्या सौंदर्याचा नाश होत असेल तर तेथें जाहिराती लावण्यांत येऊं नये अशा प्रकारची चळवळ करण्यासाठीं १९०१ सालीं एक संस्था स्थापन झाली आहे.

जर्मनी :- इंपीरियल कमर्शिअल ऑर्डिनन्सच्या जुन्या कायद्यान्वयें, सार्वजनिक जागीं जाहिरात देण्याला पोलीस परवागी लागते. जाहिरातीसाठीं मुद्दाम खांब  वगैरे पुरण्यांत आले आहेत; व त्याच विवक्षित ठिकाणीं जाहिराती चिकटविल्या पाहिजेत. स्वत:च्या मालाच्या अगर इतर बाबींसंबंधांत घरवाल्यांनां जाहिराती चिकटवण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक वाहनांच्यावर जाहिराती चिकटविण्याला पूर्ण बंदी आहे. सौंदर्यविनाशक जाहिरातींनांहि मनाई आहे.

ऑस्टिया :- जर्मनीप्रमाणेंच ऑस्ट्रियांतहि जाहिरातीसंबंधाचे कायदे आहेत. हंगेरीमध्यें यासंबंधांत कोणत्याहि प्रकारचा कायदा करण्यांत आला नसून जाहिरातीसंबंधांतील सर्व अधिकार म्युनिसिपालिटयांनां देण्यांत आले आहेत.

इटली :- हंगेरीप्रमाणेंच इटलीमध्येंहि जाहिराती कोणत्या स्थळीं लावाव्यात इत्यादिसंबंधाचे नियम  ठरविण्याचा म्युनिसिपालिटयांनां अधिकार देण्यांत आला आहे.

स्वित्झर्लंड :- स्वित्झर्लंडमधील सर्व प्रांतांनां एकाच प्रकारचे जाहिरातीचे नियम लागूं नाहींत. निरनिराळया कॅंटन्सनीं आपापलें नियम ठरविलें आहेत. झूरिचमध्यें जाहिरात देण्याचीं स्थळें ठरविण्याचा पोलिसांनां अधिकार देण्यांत आला आहे. बर्नमध्ये तो अधिकार म्युनिसिपालिटीचा आहे. ल्युर्सनमध्यें खोटया वर्णनाच्या अगर हलक्या मालाच्या जाहिराती जाहीर ठिकाणीं लावण्याची बंदी करण्यांत आली आहे. स्थानसौंदर्यहानिकारक जाहिरातींनां बंदी करण्यांत यावी अशा प्रकारची चळवळ करण्याकरितां स्वित्झर्लंडमध्यें संस्था स्थापन झाली आहे.

अमेरिका :- अमेरिकेंतील सर्व संस्थानांनां आपल्या संस्थानांत जाहिरातीसंबंधीचें नियम करण्याचा अधिकार आहे. या संस्थानांपैकी पुष्कळ संस्थानांनीं आपल्या संस्थानांतील म्युनिसिपॅलिटयांकडे हा अधिकार सोंपविला आहे. प्रत्येक संस्थानचे नियम येथें देणें शक्य नाहीं. पण त्यांतल्या त्यांत विशेष  महत्त्वाचें नियम पुढीलप्रमाणें आहेत. न्यूयॉर्क संस्थाननें, लॉटरीच्या जाहिरातींनां बंदी केली आहे. सार्वजनिक रस्त्याच्या बाजूनें जाहिराती लावण्यास मॅसॅच्यूसेटस्नें बंदी केली कोलंबियानें सार्वजनिक जागीं जाहिराती वाटण्याला देखील बंदी केली आहे. शिकॅगो बोस्टन या संस्थानांनीं जाहिरातीच्या संबंधात फार कडक नियम केलें आहेत. फ्रान्स, बेल्जम, इटली, स्वित्झर्लंडमधील कांहीं प्रांत व युनैटेड स्टेट्समधील कांहीं संस्थानांनीं सार्वजनिक जागीं जाहिरात लावण्यास कर बसविला आहे.

जाहिरात संस्था :- जाहिरातींचा अतिशय व्याप वाढल्यामुळें व व्यापा-यांनां तर जाहिराती उत्तम रीतीने तयार करतां येत नसल्यामुळें या कामासाठीं स्वतंत्र संस्था उदयास आल्या आहेत. इंग्लंडमध्यें व अमेरिकेमध्यें तर या संस्था हजारांनीं  मोजण्याइतक्या स्थापन झाल्या आहेत. या संस्थांत जाहिराती उत्कृष्ट रीतीनें जाहिरातदारांनां तयार करून देण्यांत येतात. यासाठीं उत्कृष्ट लेखक व चित्रकार या संस्थांनीं गुंतविलेलें आहेत.

जाहिरातीचे फायदे व तोटे :- जाहिरातीमुळें तोटयांपेक्षां  फायदे अधिक होतात हें नि:संशय आहे. कांहीं विद्वानांनीं यासंबंधांत एक आक्षेप उपस्थित केला आहे; व तो म्हणजे पैशाचा व्यय होय. या विद्वानांचें म्हणणें असें आहे कीं एखादी नवी वस्तू अगर एखादा नवीन शोध  लागला तर तो लोकांनां कळावा यासाठीं जाहिरात देण्यास हरकत नाहीं पण प्रत्येक जुन्या पुराण्या वस्तूंचीहि जाहिरात देणें अर्थशास्त्रदृष्टया हानिकारक आहे. याचें कारण जाहिरातीवर जाहिरातदार जो पैसा खर्च करतो त्या मानानें तो त्या वस्तूची किंमत वाढवितो व त्यामुळें जाहिरातदाराचें नुकसान न होतां जाहिरातीचा खर्च वास्तविक गि-हाईकावर पडतो; पण हें म्हणणें खरें नाहीं. कारण ज्या मानानें एखाद्या वस्तूची जाहिरात व गाजावाजा अधिक होईल त्या मानानें त्या वस्तूचा खप अधिक होतो व मालाचा खप अधिक होत गेल्यास तो माल अधिक स्वस्त दरानें देणें व्यापा-याला परवडतें. तात्पर्य वरील आक्षेप खरा नाही. दुसरा आक्षेप असा आहे कीं या जाहिरातीच्या योगानें कमी परतीचा मालहि खपला जातो व त्यामुळें अशा प्रकारच्या कमी दर्जाच्या मालाला अधिक उत्तेजन मिळतें. पण हेंहि म्हणणें खोंटें आहे. कारण या व्यापारी चढाओढीच्या काळांत कमी दर्जाचा माल केवळ भपकेदार जाहिरातींच्या योगानें कांहीं काळ खपला तरी शेवटीं अस्सल व उंची मालाचीच सरशी होते व कमी दर्जाचा माल बाजारांत खपेनांसा होतो.

मालाची जाहिरात देतांना देखील सत्याचाच अवलंब करणें फायदेशीर व आवश्यक आहे असें  अलीकडे अनुभवास येत चाललें आहे. जाहिरातीचे फायदे सांगण्याची विशेष  आवश्यकता नाहीं. कारण जाहिरातीचें फायदे पुष्कळच आहेत व ते सर्वांना विदितच असतात. जाहिरातीनें नवीन मालाची माहिती होते, कोणता माल कोणत्या ठिकाणीं मिळतो तें कळतें, वस्तूचा खप अधिक होऊं लागतो, राष्ट्रीय व्यापाराची प्रगती होते; मनुष्याच्या गरजा वाढतात व त्यामुळें जागतिक सुधारणेंस मदत होतें. जाहिरातीचा शैक्षणिक दृष्टयाहि फार फायदा आहे.

हिंदुस्थान :- या विद्येंत हिंदुस्थान हा अद्यापि इतर राष्ट्रांच्या फार मागें आहे. पण ही स्थिती सुधारण्यासाठीं हिंदुस्थाननें नेटाचा प्रयत्न केला पाहिजे. जागतिक व्यापारी चढाओढींत हिंदुस्थान टिकावयाचा असेल तर तो पाश्र्चात्त्यांच्या निरनिराळया कला साध्य करून घेण्यानेंच टिकेल हें निर्विवाद आहे. हिंदुस्थानांत कांहीं कांहीं वस्तू पाश्चात्त्यांच्या वस्तूंइतक्या उत्कृष्ट तयार होतात. पण त्या वस्तूंची जाहिरात दिली न गेल्यानें लोकांनां त्या वस्तू कोठें तयार होतात व कोठें मिळतात हें समजतच नाहीं. व त्यामुळें परदेशी माल घेण्याकडे लोकांची प्रवृत्ति जाते. मुर्शिदाबाद येथें तयार होणा-या रेशमी हातरूमालासंबंधाची गोष्ट या दृष्टीनें मननीय आहे. इंग्लंडमधील एका गृहस्थानें मुर्शिदाबाद येथें तयार झालेला हातरूमाल इंग्लंडमधील एका कंपनींतून विकत घेऊन बंगालमधील एका अधिकारी मित्राकडे पाठवला व तशा प्रकारचे आणखी कांहीं हातरूमाल पाठवून देण्यासंबंधानें त्याला लिहिलें. या अधिका-यानें हा हातरूमाल कोठें होतो यासंबंधींची खूप चौकशी केली. पण त्याला पत्ता लागेना; शेवटीं हे हातरूमाल कोठें तयार होतात यासंबंधींची माहिती इंग्लंडमध्यें ज्या कंपनीला विचारण्यास त्यानें आपल्या इंग्लंडमधील मित्राला लिहिलें. त्यानें चौकशीं करून हे हातरूमाल मुर्शिदाबाद येथें तयार होतात असें त्या कंपनीनें कळविलें. आश्र्चर्य हें कीं हा मुर्शिदाबाद प्रांतावरचाच अधिकारी होता व असें असूनहि याला मुर्शिदाबाद येथें हातरूमाल होतात ही कल्पनाहि नव्हती. याचें कारण या मुर्शिदाबादमधील कंपनीनें स्वत:च्या मालाची जाहिरात मोठमोठया वर्तमानपत्रांतून कधींच दिली नव्हती. तात्पर्य हिंदुस्थानातील प्रत्येक व्यापा-यानें आपापल्या मालाची लोकांनां जाहिरातीच्या द्वारें माहिती करून देणें आवश्यक आहे. जाहिरातींत पैसे घालणें म्हणजे व्यापारांत भांडवल घालण्यासारखेंच आहे. त्याचा एकदम जरी फायदा दृष्टीस पडला नाहीं तरी त्याचा अखेरीस फायदा झाल्याशिवाय रहात नाहीं. जाहिरातीच्या योगानें व्यापाराचें क्षेत्र विस्तृत होतें. मालाचा सर्वत्र बोलबाला होण्याला जाहिरातीशिवाय आजकाल दुसरें कोणतेंहि सुलभ साधन नाहीं ही गोष्ट आपल्या व्यापाराची उन्नत्ति व्हावी अशी इच्छा बाळगणा-या प्रत्येक हिंदी  इसमानें लक्षांत ठेवली पाहिजे.

इतर देशांत जाहिरातीसंबंधानें जे नियम करण्यांत आले आहेत तशा प्रकारचे नियमहि हिंदुस्थानांत झालेले आढळत नाहींत. स्थानिक म्युनिसिपालिटयांनीं त्या बाबतींत फारसें लक्ष घातलेलें दिसत नाहीं त्यामुळें वाटेल त्या ठिकाणीं जाहिराती चिकटविण्यांत येतात. क्वचित् अश्लिल जाहिरातींहि चिकटविलेल्या आढळतात. तर म्युनिसिपालिटयांनीं यासंबंधींचा नियम करणें अत्यंत जरूर आहे.

(संदर्भग्रंथ :- ई. एस्. होल-ॲडव्हर्टायझिंग ॲन्ड प्रोग्रेस; डिल स्कॉट-दि थीअरी ॲन्ड प्रॅक्टिस ऑफ ॲडव्हर्टायझिंग; ट्रुमन ए डेवीज-प्रॅक्टिकल पब्लिसिटी; प्रो. हेस-प्रॉडक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग; दाबर-बिझिनेस आर्गनिझेशन; ऑस्बोर्न हँडबुक ऑफ ॲडव्हर्टायझिंग; मार्शमन -बिझिनेस ॲन्ड टेड; केतकर-संकीर्ण लेख.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .