विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
जांभळी जमीनदारी :- मध्यप्रांत, भण्डारा जिल्हा, साकोली तहसिलीच्या वायव्येस ही जमीनदारी असून हिेचें एकंदर क्षेत्रफळ १५ चौरस मैल आहे. पैकीं ३।४ जंगल आहे. जमीनदार राजगोंड असून मांडला राजांच्या वेळेपासून ही जमीनदारी यांच्याकडे चालत आहे. उत्पन्न १३०० रू. व टाकोळी ३७५ रूपये