प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जावा :- मलायाद्वीपकल्पाच्या सुंदा बेटाच्या समूहांतील एक मोठें बेट. या बेटाची लांबी पश्र्चिम ते  पूर्व ६२२ मैल व रूंदी ५५ मैल आहे. डच ईस्ट इंडिज सरकारची वसाहत या नात्यानें जावाला महत्त्व आलें आहे. मदुरा व इतर किरकोळ बेटें धरून जावाचें क्षेत्रफळ ५०९७० चौ. मै. आहे. पुलौ पनैटन हें मुख्य बेट सुंदा सामुद्रधुनींत असून त्याचें क्षेत्रफळ ४७ चौ. मै. आहे. बटेवियाच्या उत्तरेस 'द्विपसहस्त्र' वसलेलें आहे. पश्र्चिमेस सुंदा सामुद्रधुनीनें जावा व सुमात्रा अलग केलीं आहेत तर पूर्वेस वली सामुद्रधुनीमुळें बलिद्वीपकल्प व जावा हीं वेगळीं झालीं आहेत. जावाच्या दक्षिणेस हिंदी महासागर व उत्तरेस जावाचा समुद्र आहे.

जावाचे तीन भाग पाडण्यांत येतात. पश्र्चिम जावांत बंटम, क्रवंग व प्रेयंगर रीजन्सी आहेत व या सर्वाचें मिळून १८००० चौ. मै. क्षेत्रफळ आहे. या भागांत दक्षिणेकडील प्रदेश  उंच व उत्तरेकडील सखल आहे. प्रेयंगरचा पर्वत या भागांत असून त्यावर बंडोंम, पेकलोंगम, तेगळ, वंडग, गुरूत इत्यादि पठारें आहेत. प्रेयंगर या बटेव्हिया व बंटम यांच्या सरहद्दीला चिकटून हलीमन पर्वताची रांग गेली आहे.

मध्यजावा हा सर्वांत लहान भाग आहे. याचें क्षेत्रफळ १३२०० चौ. मै. आहे. यांत तेगळ, पेकलोंगम, व न्यूमास, बेगन केडू, जोकजकर्ता, सुरकर्ता या मुलुखांचा अंतर्भाव होतो. पूर्व जावांत टेबंग, मदियन, केदिरी, सुरवय, पझुरण, बेसुकी इत्यादि प्रदेश  मोडत असून त्याचें क्षेत्रफळ १७५०० चौ. मै. आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीनें पहातां जावाचा प्रदेश  पुष्कळ ज्वालामुखी पर्वतानें युक्त आहे. डॉ. व्हर्बेकच्या मतें जावामध्यें १२५ ज्वालामुखी डोंगर आहेत. पश्र्चिम जावांत ११ ज्वालामुखी असून ते सर्व हल्लीं नि:सत्व झाले आहेत. प्रेयांगरमध्यें यांची संख्या ५० असून त्यांपैकीं ५ काय ते जिवंत आहेत. मध्यजावामध्यें अवघे ५ जिवंत आहेत. मध्यजावामध्यें ६ पैकीं २ जिवंत असून पूर्वजावामध्यें २१ पैकीं ५ जिवंत आहेत. चेरी, बान, मूरियो, लहू, विलिस येथें प्रत्येकीं २ ज्वालामुखी असून ते सर्व निर्जीव झालेले आहेत. स्लामेटमधील २ ज्वालामुखींपैकीं एक मात्र अद्यापि जिवंत आहे. जावामधील प्रदेशाच्या निरनिराळया भागांत, सुपीकता व नापीकता यांचें, तसेंच उंचसखलतेचें प्रमाण भिन्न आहे. मथ्या व पश्र्चिम जावामधील किना-यालगतचा टापू सखल, दलदलीचा असून बाकीचा लागवडीला योग्य व सुपीक आहे. बन्यूमस व बगेलनच्या प्रदेशांत वाळवंट आहे, तथापि कांहीं भागांत तांदूळ उत्तम पिकतो. पूर्वजावांत ही वरील प्रकारची स्थिती आहे.

नद्या :- पश्र्चिम जावामध्येंची तरम व ची मनुक या मुख्यत: दोन नद्या आहेत. त्यांमधून नावामार्फत कॉफी व मिठाची नेआण होते. मध्य जावामध्यें पमली, चोमल, प्रोगो, सेरयू बोगावंतु, उपक इत्यादि नद्या आहेत. यांच्या कांठचा प्रदेश  फार सुपीक आहे. या नद्यांमध्यें दगड खडक वगैरे असल्याकारणानें या नद्यांमधून नावा चालणें दुष्कर होतें. पूर्वजावामध्यें लहान लहान नद्या पुष्कळ आहेत. सोलो, गेंटग, बँटस या त्यांतल्यात्यांत मोठया नद्या असून त्या नद्यांमधून नौका चालवितां येतात.

भूस्तर :- जावामधील बहुतेक सर्व भागांत तृतीय अगर चतुर्थ युगांतील अवशेष सांपडतात. क्वचित एओसीन युगांतील अवशेष, रेताड दगड, खडूचे दगडहि सांपडतात.

हवामान :- पश्र्चिम जावामधील हवामान निष्चितपणें सांगतां येतें पण इतर भागांतील हवामानामध्यें वारंवार बदल होत असल्यामुळें त्यासंबंधीं नक्की अनुमान काढतां येत नाहीं. एकंदरीनें हवा उष्ण आहे. त्यांतल्यात्यांत पूर्वजावा व मध्यजावाचा कांहीं भाग हे विशेष  उष्ण आहेत. जावामध्यें उन्हाळा व पावसाळा असे दोनच ऋतू आहेत. यूरोपप्रमाणें येथें वेगवान वारे सुटत नाहींत. मेघगर्जना, विजा वगैरे प्रकार नेहमीं आढळतात, पण विजांपासून प्राणहानि क्वचित् घडून येते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च इत्यादि महिन्यांत पाऊस जोरानें पडतो. पूर्व व मध्य जावामध्यें उत्तर किना-यापेक्षां दक्षिण किना-याच्या बाजूच्या प्रदेशांत अधिक व जोराचा पाऊस पडतो. मध्यजावामध्यें इतर सर्व भागापेक्षां पर्जन्याचें मान अधिक आहे.

प्राणी :- जावामध्यें सरक, डुकरें, बाँटगें व रूसा जातीचीं हरिणें, कांतजिल नांवाचा कस्तुरीमृगासारखा असणारा प्राणि, वाघ, चित्ता, जंगली मांजर, शिकारी कुत्रे, कलोंग नांवाचा एक प्राणि, कुबिन, बुक, लुटंग, कोळी या जातीचीं माकडें, ससा, उंदीर, अस्वल इत्यादि प्राणी आढळतात.

१९०० सालीं जावामध्यें ४१० प्रकारचे पक्षी होते असें व्होर्डरमन नांवाच्या एका संशोधकानें म्हटलें आहे. यांपैकीं पुष्कळसे पक्षी मनुश्यवस्तीच्या भागांत क्वचितच आढळतात. समुद्राच्या, सरोवराच्या अगर नदीकिना-याच्या प्रदेशांत बदकें, ससाणे इत्यादि पक्षी आढळतात. घुबडाचेंहि येथें अस्तित्व आहे. जावामधील मोर हिंदुस्थानांतील मोरापेक्षांहि सुंदर असतो. पोपटाच्या येथें दोन जाती आढळतात. पोपटांनांहि अनुकरण व बोलण्याची नक्कल करणें या बाबतींत मागें टाकणारा व केवळ जावामध्येंच सांपडणारा असा एक पक्षी आहे. मधमाशांच्या व भुंग्यांच्या निरनिराळया जाती येथेंच आढळतात. कंत्रिलन नांवाच्या पक्ष्याची गोड आवाजाबद्दल फार प्रसिद्ध आहे.

जावाच्या पाण्यांमध्यें माशांच्या हजारों जाती आहेत असें तज्ज्ञांनीं सिद्ध केलें आहे. हे मासे निरनिराळया रंगाचे व निरनिराळया त-हेचे असतात. बटेव्हियाच्या भागांत जवळ जवळ ८० प्रकारचे मासे खाण्यासाठीं उपयोगांत आणले जातात. सापाच्या २४ हून अधिक जाती आहेत. किडयांचे प्रकार तर अगणीतच आहेत.

वनस्पती :- निरनिराळया वनस्पती, झाडें, लता इत्यादिकांची जावा येथें समृध्दि आहे. वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासकाला जावाहून दुसरें महत्त्वाचें स्थान मिळणें कठीण आहे.  बुइटेनझोर्ग येथील वनस्पतींची बाग अतिशय प्रसिद्ध असून त्यांत हरएक त-हेचे वृक्ष, लता, वनस्पती यांची समृध्दि आहे. जुन्या काळच्या अरण्याची यथार्थ कल्पना यावी यासाठीं छिबोडास येथें अरण्य राखून ठेवण्यांत आलें आहे व तें वाटेल त्यालला पहावयाला मोकळीक मिळते. सुमारें तीन हजार इतक्या निरनिराळया प्रकारच्या वनस्पती जावामध्यें आढळतात. उन्हाळयांत सर्वत्र हिरव्यागार पल्लवराजीनें खेडींपाडीं व शहरें आच्छादलेलीं असतात.

लोकसंख्या :- यावद्विपसंस्कृतीचा सविस्तर इतिहास पहिल्या विभागांत (प्रक. ६ वें) आलाच आहे. या ठिकाणीं थोडकयांत गोषवारा व इतर माहिती आढळेल. १९०५ सालच्या खानेसुमारीवरून पहाता जावाची लोकसंख्या ( मदुराप्रांत धरून )  ३००९८००५ होती. येथील वस्ती मुख्यत: जावानीज, सुंडानीज व मदूरीज अशा तीन जातींच्या लोकांची आहे. जावानीज व सुंदानीज यांच्यामध्यें स्थूल फरक म्हटला म्हणजे जावानीज लोकांवर हिंदूधर्माचा परिणाम झालेला दिसतो व तो सुंदानीजवर झालेला दिसत नाहीं हा होय. तीन्हीहि जातींचें लोक मलयवंशाचे आहेत. पण परिस्थितीमुळें या तीन्ही जातींमध्यें थोडाफार फरक पडला आहे. सुंदानीज लोकांच्या शरीराची ठेवण व त्यांची राहणी मलयवंशीय लोकांसारखी अद्यापि आहे. हे लोक पश्र्चिम भागांत रहातात. पूर्व जावामध्यें व विशेषत: मदुराबेटांत व त्याच्या आसपास मदुरीज लोक रहातात. तेगलपेक लोंगन, बगेलन, केदु, सेमरंग, जपुरा, सुरकर्ता, बन्यूमास इत्यादि ठिकाणीं जाव्हानीज लोकांची वस्ती आहे. या तीन्ही जातींच्या लोकांत जावानीज लोक अधिक सुधारलेले आहेत. संख्येनेंहि त्यांचाच नंबर पहिला लागतो.

जावामधील लोक वर्णानें पीत पिंगट रंगाचे आहेत. त्यांतल्या त्यांत जावानीज हे अधिक कृष्णवर्णीय आहेत. या लोकांचे डोळे भुरे अगर काळे असून त्यांचे केंस लांबलचक काळेभोर व राठ असतात. वक्षस्थलावर अगर इतर अवयवांवर केंस आढळत नाहीं. अंगाबांध्यानें जावानीज हा सुंदानीजपेक्षां उंच असतो पण सुंदानीज हा अधिकक धष्टपुष्ट असतो. मदुरीज लोक उंच व धष्टपुष्ट असतात.  सुंदानीज लोकांचे डोळे तिरकस असतात. जावांतील लोकांचें नाक चपटें व लहान असतें पण नाकपुडया फुगीर असतात. ओठ जाड असतात. दांत जात्या पांढरे पण निगा न राखल्यानें पिवळे झालेले असतात. दिसण्यांत जावानीज व मदुरीज हे सुंदानीजपेक्षां तरतरीत दिसतात. पुरूषांपेक्षां बायका अशक्त असतात. पीतवर्ण हा बायकांच्या सौंदर्याचा निदर्शक समजला जातो. जावांतील लोक पूर्वी युद्धनिपुण शूर लोक होते पण हल्लीं ते शांत. साधे व मेहनती बनलेले आहेत.

जावामधील घरें बहुतेक बांबूचीं असतात. कांहींचीं घरें लांकडाचींहि असतात. श्रीमंतांचीं दगडी घरें असतात. या लोकांचें मुख्य खाद्य तांदूळ आहे. हे लोक मासे व मांसहि खातात. यांची कौटुंबिक पद्धतीची रहाणी आहे. वरिष्ठ वर्गांत बहुपत्नीकत्वच रूढ आहे. पण खालच्या वर्गांत बहुधा एकपत्नीकत्वच रूढ आहे. जावामधील लोक मुसुलमान आहेतसे वाटतात. पण ते खरेखुरे बुद्धधर्मीय आहेत. त्यांचे आचारविचार मुसुलमानी आचारांपेक्षां पुराणवन्यधर्माच्या आचारविचारांशीं जुळतें आहेत. वरिष्ठ जातींची रहाणी मात्र इस्लामी पद्धतीची आहे. मक्केला जाणें हें पवित्र कर्तव्य होय अशी जावांतील लोकांची समजूत आहे. प्रत्येक शहरांत एक तरी मशीद आहेच. ख्रिस्ती उपदेशकांची येथें फारशी डाळ शिजलेली दिसत नाहीं.

जावाची राजधानी बटेव्हिया असून तिची लोकसंख्या सवालक्ष आहे. याशिवाय सेरंग, अंजेर, पंडेग्लंग, टंगेरंग, बटेंझोर्ग, क्रवंग, वन्यस, बंडग, चंजर, सुक्यूमी, सुकेदंग जरूत, तसीकमलय, इत्यादि शहरें आहेत. पंडेग्लंग येथें गंधकाचे व उष्ण झरे आहेत. बुटेंझोर्ग येथें सुंदर बागा आहेत. प्रेयंगर जिल्हयांत धबधबे पुष्कळ आहेत. सुकबूमी हें हवेचें ठिकाण आहे. चिचलेंका येथें कॉफी मोठया प्रमाणांत तयार होते. तसिकमलयाचा टापू सृष्टिसौंदर्याच्या दृष्टीनें अत्यंत मनोहर आहे. चेरीबोन येथें जुन्या सुलतानांचे राजवाडे, चिनी देवालय, ख्रिस्ती उपासनामंदीर, मिठागरें आढळून येतात. इंद्रमयू बंदर तांदुळाच्या व्यापाराबद्दल प्रसिद्ध आहे. तेगल येथें साखरेचे पुष्कळ कारखाने आहेत. सेमरंग येथें प्रिन्स ऑफ ऑरेंज किल्ला, कॅथॉलिक चर्च, प्रॉटेस्टंट चर्च, मशीद व एक लष्करी दवाखाना आहे. येथें नुकतीच रेल्वे सुरू करण्यांत आली असल्यानें या शहराचें वैभव वाढत आहे. डेमक हे शहर पुराणप्रसिद्ध आहे. येथें स. १८४५ मध्यें, तेथील सुलतानानें एक सुंदर मशीद बांधली होती. तिचा कांहीं भाग अद्यापि राखून ठेवण्यांत झाला आहे. सात वेळां डेमकला गेल्यास मक्कायात्रेचें श्रेय मिळतें. या ठिकाणीं पुष्कळ थडगी आहेत. सलतिग येथें लष्कराची राहण्याची जागा आहे. केंदल हे साखरेबद्दल फार प्रसिद्ध आहे. कुदस येथें कापड तयार होतें. जपरा हें १७ व्या शतकांत मतरम राजांच्या राजधानीचें शहर होतें. जोगका हें शहर मोतीं व माणकें यांच्या व्यापाराबद्दल  फार प्रसिद्ध आहे. पसरगदेह येथें जुन्या राजघराण्यांतील पुरूषांचीं थडगीं आहेत.

शेती:- जावाच्या एकंदर जमीनीपैकीं शेंकडा ४० एकर जमीन शेतकीची आहे. जावामध्यें मुख्य पीक तांदुळाचें आहे. त्याशिवाय साखर, सिंकोना, कॉफी, तंबाखू, चहा, नीळ, इत्यादि वस्तूहि येथें पिकतात. साखरेचे कारखाने जावांत पुष्कळच आहेत. जावामध्यें १९०५ सालीं १०२८३५७ टन म्हणजे सुमारे १५०००००० पौंडांची साखर तयार झाली. साखरेखालोखाल निळीचें उत्पन्न येथेंच पुष्कळच आहे.

जावामध्यें म्हशी, गाई, बैल, घोडे, कुत्रीं मांजरें पुष्कळ आहेत. म्हशीचा प्रवेश जावांत हिंदूच्या मार्फत झाला असावा. जावा येथील घोडे खुजे पण सुरेख असतात. जावामधील लोक घोडयावर बसण्यांत फार तरबेज आहेत; व ते घोडयाच्या उत्पत्तीच्या बाबतींत फार काळजी घेतात.

खनिजसंपत्ति :- खनिजसंपत्तीच्या बाबतींत मात्र जावा फार मागें आहे. सोन्याचांदीचा जावांत अभाव आहे. जोकजकर्ता येथें व इतर कांहीं भागांत मँगनीजच्या खाणी आहेत. चिलचघ येथें लोहचुंबकाच्या रेताड खाणी आहेत. कोळसा पुष्कळ ठिकाणीं पण थोड्या प्रमाणांत सांपडतो. डे ग्रोटनें जावांत पेटोलियमचा शोध  लावल्यामुळें हा एक महत्वाचा धंदा जावांत सुरू झाला आहे. याशिवाय गंधक व मिठ यांच्या खाणीहि जावामध्यें आहेत.

दळणवळण :- सपाट प्रदेशावर, पठारावर व कांहीं ठिकाणीं ज्वालामुखीच्या टापूंतूनहि रेल्वे गेली आहे. समरंग-जोकजकर्ता, बटेव्हिया-बूटेंझोर्ग हें रेल्वेचे फांटे प्रमुख आहेत. याशिवाय सुरबय-पसुरूअन, बंगील-मुलंग, सिडोर्जो-परन, कर्टोसोनो-तुलंग, बुटेंझोर्ग-चियंझर, वगैरे बरेच रेल्वेचे फांटे आहेत. सुमारें ३५०० मैलांच्या टापूंत तारा पसरलेल्या आहेत. नौकानयन सुरू आहे. गांवांत ट्रमवे चालू आहेत.

राज्यव्यवस्था :- खेडें हें सगळयांत धाकटें परिमाण होय. अशा कांहीं खेडयांचा मिळून एक जिल्हा, अशा कांहीं जिल्हयांचें मिळून एक खातें, अशीं कांहीं खाती मिळून, एक रेसीडन्सी होते. प्रत्येक रेसीडेन्सीवर एक डच मनुष्य मुख्य असतो, व त्याच्या हाताखालीं एक असिस्टंट रेसीडेंट, एक कंट्रोलर व कांहीं अधिकारी असतात. सुरकर्ता व जोकजकर्ता या संस्थानांचा कारभार रेसिडेंटच्या देखरेखीखालीं सुलतान पहातात.

भाषा, वाड्:मय व संस्कृति :- “हिंदुस्थान व जग” ज्ञानकोष, विभाग १ ला - यावद्वीपसंस्कृति हें प्रकरण पहा.

प्राचीन अवशेष :- जावामध्यें फार प्राचीन कालचे अवशेष फारसे सांपडत नाहींत. मधून मधून दगडी हत्यारांचे अवशेष दृष्टीस पडतात. हिंदूराजांचा अंमल जावावर असतांना त्याच्या अमदानींत जीं देवालयें व मठ बांधले गेले त्यांचे अवशेष मात्र पुष्कळ सांपडतात व त्यांवरून तत्कालीन शिल्प किती उच्च दर्जाचें होतें याची साक्ष पटते. पूर्व व मध्य जावामध्यें हिंदूपद्धतीची देवालयें दृष्टीस पडतात; पण या दोन ठिकाणच्या देवालयांत फरक आढळतो. मदुरेंत एकहि हिंदू देवालय नाहीं. केंडलरीजन्सीमध्यें जी गांवें आहेत त्या गांवांचीं नांवें पाहिलीं असतां पूर्वी त्या ठिकाणीं शैवांचीं व बौद्धांचीं देवालयें होतीं असें वाटतें. बुद्धांचीं देवालयें आठव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान बांधलीं गेलीं असावींत असा इझरमनचा तर्क आहे. मध्यजावामधील देवालयांपेक्षां पूर्व जावांतील देवालयें नंतरची दिसतात महाराजा धीरथ आदित्यधर्मानें सातमजली विहार बांधल्याचा जो उल्लेख मेनंगकाबू शिलालेखांत आहे, तो विहार 'बोरोबुदर' होय असें कित्येक मानतात. ८४० सालच्या एका ताम्रपटांत डिएंग हा जावामधील एक पवित्र डोंगर होय असें म्हटलें आहे.

जावामधील देवालयांची रचना चालुक्य त-हेची आहे  असें फर्ग्यूसननें म्हटलें आहे, पण इझरमननें फर्ग्यूसनचें म्हणणें चुकीचें आहे असें दाखवून, देवालयांचा घाट द्राविडी पद्धतीचा आहे असें स्पष्ट व सप्रमाण सिद्ध केलें आहे. डिएंग पठारावर शिव, दुर्गा, गणेश यांचीं देवालयें दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणें चंडीअर्जुनी, चंडीश्र्चीखंडी, चंडीपंतदेव, चंडीपरकोसिता यांचीं देवालयें आहेत. या पठाराच्या ईशान्येस दरवती व परकोसिता यांचीं देवालयें आहेत. पूर्वेस पडकीं देवालयें आहेत. वायव्येस पुष्कळ देवालयें असून त्यांत संचकीचें देवालय चांगलें आहे. दक्षिणेस चंडीभीमाचें उत्कृष्ट देवालय असून त्या देवळाचा आकार मनो-यासारखा आहे. या एका देवळाची रचना चालुक्य पद्धतीची आहे. जावामध्यें जीं हिंदु देवालयें आहेत त्यामध्यें बोरोबुदर देवालय हें सर्वांत भव्य व कलाकौशल्याच्या दृष्टीनें जगांतील अति प्रसिद्ध देवालयांमध्यें मोडण्यासारखे आहे. हें केडू रेसिडेन्सीमध्यें प्रोगोच्या पश्र्चिमेस थोडया फार अंतरावर आहे. हें देवालय एका डोंगरावर असून त्याकडे जाण्यासाठीं चार मोठे जिने चढावे लागतात. या देवळांकडे जातांना मधून मधून दागोबा उभारलेले आहेत. या देवालयाचें शिल्प अशा त-हेचें केलें आहे की तें पहातांच मनुष्याचें मन संसारापासून परावृत्त व्हावें. पायथ्यापासून तो शिखरापर्यंतचा महायान पंथाचीं तत्त्वें खोदलेलीं आहेत. या देवालयांत बुध्दाच्या मूर्ती पसरलेल्या आहेत.

सुरकर्ता संस्थानांत प्रबंनन येथें हिंदू देवळें पुष्कळ आहेत. येथील देवालयांच्या समुहाभोंवतीं तिहेरी तट पसरला आहे. दुस-या व तिस-या तटाच्या मध्यें १५७ लहान लहान देवालयें आहेत. पश्र्चिमेकडील तटाच्या मध्यभागीं एक मोठें देवालय असून त्यामध्यें कालस्वरूपी शिव, गणेश, दुर्गा इत्यादि देवतांच्या मूर्ती आहेत. दक्षिणेच्या बाजूला चतुर्मुख ब्रह्मदेवाचीं व उत्तरबाजूला विष्णूचीं देवालयें आहेत. याशिवाय चंडीसेवू, चंडी लंवग इत्यादि पुष्कळच देवालयें आहेत. कांहीं कांहीं देवालयांवर लेख खोदलेले आढळतात.

पनबरम येथेंहि देवालयांचा समूह आहे. येथील मुख्य देवालय खोदकामाचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. बाहेरच्या द्वारपालांच्या मूर्तीचा पोशाख चिनी शिल्पकलेचा अवशेष या नात्यानें प्रेक्षणीय आहे. चिनी लोकांचे या देशांशीं पुष्कळ दळणवळण असल्यामुळें चिनी शिल्पाचें अवशेष येथें सांपडतात. व त्याचा अभ्यास करणें मनोरंजक व उपयुक्त आहे.

इतिहास :- यावद्वीप या नांवावरून जावा हें नांव पडलें असावें असें दिसतें. जावा देशाचा इतिहास देखील विश्र्चसनीय असा मिळत नाहीं. बाबद उर्फ पुराणें यांच्यावरून जो थोडा फार इतिहास उपलब्ध होईल तेवढाच. जावामध्यें १५ व्या शतकापर्यंत हिंदू लोकांची सत्ता प्रचलित होती. या हिंदूसत्तेच्या काळाचे मुख्यत: तीन विभाग पडतात. ते म्हणजे (१) बौद्धकाल,  (२)  षैवकाल व  (३) संधिकाल. जावामध्यें ज्या अनेक राजघराण्यांनीं राज्य केलें त्यांमध्यें मजपहित नांवाचें राजघराणें फार प्रबल म्हणून  प्रसिद्ध होतें.  या राजघराण्याच्या सत्तेखालीं जावाराष्टाची सत्ता परमुलुखावर देखील पसरली होती. त्यानंतर मुसलमान लोकांच्या स्वा-यांनां आरंभ झाला. यांनीं कांहीं काळपर्यंत आपला अंमल जावावर बसविला पण त्यानंतर युरोपियन लोकांची टोळधाड जावावर येऊं लागली. १५२० सालीं पोर्तुगीज लोकांनीं येथील रहिवाश्यांकडून व्यापाराची परवानगी मिळविली. पुढें या शतकाच्या अखेरिस डच लोकांनीं आपला पाय रोवण्यास सुरूवात केली. या सुमारास जावावर मतरमचें राजघराणें राज्य करीत होतें. या राजघराण्यांतील राजे आपल्याला जावाचे सम्राट म्हणवून घेत असत. त्यांच्या अमदानींत जावाची राजधानी कर्तसुरा ही होती. यांच्या अमदानींत डच लोकांनीं जकत्रा व त्याच्या आसपास आपला अंमल बसवला होता. १७०५ सालीं डच लोकांनीं जावाच्या राजाशीं तह धरून प्रेयंगरचें शहर मिळविलें. स. १७४५ मध्यें चेरिबॉन ते बन्यूनंगीपर्यंतचा सर्व मुलुख डच लोकांनीं आपल्या ताब्यांत आणला. स. १७५५ मध्यें मतरमच्या घराण्यांत बेबंदशाही माजून सुरकर्ता व जोक्जकर्त अशीं दोन राज्यें पडलीं. स. १८०८ मध्यें बतंमचें राज्य डच लोकांनीं जिंकलें.

स. १८११-१८१८ या अवधींत इंग्लिशांनीं जावावर आपली सत्ता प्रस्थापित केली. यावेळीं जावाच्या राजघराण्यांतील दीपनेगर या धाडशी व चतुर पुरुषानें या परकीयांच्या ताब्यांतून आपलें राज्य सोडविण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानें तो फसला व डच लोकांची सत्ता जावावर पूर्णपणें प्रस्थापित झाली. डच इंडियन सैन्यानें दीपनेगरला पकडण्यासाठीं सतत पांच वर्षे धडपड चालविली होती. या कामांत डच लोकांचें १५००० सेन्य कामाला आलें. पण दीपनेगर सांपडला नाहीं. हा असामान्य पुरुष स. १८५५ मध्यें मरण पावला. अद्यापिहि याची स्मृति जावानीज लोकांमध्यें ताजी आहे; व डच लोकांनां हांकून लावून पुन्हां एकद्देशीयांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठीं दीपनेगर हा पुन्हां पृथ्वीवर अवतरणार अशी अद्यापिहि लोकांची भावडी समजूत आहे. या भाबडया समजुतीला बळी पडून कांहीं कांहीं पुढा-यांनीं तीन चार वेळां बंडेहिं केलीं पण त्याला यश आलें नाहीं १८५० सालापासून डच लोकांची सत्ता पूर्णपणें प्रस्थपित होऊं लागली.  त्यांनीं डच कायदा या भागांत चालू केला. व्यापाराला त्यांनीं उत्तेजन दिलें. त्यांनीं मुत्सद्दीपणानें, जावामधील संस्थानें खालसा न करतां तीं एतद्देषीय राजघराण्यांतील पुरूषांच्याच ताब्यांत ठेवलीं. तेथील रहिवाष्यांशीं मिळतें घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचा आस्ते आस्ते फैलाव करण्यास सुरूवात केली. याशिवाय इतर बाबतींतहि ब-याच सुधारणा घडवून आणल्या व अशा त-हेनें आपली सत्ता चिरस्थायी केली.

(संदर्भग्रंथ - हिंदुस्थान आणि जग-ज्ञानकोश विभाग, स्टॅंफोर्ड रॅफलीस-हिस्टरी ऑफ जावा  (लंडन १८३०);  जंगहन जावा; सिडमोर-दि गॉर्डन ऑफ दि ईस्ट, न्यूयॉर्क १८९८; डे-दि पॉलिसी ऍंड दि अँडमिनिस्टेशन ऑफ दि डच इन जावा  (लंडन  १९०८).)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .