प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जॉर्जिया :- पूर्वी हें ट्रान्सकाकेशियामधील राज्य असून ऐतिहासिकदृष्टया २००० वर्षांपेक्षां जास्त पुरातन काळाचें आहे. त्याचें पहिलें प्राचीन नांव कार्थ्लि किंवा कार्थव्हेलि हें होय. इराणी आणि ग्रीक रोमन लोकांनां याचीं अनुक्रमें गुर्जिस्तान आणि आयबेरिया या नांवांनी माहिती होती.  याचें व्हस्थान हें आमोंनियन आणि ग्रुझिया हें रशियन नांव आहे. कार्थ्लि आणि कखेटिया या दोन प्रदेशांचा अंतर्भात करणा-या ख-या जॉर्जियाच्या मर्यादा :- उत्तरेस ओस्सेटिया आणि दाघिस्तान; दक्षिणेस एरिव्हन आणि कारस्थानें, पश्र्चिमेस गुरिया आणि इमेरिटिया अशा होत्या. या राज्यांत निरनिराळया वेळीं गुरिया, मिंग्रेलिया, अबखासिया, इमेटिया आणि दाघिस्तान हे प्रांतहि मोडत असत व याचा विस्तार उत्तरेस काकेशसरांगेपासून दक्षिणेस आरासपर्यंत असे. १९१७ सालपर्यंत टिफ्लीस आणि कुटैस या दोन रशियन प्रांतांत जॉर्जियाची विभागणी झाली होती. पण महायुद्धांत रशियाच्या साम्राज्याचा नाश झाल्यानंतर जॉर्जियानें आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून घेतलें. प्रथम कांहीं दिवस ट्रान्स्कॉकेशियस फेडरल रिपब्लिकमध्यें याची गणना होत असे पण पुढें जॉर्जियाचें रिपब्लिक अगदीं स्वतंत्र स्थापन झालें.

या जॉर्जियाच्या रिपब्लिकमध्यें टिफ्लिस, कुटैस, बाटुम, अर्ट्विन या प्रदेशांचा समावेश होतो. याच्या उत्तरेस कॉकेशियस पर्वताची रांग, पश्र्चिमेस काळा समुद्र व तुर्कस्थानची सरहद्द असून दक्षिणेस व पूर्वेस अनुक्रमें, एरिव्हन, व अझर बैजनचीं रिपब्लिक संस्थानें होतीं. अद्यापिहि या रिपब्लिकच्या भौगोलिक मर्यादा संपूर्ण व स्पष्ट त-हेनें आंखल्या गेलेल्या नाहींत. टिफ्लिसच्या टांपूत कुरानदी वहात गेली असून ती कास्पियन समुद्राला मिळाली आहे. कुटैस, बाटुम इत्यादि मुलुखांतून लहान लहान नद्या वाहत गेल्या असून, त्या काळया समुद्राला मिळाल्या आहेत. डोंगराळ प्रदेश  सोडून बाकीचा सर्व प्रदेश  सुपीक आहे. जंगल मुबलक आहे. मँगेनीज, कोळसा, तांबें वगैरे खनिज संपत्तीहि पुष्कळ आहे.

क्षेत्रफळ :- जॉर्जियाचें हल्लीचें क्षेत्रफळ २८००० चौ. मैल आहे. एरिव्हन व अझरबैजनच्या संस्थानांच्या सरहद्दीवरील मुलुखासंबंधीं अद्यापि लढा सुरू असल्यानें त्यांतून जो प्रदेश  जॉर्जियाच्या वांटयास येईल त्याचे क्षेत्रफळ वरील संख्येंत जमा करावें लागेल. लोकसंख्येचीहि तीच स्थिति. स. १९१६ च्या खानेसुमारीप्रमाणें वादग्रस्त टापूंतील लोकसंख्या वगळतां बाकीच्या मुलुखांतील लोकसंख्या २७७०००० होती; व यामध्यें, जॉर्जियन, रशियन, यूरोपियन, आर्मेनियन, मुसुलमान व इतर कांहीं जातीचे लोक होते. वादग्रस्त टापूंतील संख्या १५००० भरेल असें वाटतें.

दळणवळण :- जार्जिया एरिव्हन, अझरबैजन किंबहुना सर्व मध्यआशियाचें प्रमुख बंदर बाटूम असून तें जॉर्जियाच्या ताब्यांत आहे. त्यामुळे वरील सर्व प्रदेशाचें नाकच जॉर्जियाच्या ताब्यांत आहे म्हटलें तरी चालण्यासारखें आहे. या बंदरापासून एरिव्हन, एरझेम, बाकू, टॅब्रिझ, आशियामायनर इत्यादि ठिकाणीं रेल्वे गेली आहे. बाटुम बंदरामुळें जॉर्जियाला विलक्षण महत्त्व प्राप्त झालें आहे.

लोकवस्ती :- जॉर्जियन लोक कोणच्या वंशाचे असावे याविषयीं पूर्वी बरेंच मतवैचित्रय होतें परंतु आतां असें निश्चित झालें आहे कीं, हे लोक पाम्बक नांवाच्या उंच प्रदेशांतील मूळच्या लोकांचे वंशज आहेत आणि हे बहुतकरून पश्र्चिमेकडील डोंगरपठारावरून आशियामायनर आणि यूरोप या ठिकाणीं आलेल्या आर्य लोकांच्या त्रासामुळें आग्नेयीकडून चार पांच हजार वर्षांपूर्वी येथे आले हे लोक काकेशसमधील अतिशय जुन्या संस्कृतीचे असून त्यांच्यांत कांहीं अत्युत्तम मानसिक गुण आहेत. हे फार धैर्यवान् असतात आणि यांनां गाण्याबजावण्याचा अतिशय शोक असतो अशी यांची ख्याति आहे. तथापि हे फार क्रूर आणि दुष्ट असून अति मद्यपान करणारे असतात. हे देखणे असून कसरती बांध्याचे असतात. मुसुलमानांचें राज्य असतांना येथून तुर्कझनानन्यासाठीं दासी आणि ओस्मानली सैन्यासाठीं शिपाई पुरविण्यांत येत असत. रशियन अम्मल सुरू होण्यापूर्वी येथील समाजांत उमरावांच्या व बडया लोकांचें फार प्राबल्य होतें. कोणाचेंहि बरेंवाईट करण्याचा आपला हक्क आहे असें समजत व त्या हक्काची बजावणीहि करीत असत. पण आतां जॉर्जियन लोकांनां सुस्थिति प्राप्त् झाली असून ते उद्योगी बनले आहेत व सर्व त-हेंनें त्यांनीं आपली प्रगति केली आहे.

ट्रॅन्सकॉकेशियन टापूंतील इतर सर्व जातींच्या लोकांपेक्षां जॉर्जियन लोक हल्लीं अधिक सुधारलेले आहेत. शिवाय आपल्या पराक्रमानें मिळविलेल्या स्वातंत्र्याची ताजी परंपरा त्यांच्या मागें असल्यानें जॉर्जियन लोकांकडे लोकांचें विशेष  लक्ष्य ओढलें जात आहें. या लोकांमध्यें जातिविषयक अभिमानापेक्षां राष्ट्रीय अभिमानच अधिक आढळतो व या दृष्टीनें टॉन्सकॅकेशियन लोकांमध्यें जॉर्जियन लोकांत हा मोठा फरक आहे. अनुभवान्तीं शहाणपण या न्यायानें पारतंत्र्यशृंखलेमध्यें अखंड दु:खें भोगावी लागल्यामुळें स्वत:च्या आत्मविश्‍वासाच्या अनुभवाच्या जोरावर आपलें स्वातंत्र्य मिळविल्यावर जॉर्जियन लोकांनीं आपला राज्यकारभार मोठया कुशलतेनें चालविला आहे. समाजसत्तावादाकडे यांचा कल असला तरी हे लोक बोल्शेविकपंथाच्या तत्त्वाला सर्वस्वी प्रतिकूल आहेत; व त्यांनीं संधि सांपडेल तेथें व तेव्हां बोल्शेविकांनां कसून विरोध केला आहे.

चवथ्या शतकाच्या आरंभीं कान्संटाइन दी ग्रेट यानें पाठविलेल्या धर्मोपदेशकांनीं येथें ख्रिस्ती धर्माचें बीजारोपण केलें. त्या वेळेपासून भौंवतालच्या मुसुलमानी धर्माला दाद न देतां येथील लोक अजून ख्रिस्ती धर्माच्या पुराणमतवादी पंथालाच चिकटून आहेत.

येथील लोक कार्थली भाषा बोलतात. या भाषेचा आणि इन्डोयूरोपियन भाषांच्या कुळाचा मूळापासून संबंध नाहीं इतकेंस नव्हे तर तिचा दोन उत्तर काकेशिअन वर्गांशीं देखील वर्णोच्चाराशिवाय कोणच्याच प्रकारचा संबंध दिसून येत नाहीं. मध्य आणि पश्र्चिम काकेशिअन प्रांतांतील भाषांची आणि या भाषेची वर्णोच्चारपद्धति एक असल्यामुळें या भाषेंत त्या कदाचितलिहितां येतील. ही भाषा उच्चारण्यास सुलभ नसल्यामुळें कानाला मधुर लागत नाहीं व बोलतांना श्रम होऊन अडखळल्यासारखें होतें. व्याकरणाचे नियम चांगले असल्यामुळें लिहितांना त्रास होत नाहीं

जॉर्जियन लिपी आर्मेनियन लिपीवरून तयार केली असून ती तद्देशीय मूळाक्षरांत लिहितात. या मुळाक्षरांचे दोन प्रकार आहेत व या दोन्हीचें स्वरूप् इतकें वेगळें आहे कीं हे दोन्ही निरनिराळया दोन लिपीचें प्रकार आहेत असा भास होतो.  पांचव्या शतकांत या भाषेंत बायबलचें भाषांतर केलें असें म्हणतात. याशिवाय मोंगली काव्यें, महाकाव्यें आणि धार्मिक ग्रंथहि या भाषेंत रचले आहेत.

इतिहास :- महायुद्ध सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या दोन वर्षांत जॉर्जिया हा रशियाचा प्रांत म्हणून गणला जात होता. आपला देश लवकरच स्वतंत्र होईल अशी प्रत्यक्ष जॉर्जियन लोकांनांहि महायुध्दाच्या प्रारंभीं कल्पना नव्हती. पण काळाचा महिमा अतर्क्य आहे. या कालाच्या आनुकुल्यामुळें स. १९१७ च्या वसंत ऋतूंत रशियांत लवकरच क्रांति घडून येण्याची चिन्हें दृग्गोचर होऊं लागलीं व या क्रांतीमध्यें आपल्या भावी स्वातंत्र्याचीं बीजें रूजलीं आहेत असें जॉर्जियन लोकांनां वाटूं लागलें. सबंध ट्रान्सकॉकेशियाच स्वतंत्र होईल कीं काय अशा प्रकारचे कयासहि बांधण्यांत येऊं लागले होते. आणि खरोखरच त्याप्रमाणें घडून आलें. स. १९१७ च्या सप्टेंबरमध्यें रशियांत राज्यक्रांतीचा शेवट होऊन रशिया हें रिपब्लिक बनलें. अर्थातच ट्रान्सकॉकेशियन प्रांतांनांहि आपलें भवितव्य ठरविण्याची संधि येऊन ठेपली.

ही संधि त्या टापूंतील लोकांनीं वाया जाऊं दिली नाहीं. जॉर्जियन व आर्मेनियन लोकांमध्यें स्वातंत्र्याची लालसा उत्पन्न झाल्यामुळें त्यांच्यामध्यें चटकन ऐक्य झालें. पण याशिवाय या टापूंत तार्तर लोकांचाहि भरणा होता. त्यांनांहि आपल्या मसलतींत ओढून घेणें भाग आहे असें जॉर्जियन व आर्मेनियन लोकांनां वाटत होतें व तें योग्यहि होतें. यासाठीं टिफिलस येथें स. १९१७ च्या ऑगस्टमध्येंच ट्रॅन्सकॉकेशियन लोकांनीं निवडून दिलेल्या प्रतिनिधींची बैठक भरली व त्यांनीं स. १९१७ च्या सप्टेंबरमध्यें आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. या बैठकींत जॉर्जियन लोकांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता.

पण अशा रीतीनें या टांपूतील लोकांनीं आपलें संयुक्त रिपब्लिक स्थापना केलें तरी तें फार दिवस टिकणार नाहीं अशी भीति प्रथमपासूनच वाटत होती. टापूंतील निरनिराळया संस्थानांमध्यें परस्परांमध्यें द्वेशार्ग धुमसत होता. संयुक्त रिपब्लिकमध्यें जॉर्जियाचें प्राबल्य असल्यामुळें इतर संस्थानांनां या जॉर्जियाविषयीं हेवा वाटत होता. फक्त एकाच बाबतींत या सर्व संस्थानांचें ऐकमत्य होतें व तें म्हणजे बोल्शेविझमच्या तीं सर्व राष्ट्रें विरूद्ध्‍ होती हें होय.

स. १९१७ च्या नोव्हेंबरमध्यें लेनिन, ट्रॉटस्की हे अधिकारारूढझाल्यामुळें त्यांनीं तुर्कीं सरहद्दरवरील आपलें सैन्य काढून घेण्यास सुरूवात केली. त्यामुळें तुर्कांचा या टापूंत जोर होण्याचीं चिन्हें दिसूं लागली. याविरूद्ध आपलें रक्षण करण्याकरितां ट्रॉन्स्कॉकेशियन लोकांनीं आपलें सैन्य उभारलें व आपल्या संरक्षणाची तजवीज सुरू केली.

लेनिनच्या मनांत टान्सकॉकेशियन टापू आपल्या ताब्यांत असावा असें होते व त्यासाठीं त्यानें या प्रांतावर अधिकार चालविण्याकरितां एक सुभेदार पाठवून दिला. पण टिप्लिस येथें येतांच या सुभेदार पाठवून दिला. पण  टिप्लिस येथें येतांच या सुभेदाराला अर्धचंद्र मिळाला. त्यामुळें चिडून जाऊन या सुभेदारानें १०००० आर्मेनियन बंडखोरांच्या सहाययानें व बोल्शेविक आरमाराच्या साहाययानें या टापूंत बोल्शेव्हिकांचा अंमल बसविला. व तार्तार लोकांची एकजात कत्तल केली. या कृत्यामुळें जॉर्जियन व आर्मेनियन लोकांचें तार्तार लोकांशीं ऐक्य होण्याची संधि मात्र नष्ट झाली.

याचीं फळेंहि लौकरच दिसून आलीं. स. १९१८ च्या मार्चमध्यें वेस्ट लिटोव्हस्क येथें रशिया व जर्मनी यांच्यांत तह होऊन त्या तहान्वयें आर्मेनियाचचा कांहीं प्रदेश , जॉर्जिया प्रांत व बाटूमचा कांहीं भाग तुर्कांनां देण्याचें या दोघांराष्टांनीं ठरविलें. त्याप्रमाणें आपला भाग ताब्यांत घेण्याकरितां तुर्की सैन्य त्या भागांत आलें. बाटूम हें  तुर्कांच्या हातांत ताबडतोब पडलें. या टान्सकॉकेशियन लोकांत ऐक्य असतें तर त्यानीं तुर्कांनां विरोध केला असता. पण यांच्यांमध्येंच दुही असल्यामुळें आपलें स्वांतत्र्य जाहीर करण्यापालीकडे यांच्या हातून तुर्कांनां विरोध झाला नाही. १९१८ च्या मे महिन्यांत, संयुक्त रिपब्लिक मोडलें व प्रत्येक संस्थानानें आपलें वैयक्तिक स्वातंत्र्य जाहीर केलें. अर्थातच या संस्थानांनां आपापलें स्वातंत्र्य स्वत:च्या जोरावर राखणें भाग पडलें. पण तकी तयारी कोणत्याच एका संस्थानाजवळ नव्हती. अशा स्थितींत जॉर्जियानें शहाणपणानें जर्मनींशीं सूत बांधलें. जर्मनी व जॉर्जिया यांच्यामध्यें तह होऊन जॉर्जियन रिपब्लिकचें संरक्षण करण्याचें जर्मनीनें कबूल केलें. बाटूम बंदर तुर्कांच्या ताब्यांत होतें तररी तेथील जॉर्जियाचे हितसंबंध सुरक्षित राखण्याचेंहि अभिवचन जर्मनीकडून जॉर्जियाला मिळालें. व हें वचन जर्मन सैन्य या टापूंत असे तों जर्मनीनें पाळलेंहि.

पण महायुध्दाची तहकुबी झाल्यानंतर सर्वच परिस्थिती बदलली. दोस्तराष्ट्रांनीं जर्मनी व तुर्की सैन्याचें या टान्सकॉकेशियन टापूंतून उच्चाटन करून, आपलें वर्चस्व तेथें स्थापित केलें. पण दोस्तांनीं जॉर्जियाच्या रिपब्लिकच्या कारभारांत अडथळा आणला नाहीं. रेल्वे मात्र आपल्या ताब्यांत घेण्याशिवाय त्यांनां गत्यंतरच नव्हतें.

या अवधींत सरहद्दीवरील कांहीं मुलुखांसंबंधी एरिव्हान व जॉर्जिया यांमध्यें तंटा झाला. पण ब्रिटिश अधिका-यांच्या मध्यस्थीनें तो कसाबसा मिटवण्यांत आला. पुढें स. १९१९ मध्यें पॅरिस येथें शांततापरिषद भरली. त्या परिषदेस जॉर्जियाचें प्रतिनिधिमंडळ हजर होतें. ट्रान्सकॉकेशियन प्रश्नाचा या परिषदेंत काळजीपूर्वक विचार केला जाईल असें वाटत होतें. पण रशियाच्या संमतीशिवाय या प्रश्र्नाचा सांगोपांग विचार करण्याला रशिया तयार नव्हता. त्यामुळें या प्रश्र्नाचा काळजीपूर्वक विचार करण्याचा बेत या परिषदेनें पुढें ढकलला. फक्त टान्सकॉकेशियन प्रांतांतील संस्थानें स्वतंत्र आहेत व निरनिराळया संस्थानांच्या सरहद्दी ठरविण्यांत याव्यात एवढेंच या परिषदेंत  ठरविण्यांत आलें. १९१९ च्या ऑगस्टपर्यंत या टापूंत दोस्तांचें सैन्य होतें. पण त्यानंतर कांहीं थोडया सैन्याशिवाय सगळें सैन्य काढून घेण्यांत आलें.

१९१९ सालीं जनरल डेनिकिननें बोल्शेविक रशियाविरूद्ध जोराची चळवळ सुरू केली. या बाबतींत त्याला पुष्कळच अनुयायी मिळाले. हा डेनिकिन टान्सकॉकेशियन संस्थानाच्या स्वातंत्र्याविरूद्ध होता. विशेष त: या टापूंतील रशियन वर्चस्वाला पुढें मागें जॉर्जियाकडून विरोध होईल या भीतीनें जॉर्जर्ियाचें स्वातंत्र्य नष्ट करण्याचें त्याच्या मनांत होतें. पण डेनिकिनचा बोल्शेव्हिकांनीं पराभव  केल्यामुळें डेनिकिनची भीति नष्ट झाली खरी. तथापि बोल्शेव्हिकांनीं आपला अंमल टान्सकॉकेशियन टापूंत बसविण्याची चळवळ सुरू केल्यानें हें निराळेंच संकट जॉर्जियावर आलें. बोल्शेव्हिकांनीं, अझरवैझन, एरिव्हन संस्थानें काबीज करून तेथें आपला अंमल बसविला व जॉर्जियावर स्वारी केली. पण ही स्वारी जॉर्जियानें षौर्यानें परतविली. पुन्हां बोल्शेविक लोक जॉर्जियावर स्वारी करावयाचेच पण पोलंडवर मोहिम सुरू करण्याची रशियाला अधिक जरूरी भासल्यामुळें रशियानें जॉर्जियावर सैन्य पाठविण्याचें रहित केलें; व जॉर्जियाशीं तात्पुरता तह केला. या तहान्वयें बाटुमचा प्रांत व बंदर जॉर्जियाच्या ताब्यांत आलें.

राष्ट्रसंघानें बाटुम हें स्वतंत्र न करण्याचें याच सुमारास ठरविल्यानें राष्ट्रसंघानें हा टापू जॉर्जियाच्या ताब्यांतच ठेवण्याचें ठरविलें. फक्त एरिव्हन व अझरबैजन प्रांतांनां मात्र तें बंदर खुलें असावें अशी अट घातली.

जॉर्जियाच्या ताब्यांत हा टापू आल्यावर त्यानें मुत्सद्दीपणानें या टापूंतील अजेरियन नांवाच्या मुसुलमान जातीला स्थानिक स्वातंत्र्य देऊन टाकून आपल्या बाजूला वळवून घेतलें. पण अशी रीतीनें जॉर्जियाला आपल्या टापूंतील अंतर्गत कारभार व शांतता प्रस्थापित करतां आली तरी बोल्शेविक रशिया व तुर्कस्थान या दोन्ही राष्ट्रांचा बागुलबोवा जॉर्जियाला चैन पडूं देत नव्हता. लौकरच त्या बागुलबोवानें डोकें वर काढण्यास सुरूवात केली. एकीकडून तुर्कांनीं व दुसरीकडून रशियनांनीं या ट्रान्सकॉकेशियन टापूंवर चाल केली; व आर्मेनिया वगैरे भागांत रशियनांनीं आपला अंमल स्थापन केला. जॉर्जिया एकटा या हल्ल्यांनां तोंड देण्यास समर्थ नव्हता. तेव्हां त्याला नमतें घेण्याशिवाय गत्यंतरच उरलें नाहीं पण त्यांतल्यातयांत तुर्कांच्या ताब्यांत बाटूम बंदर राहूं देण्यापेक्षां व आपला प्रदेश  तुर्की अमलाखालीं जाण्यापेक्षां आपल्या राष्ट्रांचें नशीब रशियन लोकांच्याच हातीं देणें जॉर्जियाला अधिक सोईस्कर वाटलें व त्याप्रमाणें १९२१ सालीं जॉर्जियामध्यें रशियन बोल्शेविक अंमल चालू झाला.

इ.स. १९२४ च्या सप्टेंबरांत जॉर्जियाच्या प्रजासत्ताक राज्यामध्यें, जॉर्जियन आणि सोव्हिएट लोक यांच्यामध्यें कडाक्याचें युद्ध झालें. बंडखोरांनीं, ट्रान्सकॉकेशियन रेल्वे आपल्या ताब्यांत घेतली आणि सबंध कॉकेशसभर लष्करी कायदा प्रस्थापित करण्यांत आला. बोल्शेव्हिक लोकांचा या युद्धांत अनेक वेळां पराभव झाला; आणि बंडखोरांनीं, टिफ्लीस आणि कुटैस हीं शहरें व्यापिलीं. ब्रिटीश, फ्रेंच आणि बेल्जियन सभासदांनीं जॉर्जियांत चाललेली ह अंदाधुंदी बारकाईनें पहाण्याची, राष्ट्रसंघास  ( लीग ऑफ नेशन्स)   विनंति केली. त्याचप्रमाणें देशांत पुनश्र्च शांतता प्रस्थापित करण्याची खटपट करण्याचीहि राष्ट्रसंघास विनंति करण्यात आली. सोव्हिएट लोकांच्या तत्त्वांवर विश्र्वास नसणा-यांनीं सोव्हिएटांची बदनामी करण्याच्या हेतूनें पुष्कळ वेळां सोव्हिएटांनीं केलेल्या कत्तलींचीं वर्णनें अतिशयोक्तीपूर्ण अशीं केलीं असणें शक्य आहे.

जॉर्जियांतील हया राज्यक्रांतीचा पूर ओसारतो न ओसरतो तोंच अझरबैजनमध्यें एक नवें बंड उपस्थित झालें. बकूच्या तेलाच्या खाणींत काम करणा-या हजारों मजूरांनीं व शेतांत राबणा-या शेतक-यांनीं हें बण्ड उभारलें होतें. याचीं कारणें -    (१)  रशियन लोकांकडून खाणींत काम करणा-या मजूरांनां मिळणारी मजूरी अगदींच अल्प व अपुरी होती.   (२)  शेतक-यांनीं पिकविलेल्या गव्हाला अगदीं थोडी किंमत येई.

राष्ट्रसंघानें ( लीग ऑफ् नेशन्स)   केलेल्या मध्यस्थीबद्द्ल सोव्हिएट सरकारास मनांतून खूप संताप आला व पश्र्चिम युरोपियन राष्ट्रांनीं, सोव्हिएट सरकाराविरूद्ध झालेल्या बंडास सहानुभूति दर्शविली असा सोव्हिएट सरकारनें निष्कर्श काढला. सोव्हिएट सैन्य डोंगरी मुलुखांत जबरीनें परत पाठविण्यांत आलें. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस, सोव्हिएट सैनिक टिप्लीस शहरांत शिरलें. त्यावेळीं, टिप्लिस शहरांतील कित्येक रहिवाशांनां चेकाकडून फाशीं देण्यांत आलें.

जॉर्जिया :- अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांपैकीं एक संस्थान. या संस्थानचें क्षेत्रफळ ५९२६५ चौ. मै. असून त्यापैकीं ५४० चौ. मैलांचा भाग पाण्यानें व्यापिला आहे. लो. स.  (जुलै १९१८)  २९३५६१७.   'ॲटलान्टा' हें राजधानीचें शहर आहे.

बॅप्टिस्ट आणि मेथॉडिस्ट या पंथांच्या लोकांची संख्या फार असून सबंध संस्थानांतील लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोक बॅप्टिस्ट पंचाचे आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचें झालें नाहीं. 'स्टेट स्कूल कमिशनर' नांवाचा लोकनियुक्त अधिकारी शिक्षणखात्यावरिल मुख्य असतो. दर दोन वर्षांनीं हा नवा निवडतात. प्रत्येक परगण्या (कौन्टी)  वर एक 'सुपरव्हायझर', असतो 'युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया, अथेन्स, जॉर्जिया स्कूल ऑफ् टेक्नॉलॉजी आणि नॉर्थ जॉर्जिया अग्रिकलचल्चरल कॉलेज या उच्च शिक्षण देणा-या तीन प्रमुख संस्था आहेत.

कापूस, मका, ओट, गहूं हीं महत्त्वाचीं पिके आहेत. उसांची लागवडहि दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणांत होत आहे. या संस्थानांत पाईन वृक्षांचीं दांट अरण्यें असून त्यांनीं ४२००० चौ. मैलांचा प्रदेश  व्यापिला आहे. घोडे, खेंचर, गाय, मेंढी व डुक्कर हीं संस्थानांत आढळणारीं प्रमुख जनावरें होत. शेतीच्या कामाकरितां, पहिल्या दोन जातींच्या जनावरांचा मुख्यत्त्वेंकरून उपयोग होतो.

मासे मारण्याचा धंदाहि संस्थानांतील महत्त्वाच्या धंद्यांपैकीं एक आहे. सोनें, चांदी, कोळसा, लोखंड, मॅंगॅनीजधातू, बॉक्साईट ग्रॅफाईट, चुनखडी, नैसर्गिक सिमेंट, कावेची माती, षंखजिरे वगैरे खनिज पदार्थ संस्थानांत विपुल सांपडतात. जॉर्जियांत सांपडणारा संगमरवरी दगड सुबकपणाबद्दल प्रसिद्ध आहे. १९१५ सालीं संस्थांनांतून ५७९४६८८ डॉलर किंमतीची खनिज मालाची निर्गत झाली. संस्थानांत कापडाचे कापूस दाबण्याचे व गठठे बांधण्याचे अनेक मोठ मोठे कारखाने आहेत.

जलमार्गानें आणि खुष्कीच्सा मार्गानें प्रवास करण्याचीं साधनें पुष्कळ आहेत. सावन्ना हें मुख्य बंदर असून मोठ मोठी जहाजें सुद्धां आंत येऊ शकतात. १९१३ सालीं या बंदरांतून, १०५६७०७ पौंड किंमतीच्या मालाची आयात व २०१३७७४८ पौंडाची निर्गत झाली. कापूस, सरकीचें तेल व पेंड या जिनसा निर्गतींतील मुख्य होत. टर्पेंटाईन तेल आणि इमारती लांकूडहि येथून पुष्कळ रवाना झालें. १९१५ सालीं येथें ७५८२ मैलांचा वाफेच्या गाडीचा व ४८५ मैलांचा विजेच्या गाडीचा रस्ता तयार होता. १९१७ सालीं, जॉर्जियांत, १९ सेव्हिंग्ज बँका असून त्यांत ५०००० लोकांनीं ठेवी ठेविल्या होत्या.

जॉर्जियाची  (दुस-या जॉर्ज राजाच्या नांवावरून)   वसाहत, १७३३ सालीं स्थापण्यांत आली. ४४ सभासदांचें वरिष्ठ मंडळ (सेनेट)  आणि १८९ सभासदांचे प्रतिनिधिमंडळ ( हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्)  असतें. दर दोन वर्षांनीं वरिष्ठ मंडळ आणि प्रतिनिधिमंडळ यांतील सभासदांची नवी निवड होते. काँग्रेसमध्यें या संस्थानतर्फे सेनेटमधील आणि    'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्' मधील अनुक्रमें दोन आणि बारा सभासद पाठविले जातात (संदर्भग्रंथ दि स्टेटमन्स इयर बुक, १९१९; संस्थानांतील वेगवेगळया खात्यांचे रिपोर्ट, इ.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .