प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जारकर्म  (ॲडल्टरी) :- विवाहित पुरूषाशानें किंवा स्त्रीनें अन्य स्त्रीशीं किंवा पुरुषाशीं संबंध करणें या गुन्हयाला कायद्यांत जारकर्म म्हणतात. या गुन्हयाला शिक्षा ठेवण्यांत विवाहसंस्थेचें संरक्षण हा मुख्य हेतु आहे. हिंदु समाजांत विवाह ही धार्मिक संस्था समजतात आणि स्त्रीचें पातिव्रत्य हा सर्वोच्च गुण फार प्राचीन काळापासून मानला गेला आहे. पातिव्रत्याचें अत्यंत महत्त्व व जारकर्माची अत्यंत निंदा वैदिक काळींहि केलेली दिसते. देवांचा राजा इंद्र यानें वृषणश्‍वाच्या बायकोशीं, अत्रेयीऋषीच्या अपाला नामक स्त्रीशीं आणि गैतमऋषीच्या अहिल्या नामक पत्नीशीं जारकर्म केल्याचा व त्यामुळें त्याच्या अंगाला एक हजार क्षतें पडल्याचा उल्लेख आहे. अष्वीदेवांनीं च्यवनाच्या सुकन्या नामक भार्येशीं जारकर्म केल्याची कथा आहे. रामायणांतील रामाचें चरित्र हें उच्च वैवाहिक नीतीचा केवळ आदर्श आहे. महाभारतांतील द्रोपदी, सावित्री, दमयंती वगैरे अनेक स्त्रियांच्या कथांत पातिव्रत्य-गुणाचें स्तोत्र गायिलें आहे. स्मृतिग्रंथांत कायदेशास्त्रज्ञांनीं या गुन्हयाला कडक शिक्षा सांगितल्या आहेत. जारकर्मामळें समाजावर अत्यंत घोर परिणाम होतात असें सांगून मनूनें जारकर्मी स्त्रीप्रमाणें पुरूषालाहि घोर शिक्षा सांगितली आहे; इतकेंच नव्हें तर परस्त्रीसंभाषण, अंगस्पर्श वगैरे गोष्टींनांहि दण्ड सांगितला आहे.

परदारभिमर्शेषु प्रवृत्तान्नमहीपति: ।
उद्वेजनकरैर्दण्डैश्छिन्नांयेत्वा प्रवासयेत्॥
तत्समुत्थोहि लोकस्य जायते वर्णसंकर: ।
येन मूलहरो धर्म: सर्व नाशाय कल्पते ॥
X                  X              X
न संभाशां परस्त्रीभि: प्रतिशिद्ध: समाचरेत्।
X                  X              X
भर्तारं लंघयेद्या तु स्त्रीज्ञातिगुणदर्पिता ।
तां श्वभि: खादयेद्राजा संस्थानें बहुसंस्थिते ॥
पुमांसं दाहयेत्पापं शयने तप्त आयसे ।
(मनुस्मृति , अ. ८ श्लो. ३५२ ते ३७८.)


इतर गुन्हयाप्रमाणें यांतहि जात्यनुसार शिक्षेचा कमी अधिकपणा अवलंबून आहे. मनुस्मृतीच्या नियमानुसारच मध्ययुगीन हिंदुराज्यांत व मोंगल-मराठेशाहींत अम्मल चालू होता.


सदरहू हिंदु समाजव्यवस्थेवर परकीय विद्वानांचे अनेक आक्षेप आहेत. वध, अवयवछेदन या शिक्षा फाजील, कडक व जात्यानुसार शासनभेद हें तत्त्व अन्यायय असे सर्व साधारण आक्षेप असून इंद्रादि देवादिकांचीं जारकर्मकृत्यें व कामसूत्रांतील स्त्रियांच्या नीतिमत्तेविषयींचे उल्लेख, पुत्रांचे क्षेत्रजादि दहाबारा प्रकार या गोष्टी कनिष्ठ नीतिमत्ता दर्शवितात. शिवाय बहुभार्यापद्धति, जरठकुमारीविवाह, वगैरे रूढी वैवाहिक नीतिमत्ता शिथिल करणा-या आहेत. हे सर्व आक्षेप लक्षांत घेऊन इंडियन पीनल कोडाची रचना आधुनिक पाश्चात्य  कायदेपद्धतीवर करून जारकर्माच्या गुन्हयाला ५ वर्शे कैद व दण्ड किंवा नुसता दण्ड अशी शिक्षा सांगितली आहे. शिवाय या गुन्हयांत बदकर्मी स्त्रीला शिक्षा न करतां फक्त पुरूष गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, असें ठरविण्यांत आलें    (पीनल कोड, कलम ४९७.)

बाह्य इतिहास :- प्रागैतिहासिक काळांत जेव्हां विवाह ही संस्था नीट अस्तित्वांत आली नव्हती, तेव्हां रानटी स्थितींतील पुरुष स्त्रियांवर मालमत्तेप्रमाणें हक्क सांगत, व स्त्री पळविण्या-यास चोरीच्या गुन्हयाप्रमाणें शिक्षा करीत. जारकर्मामुळें नीतिभ्रष्टता येते किंवा वैवाहिक करार मोडतो वगैरे कल्पना त्या काळीं नव्हत्या. वानर, कोंबडीं वगैरे पशुजातींचे नर ज्याप्रमाणें कांहीं माद्यांनां स्वसत्तेखालीं घेऊन इतरांनां प्रतिकार करतो त्याप्रमाणें आद्य मानवी स्थिति असली पाहिजे. पुढें विवाहसंबंध जोडण्याची कल्पना रूढ होऊन एकाच वेळीं एका पुरुषानें अनेक स्त्रिया किंवा एका स्त्रीनें अनेक नवरे करण्याची चाल प्रचारांत आली. तेव्हां स्त्रीयांनां परपुरुषसंबंध न होऊं देण्याबद्दल पुरुषवर्ग अधिकच दक्ष बनला व बदकर्मी स्त्रीला देहांत शिक्षेसारख्या कडक शिक्षा होऊं लागल्या. इतकेंच नव्हे तर आफ्रिकेंतील एका निग्रो जातींत स्त्रियांकडून चारित्र्यशुध्दीचा पुरावा म्हणून नियतकालिक दिव्य करविण्याची पद्धत आहे (मिस् किंगस्ले-ट्रव्हल्स इन वेस्ट आफ्रिका, ४९७.) पुरुषांची परपुरुषसंबंधाविषयींची ही तीव्र मत्सरबुध्दि हा मानवसमांजांत एका आद्य असस्थेंत अनिर्बंध स्त्रीपुरुषव्यवहारस्थिति  (प्रॉमिस्क्युइटी )  होती, असा या मताला प्रतिकूल पुरावा आहे. बहुतेक रानटी जातींत या गुन्हयाला वध, अवयवच्छेदन वगैरे शिक्षा रूढ असलेल्या आढळतात. नव-याचें बदकर्म हा बायकोविरूद्ध गुन्हा असून तिला त्याबद्दल दाद मागतां येतें, अशी स्थिति फार थोडया समाजांत आढळतो. या गुन्ह्याबद्दल विवाहसंबंध तोडण्याचा    (डायव्होर्स)    हक्क बायकोला कांहीं रानटी समाजांतहि दिलेला आढळतो.

ईजिप्तमध्यें फार प्राचीन काळीं सुद्धां जारकर्म हा गुन्हा मानला जात असे. याला पुरावा ५ वा रामेसिस  ( ख्रि. पू. ११५०)    याच्या कारकीर्दीतील एका लेखावरून मिळतो. अथेन्स येथील प्राचीन ग्रीक कायद्यांत जारकर्माबद्दल पुरुष व स्त्री दोघांनांहि गुन्हेगार धरीत. तथापि स्त्रियांच्या बाबतींत कायदा फार कडक होता. कारण युद्ध ग्रीक घराण्यांत रक्ताची भेसळ होऊं नये असा ग्रीकांचा कटाक्ष होता. जारकर्माची व्याख्याहि पुढें व्यापक करून विवाहित स्त्रीप्रमाणें कुमारिकांशीं किंवा विधवांशीं बदकर्म करणेंहि गुन्हा समजण्यांत येऊं लागला. गुन्हा करतांना पकडलेल्या गुन्हेगाराला एकदम ठार मारण्याचा हक्क कायद्यानें नव-यास दिला होता. पण त्याहून कमी किंवा केवळ नुकसानभरपाई दाखल द्रव्य मागण्यास सवलत असे. जारकर्मी बायकोला नव-यानें सोडचिट्ठी देणें भाग असे व तिला सार्वजनिक देवालयांत मज्जाव असे. ज्यू ऊर्फ यहुदी लोकांमध्यें बहुभार्यापद्धति बंद होऊन एकपत्नीक पद्धति सुरू झाली तरी जारकर्मासंबंधी कायद्यांत फरक झाला नाहीं. विवाहित स्त्रीशीं बदकर्म करणें यालाच जारकर्म समजतात. अविवाहित स्त्रीच्या बाबतींत हा गुन्हा होत नसे; कारण अशी स्त्री त्या पुरूशाची बायको होणें शक्य असे, इतकेंच नव्हे तर असा संबंध झाल्यास त्या स्त्रीपुरूषांचा कायदेशीर विवाहच मानला जात असे. मोझेस कायद्यांत जारकर्माला दगड मारून ठार करण्याची शिक्षा सांगितली आहे. पण पुढें ही शिक्षा बंद पडली. वैवाहिक हक्क नष्ट करून सोडचिट्ठी देण्यास भाग पाडणें तसेंच बदकर्मी स्त्री व पुरुष यांनां आपसांत लग्न लावण्यास परवानगी न देणें, या शिक्षा नंतरच्या कायद्यानें ठरविल्या.

इस्लामी कायद्यांत जारकर्माला, दगड मारून वध करण्याची जुन्या यहुदी कायद्यांतील शिक्षा आहे. पण महंमद पैगंबराच्या आयेशा नांवाच्या बायकोद्दल संशयाचा प्रसंग आला, त्या वेळीं जारकर्माबद्दल शंभर फटक्यांची शिक्षा द्यावी, असे महमंदाचे ष्लोक कुराणांत आहेत; यामुळें कायदेपंडितांत या शिक्षेबद्दल मतभेद आहे. प्रत्यक्ष गुन्हा करतांना पकडल्यास नव-यानें दोघांनांहि ठार मारावें अशी कायद्याची मुभा आहे. शिवाय विवाहसंबंध तोडण्याचा हक्क नव-याला आहे. कोणी साक्षीदार नसला तरी नुसती शपथ घेतल्यानें नव-याला ही परवानगी मिळते; या घटस्फोटाच्या प्रकाराला 'लायान' असें म्हणतात.

ख्रिस्ती धर्मग्रंथांतील दहा सुप्रसिद्ध आज्ञांमध्यें ''तूं आपल्या शेजा-याच्या बायकोचा अभिलाश धरितां कामा नसे'' अशी एक आज्ञा आहे. डोंगरावरील प्रवचनांतहि येशूख्रिस्तानें 'व्यभिचार करूं नये' असें सांगितलें आहे. इ.स. ३०५ मध्यें इलिबेरिसच्या कौन्सिलनें जे ठराव केले त्यांत व्यभिचाराला शिक्षा सांगितल्या आहेत; त्यांत वधाची शिक्षा नाहीं. पण कॉन्स्टन्टाईन बादशहानें वधाची शिक्षा पुन्हां सुरू केली. पण ती रानटी शिक्षा अप्रिय ठरून पुन्हां ज़स्टिनियननें वधाची शिक्षा बंद केली. व्यभिचार हें घटस्फोट करण्याला पुरेसें कारण नेहमींच मानण्यांत आलें आहे. पण इंग्लंडच्या कायद्यांत बायकोला नव-याविरूद्ध घटस्फोट मानण्यास हें कारण पुरेसें मानीत नाहींत.

पारश्यांच्या ग्रंथांत या गुन्हयाची फार व्यावहारिकक दृष्टीनें चर्चा केली आहे. जारकर्म व विशेष त: कुमारिकांनां कुमार्गप्रवृत्त करणें हा भयंकर गुन्हा मानला आहे. कारण त्यामुळें वंशभ्रष्टता होते, माणसाचें संयमन नष्ट होतें व नव-याच्या कायदेशीर हक्काला बाध येतो. हया गुन्हयामुळें खुनाकडेहि प्रवृत्ति होते, कारण जारकर्मी स्त्रिया गर्भपात करतात. व्यभिचारकर्मानें सर्व समाजाला कीड लागते; कारण पुरूषाला जारकर्मज संतति पोसणें भाग असल्यामुळें त्या संततीच्या संगतीनें औरस संतति बिघडते. या पापाला प्रायश्चित्त म्हणून कांहीं धार्मिक विधी, अनाथसंगोपन, दानधर्म, वगैरे सत्कृत्यें करण्यास सांगितलें आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .