प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जॉनसन, डॉ. साम्युएल  (१७०९-१७८४) :- हा सुप्रसिद्ध ग्रंथकार व शब्दकोशकार इंग्लंडांतील स्टाफर्डशायरमध्यें लिचफील्ड गांवीं गरीब पण सालस व संभावित घराण्यांत जन्मला. जॉनसनचा बाप पुस्तकें विकणारा दुकानदार होता. जॉनसनला लहानपणीं 'स्काफ्युला' नांवाचा रोग झाला होता. तो अनेक औषधांनीं किंवा तत्कालीन समजुतीप्रमाणें, इंग्लंडची राज्यकर्त्री ॲन राणी हिच्या हस्तस्पर्शानेंहि बरा झाला नाहीं. जॉनसनचा आरंभीं विद्यभ्यास लिचफील्ड गांवीं झाला. त्याची बुध्दि अति चलाख व स्मरणशक्ति विलक्षण असल्यामुळें जें एकदां वाचलें किंवा ऐकिलें तें त्याच्या कायम लक्षांत राहात असे. तथापि तो शरीरानें भला भक्कम व धष्टपुष्ट असल्यामुळें उनाड पोरांच्या दांडगांईंत त्याचा पहिला नंबर असे. त्यामुळें शाळेंत मास्तरांचा मार त्याला वारंवार खावा लागे. या तत्कालीन शिक्षापद्धतीबद्दल जॉनसन शेवटपर्यंत म्हणें कीं, पंतोजीनें जर मला मरेमरेतों खूप मारलें नसतें तर  माझ्या हातून कांहीं शिकणें झालें नसतें. असो. पुढें १९ व्या वर्षी तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पेंब्रोक कॉलेजांत राहिला. पण पुढें तीन वर्षांनीं खर्च न झेपल्यामुळें डिग्री घेण्यापूर्वीच तो घरीं परत आला. तथापि लहानपणापासून बापाच्या दुकानांतले ग्रंथ वाचण्याचा नाद लागल्यामुळें जॉनसनला लॅटिन, ग्रीक, इटालियन या भाषांचें सुद्धां इतकें ज्ञान झालें होतें कीं, त्याच्या कॉलेजांतील प्रोफेसरहि अचंबा करीत असत.

याच सुमारास त्याचा बाप वारला. पुस्तकविक्रीचें दुकान चांगलें चालत नसल्यामुळें जॉनसननें चरितार्थाकरितां एका शाळेंत नोकरी धरली; पण तेथें न जमल्यामुळें त्यानें बर्मिंगहॅम येथें जाऊन 'अबिसिनिया देशाची सफर' या नांवाच्या फ्रेंच ग्रंथाचें भाषांतर करून पांच पौंड मिळविलें. पुढें एका लॅटिन कवीचे ग्रंथ छापण्याविषयीं जाहिरात त्यानें दिली पण  त्यास आश्रय मिळाला नाहीं. बर्मिंगहॅम येथें असतांना जॉनसनचा एका व्यापा-याच्या एलिझाबेथ पोर्टर नांवाच्या विधवेशीं प्रेम जमून विवाह झाला, त्यावेळीं त्या बाईचें वय जॉनसनच्या वयाच्या दुप्पट म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षांचें होतें. लग्नसमयीं बायकोकडून आठषें पौंड त्यास मिळालें, त्या पैशावर जॉनसननें एक स्वत:चें विद्यालय सुरू केलें. त्यांत इंग्लंडचा सुप्रसिद्ध नट गॅरिक हा एक विद्यार्थी होता, तो पुढें या जॉनसनजोडप्याच्या मजेदार नकला करीत असे. जॉनसनच्या अंगीं शिक्षकाला लागणारे गुण नसल्यामुळें त्याचें विद्यालय लवकरच मोडलें आणि या उद्योगांत जॉनसनला बायकोकडून मिळालेला सर्व ऐवजहि संपला.

पुढें स. १७३७ मध्यें जॉनसन, लेखणीवर चरितार्थ चालविण्याचें ठरवून गॅरिकसह लंडनला आला. येथें त्यानें फ्रेंच, इटालियन, लॅटिन वगैरे ग्रंथांचीं भाषांतरें, नव्या ग्रंथांवर टीका,प्रसिद्ध पुरूशांचीं चरित्र, निरनिराळया विषयांवर निबंध व कविता, नाटकारंभींच्या सामाजिक विज्ञापना, ग्रंथार्पणपत्रें, पुस्तकालयांतील ग्रंथांची विषयावार याद, याप्रम्राणें जो जो उद्योग सांपडेल तो तो त्यानें केला. तथापि लंडनमधील त्याचीं पहिलीं पंचवीस वर्षे विपत्तींतच गेलीं. पोटाची चिंता कधीं  सुटली नाहीं, कधी कधीं तर त्याला दोन दोन दिवस अन्नावांचून काढावें लागले. कर्जामुळें दोनदां नाझरच्या शिपायानें पकडलें असतां त्याला त्याचा मित्र प्रख्यात कादंबरीकार रिचर्डसन यानें उसन पैसे देऊन सोडविलें. अशा विपन्न स्थितींत त्याला ऐन उमेदीचे व भर तारूण्याचे दिवस काढावे लागले. तरी पण त्याची नीति व सदाचरण हीं सुटलीं नाहींत. जॉनसननें लंडनमध्यें आल्यावर 'लंडन' व 'मानवी' आशेचें वैफल्य' हीं दोन काव्यें, 'ऐरिन' नांवाचें नाटक, सॅव्हेज नामक मित्राचें चरित्र वगैरे ग्रंथरचना केली व तेवढयानें त्याची प्रसिध्दि बरीच झाली. नंतर १७४७ सालीं जॉनसनला लंडनमधील कित्येक पुस्तकवाल्यांनीं मिळून 'इंग्रजी भाषेचा कोश' तयार करण्यास सांगून १५७५ गिनी देण्याचें कबूल केलें. या कोषाला पूर्वसंकल्पित दोनतीन वर्षे न पुरतां ७।८ वर्षे लागलीं पण मोठया चिकाटीनें व परिश्रमपूर्वक जॉनसननें हा तीसचाळीस हजार शब्दांचा कोश तडीस नेला. या कोशांत कांहीं शब्दाचे फार चमत्कारिक अर्थ दिले आहेत. जॉनसन 'टोरी' पक्षाचा असल्यामुळें 'टोरी' म्हणजे परंपरागत धर्माला व राज्यव्यवस्थेला पाठिंबा देणारा, 'व्हिग' म्हणजे धर्माची व राज्याची उलथापालथ करणारा, 'कोशकार' म्हणजे. एक प्रकारचा निरूपद्रवी हमाल, 'देशभक्ति' म्हणजे सर्व प्रकारच्या लबाडयालाचाडया करून त्या फुकट गेलेल्या पाहून पाजी लोक ज्या शेवटच्या लबाडीचा उपयोग करतात ती लबाडी, वगैरे अर्थ दिले आहेत. तथापि हा इंग्रजी भाषेचा पहिलाच कोश असल्यामुळें येथपासून त्याची संपत्ति व कीर्ति हीं वाढत जाऊन त्याचें पुढील आयुष्य बरेंच सुखानें व स्वस्थतेंत गेलें.

कोशाच्या कामगिरीच्या काळांतच जॉनसननें  'रँबलर' व 'ऐडलर' हे दोन निबंधसंग्रह लिहिले. कोशानंतरचा ग्रंथ प्रसिद्ध कादंबरी 'रासेलस' हा होय. हिचें संविधानक अगदीं लहान व साधें असलें तरी भाषेचा भारदस्तपणा व डौल, वर्णनाची मोहक शैली व आयुष्यांतील स्थित्यंतराचें यथार्थ व चित्तवेधक विवेचन या गुणांमुळें ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली कीं लवकरच तिचें भाषांतर यूरोपांतल्या सा-या भाषांतून झालें. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनीं याचें उत्कृष्ट मराठी भाषांतर केलें आहे. १७६० सालापासून जॉनसनची सांपत्तिक स्थिति चांगली सुधारत गेली. तिस-या जॉर्ज राजानें मंत्रिमंडळाच्या सल्यावरून जॉनसनच्या ग्रंथकर्तृत्वाबद्दल त्याला सालीना तीनशें पौंड वर्षासन सुरू केलें. येथपासून जॉनसन तत्कालीन पंडितमंडळांत अग्रगण्य ठरून मोठमोठे विद्वान व ग्रंथकार त्याच्याशीं शिष्याप्रमाणें वागूं लागले. जॉनसनला वाद विवादाची विशेष  हौस असल्यामुळें याच सुमारास त्यानें एक क्लब काढला, तो 'जॉनसन्स क्लब' म्हणून ५०-६० वर्षें चालू होता. या क्लबांत जॉनसनचा समकालीन प्रसिद्ध राजकारणी पुरूष बर्क, इतिहासकार गिबन, नटवर्य गॅरिक, कादंबरीकार गोल्डस्मिथ, चित्रकार रेनॉल्डस्, प्रख्यात वक्ता फॉक्स, भाषाभिज्ञ सर विल्यम जोन्स वगैरे मंडळी असून ती दर आठवडयास एकदां एकत्र जमत व तेथें जेवण व संभाषण हीं दोन्ही कामें बरोबर चालत. संभाषण बहुधां जुन्या व नव्या ग्रंथकारांबद्दल चालें. जॉनसनचें चरित्र लिहिणारा सुप्रसिद्ध वॉसवेल हा या क्लबचा अनेक वर्षे सभासद होता व त्यानें जॉनसनच्या व त्याच्या मित्रमंडळीच्या भाषणरत्नांचा संग्रह 'जॉनसनचें चरित्र' या ग्रंथांत मोठया चातुर्यानें करून ठेवला आहे.

सांपत्तिक स्थिती सुधारतांच जॉनसनचा पोष्यवर्गहि वाढला. त्याची बायको स. १७५२ मध्येंच वारली होती पण जॉनसननें आपल्या घरीं कित्येक पंगु, निराश्रित स्त्रीपुरूषांनां आश्रय दिला होता. तो स्वत: मात्र थ्रेल नांवाच्या श्रीमंत इसमाच्या घरीं राहत असे. कारण मिस्टर व मिसेस थ्रेल यांनीं त्यास भक्तिपूर्वक ठेवून घेतलें होतें.

१७७३ सालीं जॉनसननें बॉसवेलबरोबर हिब्रेडीज बेटांची सफर केली व तिचें वर्णन प्रसिद्ध केलें. नंतर त्यानें शेक्सपीअसरच्या नाटकांची सटीक आवृत्ति मोठया प्रस्तावानेसह काढलीं. जॉनसनचा शेवटचा ग्रंथ 'कविचरित्रें' हा त्योनं १७७७ सालीं म्हणजे वयाच्या सत्तराव्या वर्षीं हातीं घेतला. त्यांत सॅव्हेज, कौले, ड्रायडन, पोप, ग्रे. मिल्टन वगैरे दहा कवींचीं चरित्रें लिहून स. १७८१ मध्यें ग्रंथ पुरा केला जॉनसनच्या एकंदर ग्रंथांत हा सर्वोकृष्ट असून तो ताबडतोब लोकप्रिय झाला. यापुढील जॉनसनच्या आयुष्‍यांचीं वर्षे इष्टमित्रांचें वियोगदु:ख व वार्धक्यक्लेश यांत जाऊन तो जलोदरानें स. १७८४ मध्यें मरण पवला. त्याचें शव वेस्टमिनिस्टरच्या विख्यात स्मशानभूमींत ठेवण्यांत आलें आणि त्याचा पुतळा सेंट पॉल चर्चमध्यें अग्रभागीं स्थापिला आहे. जॉनसनच्या मागें त्याची एक सावत्र मुलगी होती. त्यानें आपली सर्व जिंदगी व सुमारें पंधरा हजारांचा ऐवज आपल्या फार वर्षे जवळ असलेल्या शिद्दी चाकरास दिली. जॉनसनचें शरीर दांडगें होते, पण उतार वयांत तर तें अवजड, चेहरा शस्त्रक्रियेमुळें विद्रुप आणि त्यांची दृष्टी अधू बनली होती. शिवाय त्याला एक मेंदूचा रोग जडला होता त्यामुळें त्याचा स्वभाव त्रासिक व कांहींसा भ्रमिष्टासारखा बनला होता. तो मूळपासूनच तापट, सत्यप्रिय, निस्पृह व मानी होता. त्याची कल्पनाशक्ति फारशी सूक्ष्म व चलाख नसून बोजड व अवजड अशा त-हेची होती पण तर्क ऊर्फ विवेचनशक्ति मात्र विशेष  प्रखर बनली होती. त्यामुळेंच काव्यकादंबरीनाटक यापेक्षां टीकात्मक ग्रंथाबद्दल व वादविवादपटुत्वाबद्दल त्याची कीर्ति फार आहे. जॉनसन हा इंग्रजसमाजाचा प्रतिनिधिभूत इसम गणला जातो. म्हणजे जॉनसनच्या अंगचे गुण व त्याचप्रमाणें दोष हे सर्वसाधारणत: एकंदर इंग्रज समाजाच्या अंगीं दिसून येतात.

(बॉस्वेलनें स. १७९१ त प्रसिद्ध केलेलें जॉनसनचें चरित्र; मिसेस प्रिओझी, रेनॉल्डस् वगैरेंच्या आठवणीं; मेकालेच जॉनसनवरील निबंध  व त्याचाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीं निबंधमालेंत केलेला अनुवाद, इत्यादि संदर्भग्रंथ होत.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .