प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जाधव, माळेगांवकर :- हें घराणें धनाजी जाधवाच्या एका मुलापासून निघालें. धनाजीला दोन बायका होत्या. एकीचा मुलगा संताजी व दुसरीचे चंद्रसेन व शंभुसिंग. धनाजीनंतर चंद्रसेनास शाहूनें सेनापति करून शंभुसिंगास त्याची मुतालकी दिली. पुढें चंद्रसेन उघडपणें शत्रूस मिळाल्यावरून कांहीं दिवस शंभुहि त्याच्या बरोबरच शत्रूकडे होता. परंतु या दोघांत वितुष्ट येऊन शंभु हा शाहूछत्रपतीकडे आला. त्यानें त्याचा मान करून त्यास संभजीवरील एका स्वारींत प्रतिनिधीबरोबर पाठिवलें. तेथें त्यानें उत्तम कामगिरी केली जंजि-यावरिल एका स्वारींत प्रतिनिधीबरोबर शंभूस पाठविलें होतें. नंतर शाहूनें त्याला माळेगांव हें इनाम करून दिलें.  (स. १७३२.)  अद्यापि हा गांव या घराण्याकडे चालत आहे. कर्नाटकाच्या १७३९ तील स्वारींतहि हा हजर होता. हा इ.स. १७६० त मेल्यावर त्याचा मुलगा अमरसिंग यानें माळेगांवास राहून दौलतीचा कारभार केला. यानें कवि मोरोपंत पराडकरास आपल्या बरोबर काशीयात्रेस नेलें होतें. हा १८१७ त मरण पावला. त्याचा मुलगा रत्नसिंह हा १८७६ त मेल्यावर (याला इंग्रजीत २० हजारांचें उत्पन्न होतें ) त्याचा पुत्र अमरसिंह हा जहागिरीवर आला. तो १८७८ त वारला. त्यानंतर त्याचे दत्तक चिरंजीव शंभुसिंह हे हल्लीं विद्यमान जहागिर-दार आहेत.  (दळवी-मराठी कैफियती; वाड-कैफियती.)

वाघोलीकर :- हें घराणें पिलाजी जाधवाच्या वंशजांचें होय. पिलाजीस थोरल्या शाहूनें पुणें प्रांतीं मौजे दिवे व नांदेड या गांवीं जहागीर इनाम दिलें; पुढें कन्नड, फुलवारी वगैरे अवरंगाबाद प्रांतांतहि जहागीर मिळाली. दमाजी थोराताच्या हातून बाळाजी विश्र्वनाथास यानें सोडवून आणिलें. हा पेशव्यांच्या बरोबर पुष्कळ मोहिमांत हजर असे. निजामानेंहि याला गोळेगांव, मरकळ वगैरे गांव इनाम दिले. छत्रसालच्या वेळीं बाजीरावाबरोबर यानें मदत केल्यामुळें याला सागरप्रांतीं पांच गांव इनाम मिळाले. वसईचे मोहिमेंत कामगिरी बजावल्यानें तेथेंहि याला कांहीं इनाम मिळालें. नानासाहेब पेशवे याला काका म्हणत. पेशव्याचा व या घराण्याचा घरोबा विशेष होता. फौज व जातसरंजाम,स. १७१८ च्या सुमारास वाघोली वगैरे गांवांचा दीड लक्षांचा प्रथम मिळाला.  यास उत्तर हिंदुस्थानांतील महालांचें उत्पन्न लाखाचें होतें. एकूण फौजेस व जातीस अडीच लक्षांचा सरंजाम होता. पिलाजीस सटवाजी म्हणून पुत्र होता. त्याला सुभानजी व जोत्याजी या नांवाचे दोन पुत्र होते. जोत्याजीचा वंश वाडीस हयात आहे. सुभानजीचा वंश वाघोलीस नांदतो. त्याला संभाजी व मळोजी असे दोन पुत्र होते. संभाजीचा पुत्र पिलाजी व मळोजीचा पुत्र लक्ष्मणराव हे स. १८३२ त हयात होते. या दोघांस मिळून या साल अखेरीस कन्नड परगण्यांतून तेरा गांवांचे साडेचोवीस हजार व वाघोली परगण्यांच्या मोकाष्यांतून एक हजार तीनशे रूपये इतकी रक्कम मिळत असे. ( वाड-कैफियती)


वाडीकर :- पिलाजी जाधवाच्या वंशजांचें हें एक घराणें आहे. वाघोलीकर घराण्यांत याची थोडी माहिती आली आहे. पिलाजीचा पुत्र सटवाजी, त्याचा धाकटा पुत्र जोत्याची, त्याचा पुत्र लाडोजी; हा स. १८३२ मध्यें हयात होत. रावबाजीनें याच्या सर्व जहागिरींची जप्ती स. १८१५ च्या सुमारास केली होती; त्यामुळें १८३२ च्या सुमारास जात अगर फौजसरंजाम लाडोजांस कांहीं शिल्लक राहिला नाहीं; खासगत इनाम मात्र राहिलें. पुढें इंग्रजी झाल्यावर कंपनीनें कांहीं गांवें सोडून जहागिरीदाखल दिलीं. लाडोजीचा वंश हल्लीं वाडी, तालुके पुरंदर, जि. पुणें येथें नांदत आहे. (वाड-कैफियती)


शिंदखेडकर :- मोंगलाईंतील हें शिंदखेडचें घराणें आपणांस दौलताबादच्या यादवघराण्यापैकीं म्हणवितें. यांच्या कांहीं शाखा देऊळगांव, औरंगाबाद या भागांत आहेत. बहामनी राज्यांत गोविंदजी व ठाकूरजी जाधवांचीं नांवें येतात विठोजी जाधव हा तालिकोटच्या लढाईंत मुसुलमानांतर्फे लढत होता. लुखजीस पैठण परगण्यांतील लासनेर गांव इनाम होतें. शिंदखेड हें दौलताबाहेजवळ असून पूर्वी मेहकर सरकारांत मोडत असे. लुखजीनें शिंदखेडच्या मूळच्या ढोणे देशमुखास ठार मारून तेथील देशमुखी मिळविली. लुखजीस भुताजी म्हणून एक भाऊ होता. लुखजी हा फौजबंद सरदार होता. त्यानें निजामशहाची चाकरी केली. निजामशहानें त्याला शिंदखेड, पडतुर, खेरडें वगैरे प्रांत खाजगत खर्चास व फौजेच्या सरंजामास, त्याला पंचहजारी सरदार करून, वैजापुर, गांडापुर, फुलंबर, कन्नड, पैठण, मेहकर वगैरे महाल लावून दिले. त्याचा व निजामशहाचा फार घरोबा होता. त्याच्या बायकोनें एकदां शहाला भाऊबीजेची ओवाळणी केली; तेव्हां त्यानें दौलताबाद सरकारची देशमुखी इनाम दिली. लुखजीकडे २७ महाल व ५२ चावडयांचा अधिकार होता. लुखजीस चार पुत्र होते. त्यांनीं चार ठिकाणीं शाखा स्थापिल्या. दत्ताजीनें अडगांव, अचलोजीनें मेहुणें, बहादुरजीनें किनगांव व राघोजीनें शिंदखेड येथें आपलें ठाणें दिलें. शिंदखेडचीच शाखा पुढें देऊळगांवास आली. या गांवच्या पाटिलक्या व देशमुखी यांच्याकडे आहेत. लुखजीनें मलिकंबरास व-हाडचा भाग मोंगला  (दिल्लीवाले )  कडून परत मिळविण्यांत बरीच मदत केली होती. परंतु पुढें त्यांचें व अंबराचें वांकडें येऊन तो मोंगलास मिळाला. त्यामुळें दक्षिण व-हाडावर मोंगलाची पकड बसली. लुखजीचें मूळ नांव लक्ष्मणसिंह. चांदबिबीनें नगर लढविलें त्यावेळीं लुखजीनें शौर्य गाजविलें होतें. तिचा खून झाल्यावर व नगर मोंगलांच्या हातीं पडल्यावर लुखजीनें इतर सरदारांच्या मदतीनें अज्ञान निजामशहास संभाळून निजामशाही कांहीं दिवस वांचविली. यावेळीं तो दसहजारीं मनसबदार होता. याचवेळीं मालोजी भोंसले लुखजीच्या पदरीं राहिला (१५७७.) पुढें शिंदखेड येथें प्रसिद्ध रंगपंचमीची गोष्ट घडली. शिंदखेडास अद्यापि या घराण्याच्या मोठमोठया इमारती, महाल, समाधी, हौद, वगैरे पडक्या स्थितींत आहेत. त्यांपैकीं एका महालास रंगपंचमीचा महाल म्हणतात. या प्रसंगीं शहाजीं पांच वर्षांचा व जिजाबाई तीन वर्षांची होती. दोघे एकमेकांवर गुलाल फेंकू लागल्यानें ळुखजीनें विनोदानें हा जोडा ठीक शोभतो असें म्हंटलें तेंच खरें धरून मालोजीनें जिजाबाईची मागणी केली. परंतु लुखजीनें आपली बायको म्हाळसाबाई हिच्या आग्रहामुळें मागणीस रूकार दिला नाहीं. तेव्हां मालोजीनें द्रव्य व लौकिक मिळविला. निजामशहानें त्याला पंचहजारी राजे करून शिवनेरी वगैरे किल्ले व पुणें वगैरे प्रांत जहागीर दिला; अणि लुखजीस आग्रह करून जिजाबाई ही शहाजीस देवविली. हें लग्न खुद्द निजामशहाच्या देखरेखीखालीं झालें (१६०४.)   मालोजी जिवंत असेपर्यंत जाधव-भोसल्यांत भांडण नव्हतें. पुढें मूर्तिजा निजामशहा हा गादीवर आला, तेव्हां तो अज्ञान असल्यानें त्याची आई कारभार पाही; व ती शहाजीच्या तंत्रानें पाहीं; त्यामुळें त्याचें वजन वाढलें तें लुखजीस खपलें नाहीं. याच सुमारास शहाजहाननें त्याला आपल्या पक्षास मिळवून घेण्याची खटपट चालविली व त्याप्रमाणें लुखजी हा त्याला जाऊन मिळाला  (१६२१.)   शहाजाद्यासहि न मिळणारा मान, म्हणजे चोवीसहजारी   (२४ हजार स्वार व १५ हजार पायदळ )  मनसब शहाजहाननें त्याला दिली. नंतर मोंगल, लुखजीच्या साहाय्यानें दौलताबादेवर चालून आले. तेव्हां मूर्तिजा व त्याची आई यांस शहाजीनें तेथून काढून कल्याण जवळील माहुलीच्या किल्ल्यांत नेऊन ठेविलें आणि आपण मलिकअंबरासह मोंगलाशीं लढूं लागला. या वेळच्या भातवडीच्या लढाईत ( सन १६२४)  मलिकंबरानें मोंगलांचा  (लुखजीचाहि)   पराभव केला; लुखजी पळून गेल्यामुळें  वांचला.  पुढें लुखाजीनें माहुलीस वेढा दिला व मूर्तिजाची आई आपण होऊन त्याला मिळाली. तेव्हां शहाजीनें तेथून निघून दुसरीकडे धुमाकूळ घातला. याचवेळीं तो दौडत असतां जिजाबाई लुखजीच्या हातीं लागली. तिला त्यानें शिवनेरीस पोहोचवून दिलें. निजामशाही अजिबात न बुडतां मूर्तिजाचा मुलगा हुसेन हा गादीवर आला. त्यानें लुखजीस राजकारणाच्या मिशानें दौलताबादच्या किल्ल्यांत बोलावून आणलें व त्याचा खून केला (१६३०).  लुखजीनें निजामशहास त्याचा वजीर फत्तेखान याच्या त्रासांतून सोडविलें होतें. लुखजी आपल्याबरोबर आपला भाऊ जगदेव यास घेऊन सैन्यासह दौलताबादेस आला. ठरलेल्या दिवशीं आपले पुत्र, नातु, आप्त यांच्यासह तो किल्यांत गेला. तेथें त्याला आधीं नि:शस्त्र करून मग निजामशहाच्या भेटीस नेलें. दरबार झाल्यावर निजामशहा ऊठून गेला व एकदम बरेचसे मारेकरी लुखजी व त्याच्या मंडळीवर तुटून पडले. या मंडळीजवळ फक्त कटय्यारीच होत्या. शेवटपर्यंत लुखजी व त्याची मंडळीं यांनीं लढून शेवटीं प्राण दिलें. यावेळीं लुखजीचीं मुलें अचलोजी व राघेजी आणि नातु यशवंतराव हे मेले. ही बातमी समजतांच जगदेव व त्याचा मुलगा बहादुर आणि गिरीजा ऊर्फ म्हासळा ही मंडळी शिंदखेडास परत गेली. याच्या पूर्वीच  (स. १६२३) खंडागळयाच्या हत्तीच्या प्रकर्णावरून शहाजी व लुखजी यांच्यामध्यें जी कटकट ( भांडण)  झाली तींत लुखजीचा पुत्र दत्ताजी मारला गेला. यानंतर लुखजी मोंगलास जाऊन मिळाला व भातवडीची लढाई झाली. लखजीनेंच दौलताबादचा किल्ला मोठया युक्तीनें निजामशहाकरितां काबीज केला होता. लुखजी मेला तेव्हां त्याचें वय ८० होतें. पुढें भेतोजी ऊर्फ जगदेव यास मोंगलाने पंचहजारी मनसब दिली. त्याचा मुलगा बहादूर व नातु मानसिंग हेहि मोंगली मनसबदार होते. स. १६३३ च्या लढाईंत जगदेवानें मोंगलातर्फे निजामशहाविरूद्ध पराक्रम गाजविला होता. त्यामुळें लुखजीच्या देशमुखीसनद व जहागीर जगदेवाला मिळाली व शिवाय रूस्तुमराव हा किताब मिळाला. जगदेवाच्या वेळीं जिजाबाई बालशिवाजी सह एकदां माहेरीं आली होती. लुखजीचा मुलगा बहादूर यास जगदेवानें दत्तक घेतलें होतें. त्याचें घराणें किनगांव राजा येथें नांदत आहे. मानसिंग रूस्तुमरावाची मुलगी थोरल्या शाहूस ( अवरंगझेबाच्या कैदेंत असतां.)  दिली होती. तिचें नांव अंबिकाबाई ( माहेरचें राजसबाई )  होतें.  ही थोडयाच दिवसांत मेली. मानसिंग मोंगलाकडेच राहिला.

लुखजीचा पुत्र अचलोजी दौलताबादच्या दंग्यांत मेला. त्याचा पुत्र संताजी ( सुजनसिंह)  व अचलोजीची बायको यांसह म्हासळाबाई शिवाजीकडे गेली. संताजी हा संभाजी  (शिवाजीचा वडील भाऊ)  बरोबर कनकगिरीच्या लढाईंत ठार झाला. त्याचा मुलगा संभाजी तो शिवाजीच्या कार्यांत हातभार लावीत असे.

लुखजीचा वडील पुत्र दत्ताजी, याची शाखा अडगांव येथें आहे. तिची विशेष  प्रसिध्दि नाहीं. लुखजीच्या सर्वांत धाकटा पुत्र राघोजी हा देऊळगांव येथें असे. या शाखेपैकीं दत्ताजी हा मोंगलाकडेच होता. त्याच्यातर्फे लढतांना कर्नाटाकांत हा स. १६६४ त मेला. त्याचा मुलगा जगदेव; यानेंच देऊळगांव येथें बालाजीचें देवस्थान स्थापिलें. देऊळगांवांस यानें गढी, वाडे, पेठा वगैरे वसविल्या. यास मोंगलाकडून छत्री-चवरीचा मान होता. हा १६९९ त मेला. हा गिरीच्या बालाजीचा भक्त होता. त्यानें शिंदखेडास बालाजीची स्थापना केली. देऊळगांवची मूर्ति अंगुष्ठप्रमाण पंचधातूची आहे. संस्थान हल्लीं पंचांच्या ताब्यांत असून, त्याचें उत्पन्नहि बरेंच आहे. जगदेवाला राघोजी म्हणून मुलगा होता. त्यास सातारकर राजाराम छत्रपति याची कन्या अंबिकाबाई दिली होती. आंदण म्हणून राजारामानें शिंदखेड, शिरपुर, मेहकर वगैरे गांवचे सरदेशमुखी हक्क जांवयास दिले. साखरखेडें येथें निजाम व दिल्लीचा सरदार मुबारीज यांच्यांत जी लढाई झालीं तींत राघोजी हा मुबारीजच्या बाजूनें लढत असतां मेला  (१७२४).  पुढें निजामानें शिंदखेड व देऊळगांव येथें राघेजीच्या कुटुंबास पकडण्यास प्रयत्न केला असतां; त्याची आई दुर्गा, बायको अंबिका व पुत्र मानसिंग हे तेथून निसटून साता-यास शाहूच्या आश्रयास गेले. कांहीं दिवसांनीं शाहूनें निजामाची समजूत करून मानसिंगाची जहागीर  ( निजामानें जप्त केली होती ती )  सोडविली. शाहूच्या पश्चात मानसिंग हा ताराबाईच्या पक्षास मिळाला व रामराजाच्या विरूद्ध कारस्थान करूं लागला. पुढें  (१७५१)   ताराबार्इ्रचा व पेशव्यांचा तह झाल्यावर हा देऊळगांवकडे निघून गेला. या शाखेंतील अखेरचा प्रसिद्ध पुरूष बाजीराव होय. त्याच्या हाताखाली अरब शिबंदी होती. एकदां त्याची व इंग्रजांच्या सैनाती फौजेची लढाई होऊन कांहीं इंग्रज अधिकारी मारले गेले. या भांडणांत आपला काहीं संबंध नसून अरबांचा पगार थकल्यामुळें ते इंग्रजावर उलटले असें बाजीराव म्हणे (अशीं उदाहरणें पगार थकल्यामुळें सैन्यानें दंगल माजविल्याचीं त्याकाळीं पुष्कळ घडत असत.) परंतु त्याचें म्हणणें न ऐकतां त्याचें सर्व वतन खालसा करून  ( स. १८५१) त्याला मरेपर्यंत दौलताबादच्या किल्यांत कैदेंत ठेविलें  (१८५९.) त्याचा औरस मुलगा मानसिंग व लेकवळा रासोजी होता. या रासोजीनें बाजीरावाची निजामकडील जहागीर खटपट करून सोडविली. त्याचें वजन सहन न होऊन मानसिंगाची आई अहिल्याबाई व तिचे कारभारी यांनीं त्याला विषप्रयोग केला असें म्हणतात (स. १८६९.)  एवढेंच नव्हें तर कारभा-यांनीं मानसिंगासहि थोडया दिवसांनीं विषप्रयोग केला  ( स. १९७८.) मानसिंगाचा मुलगा बाजीराव हा स्त्रैण व व्यसनी होता, तो   (१९०६) औरंगाबादेस एकाएकीं वारला. हल्लीं दत्ताजीराव ( बाजीरावाचा पुतण्या)   व बाजीरावाचा पुत्र आंनदराव हे हयात आहेत. या जाधव घराण्यांतील इमारती वगैरेंच्या खुणा शिंदखेड, देऊळगांवराजा, जानेफळ, किनगांवराजा, अडगांवराजा व मेहुण येथें आढळतात. जगदेवानें  (पहिल्या) शिंदखेडास एक तलाव, वाडा व गांवास काळाकोट बांधला. देऊळगांवास जगदेवाच्या ( तुळजाऊ)  बायकोची मोतीसमाध नांवाची सुंदर इमारत आहे. जानेफळास जाधवांची एक गढी. साखरखेडयास मानसिंहानें बांधलेली वेस व शिंदखेडास लुखजीची समाधि आहे.


(संदर्भग्रंथ  :- फेरिस्ता; जाधव घराण्याची कैफियत; भारत वर्ष- शिवाजीची बखर; नव्वद कलमी बखर; अहमदनगर गॅझेटियर; खरे-मालोजी व शहाजी; तंजावरचा रूशिलालेख; बुसातिने सलातीन; पातशहानामा; डफ; चिटणिशी बखर; राजवाडे खं. ६; काळे- व-हाडचा इतिहास.)

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .